Sunday, 1 November 2015

नमस्कार लाईव्ह दि. ०१-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह दि. ०१-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

१- राज्यातील 62 नगरपंचायती आणि 2 हजार ग्रामपंचायतींचाही बार उडाला, मतमोजणीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त
२- केडीएमसीत ४८ तर कोल्हापुरात ६४ टक्के मतदान, लक्ष निकालाकडे
३- शिवसेना, भाजपच्या नेत्यांना निवडणूक आयोगाच्या नोटिसा
४- अमेरिकेतील टेक्सासमध्ये वादळाचे थैमान, सहा जणांचा मृत्यू.
५- छोटा राजनचा ताबा मिळवण्यासाठी पोलीस पथक इंडोनेशियात दाखल
६- जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यासंदर्भात नाशिकमध्ये जिल्हा प्रशासनाची बैठक सुरु
७- उत्तरप्रदेशमध्ये दिवाळीत घराच्या छपाईसाठी माती आणायला गेलेल्या दोन मुलींचा मातीच्या ढिगा-याखाली दबून मृत्यू
८- पुण्यात धक्कादायक प्रकार, पत्नीने जीन्स घातल्याने पतीने केली हत्या
९- खेड तालुक्यातील ढोरे भांबुरवाडी गावच्या निवडणुकीत 93 वर्षांच्या आजीबाई निवडून आल्या
१०- मुक्रमाबाद येथील ग्रामपंचायत निवडणुकीचे ६७% मतदान
~~~~~~~~~~
११- बिलोली दिवाणी न्यायालयातील वरिष्ठ स्तर अधिक्षक पदी कार्यरत असलेले बि जी चव्हाण सेवानिवृत्त
~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो., माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो.. , पण जमिनीवर
राहून माणसासारखे वागायला शिकलो का..
(सतीश जाधव, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

बिलोली दिवाणी न्यायालयातील वरिष्ठ स्तर अधिक्षक पदी कार्यरत असलेले बि जी चव्हाण सेवानिवृत्त



(प्रतिनिधीयादव लोकडे, सगरोळीकर )
बि जी चव्हाण सेवानिवृत्त

बिलोली : बिलोली दिवाणी न्यायालयातील वरिष्ठ स्तर अधिक्षक पदी कार्यरत असलेले बि जी चव्हाण हे नियतकालीन वयोमानानुसार 34 वर्ष सेवा बजावून काल दि 31 आँक्टोंबर रोजी सेवानिवृत्त झाले बिलोली न्यायालयातील सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करून जिल्हा न्यायधिश बिलोली चे आनंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. चव्हाण यांच्या सेवानिवृत्त निरोप समारंभाच्या आयोजीत कार्यक्रमात त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले तर न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी चव्हाण यांच्या सेवेतील कार्याचा व मनमिळावू स्वभावाचे कौतुक करून चव्हाण यांच्या परिवारांना सेवानिवृत्ती व दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी न्या.भागवत साहेब , दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर कोल्हापूरे साहेब , दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर बिलोली अभिवक्ता संघाचे पदाधिकारी , न्यायालयीन अधिकारी , कर्मचारी व सदस्य आदी उपस्थित होते .

नमस्कार लाईव्ह ०१-११-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह ०१-११-२०१५ सकाळचे बातमीपत्र

१- 'सेना-भाजपचा तमाशा सुरु आहे', छगन भुजबळांची बोचरी टीका
२- असे उथळ मुख्यमंत्री मी पहिल्यांदाच पाहिले - एकनाथ शिंदेंचा घणाघात
३- कल्याण-डोंबिवली; वृत्तपत्रांमध्ये भाजपच्या प्रचाराचे पॅम्प्लेट, विरोधकांचा आरोप
४- छोटा राजन येत्या तीन दिवसात भारताच्या ताब्यात
५- मी आयुष्यभर दहशतवादाविरोधात लढलो आहे, यापुढेही लढणार : छोटा राजन
६- रशियाच्या विमानाचा तो अपघात नव्हता तर 'घात' होता - इसिस
७- डोंबिवलीत पहिल्या तीन मतदारांना तुळशीचं रोपटं भेट
८- कोल्हापूर: सदर बाजार मतदान केंद्रावर ताराराणी आघाडीचे उमेदवार-अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची, प्रतिनिधी येण्याआधी एव्हीए मशिन सुरु केल्याने वाद
९- 'समृद्ध जीवन' सह संचालक महेश मोतेवारांवर गुन्हा दाखल
१०- शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंच्या विरोधात महसूल कर्मचार्‍यांचं कामबंद आंदोलन
११- लातूर -आरटीआय कार्यकर्त्यांला मारहाण करणार्‍या शिवसैनिकांची पक्षातून हकालपट्टी
१२- वाशिम : मोदीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर आठ वृद्धांनी दृष्टी गमावली
~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
सविता कंठेवाड, गजानन गोपछडे, अवधूत खुळखुळे, बापूराव पडघने, सतीश पाटील, शैलेन्द्रसिंग ठाकूर, इमरान खान, प्रदीप पाटील, गणेश मरळककर, कुणाल कदम, नितीन मोहरे, अखिल गुप्ता, दीपक यादव, रवींद्र भिलवंडे, देवानंद चव्हाण, अशोक भूतडा, अखिल गुप्ता, रितेश सोनी
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे
(सोनी इंगोले, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~
<<::महत्वाची सूचना ::>>
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र हे www.namaskarlive.blogspot.com व नमस्कार लाईव्हचे पोर्टल www.namaskarlive.com वर अधिकृतरीत्या प्रकाशित होते.
What's Up वरील प्रत्येक बातमीपत्रात संबंधित बातमीपत्राची लिंक दिली जाते. वाचकांनी लिंकवर क्लिक करून बातमीपत्राची खातरजमा करावी व पुढे शेअर करावे. इतर कुठल्याही बातमीपत्राचा नमस्कार लाईव्हशी संबंध नाही. नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी आपल्या Whats Up ग्रुप मध्ये 8975495656 हा नंबर अड्ड करा.