Monday, 7 November 2016

नमस्कार लाईव्ह ०७-११-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- US ELECTION: मतदान केलंत तर कत्तल करु, ISIS ची धमकी
२- अनिश्चित मते मिळविण्यासाठी क्लिंटन, ट्रम्प यांची शेवटची धडपड
३- चीनच्या नाकावर टिच्चून भारताने लडाखमध्ये टाकली पाइपलाइन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- जेएनयूमध्ये शस्त्रास्त्रांनी भरलेली काळी बॅग सापडली 
५- भारतातील स्मार्टफोनमध्ये प्रादेशिक भाषेतील कीबोर्ड बंधनकारक 
६- जुन्या अटींवर दाऊद भारतात येण्यास तयार : केसवानी 
७- अलर्ट ! फक्त 10 महिन्यांत 76 वाघांचा मृत्यू 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
८- पुण्यातील SRPF मैदानावर सरावादरम्यान पोलिसाचा मृत्यू 
९- दहावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल होणार! 
१०- मुंबईकरांची एसी लोकल पहिल्यांदाच स्वतःच्या यंत्रणेसह रुळावर 
११- 'बेळगावातील हैदोस, महाराष्ट्रालाही मनगट आहे', सामनातून भाजपवर टीकेचे बाण 
१२- राज्यभर थंडीची लाट, नाशिकनंतर मराठवाडाही गारठला 
१३- टाटा समूहाच्या मुख्यालयावर पत्रकारांचा आज मोर्चा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- चारित्र्याच्या संशयावरुन पुण्यात पत्नीची हत्या, पतीला अटक 
१५- शहीद राजेंद्र तुपारेंचं पार्थिव आज कोल्हापुरातील मूळगावी आणणार 
१६- पाटणा; रुळ ओलांडताना रेल्वेची धडक, सहा जणांचा मृत्यू 
१७- मुंबई; भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांचं निधन 
१८- बेळगाव; सराफा दुकानातून मंगळसूत्र लांबवणाऱ्या तिघी सीसीटीव्हीत कैद
१९- एकविरा देवीच्या पायथा मंदिरात चोरी, साडेसहा लाखांचा ऐवज चोरीला 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- वासुदेव गायतोंडे यांचे 50 कोटीचे चित्र चोरीला 
२१- दिवाळी सेलमध्ये LeEceoचा रेकॉर्ड, 350 कोटींची कमाई! 
२२- आठ खेळाडूंना शासकीय नोकरी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html

==========================================

पुण्यातील SRPF मैदानावर सरावादरम्यान पोलिसाचा मृत्यू

पुण्यातील SRPF मैदानावर सरावादरम्यान पोलिसाचा मृत्यू
पुणे : पुण्याच्या हडपसर इथल्या एसआरपीएफ मैदानावर आज एका पोलिस कॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. राम नागरे असं मृत पोलिसाचं नाव आहे.

पोलिस खात्याअंतर्गत होणाऱ्या उपनिरीक्षक पदासाठी सरावादरम्यान राम नागरे मैदानावरच कोसळले. त्यांना जवळच्या नोबेल रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगिलं.

कॉन्स्टेबल राम नागरे सध्या नियंत्रण कक्षात कार्यरत होते. पोलिस खात्यातंगर्त पोलिस उपनिरीक्षकपदाच्या लेखी परीक्षेत राम नागरे यांना 218 गुण मिळाले होते. तर येत्या 21 नोव्हेंबर रोजी  शारीरिक परीक्षा होणार आहे.

शारीरिक परीक्षेच्या सरावासाठी राम नागरे हडपसरच्या एसआरपीएफ मैदानावर दाखल झाले होते. मात्र हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

==========================================

चारित्र्याच्या संशयावरुन पुण्यात पत्नीची हत्या, पतीला अटक

चारित्र्याच्या संशयावरुन पुण्यात पत्नीची हत्या, पतीला अटक
शिरुर: पुण्यातील शिरुरमध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनं हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे.

शिरुर मधील रामलिंग येथे राहणाऱ्या सीताराम घावटे यांने पत्नी रुपालीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा साडीने गळा आवळून खून केला. हत्येनंतर त्यानं पत्नी रुपालीचा मृतदेह १० किमी दूर एका शेतात टाकून दिला. रुपालीचा मृतदेह शेतात आढळून आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरु केली.

दरम्यान, चौकशीअंती रुपालीचा पती आरोपी सीताराम घावटे याला अटक करुन त्याच्यावर कलम- ३०२,२०१ अंर्तगत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

==========================================

वासुदेव गायतोंडे यांचे 50 कोटीचे चित्र चोरीला

वासुदेव गायतोंडे यांचे 50 कोटीचे चित्र चोरीला
मुंबई: प्रख्यात चित्रकार वासुदेव गायतोंडे यांचं सुमारे 50 कोटी किमतीचं जगविख्यात चित्र चोरी झाल्याची तक्रार मुंबईतल्या वरळी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
निर्लॉन हाऊस या कंपनीच्या कार्यालयात लागलेलं हे चित्र अमेरिकेच्या एका गॅलरीमध्ये पाहिल्याची तक्रार कंपनीचे संचालक जनक मथुरादास यांनी दिली आहे.
1960 साली तयार केलेलं हे चित्र हे निर्लॉन हाऊसची शान मानलं जायचं. पण आता निर्लॉन हाऊसमध्ये असलेलं चित्र हे बनावट असल्याची शंका त्यांना आली आहे.
दरम्यान, वरळी पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
वासूदेव गायतोंडे यांची यापूर्वीची चित्रंही कोट्यवधी रुपयांना विकले गेले आहेत.

==========================================

जेएनयूमध्ये शस्त्रास्त्रांनी भरलेली काळी बॅग सापडली

जेएनयूमध्ये शस्त्रास्त्रांनी भरलेली काळी बॅग सापडली
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ अर्थात जेएनयू पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. जेएनयूमध्ये शस्त्रास्त्रांनी भरलेली काळी बॅग सापडली आहे.

जेएनयू कॅम्पसमध्ये रात्री दोनच्या सुमारास नॉर्थ गेटपासून 50 मीटर अंतरावर एक काळी बॅग असल्याचं सुरक्षरक्षकाच्या निदर्शनास आलं. या बॅगमध्ये 7.56 ची देशी पिस्तुल, 7 काडतुसं आणि 1 स्क्रू ड्रायव्हर सापडला.

यानंतर जेएनयूच्या कंट्रोल रुमला माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात आर्म्स अक्ट अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.

==========================================

रुळ ओलांडताना रेल्वेची धडक, सहा जणांचा मृत्यू

रुळ ओलांडताना रेल्वेची धडक, सहा जणांचा मृत्यू
पाटणा : बिहारच्या दरभंगामध्ये छठ पर्वाच्या समारोप उत्सवावर शोककळा पसरली. छठ पूजेहून परतताना महिला भाविकांना अपघात झाला. रामभद्रपूर स्टेशनजवळ रेल्वे रुळ ओलांडताना सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

या महिला मुलांसह छठ पूजा करुन परतत होत्या. मात्र रामभद्रपूर स्टेशनजवळ स्वतंत्रता सेनानी ट्रेनने धडक दिल्याने दोन मुलं आणि चार महिलांसह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर नागरिक संतप्त झाले आहे. मृतदेह रेल्वे रुळवर ठेवून नागरिक रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलन करत आहेत. याशिवाय दरभंगा-समस्तीपूर यादरम्यानची रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

==========================================

जुन्या अटींवर दाऊद भारतात येण्यास तयार : केसवानी

जुन्या अटींवर दाऊद भारतात येण्यास तयार : केसवानी
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम त्याच्या जुन्या अटींवर भारतात येऊ शकतो, असा दावा दाऊदचे वकिल श्याम केसवानी यांनी केला आहे. त्यासाठी दाऊदशी चर्चा करावी लागेल, असंही केसवानी यांनी सांगितलं.
दाऊदने पाच वर्षांपूर्वी ऑर्थर रोड जेलमध्ये न ठेवण्याच्या अटीवर भारतात येण्यासाठी सहमती दर्शवली होती. मात्र तत्कालीन सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली नाही, असा खुलासा केसवानी यांनी केला.
दाऊद भारतात येण्यासाठी तयार आहे. मात्र त्याला ऑर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात येऊ नये, अशी अट दाऊदच्या हस्तकाने लंडनमध्ये माजी मंत्री राम जेठमलानी यांच्यासमोर ठेवली होती. तत्कालीन सरकारने अबू सालेम आणि छोटा राजन यांच्या अटी स्विकारल्या मात्र, दाऊदच्या अटींकडे दुर्लक्ष केलं, असा खुलासाही केसवानी यांनी केला आहे.
अबू सालेमने फाशीच्या शिक्षेचा आरोप लावू नये, अशी अट ठेवली होती. तर छोटा राजनने तिहार जेलमध्ये न ठेवण्याची अट ठेवली होती. या दोन्हीही अटी सरकारने मान्य केल्या. मात्र दाऊदच्या अटीकडे गांभिर्याने पाहिलं जात नसल्याची खंत केसवानी यांनी व्यक्त केली.
दाऊदने ठेवलेली अट किरकोळ आहे. मात्र सरकार तरीही दाऊदला भारतात आणायला तयार नाही. यामागे दुसरंच काही कारण आहे का, अशी शंकाही केसवानी यांनी उपस्थित केली.
दरम्यान दाऊदला भारतात आणण्यासाठी त्याच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे. दाऊदला सुरक्षा पुरवली तर तो भारतात येईल. कारण यापूर्वीही सुरक्षेच्या अटीवरच दाऊदने भारतात येण्यास सहमती दाखवली होती, असा दावा केसवानी यांनी केला.

==========================================

Sunday, 6 November 2016

नमस्कार लाईव्ह ०६-११-२०१६सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, दोन जवान शहीद 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
२- रोनेन सेन यांचे मिस्त्रींवर टीकास्त्र
३- सेन्सेक्स आणखी १५६ अंकांनी घसरला
४- जीएसटी कौन्सिलमध्ये मतभेद कायम 
५- काश्मीरमध्ये शाळांची जाळपोळ करणारे काश्मीरचेच नव्हे तर मानवतेचेही शत्रू. - ओवेसी 
६- दिल्ली- कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी अरविंद केजरीवाल केंद्र सरकारशी करणार चर्चा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
७- वेगळ्या विदर्भाची मागणी आता मोठ्या पडद्यावर, 'खुर्द बुद्रूक' रिलीज 
८- दिवंगत शरद जोशींचा अर्थविचार राजकारणाला कलाटणी देणारा : गडकरी 
९- जलसंधारणाचा चार गाव पॅटर्न सह्याद्री वाहिनीवर 
१०- दिल्ली- राजधानीतील प्रदूषणामुळे पुढचे तीन दिवस सर्व शाळा राहणार बंद 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
११- कोकणात राष्ट्रवादीला भगदाड, सुनील तटकरेंच्या पुतण्याचा सेनेत प्रवेश 
१२- मुंबईत शिस्तबद्ध पद्धतीने मराठा समाजाची बाईक रॅली 
१३- औरंगाबाद- फटाका मार्केट आगप्रकरणी फटाका असोसिएशनवर गुन्हा दाखल 
१४- अकोला : नवजात मुलीचं रामदास पेठ पोस्ट हद्दीत सापडले अर्भक 
१५- दिल्ली- इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2 कोटींची हेरॉईन जप्त 
१६- हरियाणा- धुरक्यामुळे रोहतकमध्ये रस्त्यावर अपघात, तीन जणांचा मृत्यू, दोघे जखमी 
१७- उस्मानाबाद; शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविक-सुरक्षारक्षकांमध्ये दर्शनावरुन मारहाण 
१९- युवीने आपल्या लग्नपत्रिकेला दिला क्रिकेट टच !
२०- धुरक्यामुळे दिल्लीत सुरू असलेला बंगाल आणि गुजरातमधील रणजी सामना रद्द.   
२१- मधुरा वायकरला सुवर्ण तर ऋतूजा सातपुतेला रौप्य 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
==================================

कोकणात राष्ट्रवादीला भगदाड, सुनील तटकरेंच्या पुतण्याचा सेनेत प्रवेश 

कोकणात राष्ट्रवादीला भगदाड, सुनील तटकरेंच्या पुतण्याचा सेनेत प्रवेश
मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा पुतण्या संदीप तटकरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. संदीप तटकरे हे सुनील तटकरेंचे बंधू अनिल तटकरेंचे सुपुत्र आहेत.
आज दादरच्या शिवसेनाभवनात संदीप तटकरेंनी सेनेत प्रवेश केला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री अनंत गिते, आमदार भरत गोगावले आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर उपस्थित होते. संदीप तटकरेंचा शिवसेना प्रवेश कोकणात राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनील तटकरेंच स्थान मोठं असल्यानं त्यांच्यासाठी हा फार मोठा धक्का आहे. दरम्यान संदीप तटकरेंच्या प्रवेशावेळी ‘घडाळ्याचा काटा अडकला, भगवा झेंडा फडकला’च्या घोषणा शिवसैनिकांकडून देण्यात आल्या.

==================================

वेगळ्या विदर्भाची मागणी आता मोठ्या पडद्यावर, 'खुर्द बुद्रूक' रिलीज

वेगळ्या विदर्भाची मागणी आता मोठ्या पडद्यावर, 'खुर्द बुद्रूक' रिलीज
नागपूर : वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाला अजून धार आण्यासाठी खास सिनेमाचं प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘खुर्द बुद्रूक’ या सिनेमाच्या माध्यमातून वेगळ्या राज्याच्या मागणीचे जनजागरण केलं जाणार आहे. जनमंच या विदर्भवादी संघटनेचा हा उपक्रम आहे.
आमगाव म्हणजे विदर्भाचे प्रतिक असलेले गाव आणि खामगाव म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचे प्रतिक असलेले गाव. या दोन गावांच्या कहाणीच्या माध्यमातून विदर्भावर झालेला अन्याय हा समोर आणण्याचा प्रयत्न या सिनेमातून करण्यात आला आहे. अगदी महाराष्ट्र बनला तेव्हापासून अनेक तथाकथित सत्याची कशी तोडमरोड करण्यात आली आहे, याचे दर्शनसुद्धा या सिनेमातून झाले आहे.
या सिनेमाची निर्मिती जरी जनमंचने केली असली, तरीही यातील सर्व वैदर्भीय मंडळींनी मात्र आपली सेवा आणि स्किल हे मोफत दिले आहे. पैसे लागले ते फक्त मुंबईहुन बोलावलेल्या टेक्निकल टीम साठी. आता हा सिनेमा विदर्भभर प्रदर्शित होणार आहे.


==================================

दिवंगत शरद जोशींचा अर्थविचार राजकारणाला कलाटणी देणारा : गडकरी

दिवंगत शरद जोशींचा अर्थविचार राजकारणाला कलाटणी देणारा : गडकरी
पुणे : शेतकरी कमागार नेते दिवंगत शरद जोशी यांना राजकारणात लौकिक अर्थाने यश मिळालं नाही. मात्र, त्यांनी मांडलेला अर्थविचार हा संपूर्ण राजकारणाला कलाटणी देणारा होता, असे मत केंद्रीय दळववळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते पुण्यात पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
शरद जोशी यांच्यावरील ‘शरद जोशी : शोध अस्वस्थ कल्लोळाचा’ या पुस्तकाचं पुण्यात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
या पुस्तकात लेखिका वसुंधरा काशीकर-भागवत यांनी शरद जोशी यांच्या झंझावती आणि वादळी जीवनाचा आढावा घेतला आहे. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला शरद जोशींसोबत काम केलेल्या माजी आमदार सरोज काशीकर, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, अर्थविषयांचे अभ्यासक राजीव साने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

नमस्कार लाईव्ह ०६-११-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेत संशयित व्यक्ती घुसल्याने गोंधळ; डोनाल्ड ट्रम्प यांना स्टेजवरून उतरवले 
२- तुमचा हात हाच तुमचा पासवर्ड, पीन आणि सिग्नेचर; इन्फ्रारेड स्कॅनरवर कधीच चोरीला न जाणारी यंत्रणा 
३- ‘आॅपरेशन ब्लू स्टार’मधील ब्रिटनची भूमिका स्पष्ट करा : लेबर पार्टी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- 'एनडीटीव्ही'नंतर आणखी दोन चॅनलवर बंदीची कारवाई 
५- पेट्रोल प्रति लीटर 89 पैसे, तर डिझेल प्रति लीटर 86 पैसे महाग 
६- सिंचनाचे बजेट ५० हजार कोटींचे करा- गडकरी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
७- रेल्वे पोलिसांना जनजागृतीसाठी सापडला नवा पोस्टरबॉय 
८- अक्षय कुमारकडून यवतमाळमधील आत्महत्याग्रस्त गाव दत्तक 
९- मनी लाँडरिंग प्रकरणी राज्याचे माजी मुख्यमंत्री ईडीच्या रडारवर? 
१०- सरकारविरोधात हक्कभंग दाखल करणार: विखे पाटील 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
११- जोगेश्वरी; चुकीच्या माहितीवर याचिका करणाऱ्या रिक्षाचालकाला दंड 
१२- मराठा मोर्चाचं वादळ मुंबईत 
१३- मुलुंडचं गणेश मंदिर अनधिकृत, आरपीएफचा भांडाफोड 
१४- औरंगाबादमधील मिटमिटा तलावात तिघे जण बुडाले, दोघांचे मृतदेह सापडले 
१५- रायगड; सुनील तटकरेंच्या घरात फूट, पुतण्याचा शिवसेनेत प्रवेश
१६- पुणे; प्रसिद्ध उद्योगपती विठ्ठल कामत यांच्या ऑर्किड हॉटेलवर जप्ती 
१७- दिल्ली: 15 वर्षीय मुलीवर 7 जणांचा बलात्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- विराटच्या बर्थडे सेलिब्रेशनला अनुष्काची हजेरी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html



===================================

डोनाल्ड ट्रम्प यांना स्टेजवरून उतरवले


  • अमेरिका, दि. 6 - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना सिक्रेट सर्व्हिस एजंटनं सुरक्षेच्या कारणास्तव चक्क स्टेजवर घेराव घालून त्यांच्याभोवती सुरक्षेचे कडे निर्माण केले. नेवाडा येथे एका रॅलीमध्ये डोनाल्ड ट्रम्प भाषण करत होते. मात्र त्याचदरम्यान सिक्रेट सर्व्हिस एजंटचे काही अधिकारी स्टेजवर आले आणि त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षेसाठी स्टेजवरून खाली उतरवून सुरक्षाकडे निर्माण केले.
    विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेला मोठी गर्दी होती. त्याच गर्दीतून डोनाल्ड ट्रम्प यांना स्टेजवरून खाली उतरवल्यानं उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला. मात्र काही मिनिटांनंतर पोलीस टक्कल असलेल्या एका संशयिताला बेड्या ठोकून घेऊन गेले. या संशयितापासून डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीविताला धोका असण्याची शक्यता सिक्रेट सर्व्हिस एजंटनं व्यक्त केली आहे.
    दरम्यान त्यानंतर ट्रम्प पुन्हा स्टेजवर आले आणि म्हणाले, "हे सोपे असेल, असं मला कोणीच सांगितले नव्हतं. मात्र आता आम्ही थांबणार नाही. मी सिक्रेट सर्व्हिसचे आभार मानू इच्छितो. त्यांनी त्यांचे काम उत्तमरीत्या केलं आहे," असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण संपवलं.
===================================

'एनडीटीव्ही'नंतर आता 'या' दोन चॅनलवर बंदी

  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. 6 - भारतातले लोकप्रिय हिंदी न्यूज चॅनल एनडीटीव्ही इंडियावर एका दिवसाची बंदी घालण्यात आल्यानंतर केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाने आणखी दोन चॅनलवर बंदी घातली आहे. 'न्यूज टाइम आसाम' आणि 'केअर वर्ल्ड टीव्ही' चॅनलच्या प्रक्षेपणावर बंदी घातली आहे, असं वृत्त बिझनेस स्टॅडर्डनं दिलं आहे.
    'न्यूज टाइम आसाम'वर प्रोग्रॅमिंग मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 9 नोव्हेंबरला एका दिवसासाठी बंदी घालण्यात आली आहे. 'न्यूज टाइम आसाम'नं एका अल्पवयीन मुलीचा परिचय देताना तिची ओळख सार्वजनिक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर 'केअर वर्ल्ड चॅनल'वर आक्षेपार्ह माहिती दिल्याचा ठपका ठेवत तब्बल 7 दिवस चॅनल बंद ठेवण्याचे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून जारी करण्यात आले आहेत.
    तत्पूर्वी 9 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजेपासून 24 तासांसाठी एनडीटीव्ही इंडिया या चॅनलचं प्रसारण बंद असणार आहे. पठाणकोट हल्ल्यावेळी एनडीटीव्ही इंडियाने केलेलं कव्हरेज हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे. त्यांनी दाखवलेल्या माहितीचा दहशतवादी वापर करू शकत होते, अशा प्रकारची माहिती जाहीर करणं हे देशाच्या सुरक्षेला बाधा पोहोचवणारं असल्याचा ठपका एनडीटीव्हीवर ठेवण्यात आला होता. आता 9 नोव्हेंबरला एकंदरीत तीन चॅनलवर बंदी असणार आहेत. मात्र चॅनलवर अशा प्रकारे बंदी घातल्यानं लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय घाला घालत असल्याची भावना सोशल मीडियावरून व्यक्त केली जातं आहे.

===================================

चुकीच्या माहितीवर याचिका करणाऱ्या रिक्षाचालकाला दंड

मुंबई : जोगेश्वरीमधील एका पुनर्विकास प्रकल्पात बिल्डरने कायदेशीर प्रक्रिया डावलून बांधलेल्या १९ मजली निवासी इमारतीला मुंबई महापालिकेनेही कायदेशीर प्रक्रियेविरूद्ध परवानगी दिल्याचा दावा करत चुकीची जनहित याचिका केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने एका रिक्षाचालकाला एक लाख रूपयांचा दंड ठोठावून दंडाची रक्कम चार आठवड्यात टाटा कॅन्सर रिसर्च सोसायटीला देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले.
जोगेश्वरी येथील सर्व्हे क्रमांक १२ क हा भूखंड महापालिकेच्या प्राथमिक शाळेसाठी राखीव होता. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेविना आरक्षण बदलता येत नाही आणि त्यावर निवासी इमारतींचे बांधकाम करता येत नाही. तरिही महापालिकेने एम.एम. कॉर्पोरेशन या विकासकाला बांधकामाची मंजुरी दिल्याचा दावा करत संजय चव्हाण यांनी ही जनहित याचिका केली होती. एमआरटीपी कायद्यातील तरतुदींप्रमाणे आवश्यक कायदेशीर प्रक्रिया केलीच नाही, असा दावा चव्हाण यांनी याचिकेद्वारे केला. या भूखंडावर पूर्वी एकमजली इमारत होती. त्यात प्राथमिक शाळा आणि काही भाडेकरू होते. त्यांना धमकावून करार करून घेतले, असा युक्तिवादही याचिकादारातर्फे करण्यात आला होता.
मात्र, हा भूखंड १९९४ मध्ये विकत घेतला होता. त्यातील काही भागात शाळा आणि बगिचाचे आरक्षण होते. त्याप्रमाणे विकास नियंत्रण नियमावलीतील नियम ११(२) अन्वये निवासी इमारतीच्या बांधकामाला सर्व आवश्यक कायदेशीर मंजुरी मिळवूनच बांधकाम केले. शिवाय महापालिकेला शाळा आणि बगिच्याची जागाही अधिकृतपणे हस्तांतरित केली. शिवाय या भूखंडाला एमआरटीटी कायद्यातील तरतुदी लागूच होत नाहीत, असा युक्तिवाद बांधकाम कंपनीतर्फे ज्येष्ठ वकील एस.यू. कामदार यांनी केला.
रिक्षाचालक संजय चव्हाण यांच्यामार्फत हेमंत दलाल, अशोक देशमुख, अश्विन हिरानी आणि हिना श्रॉफ यांनी ही याचिका चुकीच्या माहितीवर आधारित केल्याचे निदर्शनाश आल्याने न्यायालयाने टाटा कॅन्सर रिसर्च सोसायटीला चार आठवड्यांत एक लाख रुपये देण्याच आदेश दिले. महापालिकेतर्फे अ‍ॅड. तृप्ती पुराणिक यांनीही सर्व मंजुरी कायद्यानुसारच असल्याचा युक्तिवाद प्रतिज्ञापत्रांच्या आधारे मांडला. 

===================================