Monday, 7 November 2016

नमस्कार लाईव्ह ०७-११-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- US ELECTION: मतदान केलंत तर कत्तल करु, ISIS ची धमकी
२- अनिश्चित मते मिळविण्यासाठी क्लिंटन, ट्रम्प यांची शेवटची धडपड
३- चीनच्या नाकावर टिच्चून भारताने लडाखमध्ये टाकली पाइपलाइन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- जेएनयूमध्ये शस्त्रास्त्रांनी भरलेली काळी बॅग सापडली 
५- भारतातील स्मार्टफोनमध्ये प्रादेशिक भाषेतील कीबोर्ड बंधनकारक 
६- जुन्या अटींवर दाऊद भारतात येण्यास तयार : केसवानी 
७- अलर्ट ! फक्त 10 महिन्यांत 76 वाघांचा मृत्यू 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
८- पुण्यातील SRPF मैदानावर सरावादरम्यान पोलिसाचा मृत्यू 
९- दहावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल होणार! 
१०- मुंबईकरांची एसी लोकल पहिल्यांदाच स्वतःच्या यंत्रणेसह रुळावर 
११- 'बेळगावातील हैदोस, महाराष्ट्रालाही मनगट आहे', सामनातून भाजपवर टीकेचे बाण 
१२- राज्यभर थंडीची लाट, नाशिकनंतर मराठवाडाही गारठला 
१३- टाटा समूहाच्या मुख्यालयावर पत्रकारांचा आज मोर्चा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- चारित्र्याच्या संशयावरुन पुण्यात पत्नीची हत्या, पतीला अटक 
१५- शहीद राजेंद्र तुपारेंचं पार्थिव आज कोल्हापुरातील मूळगावी आणणार 
१६- पाटणा; रुळ ओलांडताना रेल्वेची धडक, सहा जणांचा मृत्यू 
१७- मुंबई; भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांचं निधन 
१८- बेळगाव; सराफा दुकानातून मंगळसूत्र लांबवणाऱ्या तिघी सीसीटीव्हीत कैद
१९- एकविरा देवीच्या पायथा मंदिरात चोरी, साडेसहा लाखांचा ऐवज चोरीला 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- वासुदेव गायतोंडे यांचे 50 कोटीचे चित्र चोरीला 
२१- दिवाळी सेलमध्ये LeEceoचा रेकॉर्ड, 350 कोटींची कमाई! 
२२- आठ खेळाडूंना शासकीय नोकरी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html

==========================================

पुण्यातील SRPF मैदानावर सरावादरम्यान पोलिसाचा मृत्यू

पुण्यातील SRPF मैदानावर सरावादरम्यान पोलिसाचा मृत्यू
पुणे : पुण्याच्या हडपसर इथल्या एसआरपीएफ मैदानावर आज एका पोलिस कॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. राम नागरे असं मृत पोलिसाचं नाव आहे.

पोलिस खात्याअंतर्गत होणाऱ्या उपनिरीक्षक पदासाठी सरावादरम्यान राम नागरे मैदानावरच कोसळले. त्यांना जवळच्या नोबेल रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगिलं.

कॉन्स्टेबल राम नागरे सध्या नियंत्रण कक्षात कार्यरत होते. पोलिस खात्यातंगर्त पोलिस उपनिरीक्षकपदाच्या लेखी परीक्षेत राम नागरे यांना 218 गुण मिळाले होते. तर येत्या 21 नोव्हेंबर रोजी  शारीरिक परीक्षा होणार आहे.

शारीरिक परीक्षेच्या सरावासाठी राम नागरे हडपसरच्या एसआरपीएफ मैदानावर दाखल झाले होते. मात्र हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

==========================================

चारित्र्याच्या संशयावरुन पुण्यात पत्नीची हत्या, पतीला अटक

चारित्र्याच्या संशयावरुन पुण्यात पत्नीची हत्या, पतीला अटक
शिरुर: पुण्यातील शिरुरमध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनं हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे.

शिरुर मधील रामलिंग येथे राहणाऱ्या सीताराम घावटे यांने पत्नी रुपालीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा साडीने गळा आवळून खून केला. हत्येनंतर त्यानं पत्नी रुपालीचा मृतदेह १० किमी दूर एका शेतात टाकून दिला. रुपालीचा मृतदेह शेतात आढळून आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरु केली.

दरम्यान, चौकशीअंती रुपालीचा पती आरोपी सीताराम घावटे याला अटक करुन त्याच्यावर कलम- ३०२,२०१ अंर्तगत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

==========================================

वासुदेव गायतोंडे यांचे 50 कोटीचे चित्र चोरीला

वासुदेव गायतोंडे यांचे 50 कोटीचे चित्र चोरीला
मुंबई: प्रख्यात चित्रकार वासुदेव गायतोंडे यांचं सुमारे 50 कोटी किमतीचं जगविख्यात चित्र चोरी झाल्याची तक्रार मुंबईतल्या वरळी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
निर्लॉन हाऊस या कंपनीच्या कार्यालयात लागलेलं हे चित्र अमेरिकेच्या एका गॅलरीमध्ये पाहिल्याची तक्रार कंपनीचे संचालक जनक मथुरादास यांनी दिली आहे.
1960 साली तयार केलेलं हे चित्र हे निर्लॉन हाऊसची शान मानलं जायचं. पण आता निर्लॉन हाऊसमध्ये असलेलं चित्र हे बनावट असल्याची शंका त्यांना आली आहे.
दरम्यान, वरळी पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
वासूदेव गायतोंडे यांची यापूर्वीची चित्रंही कोट्यवधी रुपयांना विकले गेले आहेत.

==========================================

जेएनयूमध्ये शस्त्रास्त्रांनी भरलेली काळी बॅग सापडली

जेएनयूमध्ये शस्त्रास्त्रांनी भरलेली काळी बॅग सापडली
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ अर्थात जेएनयू पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. जेएनयूमध्ये शस्त्रास्त्रांनी भरलेली काळी बॅग सापडली आहे.

जेएनयू कॅम्पसमध्ये रात्री दोनच्या सुमारास नॉर्थ गेटपासून 50 मीटर अंतरावर एक काळी बॅग असल्याचं सुरक्षरक्षकाच्या निदर्शनास आलं. या बॅगमध्ये 7.56 ची देशी पिस्तुल, 7 काडतुसं आणि 1 स्क्रू ड्रायव्हर सापडला.

यानंतर जेएनयूच्या कंट्रोल रुमला माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात आर्म्स अक्ट अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.

==========================================

रुळ ओलांडताना रेल्वेची धडक, सहा जणांचा मृत्यू

रुळ ओलांडताना रेल्वेची धडक, सहा जणांचा मृत्यू
पाटणा : बिहारच्या दरभंगामध्ये छठ पर्वाच्या समारोप उत्सवावर शोककळा पसरली. छठ पूजेहून परतताना महिला भाविकांना अपघात झाला. रामभद्रपूर स्टेशनजवळ रेल्वे रुळ ओलांडताना सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

या महिला मुलांसह छठ पूजा करुन परतत होत्या. मात्र रामभद्रपूर स्टेशनजवळ स्वतंत्रता सेनानी ट्रेनने धडक दिल्याने दोन मुलं आणि चार महिलांसह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर नागरिक संतप्त झाले आहे. मृतदेह रेल्वे रुळवर ठेवून नागरिक रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलन करत आहेत. याशिवाय दरभंगा-समस्तीपूर यादरम्यानची रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

==========================================

जुन्या अटींवर दाऊद भारतात येण्यास तयार : केसवानी

जुन्या अटींवर दाऊद भारतात येण्यास तयार : केसवानी
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम त्याच्या जुन्या अटींवर भारतात येऊ शकतो, असा दावा दाऊदचे वकिल श्याम केसवानी यांनी केला आहे. त्यासाठी दाऊदशी चर्चा करावी लागेल, असंही केसवानी यांनी सांगितलं.
दाऊदने पाच वर्षांपूर्वी ऑर्थर रोड जेलमध्ये न ठेवण्याच्या अटीवर भारतात येण्यासाठी सहमती दर्शवली होती. मात्र तत्कालीन सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली नाही, असा खुलासा केसवानी यांनी केला.
दाऊद भारतात येण्यासाठी तयार आहे. मात्र त्याला ऑर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात येऊ नये, अशी अट दाऊदच्या हस्तकाने लंडनमध्ये माजी मंत्री राम जेठमलानी यांच्यासमोर ठेवली होती. तत्कालीन सरकारने अबू सालेम आणि छोटा राजन यांच्या अटी स्विकारल्या मात्र, दाऊदच्या अटींकडे दुर्लक्ष केलं, असा खुलासाही केसवानी यांनी केला आहे.
अबू सालेमने फाशीच्या शिक्षेचा आरोप लावू नये, अशी अट ठेवली होती. तर छोटा राजनने तिहार जेलमध्ये न ठेवण्याची अट ठेवली होती. या दोन्हीही अटी सरकारने मान्य केल्या. मात्र दाऊदच्या अटीकडे गांभिर्याने पाहिलं जात नसल्याची खंत केसवानी यांनी व्यक्त केली.
दाऊदने ठेवलेली अट किरकोळ आहे. मात्र सरकार तरीही दाऊदला भारतात आणायला तयार नाही. यामागे दुसरंच काही कारण आहे का, अशी शंकाही केसवानी यांनी उपस्थित केली.
दरम्यान दाऊदला भारतात आणण्यासाठी त्याच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे. दाऊदला सुरक्षा पुरवली तर तो भारतात येईल. कारण यापूर्वीही सुरक्षेच्या अटीवरच दाऊदने भारतात येण्यास सहमती दाखवली होती, असा दावा केसवानी यांनी केला.

==========================================

Sunday, 6 November 2016

नमस्कार लाईव्ह ०६-११-२०१६सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, दोन जवान शहीद 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
२- रोनेन सेन यांचे मिस्त्रींवर टीकास्त्र
३- सेन्सेक्स आणखी १५६ अंकांनी घसरला
४- जीएसटी कौन्सिलमध्ये मतभेद कायम 
५- काश्मीरमध्ये शाळांची जाळपोळ करणारे काश्मीरचेच नव्हे तर मानवतेचेही शत्रू. - ओवेसी 
६- दिल्ली- कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी अरविंद केजरीवाल केंद्र सरकारशी करणार चर्चा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
७- वेगळ्या विदर्भाची मागणी आता मोठ्या पडद्यावर, 'खुर्द बुद्रूक' रिलीज 
८- दिवंगत शरद जोशींचा अर्थविचार राजकारणाला कलाटणी देणारा : गडकरी 
९- जलसंधारणाचा चार गाव पॅटर्न सह्याद्री वाहिनीवर 
१०- दिल्ली- राजधानीतील प्रदूषणामुळे पुढचे तीन दिवस सर्व शाळा राहणार बंद 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
११- कोकणात राष्ट्रवादीला भगदाड, सुनील तटकरेंच्या पुतण्याचा सेनेत प्रवेश 
१२- मुंबईत शिस्तबद्ध पद्धतीने मराठा समाजाची बाईक रॅली 
१३- औरंगाबाद- फटाका मार्केट आगप्रकरणी फटाका असोसिएशनवर गुन्हा दाखल 
१४- अकोला : नवजात मुलीचं रामदास पेठ पोस्ट हद्दीत सापडले अर्भक 
१५- दिल्ली- इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2 कोटींची हेरॉईन जप्त 
१६- हरियाणा- धुरक्यामुळे रोहतकमध्ये रस्त्यावर अपघात, तीन जणांचा मृत्यू, दोघे जखमी 
१७- उस्मानाबाद; शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविक-सुरक्षारक्षकांमध्ये दर्शनावरुन मारहाण 
१९- युवीने आपल्या लग्नपत्रिकेला दिला क्रिकेट टच !
२०- धुरक्यामुळे दिल्लीत सुरू असलेला बंगाल आणि गुजरातमधील रणजी सामना रद्द.   
२१- मधुरा वायकरला सुवर्ण तर ऋतूजा सातपुतेला रौप्य 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
==================================

कोकणात राष्ट्रवादीला भगदाड, सुनील तटकरेंच्या पुतण्याचा सेनेत प्रवेश 

कोकणात राष्ट्रवादीला भगदाड, सुनील तटकरेंच्या पुतण्याचा सेनेत प्रवेश
मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा पुतण्या संदीप तटकरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. संदीप तटकरे हे सुनील तटकरेंचे बंधू अनिल तटकरेंचे सुपुत्र आहेत.
आज दादरच्या शिवसेनाभवनात संदीप तटकरेंनी सेनेत प्रवेश केला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री अनंत गिते, आमदार भरत गोगावले आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर उपस्थित होते. संदीप तटकरेंचा शिवसेना प्रवेश कोकणात राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनील तटकरेंच स्थान मोठं असल्यानं त्यांच्यासाठी हा फार मोठा धक्का आहे. दरम्यान संदीप तटकरेंच्या प्रवेशावेळी ‘घडाळ्याचा काटा अडकला, भगवा झेंडा फडकला’च्या घोषणा शिवसैनिकांकडून देण्यात आल्या.

==================================

वेगळ्या विदर्भाची मागणी आता मोठ्या पडद्यावर, 'खुर्द बुद्रूक' रिलीज

वेगळ्या विदर्भाची मागणी आता मोठ्या पडद्यावर, 'खुर्द बुद्रूक' रिलीज
नागपूर : वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाला अजून धार आण्यासाठी खास सिनेमाचं प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘खुर्द बुद्रूक’ या सिनेमाच्या माध्यमातून वेगळ्या राज्याच्या मागणीचे जनजागरण केलं जाणार आहे. जनमंच या विदर्भवादी संघटनेचा हा उपक्रम आहे.
आमगाव म्हणजे विदर्भाचे प्रतिक असलेले गाव आणि खामगाव म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचे प्रतिक असलेले गाव. या दोन गावांच्या कहाणीच्या माध्यमातून विदर्भावर झालेला अन्याय हा समोर आणण्याचा प्रयत्न या सिनेमातून करण्यात आला आहे. अगदी महाराष्ट्र बनला तेव्हापासून अनेक तथाकथित सत्याची कशी तोडमरोड करण्यात आली आहे, याचे दर्शनसुद्धा या सिनेमातून झाले आहे.
या सिनेमाची निर्मिती जरी जनमंचने केली असली, तरीही यातील सर्व वैदर्भीय मंडळींनी मात्र आपली सेवा आणि स्किल हे मोफत दिले आहे. पैसे लागले ते फक्त मुंबईहुन बोलावलेल्या टेक्निकल टीम साठी. आता हा सिनेमा विदर्भभर प्रदर्शित होणार आहे.


==================================

दिवंगत शरद जोशींचा अर्थविचार राजकारणाला कलाटणी देणारा : गडकरी

दिवंगत शरद जोशींचा अर्थविचार राजकारणाला कलाटणी देणारा : गडकरी
पुणे : शेतकरी कमागार नेते दिवंगत शरद जोशी यांना राजकारणात लौकिक अर्थाने यश मिळालं नाही. मात्र, त्यांनी मांडलेला अर्थविचार हा संपूर्ण राजकारणाला कलाटणी देणारा होता, असे मत केंद्रीय दळववळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते पुण्यात पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
शरद जोशी यांच्यावरील ‘शरद जोशी : शोध अस्वस्थ कल्लोळाचा’ या पुस्तकाचं पुण्यात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
या पुस्तकात लेखिका वसुंधरा काशीकर-भागवत यांनी शरद जोशी यांच्या झंझावती आणि वादळी जीवनाचा आढावा घेतला आहे. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला शरद जोशींसोबत काम केलेल्या माजी आमदार सरोज काशीकर, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, अर्थविषयांचे अभ्यासक राजीव साने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

नमस्कार लाईव्ह ०६-११-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेत संशयित व्यक्ती घुसल्याने गोंधळ; डोनाल्ड ट्रम्प यांना स्टेजवरून उतरवले 
२- तुमचा हात हाच तुमचा पासवर्ड, पीन आणि सिग्नेचर; इन्फ्रारेड स्कॅनरवर कधीच चोरीला न जाणारी यंत्रणा 
३- ‘आॅपरेशन ब्लू स्टार’मधील ब्रिटनची भूमिका स्पष्ट करा : लेबर पार्टी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- 'एनडीटीव्ही'नंतर आणखी दोन चॅनलवर बंदीची कारवाई 
५- पेट्रोल प्रति लीटर 89 पैसे, तर डिझेल प्रति लीटर 86 पैसे महाग 
६- सिंचनाचे बजेट ५० हजार कोटींचे करा- गडकरी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
७- रेल्वे पोलिसांना जनजागृतीसाठी सापडला नवा पोस्टरबॉय 
८- अक्षय कुमारकडून यवतमाळमधील आत्महत्याग्रस्त गाव दत्तक 
९- मनी लाँडरिंग प्रकरणी राज्याचे माजी मुख्यमंत्री ईडीच्या रडारवर? 
१०- सरकारविरोधात हक्कभंग दाखल करणार: विखे पाटील 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
११- जोगेश्वरी; चुकीच्या माहितीवर याचिका करणाऱ्या रिक्षाचालकाला दंड 
१२- मराठा मोर्चाचं वादळ मुंबईत 
१३- मुलुंडचं गणेश मंदिर अनधिकृत, आरपीएफचा भांडाफोड 
१४- औरंगाबादमधील मिटमिटा तलावात तिघे जण बुडाले, दोघांचे मृतदेह सापडले 
१५- रायगड; सुनील तटकरेंच्या घरात फूट, पुतण्याचा शिवसेनेत प्रवेश
१६- पुणे; प्रसिद्ध उद्योगपती विठ्ठल कामत यांच्या ऑर्किड हॉटेलवर जप्ती 
१७- दिल्ली: 15 वर्षीय मुलीवर 7 जणांचा बलात्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- विराटच्या बर्थडे सेलिब्रेशनला अनुष्काची हजेरी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html



===================================

डोनाल्ड ट्रम्प यांना स्टेजवरून उतरवले


  • अमेरिका, दि. 6 - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना सिक्रेट सर्व्हिस एजंटनं सुरक्षेच्या कारणास्तव चक्क स्टेजवर घेराव घालून त्यांच्याभोवती सुरक्षेचे कडे निर्माण केले. नेवाडा येथे एका रॅलीमध्ये डोनाल्ड ट्रम्प भाषण करत होते. मात्र त्याचदरम्यान सिक्रेट सर्व्हिस एजंटचे काही अधिकारी स्टेजवर आले आणि त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षेसाठी स्टेजवरून खाली उतरवून सुरक्षाकडे निर्माण केले.
    विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेला मोठी गर्दी होती. त्याच गर्दीतून डोनाल्ड ट्रम्प यांना स्टेजवरून खाली उतरवल्यानं उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला. मात्र काही मिनिटांनंतर पोलीस टक्कल असलेल्या एका संशयिताला बेड्या ठोकून घेऊन गेले. या संशयितापासून डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीविताला धोका असण्याची शक्यता सिक्रेट सर्व्हिस एजंटनं व्यक्त केली आहे.
    दरम्यान त्यानंतर ट्रम्प पुन्हा स्टेजवर आले आणि म्हणाले, "हे सोपे असेल, असं मला कोणीच सांगितले नव्हतं. मात्र आता आम्ही थांबणार नाही. मी सिक्रेट सर्व्हिसचे आभार मानू इच्छितो. त्यांनी त्यांचे काम उत्तमरीत्या केलं आहे," असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण संपवलं.
===================================

'एनडीटीव्ही'नंतर आता 'या' दोन चॅनलवर बंदी

  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. 6 - भारतातले लोकप्रिय हिंदी न्यूज चॅनल एनडीटीव्ही इंडियावर एका दिवसाची बंदी घालण्यात आल्यानंतर केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाने आणखी दोन चॅनलवर बंदी घातली आहे. 'न्यूज टाइम आसाम' आणि 'केअर वर्ल्ड टीव्ही' चॅनलच्या प्रक्षेपणावर बंदी घातली आहे, असं वृत्त बिझनेस स्टॅडर्डनं दिलं आहे.
    'न्यूज टाइम आसाम'वर प्रोग्रॅमिंग मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 9 नोव्हेंबरला एका दिवसासाठी बंदी घालण्यात आली आहे. 'न्यूज टाइम आसाम'नं एका अल्पवयीन मुलीचा परिचय देताना तिची ओळख सार्वजनिक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर 'केअर वर्ल्ड चॅनल'वर आक्षेपार्ह माहिती दिल्याचा ठपका ठेवत तब्बल 7 दिवस चॅनल बंद ठेवण्याचे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून जारी करण्यात आले आहेत.
    तत्पूर्वी 9 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजेपासून 24 तासांसाठी एनडीटीव्ही इंडिया या चॅनलचं प्रसारण बंद असणार आहे. पठाणकोट हल्ल्यावेळी एनडीटीव्ही इंडियाने केलेलं कव्हरेज हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे. त्यांनी दाखवलेल्या माहितीचा दहशतवादी वापर करू शकत होते, अशा प्रकारची माहिती जाहीर करणं हे देशाच्या सुरक्षेला बाधा पोहोचवणारं असल्याचा ठपका एनडीटीव्हीवर ठेवण्यात आला होता. आता 9 नोव्हेंबरला एकंदरीत तीन चॅनलवर बंदी असणार आहेत. मात्र चॅनलवर अशा प्रकारे बंदी घातल्यानं लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय घाला घालत असल्याची भावना सोशल मीडियावरून व्यक्त केली जातं आहे.

===================================

चुकीच्या माहितीवर याचिका करणाऱ्या रिक्षाचालकाला दंड

मुंबई : जोगेश्वरीमधील एका पुनर्विकास प्रकल्पात बिल्डरने कायदेशीर प्रक्रिया डावलून बांधलेल्या १९ मजली निवासी इमारतीला मुंबई महापालिकेनेही कायदेशीर प्रक्रियेविरूद्ध परवानगी दिल्याचा दावा करत चुकीची जनहित याचिका केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने एका रिक्षाचालकाला एक लाख रूपयांचा दंड ठोठावून दंडाची रक्कम चार आठवड्यात टाटा कॅन्सर रिसर्च सोसायटीला देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले.
जोगेश्वरी येथील सर्व्हे क्रमांक १२ क हा भूखंड महापालिकेच्या प्राथमिक शाळेसाठी राखीव होता. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेविना आरक्षण बदलता येत नाही आणि त्यावर निवासी इमारतींचे बांधकाम करता येत नाही. तरिही महापालिकेने एम.एम. कॉर्पोरेशन या विकासकाला बांधकामाची मंजुरी दिल्याचा दावा करत संजय चव्हाण यांनी ही जनहित याचिका केली होती. एमआरटीपी कायद्यातील तरतुदींप्रमाणे आवश्यक कायदेशीर प्रक्रिया केलीच नाही, असा दावा चव्हाण यांनी याचिकेद्वारे केला. या भूखंडावर पूर्वी एकमजली इमारत होती. त्यात प्राथमिक शाळा आणि काही भाडेकरू होते. त्यांना धमकावून करार करून घेतले, असा युक्तिवादही याचिकादारातर्फे करण्यात आला होता.
मात्र, हा भूखंड १९९४ मध्ये विकत घेतला होता. त्यातील काही भागात शाळा आणि बगिचाचे आरक्षण होते. त्याप्रमाणे विकास नियंत्रण नियमावलीतील नियम ११(२) अन्वये निवासी इमारतीच्या बांधकामाला सर्व आवश्यक कायदेशीर मंजुरी मिळवूनच बांधकाम केले. शिवाय महापालिकेला शाळा आणि बगिच्याची जागाही अधिकृतपणे हस्तांतरित केली. शिवाय या भूखंडाला एमआरटीटी कायद्यातील तरतुदी लागूच होत नाहीत, असा युक्तिवाद बांधकाम कंपनीतर्फे ज्येष्ठ वकील एस.यू. कामदार यांनी केला.
रिक्षाचालक संजय चव्हाण यांच्यामार्फत हेमंत दलाल, अशोक देशमुख, अश्विन हिरानी आणि हिना श्रॉफ यांनी ही याचिका चुकीच्या माहितीवर आधारित केल्याचे निदर्शनाश आल्याने न्यायालयाने टाटा कॅन्सर रिसर्च सोसायटीला चार आठवड्यांत एक लाख रुपये देण्याच आदेश दिले. महापालिकेतर्फे अ‍ॅड. तृप्ती पुराणिक यांनीही सर्व मंजुरी कायद्यानुसारच असल्याचा युक्तिवाद प्रतिज्ञापत्रांच्या आधारे मांडला. 

===================================

Saturday, 5 November 2016

नमस्कार लाईव्ह ०५-११-२०१६सायंकाळचे बातमीपत्र

[राष्ट्रीय] 
१- पाकचे 40 जवान ठार, चार चौक्या उद्ध्वस्त 
२- हजारो संस्थांच्या परदेशी देणग्या रोखल्या, गृहमंत्रालयाचा बडगा 
३- स्टेट बँकेत उच्चपदासाठी भरती 
४- नोकरीची संधी! विक्रीकर निरीक्षकाच्या 181 जागांसाठी भरती 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
५- बुलडाणा : इतर मुलींसमोरच बलात्कार, डॉ. आशा मिरगेंची थरकाप उडवणारी माहिती 
६- कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी वाहनं शिवसेनेने रोखली 
७- तुकाराम मुंढेंच्या 'वॉक विथ कमिशनर' उपक्रमाला जोरदार प्रतिसाद 
८- उबरच्या समर्थनार्थ एक लाख मुंबईकरांच्या प्रशासनाकडे याचिका 
९- मला मुख्यमंत्री व्हायचे नाही - शिवपाल यादव 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१०- हिमाचल प्रदेशात बस नदीत कोसळली, 14 जणांचा जागीच मृत्यू
११- बांगलादेशात स्फोट करुन ठाण्यात घुसलेल्या आरोपीला अटक  
१२- ईस्टर्न फ्रीवेवर टॅक्सीचा भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू 
१३- भाईंदरमध्ये तेरेसा मंदिरासभोवतालच्या कुंपण भिंतीवरील कारवाईमुळे तणाव 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१४- आदित्य पांचोलीला एक वर्षाची शिक्षा, मात्र जामीनही मंजूर 
१५- राष्ट्रकुल स्पर्धा : पैलवान रेश्माला सुवर्ण, सोनालीला रौप्यपदक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
=================================

आदित्य पांचोलीला एक वर्षाची शिक्षा, मात्र जामीनही मंजूर

आदित्य पांचोलीला एक वर्षाची शिक्षा, मात्र जामीनही मंजूर
मुंबईमारहाणप्रकरणात बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोलीला झटका बसला आहे. अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने त्याला एक वर्षांची शिक्षा आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मात्र आदित्य पांचोली शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात आव्हान देणार आहे. त्यामुळे जामीन मंजूर झाला असून, त्याची जेलवारी टळली आहे.
आदित्य पांचोलीने 2005 साली सोसायटीच्या पार्किंगमध्ये एका व्यक्तीला मारहाण केली होती. याप्रकरणी प्रतिक नावाच्या व्यक्तीने आदित्य पांचोलीविरोधात गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, सध्या कोर्टाने आदित्य पांचोलीला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तूर्तास तरी जेलवारी टळली आहे. आदित्य पांचोली शिक्षेविरोधात सत्र 

यालयात आव्हान देणार आहे. त्यामुळे जामीन मंजूर झाला आहे. पुढील कोर्टात अपील करेपर्यंत ही जमानत असेल.

 


=================================

बुलडाणा : इतर मुलींसमोरच बलात्कार, डॉ. आशा मिरगेंची थरकाप उडवणारी माहिती

बुलडाणा : इतर मुलींसमोरच बलात्कार, डॉ. आशा मिरगेंची थरकाप उडवणारी माहिती
बुलडाणा : सर्व मुली ज्या हॉलमध्ये झोपल्या तिथेच बलात्कार झाला, अशी धक्कादायक माहिती महिला आयोगाच्या माजी सदस्या डॉ. आशा मिरगे यांनी दिली. बुलडाण्याच्या आश्रमशाळेतील मुलीवरील बलात्कारप्रकरणी ‘एबीपी माझा’शी बोलताना त्यांनी हे सांगितलं. पीडित मुलीच्या वैद्यकीय तपासणीच्या वेळी डॉ. आशा मिरगे तिथेच उपस्थित होत्या.

“आरोपीने हॉलमधील इतर मुलींसमोरच पीडित मुलीवर बलात्कार केला. मुलीने ओरडण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपीने तिचं तोंड दाबून गप्प केलं,”  अशी थरकाप उडवणारी माहिती मुलीने दिल्याचं आशा मिरगे सांगितलं.

नमस्कार लाईव्ह ०५-११-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 

१- हवाई हल्ल्यात अल् कायदाचा म्होरक्या काहतनी ठार 

२- युनोच्या सर्वोच्च विधि संस्थेवर युवा भारतीय वकिलाची निवड

३- अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी अमेरिकेवर होऊ शकतो दहशतवादी हल्ला 

~~~~~~~~~~~~~~~~~~~

[राष्ट्रीय] 

४- फोटोग्राफर्स मारहाणप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल, टाटा समूहाकडून माफीनामा 

५- नवस पूर्ण झाल्यानं सिद्धीविनायकाच्या चरणी: रॉबर्ट वढेरा 

६- सेन्सेक्स आणखी १५६ अंकांनी घसरला

७- जीएसटी कौन्सिलमध्ये मतभेद कायम

८- साखरेचा ५00 टनांचा साठा ठेवण्याचे बंधन

९- जिओची ४जी गती स्पर्धकांपेक्षा कमीच 

~~~~~~~~~~~~~~~~~~~

[राज्य] 

१०- सहा मुलींवर अत्याचाराचा संशय, वैद्यकीय तपासणी बाकी : सावरा 

११- दिल्लीवर विषारी धुरक्याची चादर, शाळा, कार्यालयांना सुट्टी 

१२- 25 लाखांच्या खंडणीप्रकरणी औरंगाबादमधील प्राचार्याला अटक 

१३- पेट्रोलपंप चालकांचं 'इंधन खरेदी बंद' आंदोलन तूर्तास मागे 

१४- कल्याणजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वे विस्कळीत

१५- चीनवर सर्जिकल स्ट्राइक करा- उद्धव ठाकरे

१६- राज्याला वीज दरवाढीचा झटका!      

~~~~~~~~~~~~~~~~~~~

[प्रादेशिक]

१७- ईस्टर्न फ्रीवेवर टॅक्सीचा भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू 

१८- कोल्हापूर; कार मेकॅनिककडून हेलिकॉप्टर दुरुस्त, पायलटवर कारवाई 

१९- सोलापुरात शासकीय रुग्णालयाच्या आवारात दोन गटात तुफान हाणामारी 

२०- मुंबईतील प्रसिद्ध लिंकिंग रोडवरचा बाजार उठणार 

~~~~~~~~~~~~~~~~~~~

[इतर]

२१- इंग्लंड संघाने मुंबईत ब्रेबोर्न स्टेडियमवर केला कसून सराव

२२- भारतीय फुटबॉलने आता मागे वळून पाहू नये : छेत्री

२३- आॅस्ट्रेलियन चॅम्पियनशिपमध्ये उसेन बोल्टची एंट्री 

~~~~~~~~~~~~~~~~~~~

*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 

आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 

फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 

गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.

संपर्क- 9423785456, 7350625656 

अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 

http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html

Friday, 4 November 2016

नमस्कार लाईव्ह ०४-११-२०१६सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- नेपाल; दाऊदचा आणखी एक हस्तक ताब्यात 
२- सी-१७ ग्लोबमास्टरच्या लँडीगमधून भारताचा चीनला इशारा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- तुमचा खर्च तुम्हीच करा, BCCI चं ईसीबीला पत्र 
४- OROPबाबत मोदींकडून धुळफेक - राहुल गांधी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
५- राहुल प्रत्युषाला देहविक्रीयासाठी भाग पाडत होता ?
६- मुंबईत आता तृतीयपंथीयांसाठीही स्वतंत्र स्वच्छतागृहे 
७- खामगाव - आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्यावर गुन्हे दाखल करा - चित्रा वाघ
८- पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनची मुंबईत बैठक 
९- औरंगाबाद : क्रांती चौकातून बहुजन क्रांती मूकमोर्चा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१०- पुंछ; बस दरीत कोसळली, तिघांचा मृत्यू तर 5 जखमी.
११- अकोला; निवृत्त झालेल्या ड्रायव्हर मामांसाठी कलेक्टर स्वत: बनले ड्रायव्हर! 
१२- बुलडाणा बलात्कार : आरोपी इतू सिंग आश्रमशाळेसाठी मुली जमवायचा 
१३- केरळ; धार्मिक कारणासाठी पित्याचा बाळाला 24 तास स्तनपानास मज्जाव 
१४- नाशिक - येवला तालुक्यात बिबट्या अखेर जेरबंद. 
१५- लातूर - शहरातील गरुड चौकात आठ किलो गांजा पकडला 
१६- उस्मानाबाद : कालव्यामध्ये बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू 
१७- अहमदनगर : मनमाड रोडवरील महाराष्ट्र बँकेच्या ग्राहकांना लुटणारी सहा जणांची टोळी गजाआड 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- पंतप्रधानांचा अपमान, राखी सावतंवर गुन्हा 
१९- 20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा स्मार्टफोनचं 15 नोव्हेंबरला भारतात लाँचिंग 
२०- सेल्फीसाठी कॅप्टन कूल धोनीच्या हमरचा तरुणीकडून पाठलाग 
२१- अथियापाठोपाठ सुनिल शेट्टीच्या मुलाचंही बॉलिवूड पदार्पण? 
२२- इंग्लंडमध्ये फिरकी गोलंदाजांना थर्ड क्लास समजतात - ग्रॅमी स्वान 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
===================================

निवृत्त झालेल्या ड्रायव्हर मामांसाठी कलेक्टर स्वत: बनले ड्रायव्हर!

निवृत्त झालेल्या ड्रायव्हर मामांसाठी कलेक्टर स्वत: बनले ड्रायव्हर!
अकोला : अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 33 वर्षे सेवेत असलेल्या ड्रायव्हरचा अनोखा सन्मान केला. ड्रायव्हर म्हणून 33 वर्ष सेवा बजावल्यानंतर, निवृत्तीच्या दिवशी निरोपासाठी खुद्द कलेक्टर ड्रायव्हिंग सीटवर बसले आणि आपल्या ड्रायव्हरचं सारथ्य केलं.
अकोल्याचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत गाडी चालवत आहेत  आणि त्यांचा ड्रायव्हर दिगंबर ठक ऐटीत मागे बसलेत, असं चित्र अकोल्यात पाहायला मिळालं.

===================================

भारतीय 'चहावाली'चा जगाला हेवा!

...म्हणून या भारतीय 'चहावाली'चा जगाला हेवा!
नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा ‘चहावाला’ तरुण अरशद खानने आपल्या निळ्या डोळ्यांनी साऱ्यांचेच लक्ष वेधले. त्याचे फोटो सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल झाल्याने, त्याला चक्क मॉडेलिंगच्याही ऑफर मिळत होत्या. पण सध्या एका भारतीय ‘चहावाली’ने इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. उप्पम्मा विर्दी असे या ‘चहावाली’चे नाव असून, तिच्या हातच्या चहासाठी ऑस्ट्रेलियातील लोक वेडे आहेत.
मूळची चंदीगढची असलेल्या विर्दीला काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियामधील एका कार्यक्रमात 2016 सालातील ‘बिझनेस वुमन ऑफ द इअर’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 26 वर्षीय उप्पम्मा विर्दीची ओळख एक ‘चहावाली’च म्हणून नव्हे, तर एक कॉर्पोरेट वकील म्हणूनही ती लोकप्रिय आहे.
काही दिवसांपूर्वी एका टेलिव्हीजनला चॅनेलला मुलाखतीसाठी बोलवले असता, ती चक्क चहाच्या किटलीसोबत, ग्लास घेऊन पोहोचली. सुरुवातीला सर्वांना ती मस्करी करत असल्याचे वाटत होते. मात्र, या माध्यमातून तिने उपस्थितांना मसाला चहाविषयी माहिती दिली.
Uppama Virdiतिने गेल्या दोन वर्षांपूर्वी चहाचा व्यवसाय सुरु असून ऑस्ट्रेलियात तिचा चहा सर्वाधिक लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे, आपले कॉर्पोरेट वकीलीचे कामही तिने सुरुच ठेवले आहे. लोकांच्या मते, विर्दीला तिची मेहनत आणि सोशल मीडियावरील कॅम्पेनच्या प्रसिद्धीमुळे ती दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.
वास्तविक, विर्दीचे चहाबद्दलची आत्मियता ही पिढीजात वारशाने मिळाली आहे. विर्दीचे अजोबा आयुर्वेदीक डॉक्टर होते. ते मसाल्यांचे तज्ज्ञ असल्याचे सांगितले जाते. तिच्या अजोबांकडून मिळालेला हा वारसा तिने जोपासला, अन् आता ती प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. विर्दीच्या मते, चहा हे दोन लोकांमधील मतभेद मिटवून त्यांना एकत्र आणण्याचे प्रभावी माध्यम आहे.
विर्दीने या कामाची सुरुवात केली, तेव्हा तिच्या कुटुंबियांकडूनही विरोध झाला. कारण, भारतात ‘चहावाला’ या शब्दाला कमी दर्जाची कामे करणारा व्यक्ती म्हणून ओळखले जाते, असे ते मानत. विर्दी सांगते की, ”माझ्या आई-वडिलांना याबद्दल आक्षेप होता. पण भारतातील प्रत्येक ‘चहावाला’ एखाद्या उद्योजकांप्रमाणेच आहे. कारण, त्यांच्यामध्येही एखाद्या कसलेल्या उद्योजकाचे गुण असतात.”

===================================

नमस्कार लाईव्ह ०४-११-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- 31 डिसेंबरनंतर काही स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप बंद! 
२- पाककडून 300 पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचा भंग 
३- BSF जवानांपुढे पाकिस्तानने टेकले गुडघे, सफेद झेंडे दाखवत घेतली माघार 
४- चीनची दादागिरी, भारतात घुसून रोखले कालव्याचे काम 
५- माघार घेऊ नका, लढतच राहा; स्वत:चा जीव वाचवण्यासाठी बगदादीची अतिरेक्यांना चिथावणी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
६- अरबी समुद्रातील शिवस्मारकामुळे पर्यावरण हानी नाही : सरकार 
७- यूपीत भाजपचा सिक्सर, प्रचाराच्या बॅनरवर सहा चेहरे 
८- समाजवादी पक्षातील भांडणाचा फायदा भाजपला 
९- पुण्यातील कर्ण, केळकर दाम्पत्यांची आयुष्यभराची पुंजी देशाला दान 
१०- जीएसटीचे दर जाहीर, चैनीच्या वस्तूंवर सर्वाधिक 28 टक्के टॅक्स 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
११- विलास शिंदे हत्या : अल्पवयीन आरोपीवर सज्ञान म्हणून खटला चालणार 
१२- कन्नडीगांचा दबाव, एकीकरण समितीच्या 22 कार्यकर्त्यांना अटक 
१३- मनसेचं इंजिन आता उजवीकडून डावीकडे धावणार 
१४- दर सोमवारी शाळेचा पहिला तास सेल्फीचा! 
१५- वडापाव महागला, डाळी कडाडल्याने खिशाला चाट 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- वाराणसी एक्स्प्रेस 22 तास उशिराने, पुणे स्टेशनवर प्रवाशांचा खोळंबा 
१७- सोलापूर; कुऱ्हाडीचे वार करुन सुनेची हत्या, आरोपी सासरा पसार 
१८- बुलडाणा : आश्रमशाळेतील बलात्कारप्रकरणी आणखी 4 जणांना बेड्या 
१९- मुंबई; लोकलबाहेर खांबाला धडकून स्टंटबाज तरुणाचा मृत्यू 
२०- गुजरात; विषारी वायुगळतीमुळे 13 कामगारांचा मृत्यू 
२१- ओटावा; कुत्रिम गर्भधारणेत डॉक्टरने स्वत:चे स्पमर्स वापरुन केली महिलेची फसवणूक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- ईशांत शर्माची 'विकेट', पुढच्या महिन्यात विवाहबंधनात 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
=====================================

विलास शिंदे हत्या : अल्पवयीन आरोपीवर सज्ञान म्हणून खटला चालणार


विलास शिंदे हत्या : अल्पवयीन आरोपीवर सज्ञान म्हणून खटला चालणार
मुंबई : वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या मृत्यूप्रकरणी अल्पवयीन आरोपीचा खटला सज्ञान म्हणून चालवण्यात येणार आहे. ज्युवेनाईल जस्टिस बोर्डाने हा खटला चालवण्यास परवानगी दिली आहे.

अल्पवयीन आरोपीवर सज्ञान म्हणून खटला चालवण्याची मुंबईतील ही पहिलीच वेळ आहे. दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर सरकारने अल्पवयीन आरोपींसंदर्भातील कायद्यात बदल केला आहे.

=====================================

कन्नडीगांचा दबाव, एकीकरण समितीच्या 22 कार्यकर्त्यांना अटक

कन्नडीगांचा दबाव, एकीकरण समितीच्या 22 कार्यकर्त्यांना अटक
बेळगावमहाराष्ट्र एकीकरण समितीच्या आणखी 22 कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्री अटक केली. कन्नड संघटनांच्या दबावाखाली येऊन ही कारवाई केली जात आहे.
यापू्र्वी पोलिसांनी एकीकरण समितीच्या सहा कार्यकर्त्यांना अटक करून त्यांच्यावर दोन पोलीस स्थानकात गुन्हे दाखल केले आहेत.
काळ्या दिनाच्या फेरीत ठाकूरच्या वेशात हातात एअर गन धरून, घोड्यावर स्वार झालेल्या रत्नप्रसाद पवार या तरुणाला पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे असे गुन्हे मार्केट पोलिसात नोंदवण्यात आले आहेत. अन्य पाच कार्यकर्त्यावर लाल पिवळे ध्वज, पताके काढून सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न, असे गुन्हे शहापूर पोलिसांनी नोंदवले आहेत.
या पाच जणांना आणि रत्नप्रसाद पवार यांना न्यायालयात हजर करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात केली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्यावतीने वकील सुधीर चव्हाण, महेश बिर्जे,अमर येळ्ळूरकर,शाम पाटील यांच्यासह अन्य वकिलांनी न्यायालयात बाजू मांडून जामीन अर्ज दाखल केला.
शहापूर पोलीस स्थानकात अटक केलेल्या पाच कार्यकर्त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, पण कारागृहातून सुटका करण्याची वेळ टळून गेल्यामुळे त्यांची सुटका उद्या होणार आहे . तर रत्नप्रसाद पवार यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.

=====================================

अरबी समुद्रातील शिवस्मारकामुळे पर्यावरण हानी नाही : सरकार

अरबी समुद्रातील शिवस्मारकामुळे पर्यावरण हानी नाही : सरकार
मुंबई : अरबी समुद्रात बांधल्या जाणाऱ्या शिवस्मारकामुळे पर्यावरणाला कोणताही धोका होणार नसल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने केंद्रीय हरित लवादाला पाठवलं आहे. सरकारच्या या भूमिकेवर पर्यावरणवादी आणि मच्छिमार संघटनांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.
शिवस्मारकाच्या बांधकामामुळे अरबी समुद्रातल्या जैवविविधतेला धोका निर्माण होईल, असा दावा करत पर्यावरणवाद्यांनी हरित लवादामध्ये याचिका दाखल केली होती. त्याच याचिकेवर राज्य सरकारला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार राज्य सरकारनं पाठवलेल्या पत्रात या प्रकल्पामुळे कोणतीही हानी होणार नसल्याचा दावा केला आहे.
भर समुद्रात बांधकाम करुन जर पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, असं सरकारला वाटत असेल, तर सरकारच्या दृष्टीने ‘पर्यावरण म्हणजे नेमकं काय?’ असा सवालही पर्यावरणतज्ज्ञ आनंद पेंढारकर यांनी उपस्थित केला आहे.
शिवाजी महाराजांचे स्मारक मुंबईतील कफ परेडजवळच्या समुद्रात बांधण्याची तयारी राज्य सरकारने सुरु केली आहे. मात्र पर्यावरणाला धोका असल्याने स्मारक समुद्रात उभारण्यात येऊ नये, असं सांगत पर्यावरणतज्ज्ञ प्रदीप पाताडे आणि अखिल मच्छीमार कृती मंडळाचे संचालक दामोदर तांडेल यांनी पुण्यातल्या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल केली.

=====================================

मनसेचं इंजिन आता उजवीकडून डावीकडे धावणार

मनसेचं इंजिन आता उजवीकडून डावीकडे धावणार
मुंबई : एकहाती सत्तेचं स्वप्न भंगल्याने भरकटलेल्या मनसेच्या इंजिनची दिशा पुन्हा बदलण्यात येणार आहे. डावीकडून उजवीकडे धावणारं इंजिन आता पुन्हा उजवीकडून डाव्या दिशेने धावणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसे जोरदार तोंडावर आपटल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
2012 पर्यंत जोरदार वेगाने धावणाऱ्या इंजिनची दिशा डावीकडे होती. मात्र, 2012 च्या महापालिका निवडणुकीत पक्षाला भरघोस यश मिळालं. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावर लढणाऱ्या पक्षाचं चिन्हं मराठी भाषा ज्या प्रमाणे लिहितात त्याप्रमाणेच म्हणजे उजवीकडे धावणारं हवं यावर एकमत झालं आणि इंजिनची दिशा बदलली. मात्र, सध्या मनसेचं इंजिन थेट यार्डात पोहचल्यानं आगामी पालिका निवडणुकांसाठी नवा बदल करण्याचा सल्ला वास्तूतज्ञांनी दिला आहे.
त्यामुळे  8 नोव्हेंबरला पुण्यात होणाऱ्या मेळाव्याच्या जाहिरातीवर डावीकडे धावणारं इंजिन छापण्यात आले आहे. तसेच लेटरहेडवरही ‘श्री जयमहाराष्ट्र’ आणि राजमुद्राही छापण्यात येणार आहे. त्यामुळे हे नवे बदल प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू राज ठाकरेंना कितपत फलदायी ठरतात हे पाहावं लागेल.

=====================================

दर सोमवारी शाळेचा पहिला तास सेल्फीचा!

दर सोमवारी शाळेचा पहिला तास सेल्फीचा!
मुंबई : शाळेत आता शिक्षकांना विद्यार्थ्यांबरोबर दर आठवड्याला सेल्फी काढावा लागणार आहे. येत्या जानेवारी महिन्यापासून शाळांमधला दर सोमवारचा पहिला तास हा सेल्फीचा ठरणार आहे. पटपडताळणीसाठी शिक्षण विभागाने ही अनोखी शक्कल लढवली आहे.
देशातली 18 टक्के मुले पटावर नोंद असूनही प्रत्यक्षात शाळेत येत नाहीत. त्यामुळे हजेरीची सातत्याने पडताळणी करण्यासाठी आधी बायोमेट्रिकचा पर्याय स्वीकारण्यात आला. पण आता त्यापेक्षा सेल्फीचा पर्याय सोपा असल्याने त्याच्या अंमलबजावणीचे आदेश सोडण्यात आले आहेत.
शिक्षकांनी सोमवारच्या सकाळी प्रत्येकी 10 विद्यार्थ्यांचा गट तयार करुन सेल्फी काढून शासनाच्या ‘सरल’ या प्रणालीवर अपलोड करावा लागणार आहे. इतकंच नाही, तर अनियमित राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव, त्यांचा आधारक्रमांक आणि त्यांच्यासोबतचा सेल्फीही शिक्षकांना ‘सरल’वर अपलोड करावे लागणार आहे.
वर्गातील मुलांची हजेरी आणि शिक्षकांनी दिलेल्या छायाचित्रातील तपशिलांची पडताळणी करण्यात येणार आहे. जानेवारी 2017 पासून हा उपाय अमलात आणण्यात येणार आहे.

=====================================

VIDEO : लोकलबाहेर खांबाला धडकून स्टंटबाज तरुणाचा मृत्यू

VIDEO : लोकलबाहेर खांबाला धडकून स्टंटबाज तरुणाचा मृत्यू
मुंबई : स्टंटबाजीची नशा चढलेल्या एका तरुणाला लोकलच्या फुटबोर्डवर बसून स्टंट करणं चांगलंच महागात पडलं आहे. लोकलबाहेर लोंबकळताना रेल्वेमार्गावरील विजेच्या खांबाला धडकून तरुणाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
जशी ट्रेन वेगात निघाली हा तरुण ट्रेनबाहेर झेपावला आणि तेव्हाच बाहेरच्या विजेच्या खांबाला धडकून खाली पडला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
लोकलच्या अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या संख्येत गेल्या काही दिवसांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. यापैकी अनेकांचा स्वतःच्याच चुकीमुळे जीव गमवावा लागत असल्याचंही समोर आलं आहे.
23 सेकंदांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जीआरपीनं त्याची चौकशी सुरु केली आहे. व्हिडिओत येणारा आवाज ऐकला तर ही लोकल मरिन लाईन्स आणि चर्नीरोड स्थानकाच्या मध्ये असल्याचं समजतं.

=====================================

यूपीत भाजपचा सिक्सर, प्रचाराच्या बॅनरवर सहा चेहरे

यूपीत भाजपचा सिक्सर, प्रचाराच्या बॅनरवर सहा चेहरे
लखनौ : भाजपने उत्तर प्रदेशात एक-दोन नव्हे, तर अर्धा डझन चेहरे मैदानात मुख्य प्रचारक म्हणून उतरवले आहेत. उत्तर प्रदेशची निवडणूक व्यक्तीकेंद्रीत न करण्याची भाजपची रणनीती आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणाही केली जाणार नाही.
5 नोव्हेंबरला सहारनपूरमधून सुरु होणाऱ्या भाजपच्या परिवर्तन यात्रेमध्ये भाजपच्या प्रत्येक बॅनरवर सहा महत्त्वाच्या नेत्यांचे फोटो असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती, केंद्रीय मंत्री कलराज मिश्र आणि भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांचेच फोटो प्रचारादरम्यान बॅनरवर असणार आहेत. एकंदरीत भाजपकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत गुप्तता बाळगण्यात आली आहे.
यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांचे फोटो बॅनरवर लावणं, हे अपरिहार्य होतं. मात्र, इतर चार नेत्यांचे फोटो लावण्यामागे भाजपचे जातीय समीकरण असल्याची चर्चा आहे. भाजप रणनीती आखूनच उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी मैदानात उतरलं आहे.
परिवर्तन यात्रेची सुरुवात 5 नोव्हेंबरपासून होणार आहे. सहारनपूरहून भाजपाध्यक्ष अमित शाह ही यात्रा सुरु करतील. त्यानंतर 6 नोव्हेंबरला झाँसीहून दुसरी यात्रा, 8 तारखेला सोनभद्रमध्ये तिसरी आणि 9 नोव्हेंबरला बलियाहून चौथी यात्री सुरु होईल. सर्व यात्रा 24 डिसेंबरला लखनौमध्ये येऊन थांबतील आणि तिथेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे.

=====================================

समाजवादी पक्षातील भांडणाचा फायदा भाजपला

समाजवादी पक्षातील भांडणाचा फायदा भाजपला: एबीपी न्यूज-सिसरो सर्व्हे
नवी मुंबई: उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्ष आणि मुलायम सिंह यांच्या कुटुंबीयांमधील भांडणानं उत्तरप्रदेशचं राजकारण बरंच बदललं आहे. याच बदलत्या राजकारणामुळं येथील मतदारांचा आता नेमका कल कुणाच्या बाजूनं आहे हे जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूज आणि सिसरोनं एक तात्काळ सर्व्हे केला आहे.

एबीपी न्यूज आणि सिसरोनं केलेल्या तात्काळ सर्व्हेनुसार मुख्यमंत्रीपदासाठई अखिलेश यादव यांना सर्वाधिक म्हणजेच 31 टक्के पसंती मिळाली आहे. तर मायावती यांना 27 टक्के पसंती मिळाली असून भाजपच्या आदित्यनाथ यांना 24 टक्के पसंती मिळाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तीन महिने पहिले काका पुतण्यामध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. सध्या तरी हे भांडणं शमलं असलं तरीही ऐन निवडणुकीच्या वेळेस काय होईल याबाबत काहीही सांगता येणार नाही.

=====================================

Thursday, 3 November 2016

नमस्कार लाईव्ह ०३-११-२०१६सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय]
१- 'स्ट्रीट व्ह्यू'ला अद्याप भारतात परवानगी नाही : गुगल
२- पाकमध्ये रेल्वे अपघातात 16 ठार; 40 जखमी
३- पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, भारतीय अधिका-यांवर हेरगिरीचे आरोप
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- कम्प्युटरपेक्षा मोबाइलवर इंटरनेटचा सर्वाधिक वापर: रिपोर्ट
५- रामकिशनांच्या अंत्यसंस्कारावेळी राहुल गांधी उपस्थित
६- "ओआरओपी'चे राजकारण नकोच - भाजप
७- जीएसटी दर अखेर निश्चित, किमान 5 तर कमाल 28 टक्के
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- शरद पवारांचा वारस काळच ठरवेल : सुप्रिया सुळे
९- भाजपची नवी खेळी, मुंबईत 12 ठिकाणी छटपूजा
१०- 'ए दिल' विरोधात संभाजी ब्रिगेडचे कल्याणाच्या सर्वोदय मॉलमध्ये आंदोलन
११- गाडीची टाकी फुल करुन घ्या, उद्यापासून पेट्रोल-डिझेल खरेदी बंद
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- ठाणे; खेळण्यातल्या बंदुकीचा वाद जीवावर, रेल्वेखाली येऊन एकाचा मृत्यू
१३- बुलडाण्यातील आश्रमशाळेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
१४- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कारने दोन पोलिसांना उडवलं, महिला चालक ताब्यात
१५- सांगली: चालत्या स्कूटीच्या हँडलवर कोब्रा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१६- रोबोटचा सिक्वेल 2.0 : रजनीकांतचा ट्रिपल रोल
१७- रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीला पुन्हा ब्रेक
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स*
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा.
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
-----------------------------------------------------------

VIDEO : 'बाबा'... प्रियंका चोप्राची मराठी गाण्यातून आर्त साद



VIDEO : 'बाबा'... प्रियंका चोप्राची मराठी गाण्यातून आर्त साद
मुंबई : ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाची निर्मिती करत अभिनेत्री प्रियंका चोप्राने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. आता याच चित्रपटातून प्रियंका मराठी पार्श्वगायनाच्या क्षेत्रातही पाऊल ठेवत आहे. प्रियंकाने गायलेलं ‘बाबा’ हे गाणं यूट्यूबवर रिलीज झालं आहे.
सुप्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटात जितेंद्र जोशी, सुकन्या कुलकर्णी, सतीश आळेकर, सुलभा आर्य, स्वाती चिटणीस अशा दिग्गज कलाकारांची फौज आहे. प्रियंकाही या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जातं.
‘क्वांटिको’ सारख्या आंतरराष्ट्रीय मालिकेत झळकलेल्या प्रियंकाने बॉलिवूडमध्ये एकही नवा प्रोजेक्ट हाती घेतलेला नाही. ‘बाजीराव मस्तानी’नंतर मोठ्या पडद्यावर तिचं दर्शन घडलेलं नाही. त्यामुळे प्रियंकाच्या चाहत्यांना तिला पाहण्याची आणि ऐकण्याची उत्सुकता लागली आहे.
प्रियंकाचे वडील अशोक चोप्रा यांचं 2013 मध्ये कर्करोगाने निधन झालं. त्यामुळे गाणं गाताना प्रियंकाही वडिलांच्या आठवणीने भावुक झाली होती. ‘डॅडीज् गर्ल’ असा टॅटू प्रियंकाने तिच्या हातावरही गोंदवला आहे. ‘बाबा’ हे गाणं तमाम पितृवर्गाला समर्पित करत असल्याचं प्रियंका सांगते.
‘कळले’ यासारखे मराठी शब्द गाण्यासाठी तिने उच्चारांवर मेहनत घेतल्याचं व्हिडिओत दिसतं. प्रियंका चोप्राच्या आवाजातलं ‘बाबा’ हे गाणं ऐकून अनेकांनी मनाला स्पर्शून गेल्याची भावना व्यक्त केली आहे.

-----------------------------------------------------------