Wednesday, 31 August 2016

नमस्कार लाईव्ह ३१-०८-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
1- शिकागो; ८३ वर्षीय काकाकुवा पक्ष्याचा मृत्यू 
2- ISIS दहशतवादी अदनानीला अमेरिकेने केलं ठार 
3- १०० वर्षांच्या आजीने मिळविले सुवर्णपदक! 
4- भारत-अमेरिका यांच्यात संरक्षण करारावर स्वाक्षरी 
5- पर्युषण पर्वानिमित्त ओबामांकडून शुभेच्छा 
6- भारत-अमेरिकेच्या भागिदारीवरून चीन-पाकला पोटशूळ 
7- भूमध्य सागरातून दोन जुळ्यांसह 6500 शरणार्थींची सुटका 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
8- सचिनचं अजून एक स्तुत्य पाऊल, कर्णबधीर शाळेला 40 लाखांचा निधी 
9- पुण्यात तयार होणार फियाटची ‘जीप’ 
10- ‘मोबिविक’चे ‘मोअर दॅन अ वॉलेट’ 
11- रतन टाटा, नीलकेणी आले एकत्र 
12- सेवा, भरती नियमांत बदल करण्याचा आदेश 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
13- बलात्कार प्रकरणात दोषींना पॅरोल नाही - राज्य सरकारचा निर्णय 
14- विलास शिंदेंच्या मृत्यूचे पोलीस कॉलनीत पडसाद, मुख्यमंत्र्यांना घेराव 
15- वाहतूक पोलिस विलास शिंदे यांचे निधन, दुचाकीस्वाराने केली होती मारहाण 
16- पुण्यात रिक्षाचालकांकडून ओला कॅबची तोडफोड 
17- ‘सैराट’ची कथा चोरल्याप्रकरणी चौकशी आदेश 
18- राज्यातील २३ लाख वाहने बंद 
19- चौदा प्रकल्पांच्या निविदा रद्द 
20- कायम विनाअनुदानित शाळांना दिलासा 
21- मराठा समाज आता अन्याय सहन करणार नाही- नारायण राणे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
22- हरियाणा- फरिदाबादमध्ये डेंग्यूचे दोन संशयित रुग्ण आढळले 
23- कोल्हापूर; इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून एका पेंटरचा मृत्यू 
24- देशात महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र आघाडीवर 
25- जीएसटीमधून आम्हाला हवी सूट: ई-कॉमर्स कंपन्या
26- 'मन की बात' आता बलुचिस्तानमध्येही
27- 'स्टुटंड ऑस्कर' विजेत्या दिग्दर्शकाची फरपट
28- उत्तर प्रदेश: चहा, नाश्‍त्यासाठी नऊ कोटी खर्च
29- हैदराबादला पावसामुळे सात जण मृत्युमुखी
30- कानाने नव्हे, 'तो' ऐकतो चक्क तोंडाने !
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
31- नशीब, मी अभ्यासात ढ होतो - पुलेला गोपीचंद
32- इंग्लंडने रियाझ करुन पाकिस्तानची वाजवली - नेटीझन्सनी उडवली खिल्ली
33- मल्ल योगेश्वर दत्तच्या पदकाचा रंग बदलणार!
34- जोकोविच, नदाल दुसऱ्या फेरीत
35- बोपन्ना-पेस पुन्हा एकत्र खेळणार 
36- रौप्य पदक न स्वीकारण्याचा योगेश्‍वरचा निर्णय 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
--------------------------------------------------------

वाहतूक पोलिस विलास शिंदे यांचे निधन, दुचाकीस्वाराने केली होती मारहाण



  • मुंबई, दि. ३१ - डयुटी बजावत असताना दुचाकीस्वाराकडून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले वाहतूक पोलिस कर्मचारी विलास शिंदे यांचे बुधवारी दुपारी लिलावती रुग्णालयात निधन झाले.  
     
    वाहतूक पोलिसांकडून सध्या मुंबईतील सगळया वाहनांची माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपावर एक वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्यात आली आहे. मागच्या मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी खार एसव्ही रोडवरील पेट्रोल पंपावर डयुटीवर बजावत असताना   विलास शिंदे यांनी तिथे आलेल्या दुचाकीस्वाराकडे त्याच्या गाडीची माहिती मागितली. 
     
    पण शिंदे यांना माहिती देण्यास दुचाकीस्वाराने नकार दिला. दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. त्यांनी दुचाकीस्वाराला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जायची धमकी दिली. त्यानंतर संतापलेल्या दुचाकीस्वाराने शिंदे यांना मारहाण सुरु केली. तिथे असलेले एक लाकूड उचलून त्याने शिंदे यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. शिंदे रक्ताच्या थारोळयात तिथे कोसळले. ते पाहून भेदरलेला दुचाकीस्वार तिथून पसार झाला. 
--------------------------------------------------------

आणखी एक पोलीस शहीद झाला 



  • मुंबई, दि. 31 - अखेर कायदा तोडणाऱ्या तरूणांच्या बेदम मारहाणीमुळे कॉन्स्टेबल विलास शिंदेंचा मृत्यू झाला. 23 तारखेला आपलं कर्तव्य बजावणाऱ्या शिंदेंची चूक एवढीच होती की त्यांनी हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाला हटकलं होतं. त्या मुलानं त्याच्या मोठ्या भावाला बोलावलं आणि शिंदेंना बांबूने मारहाण केली. लीलावतीमध्ये उपचार सुरू असताना, शिंदेंची प्राणज्योत मालवली.
     
    या महानगरीत रोज छोटे छोटे हादसे तर होतच असतात, कित्येक जण प्राणाला मुकतात, आणखी एक गेला तर काय फरक पडतो, भलेही मग तो कायद्याचं रक्षण करणारा पोलीस का असेना? समाजाच्या अशा निर्ढावलेल्या मनोवृत्तीमुळे अत्यंत अडगळीत गेलेल्या या शिंदेंच्या मारहाणीला खऱ्या अर्थाने वाचा फोडली मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी... त्यांनी काल शिंदे यांची रूग्णालयात केवळ भेटच नाही घेतली, तर मुस्लीम तरूण मोठ्या प्रमाणावर कायदे मोडत असल्याचा थेट आरोप केला. राज ठाकरेंच्या भेटीनंतर या मारहाणीला वाचा फुटली आणि हिंदू-मुस्लीम अंगाने त्यावर चर्चा झडायला लागल्या.
--------------------------------------------------------

विलास शिंदेंच्या मृत्यूचे पोलीस कॉलनीत पडसाद, मुख्यमंत्र्यांना घेराव



  • मुंबई, दि. 31 - कर्तव्य बजावत असताना दुचाकीस्वारावरुन झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस शिपाई विलास शिंदे यांच्या मृत्यूचे पडसाद पोलीस कॉलनीत पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विलास शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी वरळीमधील पोलीस कॉलनीत गेले होते. यावेळी पोलीस कॉलनीतील महिलांनी मुख्यमंत्र्यांना घेराव घालत रोष व्यक्त केला. 'पोलिसांना न्याय मिळालाच पाहिजे' अशा घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर देण्यात आल्या. आरोपीला जामीन मिळाला नाही पाहिजे अशी मागणीही यावेळी महिलांनी केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी मात्र तेथून काढता पाय घेतला.
     
    'ही दुर्देवी घटना असून आम्ही सर्व त्यांच्या दुखात सामील आहोत. सरकारकडून विलास शिंदे यांच्या कुटुंबियांना पुरेपूर मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल', असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलं.
     
    दुचाकीस्वाराकडून झालेल्या मारहाणीत जखमी झालेले पोलीस शिपाई विलास शिंदे यांचं बुधवारी निधन झालं. गंभीर जखमी झालेल्या विलास शिंदेंना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं. मृत्यूशी सुरु असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. संध्याकाळी सात वाजता त्यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे.
--------------------------------------------------------

बलात्कार प्रकरणात दोषींना पॅरोल नाही - राज्य सरकारचा निर्णय




  • मुंबई, दि. ३१ - बलात्कार प्रकरणात तुरूंगवासाची शिक्षा भोगणा-या दोषींची यापुढे पॅरोलवर सुटका होणार नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने दिला आहे. अ‍ॅड. पल्लवी पूरकायस्थ हत्या करणारा सज्जाद मुघल हा पॅरोलवर असतानाच फरार झाल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. 
    वडाळयाच्या भक्ती पार्कमध्ये १६ व्या मजल्यावर रहाणा-या पल्लवीची ९ ऑगस्ट २०१२ रोजी सज्जादने अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली होती. या हत्येविरोधात समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सरकारने जलदगती न्यायालयात हा खटला चालवला. सज्जादला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली व त्याला नाशिक कारागृहात पाठवले.
    सज्जादने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पॅरोलसाठी अर्ज केला होता. विभागीय आयुक्तांनी त्याचा पॅरोल मंजूर केल्यानंतर तो एप्रिलच्या अखेरीस तीस दिवसांसाठी बाहेर आला पण त्यानंतर तो तुरुंगात परतलाच नाही. या प्रकरणी नाशिक पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला.
    सज्जादने ९ ऑगस्टच्या रात्री पल्लवीच्या फ्लॅटचा वीज पुरवठा खंडीत केला. त्यानंतर त्याने पल्लवीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करुन तिची हत्या केली होती.  वडाळ्यातील एका उच्चभ्रू सोसाटीत राहणा-या पल्लवीचा मृतदेह आढळला होता. या घरात पल्लवी तिचा प्रियकर अविक सेनगुप्तासोबत राहत होती. याप्रकरणी पोलिसांनी सज्जादला अटक केली होती. 
    खून, घुसखोरी व विनयभंगाचे आरोप लावण्यात आले होते. पल्लवीवर सज्जादची पहिल्यापासून वाईट नजर होती़ त्या रात्री ती घरात एकटीच होती़ त्या वेळी सज्जादने जाणीवपूर्वक लाइट बंद केले व घरात घुसला. त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला़ पण तिने प्रतिकार केल्याने सज्जादने तिचा खून केला होता.
--------------------------------------------------------

सचिनचं अजून एक स्तुत्य पाऊल, कर्णबधीर शाळेला 40 लाखांचा निधी



  • नाशिक, दि. 31 - उस्मानाबादेतील डोंजा गाव दत्तक घेतल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने अजून एक स्तुत्य पाऊल उचललं आहे. खासदार सचिन तेंडूलकरने स्थानिक विकास निधीतून, येवल्यातील समता प्रतिष्ठानच्या मायबोली निवासी कर्णबधीर विद्यालयाला तब्बल चाळीस लाखांचा निधी दिला आहे.
     
    एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार  येवल्यातील अंगणगाव येथील समता प्रतिष्ठान संचलित मायबोली निवासी शाळा गेल्या 21 वर्षांपासून कार्यरत आहे. जिल्हयातील ही दुसरीच निवासी शाळा असून, या ठिकाणी 110 विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र केवळ 40 विद्यार्थ्यांना शासकीय अनुदान मिळते.  

--------------------------------------------------------

८३ वर्षीय काकाकुवा पक्ष्याचा मृत्यू



  • शिकागो, दि. ३१ - जगातील सर्व पक्ष्यांच्या तुलनेत सर्वाधिक जास्त म्हणजे ८३ वर्षे जगणा-या काकाकुवा या पक्ष्याचा सोमवारी मृत्यू झाला. जगातील सर्वात वयस्कर पक्षी म्हणून काकाकुवा पक्ष्याकडे पाहिजे जात होते.
    शिकागो येथील प्रसिद्ध असलेल्या ब्रूकफिल्ड प्राणिसंग्रहालयात सोमवारी काकाकुवा पक्ष्याचा मृत्यू झाला. प्राणिसंग्रहालयात काककुवा पक्ष्याला कुकी या नावाने सर्वजण ओळखत होते. लाल व पिवळा तुरा असलेला सफेद गुलाबी रंगाचा कूकी हा अवघ्या एक वर्षाचा असताना ऑस्ट्रेलियातील तारोंगा प्राणिसंग्रहालयातून आणले होते, अशी माहिती ब्रूकफिल्ड प्राणिसंग्रहालयाच्या अधिका-यांनी दिली.
    गेल्या शनिवारी कुकीची अचानक तब्येत खालावली. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. कुकीला वेगवेगळ्या आजारांनी ग्रासले होते. यात ऑस्टिओपोरोसिस, संधिवात आणि मोतीबिंदू झाल्याचे अधिका-यांकडून सांगण्यात आले.
    काकाकुवा पक्ष्याबद्दल माहिती...
    काकाकुवा हा सिट्टॅसिडी कुलातील मोठ्या आकाराचा पोपट आहे. हा उष्णकटिबंध प्रदेशांत आढळणारा पक्षी असून याचे शास्त्रीय नाव कॅकॅटोई गॅलेरिटा आहे. या पक्ष्याचे काकाकुवा हे नाव मूळ ‘काकातुआ’ या मलेशियन नावापासून आले आहे. मलेशिया, इंडोनेशिया, टास्मानिया, ऑस्ट्रेलिया, न्यूगिनी आणि ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील बर्‍याच बेटांवर हा पक्षी आढळतो. ऑस्ट्रेलिया आणि टास्मानियात याच्या अकरा जाती आहेत. त्यापैकी पिवळसर तुरा असलेले पांढर्‍या रंगाचे काकाकुवा पक्षी मोठ्या संख्येने आढळतात. 
  • ==================================

नमस्कार लाईव्ह ३१-०८-२०१६चे बातमीपत्र

*[अंतरराष्ट्रीय]*
1- भारत-अमेरिका यांच्यात संरक्षण करारावर स्वाक्षरी
2- पर्युषण पर्वानिमित्त ओबामांकडून शुभेच्छा
3- भारत-अमेरिकेच्या भागिदारीवरून चीन-पाकला पोटशूळ
4- भूमध्य सागरातून दोन जुळ्यांसह 6500 शरणार्थींची सुटका
5- अमेरिकेला वापरता येणार भारतीय नौदलाचे तळ
6- लिट्टेचा नेता प्रभाकरन जिवंत असू शकतो?
7- इंग्लंडने रियाझ करुन पाकिस्तानची वाजवली - नेटीझन्सनी उडवली खिल्ली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
8- इंग्लंडने रियाझ करुन पाकिस्तानची वाजवली - नेटीझन्सनी उडवली खिल्ली 
9- पुण्यात तयार होणार फियाटची ‘जीप’
10- ‘मोबिविक’चे ‘मोअर दॅन अ वॉलेट’
11- रतन टाटा, नीलकेणी आले एकत्र
12- सेवा, भरती नियमांत बदल करण्याचा आदेश
13- टॅक्सीचालक देऊ शकतात सूट 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
14- जन्माच्या दाखल्यासोबत मिळणार दहावीचं प्रमाणपत्र 
15- ‘सैराट’ची कथा चोरल्याप्रकरणी चौकशी आदेश
16- राज्यातील २३ लाख वाहने बंद
17- चौदा प्रकल्पांच्या निविदा रद्द
18- कायम विनाअनुदानित शाळांना दिलासा
19- जीएसटी आणणा-या सरकारांचा दारुण पराभव झाला - उद्धव ठाकरे
20- जन्माच्या दाखल्यासोबत मिळणार दहावीचं प्रमाणपत्र
21- सेनेचे ‘थीम पार्क’ बारगळले?
22- नागरी समस्यांबाबत नगरसेवक उदासीनच
23- पश्चिम रेल्वेच्या सेवेत १४ नव्या लोकल फेऱ्या
24- सहा महिन्यांत १0२ दुचाकीस्वार ठार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
25- हैदराबादमध्ये पावसाचा कहर, चौघांचा मृत्यू 
26- ठाणे : महिलेकडे बॉडी मसाजची मागणी करत छळणा-याची तुुरूंगात रवानगी 
27- आज रिक्षांचा एकदिवसीय संप, प्रवाशांचे मोठे हाल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
28- ‘सैराट’ची कथा चोरल्याप्रकरणी चौकशी आदेश 
29- १०० वर्षांच्या आजीने मिळविले सुवर्णपदक!
30- मल्ल योगेश्वर दत्तच्या पदकाचा रंग बदलणार!
31- जोकोविच, नदाल दुसऱ्या फेरीत
32- बोपन्ना-पेस पुन्हा एकत्र खेळणार
33- असे काही झालेच नव्हते....
34- इंग्लंडचा ४४४ धावांचा विक्रम,पाकिस्तानचा १६९ धावांनी पराभव
35- किरण भगतकडून काका पंजाबी झोळी डावावर चितपट
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *

======================================

आज रिक्षांचा एकदिवसीय संप, प्रवाशांचे मोठे हाल


  • मुंबई : ओला, उबेर यासह अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांवर निर्बंध आणावे, अवैध वाहतुकीवर बंदी आणावी आणि तीन वर्षे झालेल्या लायसन्सधारक रिक्षाचालकांना बॅज देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी मुंबईतील आॅटोरिक्षा चालकांनी बुधवारी संप पुकारला असून त्यामुळे मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत. आॅटोरिक्षा चालक व टॅक्सीमेन्स युनिअनने आज पुकारलेल्या संपात मुंबईतील पूर्व व पश्चिम उपनगरांतील मिळून १ लाखांहून अधिक रिक्षाचालकांनी रिक्षा बंद ठेवल्या आहेत. मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, सातारा, लातूर, नांदेड येथे रिक्षा बंद ठेवतानाच चालकांकडून निदर्शनेही करण्यात येणार आहेत.
    दरम्यान संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून प्रशासनाकडून पर्यायी वाहतूक व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. जास्तीच्या बसेस रस्त्यावर उतरवण्यात आल्या आहेत.  
    ओला, उबेरसह खासगी टॅक्सी कंपन्यांवर निर्बंध आणावेत या मागणीसाठी २९ आॅगस्टपासून जय भगवान महासंघ आणि स्वाभिमान टॅक्सी युनियनकडून बेमुदत संपाची हाक देण्यात आली होती. मात्र १ सप्टेंबर रोजी परिवहनमंत्री यांनी चर्चेसाठी बोलावल्याने टॅक्सी संप मागे घेण्यात आला. मुंबई आॅटोरिक्षा व टॅक्सीमेन्स युनियनकडून मात्र आपल्या विविध मागण्यांसाठी ३१ आॅगस्ट रोजी संपाची हाक दिली होती. याबाबत युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले की, मुंबईत पूर्णपणे रिक्षा बंद ठेवल्या जातील. त्याचबरोबर पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर येथेही परिणाम जाणवेल. तर अन्य शहरांत निदर्शने केली जातील. आमच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार न केल्यास गणेशोत्सवानंतर बेमुदत संप पुकारू. मागण्यांचे निवेदन बुधवारी दुपारी परिवहन आयुक्त यांना सादर केले जाईल, असे राव म्हणाले. मुंबईत होणाऱ्या संपात १ लाख ४ हजार रिक्षा सामील होतील. संपामुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी परिवहन विभागाकडून पर्यायी वाहतूक व्यवस्था सज्ज ठेवली आहे. मालवाहू वाहने तसेच इतर प्रवासी वाहने जसे बस व इत्यादीमधून बंद कालावधीत प्रवासी वाहून नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. बेस्ट आणि एसटी महामंडळाच्या बसही आवश्यकतेनुसार प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध राहतील, अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली.
======================================

इंग्लंडने रियाझ करुन पाकिस्तानची वाजवली - नेटीझन्सनी उडवली खिल्ली


  • ऑनलाइन लोकमत 
    टेंटब्रीज, दि. ३१ - इंग्लंडने काल पाकिस्तान विरुद्ध नॉटिंगहॅम येथे झालेल्या तिस-या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करुन ४४४ धावांचा नवा विश्वविक्रम नोंदवला. पाकिस्तानचा भेदक गोलंदाज वाहाब रियाझची इंग्लिश फलंदाजांनी अक्षरक्ष: पिसे काढली. 
     
    भारतीय क्रिकेटपटूंनीही पाकिस्तानच्या या कामगिरीची टि्वटरवरुन चांगलीच फिरकी घेतली. इंग्लंडवाले रियाझ करुन करुन पाकिस्तानची वाजवत आहेत असे टि्वट भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने केले. वाहाब रियाझने १० षटकात ११० धावा मोजल्या. नेटीझन्सनीही पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे. 
======================================

ठाणे : महिलेकडे बॉडी मसाजची मागणी करत छळणा-याची तुुरूंगात रवानगी


  •  ऑनलाइन लोकमत
    ठाणे, दि. ३१ - महिलेला वारंवार फोन करून तिच्याकडे बॉडी मसाजची मागणी करत तिला त्रास देणा-या महाभागाला पोलिसांनी हिसका दाखवत तुरूंगवारी घडवली आहे. ठाण्यातील कोपरी भागात ही घटना घडली आहे. गुजरातमधील सिल्व्हासा येथे एका खासगी कंपनीत काम करणा-या अंकज पांडे (वय २४) याने कोपरी येथे राहणा-या एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेला (३५) फोन करून तिच्याकडे बॉडी मसाजची मागणी केली. तुमचा नंबर ' एस्कॉर्ट'  (कॉलगर्ल्स ) सर्व्हिस पुरवणा-यातर्फे मिळाल्याचे सांगत त्याने त्या महिलेला बराच वेळ फोन केला. मात्र ही माहिती चुकीची असल्याचे त्या महिलेने स्पष्ट केल्यानंतरही तो तिला फोन करून त्रास देत राहिला. अखेर तिने त्याचा नंबर ब्लॉक करून टाकला.
    मात्र त्यानंतरही पांडे याने वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करत त्या महिलेला त्रास देणे सुरूच ठेवले. एके दिवशी त्याने त्या महिलेला कोपरी येथील १२ बंगला भागात भेटण्यास बोलावले. त्रस्त झालेल्या महिलेने सर्व कॉल रेकॉर्ड करून कोपरी पोलिसांकडे तक्रार नोंदवत ते पुरावे त्यांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिस व सामाजिक महिला कार्यकर्त्यांनी सापळा रचत त्या नराधमाला १२ बंगला भागात रंगेहाथ पकडले. व पोलिसांनी त्याची रवानगी तुरूंगात करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

======================================

हैदराबादमध्ये पावसाचा कहर, चौघांचा मृत्यू


  • - ऑनलाइन लोकमत
    हैदराबाद, दि. 31 - मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं आहे.  मुसळधार पावसामुळे चौघांचा मृत्यू झाला असून यामधील तिघांचा मृत्यू भिंत कोसळल्याने झाला आहे. मुशीराबादमध्ये ही घटना घडली. ठिकठिकाणी पाणी साचले असून अनेक ठिकाणी वाहतूकीची कोंडी झाली आहे. राज्य सरकारने कर्मचा-यांना कार्यालयात एक तास उशिरा पोहोचण्याची मुभादेखील दिली होती. 
     
    रायलसीमा आणि आंध्रप्रदेशच्या किनारी भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.  हैदराबाद महापालिका आयुक्त जनार्दन रेड्डी यांनी महापालिका कर्मचारी आणि आणीबाणी पथक वगळता इतर नागरिकांना गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन केलं आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आयुक्त मुख्य सचिवांची भेट घेणार आहेत. 

======================================
जन्माच्या दाखल्यासोबत मिळणार दहावीचं प्रमाणपत्र

  • योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
     
    विद्यार्थ्यांच्या कोवळ्या हळूवार मनाची तितक्याच कोमलपणे दखल घेणाऱ्या माननीय शिक्षणमंत्र्यांनी आणखी एक स्तुत्य उपक्रम राबवणार असल्याचे जाहीर केले आहे. मूल जन्माला आलं की महापालिकेच्या जन्मदाखल्यासोबतच, मुलाच्या 16व्या वाढदिवसाच्या तारखेचं दहावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे.
     
    जुलै-ऑगस्ट, २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेत तीन किंवा तीन पेक्षा अधिक विषयात अनूत्तीर्ण विद्यार्थी हे कौशल्य विकास सेतू कार्यक्रमासाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या एकही गुणपत्रिकेवर नापास हा शिक्का राहणार नाही, असे शिक्षणमंत्र्यांनी मंगळवारी घोषित केले.
     
    त्यानंतर अनौपचारीक वार्तालाप करताना शिक्षणमंत्र्यांनी यापुढचं पाऊल आणखी दमदार असल्याचे सूचित केले. दहावीला नापास होणार नाही याची तर हमी मिळाली, परंतु दहावीपर्यंत पोहोचू का? शाळेत जायला जमेल का? गेलोच आणि सैराट होत आर्ची-परश्या झालो तर शैक्षणिक नुकसान होईल का? हे आणि असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर, पुढील काळात येण्याची शक्यता आहे. या अडचणींचा विचार करून जन्मदाखल्यासोबतच दहावीचं प्रमाणपत्र दिलं, तर विद्यार्थी अत्यंत निर्धोकपणे त्यांचं बालजीवन कृष्णलीला करत रमतगमत घालवू शकतील असा यामागचा विचार आहे.
     
    यावरच न थांबता, शिक्षणमंत्री देशभरातल्या विविध विद्यापीठांशी आणि कंपन्यांशी टाय अप करण्याचा प्रयत्न करत असून पदवीचं शिक्षण, पदव्युत्तर शिक्षण व कँपस इंटरव्यूची सोय मुलाच्या जन्माच्यावेळीच करता येईल का याची चाचपणी करत आहेत.
     
    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तंत्रज्ञानाच्या वापराचा मंत्र त्यासाठी उपयोगाला येईल असा शिक्षणमंत्र्यांना विश्वास आहे. उगाच शैक्षणिक अभ्यासक्रमाचे उंबरठे झिजवण्यापेक्षा मुलाची डीएनए टेस्ट करून तो मोठेपणी कोण होईल हे ठरवता येणं आणि त्या अनुषंगानं पदव्या व नोकरीचं वाटपही जन्मदाखल्यासोबतच करता येईल अशी त्यांची अटकळ आहे.
    संपूर्ण महाराष्ट्राला शहाणं करून सोडणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचा आदर्श शिक्षणमंत्र्यांच्या डोळ्यासमोर आहेच. विश्वाचं सार सांगणारी ज्ञानेश्वरी लिहून अवघ्या सोळाव्या वर्षी समाधी घेणाऱ्या ज्ञानेश्वरांना डिग्रीची अडचण भासली नाही, तर आपल्याला का भासावी असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला असून, हा विषय याच टर्ममध्ये मार्गी लावण्याचा निर्धार केला आहे.

======================================

‘सैराट’ची कथा चोरल्याप्रकरणी चौकशी आदेश



  • सैराट चित्रपटाची कथा ‘बोभाटा’ या कादंबरीवरून चोरल्याप्रकरणी पनवेल न्यायालयात केस दाखल करण्यात आली आहे. नवनाथ माने यांनी २०१०मध्ये ही कादंबरी लिहिली होती. या प्रकरणी माने यांनी पनवेल न्यायालयात धाव घेतली होती. कादंबरीची कथा चोरल्याप्रकरणी न्यायालयाने कामोठे पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
    कोट्यवधींचा गल्ला जमवणारा हा चित्रपट व त्यामधील कलाकार रातोरात प्रसिद्ध झाले. चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी या कादंबरीतील कथेत थोडाफार बदल करून चित्रपट तयार केल्याचा आरोप माने यांनी केला आहे. यासंदर्भात ३० सप्टेंबरपर्यंत चौकशी पूर्ण करण्याचे आदेश पनवेल न्यायालयाने कामोठे पोलिसांना दिले आहेत.
    ‘बोभाटा’ कादंबरीत ग्रामीण भागातील जातीच्या भिंती, प्रेमाची कथा, यातून निर्माण होणारा संघर्ष याचे वर्णन करण्यात आले
    आहे.
    डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनीदेखील कादंबरीचे कौतुक केले होते. कादंबरीवर आधारित चित्रपट बनवण्यासाठी खुद्द माने यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र नागराज मंजुळे यांनी ही कथा चोरल्याने माने यांचे स्वप्न भंगले असल्याची माहिती त्यांचे वकील अभिषेक येंडे यांनी दिली.
======================================

Tuesday, 30 August 2016

नमस्कार लाईव्ह ३०-०८-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह ३०-०८-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी लिंक क्लिक करा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय] 
1- भूमध्य सागरातून दोन जुळ्यांसह 6500 शरणार्थींची सुटका
2- अमेरिकेला वापरता येणार भारतीय नौदलाचे तळ
3- लिट्टेचा नेता प्रभाकरन जिवंत असू शकतो?
4- मांझीला बहारीनचे पंतप्रधान देणार मदत
5- लॉस एंजेल्स विमानतळावर गोळीबाराची अफवा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
6- विजय मल्ल्या यांनी मुद्दामच दडविली संपत्तीची माहिती!
7- दोन हजार कोटींचा हवाला घोटाळा?
8- इन्फोसिसचा टीसीएस फॉर्म्युला !
9- भारत पूर्वीपेक्षा सध्या अधिक मजबूत स्थितीत
10- खरिपाच्या मुहुर्तालाच शेतक-यांवर सुलतानी संकट!
11- 2 सप्टेंबरपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिएतनामच्या दौ-यावर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
12- मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे - शरद पवार 
13- मुंबईतील कामगार चळवळीचा केंद्रबिंदू कोसळला 
14- बेस्टला वर्षाला ९०५ कोटींचा तोटा
15- मेट्रोतून मांसवाहतूक करण्यास बंदी कायम
16- प.रे.ची ‘हार्बर वाहतूक सेवा’ मध्य रेल्वेकडे ?
17- अर्शीद कुरेशी, रिझवान खानचा ताबा मुंबई पोलिसांकडे
18- दहीहंडी अवमान याचिकेवरील सुनावणी २० सप्टेंबरला
19- किडनी रॅकेट - पत्राकडे दुर्लक्ष करणे पडले महागात
20- सरकारी अनास्थेचा बळी; मोखाड्याच्या सागर वाघ याचा कुपोषणाने मृत्यु 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
20- रुग्णालयाने प्रवेश नाकारला, मुलाने पित्याच्या खांद्यावर सोडले प्राण 
21- आकाशातून असा दिसतो मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वे 
22- पुणे - गैरहजर, बडतर्फ कर्मचाऱ्यांना एसटीकडून पुन्हा कामाची संधी 
23- पंढरपूर - सोलापूर महामार्गावर टमटम व स्कॉर्पिओचा अपघात 
24- गाझियाबादमध्ये वादळी वा-यासह मुसळधार पावसाला सुरुवात 
25- औरंगाबाद- जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय 
26- 1500 रुपयांची लाच घेताना खेड न्यायालयातील लिपिकाला रंगेहाथ पकडले 
27- नाशिकच्या तरुणाचे अपहरण करून पुण्यात बळजबरीने विवाह 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
28- आर्चीत दिसली वैजयंतीमाला यांची झलक !  
29- मोसमाच्या अखेर भारत अव्वल स्थान पटकावू शकतो - धोनी 
30- आॅलिम्पियन महिला हॉकी संघाला रेल्वेत करावा लागला खडतर प्रवास 
31- ...आणि राष्ट्रपतींनी स्टेजच्या खाली येऊन दिला पुरस्कार 
32- सिंधू, साक्षी, दीपाला खेलरत्न पुरस्कार प्रदान 
33- बीफ खाल्ले म्हणून बोल्टने नऊ सुवर्णपदके मिळवली - भाजप खासदार 
34- पावसाच्या जोरावर विंडिजने जिंकली मालिका 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
==================================

    मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे - शरद पवार

  • मुंबई, दि. ३० - अॅट्रोसिटी कायद्याचा गैरवापर दलितांकडून नव्हे, स्थानिक नेतृत्वाकडून होतोय. त्यामुळे अॅट्रोसिटीचा गैरवापर होऊ नये यावर प्रशासनाने लक्ष ठेवले पाहिजे. तीच आमची भूमिका आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी सांगितले. ते पत्रकारपरिषदेत बोलत होते.

    अॅट्रोसिटी कायदा पूर्णपणे रद्द करा अशी आमची भूमिका नाही. अॅट्रोसिटीचा गैरवापर दलितांनी नव्हे राजकारणासाठी स्थानिक पुढा-यांनी केला असे शरद पवार यांनी सांगितले. सध्या मराठा समाजाचे जे मोर्चे निघत आहेत ते योग्य आहेत, सरकारने त्याची दखल घेतली पाहिजे असे पवारांनी सांगितले.
    ओबीसी आरक्षणला धक्का न लावता आर्थिक दृष्टया मागास मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे शरद पवार यांनी सांगितले. मराठवाडयात इसिसशी संबंध असल्याच्या संशयातून सरसकट मुस्लिम तरुणांची धरपकड करणे चुकीचे असल्याचे शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रातील मुस्लिम संघटनांनी आधीच इसिसचा निषेध केला आहे असे शरद पवार यांनी सांगितले.  
==================================
मुंबईतील कामगार चळवळीचा केंद्रबिंदू कोसळला


  • मुंबई, दि. 30 - दक्षिण मुंबईत जुन्या इमारती कोसळणं हे दरवर्षी पावसाळ्यात ठरलेलंच असतं. तशीच एक इमारत मंगळवारी सकाळी कोसळली. त्याचा फारसा धक्का बसला नाही. त्यातही ती आधीच रिकामी करण्यात आली होती, त्यामुळे मनुष्यहानी झाली नाही, हे वाचून बरं वाटलं. मग दुपारी एक निरोप आला... अरे, २0४, राजा राममोहन राय मार्ग ही इमारत कोसळलीय. 
    खरं तर या पत्त्यावरून अगदी मुंबईकरांनाही फारसा बोध होणार नाही. तरीही २0४, राजा राममोहन राय मार्ग ही इमारत कोसळली, हे कळताच धक्का बसला. सलग तीन वर्षं त्या इमारतीत जाणं होतं. ती इमारत म्हणजे मुंबईतील कामगार चळवळीचा केंद्रबिंदू होती. मुंबईतील हॉटेल कामगार, थिएटर कामगार, महापालिका शिक्षक, अग्निशामक दल कर्मचारी, महापालिका नर्सिंग आणि पॅरामेडिकल स्टाफ, महापालिका कामगार व कर्मचारी, बेस्ट कामगार, फेरीवाले, गुमास्ता, टॅक्सीवाले या साऱ्यांच्या आंदोलनांचं ते केंद्रच होतं बरीच वर्षं. वास्तविक कामगार चळवळीचं केंद्र गिरगावात हे आश्चर्य वाटण्यासारखं. पण तसं होतं खरं. 
==================================

रुग्णालयाने प्रवेश नाकारला, मुलाने पित्याच्या खांद्यावर सोडले प्राण



  • कानपूर, दि. ३० - ओडिसामध्ये रुग्णालयाने गाडी देण्यास नकार दिल्याने एका आदिवासी व्यक्तीला आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावरुन घेऊन जावा लागल्याची घटना ताजी असताना आता उत्तरप्रदेशातील एका सरकारी रुग्णालयाच्या असंवेदनशीलतचे उदहारण समोर आले आहे. 
    रुग्णालयाने कोणत्याही प्रकारची मदत न केल्याने अखेर 'त्या' १२ वर्षाच्या मुलाने पित्याच्या खांद्यावरच आपले प्राण सोडले. सुनील कुमार यांचा मुलगा अंश तापाने फणफणत होता. सुनील कुमार त्याला घेऊन कानपूरच्या लाला लजपत राय रुग्णालयात गेले. 
    पण रुग्णालय प्रशासनाने अंशला दाखल करुन घेण्यास नकार देत त्याला बाल रुग्णलायात जाण्यास सांगितले. अंशची प्रकृती नाजूक असूनही रुग्णालयाने रुग्णवाहिका किंवा स्ट्रेचर अशी कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे सुनील कुमार मुलाला आपल्या खांद्यावर घेऊन रुग्णालयाच्या दिशेने निघाले. मात्र रस्त्यातच अंशने पित्याच्या खांद्यावर प्राण सोडले. 

==================================

आर्चीत दिसली वैजयंतीमाला यांची झलक !



  • मुंबई, दि. ३० - 'सैराट' फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरुनं सध्या रसिकांवर मोहिनी घातलीय. ती जिथं जाईल तिथे चाहत्यांचा गराडा तिच्याभोवती जमा होतो. तिच्या फॅन्सना आवरण्यासाठी तर चक्क बाऊन्सर आणि पोलिसांनाही पाचारण करावं लागलंय. रुपेरी पडद्यावरील आर्चीची अशी क्रेझ वाढत असताना एका वाहिनीवरील कार्यक्रमातील तिच्या लूकमुळे वेगळी चर्चा रंगलीय. 
    या कार्यक्रमात परफॉर्मन्समधला आर्चीच्या लूकमध्ये अनेकांना हिंदी चित्रपटसृष्टीच्या ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेत्री वैजयंतीमाला यांची झलक दिसली. 'वडकई' या तमिळ सिनेमातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केलेल्या वैजयंतीमाला यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनय आणि नृत्यानं रसिकांची मनं जिंकली.  
    दोन दशकांहून अधिक काळ हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणा-या वैजयंतीमाला या प्रसिद्ध नृत्यांगणासुद्धा होत्या. त्यामुळं अभिनयासह त्यांच्या नृत्याचीही कायम चर्चा व्हायची. आता आर्ची अर्थात रिंकूच्या त्या परफॉर्मन्समुळं अनेकांना वैजयंतीमाला यांची झलक दिसलीय. त्यामुळं तिच्यासाठी ही तुलना नक्कीच नवी प्रेरणा देणारी म्हणावी लागेल.

==================================

आकाशातून असा दिसतो मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वे



  • लोणावळा, दि. 30-  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लेनची शिस्त मोडणे, अतिवेगाने वाहने चालविणे आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणाऱ्यांवर आता ड्रोन कॅमेऱ्यांची २४ तास नजर राहणार आहे. द्रुतगती मार्गावर शिस्त लावण्यास ४ ठिकाणी ड्रोन कॅमेरे बसविण्याचे प्रात्यक्षिक शनिवारी घेण्यात आले. या वेळी लेनची शिस्त मोडणाऱ्या काही अवजड वाहनांविरोधात कारवाईदेखील करण्यात आली. मात्र यानिमित्ताने मुंबई - पुणे एक्स्पेस-वे आकाशातून दिसतो कसा हेदेखील पाहण्याची संधी मिळाली. 
    द्रुतगती महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रात लेन कटिंग करणाऱ्या, अतिवेगाने वाहने चालविणाऱ्या आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांवर नजर ठेवण्यासाठी चार ठिकाणी ड्रोन कॅमेरे बसविण्याचे काम सुरू झाले आहे. त्याचे पहिले प्रात्यक्षिक व सर्वेक्षण महामार्ग पोलीस अधीक्षक अमोल तांबे, महामार्ग पोलीस निरीक्षक अजय बारटक्के, सुधीर अस्पत, सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम जोशी, एम. आर. काटकर यांच्या उपस्थितीत शनिवारी करण्यात आले. 
==================================

नमस्कार लाईव्ह ३०-०८-२०१६चे बातमीपत्र

*[अंतरराष्ट्रीय]*
१- किरगिस्तानमधील चीनी दूतावासाजवळ शक्तीशाली बॉम्बस्फोट 
२- अमेरिकेला वापरता येणार भारतीय नौदलाचे तळ 
३- लिट्टेचा नेता प्रभाकरन जिवंत असू शकतो? 
४- मांझीला बहारीनचे पंतप्रधान देणार मदत 
५- लॉस एंजेल्स विमानतळावर गोळीबाराची अफवा 
६- ब्रसेल्समध्ये पोलिस इमारतीत बॉम्बस्फोट 
७- स्तनाच्या कर्करोगावरील उपचार शोधला 
८- १४५ वर्षांच्या गोथोंना जगाचा घ्यायचाय निरोप 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
९- ज्येष्ठांच्या सेवेसाठी केंद्राचे नवे धोरण!
१०- स्कॉर्पिन प्रकरण गंभीरच!
११- ददलानी यांना क्षमा करावी, विजय दर्डा यांचे जैन समाजाला आवाहन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
१२- शेतकरी आत्महत्येवरुन उद्धव यांची फडणवीस सरकारवर टीका 
१३- बीडमध्ये मराठा समाजाच्या मोर्चाला उसळली गर्दी 
१४- मराठी, हिंदू सण संपवण्याचं कारस्थान - राज ठाकरे 
१५- बेस्टला वर्षाला ९०५ कोटींचा तोटा 
१६- मेट्रोतून मांसवाहतूक करण्यास बंदी कायम 
१७- प.रे.ची ‘हार्बर वाहतूक सेवा’ मध्य रेल्वेकडे ?
१८- अर्शीद कुरेशी, रिझवान खानचा ताबा मुंबई पोलिसांकडे 
१९- दहीहंडी अवमान याचिकेवरील सुनावणी २० सप्टेंबरला 
२०- किडनी रॅकेट - पत्राकडे दुर्लक्ष करणे पडले महागात 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
२१- गोरेगाव रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड 
२२- दिल्लीत डेंग्यूचा वाढता फैलाव 
२३- तेलंगणा विधानसभेत जीएसटी विधेयक मंजूर 
२४- नाशिक - छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या 
२५- छत्तीसगड; बायानार भागातून ५ किलो आईडी स्फोटके जप्त  
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२६- लंडन ऑलिम्पिकसाठी योगेश्वरला मिळणार रौप्यपदक 
२७- मोसमाच्या अखेर भारत अव्वल स्थान पटकावू शकतो - धोनी 
२८- आॅलिम्पियन महिला हॉकी संघाला रेल्वेत करावा लागला खडतर प्रवास 
२९- ...आणि राष्ट्रपतींनी स्टेजच्या खाली येऊन दिला पुरस्कार 
३०- सिंधू, साक्षी, दीपाला खेलरत्न पुरस्कार प्रदान 
३१- बीफ खाल्ले म्हणून बोल्टने नऊ सुवर्णपदके मिळवली - भाजप खासदार 
३२- पावसाच्या जोरावर विंडिजने जिंकली मालिका 
३३- विजय मल्ल्या यांनी मुद्दामच दडविली संपत्तीची माहिती!
३४- दोन हजार कोटींचा हवाला घोटाळा?
३५- इन्फोसिसचा टीसीएस फॉर्म्युला !
३६- भारत पूर्वीपेक्षा सध्या अधिक मजबूत स्थितीत
३७- खरिपाच्या मुहुर्तालाच शेतक-यांवर सुलतानी संकट!
३८- उत्पादन येताच पडले शेतमालाचे भाव 
३९- साहित्यिक वि.ग.कानेटकर यांचे निधन. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
======================================

लंडन ऑलिम्पिकसाठी योगेश्वरला मिळणार रौप्यपदक



  • नवी दिल्ली, दि. ३० - रिओ ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू योगेश्वर दत्तचा पहिल्या फेरीतच पराभव झाला. मात्र त्याआधीच्या २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकसाठी योगेश्वरला रौप्यपदक मिळण्याची शक्यता आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वरला कांस्यपदक मिळाले होते. 
     
    २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वरच्या ६० किलो वजनी गटात खेळणा-या  रशियाचा बीसीक कुडखोव्हला रौप्यपदक मिळाले होते. मात्र कुडखोव्हचा डोप चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याची पदके काढून घेण्यात आली आहेत. चारवेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेला आणि दोन ऑलिम्पिक पदके मिळवणा-या कुडखोव्हचा २०१३ मध्ये दक्षिण रशियामध्ये कार अपघातात मृत्यू झाला. 
     
    वाडाने निर्बंध घातलेल्या उत्तेजकांचे कुडखोव्हने सेवन केले होते. जागतिक कुस्ती संघटना आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून अद्याप यासंबंधीची अधिकृत घोषणा झालेली नाही. योगेश्वरला रौप्यपदक मिळाले तर, २०१२ लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताच्या खात्यावर आणखी एक रौप्यपदक जमा होईल. सुशील कुमारने लंडनमध्ये रौप्यपदक मिळवले होते. 
======================================

शेतकरी आत्महत्येवरुन उद्धव यांची फडणवीस सरकारवर टीका



  • मुंबई, दि. ३० - राज्य आणि केंद्रात सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावरुन फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. धाराशीव जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य वनमाला चंद्रकांत गायकवाड या महिलेने सावकारी जाचाला कंटाळून विष प्राशन करुन जीवन संपवले. 
     
    धाराशीवच्या वनमालेच्या मृत्यूनंतर तरी कर्जबाजारी शेतकर्‍यांची तडफड सरकारला दिसणार आहे का? आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडणार आहे का? असे सवाल उद्धव यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून विचारले आहेत. 

======================================

बीडमध्ये मराठा समाजाच्या मोर्चाला उसळली गर्दी



  • बीड, दि. ३० - कोपर्डी अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने आज बीड शहरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी जिल्ह्यातून मोर्चात सहभागी होण्यासाठी येणा-या लोकांची रस्त्यावर अक्षरश: रीघ लागली आहे. 
     
    वाहनांची पार्किंगची व्यवस्था शहराबाहेर करण्यात आलेली असल्याने पार्किगपासून स्टेडियमकडे लोकांची रस्त्यावर गर्दी उसळली आहे. कोपर्डी अत्याचार प्रकरणी आज दुपारी १२ वाजता मराठा क्रांती मुक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. सकाळपासून बीडकडे येणारी वर्दळ वाढली आहे. 
     
    वाहतूकीचे मार्गही बदलण्यात आले आहेत. मराठा समाजाच्या मुकमोर्चासाठी एक हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असून, पन्नास पोलीस अधिकारी, तीन हजार स्वयंसेवक मदतीला आहेत. काहीवेळात मोर्चाला सुरुवात होणार असून, मोर्चाच्या मार्गावरील दुकाने बंद आहेत. 
======================================

मराठी, हिंदू सण संपवण्याचं कारस्थान - राज ठाकरे



  • मुंबई, दि. ३० - मराठी, हिंदू सण संपवण्याचं कारस्थान सुरु आहे  या आरोपाचा मंगळवारी  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुनरुच्चार केला. मुंबईत मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. गैरवापर होत असेल तर, अॅट्रोसिटीचा कायदा रद्द करण्याचाही त्यांनी पुनरुच्चार  केला. 
     
    जातिनिहाय कायदे कशाला हवेत ?, आरक्षण आर्थिक निकषांवर हवं असे राज म्हणाले. मुंबईत वाहतूक पोलिसावर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत कायद्याचा कुठलाही धाक राहिला नसल्याचे त्यांनी सांगितले. 
     
    बलात्कार रोखण्यासाठी सौदी अरेबियासारखे कठोर कायद्याची आवश्यकता आहे. कठोर कायदे नसल्यामुळे बलात्काराचे गुन्हे सर्रास घडतात असे ते म्हणाले. दहीहंडी उत्सवासंबंधी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत न्यायालयाच्या निर्णयावर टीका करताना त्यांनी हिंदू सण, उत्सव संपवण्याचा डाव असल्याचा आरोप केला होता.   
======================================

अमेरिकेला वापरता येणार भारतीय नौदलाचे तळ



  • वॉशिंग्टन, दि. ३० - परस्परांची जमीन, हवाई हद्द आणि नौदल तळ वापरण्याच्या महत्वाच्या करारावर सोमवारी भारत आणि अमेरिकेने स्वाक्षरी केली. त्यामुळे दोन्ही देशांना आता दुरुस्ती आणि वस्तू पुरवठयासाठी परस्परांचे तळ वापरता येतील. 
     
    हा करार म्हणजे भारत-अमेरिका संरक्षण भागीदारी अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक भक्कम पाऊल आहे. चीनच्या आक्रमकतेला आळा घालण्यासाठी भारत आणि अमेरिका अधिक जवळ येत चालले आहेत. 
     
    अन्य जवळच्या सहका-यांप्रमाणेच भारता बरोबर संरक्षण व्यापार आणि तंत्रज्ञान शेअरींग वाढवणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव अॅश कार्टर आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या कराराची माहिती दिली. या करारामुळे संयुक्त मोहिम, सरावा दरम्यान भारत आणि अमेरिकन नौदलाला परस्परांना मदत करणे अधिक सोपे झाले आहे असे पर्रिकर यांनी सांगितले. 

======================================