Thursday, 3 November 2016

नमस्कार लाईव्ह ०३-११-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- जपानमधील नौदलाचे तळ अमेरिकेकडून बंद 
२- पाकच्या गोळीबारामुळे सीमेवरील गावांत भीती 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- पालघरमध्ये सापडलेली स्फोटकं आरडीएक्स असल्याचे निष्पन्न  
४- अंगणात खेळणाऱ्या परीवर पाककडून गोळीबार, छर्र्यांनी शरीराची चाळण 
५- पासपोर्ट, लायसन्स, UPSC परीक्षेसाठी जास्त पैसे मोजावे लागणार! 
६- लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेतही आता हायस्पीड वायफाय! 
७- उत्तर प्रदेशात इतिहासाची पुनरावृत्ती होईल-अखिलेश 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
८- मुख्यमंत्र्यांनी खडसे समर्थकांचं तिकीट कापलं 
९- मुंबई; 'मतदान करा आणि हॉटेलिंगमध्ये 25 टक्क्यांपर्यंत सूट मिळवा' 
१०- ओएनजीसीतला नांदेडचा इंजिनिअर 15 दिवसांपासून बेपत्ता 
११- निवडणुकांच्या तोंडावर मुंबईत विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका 
१२- पत्नीला नोकरी सोडण्याची बळजबरी करु शकत नाही - नागपूर न्यायालय 
१३- नाशिक-पुण्यात थंडीने हुडहुडी, मुंबईचा पाराही घसरला 
१४- पेट्रोलपंप चालकांकडून दोन दिवस 'इंधन खरेदी बंद' आंदोलन 
१५- माजी सैनिकाच्या आत्महत्येनंतर दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- फटाके उडवताना ड्रेस पेटला, नवी मुंबईत चिमुरडीचा मृत्यू 
१७- मुंबईकरांना गारेगार प्रवासाचं स्वप्न, एसी लोकलची चाचणी पुन्हा सुरु 
१८- औरंगाबादमध्ये सॅमसंगच्या गोदामाला आग, फ्रीज, वॉशिंग मशीनचा कोळसा 
१९- कल्याणमध्ये नळातून पाण्यासोबत चक्क जिवंत साप आला! 
२०- पेंग्विनची देखभाल करणाऱ्या कंपनीवर मुंबई पालिकेची कारवाई 
२१- 'यमुना एक्स्प्रेस वे'वर 20 गाड्या धडकल्या 
२२- भिवंडी महानगरपालिकेचे कामगार करणार भीक मांगो आंदोलन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- भारताची 'फुलराणी' सायना नेहवालचे निवृत्तीचे संकेत 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
===================================

पालघरमध्ये सापडलेली 'ती' स्फोटकं आरडीएक्स! 

पालघरमध्ये सापडलेली 'ती' स्फोटकं आरडीएक्स!
मुंबई : पालघरच्या सातवली गावात एटीएसनं जप्त केलेली स्फोटकं ही आरडीएक्स असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. त्यामुळे साहजिकच पुन्हा एकदा मुंबई रक्तरंजित करण्याची योजना आखली गेली होती का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
एफएसएलच्या अहवालानुसार त्या स्फोटकांची पाहणी केली गेली. त्यात ती स्फोटकं ही आरडीएक्स असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आता एटीएसही चकित झाली आहे.
27 ऑक्टोबरला मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सातवलीमध्ये एका झोपडीत जिलेटीनच्या कांड्या आणि ज्वलनशील पदार्थ सापडले होते. मुंबई आणि ठाणे एटीएसने संयुक्त कारवाई करत हा डाव उधळून लावला होता.
ऐन दिवाळीच्या तोंडावर 15 ते 20 किलो स्फोटकं सापडल्याने भीती व्यक्त केली जात होती. पालघरचा बराचसा भाग हा समुद्राला जोडलेला असल्यानं हा परिसर संवेदनशील समजला जातो.

===================================

मुख्यमंत्र्यांनी खडसे समर्थकांचं तिकीट कापलं

मुख्यमंत्र्यांनी खडसे समर्थकांचं तिकीट कापलं
A
जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांना धक्का दिला आहे. कारण, जळगाव विधानपरिषदेत खडसे समर्थक आणि विद्यमान आमदार गुरुमुख जगवानी यांचा पत्ता कापला आहे. त्यांच्याजागी गिरीश महाजन समर्थक चंदू पटेल यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
विधानपरिषदेच्या अर्जासाठी शेवटची फक्त 15 मिनिटं शिल्लक असताना भाजपने चंदू पटेल यांना उमेदवारी जाहीर करुन खडसेंना मोठा दणकाच दिला. चंदू पटेल हे जळगावमधील बडे प्रस्थ समजले जाते.
जळगाव हा खडसेंचा बालेकिल्ला. तसंच जळगाव म्हणजे खडसे हे भाजपमध्ये वर्षांनुवर्षे समीकरण होतं. पण भाजपने याला छेद देत खडसेंचे जळगावमधील विरोधक आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कलाने घेत, त्यांच्या समर्थकाला उमेदवारी दिली.

===================================

अंगणात खेळणाऱ्या परीवर पाककडून गोळीबार, छर्र्यांनी शरीराची चाळण

अंगणात खेळणाऱ्या परीवर पाककडून गोळीबार, छर्र्यांनी शरीराची चाळण
जम्मू : सीमेवर पाकिस्तानच्या गोळीबारात 14 महिन्यांची परी गंभीर जखमी झाली असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. तर भाऊबीजेलाच तिने तिच्या दोन्ही भावांना कायमचं गमावलं.
सांबामधील रामगड सेक्टरध्ये परीच्या घरी भाऊबीजेला पाकिस्तानी जवानांनी फेकलेला मोर्टार फुटला. यामध्ये तिचे आजोबा, आत्या आणि दोन्ही भावांच्या मृत्यू झाला. तर परी रुग्णालयात असून तिची प्रकृती नाजूक आहे.
या चिमुकलीच्या शरीरात बॉम्बचे छर्रे घुसले आहेत. कण्यापासून शरीरातील अनेक भागांना दुखापत झाली आहे. नस फाटल्याने तिला श्वास घेण्यास अडचणी येत आहेत. तिचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांना ऑपरेशन करावं लागलं. सुमारे दोन तास तिच्यावर शस्त्रक्रिया सुरु होती. डॉक्टरांच्या माहितीनुसार, पुढील काही तास तिच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तिच्यावर देखरेख असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
भाऊबीजेच्या दिवशी चिमुकली परी तिच्या दोन भावांसह अंगणात खेळत होती. मात्र त्यावेळी पाकिस्तानकडून गोळीबार सुरु झाला. पाकिस्तानी रेंजर्सनी फेकलेला मोर्टार अंगणात पडला. या घटनेत परीच्या दोन्ही भावांसह चार जणांचा मृत्यू झाला. यात भावांसह आजोबा आणि आत्याचाही समावेश आहे.
परीचे वडील राकेश कुमार हॉस्पिटलमध्ये आहेत. ते स्वत: एक सैनिक आहेत. दिवाळीनिमित्त ते घरी आले होते. तर आईलाही दुखापत झाली आहे. पण यावेळी कुटुंबासह संपूर्ण देश परीच्या आयुष्यासाठी प्रार्थना करत आहे.
पाकिस्तानने सीमेजवळील गावांवर केलेल्या हल्ल्यात 8 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात दोन मुलं, चार महिलांसह आठ जणांनी प्राण गमावले आहेत.

===================================

पासपोर्ट, लायसन्स, UPSC परीक्षेसाठी जास्त पैसे मोजावे लागणार!

आता पासपोर्ट, लायसन्स, UPSC परीक्षेसाठी जास्त पैसे मोजावे लागणार!
नवी दिल्ली : पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यापासून यूपीएससी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जासाठी आता आधीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. अर्थमंत्रालयाने संबंधित विभागांना ऑनलाईन शुल्कात वाढ करण्याचे निर्देश दिले आहेत. ऑनलाईन सेवा सुरु ठेवताना होणारा तोटा भरुन काढण्यासाठी सरकार शुल्क वाढणार आहे.
अर्थमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, “जनतेसाठी जेवढ्या ऑनलाईन सेवा आहेत, त्यांच्यासाठी सरकारी विभाग वेगळ्या कंपन्यांना कामं देतात. त्यांच्या सेवेच्या मोबदल्यात सरकारला मोठी रक्कम कंपन्यांना द्यावी लागते. परंतु जेवढं शुल्क जनतेकडून आकारलं जातं, त्यापेक्षा जास्त पैसे सरकारला कंपन्यांना द्यावे लागतात. परिणामी तोटा भरुन काढण्यासाठी शुल्क वाढवण्यात येणार आहे.”
यूपीएससीसाठी सध्या किती शुल्क?
सध्या यूपीएससी परीक्षेच्या फॉर्मसाठी 100 रुपये ऑनलाईन शुल्क द्यावं लागतं. सरकारच्या मते, मागील अनेक वर्षांपासून या शुल्कात वाढ झालेली नाही. उलट सरकारलाच एका विद्यार्थ्याच्या अर्जासाठी 100 रुपये अतिरिक्त खर्च करावे लागतात. याशिवाय रेल्वेच्या विविध ऑनलाईन सेवांमध्येही अनेक वर्ष शुल्क वाढलेलं नाही. रेल्वेने स्वत: सब्सिडी देऊन शुल्काची रक्कम कमी केली आहे.

===================================

'मतदान करा आणि हॉटेलिंगमध्ये 25 टक्क्यांपर्यंत सूट मिळवा'

'मतदान करा आणि हॉटेलिंगमध्ये 25 टक्क्यांपर्यंत सूट मिळवा'
मुंबई : तुम्ही जर येत्या स्थानिक स्वराज संस्थेत मतदान करणार असाल, तर तुम्हाला हॉटेलिंगमध्ये 25 टक्क्यापर्यंतची सूट मिळू शकते. मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीने शासनातर्फे ही सकारात्मक पावलं उचलण्यात येत आहेत.
मतदानाची खूण आणि आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंतर सरकारी किंवा खासगी हॉटेलमध्ये तुम्हाला 25 टक्क्यांची सवलत मिळणार आहे. महाराष्ट्राच्या पर्यटन विभागानं याबाबत पुढाकार घेत ही खास सवलत दिली आहे.
निवडणुकांच्या दिवशी सुट्टीचा फायदा अनेक जण फिरायला जातात. त्यामुळे मतदानाच्या प्रमाणात घट होते. मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. खास करुन शहरी लोकांनी गावाकडे जाऊन अधिकाधिक मतदानाचा हक्क बजवावा, असा हेतू यामागे आहे.

===================================

No comments: