[अंतरराष्ट्रीय]
१- सायप्रस; विमान अपहरणकर्ताकडून पत्नीचा होत असे छळ
२- पॅरीस; फ्रेंच मंत्र्यांच्या बुरख्यासंदर्भातील विधानाने खळबळ
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- गणेश पांडेप्रकरणावरून विधानसभेत खडाजंगी
४- अहमदनगर; अण्णा हजारे अतिदक्षता विभागात
५- 2015 मध्ये 4 हजार कोट्यधीशांनी सोडला देश
६- 5 बड्या कंपन्यांनी थकवले 1.4 लाख कोटींचे कर्ज
७- अण्विक सुरक्षा परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी वॉशिंग्टनमध्ये
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- श्रीहरी अणेंवर जंतरमंतरवर शाईफेक
९- अणेंवर शाई फेकल्याचा अभिमान : नितेश राणे
१०- पुणे; ग्राहक पळविण्यारया ओला,उबेरवर बंदी घाला: आप
११- छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
१२- 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आमदार बच्चू कडू यांना जामीन मंजूर.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- कोलकाता; कोलकाता: पूल कोसळून 14 ठार; 78 जखमी
१४- बंगळूर: पेपर फुटीप्रकरणी 40 कर्मचारी निलंबित
१५- चोपडा; नक्षलवादी स्फोटात नागलवाडीतील जवान हुतात्मा
१६- पणजी; भारतीय सिम्युलेटरला 45 देशांमध्ये मागणी
१७- सामाजिक बांधलकीच्या भावनेतून रुग्णांची सेवा करावी - वर्षाताई भोसीकर
१८- मुखेड; आज 'सराफा' प्रकरणी मुखेड बंद चे आवाहण
१९- मुखेड; मुखेड येथे फुले व आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सव समिती घोषीत
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- 31/03/1997, सचिनचं ते दु:ख अन् आज बदल्याचा दिवस!
२१- उद्या प्रत्येकाच्या खात्यात जमा होणार 15 लाख!
२२- मुंबई पोलिसांनी कंगना राणावतला बजावला समन्स.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्व आहे
(रितेश कोल्हे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये,
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड

मुखेड येथे फुले व आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सव समिती घोषीत
" मुखेड येथे फुले व आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सव समिती घोषीत "
" एक शहर एक जयंतीचा संकल्प "
मुखेड :-
क्रांतीसुर्य ज्योतीराव फुले यांची 189 वी जयंती व विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रोप्य महोत्सवी जयंती एक शहर एक जयंती संकल्पनेनुसार संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सव साजरी करण्यासाठी मुखेडात सर्वसमावेश कार्यकारिणी जाहिर करण्यात आली.
राष्ट्रनिर्माते क्रांतीसुर्य ज्योतीराव फुले व विश्वभुषण बोधिसत्व डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य मुखेडात माजी नगराध्यक्ष बाबुसावकार देबडवार, जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली व एक शहर एक जयंती संकल्पनेनुसार कार्यकारी मंडळ व सल्लागार मंडळाची निवड करण्यात आली. सल्लागर मंडळ प्रमुख बाबुसावकार देबडवार, डाँ.दिलीप पुंडे, दशरथराव लोहबंदे, माधवअण्णा साठे, बालाजी बंडे, शौकत खाँ पठाण, विजय चौधरी, नंदकुमार मडगुलवार, श्रावण रँपनवाड, ईसाक तांबोळी, काँ.बालाजी घोडके, गंगाधर सोंडारे सह कार्यकारी मंडळ अँड.गोविंद डुमणे, सुनिल पौळकर, गोवर्धन पवार, दिलीप कोडगीरे, शेख शौकत होनवडजकर, अनिल सिरसे, डाँ.राहुल कांबळे, किशोर चौहाण, बालाजी लंगेवाड, संतोष इंगोले, मोहनदादा गायकवाड़, पंकज गायकवाड़, शिवकुमार बंडे, आकाश कलेपवार, एकनाथ बनसोडे व प्रसिद्धीप्रमुख म्हणुन सुशिल पत्की, किशोर संगेवार आदींची निवड करण्यात आली आहे. संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सवानिमित्य शहरात पाच दिवस भरगच्च समाज प्रबोधनपर कार्यक्रम होणार असल्याची माहीती जयंती समन्वयक माजी नगरसेवक राहुल दशरथराव लोहबंदे, शेख रियाज चांदपाशा यांनी दिली.
========================================

अणेंवर शाई फेकल्याचा अभिमान : नितेश राणे
मुंबई : स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारे महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्यावर माझ्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली आहे. या कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे, असं काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्लीत आज श्रीहरी अणे यांच्यावर शाईफेक झाली. ही शाईफेक शिवसैनिकांनी केल्याचं सांगण्यात येत होतं, मात्र स्वत: नितेश राणेंनीच याबाबत खुलासा केला.
ही शाईफेक आपल्याच कार्यकर्त्यांनी केल्याचं नितेश राणेंनी सांगितलं.
========================================
श्रीहरी अणेंवर जंतरमंतरवर शाईफेक
नवी दिल्ली : स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारे महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्यावर दिल्लीत शाईफेक करण्यात आली आहे. काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केल्याचं सांगत जबाबदारी स्वीकारली आहे.
नवी दिल्लीतील जंतरमंतरवर विदर्भवाद्यांची सभा सुरु होती. त्यावेळी अणेंच्या भाषणादरम्यान काही जणांनी घोषणाबाजी केली. त्याचप्रमाणे अणेंच्या स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या मागणीला विरोध दर्शवत काळे झेंडे दाखवले आणि शाईफेक केली.
काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी आपल्याच कार्यकर्त्यांनी शाईफेक केल्याचा दावा केला आहे. आपल्या कार्यकर्त्यांच्या या कृत्याचा अभिमान असल्याचंही नितेश यांनी म्हटलं आहे.
विदर्भ वेगळा झाल्यावर आम्ही काय खाऊ, याची चिंता तुम्ही करु नका, पण जर विदर्भ वेगळा झालाच, तर तुम्हाला खायला काय मिळेल, याची चिंता करा, असा सल्ला राज्याचे माजी महाधिवक्ते श्रीहरी अणे यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांना दिला होता.
========================================
31/03/1997, सचिनचं ते दु:ख अन् आज बदल्याचा दिवस!
मुंबई: आज भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात टी-20 मधील दुसरा उपांत्य सामना खेळविण्यात येणार आहे. पण आजच्याच दिवशी एका वाईट घटनेची नोंद झाली होती. ज्यानं क्रिेकेटच्या देव सचिन तेंडुलकरला रडवलं होतं.
होय… कर्णधारपद हा सचिनच्या कारकिर्दीमधील सर्वात वाईट काळ होता. या दरम्यान, सचिन प्रचंड निराशेच्या गर्तेत दिसून आला होता. कर्णधारपद स्वीकारल्यानंतर वारंवार अपयशी पदरी पडत असल्यानं सचिननं जवळजवळ क्रिकेट सोडून देण्याचाच निर्णय घेतला होता. अशीच एक तारीख 31 मार्च 1997, बार्बाडोस कसोटीत भारताला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला होता. 120 धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया अवघ्या 81 धावांवर ऑल-आऊट झाली होती. यानंतर सचिननं क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळेस सचिननं स्वत:ला जवळजवळ 2 दिवस रुममध्ये कोंडून घेतलं होतं.
========================================
गणेश पांडेप्रकरणावरून विधानसभेत खडाजंगी
मुंबई : भाजयुमोचा माजी अध्यक्ष गणेश पांडे प्रकरणी आज विधानसभेत खडाजंगी झाली. पक्षातील कार्यकर्तीचा विनयभंग करणाऱ्या गणेश पांडेविरोधात एफआयआर दाखल होऊनही अजून अटक का झाली नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनी उपस्थित केला.
त्यावर महिलेनं तक्रार दिली आहे, आता पोलीस कारवाई करतील असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं.
एबीपी माझानं हे प्रकरण लावून धरलं होतं. त्यानंतर गणेश पांडे आणि मैथिली जावकर या दोघांनीही एबीपी माझाकडे आपली बाजू मांडली. यानंतर या प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटले.
========================================
कोलकाता: पूल कोसळून 14 ठार; 78 जखमी
कोलकता - उत्तर कोलकातामधील गणेश चित्रपटगृहाजवळ बांधकाम सुरु असलेला नवीन पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला असून 78 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गिरीश पार्क भागातील गणेश चित्रपटगृहाजवळ ही दुर्घटना घडली. पुलाचे बांधकाम सुरु असताना अचानक तो कोसळला. यावेळी पुलाखाली नागरिकांची वर्दळ होती. तसेच काही वाहनेही उभी करण्यात आली होती. पुलाच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींनी वर्तविली आहे. पोलिस व स्थानिक प्रशासनाने ढिगारा हटविण्याचे काम सुरु केले असून, मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान पश्चिम बंगाल सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये तर जखमींच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे महासंचालक ओ. पी. सिंह यांनी दिली आहे.

विमान अपहरणकर्ताकडून पत्नीचा होत असे छळ
सायप्रस- "इजिप्त एअर‘च्या विमानाचे अपहरण करून ते लारनाका विमानतळावर उतरविण्यास भाग पाडल्याबद्दल इजिप्तचा नागरिक असलेल्या सैफ इल्डीन मुस्तफा (वय 59) याच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळत होती. माझ्यासह तो मुलांना मारहाण करत होतो, असे त्याच्या पासून विभक्त झालेल्या पत्नीने म्हटले आहे.
मरिना परसछोऊ या मुस्तफापासून विभक्त झाल्या आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान बोलताना त्या म्हणाल्या, ‘मुस्तफा हा खरोखरच खूपच वाईट माणूस आहे. आमली पदार्थांचे त्याला व्यसन आहे. माझ्यासह मुलांना तो अतिशय वाईट पद्धतीने तो मारहाण करायचा. पॅलेस्टाईन लिबरेशन ऑरगनायझेशनचा तो मोठा समर्थक आहे. इस्राईलच्या तीन सैनिकांना मारल्याच्या गुन्ह्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली सिरियामध्ये त्याला चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.‘
दरम्यान, स्वतःला बॉंबने उडवून देण्याची धमकी देत मुस्तफाने विमान कैरोऐवजी सायप्रसमधील लारनाका विमानतळावर उतरविण्यास भाग पाडले होते. या विमानात 72 प्रवासी होते. त्या सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुस्तफाने स्वतःहून पोलिसांपुढे शरणागती पत्करली होती. त्यानंतर पोलिसांनी मुस्तफाला अटक केली होती. न्यायालयाने मुस्तफाला विमानाच्या अपहरणाच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आपल्या आधीच्या पत्नीला भेटण्यासाठी मुस्तफा याने विमानाचे अपहरण केले होते, असा दावा करण्यात आला होता.

ग्राहक पळविण्यारया ओला,उबेरवर बंदी घाला: आप
पुणे - ओला, उबेर यांसारख्या खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांविरुद्ध आता आम आदमी पार्टी रिक्षा संघटनेने दंड थोपटले आहेत. या बेकायदेशीर वाहतूक कंपन्यांविरुद्ध प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि वाहतूक पोलिस शाखेने कारवाई करण्यासाठी संघटनेकडून पाठपुरावा करण्यात येत आहे.
"आप‘ने आता राज्यातील रिक्षा चालक-मालकांचे संघटन करण्यास सुरवात केली असून, पुण्यामध्ये पहिल्यांदा संघटना स्थापना करण्यात आली आहे. याबाबतची माहिती संघटनेचे अध्यक्ष गणेश ढमाले, संस्थापक असगर बेग यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी कानिफनाथ घोरपडे, एस. एस. शेट्टी, सुभाष कारंडे, बाबा सय्यद, राजेश चौधरी, श्रीकांत आचार्य उपस्थित होते.
ढमाले म्हणाले, ""रिक्षाचे ग्राहक पळविण्याचे काम ओला, उबेर यांनी केले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार आरटीओला नसल्याचे अधिकारी सांगतात. त्यामुळे या कंपन्यांना कोणाचाही वचक नाही. हा प्रकार थांबविण्यासाठी आमचा प्रयत्न असेल.‘‘ बेकायदेशीर शहरी प्रवासी वाहतूक आणि विनापरवाना रिक्षा चालकांवरही आरटीओ व पोलिसांनी कारवाई करावी, नागरिकांच्या सोयीसाठी दिल्लीच्या धर्तीवर पुण्यातही "पुछो‘ ही मोबाईल ऍप सेवा राज्य सरकारने सुरू करावी, गॅसवरील रिक्षाचालकांना पीयूसीची मागणी करू नये, अशा विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदन संघटनेतर्फे राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे.
याबरोबरच रिक्षाचालकांच्या वर्तणुकीत सुधारणा होण्यासाठी आणि रिक्षाचालकांची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी संघटना अभिनव उपक्रम राबविणार असल्याचे घोरपडे यांनी सांगितले.

अण्णा हजारे अतिदक्षता विभागात

नगर- ताप व त्यातून आलेला अशक्तपणा यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज सकाळी राळेगणसिद्धी येथे स्नानगृहातच कोसळले. तब्बल दीड तासांनंतर त्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलिसांना त्याबाबत संशय आला. त्यामुळे त्यांनी स्नानगृहाचा दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढले. नगरच्या नोबल रुग्णालयातील अतिदक्षता विभागात अण्णांना दाखल करण्यात आले आहे.
नोबल रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. बापूसाहेब कांडेकर म्हणाले, "हजारे यांनी काल दिवसभर गावातील विविध विकासकामांची पाहणी केली. त्यामुळे त्यांना उन्हाचा तडाखा बसला. त्यांना 101 ताप असून, अशक्तपणाही खूप आहे. त्यांच्या इतर सर्व चाचण्याही करण्यात येत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सध्या त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. अजून किमान दोन दिवस त्यांना तेथेच ठेवण्यात येईल.‘‘

बंगळूर: पेपर फुटीप्रकरणी 40 कर्मचारी निलंबित

बंगळूर- बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा रसायनशास्त्राचा पेपर दुसऱ्यांदा फुटला असून या प्रकरणी कर्नाटकातील शिक्षण मंत्रालयाने पदवीपूर्व शिक्षण विभागातील 40 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच ही परीक्षा आता 12 एप्रिल रोजी घेणार असल्याचेही जाहीर केले आहे.
आज (गुरुवार) बारावीची परीक्षा देणारे शेकडो विद्यार्थी पेपरला बसण्याऐवजी बंगळूरच्या रस्त्यावर उतरले होते. सलग दुसऱ्यांना रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका फुटल्याने विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत, काळे झेंडे दाखवत कर्नाटक शिक्षण उच्च माध्यमिक विभागाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. ‘कोणत्याही परिस्थितीत आम्ही आता परीक्षा देण्यास तयार नाही... आमची परीक्षा संपली आहे.. त्यांनी आता परीक्षेची कोणतीही तारीख देऊ द्या.. आम्ही पेपर लिहिणार नाही,‘ असे एका विद्यार्थ्याने सांगितले. विद्यार्थी आणि पालकांच्या तीव्र निषेधामुळे हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी पदवीपूर्व शिक्षण विभागातील 40 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
‘पेपरफुटीप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. मी विद्यार्थी आणि पालकांच्या भावना समजू शकतो. त्यांना न्याय मिळेल याची मी खात्री देतो‘, अशा शब्दांत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

फ्रेंच मंत्र्यांच्या बुरख्यासंदर्भातील विधानाने खळबळ
पॅरिस - मुस्लिम महिलांनी स्वत:हून बुरखा परिधान करणे म्हणजे अमेरिकेतील निग्रो समुदायाने गुलामगिरीचे समर्थन करण्यासारखे असल्याचे विधान फ्रान्समधील एका महिला मंत्र्यांनी केल्यानंतर येथील सोशल मिडियावर वादळी प्रतिक्रिया उमटल्या आहेत. लॉरेन्स रोसिग्नोल या फ्रान्सच्या सरकारमधील मंत्री या वादळाच्या केंद्रस्थानी आहेत.
इस्लाम धर्माचे अत्यंत धार्मिकतेने पालन करणाऱ्या मुस्लिम नागरिकांसाठी पारंपारिक इस्लामी पोशाखाच्या सतत नवनवीन "फॅशन्स‘ येत असून या बाजारपेठेची वार्षिक उलाढाल 200 अब्ज पौंडांहूनही जास्त आहे. यामध्येच लक्षावधी मुस्लिम महिलांसाठी सतत नवनवीन प्रकारचे बुरखे बाजारामध्ये येत आहेत. रोसिग्नोल या यासंदर्भात बोलत होत्या. मुस्लिम महिलांनी नवनवीन प्रकारचे बुरखे स्वत:हून परिधान करणे म्हणजे निग्रो समुदायानेच गुलामगिरीचे समर्थन करण्यासारखे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते.
दरम्यान, या विधानावर समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर रोसिग्नोल यांनी आपण मत व्यक्त करताना निग्रो शब्द वापरुन भाषेची चूक केल्याचे स्पष्ट केले; मात्र त्याव्यतिरिक्त आपण मांडलेला मुद्दा योग्यच असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
फ्रेंच मंत्र्यांच्या बुरख्यासंदर्भातील विधानाने खळबळ
इस्लाम धर्माचे अत्यंत धार्मिकतेने पालन करणाऱ्या मुस्लिम नागरिकांसाठी पारंपारिक इस्लामी पोशाखाच्या सतत नवनवीन "फॅशन्स‘ येत असून या बाजारपेठेची वार्षिक उलाढाल 200 अब्ज पौंडांहूनही जास्त आहे. यामध्येच लक्षावधी मुस्लिम महिलांसाठी सतत नवनवीन प्रकारचे बुरखे बाजारामध्ये येत आहेत. रोसिग्नोल या यासंदर्भात बोलत होत्या. मुस्लिम महिलांनी नवनवीन प्रकारचे बुरखे स्वत:हून परिधान करणे म्हणजे निग्रो समुदायानेच गुलामगिरीचे समर्थन करण्यासारखे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते.
दरम्यान, या विधानावर समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर रोसिग्नोल यांनी आपण मत व्यक्त करताना निग्रो शब्द वापरुन भाषेची चूक केल्याचे स्पष्ट केले; मात्र त्याव्यतिरिक्त आपण मांडलेला मुद्दा योग्यच असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
========================================
2015 मध्ये 4 हजार कोट्यधीशांनी सोडला देश
नवी दिल्ली - भारतातील तब्बल 4 हजार कोट्यधीश व्यक्ती 2015 साली भारताबाहेर स्थालांतरित झाल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे.
"न्यू वर्ल्ड वेल्थ‘ या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे. भारतातील 4 हजार कोट्यधीश व्यक्ती 2015 साली भारताबाहेर स्थलांतरीत झाली आहेत. तर फ्रान्समधील 10 हजार कोट्यधीश व्यक्तींनी देश सोडला आहे. भारत आणि चीनमधील लोकांनी देश सोडून जाणे ही चिंतेची बाब नसल्याचे अहवालात म्हटले आहे. "भारत आणि चीनमधील कोट्यधीश लोक देश सोडून जात असताना अनेक नवीन कोट्यधीश निर्माण होत आहेत. या देशांमधील जीवनशैलीमध्ये सुधारणा झाली तर देश सोडून गेलेले कोट्यधीश परत येतील असा आम्हाला विश्वास आहे‘, असे अहवालात म्हटले आहे.
कोट्यधीशांनी देश सोडून जाण्याच्या यादीत फ्रान्सनंतर चीनचा क्रमांक लागतो. चीनमधील 9 हजार कोट्यधीशांनी देश सोडला आहे. तर त्यानंतर इटलीचा क्रमांक लागत असून तेथील 6 हजार कोट्यधीशांनी देश सोडला आहे. कोट्यधीश मंडळी ज्या देशांमध्ये जाऊन स्थिरावत आहेत अशा देशांच्या यादीत ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियात 8 हजार कोट्यधीश स्थिरावले आहेत. तर त्यानंतर युएस (7000) आणि कॅनडा (5000) क्रमांक लागतो.

नक्षलवादी स्फोटात नागलवाडीतील जवान हुतात्मा
नक्षलवाद्यांच्या स्फोटात नागलवाडीतील जवान शहीद
नक्षलवादी स्फोटात नागलवाडीतील जवान हुतात्मा
चोपडा - छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे सात जवान हुतात्मा झाले. यात चोपड्याचे नाना सैंदाणे यांचा समावेश आहे. जवानांची शस्त्रे घेऊन नक्षलवादी पळून गेले. बसारस- कुआकोंडा रस्त्यावर ही घटना घडली. जवानांचे वाहन भूसुरुंगावरून गेल्यावर सुरुंगाचा स्फोट झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
यात नागलवाडी (रा. चोपडा) येथील नाना उदेसिंग सैंदाणे (वय ३९) हे जवान शहीद झाले. नाना सैंदाणे हे सन २००० मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात चालक या पदावर सामील झाले होते. दंतेवाडा बटालियन २३० मध्ये असलेले सैंदाणे हे सुटीवर गेलेल्या जवानांना परत घेवून येतांना कुआकोंडा (जिल्हा नकुलनार) या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. मैलावाडा ते कलारपारा या मुख्य मार्गावर नक्षलवाद्यांनी जबरदस्त बॉम्बस्फोट घडवून नाना सैंदाणे हे चालवित असलेले वाहन १५० ते २०० मीटर लांब फेकले गेले. बॉम्बस्फोट झाला त्या ठिकाणी १० ते ११ फुट खोल खड्डा पडला.
इ. १० वी पर्यंत शिक्षण झालेले नाना सैंदाणे यांचा विवाह २००३ मध्ये झाला होता त्यांना १० वर्षाची एक मुलगी अंजली व ८ वर्षाचा १ मुलगा पियुष असून वडील, आई व एक मोठा भाऊ आहे. मोठा भाऊ शिवण काम, शेतमजूरी करतो. अवघी अडीच एकर शेती असलेल्या सामान्य कुटूंबात गरीब परिस्थितीत नाना सैंदाणे यांनी सैन्य भरतीत सामील होण्याचे स्वप्न पाहिले होते.
========================================
उद्या प्रत्येकाच्या खात्यात जमा होणार 15 लाख!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार उद्या प्रत्येक भारतीय नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होणार आहेत... असा मेसेज वॉट्सऍपवर पहिल्यांदा वाचताना तुम्ही हरकून गेला असाल, परंतु उद्या 1 एप्रिल आहे हे चाणाक्ष वाचकाच्या लक्षात येताच हास्याची एक लकेर चेहऱ्यावर उमटली असेल.
खरं तर अत्यंत दु:खाची आणि अतिआनंदाची बातमी पचवायलाही मनाची तयारी करावी लागते. असा धक्कादायक आनंदही अनेकदा सहन होत नाही. त्यामुळे आताच मनाची तयारी करून ठेवा उद्याच्या एप्रिल फूलची! आणि त्याला दाद द्या दिलखुलासपणाने.
एखाद्या बड्या नेत्याच्या किंवा सेलिब्रिटीच्या प्रकृतीबद्दलचे वृत्त पाहता पाहता वॉट्सऍपवर सर्व ग्रूपमध्ये फिरू लागते. आपणही आपल्या परिचयातील संबंधित कार्यकर्त्यांना कनवाळू स्वरात कळवतो. पण रात्रीपर्यंत कोणत्याच वृत्तवाहिनीवर याबाबत एक अवाक्षरही उच्चारलं जात नाही... तेव्हा लक्षात येते दिवसभर आपल्या मनात दाटून आलेल्या सहानुभूतीची जागा फजितीच्या भावनेने घेतलेली असते. सांत्वनाची जागा हास्याने घेतलेली असते... आपल्यापैकी अनेकांना असा अनुभव आलेला असेल.

भारतीय सिम्युलेटरला 45 देशांमध्ये मागणी
पणजी : बोटीच्या कॅप्टनच्या जागेवर बसून समुद्र सफारी अनुभवणं म्हणजे आयुष्यभराचा अनुभव. या अनुभूतीसोबतच बोटीच्या तांत्रिक शिक्षणासाठी नौदलात सिम्युलेटर्स वापरले जातात. या सिम्युलेटरच्या जागतिक बाजारपेठेवर एआरआय सिम्युलेटर या भारतीय संस्थेने आपला ठसा उमटवला आहे. जगभरातील 45 देशांमध्ये एआरआयचे सिम्युलेटर वापरले जातात. बेतूल येथील डिफेन्स एक्स्पोत या सिम्युलेटरचे दर्शन घडते आहे.
सागराला आव्हान देणाऱ्या नौका असोत वा हवा छेदणारी विमानं. या अवाढव्य वाहनांचं स्टेअरिंग हाती घेण्यासाठी कड्या प्रशिक्षणाची आणि सरावाची गरज असते. पण प्रशिक्षणासाठी खऱया नौका वापरणे शक्य नसते. तेंव्हा नौकेच्या कॅप्टन रुमचा आभास निर्माण करणाऱ्या सिम्युलेटरचा वापर केला जातो. अत्युच्च तंत्रज्ञानाचा अविष्कार असणारी ही सिम्युलेटर नौदल आणि सागरी व्यापाराच्या वापराच्या दृष्टीने अत्यंत्त महत्त्वाची असतात. कॅप्टन एसएसएस रेवारी यांनी 1994 साली यासाठी एआरआय सिम्युलेटरची स्थापना केली. औदयोगिक, ऊर्जा, संरक्षण, वाहतूक क्षेत्रासाठी ही सिम्युलेटर जगभर नावाजली जात आहेत.
विविध औद्योगिक प्रकारात सिम्युलेटर निर्माण करणारी एआरआय सिम्युलेटर एकमेव भारतीय संस्था आहे. त्यांची उत्पादने जपान, इंग्लंड, अमेरिका, स्कॅन्डिनॅव्हिया, दक्षिण कोरिया सारख्या देशात वापरात आहेत. भारतात चार नौदल तळांवर एआरआय सिम्युलेटर आहेत. तर अंदमान निकोबारला पाचवे सिम्युलेटर बसवण्यात येणार असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱयांनी सांगितले.

5 बड्या कंपन्यांनी थकवले 1.4 लाख कोटींचे कर्ज
नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) बड्या करबुडव्यांची यादी आज सर्वोच्च न्यायालयात सादर केली. तसेच ही नावे जाहीर करणे व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम करणारे असल्याचे स्पष्टीकरण रिझर्व्ह बॅंकेने आज (गुरुवार) दिले. यात 72 बड्या कंपन्यांच्या समावेश आहे.
ज्यांनी रु.5,53,167 कोटींचे कर्ज थकवले आहे. 72 पैकी 40 कंपन्यांनी तीन वर्षात थोडी देखील कर्जाची रक्कम भरलेली नाही. त्यामध्ये पाच बड्या कंपन्यांवर रु.1.4 लाख कोटींचे कर्ज आहे.
बड्या करबुडव्यांची नावे जाहीर केल्यास त्याचा सध्याचे कर्मचारी व व्यावसायिक या दोहोंवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे, असे आरबीआयने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या खंडपीठाकडे संबंधित कंपन्यांची सविस्तर माहिती केंद्रीय बॅंकेकडून देण्यात आली. या कंपन्यांचे कर्ज 500 कोटींच्या पुढे असल्याचे सांगण्यात आले आहे. या कर्जामुळे संबंधित कंपन्यांना नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे.
पाच बड्या कंपन्यांमध्ये पुढील कंपन्यांचा समावेश आहे.
कंपनीचे नाव - कर्ज
अदानी पॉवर - रु.44,840 कोटी
लॅन्को इन्फ्रा - रु.39,890 कोटी
जीव्हीके पॉवर - रु.25,062 कोटी
सुझलॉन - रु.18,035 कोटी
एचसीसी - रु.12,170 कोटी

छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
मुंबई- मनी लॉंडरिंग आणि ‘महाराष्ट्र सदन‘ गैरव्यवहार प्रकरणात अटक झालेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत 13 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मनी लॉंडरिंगप्रकरणी छगन भुजबळ व समीर भुजबळ दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
मनी लॉंडरिंग आणि ‘महाराष्ट्र सदन‘ गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छगन भुजबळ यांनाही 31 मार्चपर्यंत कोठडी दिली होती. न्यायालयीन कोठडीत आज (गुरुवार) पुन्हा वाढ करण्यात आली आहे. छगन भुजबळ, समीर व पंकज भुजबळ यांच्यासह 50 जणांवर ‘ईडी‘ने मंगळवारी (ता. 29) मनी लॉंडरिंग कायद्यांतर्गत सत्र न्यायालयात 11 हजार 150 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. दोन दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही कलिनातील वाचनालय गैरव्यवहार प्रकरणी भुजबळांवर आरोपपत्र दाखल केले होते. सत्र न्यायालयातील रजिस्ट्रारकडे ईडीने आरोपपत्र दाखल केले. त्याशिवाय यामध्ये 30 साक्षीदारांचा समावेश आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सदनात 870 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका भुजबळांवर ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय मुंबईतील आरटीओ इमारतीचे बांधकाम, नवी मुंबईतील हेक्सा वर्ल्ड प्रकल्पातील कथित गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून समीर भुजबळ आणि त्यानंतर छगन भुजबळ यांची चौकशी करण्यात आली होती. त्या आधारावर ईडीकडून आरोपपत्र तयार केले आहे. त्याचबरोबर पुरावे आणि माहितीसह एकूण 11 हजारांहून अधिक कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. या प्रकरणी ईडीने आतापर्यंत भुजबळांच्या 131.86 कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. बाजारभावानुसार या मालमत्तांची किंमत 300 कोटींहून अधिक आहे.

आज 'सराफा' प्रकरणी मुखेड बंद चे आवाहण
मुखेड :-
केंद्र सरकारने सराफा व्यापा-यांना अबकारी करासह विविध जाचक अटी लागू केल्याच्या निषेधार्थ सराफांच्या ३१ दिवसापासुन चालू असलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणुन आज १ एप्रिल रोजी मुखेड शहरात कडकडीत बंदचे आवाहण करण्यात आले आहे.
या बंदला काँग्रेस, शिवसेना, मनसे आदीं राजकीय पक्षांनी आपले समर्थन जाहिर केले आहे. यासंबंधीचे निवेदन तहसीलदार अतुल जटाळे, पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी व्यापा-यांसोबतच काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार, डाँ.श्रावण रँपनवाड, मनसेचे तालुकाध्यक्ष बालाजी बंडे तथा शिवसेना शहरप्रमुख नागनाथ लोखंडे यांनी या बंदला पाठिंबा देवुन पक्षातर्फे तहसीलदारांना निवेदन दिले आहे. निवेदन देताना सराफा व सुवर्णकार असोसिएशन अध्यक्ष बस्वराज शिवपूजे, किराणा असोसिएशन बालाजी चौधरी, जगदीश बियाणी, राम पत्तेवार, बाबुराव देबडवार, विजय चौधरी, सराफा असोसिएशन सत्यवान गरुडकर, सुनिल पाटील, गजानन कवटीकवार, सुरेश पा बेळीकर, सुरेश उत्तरवार, राजेश पोलावार, दीपक देवापुरे, सागर कोडगीरे, शंकरअण्णा पोतदार, शशिकांत जुन्ने सह सराफा व्यापारी व सुवर्ण कारागीर उपस्थित होते.