[अंतरराष्ट्रीय]
१- डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेत संशयित व्यक्ती घुसल्याने गोंधळ; डोनाल्ड ट्रम्प यांना स्टेजवरून उतरवले
२- तुमचा हात हाच तुमचा पासवर्ड, पीन आणि सिग्नेचर; इन्फ्रारेड स्कॅनरवर कधीच चोरीला न जाणारी यंत्रणा
३- ‘आॅपरेशन ब्लू स्टार’मधील ब्रिटनची भूमिका स्पष्ट करा : लेबर पार्टी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- 'एनडीटीव्ही'नंतर आणखी दोन चॅनलवर बंदीची कारवाई
५- पेट्रोल प्रति लीटर 89 पैसे, तर डिझेल प्रति लीटर 86 पैसे महाग
६- सिंचनाचे बजेट ५० हजार कोटींचे करा- गडकरी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
७- रेल्वे पोलिसांना जनजागृतीसाठी सापडला नवा पोस्टरबॉय
८- अक्षय कुमारकडून यवतमाळमधील आत्महत्याग्रस्त गाव दत्तक
९- मनी लाँडरिंग प्रकरणी राज्याचे माजी मुख्यमंत्री ईडीच्या रडारवर?
१०- सरकारविरोधात हक्कभंग दाखल करणार: विखे पाटील
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
११- जोगेश्वरी; चुकीच्या माहितीवर याचिका करणाऱ्या रिक्षाचालकाला दंड
१२- मराठा मोर्चाचं वादळ मुंबईत
१३- मुलुंडचं गणेश मंदिर अनधिकृत, आरपीएफचा भांडाफोड
१४- औरंगाबादमधील मिटमिटा तलावात तिघे जण बुडाले, दोघांचे मृतदेह सापडले
१५- रायगड; सुनील तटकरेंच्या घरात फूट, पुतण्याचा शिवसेनेत प्रवेश
१६- पुणे; प्रसिद्ध उद्योगपती विठ्ठल कामत यांच्या ऑर्किड हॉटेलवर जप्ती
१७- दिल्ली: 15 वर्षीय मुलीवर 7 जणांचा बलात्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- विराटच्या बर्थडे सेलिब्रेशनला अनुष्काची हजेरी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स*
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा.
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
===================================

डोनाल्ड ट्रम्प यांना स्टेजवरून उतरवले
- अमेरिका, दि. 6 - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना सिक्रेट सर्व्हिस एजंटनं सुरक्षेच्या कारणास्तव चक्क स्टेजवर घेराव घालून त्यांच्याभोवती सुरक्षेचे कडे निर्माण केले. नेवाडा येथे एका रॅलीमध्ये डोनाल्ड ट्रम्प भाषण करत होते. मात्र त्याचदरम्यान सिक्रेट सर्व्हिस एजंटचे काही अधिकारी स्टेजवर आले आणि त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षेसाठी स्टेजवरून खाली उतरवून सुरक्षाकडे निर्माण केले.विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेला मोठी गर्दी होती. त्याच गर्दीतून डोनाल्ड ट्रम्प यांना स्टेजवरून खाली उतरवल्यानं उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला. मात्र काही मिनिटांनंतर पोलीस टक्कल असलेल्या एका संशयिताला बेड्या ठोकून घेऊन गेले. या संशयितापासून डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीविताला धोका असण्याची शक्यता सिक्रेट सर्व्हिस एजंटनं व्यक्त केली आहे.दरम्यान त्यानंतर ट्रम्प पुन्हा स्टेजवर आले आणि म्हणाले, "हे सोपे असेल, असं मला कोणीच सांगितले नव्हतं. मात्र आता आम्ही थांबणार नाही. मी सिक्रेट सर्व्हिसचे आभार मानू इच्छितो. त्यांनी त्यांचे काम उत्तमरीत्या केलं आहे," असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण संपवलं.
===================================
'एनडीटीव्ही'नंतर आता 'या' दोन चॅनलवर बंदी
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 6 - भारतातले लोकप्रिय हिंदी न्यूज चॅनल एनडीटीव्ही इंडियावर एका दिवसाची बंदी घालण्यात आल्यानंतर केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाने आणखी दोन चॅनलवर बंदी घातली आहे. 'न्यूज टाइम आसाम' आणि 'केअर वर्ल्ड टीव्ही' चॅनलच्या प्रक्षेपणावर बंदी घातली आहे, असं वृत्त बिझनेस स्टॅडर्डनं दिलं आहे.'न्यूज टाइम आसाम'वर प्रोग्रॅमिंग मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 9 नोव्हेंबरला एका दिवसासाठी बंदी घालण्यात आली आहे. 'न्यूज टाइम आसाम'नं एका अल्पवयीन मुलीचा परिचय देताना तिची ओळख सार्वजनिक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर 'केअर वर्ल्ड चॅनल'वर आक्षेपार्ह माहिती दिल्याचा ठपका ठेवत तब्बल 7 दिवस चॅनल बंद ठेवण्याचे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून जारी करण्यात आले आहेत.तत्पूर्वी 9 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजेपासून 24 तासांसाठी एनडीटीव्ही इंडिया या चॅनलचं प्रसारण बंद असणार आहे. पठाणकोट हल्ल्यावेळी एनडीटीव्ही इंडियाने केलेलं कव्हरेज हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे. त्यांनी दाखवलेल्या माहितीचा दहशतवादी वापर करू शकत होते, अशा प्रकारची माहिती जाहीर करणं हे देशाच्या सुरक्षेला बाधा पोहोचवणारं असल्याचा ठपका एनडीटीव्हीवर ठेवण्यात आला होता. आता 9 नोव्हेंबरला एकंदरीत तीन चॅनलवर बंदी असणार आहेत. मात्र चॅनलवर अशा प्रकारे बंदी घातल्यानं लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय घाला घालत असल्याची भावना सोशल मीडियावरून व्यक्त केली जातं आहे.
===================================
चुकीच्या माहितीवर याचिका करणाऱ्या रिक्षाचालकाला दंड
मुंबई : जोगेश्वरीमधील एका पुनर्विकास प्रकल्पात बिल्डरने कायदेशीर प्रक्रिया डावलून बांधलेल्या १९ मजली निवासी इमारतीला मुंबई महापालिकेनेही कायदेशीर प्रक्रियेविरूद्ध परवानगी दिल्याचा दावा करत चुकीची जनहित याचिका केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने एका रिक्षाचालकाला एक लाख रूपयांचा दंड ठोठावून दंडाची रक्कम चार आठवड्यात टाटा कॅन्सर रिसर्च सोसायटीला देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले.
जोगेश्वरी येथील सर्व्हे क्रमांक १२ क हा भूखंड महापालिकेच्या प्राथमिक शाळेसाठी राखीव होता. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेविना आरक्षण बदलता येत नाही आणि त्यावर निवासी इमारतींचे बांधकाम करता येत नाही. तरिही महापालिकेने एम.एम. कॉर्पोरेशन या विकासकाला बांधकामाची मंजुरी दिल्याचा दावा करत संजय चव्हाण यांनी ही जनहित याचिका केली होती. एमआरटीपी कायद्यातील तरतुदींप्रमाणे आवश्यक कायदेशीर प्रक्रिया केलीच नाही, असा दावा चव्हाण यांनी याचिकेद्वारे केला. या भूखंडावर पूर्वी एकमजली इमारत होती. त्यात प्राथमिक शाळा आणि काही भाडेकरू होते. त्यांना धमकावून करार करून घेतले, असा युक्तिवादही याचिकादारातर्फे करण्यात आला होता.
मात्र, हा भूखंड १९९४ मध्ये विकत घेतला होता. त्यातील काही भागात शाळा आणि बगिचाचे आरक्षण होते. त्याप्रमाणे विकास नियंत्रण नियमावलीतील नियम ११(२) अन्वये निवासी इमारतीच्या बांधकामाला सर्व आवश्यक कायदेशीर मंजुरी मिळवूनच बांधकाम केले. शिवाय महापालिकेला शाळा आणि बगिच्याची जागाही अधिकृतपणे हस्तांतरित केली. शिवाय या भूखंडाला एमआरटीटी कायद्यातील तरतुदी लागूच होत नाहीत, असा युक्तिवाद बांधकाम कंपनीतर्फे ज्येष्ठ वकील एस.यू. कामदार यांनी केला.
रिक्षाचालक संजय चव्हाण यांच्यामार्फत हेमंत दलाल, अशोक देशमुख, अश्विन हिरानी आणि हिना श्रॉफ यांनी ही याचिका चुकीच्या माहितीवर आधारित केल्याचे निदर्शनाश आल्याने न्यायालयाने टाटा कॅन्सर रिसर्च सोसायटीला चार आठवड्यांत एक लाख रुपये देण्याच आदेश दिले. महापालिकेतर्फे अॅड. तृप्ती पुराणिक यांनीही सर्व मंजुरी कायद्यानुसारच असल्याचा युक्तिवाद प्रतिज्ञापत्रांच्या आधारे मांडला.
===================================
No comments:
Post a Comment