Monday, 31 October 2016

नमस्कार लाईव्ह ३१-१०-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- झाकीर नाईकच्या वडिलांचं निधन, अटकेच्या भीतीने झाकीर परदेशातच 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
२- भोपाळ सेंट्रल जेलमधून सिमीच्या 8 दहशतवाद्यांचं पलायन 
३- दिवाळीच्या रात्रीही ना'पाक' कुरापती, आरएसपुरात तुफान गोळीबार 
४- देशभरात लक्ष्मीपूजन संपन्न, बीएसईमध्ये मुहूर्त ट्रेडिंग 
५- भोपाळ : सिमीच्या फरार 8 दहशतवाद्यांना केले ठार 
६- मोदीजी 15 लाख जमा करा: दिग्विजयसिंह 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
७- नवाजुद्दीनच्या कुटुंबाला धमक्या, उत्तर प्रदेश सोडण्याचा निर्णय? 
८- चंद्रकांत पाटील आणि राजू शेट्टी यांची ऊस दरासंदर्भातील बैठक निष्फळ 
९- कुत्र्यांना मारा, सोनं मिळवा, केरळच्या एका संस्थेची अजब योजना 
१०- कोल्हापुरात कार मेकॅनिककडून चक्क हेलिकॉप्टर दुरुस्ती 
११- कोल्हापूर; स्मशानात दिवाळसण, कर्मचाऱ्यांचं करवीरवासियांकडून औक्षण 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- चंद्रपूरमध्ये सुपर मार्केटला भीषण आग 
१३- फटाक्यामुळे उस्मानाबादच्या उमरग्यात दहा दुकानांना आग 
१४- गिरगावातल्या मेहता मॅन्शन इमारतीला भीषण आग 
१५- कल्याणमध्ये भीषण आग, गॅरेजसह 2 गाड्यांचा कोळसा 
१६- औरंगाबाद; स्वच्छतागृह नसल्याने डी.एड.च्या विद्यार्थिनीचा शिक्षणाला रामराम 
१७- औरंगाबाद फटाका मार्केटची आग शॉर्ट सर्किटमुळे नाही?
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- भारताला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीचं जेतेपद, पाकिस्तानचा धुव्वा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
===================================

वारणेच्या काठी शहीद नितीन कोळींना अखेरचा सलाम

वारणेच्या काठी शहीद नितीन कोळींना अखेरचा सलाम
सांगलीः शहीद नितीन कोळी यांच्यावर सांगलीतील दुधगावमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा देवराज आणि भाऊ उल्हास यांनी नितीन यांना मुखाग्नी दिला. यावेळी अवघा जनसमुदाय शोकाकूळ झाला होता.
शुक्रवारी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात नितीन कोळी शहीद झाले होते. श्रीनगरच्या लष्करी तळावर लष्कराने त्यांना अंतिम सलामी दिली होती. त्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांचं मूळगाव असलेल्या सांगलीतील दुधगावमध्ये आणण्यात आलं होतं.
यावेळी नितीन कोळी यांच्या अंत्यदर्शनासाठी अवघी अलोट गर्दी जमली होती. एकीकडे नितीन कोळी यांचा अंत्यविधी सुरु होता आणि दुसरीकडे शहीद नितीन कोळी अमर रहेपाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या.

===================================

भोपाळ सेंट्रल जेलमधून सिमीच्या 8 दहशतवाद्यांचं पलायन

भोपाळ सेंट्रल जेलमधून सिमीच्या 8 दहशतवाद्यांचं पलायन
भोपाळ (मध्य प्रदेश) : भोपाळमधील सेंट्रल जेलमधून सिमीच्या 8 दहशतवाद्यांनी पलायन केले. चादरीची रस्सी बनवून रात्री साडेतीनच्या सुमारास जेलची भिंत ओलांडून दहशतवादी पळाले.
सिमीशी संबंधित 8 दहशतवाद्यांनी भोपाळमधील सेंट्रल जेलमधून पलायन केले. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षारक्षकाची गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर चादरीच्या साहाय्याने जेलची भिंत ओलांडून फरार झाले.
भोपाळ जेलमध्ये याआधी अशाप्रकारे गुन्हेगारांच्या पलायनाची घटना कधीही घडली नव्हती. दहशतवाद्यांच्या पलायनाच्या घटनेनंतर संपूर्ण शहरभर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाही तातडीने सेंट्रल जेलमध्ये पोहोचले असून, तपासही सुरु करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी भोपाळ सेंट्रल जेलच्या अधीक्षकांसोबत चार जणांना निलंबित करण्यात आले आहे.

===================================

झाकीर नाईकच्या वडिलांचं निधन, अटकेच्या भीतीने झाकीर परदेशातच

झाकीर नाईकच्या वडिलांचं निधन, अटकेच्या भीतीने झाकीर परदेशातच
मुंबई : इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा संस्थापक झाकीर नाईक याचे वडील अब्दुल कर्म नाईक यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. मात्र, भारत सरकार आणि तपास यंत्रणाच्या भीतीनं झाकीर नाईक वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिलेला नाही.
मुंबईतल्या माझगावमधील नारियल वाडीतल्या कब्रस्तानात झाकीर नाईकचे वडील अब्दुल कर्म नाईक यांचे अंत्यविधी करण्यात आले. अंत्यविधीसाठी मोठ्या प्रमाणात लोक जमले होते. मात्र, अटकेच्या भीतीनं झाकीरनं अंत्यविधीला येणं टाळलं.
दहशतवादाला खतपाणी देणं आणि धर्मपरिवर्तनाच्या आरोपांमुळे झाकीर नाईक गेल्या काही महिन्यांपासून देशाबाहेर आहे. केंद्र सरकारने झाकीर नाईकच्या संस्थेवर बंदी घातली आहे. त्यानंतर झाकीर देशात परतलाच नाही.

===================================

'सर्वात फास्ट कॅशियर' अशी खिल्ली उडवलेल्या महिलेचं व्हायरल सत्य


'सर्वात फास्ट कॅशियर' अशी खिल्ली उडवलेल्या महिलेचं व्हायरल सत्य
मुंबई : सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल होते, तेव्हा तिची सत्यता पडताळलेली असतेच असं नाही. किंबहुन अर्ध्याहून अधिक वेळा व्हायरल गोष्टींची एकच बाजू प्रकाशात आलेली असते. ‘सर्वात जलद कॅशियर’ असं उपरोधिक कॅप्शन देत हिणवल्या गेलेल्या महिलेची दुसरी बाजू जाणून न घेताच तिची सोशल मीडियावर बदनामी करण्यात आली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुण्यातील शाखेत काम करणाऱ्या प्रेमलता शिंदे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 24 ऑक्टोबरला बालराजू सोमीसेट्टी या फेसबुक यूझरने त्या बँकेत संथ गतीने कॅश मोजतानाचा व्हिडिओ शूट केला आणि अपलोड केला. 14 लाख पेक्षा जास्त जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून दोन लाखांपेक्षा जास्त जणांनी शेअर केला आहे.
कुंदन श्रीवास्तव यांनी प्रेमलता शिंदे यांची खरी कहाणी समोर आणल्याचं वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिलं आहे. शिंदे फेब्रुवारी 2017 मध्ये निवृत्त होणार आहेत. प्रेमलतांना एकदा पॅरलिसीसचा, तर दोन वेळा हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे. संबंधित व्हिडिओ शूट करण्यात आला, त्यावेळी नुकत्याच त्या वैद्यकीय चाचण्यांनंतर कामावर रुजू झाल्या होत्या.
अनेक सुट्ट्या उर्वरित असूनही त्यांनी कामावर येणं पसंत केलं. सन्मानाने निवृत्त होण्याचा त्यांचा मानस असल्याने प्रेमलता आजारपण दूर सारुन कामावर आल्या. बँक शाखेतील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार शिंदेंना अतिरिक्त कॅश काऊण्टर देण्यात आलं आहे. त्यामुळे त्या त्यांच्या गतीनुसार काम करु शकतात आणि ग्राहकांचा खोळंबा होत नाही.

===================================

स्वच्छतागृह नसल्याने डी.एड.च्या विद्यार्थिनीचा शिक्षणाला रामराम

स्वच्छतागृह नसल्याने डी.एड.च्या विद्यार्थिनीचा शिक्षणाला रामराम
औरंगाबाद : महाराष्ट्रात विकासाच्या कितीही बाता होत असल्या तरी, प्राथमिक सुविधा सुद्धा देण्यात मागं असल्याचं चित्र पैठणमध्ये दिसतं. केवळ स्वच्छतागृह नाही म्हणून एका विद्यार्थिनीनं बीएडचं शिक्षण सोडलं आहे.
एका भावी शिक्षिकेला महाविद्यालयात महिला स्वच्छतागृह नाही, म्हणून शिक्षणच सोडावं लागलं आहे. पैठण तालुक्यातील आखदवाड्यातल्या कविता छडीदार यांनी लहान मूल असताना शिक्षण सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. डीएडसाठी पैठणच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयात प्रवेश घेतला. मात्र मुलं आणि मुलींसाठी एकत्र स्वच्छतागृह असल्यानं कविता यांना महाविद्यालय नकोसं वाटू लागलं.
कविता यांच्याबरोबर त्यांच्या पतीनंही यासाठी लढा दिला. पण साधं आश्वासनंही मिळालं नाही. खूप पत्रं लिहिली पण काही झालं नाही. त्यानंतर टीसी मागितली, असं त्या सांगतात. मात्र प्राचार्यांना कविता यांचे आरोप मान्य नाहीत. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र
स्वच्छतागृह असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आता महाविद्यालयावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी शाळेतल्या मुलींच्या स्वतंत्र स्वच्छतागृहासाठी प्रशासनाला कामाला लावलं आहे. मात्र सरकारी महाविद्यालयांमध्येही परिस्थिती वेगळी नाही. त्यामुळे आता राज्य सरकार पुढाकार घेऊन इतर विद्यार्थिनींचं शिक्षण सुकर करणार का? हा महत्वाचा प्रश्न आहे.

===================================

कोल्हापुरात कार मेकॅनिककडून चक्क हेलिकॉप्टर दुरुस्ती

कोल्हापुरात कार मेकॅनिककडून चक्क हेलिकॉप्टर दुरुस्ती
कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील यांच्या कोल्हापुरातल्या बंगल्यावरच्या हेलिपॅडवर पाहुण्यांचं हेलिकॉप्टर उतरलं, पण परतीच्या प्रवासात हेलिकॉप्टर सुरुच होईना… संजय पाटील यांनी कंपनीला फोन केला, पण मेकॅनिक पोहोचण्यासाठी दोन दिवस लागणार होते. अशावेळी मेकॅनिक मोमीन धावून आला.
इम्तियाज मोमीन यांच्या गॅरेजमध्ये नेहमीप्रमाणे काम सुरु होतं. पण तितक्यात काही मंडळी आली आणि हेलिकॉप्टर बंद पडलं आहे, दुरुस्त कराल का अशी विचारणा केली. सुरुवातीला कुणी तरी थट्टा करत असेल असं वाटलं. पण नंतर डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निवासस्थानी इम्तियाज पोहोचले आणि समोर दिसलं ते भलं मोठं हेलिकॉप्टर.
याआधी कधीही हेलिकॉप्टर दुरुस्तच काय जवळूनही बघितलं नव्हतं, तरीही इम्तियाज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पायलटशी चर्चा केली आणि थेट हेलिकॉप्टर दुरुस्तीला हात घातला. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर पायलटनं टेस्ट फ्लाय घेतली आणि हेलिकॉप्टर चक्क सुरु झालं.
सगळी खात्री झाली… हेलिकॉप्टर उड्डाणासाठी सज्ज झालं… आणि अर्ध्या तासात हेलिकॉप्टरनं आकाशात भरारी घेतली… याआधी या अवलिया मेकॅनिकनं चक्क पाण्यावर चालणारी कार कोल्हापुरातल्या तलावात उतरवली होती. कोल्हापूरमध्ये काहीही शक्य आहे, असं म्हणतात ते उगाच नाही.

===================================

Sunday, 30 October 2016

नमस्कार लाईव्ह ३०-१०-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय]
१- 'यूएन'च्या इमारतीवर 'हॅपी दिवाळी'चा संदेश
२- बीएसएफकडून पाक रेंजर्सला मिठाई नाही
३- चिनी वस्तुंवरील बहिष्कारामुळे बीजिंग संतप्त
४- लाहोरमध्ये बलूच नागरिकांकडून पाकिस्तानविरोधी निदर्शने.
५- देहदंडाची शिक्षा पुन्हा सुरु करण्यावर टर्कीची संसद विचार करणार.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- भारताकडून पाकला सडेतोड उत्तर, चार पाकिस्तानी चौक्या उडवल्या!
७- केंद्र सरकारमुळे सैन्यावर विपरीत परिणाम- राहुल
८- यंदाची दिवाळी वीर जवानांना समर्पित - पंतप्रधान
९- LOC वर उजळले दिवे, जवानांनी साजरी केली दिवाळी
१०- मिस्त्री यांच्यापासून फारकत घेण्यास टाटांना मोजावे लागणार १६ अब्ज डॉलर
११- उत्तर आणि पूर्व भारतात आता छट पूजेची तयारी सुरू होईल - पंतप्रधान
१२- हुतात्मा नितीन कोळी यांना श्रीनगर येथे लष्कराकडून मानवंदना.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१३- राकेश मारियांची मुख्यमंत्र्यांकडून उचलबांगडी
१४- मुख्यमंत्रिपदी पाच वर्षे मीच - फडणवीस
१५- जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा परिसरात चकमक
१६- हरियाणा केरोसीन मुक्त राज्य बनण्याच्या दिशेने जात आहे. - पंतप्रधान
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- नाशिकचे आजचे तापमान 11.2 अंशावर.
१८- शक्तिप्रदर्शनासाठी इम्रान खान सज्ज
१९- सोलापूर; अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या यांत्रीक बोट व वाळू ट्रकवर कारवाई.
२०- सोलापूर - माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे मुलानेच वडिलांचे घर पेटवल्याची घटना
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- हॉकीत भारताची अंतिम लढत पाकिस्तानशी    
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स*
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा.
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
=====================================

राकेश मारियांची मुख्यमंत्र्यांकडून उचलबांगडी


=====================================

Saturday, 29 October 2016

नमस्कार लाईव्ह २९-१०-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- शिकागोत विमानाला आग; 170 प्रवासी बचावले 
२- भारताची प्रगती होते, मग आपली का नाही - डोनाल्ड ट्रम्प 
३- भारताबरोबरचा व्यापार थांबवण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- भारत-चीन सीमेवर पंतप्रधान मोदींची जवानांसोबत दिवाळी 
५- पाकिस्तानच्या गोळीबारात सांगलीचा जवान शहीद 
६- धनत्रयोदशीलाही खरेदी नाही; सोने घसरले
७- मिस्त्री यांच्यापासून फारकत घेण्यास टाटांना मोजावे लागणार १६ अब्ज डॉलर  
८- रतन टाटा मिस्त्री परिवाराकडील शेअर्ससाठी खरेदीदाराच्या शोधात 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
एसटीची सहा प्रादेशिक कार्यालयं दिवाळीनंतर बंद
९- ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचं निधन 
१०- तुकाराम मुंढेंचा डॉ. डी. वाय पाटील संकुलाला दणका 
११- गाडीतून उतरुन खासदार डॉ. प्रीतम मुंडेंचे रुग्णावर उपचार 
१२- मुंबई; ऐन दिवाळीत तब्बल 2 कोटींचा भेसळयुक्त खवा आणि तेल जप्त 
१३- आगामी नगरपालिका निवडणुकांसाठी ऑफलाईन फॉर्म भरण्याची मुभा 
१४- कर्नाटकात कांद्याला 624 रुपये हमीभाव 
१५- न्हावा-शेवा येथे पकडले ३८ कोटींचे चिनी फटाके 
१६- साखरेचे नियंत्रण करण्याचा अधिकार राज्यांना 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- औरंगाबादमध्ये अग्नितांडव, फटाक्यांच्या दुकानात भडका 
१८- नगर-सोलापूर हायवेवर भीषण अपघात, मायलेकाचा मृत्यू 
१९- औरंगाबादेत ग्राहकांची दुकानदाराला बेदम मारहाण 
२०- मला राजीनामा देण्याची वेळ येणार नाही: महापौर सुधाकर सोनावणे 
२१- पायानं मळलं जातं पाणीपुरीच्या पुरीचं पीठ, धक्कादायक दृश्य कॅमेऱ्यात कैद 
२२- ठाणे; सीमेवरील जवानांसाठी विद्यार्थ्यांकडून तब्बल 300 किलो फराळाची भेट! 
२३- नाशिक; होर्डिंग बाजूला ठेवल्यानं मनसे पदाधिकाऱ्यांची व्यापाऱ्याला मारहाण 
२४- औरंगाबादमध्ये चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू 
२५- वसईत अनोळखी महिलेचा मृतदेह 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२६- आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीमध्ये भारताची फायनलमध्ये धडक 
२७- रोहित, विराटची अर्धशतकं, किवींसमोर 270 धावांचं आव्हान 
२८- टीम इंडियाची 'नई सोच', आईच्या नावाच्या जर्सीसह मैदानात! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html

नमस्कार लाईव्ह २९-१०-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- शिकागोत विमानाला आग; 170 प्रवासी बचावले 
२- भारताची प्रगती होते, मग आपली का नाही - डोनाल्ड ट्रम्प 
३- भारताबरोबरचा व्यापार थांबवण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- भारत-चीन सीमेवर पंतप्रधान मोदींची जवानांसोबत दिवाळी 
५- पाकिस्तानच्या गोळीबारात सांगलीचा जवान शहीद 
६- धनत्रयोदशीलाही खरेदी नाही; सोने घसरले
७- मिस्त्री यांच्यापासून फारकत घेण्यास टाटांना मोजावे लागणार १६ अब्ज डॉलर  
८- रतन टाटा मिस्त्री परिवाराकडील शेअर्ससाठी खरेदीदाराच्या शोधात 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
९- ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचं निधन 
१०- तुकाराम मुंढेंचा डॉ. डी. वाय पाटील संकुलाला दणका 
११- गाडीतून उतरुन खासदार डॉ. प्रीतम मुंडेंचे रुग्णावर उपचार 
१२- मुंबई; ऐन दिवाळीत तब्बल 2 कोटींचा भेसळयुक्त खवा आणि तेल जप्त 
१३- आगामी नगरपालिका निवडणुकांसाठी ऑफलाईन फॉर्म भरण्याची मुभा 
१४- कर्नाटकात कांद्याला 624 रुपये हमीभाव 
१५- न्हावा-शेवा येथे पकडले ३८ कोटींचे चिनी फटाके 
१६- साखरेचे नियंत्रण करण्याचा अधिकार राज्यांना 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- औरंगाबादमध्ये अग्नितांडव, फटाक्यांच्या दुकानात भडका 
१८- नगर-सोलापूर हायवेवर भीषण अपघात, मायलेकाचा मृत्यू 
१९- औरंगाबादेत ग्राहकांची दुकानदाराला बेदम मारहाण 
२०- मला राजीनामा देण्याची वेळ येणार नाही: महापौर सुधाकर सोनावणे 
२१- पायानं मळलं जातं पाणीपुरीच्या पुरीचं पीठ, धक्कादायक दृश्य कॅमेऱ्यात कैद 
२२- ठाणे; सीमेवरील जवानांसाठी विद्यार्थ्यांकडून तब्बल 300 किलो फराळाची भेट! 
२३- नाशिक; होर्डिंग बाजूला ठेवल्यानं मनसे पदाधिकाऱ्यांची व्यापाऱ्याला मारहाण 
२४- औरंगाबादमध्ये चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू 
२५- वसईत अनोळखी महिलेचा मृतदेह 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२६- 'ए दिल है मुश्कील'विरोधात संभाजी ब्रिगेडची निदर्शने   
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
========================================

औरंगाबादमध्ये अग्नितांडव, फटाक्यांच्या दुकानात भडका

औरंगाबादमध्ये अग्नितांडव, फटाक्यांच्या दुकानात भडका
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये फटाक्यांच्या दुकानांना भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या सहा ते सात गाड्या, पाण्याच्या गाड्या आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
मैदानातील सर्वच्या सर्व 150 दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचं म्हटलं जात आहे. तर 25 ते 30 चारचाकी आणि अनेक दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
जिल्हा परिषद मैदानात फटाक्यांचा बाजार भरतो. मात्र आज तिथे एका स्टॉलला आग लागली. मैदानात साधारण 150 दुकानं आहेत. दुकानं एकमेकांना लागूनच असल्याने आग पसरली.
आगीनंतर फटाक्यांच्या मोठ्या आवाजाने परिसर दणाणला आहे. या मैदानाच्या शेजारीच रहिवासी इमारती असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. रहिवासी परिसर सोडून सुरक्षित स्थळी धाव घेत आहेत.

========================================

पाकिस्तानच्या गोळीबारात सांगलीचा जवान शहीद

पाकिस्तानच्या गोळीबारात सांगलीचा जवान शहीद
श्रीनगर : भारत-पाकिस्तान सीमेवर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जवानाने बलिदान दिलं आहे. जम्मूच्या कुपवाड्यातील माछिल सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात सांगलीचे नितीन सुभाष कोळी शहीद झाले आहेत.
नितीन सुभाष कोळी यांच्यासोबतच शिख रेजिमेंटचे मनदीप सिंह देखील शहीद झाले आहेत.

========================================

भारत-चीन सीमेवर पंतप्रधान मोदींची जवानांसोबत दिवाळी

भारत-चीन सीमेवर पंतप्रधान मोदींची जवानांसोबत दिवाळी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली दिवाळी भारतीय जवानांसोबत साजरी करणार आहेत. नरेंद्र मोदी उत्तराखंडच्या माणामधील भारत-चीन सीमेवर जाऊन तिथे भारतीय जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देतील.
अजित डोभालही मोदींसोबत
सकाळी बद्रीनाथचं दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी आयटीबीपीच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करतील. सकाळी वायुसेनेच्या MI-17 हेलिकॉप्टरमधून पंतप्रधान मोदी गौचरला पोहोचतील. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल देखील असतील.
सर्जिकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा
सुरक्षेच्या कारणामुळे मोदींच्या या दौऱ्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली नाहीय. या दौऱ्यादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कारण सर्जिकल स्ट्राईक आणि सीमेवर पाकिस्तानकडून वारंवार होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन लक्षात घेता, मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ करण्यात आलीय.
दरम्यान, याआधीही पंतप्रधान मोदींनी सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. गेल्यावर्षी अमृतसरमधील खालसास्थित डोगराई वॉर मेमोरियलमध्ये सियाचिनमधील जवानांसोबत पंतप्रधान मोदींनी दिवाळी साजरी केली होती.

========================================

तुकाराम मुंढेंचा डॉ. डी. वाय पाटील संकुलाला दणका

तुकाराम मुंढेंचा डॉ. डी. वाय पाटील संकुलाला दणका
नवी मुंबईः नवी मुंबईतील नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संकुलात 9 मजली इमारतीचं बांधकाम सुरु आहे. हे बांधकाम अनधिकृत असल्याचं सांगत याची परवानगी रद्द करून बांधकाम जमिनदोस्त करण्याचे आदेश नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेनी दिले आहेत.
आयुक्त तुकाराम मुंढेवर अविश्वास ठराव आणल्यानंतरही त्यांची कारवाई तेवढ्याच जोमाने सुरु आहे. अविश्वास ठरावानंतर पहिलाच दणका मुंढे यांनी शिक्षण सम्राटांना दिला आहे.
डी. वाय. पाटील समूहाने पार्किंगच्या जागेवर व्यावसायिक इमारत उभारली आणि प्रत्यक्षातली पार्किंगची इमारत उद्यानावर उभारण येत आहे. 30 दिवसात ही स्वताःहून जमिनदोस्त न केल्यास महापालिका जमिनदोस्त करणार आहे. शिक्षण सम्राटांना दिलेल्या दणक्यानंतर सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर महापौर, नगरसेवक, लोकप्रतिनिधींचा अवमान करणे, महासभेत धोरणात्मक प्रस्ताव न आणता परस्पर निर्णय घेणे, स्थायी समितीच्या निर्णयावर गदा आणणे, आदी आरोप ठेवत नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणला होता.

========================================

गाडीतून उतरुन खासदार डॉ. प्रीतम मुंडेंचे रुग्णावर उपचार

गाडीतून उतरुन खासदार डॉ. प्रीतम मुंडेंचे रुग्णावर उपचार
बीडः बीडकरांना खासदार प्रीतम मुंढे यांच्यातील लोकप्रतिनिधीसोबतच त्यांच्यातील डॉक्टरी पेशाचाही अनुभव आला. बस आणि रिक्षा अपघातातील जखमींना दवाखान्यात पोहोचविण्यासाठी खासदार प्रीतम मुंडे यांनी तत्परता दाखविली.
pritam munde 1
प्रीतम मुंडे काल परळीला येत होत्या. त्यावेळी काही वेळ आधीच कन्हेरवाडी गावाजवळ लातूर-नागपूर बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली होती.
pritam munde 3
अपघात पाहिल्यानंतर प्रीतम मुंडे यांनी घटनास्थळी थांबून जखमींना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. त्याचसोबत त्यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांकडेही विचारपूस केली. या अपघातात उपचारादरम्यान केशव मुंडे यांचा मृत्यू झाला.

========================================
औरंगाबादेत ग्राहकांची दुकानदाराला बेदम मारहाण
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये दुकानदार आणि ग्राहकांमध्ये चांगलाच वाद झाला. दोन तरुणांनी धुडगूस घालत दुकानदाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
aur marhan cctv
औरंगाबादमधील सिडको एन- 4 भागामध्ये रिद्धी डेली निड्स नावाचं किराणा दुकान आहे. दुपारी अचानक एका ग्राहक आणि दुकानदारामध्ये वाद झाला. त्यानतंर दोन तरुणांनी येऊन दुकानदाराला बेदम मारहाण केली.

========================================

पायानं मळलं जातं पाणीपुरीच्या पुरीचं पीठ, धक्कादायक दृश्य कॅमेऱ्यात कैद 

पायानं मळलं जातं पाणीपुरीच्या पुरीचं पीठ, धक्कादायक दृश्य कॅमेऱ्यात कैद
कल्याण: गोल गरगरीत पुरी आणि चमचमीत पाणी सगळ्यांनाच आवडतं. मात्र, ही पुरी कशाप्रकारे बनवली जाते. हे पाहिलं तर पाणीपुरी खाताना तुम्ही नक्कीच दोनदा विचार कराल.

कल्याण पूर्वेतील कर्पेवाडी परिसरातल्या पुरी बनवण्याच्या कारखान्यात अतिशय घाणेरड्या पद्धतीनं पुरीचं पीठ मळलं जातं. चार ते पाच मुलं या पिठावर नाचत असल्याचं दिसून आलं आहे. याच पिठाच्या पुऱ्या बनवल्या जातात. हे पीठ आरोग्यासाठी घातक असून अशाप्रकारे पुऱ्या बनवणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येते आहे.

त्यामुळे खिशाला परवडणारी ही पाणीपुरी खाणाऱ्या खवय्यांना आता सावधानता बाळगावी लागणार आहे .

========================================

Thursday, 27 October 2016

नमस्कार लाईव्ह २७-१०-२०१६सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय]
१- सीरियात शाळेवर हवाई हल्ला, 22 मुलांचा मृत्यू
२- पाक सैन्याच्या गोळीबारात 6 नागरिक जखमी
३- इस्लामाबाद; गोल चपाती जमेना म्हणून बापानेच केली मुलीची हत्या
४- भारताने दलाई लामांच्या दौ-याला परवानगी दिल्याने चीन चिडण्याची शक्यता
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी अधिका-याला दिल्लीतून अटक
६- नॅनो कार तोट्याची, सायरस मिस्त्रींचा रतन टाटांवर हल्लाबोल
७- टाटा समूहातील कॉर्पोरेट गव्हर्नन्सची सेबीकडून चौकशी ?
८- कच्छमध्ये जवानांना घेऊन जाणा-या बसला अपघात, १७ जवान जखमी.
९- रामेश्वरम येथून तीन भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने केली अटक
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- 'डॉन' तुकाराम मुंंढेंसाठी ईरेला पेटू नका, शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
११- आयुक्त तुकाराम मुंढेंची तात्काळ बदली होणार नाही: सूत्र
१२- सायरस मिस्त्रींचा पलटवार, गोपनीय ई-मेल लिक
१३- पेंग्विनला काँग्रेसची श्रद्धांजली, मनसेची लिंबू-मिरची फंडाची मागणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- सातारा जि.प.चा यांत्रिकी विभाग जळून खाक, कर्मचाऱ्याचा मृत्यू
१५- दिल्ली-नोएडा फ्लायओव्हरवर टोलवसुली बंद
१६- कल्याण; रखडलेल्या मालमत्ताकराची वसुली तृतीयपंथीयांकडून
१७- अवयवदानाच्या संकल्पात कंधार तालुक्यातील युवकामुळे पाच जणाला जीवदान
१८- कल्याण: ३ मुलांना विष पाजून महिलेची आत्महत्या
१९- रायगड किल्ल्यावरील रोप वे सेवा बंद
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- तेजस ठाकरेंनी शोधलेल्या खेकड्यांच्या प्रजातीवर अभ्यासाची परवानगी
२१- मिथुन चक्रवर्तीच्या पोशाखात चोरी करणारा अखेर गजाआड
२२- परदेशी संघांना पाकमध्ये बोलावू नका- अख्तर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स*
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा.
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html

नमस्कार लाईव्ह २७-१०-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- सीरियात शाळेवर हवाई हल्ला, 22 मुलांचा मृत्यू 
२- पाक सैन्याच्या गोळीबारात 6 नागरिक जखमी 
३- इस्लामाबाद; गोल चपाती जमेना म्हणून बापानेच केली मुलीची हत्या 
४- भारताने दलाई लामांच्या दौ-याला परवानगी दिल्याने चीन चिडण्याची शक्यता 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी अधिका-याला दिल्लीतून अटक  
६- नॅनो कार तोट्याची, सायरस मिस्त्रींचा रतन टाटांवर हल्लाबोल 
७- टाटा समूहातील कॉर्पोरेट गव्हर्नन्सची सेबीकडून चौकशी ? 
८- कच्छमध्ये जवानांना घेऊन जाणा-या बसला अपघात, १७ जवान जखमी. 
९- रामेश्वरम येथून तीन भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने केली अटक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- 'डॉन' तुकाराम मुंंढेंसाठी ईरेला पेटू नका, शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना सल्ला 
११- आयुक्त तुकाराम मुंढेंची तात्काळ बदली होणार नाही: सूत्र 
१२- सायरस मिस्त्रींचा पलटवार, गोपनीय ई-मेल लिक 
१३- पेंग्विनला काँग्रेसची श्रद्धांजली, मनसेची लिंबू-मिरची फंडाची मागणी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- सातारा जि.प.चा यांत्रिकी विभाग जळून खाक, कर्मचाऱ्याचा मृत्यू 
१५- दिल्ली-नोएडा फ्लायओव्हरवर टोलवसुली बंद 
१६- कल्याण; रखडलेल्या मालमत्ताकराची वसुली तृतीयपंथीयांकडून 
१७- अवयवदानाच्या संकल्पात कंधार तालुक्यातील युवकामुळे पाच जणाला जीवदान 
१८- कल्याण: ३ मुलांना विष पाजून महिलेची आत्महत्या 
१९- रायगड किल्ल्यावरील रोप वे सेवा बंद 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- तेजस ठाकरेंनी शोधलेल्या खेकड्यांच्या प्रजातीवर अभ्यासाची परवानगी 
२१- मिथुन चक्रवर्तीच्या पोशाखात चोरी करणारा अखेर गजाआड 
२२- परदेशी संघांना पाकमध्ये बोलावू नका- अख्तर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
=======================================

'डॉन' तुकाराम मुंंढेंसाठी ईरेला पेटू नका, शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

'डॉन' तुकाराम मुंंढेंसाठी ईरेला पेटू नका, शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
मुंबई : नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अविश्वास ठरावावरुन शिवसेनेने ‘सामना’तून थेट मुख्यमंत्र्यांवर वार केला आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुमता आदर करावा, असं म्हणत, तुकाराम मुंढेंवरील अविश्वास ठराव तातडीने मंजूर करण्याचा अप्रत्यक्ष सल्ला शिवसेनेने दिला आहे.
तुकाराम मुंढेंविरोधात 104 तर बाजूने 6 मतं पडली आहेत. त्यामुळे लोकशाहीत बहुमताला किंमत असते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उगाच ईरेला पेटू नये. सरकारला बहुमताचा आदर करावाच लागेल, असं ‘सामना’त म्हटलं आहे.

=======================================

आयुक्त तुकाराम मुंढेंची तात्काळ बदली होणार नाही: सूत्र

आयुक्त तुकाराम मुंढेंची तात्काळ बदली होणार नाही: सूत्र
मुंबई: नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची तात्काळ बदली होणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. काल नवी मुंबई महापालिकेत अविश्वास ठराव पास झाल्यानंतर आज मुंढेंनी थेट मंत्रालय गाठलं. नवी मुंबईत केलेल्या कारवाया आणि कामांबद्दल नगरविकास खात्याकडे अहवाल दिला आणि या अहवालाची एक प्रत मुख्यमंत्री कार्यालयालाही दिली.

दुसरीकडे मुंढेंना हटवण्यासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मुंढेंना हटवण्याची मागणी करणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.


=======================================

सीरियात शाळेवर हवाई हल्ला, 22 मुलांचा मृत्यू

सीरियात शाळेवर हवाई हल्ला, 22 मुलांचा मृत्यू
दमिश्क : सीरियामधील इदलिब प्रातांत झालेल्या हवाई हल्ल्यात 22 विद्यार्थी आणि 6 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. कट्टरपंथीयांच्या ताब्यातील हास गावात हा हल्ला झाला.
शाळेच्या आवारातच हवाई हल्ला झाल्याने मृतांमध्ये शाळकरी मुलं आणि शिक्षकांचा समावेश आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या हल्ल्यामागे रशियाच्या लढाऊ विमानांचा हात असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सीरियाच्या सरकारी टीव्ही चॅनलवर या हल्ल्याची माहिती देताना म्हटलं आहे की, कट्टरपंथीयांच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला असून, त्यात कट्टरपंथीय ठार झाले आहेत. मात्र शाळकरी मुलांच्या मृत्यूबाबत उल्लेख केलेला नाही.
दरम्यान, इदलिब परिसर कट्टरपंथीयांच्या ताब्यात आहे. याआधीही या परिसरात अनेकवेळा हवाई हल्ले झाले आहेत.

=======================================

सातारा जि.प.चा यांत्रिकी विभाग जळून खाक, कर्मचाऱ्याचा मृत्यू

सातारा जि.प.चा यांत्रिकी विभाग जळून खाक, कर्मचाऱ्याचा मृत्यू
सातारा: सातारा जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाला भीषण आग लागली. या  आगीत संपूर्ण यांत्रिकी विभाग जळून खाक झाला आहे. धक्कादायक म्हणजे आग विझवताना एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
निवृत्ती गांगुर्डे असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे. काल रात्री ही दुर्घटना घडली.

=======================================

दिल्ली-नोएडा फ्लायओव्हरवर टोलवसुली बंद

दिल्ली-नोएडा फ्लायओव्हरवर टोलवसुली बंद, महाराष्ट्रात कधी?
नवी दिल्ली : दिल्ली आणि नोएडा या दोन शहरांना जोडणारा डीएनडी फ्लायओव्हर टोलमुक्त करण्यात आला आहे. अलाहाबाद हायकोर्टाने या उड्डाणपुलावर टोलवसुली करण्यास बंदी घातली आहे.
कोर्टाच्या या निर्णयामुळे दिल्ली-नोएडा भागातील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. खर्चाची पूर्ण रक्कम वसूल झाल्यानंतरही टोलवसुली सुरु ठेवणं चुकीचं असल्याचा निर्वाळा कोर्टाने दिला आहे. 407 कोटींच्या खर्चाच्या बदल्यात 2200 कोटी रुपयांची टोलवसुली झाल्यानंतरही ती सुरु ठेवणं चुकीचं असल्याचं कोर्टाने सांगितलं आहे. अलाहाबाद कोर्टाचा हा निर्णय तात्काळ लागू करण्यात येत आहे.
नोएडा अथॉरिटी आणि टोल ब्रिज कंपनीमध्ये झालेल्या मनमानी कराराचा फटका सामान्य वाहनचालकांना बसता कामा नये, असं कोर्टाने ठणकावून सांगितलं. त्यामुळे यापुढे दिल्ली-नोएडा फ्लायओव्हरवर कोणतीही टोलवसुली केली जाणार नाही.
नोएडा-दिल्लीला जोडणाऱ्या सव्वाशे किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाची निर्मिती 1997 साली सुरु झाली. निर्मितीसाठी जवळपास 407 कोटी रुपये खर्च आला होता. फेब्रुवारी 2001 मध्ये या रस्त्यावरुन वाहतूक सुरु झाली. नोएडा टोल ब्रिज कंपनी टोलवसुली करणार होती. आतापर्यंत अंदाजे 2200 कोटी रुपये टोल वसूल झाल्याचा अंदाज लावला जात आहे.

=======================================

सायरस मिस्त्रींचा पलटवार, गोपनीय ई-मेल लिक

सायरस मिस्त्रींचा पलटवार, गोपनीय ई-मेल लिक
मुंबई: टाटा ग्रुपच्या चेअरमनपदावरुन हटवल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी पलटवार केला आहे. मिस्त्री यांनी टाटाच्या संचालक मंडळाला एक गोपनीय ई मेल करुन, आपली बाजू मांडल्याचं सांगण्यात येतंय.
या पत्रात सायरस यांनी टाटा ग्रुपवर अनेक आरोप केले आहेत. तसंच आपल्याला कधीच कामाचं स्वातंत्र्य मिळालं नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
मिस्त्रींनी गोपनीय मेलमध्ये काय म्हटलंय?
“अचानक चेअरमनपदावरुन हटवल्यामुळे मला धक्का बसला आहे. यामुळे माझी प्रतिमा मलिन झाली आहे. हा निर्णय अवैध आहे. मला माझी बाजू मांडण्याची संधीच मिळाली नाही. चेअरमनपदी राहूनही मला काम करण्याचं स्वातंत्र्य मिळालं नाही.  त्यामुळे चेअरमनपद कमकुवत झालं होतं. ज्याबाबत मला माहिती नव्हती, त्या कंत्राटांना मंजुरी देण्याचा अट्टाहास माझ्याकडे करण्यात आला. “, असं मिस्त्रींनी म्हटलं आहे.
 मला हटवल्याने टाटा ट्रस्टचं कौतुक होत नाही, तर टाटा आणि माझी स्वत:ची प्रतिमा मलिन झाली आहे, असंही मिस्त्रींनी म्हटलं आहे. 2012 मध्ये मला कार्यकारी संचालकपदावरुन चेअरमन बनवलं, तेव्हा किती गंभीर समस्या वारसा हक्काने मिळणार आहेत याचा अंदाज नव्हता, असं मिस्त्रींनी नमूद केलं आहे.
युरोपात टाटा स्टीलचा प्लांट विकण्याच्या सायरस यांच्या निर्णयाला टाटा परिवाराचा विरोध होता. टाटा परिवाराला कंपनीच्या जागतिक विस्ताराची अपेक्षा होती.

=======================================

अवयवदानाच्या संकल्पात कंधार तालुक्यातील युवकामुळे पाच जणाला जीवदान

कंधार तालुक्यातील पानशेवडी येथील संतोष उध्दव मोरे (25) हा मोटारसायकलने नायगाव येथे मावस बहिणीला भेटून परतत असताना मारतळा येथे टिपरला धडकल्याने मेंदूस गंभीर दुखापत झाली आणि युवक कोमात गेला. नांदेड येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. चिंताजनक परिस्थितीमुळे त्यांची पत्नी भाग्यश्री हिने अवयवदानाच्या कागदपत्रावर स्वाक्षऱ्या केल्याने जिल्ह्यातून होणाऱ्या अवयवदानाच्या संकल्पात कंधार तालुक्यातील या युवकामुळे पाच जणाला जीवदान मिळणार आहे.

शहरापासून केवळ दहा किलोमीटर अंतरावर असलेले पानशेवडी गावाची लोकसंख्या तीन हजाराच्या आसपास आहे. तेथील जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेले शारजाबाई व उध्दव संताजी मोरे यांना दोन मुले. मोठा बापूजी हा पुणे येथील खाजगी कंपनीत कार्यरत असून, दुसरा संतोष हा आपले दहावीपर्यंतचे शिक्षण गावातील संत नामदेव महाराज माध्यमिक विद्यालयात तर पुढील शिक्षण शेकापूर व त्यानंतर आयटीआय ग्रामीण औद्योगिक प्रशिक्षण संस्था नेहरुनगर येथे घेतले. त्यानंतर त्याने माझगाव डॉर्कयार्ड मुंबई येथे एका खाजगी कंपनीत टेक्नीशियन म्हणून नोकरी सुरु केली. दरम्यान 2012 मध्ये गावात झालेल्या लग्न मेळाव्यात केकतशिदगी येथील दळवे कुटुंबियातील भाग्यश्री हिच्याशी हिंदू संस्कृतीप्रमाणे लग्न झाले. पनवेल येथे आनंदाने हे दांपत्य राहात असताना चार वर्षानंतर त्यांना संतती प्राप्तीचा योग आला. 30 ऑक्टोबरला नांदेडच्याप्रसूतीसाठी भाग्यश्री माहेरी तर संतोष सुध्दा प्रसूतीसाठी सुटी घेवून गावाकडे आला होता. गावात आल्यानंतर नातेवाईकांना भेटी घेणे सुरु असताना 24 रोजी तो व मामाचा मुलगा ज्ञानेश्र्वर आनकाडे हे नायगाव येथे मावस बहिणीला भेटून गोपाळचावडी येथे आत्याला भेटण्यासाठी जात असताना मारतळा येथे उभ्या टिपरला धडक बसल्याने संतोष जागीच बेशुद्ध झाला तर ज्ञानेश्र्वरला किरकोळ मार लागला. ही बातमी समजताच मारतळा येथील नातेवाईकांनी संतोषला नांदेडच्या लोटस या खाजगी रुग्णालयात दाखल केले. गंभीर दुखापतीमुळे संतोष व्हेटींलेटरवर होता. उपचारार्थ कै. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात त्याला उपचारार्थ दाखल करण्यात आले. ही बाब पत्नी भाग्यश्रीला सांगण्यात आली. ती गरोदर असल्याने तिने आपल्या पतीची अवस्था पाहून रक्तदाब वाढल्याने तिला सुध्दा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान नातेवाईकांच्या व सासु-सासऱ्याच्या सांगण्यावरुन तिने आपल्या पतीचा देहदान करण्याचा संकल्प केला. त्यानुसार कागदपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या. 
=======================================

Wednesday, 26 October 2016

नूतनवर्षानिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा




नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संस्था पानभोसी व संजय शिक्षण संस्था कंधार यांच्या वतीने दीपावली व नूतनवर्षानिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा 
शुभेच्छुक 
प्राचार्य राजेंद्र ईश्वरराव भोसीकर 
सचिव नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संस्था पानभोसी
तथा उपसरपंच पानभोसी ता. कंधार 
प्रकाशक% सौ. सुवर्णा मनोहर नाईकवाडे सरपंच पानभोसी ता. कंधार 

दिपावली व नुतनवर्षानिमीत्त ग्रामस्वच्छ्ता,डिजिटल शाळेचा संकल्प - सौ.वर्षाताई भोसीकर



दिपावली व नुतनवर्षानिमीत्त ग्रामस्वच्छ्ता,डिजिटल शाळेचा संकल्प - सौ.वर्षाताई भोसीकर


कंधार पञकार विठ्ठल कतरे

 दरवर्षी दिवाळी व नुतन वर्षानिमीत्त जि.प.सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर ह्या नवीन संकल्प करत असतात.यावर्षीच्या दीपावली निमित्त ग्रामस्वच्छ्तेसह डिजिटल शाळा करण्याचा त्यांनी संकल्प केला आहे.कंधार येथे पत्रकारांसमवेत वार्तालाप करतांना त्या बोलत होत्या.
     त्या म्हणाल्या नविन वर्षा निमीत्त अनेक व्यक्ती नव नविन संकल्प करत असतात.दर वर्षी मी,ही दीपावली नूतन वर्षा निमित्त एखादा संकल्प करुण तो पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असतो.यावर्षी ही मई संकल्प केला असुन महिलांच्या प्रतिष्ठासाठी स्वच्छालय महत्वाचे असुन प्रत्येकाच्या घरात स्वच्छालय उभारण्यासाठी सामाजिक दायित्व ठेऊन काम करण्याचा संकल्प केला आहे.त्याच बरोबर ग्रामीण भागामध्ये डासमुक्ती साठी गटारमुक्त अभियान,ग्रामीण भागातील नागरीकानां आरोग्याच्या सुवीधा शिवाय शाळेच्या वीद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण मिळण्यासाठी डिजिटल शाळा,कुपोषण मुक्तिसाठी अंगत-पंगत उपक्रम राबवण्याचा संकल्प ही केला आहे.असे ही त्यावेळी त्या म्हणाल्या.

नमस्कार लाईव्ह २६-१०-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- राजौरीत पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर 
२- डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचा घेतला आधार; मोदींची स्तुती, आता घोषणांचीही कॉपी 
३- भारताकडून चोख प्रत्युत्तर; पाकचे 3 रेंजर्स ठार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- औरंगाबादमध्ये अनुदान लाटणाऱ्या बोगस मदरशांची चौकशी होणार 
५- राष्ट्रपतींना 200 टक्के वेतनवाढ मिळणार 
६- जेएनयूत आढळला मणिपुरी युवकाचा मृतदेह 
७- हिंदुत्वाची व्याख्या नव्याने नाही- न्यायालय 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
८- सहा लॉटरी कंपन्यांकडून महाराष्ट्र सरकारला 933 कोटींचा चुना 
९- शिवस्मारकासाठी 3600 कोटी रुपये, लवकरच भूमीपूजन 
१०- रिझल्ट देणं माझं काम : तुकाराम मुंढे 
११- अंगणवाडी सेविकांना एक हजार रुपये भाऊबीज भेट 
१२- पेग्विन मृत्यूप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसची होर्डिंगबाजी 
१३- प्रतिटन 3200 मिळाले तरच ऊसतोड- राजू शेट्टी 
१४- राज्यातील धरणांमध्ये 83 टक्के पाणी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- बाटलीत पेट्रोल न दिल्याने पिंपरीत पेट्रोल पंपाची तोडफोड 
१६- अहमदनगरमध्ये निवडणुकीच्या बंदोबस्तावरील पोलिसाला मारहाण
१७- पुणे; ब्राह्मणांचा अॅट्रॉसिटीमध्ये समावेश करा, ब्राह्मण महासंघाची मागणी 
१८- उत्तराखंडमध्ये व्हाईटनरवर बंदीचे आदेश 
१९- पाटणा रेल्वे स्थानकावर पॉर्न साईट ब्लॉक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीत भारताकडून चीनचा धुव्वा 
२१- 'फँड्री', 'सैराट'वर आमीर फिदा, आता थेट नागराजसोबत काम करणार? 
२२- विद्या बालनच्या 'कहानी 2' चा जबरदस्त ट्रेलर रिलीज 
२३- हृतिकच्या अॅक्शन थ्रिलर 'काबिल'चा ट्रेलर रिलीज 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
........................................................................

रिझल्ट देणं माझं काम : तुकाराम मुंढे

रिझल्ट देणं माझं काम : तुकाराम मुंढे
नवी मुंबई : नवी मुंबई पालिका आयुक्त म्हणून पदावर आजही कायम आहे. जोपर्यंत सरकार हटवत नाही, तोपर्यंत काम करत राहणार. कायद्यानुसार काम करणं, लोकांच्या समस्यांवर काम करणं, ही माझी जबाबदारी आहे, रिझल्ट देणं माझं काम आहे, असा निर्धार तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला.  वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांननी एबीपी माझाला खास मुलाखत दिली.
मी माणूस आहे, सर्वज्ञानी नाही.  जलद निर्णयांमुळेच कदाचित माझ्याबाबतीत जास्त वाद होत असतील, असं आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले.
वेळ देत नसल्याचा आरोप चुकीचा
मी वेळ देत नाही हा नगरसेवकांचा आरोप चुकीचा आहे. दर बुधवारी एक तास नगरसेवकांसाठी असतो. मी कोणालाही बसवून ठेवत नाही, असं तुकाराम मुंढे म्हणाले. माझ्याविषयी अनेक गैरसमज पसरवले जात आहेत, असंही मुंढे म्हणाले.
नियमाला धरुनच निर्णय
नवी मुंबईच्या नागरिकांसाठी आवश्यक ते सर्व निर्णय तातडीने घेतले. हे सर्व निर्णय नियमाला धरुनच घेतले. रस्त्यावरील फेरीवाल्यांवर आणि मनपाच्या जागेवर बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई केली, प्रकल्पग्रस्तांवर कुठलीही कारवाई केली  नाही, असंही तुकाराम मुंढेंनी सांगितलं.

........................................................................

औरंगाबादमध्ये अनुदान लाटणाऱ्या बोगस मदरशांची चौकशी होणार

औरंगाबादमध्ये अनुदान लाटणाऱ्या बोगस मदरशांची चौकशी होणार
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये सरकारी अनुदान लाटणाऱ्या बोगस मदरशांची चौकशी होणार आहे. उपजिल्हाधिकारी गणेश चव्हाण यासंदर्भात चौकशी करणार आहे.
‘एबीपी माझा’ने एका स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून मदरशांमधील हा घोटाळा समोर आणला होता. त्यानंतर आता प्रशासनाला जाग आल्याचं पाहायला मिळत आहे.
मुस्लिम मुलांच्या शिक्षणाचा आधार मिळावा, यासाठी मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी सरकारने डॉ. झाकीर हुसेन योजनेची घोषणा केली होती. मात्र औरंगाबादमध्ये या योजनेअंतर्गत अनुदान लाटलं, मात्र मदरशे सुरु नसल्याचं चित्र आहे.
‘माझा’ने यासोबतच याठिकाणी सुरु असलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यावरही प्रकाश टाकला होता.
मदरशांना वर्षाकाठी 4 लाख अनुदान मिळतं. एकट्या औरंगाबादेत 500 मदरसे आहेत. त्यातल्या 125 मदरशांना अनुदान मिळालं आहे. 65 मदरशांच्या हातात पैसे पडले आहे. तर 61 मदरशांचे पैसे जिल्हा प्रशासनाच्या खात्यात आहेत.

........................................................................

सहा लॉटरी कंपन्यांकडून महाराष्ट्र सरकारला 933 कोटींचा चुना

सहा लॉटरी कंपन्यांकडून महाराष्ट्र सरकारला 933 कोटींचा चुना
मुंबई: महाराष्ट्र सरकारला सहा लॉटरी कंपन्यांनी 2007 ते 2009 दरम्यान 933 कोटींचा चुना लावल्याचं समोर आलं आहे. यासंबंधीचं वृत्त मिड-डेनं दिलं असून याला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही दुजोरा दिला आहे.
या कंपन्यांनी अवैधरितीने अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि मिझोरम आदी राज्यातील ऑनलाईन लॉटरीची राज्यात विक्री केली, पण याचा कर राज्य सरकारकडे जमा केला नाही. यामुळे राज्य सरकारला मोठं नुकसान सहन करावं लागलं.
मुनगंटीवार यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून या सहा कंपन्यांपैकी स्वागत एजन्सीने 76.22 कोटी, समर्पण ट्रेडिंगने 134. 43 कोटी, कॅम्पलॉट गेमिंग सोल्यूशनने 38 कोटी, ज्यूपिटर गेमिंग 323.14 कोटी, एसएल मार्केटिंगने 133.10 कोटी आणि श्वेता एन्टरप्रायझेसने 228.30 कोटींचा महसूल बुडवला आहे.
दरम्यान, गुन्हे अन्वेषण विभागाने सेवरी पोलीस स्थानकात या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असल्याचे गुन्हे शाखेचे उपायुक्तांनी सांगितलं. तसेच या प्रकरणी लॉटरी ड्रॉ करणाऱ्या सहा कंपन्याना आरोपी बनवण्यात आलं असून यातील कर भरण्यासंदर्भातील तपास सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.

राष्ट्रपतींना 200 टक्के वेतनवाढ मिळणार

राष्ट्रपतींना 200 टक्के वेतनवाढ मिळणार?
नवी दिल्ली: देशाचे प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपतींना घटनेने अनेक अधिकार दिले आहेत. याचा वापर गरजेनुसार ते करतात. राष्ट्रपती या घटनात्मक पदावरील व्यक्तीला महिन्याला दीड लाखांचे वेतन मिळते. पण आता त्यामध्ये 200 टक्क्यांनी वाढ होणार आहे. कारण सध्याच्या तुलनेत राष्ट्रपतींच्या तुलनेत विद्यमान मंत्रिमंडळातील एखाद्या सचिवाचा वेतनपेक्षा जास्त असल्याने यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
देशात सर्वत्र सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या वेतनवाढीसंदर्भातील चर्चा सुरु झाली होती. याला मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी मिळाल्यानंतर, यासंबंधीचे विधेयक संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येईल. संसदेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर जानेवारी 2016 पासूनची वेतनवाढ राष्ट्रपतींना देण्यात येईल.
या निर्णयानंतर राष्ट्रपतींसोबत उपराष्ट्रपती आणि राज्यपालांच्याही वेतनात घसघशीत वाढ होणार आहे. 2008 मध्ये राष्ट्रपतींच्या वेतनात दुपटीने वाढ करण्यात आली होती. 2008 मध्ये राष्ट्रपतींचे 50 हजारावरुन दीड लाख  वेतन करण्यात आले होते. पण आता यात 200 टक्क्यांनी वाढ होणार आहे. या वाढीनंतर राष्ट्रपतींना एकूण 5 लाखांच्या आसपास वेतन मिळणार आहे. तर उपराष्ट्रपतींचा एक लाख 10 हजारावरुन 3 लाख 50 हजार  वेतन मिळणार आहे.
विशेष म्हणजे, या निर्णयानंतर राष्ट्रपतींच्या निवृत्तीनंतर त्यांना मिळणाऱ्या पेन्शनमध्येही वाढ होणार आहे. त्यांना निवृत्तीनंतर एक लाख 50 हजार पेन्शन मिळेल, तर त्यांचे पती किंवा पत्नीलाही 30 हजार रुपये मिळतील.

........................................................................

'फँड्री', 'सैराट'वर आमीर फिदा, आता थेट नागराजसोबत काम करणार?

'फँड्री', 'सैराट'वर आमीर फिदा, आता थेट नागराजसोबत काम करणार?
मुंबई : ‘फँड्री’ आणि ‘सैराट’वर फिदा झालेला बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खान आता थेट दिग्दर्शक नागराज मंजुळेसोबत काम करणार असल्याची चर्चा आहे. नव्या प्रोजेक्टसाठी दोघे एकत्र येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
याआधी आमीर खानने नागराज मंजुळेच्या ‘फँड्री’चं कौतुक केलं होतं. तर काही महिन्यापूर्वीच आलेला ‘सैराट’ पाहून आमीर भारावला होता. शिवाय चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहण्याचंही आवाहन केलं होतं.
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘सैराट’ने मराठीलाच नाही तर बॉलिवूडलाही भूरळ घातली. नागराजच्या दिग्दर्शन कौशल्यावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यामुळे परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला आमीरला आता नागराजसोबत काम करण्याचे वेध लागल्याची चर्चा आहे.
दरम्यान, ‘सैराट’चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचं संगीत. अजय-अतुल या संगीतकार जोडीने या सिनेमाला संगीत दिलं. ‘सैराट’च्या गाण्यांनी सगळ्यांना अक्षरश: याड लावलं आहे. अजय-अतुलने याआधी 2014 मध्ये आलेल्या ‘पीके’ सिनेमासाठी आमीरसोबत काम केलं आहे.

........................................................................

विद्या बालनच्या 'कहानी 2' चा जबरदस्त ट्रेलर रिलीज



........................................................................

हृतिकच्या अॅक्शन थ्रिलर 'काबिल'चा ट्रेलर रिलीज

हृतिकच्या अॅक्शन थ्रिलर 'काबिल'चा ट्रेलर रिलीज
नवी दिल्लीः बॉलिवूड स्टार हृतिक रोशनच्या सस्पेंस थ्रिलर ‘काबिल’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झाल्यानंतर आता सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
दोन दृष्टिहीन प्रेमीयुगुलींची प्रमकथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. दोघेही प्रेमातून एकमेकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र त्यांच्या कहाणीत अचानक खलनायकाची एंट्री होते. त्यानंतर सिनेमात खरा सस्पेंस असण्याची शक्यता आहे.

........................................................................

शिवस्मारकासाठी 3600 कोटी रुपये, लवकरच भूमीपूजन

शिवस्मारकासाठी 3600 कोटी रुपये, लवकरच भूमीपूजन
मुंबईः अरबी समुद्रात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी 3 हजार 600 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. आचारसंहितेतही निवडणूक आयोगाच्या परवानगीने निधी मंजूर केला जाईल, अशी माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली.
शिवस्मारकाचा आराखडा यापूर्वीच तयार करण्यात आला आहे. आता त्यासाठीच्या टेंडर प्रक्रिया सुरु केल्या जातील. मात्र आचारसंहितेमुळे सध्या ते शक्य नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून परवानगी घेण्यात येणार आहे, असं मेटेंनी सांगितलं.
पहिला टप्पा 2019 पर्यंत पूर्ण होणार
निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यास टेंडर प्रक्रिया पूर्ण करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमीपूजन करण्यात येईल, अशी माहिती विनायक मेटे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना दिली.

........................................................................

अंगणवाडी सेविकांना एक हजार रुपये भाऊबीज भेट

अंगणवाडी सेविकांना एक हजार रुपये भाऊबीज भेट
मुंबईः एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील अंगणवाडी सेविकांना एक हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात आली आहे. महिला बालविकास विभागाने या बाबतीत परिपत्रकाद्वारे माहिती दिली.
अंगणवाडी सेविकांना दरवर्षी दिवाळीच्या बोनसची मागणी करावी लागते. त्यासाठी आंदोलनाची देखील वेळ येते. या वर्षासाठी अंगणवाडी सेविकांना भाऊबीज भेट देण्याचा विषय सरकारच्या विचाराधीन होता. त्यामुळे बोनस जाहीर केला, असं परिपत्रकात म्हटलं आहे.
मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांसह, मदतनिस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. बोनसची रक्कम दिवाळीपूर्वी देण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

........................................................................