(प्रतिनिधीयादव लोकडे, सगरोळीकर )
बि जी चव्हाण सेवानिवृत्त
बिलोली : बिलोली दिवाणी न्यायालयातील वरिष्ठ स्तर अधिक्षक पदी कार्यरत असलेले बि जी चव्हाण हे नियतकालीन वयोमानानुसार 34 वर्ष सेवा बजावून काल दि 31 आँक्टोंबर रोजी सेवानिवृत्त झाले बिलोली न्यायालयातील सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करून जिल्हा न्यायधिश बिलोली चे आनंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. चव्हाण यांच्या सेवानिवृत्त निरोप समारंभाच्या आयोजीत कार्यक्रमात त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले तर न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी चव्हाण यांच्या सेवेतील कार्याचा व मनमिळावू स्वभावाचे कौतुक करून चव्हाण यांच्या परिवारांना सेवानिवृत्ती व दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी न्या.भागवत साहेब , दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर कोल्हापूरे साहेब , दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर बिलोली अभिवक्ता संघाचे पदाधिकारी , न्यायालयीन अधिकारी , कर्मचारी व सदस्य आदी उपस्थित होते .

No comments:
Post a Comment