Wednesday, 2 November 2016

नमस्कार लाईव्ह ०२-११-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- पाकचा नापाक हल्ला, जवानांनंतर नागरिकांवरही गोळीबार, 8 जणांचा मृत्यू 
२- भारतात जाताय, जरा जपून रहा - अमेरिका 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- दिल्ली; 'वन रँक, वन पेंशन'साठी माजी सैनिकाची आत्महत्या
४- झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर गृहमंत्रालयाचे आर्थिक निर्बंध 
५- केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक 
६- केंद्राकडून झाकीर नाईकच्या आर्थिक कोंडींची तयारी 
७- छत्तीसगडमध्ये मोदींची जंगल सफारी, 'शिवाजी' वाघाची फोटोग्राफी 
८- चुकीची शैक्षणिक माहिती दिल्यास उमेदवारी होणार रद्द - सर्वोच्च न्यायालय 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
९- मुंबईकरांचा लोकलचा प्रवास महागणार 
१०- पुणे विधान परिषदेच्या जागेसाठी पंचरंगी लढत?
११- दहशतवाद्यांचे मनोबल वाढवण्याचं काम करू नका : सामना 
१२- वाद टाळण्यासाठी राकेश मारियांची मुदतीपूर्वी बढती : मुख्यमंत्री 
१३- मुंबईतील चौपाटयांना नवा लूक, शिडाच्या नौकांचे मॉडेल 
१४- भाजपाच्या राज्यात देशाची सुरक्षाव्यवस्था 'रामभरोसे' - उद्धव ठाकरे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- अमरावती; बापाकडून दोन चिमुकल्यांची कुऱ्हाडीने हत्या 
१६- परगावी गेलेल्या वसईतील डॉक्टरच्या बंगल्यात मुक्काम, चोराला बेड्या 
१७- जिथून आग भडकली....औरंगाबादमधील अग्नितांडवाचा व्हिडीओ 
१८- सोलापूर; फटाके फोडण्यास विरोध, तरुणाच्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू 
१९- ऐन भाऊबीजेला टिटवाळ्यात तीन भावांचा बुडून मृत्यू 
२०- दिल्लीतील शहादरात आगीत तिघांचा मृत्यू 
२१- मुंबईत मराठा क्रांती मोर्चासाठी बाइक रॅली 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी गंभीरला संधी मिळणार? 
२३- 'ऐ दिल..'मधल्या 'त्या' संवादामुळे रफींचा अपमान, मुलाचा आरोप 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
==================================

अमरावती; बापाकडून दोन चिमुकल्यांची कुऱ्हाडीने हत्या  
बापाकडून दोन चिमुकल्यांची कुऱ्हाडीने हत्या
अमरावती : देवीचा नवस पूर्ण करण्यासाठी पोटच्या दोन चिमुकल्यांचा बळी दिल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात खडीमल गावात घडली आहे. तीनशे फूट खोल दरीत मुलांना फेकून निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे.
दिवाळीच्या दिवशी सुधाकर भाऊसावलकर याने आपल्या आतिष आणि आकाश या दोन चिमुकल्यांची अत्यंत निर्दयीपणे अज्ञातस्थळी नेऊन हत्या केली. दिवाळी अमावस्येचा दिवस असल्याने देवीला प्रसन्न करण्यासाठी त्याने स्वतःच्याच मुलांचा बळी दिला.
आरोपी सुधाकरने मुलांना डोलारदेव बाबा जंगलातील खोल नेले. दोन्ही मुलांना उभे केले आणि मान खाली करायला लावली. दोन्ही लहानग्यांनी वडीलांचा आदेश पाळला. त्यांनी डोके जमिनीचे करताच सुधाकरने कुर्‍हाडीने वार करुन त्यांची अमानुष हत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.
==================================

जिथून आग भडकली....औरंगाबादमधील अग्नितांडवाचा व्हिडीओ





==================================

Tuesday, 1 November 2016

नमस्कार लाईव्ह ०१-११-२०१६सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- भारतीय कार्यक्रम दाखवला म्हणून पाकमध्ये चॅनेलचा परवाना रद्द 
२- हिमाचल प्रदेश; पॅराग्लायडिंग करतेवेळी तारांमध्ये अडकल्याने रशियन पर्यटकाचा मृत्यू. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- झाकीर नाईकच्या संस्थेची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू 
४- पाकिस्तानला BSFचं सडेतोड उत्तर, 11 दिवसांत चालवल्या 35 हजार गोळ्या 
५- विनाअनुदानित सिलिंडर 38.50 रुपयांनी महागला 
६- चंदू चव्हाणांच्या सुटकेसाठी भारत साधणार पाक परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
७- कल्याणमधील मेट्रो रेल्वेचा मार्ग चुकीचा, नवा डीपीआर तयार करण्याची मागणी 
८- मुंबईत सामुहिक बलात्कार; सात अटक 
९- भोपाळमधील चकमक रहस्यमय : सीपीआय 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१०- मुंबई : नव्या घराच्या शोधात आलेल्या महिलेवर पतीसमोरच सामूहिक बलात्कार 
११- डोंबिवली : नवजात शिशुला पत्र्यावर फेकणा-या अल्पवयीन आईला अटक 
१२- नाशिक - शहरातील महामार्गावरील उड्डाण पुलाचे होणार विस्तारीकरण 
१३- मध्यप्रदेश: सुधीर शाही यांना स्पेशल टास्क फोर्स प्रमुख पदावरुन हटवण्यात आले 
१४- लातूर;; कर्ज बाजारीपणाला कंटाळून शेतक-याची विष घेऊन आत्महत्या.
१५- पंढरपूर : सोनके येथे बाईक आणि कारच्या धडकेत एकाचा मृत्यू 
१६- जुन्नरमध्ये अन्नातून विषबाधा, एकाच कुटुंबातील 3 मुलांचा मृत्यू 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१७- कमल हसन आणि गौतमी यांच्यात 13 वर्षांनी दुरावा 
१८- 'ए दिल...'ची 4 दिवसांत 121 कोटींची विक्रमी कमाई 
१९- तुरुंगवारीनंतर 2017मध्ये संजूबाबा करणार कमबॅक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
====================================

झाकीर नाईकच्या संस्थेची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू 

  •  ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. 1 - वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेची एफसीआरए नोंदणी रद्द  करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.  गृहमंत्रालय दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत झाकीरच्या बिगरशासकीय संघटनेवर बंदी घालण्याची तयारी करत असून, त्यादृष्टीने कॅबिनेटच्या बैठकीसाठी गृहमंत्रालयाने मसुदादेखील तयार केला आहे. 
    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झाकीर नाईक याच्या संस्थेवर बंदी घालण्यापूर्वी त्याच्या संस्थेकडून होणाऱ्या सर्व अवैध कृत्यांचा तपास करण्यात आला. त्यानंतर या संस्थेवर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 
    तसेच पीस टीव्ही या आंतरराष्ट्रीय इस्लामिक चॅनेलचा झाकीर नाईकच्या संस्थेशी संबंध असल्याचेही तपासातून समोर आले आहे. झाकीरची संस्था पीस टीव्हीसाठी आक्षेपार्ह कार्यक्रमांची निर्मिती करते. तसेच त्यापैकी बरेच कार्यक्रम हे भारतात तयार केले जातात, असेही आढळून आले आहे. 
    तरुणांना दहशतवादाकडे वळण्यासाठी प्रेरित करण्याचा आरोप झाकीर नाईकवर आहे. बांगलादेशमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी हे झाकीर नाईकच्या भाषणांनी प्रभावीत झाल्याचे समोर आल्यानंतर झाकीर नाईक वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.   

====================================

नमस्कार लाईव्ह ०१-११-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- राजकोटमधील भारत वि. इंग्लंड कसोटीसाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रण 
२- बांगलादेशात हिंदूंची 15 मंदिरं आणि 100 घरांची तोडफोड 
३- पाकने पुन्हा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन, १९ वर्षीय युवती ठार 
४- मुस्लिम, हिलेरी समर्थकांना शस्त्र विकणार नाही : अमेरिकेत नवा वाद 
५- ओबामांनी व्हाईट हाऊसमध्ये केली दिवाळी साजरी 
६- चीन- कोळशाच्या खाणीत गॅसचा स्फोट होऊन 15 जणांचा मृत्यू, 18 जण अडकले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
७- पाकिस्तानकडून काश्मीरच्या सीमेवर अंदाधुंद गोळीबार, एक जवान शहिद 
८- विनाअनुदानित सिलेंडर महागला, नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू 
९- भोपाळ सेंट्रल जेलमधून पळालेल्या सिमीच्या आठही दहशतवाद्यांचा खात्मा 
१०- चांगले कपडे घालून कैदी बाहेर कसे पडले?' चकमकीवर ओवेसींकडून प्रश्नचिन्ह 
११- युती सरकारची दोन वर्षे पूर्ण, मात्र भाजप-सेनेमधला कलगीतुरा कायम
१२- सरकार नव्हे, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, विखे पाटलांची टीका  
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१३- यूपीएच्या कार्यकाळातील आणखी एक महाघोटाळा उघड 
१४- मुख्यमंत्र्यांचं दिवाळी गिफ्ट, सेवानिवृत्त पोलिसांसाठी गृह योजनेची घोषणा 
१५- आशिष शेलार शिवसेनेला बदनाम करण्याचं काम करत आहेत: शिवसेना आमदार 
१६- दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यभरात 475 कोटींच्या सोन्याची विक्री 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- नगरमध्ये भरधाव ट्रकने दुचाकीला उडवलं, दोघांचा जागीच मृत्यू 
१८- जुन्नर - अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू 
१९- अहमदनगर; ट्रक व दुचाकीच्या अपघातात २ ठार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- गिफ्ट मागितलं आणि घटस्फोट दिला, रेहम खानचा खुलासा 
२१- कोहली, अश्विन ICCच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी कायम 
२२- लेनोव्हो वाइब पी2 आणि मोटो एमचं 8 नोव्हेंबरला लाँचिंग 
२३- शाहरुखच्या अतिउत्साही चाहत्यांनी थिएटरमध्ये फोडले फटाके 
२४- ‘थ्री डी’ प्रिंटच्या आधारे ‘ब्रह्मांड’ आपल्या हाती !b 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
-----------------------------------------------------------

पहा भोपाळ एन्काऊंटरचा एक व्हिडिओ 
भोपाळ एन्काऊंटरचा आणखी एक व्हिडिओ 'माझा'च्या हाती
भोपाळ : भोपाळमध्ये खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीचा आणखी एक व्हिडिओ ‘माझा’च्या हाती लागला आहे. मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास भोपाळच्या सेंट्रल जेलमधून फरार झालेल्या 8 अतिरेक्यांना भोपाळपासून 10 किलोमीटरवर गाठून कंठस्नान घालण्यात आलं.
त्यावेळी तिथे हजर असलेल्या एका अज्ञाताने अतिरेक्यांचा खात्मा करतानाचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.
या व्हिडिओमध्ये मृत दहशतवादी दिसत असून त्यांच्याजवळ हत्यारंही सापडली आहेत. खेजडा गावातील लोकांनी मोबाइलमध्ये हा व्हिडिओ शूट केला आहे.
अचारपुरा गावात पोलिसांनी जेलमधून पळालेल्या सिमीच्या आठही दहशतवाद्यांना घेरलं. त्यानंतर दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगितले. मात्र, शरण येण्यास नकार दिल्याने पोलिसांनी दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं


-----------------------------------------------------------

पाकिस्तानकडून काश्मीरच्या सीमेवर अंदाधुंद गोळीबार, एक जवान शहिद

पाकिस्तानकडून काश्मीरच्या सीमेवर अंदाधुंद गोळीबार, एक जवान शहिद
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या राजौरी भागात पाकिस्तानकडून सीमेलगत अंधाधुंद गोळीबार सुरु आहे.  पाकच्या या गोळीबारात भारताचा आणखी एक जवान शहीद झाला आहे.
या गोळीबारात सीमेलगतच्या गावात राहणारी एक महिलादेखील मृत्यूमुखी पडली आहे. तसंच एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरच्या राजौरी आणि पूंछमध्ये काल सकाळपासून अंदाधुंद गोळीबार सुरू आहे. काल सकाळी नऊ वाजल्यापासून पाकिस्ताननं भारताच्या दिशेनं गोळीबार सुरु केला.
या गोळीबाराला भारतीय जवानांकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. पाकिस्तानकडून युद्धासाठी वापरली जाणारी शस्त्रास्त्रं वापरली जात आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्यात 55 वर्षीय रशिदा बेगम नावाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे, तर त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

-----------------------------------------------------------

नगरमध्ये भरधाव ट्रकने दुचाकीला उडवलं, दोघांचा जागीच मृत्यू

नगरमध्ये भरधाव ट्रकने दुचाकीला उडवलं, दोघांचा जागीच मृत्यू
अहमदनगर : अहमदनगरमध्ये भरधाव ट्रकने दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांना उडवलं. अमरापूर-शेवगाव मार्गावर आज सकाळी ही दुर्दैवी अपघात झाला.
संजय ओमासे आणि हनुमंत सानप अशी मृतांची नावं आहेत.
संजय आणि हनुमंत हे दोघेही दुचाकीवरुन शेवगावहून अमरापूरकडे जात होते. मात्र त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने फलकेवाडीजवळ या दोघांना चिरडलं. गंभीर दुखापत झाल्याने दोघांनी तिथेच प्राण सोडले.
अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला आहे. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान भरधाव वेगाने वाहनारी वाहनं आणि रस्त्यांच्या दूरवस्थेमुळे दिवसेंदिवस अपघातांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे.

-----------------------------------------------------------

यूपीएच्या कार्यकाळातील आणखी एक महाघोटाळा उघड

यूपीएच्या कार्यकाळातील आणखी एक महाघोटाळा उघड
नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यानंतर यूपीए सरकारच्या काळात आणखी एक संरक्षणविषयक घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे. हॉक जेट ट्रेनरचं इंजिन खरेदी करण्यासाठी तब्बल 800 कोटी रुपयांची लाच दिल्याची बाब समोर आली आहे.
2011 साली हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि रोल्स रॉईसमध्ये हॉक जेट ट्रेनरच्या इंजिनाच्या खरेदीसाठी 10 हजार कोटी रुपयांचा व्यवहार झाला होता. या इंजिनाच्या व्यवहारासाठी रोल्स रॉईसकडून 10 मिलियन पाऊंड म्हणजेच 800 कोटी रुपयांची लाच घेण्यात आली होती.
शस्त्रास्त्रांचा व्यवहार करणाऱ्या सुधीर चौधरींना ही लाच देण्यात आली आहे. यापूर्वीही सुधीर चौधरींवर लाच घेतल्याचे आरोप करणात आले आहेत. 2014 मध्ये चौधरींना ब्रिटनमध्ये अटकही करण्यात आली होती, पण भक्कम पुराव्याअभावी त्यांना सोडून देण्यात आलं होतं. सुधीर चौधरींना रशियातील कंपन्यांनी क्रूझ मिसाईलच्या नावाखाली 2007-08 मध्ये 100 मिलियन युरो म्हणजेच जवळपास 7 हजार कोटी रुपये दिले होते, अशी माहितीही समोर येत आहे.
ब्रिटनमध्ये बनलेली हॉक विमानं भारतात नौदल आणि हवाईदलाकडून वापरली जातात. या विमानात ब्रिटीश कंपनी रोल्स रॉईसचं इंजिन लावण्यात आलं आहे.

-----------------------------------------------------------

विनाअनुदानित सिलेंडर महागला, नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू

विनाअनुदानित सिलेंडर महागला, नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू
मुंबई: विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरचे दर 38 रुपये 50 पैशांनी वाढवण्यात आले आहेत.

मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू करण्यात येणार आहेत. सध्या एका ग्राहकाला वर्षापोटी 9 अनुदानित सिलेंडर मिळतात. त्यामुळं दहावा सिलेंडर विकत घेताना तुम्हाला दरवाढीचे अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.

मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहे. सध्या दिल्लीमध्ये विनाअनुदानित सिलेंडर 529 रुपयाला मिळणार आहे. दरम्यान, याआधीस जुलै महिन्यात विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत घट करण्यात आली होती. तेव्हा 11 रुपये सिलेंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली होती.

-----------------------------------------------------------

गिफ्ट मागितलं आणि घटस्फोट दिला, रेहम खानचा खुलासा

गिफ्ट मागितलं आणि घटस्फोट दिला, रेहम खानचा खुलासा
नवी दिल्ली लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट मागितलं आणि इम्रान खानने मला घटस्फोट दिला असा दावा, पाकिस्तानचे माजी क्रिकेटर आणि तहरिक-ए-इन्साफ पार्टीचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या पत्नीने केला आहे.
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रेहमने हा गौप्यस्फोट केला आहे. इम्रानने माझ्यासोबत जे केलं ते पाकिस्तानसोबत करु नये म्हणजे झालं, अशा शब्दात रेहमने टोला लगावला.
महिला पत्रकार रेहम खान हिच्याशी 62 वर्षीय इम्रान खान यांनी लग्नानंतर 10 महिन्यातच घटस्फोट घेतला. दोघांच्या घटस्फोटाची अनेक कारणं समोर आली. मात्र आता खुद्द रेहमनेच त्याचा खुलासा केला आहे.
इम्रान खान यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पाकिस्तानमध्ये तहरिक-ए-इन्साफ पार्टीची स्थापना केली. इम्रान खान यांच्या पक्षाने 2 नोव्हेंबरला इस्लामाबाद बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. त्याआधी रेहमने इम्रान खानबाबत मोठा खुलासा केला.

-----------------------------------------------------------