Monday, 1 February 2016

नमस्कार लाईव्ह ०१-०२-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[आंतरराष्ट्रीय]

१- एका मिनिटासाठी google.com चा मालक झालेल्या सन्मयला गुगलने दिले आठ लाखाचे बक्षीस 

२- काबूलमध्ये पोलिस आवारात शक्तिशाली स्फोट 

३- नरेंद्र मोदी मुस्लिम विरोधी- परवेझ मुशर्रफ 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[राष्ट्रीय] 

४- छगन भुजबळांच्या मालमत्तेवर छापे, भुजबळ तुरुंगाच्या मार्गावर - सोमय्यांचा दावा 

५- धोब्यामुळे सीतेवर अन्याय, प्रभू रामांविरोधात कोर्टात खटला 

६- जमशेदपूर; बलात्कार पीडितेवर रुग्णालयात पुन्हा बलात्कार 

७- पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी पोखरण येथील टपाल कार्यालयातील अधिकाऱ्याला गुप्तहेर संघटनेने ताब्यात घेतले 

८- काबूलमधील पोलिस तळावर बॉम्बस्फोट, कोणतीही जीवितहानी नाही 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[राज्य] 

९- अह्म्बाबाद; जमिनीच्या 20 फूट खाली भारतातलं पहिलं अंडरवॉटर रेस्टॉरंट 

१०- 12 वीच्या नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलैमध्ये 

११- लोकलमधून पडून डोंबिवलीच्या तरुणीचा मृत्यू 

१२- चर्चगेट लोकलमध्ये भरदिवसा छेडछाड 

१३- रेल्वे रुळावर सेल्फी काढणाऱ्या तरुणाचा मृत्यू 

१४- मुरूडच्या समुद्रात बुडालेले सर्व विद्यार्थी इनामदार कॉलेडचे विद्यार्थी. 

१५- रायगडजवळ १० पर्यटक समुद्रात बुडाल्याचे वृत्त 

१६- मुंबई : भिवंडीत शाळेच्या बसला आग, दोन विद्यार्थी ५० टक्के भाजले 

१७- पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या घरातून ८० क्रूड बॉम्ब जप्त 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[प्रादेशिक]

१८- लहानशा मधमाशीने बुलडाण्याच्या शेतकऱ्याला लक्षाधीश बनवलं 

१९- दिल्ली पोलिसांची मर्दुमकी, आंदोलक मुलींचे केस उपटून बेदम मारहाण 

२०- मरोळ; खड्ड्यांमुळे गमावला मुलाने जीव, खड्डे बुजवून वडिलांची अनोखी श्रद्धांजली 

२१- नागपट्टणम; तिरंगा जाळतानाचे फोटो 'त्यानं' FBवर टाकले 

२२- वसमत; कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे विनोद झंवर हे १४४ मतांनी विजयी तर अपक्ष लक्ष्मीनारायण मुरक्या हे १४६ मतांनी विजयी 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[इतर]

२३- स्मार्टफोनमुळे करंगळीत वाकडेपणा 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

जो जिभेवर ताबा मिळवितो, तो मन जिंकतो......

जो मन जिंकतो, तो जग जिंकतो

(पांडुरंग पोटे, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

घरांची आर्टिफिशिअल सजावट 

फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध 

संपर्क- 9423785456, 7350625656 

http://goo.gl/lE9S67

************************

नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

http://goo.gl/uS8DX4

*************************************************************************************************************

लहानशा मधमाशीने बुलडाण्याच्या शेतकऱ्याला लक्षाधीश बनवलं


बुलडाणा: असा कोणता शेतीपूरक व्यवसाय तुम्हाला माहित आहे, जो तुम्हाला लक्षाधीश बनवू शकतो? ज्याला ना कोणत्या भांडवलाची गरज, ना शेतजमिनीची. देशभर फिरायचं आणि लाखो रुपये कमवायचे.
तो व्यवसाय आहे मधमाशी पालन..
लहानशा दिसणाऱ्या या माशीनं बुलडाण्याच्या राजेंद्र बैरागी या तरुण शेतकऱ्याच्या जीवनात गोडवा आणला आहे. त्याला लक्षाधीश बनवलं आहे. याच्या व्यावसायाची उलाढाल पोहोचलीय तब्बल 45 लाखांवर.
राजेंद्रकडं वडिलोपार्जित 8 एकर शेती आहे. ज्यात तो शेवग्याचं पीक घ्यायचा. मात्र फुलगळीनं मोठं नुकसान व्हायचं. उत्पन्नही जेमतेमच येत होतं. यावर कृषी विभागानं एक गोड सल्ला दिला. मधमाशी पालनाचा.
मधमाशी पालनासाठी राजेंद्रनं खादी ग्रामद्योगमधून प्रशिक्षण घेतलं. इंटरनेटवरून बाजारपेठांची माहिती घेतली. स्वत: च्या शेतापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज इतर राज्यातही पसरला आहे.
राजेंद्र आता महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात फिरून मध गोळा करतो. पेट्या लावण्याआधी तो लागवड केलेली पीकं आणि भौगोलिक परिस्थितीचं बारकाईने निरिक्षण करतो. यामुळं मधाच्या गुणवत्तेत आणि उत्पादनात वाढ होत असल्याचं राजेंद्र सांगतो.
==========================================

दिल्ली पोलिसांची मर्दुमकी, आंदोलक मुलींचे केस उपटून बेदम मारहाण


नवी दिल्ली: नेहमी आपल्या गलथानपणानं चर्चेत राहणाऱ्या दिल्ली पोलिसांचा सैतानी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. कारण रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी जनावराप्रणाणे मारलं आहे. पोलिसांच्या कर्तृत्त्वाची हद्द म्हणजे त्यांनी आंदोलक तरुणींचे केस उपटून त्यांना बेदम मारहाण केली.
30 जानेवारीला रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या निषेधार्थ दिल्लीत मोर्चा काढण्यात आला.
‘आईसा’ या डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेनं दिल्लीच्या संघ कार्यालयावर हा मोर्चा काढला होता. मात्र मध्येच पोलिसांनी हा मोर्चा अडवला आणि त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना अक्षरश: जनावरांप्रमाणे मारहाण केली.
यावेळी मोर्चात सहभागी झालेले विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये वाद होऊन त्याचं रुपांतर मारामारीत झालं. हाती आलेल्या व्हिडीओनुसार दिल्ली पोलिस मोर्चातील सहभागी विद्यार्थ्यांना अक्षरशः लाथा बुक्क्यांनी तुडवताना दिसतात.
=============================================

अह्म्बाबाद; जमिनीच्या 20 फूट खाली भारतातलं पहिलं अंडरवॉटर रेस्टॉरंट


अहमदाबाद : तुम्ही जेवत असताना अचानक एखादा मासा तुमच्या बाजूने पोहत गेला तर? कल्पना विचित्र वाटत असली, तरी हे सत्य आहे. भारतातलं पहिलं-वहिलं अंडरवॉटर रेस्टॉरंट अहमदाबादमध्ये सुरु झालं आहे.
जमिनीपासून 20 फूट खाली सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेल्या जागेत बसून खवय्यांना जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. रेस्टॉरंटमध्ये नाश्ता आणि जेवणासोबत विविध जातींचे, रंगीबेरंगी मासे पाहण्याची संधीही तुम्हाला मिळणार आहे.
अहमदाबादच्या बोपल भागात रिअल पोसिडॉन- अंडर वॉटर रेस्टॉरंट उभारण्यात आलं आहे. तब्बल 3 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या रेस्टॉरंटमध्ये एका वेळेस 32 जण बसू शकतात. एक लाख 60 हजार लीटर पाणी हॉटेलच्या सभोवताली आहे.
==========================================

धोब्यामुळे सीतेवर अन्याय, प्रभू रामांविरोधात कोर्टात खटला


पाटणा : धोब्याच्या सांगण्यावरुन सीतेला सोडल्याचा आरोप करत प्रभू रामचंद्रांविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. बिहारमधल्या सीतामढी शहरातले वकील ठाकूर चंदन सिंह यांनी हा अजब खटला दाखल केला आहे.
प्रभू रामचंद्रानी एका तिऱ्हाईताच्या सांगण्यावरुन आपल्या पत्नीवर अत्याचार केल्याचा आरोप चंदन सिंह यांनी केला आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने हा खटला दाखल करुन घेतला असून आज सीतामढीमध्ये या खटल्यावर सुनावणी होणार आहे.
अशा प्रकारचे खटले हे सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.
का दाखल केला खटला?
कोणत्याही धर्माच्या भावना दुखावण्यासाठी नाही, तर सीतामाईला न्याय मिळवून देण्यासाठी आपण हा खटला दाखल केला असल्याचा दावा चंदन सिंह यांनी केला आहे. जोपर्यंत सीतामाईंना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत या देशात स्त्रियांवरचे अत्याचार थांबणार नाहीत, असा दावाही ते करतात.
त्यामुळे आज सीतामढीच्या कोर्टात आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या प्रभू रामचंद्रांवर कोर्ट काय सुनावणी करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
==================================================

छगन भुजबळांच्या मालमत्तेवर छापे, भुजबळ तुरुंगाच्या मार्गावर - सोमय्यांचा दावा


महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचलानलयाकडून पुन्हा छापे मारण्यात आले आहेत. 
छगन भुजबळ लवकरच तुम्हाला तुरुंगात दिसतील अशी प्रतिक्रिया भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी या छाप्यांवर दिली आहे. छगन भुजबळ तसेच पंकज व समीर भुजबळ यांच्या विविध ठिकाणच्या नऊ मालमत्तांवर छापे मारण्यात आल्याचे वृत्त आहे. 
सक्तवसुली संचालनालयाच्या वरीष्ठ अधिका-यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, एक डझनपेक्षा जास्त अधिका-यांची टीम छाप्यांमध्ये सहभागी आहे. तसेच भुजबळांच्या फक्त मुंबईतल्याच मालमत्तांवर छापे टाकण्यात आले आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत तपास संपवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भुजबळ यांच्या मालकीचा बांद्रे येथील एक मोकळा भूखंड व सांताक्रूझ येथील एक नऊ मजली इमारत या दोन्ही मालमत्तांवर टाच आणली होती. 
=================================================

खड्ड्यांमुळे गमावला मुलाने जीव, खड्डे बुजवून वडिलांची अनोखी श्रद्धांजली


रस्त्यावरील उघड्या पॉटहोलला धडकून बाईकच्या झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे दु:ख विसरता यावे आणि अशी परिस्थिती इतर कोणावरही येऊ नये यासाठी दादाराव बिल्होरे गेल्या महिन्याभरापासून रस्त्यावरील उघडी पॉटहोल्स माती-विटांनी भरत आहेत. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, मरोळचे रहिवासी असलेले बिल्होरे यांनी गेल्या महिन्याभरात एक डझन वा त्याहून अधिक पॉटहोल्स भरत आपल्या मुलाला श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न केला आहे.
मरोळमधील विजयनगर येथे भाजी विकण्याचा व्यवसाय करणारे बिल्होरे यांनी रात्रंदिवस मेहनत करून आपल्या मुलांना शिकवलं. १६ वर्षीय प्रकाश हा इंग्रजी मीडियममध्ये शिकणारा त्यांच्या कुटुंबातील पहिला सदस्य होता. मात्र गेल्या वर्षी २८ जुलै रोजी तो त्याचा चुलतभाऊ रामसह भांडूपच्या नवजीवन एज्युकेशन सोसायटीच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन परत येत होता. तेव्हा मुसळधार पावसामुळे जोगेश्वरी-विक्रोली लिंक रोडवर पाणी साचल्याने उघडा असलेला पॉटहोल न दिसल्याने त्यांच्या बाईकचा अपघात झाला आणि प्रकाशला जीव गमवावा लागला तर त्याचा भाऊ रामलाही डोक्याला गंभीर जखम झाली. 
मात्र या घटनेनंतर दादाराव यांचे अवघे आयुष्यच बदलले. प्रकाशला न्याय मिळावा आणि निष्काळजीपणे रस्ता खोदून, पॉटहोल्स उघडी टाकणा-यांना कठोर शिक्षा मिळावी यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून ते लढा देत आहेत. मात्र कायदेशीर लढा सुरू असतानाच इतर कोणत्याही निष्पाप नागरिकांना असा त्रास वा कोणाचाही वियोग सहन करावा लागू नये यासाठी ज्या रस्त्यावर उघडे पॉटहोल्स दिसतात, त्यावर दादाराव स्वत:च्या हातांनी दगड-विटा टाकून ते बुजवात. ' माझ्या मुलाबाबतीत जे झाले ते इतर कोणाबाबतीत व्हावे असे मला वाटत नाही, माझ्या मुलालाही तसं वाटलं नसतं. तो अतिशय हुशार, भरभूरन जगणारा आणि मनमिळावू मुलगा होता. त्याच्या मृत्यूला जबाबदार असणा-यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी तर मी लढा देईनच. पण जे मला आणि माझ्या कुटुंबाला सहन करावं लागलं, तशी वेळ इतरांवर येऊ नये असं मला वाटतं' असा भरल्या डोळ्यांनी दादाराव सांगतात.
स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून इतरांच्या भल्यासाठी हे काम करणा-या दादाराव यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांच्या परिसरातील इतर नागरिकांनाही त्यांना मदत करण्यास सुरूवात केली आहे. 
======================================================

12 वीच्या नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलैमध्ये


मुंबई: शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दहावीप्रमाणेच बारावीच्या विद्यार्थ्यांनाही आनंदाची बातमी दिली आहे. कारण बारावीच्या नापास विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यांचीही जुलै महिन्यातच परीक्षा घेण्यात येणार आहे.
यापूर्वी दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याकरिता नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै २०१५ मध्ये घेण्यात आली होती. त्याचपद्धतीने आता २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १२ वीची फेरपरीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबर ऐवजी जुलै-ऑगस्टमध्ये घेण्याचा निर्णय तावडेंनी घेतला आहे.
या निर्णयामुळे १२ वीच्या नियमित परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधी तातडीने मिळणार आहे.
गेल्या वर्षी १० वी परीक्षेमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ जुलै ते ५ ऑगस्ट, २०१५ या कालावधीत आयोजित करून त्याचा निकाल २५ ऑगस्ट, २०१५ रोजी जाहीर करण्यात आला होता. या फेरपरीक्षेमध्ये ५७,५१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे त्यांचं वर्ष वाया जाण्यापासून वाचलं होतं.
======================================================

भुजबळांच्या मालमत्तेवर पुन्हा छापेमारी


मुंबई: बेहिशेबी मालमत्ताप्रकरणात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या 9 मालमत्तांवर छापेमारी केली आहे. भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती दिली.
छगन भुजबळ यांच्यासह मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांच्याही मालमत्तांचा यामध्ये समावेश आहे.
त्यामुळे छगन, समीर आणि पंकज भुजबळ यांनी आता कुठल्या जेलमध्ये जायचं हे ठरवायला हवं, असा टोला सोमय्यांनी लगावला.
भुजबळ गटातीलच काही लोक आमच्यासेबत आले आहेत, ते एसीबी ला माहिती देत आहेत. भुजबळ कुटुंबियांच्या नावाने ६३ बोगस बँक अकाउंट उघडण्यात आले आहेत. छगन भुजबळांनी इंडोनेशियात कोळसा खाण विकत घेतल्याचं सांगितलं होतं. मात्र ही माहिती संपूर्ण खोटी असल्याचं समोर आल्याचा दावा सोमय्यांनी लगावला.
यापूर्वी महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी एसीबीनं गेल्या वर्षी जून महिन्यात छगन भुजबळ यांच्या तब्बल 16 मालमत्तावर छापे टाकले होते. मुंबई, मनमाड, येवला, पुणे यासारख्या 16 ठिकाणी एसीबीच्या 15 पथकांनी भुजबळांच्या संपत्तीची कसून तपासणी केली.
यानंतर काही दिवसांनीच मलबजावणी संचालनालय अर्थात ईडीनेही धाडी टाकल्या होत्या.
======================================================

लोकलमधून पडून डोंबिवलीच्या तरुणीचा मृत्यू


मुंबई: मुंबई लोकल आणि अपघात हे जणू सूत्रच बनत असल्याचं चित्र आहे. कारण अपघाताच्या अनेक घटना दररोज समोर येत आहेत.
लोकलमधून पडून आज सकाळी एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. धनश्री नंदकिशोर गोडवे असं मृत्यू झालेल्या 25 वर्षीय तरुणीचं नाव असून ती डोंबिवलीची राहणारी होती.
सकाळी जलद लोकलने प्रवास करताना डोंबिवली आणि कोपर या स्थानकादरम्यान पडून तिचा अपघात झाला. अपघातानंतर तिला शास्त्रीनगर हॉस्पीटलमधे दाखल केले असता त्यांना मृत घोषीत करण्यात आलं.
कालच धावत्या लोकलमध्ये चढण्याची घाई एका प्रवाशाच्या जीवावर बेतली होती. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये धावत चढण्याच्या नादात प्लॅटफॉर्मवरुन पडून एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर काही दिवसांपूर्वीच अतीगर्दीमुळे लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता.
======================================================

बुलढाणा; लहानशा मधमाशीने बुलडाण्याच्या शेतकऱ्याला लक्षाधीश बनवलं

बुलडाणा: असा कोणता शेतीपूरक व्यवसाय तुम्हाला माहित आहे, जो तुम्हाला लक्षाधीश बनवू शकतो? ज्याला ना कोणत्या भांडवलाची गरज, ना शेतजमिनीची. देशभर फिरायचं आणि लाखो रुपये कमवायचे. 
तो व्यवसाय आहे मधमाशी पालन.. 
लहानशा दिसणाऱ्या या माशीनं बुलडाण्याच्या राजेंद्र बैरागी या तरुण शेतकऱ्याच्या जीवनात गोडवा आणला आहे. त्याला लक्षाधीश बनवलं आहे. याच्या व्यावसायाची उलाढाल पोहोचलीय तब्बल 45 लाखांवर. 
राजेंद्रकडं वडिलोपार्जित 8 एकर शेती आहे. ज्यात तो शेवग्याचं पीक घ्यायचा. मात्र फुलगळीनं मोठं नुकसान व्हायचं. उत्पन्नही जेमतेमच येत होतं. यावर कृषी विभागानं एक गोड सल्ला दिला. मधमाशी पालनाचा. 
मधमाशी पालनासाठी राजेंद्रनं खादी ग्रामद्योगमधून प्रशिक्षण घेतलं. इंटरनेटवरून बाजारपेठांची माहिती घेतली. स्वत: च्या शेतापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज इतर राज्यातही पसरला आहे. 
राजेंद्र आता महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात फिरून मध गोळा करतो. पेट्या लावण्याआधी तो लागवड केलेली पीकं आणि भौगोलिक परिस्थितीचं बारकाईने निरिक्षण करतो. यामुळं मधाच्या गुणवत्तेत आणि उत्पादनात वाढ होत असल्याचं राजेंद्र सांगतो. 
मधमाशा पीकांवर बसल्यामुळे संबंधीत पीकही भरभरून येतं. 
मधमाशांच्या पेट्या लावल्याचा फायदा फक्त राजेंद्रलाच होतो असं नाही तर यामुळं पिकांचं उत्पादनही वाढत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना आला आहे. 
आयुर्वेदातील मधाचं महत्त्व पाहाता याला बाजारात मोठी मागणी आहे. यामुळं राजेंद्रला दरही चांगला मिळतो. 
राजेंद्रचा मधमाशा पालनाचा व्यवसाय 
*सध्या राजेंद्रकडं मधमाशांच्या 700 पेट्या आहेत.
*यापासून त्याला वर्षाकाठी 10 ते 15 टन मधाचं उत्पादन मिळतं
*त्याला बाजारात सरासरी 300 रुपये किलोचा दर मिळतो..
*म्हणजे यातून वर्षाकाठी 45 लाखांचं उत्पन्न.
*यातून वाहतूक, जागा सर्व्हेक्षण आणि इतर 50 टक्के उत्पादन खर्च वगळला तरी राजेंद्रला या व्यावसायातून 20 ते 25 लाखांचा निव्वळ नफा होतो.
राजेंद्रचा हा व्यवसाय देशभर आपली मुळं रोवतोय. मध उत्पादनात राज्याचा वाटा वाढवतोय. नापिकीनं हैराण झालेल्या विदर्भातील शेतकऱ्यांना राजेंद्रच्या या व्यवसायातून नवी उमेद मिळेल यात शंका नाही.
======================================================

एका मिनिटासाठी google.com चा मालक झालेल्या सन्मयला गुगलने दिले आठ लाखाचे बक्षीस

एका मिनिटासाठी गुगल डॉट कॉमचा मालका झालेल्या सन्मय वेदला गुगलने तब्बल आठ लाख रुपये दिले आहेत. सप्टेंबरमध्ये गुजरातमधल्या सन्मय वेद या तरूणाला गुगलची डोमेन बघता बघता असं आढळलं की google.com हे डोमेन विक्रीसाठी उपलब्ध आहे. गुगलचाच माजी कर्मचारी असलेल्या सन्मयने ते चक्क अवघ्या १२ डॉलर्सना खरेदी केलं. गुगलने हा खरेदी विक्रीचा व्यवहार रद्द करेपर्यंत त्याला गुगलच्या वेबमास्टर टूलचा ताबाही मिळाला. अखेर, सन्मयने ते डोमेन गुगलला सुमारे चार लाख रुपयांना परत केले. परंतु हा किस्सा इथं संपला नाही.
सन्मयने त्याला मिळालेले चार लाख रुपये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कामासाठी दान केले. आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था देशभरात सुमारे ४०४ मोफत शिक्षण देणा-या शाळा चालवते आणि जवळपास ३९,२०० मुलं तिथं शिकतात. सन्मयने या संस्थेला हे पैसे दिल्याचे कळताच, गुगलने स्वत:हून ही रक्कम दुप्पट करत सन्मयला आठ लाख रुपये दिले आहेत.
गुगलची सुरक्षा किती अभेद्य आहे हे बघण्यासाठी जगभरातल्या तंत्रज्ञांसाठी गुगल सेक्युरिटी रिवॉर्ड प्रोग्राम राबवते. यामध्ये सहभागी झालेल्या व गुगलच्या यंत्रणेतल्या त्रुटी दाखवलेल्या जवळपास ३०० तरुणांना गुगलने गेल्या वर्षी दोन दशलक्ष डॉलर्स दिले आहेत. २०१० मध्ये ही संकल्पना त्यांनी राबवण्यास सुरुवात केली आणि आत्तापर्यंत सहा दशलक्ष डॉलर्स बक्षीसापोटी दिले आहेत.
======================================================

जमशेदपूर; बलात्कार पीडितेवर रुग्णालयात पुन्हा बलात्कार



 बलात्काराच्या यातना सोसलेल्या अल्पवयीन पीडित तरुणीवर पुन्हा रुग्णालयात बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना जमशेदपूरमध्ये  घडली आहे. दोन दिवसांपूर्वी या तरुणीवर बलात्कार झाला होता. त्यानंतर तिला उपचारासाठी जमशेदपूरच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 
तिथे डयुटीवर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाने पुन्हा या तरुणीवर बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले असून, मुख्य आरोपी फरार झाला आहे. 
मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी खासगी सुरक्षा रक्षकाला पकडण्यासाठी तपास सुरु केला आहे. मुख्यमंत्री रघुबर दास यांनी एमजीएम रुग्णालयाची पाहणी करुन गेल्यानंतर काही तासांनी ही घटना घडली. 
======================================================

चर्चगेट लोकलमध्ये भरदिवसा छेडछाड 

चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या लोकलमध्ये आज भरदुपारी एका गर्दुल्ल्याने दोन महिलांची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून डब्यातील धाडसी प्रवाशांनी या गर्दुल्ल्याला चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे. 
आज दुपारी २.३० च्या सुमारास प्रथम श्रेणीच्या डब्यात हा प्रकार घडला. चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या लोकलमध्ये शिरलेल्या या गर्दुल्ल्याने दोन महिलांची छेड काढली. या गर्दुल्ल्याला प्रथम या महिलांनी प्रतिकार केलाच पण, नंतर अन्य प्रवाशांनीही या गर्दुल्ल्याची गचांडी पकडली व त्याला बेदम चोप दिला. दरम्यान, या प्रकारामुळे अंधेरी स्टेशनमध्ये काही मिनिटं गाडी थांबवण्यात आली. तेथे संतप्त प्रवाशांनी धक्के देतच या गर्दुल्ल्याला डब्यातून बाहेर काढले आणि रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. या आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची रेल्वे पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 
दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या घटनेने लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

======================================================
नागपट्टणम; तिरंगा जाळतानाचे फोटो 'त्यानं' FBवर टाकले

भारताचा तिरंगा जाळत असतानाचे आपले फोटो फेसबुकवर शेअर करून देशवासियांच्या भावना भडकवणाऱ्या चेन्नईतील तरुणाला शोधण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. दिलीपन महेंद्रन असं त्यांचं नाव असून त्याच्या देशद्रोही कृत्याचा सर्वच स्तरातून निषेध होतोय. 
नागपट्टणम इथे राहणारा २५ वर्षीय दिलीपन स्वतःला 'पेरियरिस्ट' (प्रख्यात तामिळ सामाजिक प्रवर्तक पेरियर यांची तत्व मानणारे) म्हणवतो. तामिळनाडूतील एसव्हीएस योगा मेडिकल कॉलेजमधील तीन विद्यार्थ्यांची आत्महत्या आणि रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनांमध्ये तो सहभागी झाला होता. दलित आणि मागासवर्गीयांवरील अत्याचाराच्या घटनांवरून त्यानं आपल्या फेसबुक पेजवरून सरकारवर टीकेची झोडही उठवली होती. पण, शुक्रवारी त्यानं जो प्रताप केला, तो कुठल्याही देशप्रेमी नागरिकाच्या संतापाचा उद्रेक होईल असाच होता.
देशाचा तिरंगा फाडून आपण तो हसत-हसत जाळल्याचे फोटो दिलीपनने पोस्ट केले. सोशल मीडियावर ते वाऱ्याच्या वेगानं पसरले आणि त्याच्यावर अक्षरशः शिव्यांचा भडिमारच झाला. अर्थात, दिलीपनच्या कृत्याचं समर्थनही काहींनी केलं. स्वतःला देशप्रेमी म्हणवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग दिनी झेंड्याचा अपमान केला, त्याचं काय?, असा सवाल या समर्थकांनी केला. पण, देशप्रेमींनी आणि मोदींच्या चाहत्यांनी त्यांचाही समाचार घेतला. 
दरम्यान, खासगी विमान कंपनीतील पायलट सी. आर. नवीनकुमार यांच्यासह दोघांनी दिलीपन महेंद्रनविरुद्ध चेन्नई शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतलीय. तसंच, हे फोटो आता फेसबुकवरून काढून टाकण्यात आलेत. 
======================================================
काबूलमध्ये पोलिस आवारात शक्तिशाली स्फोट

काबूल- मध्य शहरातील पोलिस कार्यालयाच्या आवारात आज (सोमवार) शक्तिशाली आत्मघाती स्फोट घडवून आणण्यात आला आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पोलिस कार्यालयाच्या आवारात एका मोटारीने प्रवेश केला. काही वेळातच या मोटारीमधून शक्तिशाली आत्मघाती स्फोट घडवून आणण्यात आला. परिसरात मोठे धुराचे लोट पसरले आहेत. या घटनेमध्ये कोणी जखमी अथवा मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. परंतु, परिसरामध्ये 10 मृतदेह विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. अद्याप कोणत्याही संघटनेने स्फोटाची जबाबदारी घेतली नसली तरी तालिबानी दहशतवादी संघटनेने स्फोट घडवून आणल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
======================================================
स्मार्टफोनमुळे करंगळीत वाकडेपणा

आजच्या तरुणाईसाठी स्मार्टफोन अत्यावश्‍यक बनला आहे, मात्र त्याच्या अतिवापराचे दुष्परिणामही दिसू लागले आहेत. स्मार्टफोनच्या अतिवापराचा एक दुष्परिणाम आता समोर आला असून, तुम्हीही असे करत असल्यास तुमच्या करंगळीकडे निरखून पाहा! सतत स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या करंगळीमध्ये वाकडेपणा येऊ शकतो. 

सिडनी मॉर्निंग हेरल्डच्या म्हणण्यानुसार, दिवसातून कमीत कमी सहा तास स्मार्टफोन वापरणाऱ्या युजर्सच्या करंगळीमध्ये थोडासा बाक येऊ शकतो. करंगळीच्या या वाकडेपणाला "स्मार्टफोन पिंकी‘ असे नाव देण्यात आले आहे. तासन्‌तास स्मार्टफोन वापरल्यामुळे करंगळीतील नाजूक पेशींवर दाब पडतो व त्यामुळे हा वाकडेपणा येऊ शकतो. स्मार्टफोनच्या बाजारात नव्या आलेल्या मॉडेल्सचे वजन जास्त असून, त्यांचा आकारही वाढत चालला आहे. त्यामुळे करंगळीवर अतिरिक्त भार पडत आहे. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे अंगठ्याची अधिक हालचाल होत असल्यामुळे अंगठ्याचेही नुकसान होत आहे. त्यातच, आता करंगळी वाकडी होण्याच्या या प्रकारामुळे युजर्सनी सावध होण्याची गरज आहे. युजर्सनी स्मार्टफोनचा सलग वापर न करण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे. कॅंडी क्रश खेळण्यापासून व्हॉटस ऍप वापरण्याच्या नावाखाली स्मार्टफोनच्या आहारी जाणाऱ्यांनी हा सल्ला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. 
======================================================
नरेंद्र मोदी मुस्लिम विरोधी- परवेझ मुशर्रफ

इस्लामाबाद- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुस्लिम विरोधी असून पाकिस्तानला ते फसवत आहेत, असे पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी म्हटले आहे. 
एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुशर्रफ म्हणाले, ‘मोदी हे पाकिस्तान व मुस्लिम विरोधी नेते आहेत. त्यांचा पाकिस्तान दौरा ठीक आहे. परंतु, यामधून काही साध्य होणार नाही. पाकिस्तानला ते फसवतच आहेत.‘
======================================================
रेल्वे रुळावर सेल्फी काढणाऱ्या तरुणाचा मृत्यू

चेन्नई - सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात जीव गमाविल्याच्या अनेक घटना ताज्या असतानाच, चेन्नईमध्ये एका 17 वर्षीय तरुणाचा रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेसमोर सेल्फी काढण्याचा प्रयत्न त्याच्या जीवावर बेतला. 
रविवारी सायंकाळी चेन्नईत ही घटना घडली. पुनामल्ली अरींग्नार अण्णा शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात शिकत असलेला देना सुकुमार हा सतरा वर्षीय तरुण रेल्वे रुळावर उभारुन धावत्या रेल्वेसमोर सेल्फी काढत होता. त्यावेळी तो मित्रांबरोबर सेल्फीचा अँगल ठरवत असताना त्याच रेल्वेने त्याला उडविले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
सेल्फीमुळे नुकतेच मुंबईतील किनाऱ्यावर दोन तरुणींचा मृत्यू झाला होता. तर, मध्य प्रदेशात नर्मदा नदीत दोघे जण बुडाले होते. यामुळे मुंबईतील सोळा समुद्र किनाऱ्यांवर नो सेल्फी झोन बनविण्यात आला आहे. जगभरात गेल्यावर्षी 27 जणांचा सेल्फी काढताना मृत्यू झाला आहे. यामध्ये अर्धे भा
======================================================
वसमत; कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे विनोद झंवर हे १४४ मतांनी विजयी तर अपक्ष लक्ष्मीनारायण मुरक्या हे १४६ मतांनी विजयी 





नमस्कार लाईव्ह ०१-०२-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- 'माझ्यासोबतही त्यानं गैरवर्तन केलेलं', योगगुरु बिक्रम चौधरीवर महिलेचा आरोप 
२- संयुक्त राष्ट्रांतील राजदूत पाक-अमेरिकेतील मध्यस्थ 
३- नायजेरीयात बोको हरामच्या अतिरेक्यांनी लहान मुलांना जिवंत जाळले, ८६ ठार 
४- सिरियाची राजधानी दमास्कसजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात ४५ जण ठार, तर ११० जण जखमी 
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- आंध्रप्रदेशात आरक्षणाची धग, रत्नांचल एक्स्प्रेसच्या 5 बोगी पेटवल्या 
६- देवनारमध्ये कचरा घोटाळ्यामुळंच आग, सोमय्यांचा घणाघाती आरोप 
७- रोहित दहशतवाद्यांचा समर्थक, भाजप नेते विजयवर्गीयांचं वादग्रस्त वक्तव्य 
८- पुरस्कार परत करण्याऐवजी कलाकृतीतून विरोध नोंदवावा - जब्बार पटेल 
९- थकीत वेतन न मिळाल्याबद्दल एमसीडी कर्मचा-यांची दिल्लीचे पर्यटन मंत्री कपिल मिश्रा यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन.
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- श्रद्धेने मंदिरात जावं, हट्टापायी नको- पंकजा मुंडे 
११- राणीच्या रत्नहाराला सुवर्णझळाळी, पुन्हा पिवळे एलईडी बसवले 
१२- मुंबई; पुरणपोळी-वडापावला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध करणार 
१३- डोक्यात धुण्याची बॅट घालून आईची हत्या, दादरमधील धक्कादायक प्रकार 
१४- बुलडाणा: काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदांना अटक 
१५- अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर शनिशिंगणापूरला जाणार. 
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- चंद्रपूर; शिवसेना आमदाराची तलाठ्याला जीवे मारण्याची धमकी 
१७- पत्नी, मुलींची हत्या करुन इसमाचीही आत्महत्या, कल्याणमधील खळबळजनक घटना 
१८- लातूरजवळच्या अनसरवाडामध्ये डोंबार्‍यांना झरे गुरुजींनी दिली नवी ओळख 
१९- रत्नागिरीच्या धामापूर गावात पहिलीत शिकणा-या मुलीची शेजा-याने केली हत्या. 
२०- पंढरपूर - टेंभुर्णी भीमानगर परिसरात वाळू माफियांवर कारवाई, १३ ट्रक ताब्यात  
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२१- मग्रारोहयो भ्रष्टाचार प्रकरणी मुखेड कॉंग्रेस तालुकाध्यक्ष स्थागुशाच्या जाळ्यात 
२२- नांदेड प्रेस फोरमचे या वर्षीचे पुरस्कार जाहीर 
२३- मागासवर्ग महिला, कर्मचारी व विद्यार्थ्याचा मोर्चा; रोहितवर अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी 
२४- शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सर्वांचे प्रामाणिक प्रयत्न आवश्यक - खा. चव्हाण 
२५- हिमायतनगर; अशोक चक्राऐवजी तिरंग्यात 'स्टार'; तणावाचे वातावरण 
२६- लोहा; उमरा गावालगत कडब्याच्या गंजीस आग; दोन गोठ्यासह घरातील संसारोपयोगी साहित्य खाक 
२७- गाडीपुरा खूनप्रकरणी दोषींवर आज सुनावणी 
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
व्यंकट पवळे, ज्ञामेश्वर चापके, सौरभ वाहने, बालाजी बोखारे, शिवाजी पावडे, दिनकर दगजानन छोटे, देसाई, महेंद्र वाठोरे, हरीश चौधरी, सतीश डाखोरे, राज दाभाडे, रवी रामेश्वर, सोनाबा शिंदे, सुनील धोबे 
~~~~~~~~~~~~~~~
स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते,पण....
एखाद्याच्या मनात घर करणे,यापेक्षा सुंदर काहीच नसते...यापेक्षा सुंदर काहीच नसते
(प्राची पवार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
घरांची आर्टिफिशिअल सजावट 
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
http://goo.gl/uS8DX4

=======================================================

चंद्रपूर; शिवसेना आमदाराची तलाठ्याला जीवे मारण्याची धमकी


चंद्रपूर : शिवसेनेचे आमदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्याविरोधात तलाठ्याला जीवे मारण्याची धमकी आणि अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. धानोरकर हे चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा मतदार संघातील आमदार आहेत.
वाळू तस्करांवर कारवाई केल्याच्या रागातून धानोरकर यांनी एकनाथ गाडेकर या तलाठ्याला घरी बोलावून जीवे मारण्याची धमकी दिली आणि अश्लील शिवीगाळही केली. गाडेकर यांनी हे संपूर्ण संभाषण मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं आहे.
वरोरा तालुक्यातील चारगाव परिसरात असलेल्या वाळू वाहतुकीवर या तलाठ्याने गुरुवारी संध्याकाळी जप्तीची कारवाई केली होती. त्यानंतर हे वाळू तस्कर थेट आमदार बाळू धानोरकर यांच्या दरबारात पोहचले आणि त्यांनी तलाठी गाडेकर यांची तक्रार केली.
आपल्या मर्जीतील वाळू तस्करावर कारवाई केल्याच्या रागातून आमदारांनी ही धमकी दिल्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. या प्रकरणात आमदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या विरोधात वरोरा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या संभाषणात केंद्रीय मंत्री हंसराज अहीर आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही शिवीगाळ करत असल्याचं रेकॉर्ड झालं आहे. त्यामुळे शिवसेना आता काय कारवाई करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
=======================================================

पत्नी, मुलींची हत्या करुन इसमाचीही आत्महत्या, कल्याणमधील खळबळजनक घटना

कल्याण: कल्याणजवळील म्हारळ गावामध्ये पोटच्या दोन मुली आणि पत्नीची हत्या करून एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून हे संपूर्ण कुटुंब गायब होत. मात्र, घरातून घाण वास येत असल्यामुळे शेजाऱ्यांनी घर तोडून आत प्रवेश केला असता हे घटना उघड झाली.
म्हारळ गावातील मोहन टॉवर इमारतीत रणजित यशवंतराव (45 वर्ष) हे पत्नी स्वाती (38 वर्ष) आणि दोन मुली श्रद्धा (14 वर्ष), आर्या (7 वर्ष) यांच्यासह राहत होते. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कामाला असणारे रणजित 5 दिवसांपूर्वी शेजारी आणि नातेवाईक यांना शेगावला जात आहोत असं सांगितलं होतं. मात्र 4 ते 5 दिवस त्यांचा मोबाइलही बंद होता. त्याच दरम्यान, इमारतीतील रहिवाशांना त्यांच्या घरातून कुजल्यासारखा वास येऊ लागला. अखेर पाच दिवसांनंतर शेजाऱ्यांनी खिडकी तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी ही घटना समोर आली.
दोन लहान मुलींसह रणजित आणि त्यांची पत्नी स्वाती या चोघांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. पत्नी स्वाती, चौदा वर्षीय श्रद्धा आणि सात वर्षीय आर्या यांचे मृतदेह वेगवेगळ्या रुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. तर रणजितचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला.
 कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट न मिळाल्यानं या प्रकरणातील गूढ अद्यापही कायम आहे. मात्र, पोलिसांच्या मते, रणजित गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता त्यामुळेच त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं असू शकतं.
=======================================================

मुंबई; पुरणपोळी-वडापावला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध करणार


मुंबई : मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचं फास्टफूड मानला जाणारा वडापाव आणि महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीतील गोडाधोडाच्या पदार्थांची राणी म्हणावी अशी पुरणपोळी आता जगभरात ओळख मिळवणार आहे. लहान-मोठ्या हॉटेल व्यावसायिकांशी हातमिळवणी करुन पुरणपोळी आणि वडापावला आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
महाराष्ट्रातल्या लहानमोठे व्यावसायिक आणि केटरर्ससोबत टाय-अप करुन पुरणपोळी आणि वडापावला जागतिक पातळीवर ओळख मिळवून देण्याचा मानस आहे, अशी माहिती पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग सचिव वल्सा नायर सिंग यांनी दिली.
वडापाव कसा खाद्यप्रेमींचा लाडका झाला?
दिवसभर घडाळ्याच्या काट्यांवर धावणाऱ्या मुंबईकरांना वडापावच्या रुपाने गेल्या काही वर्षांत एक नवा पर्याय उपलब्ध झाला. राज्यात प्रसिद्ध असलेले बटाटेवडे पावात जाऊन बसले आणि त्यांच्या एकत्रित चवीची चटक अनेकांना लागली. एका हातात धरुन खाता येणाऱ्या फ्रँकी, सँडविच सारख्या विदेशी पदार्थांच्या तुलनेत वडापाव या महाराष्ट्रीय पदार्थांने बाजी मारली. फक्त मुंबईकरच नव्हे तर दिल्लीसारख्या अनेक मेट्रोसिटीजमध्ये हा पदार्थ खवय्यांच्या पसंतीस उतरला आहे.
=======================================================

आंध्रप्रदेशात आरक्षणाची धग, रत्नांचल एक्स्प्रेसच्या 5 बोगी पेटवल्या


विजयवाडा: आंध्रप्रदेशमध्ये आरक्षणाचा प्रश्नावर कापू समाजाचं आंदोलनानं आज हिंसक वळण घेतलं. आंदोलनकर्त्यांनी पूर्व गोदावरी जिल्ह्यातील तुनी रेल्वे स्टेशनवर रत्नांचल एक्सप्रेसच्या चार डब्ब्यांना आग लावली. ज्यामुळं विजयवाडा आणि विशाखापट्ट्णम मार्गावरील ट्रेनच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला आहे. या हिंसेत 15 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
आंध्रप्रदेशमधील या आंदोलनानं चांगलचंत हिंसक वळण घेतलं. आंदोलनकर्त्यांनी ट्रेनला आग लावण्याआधी त्यातील प्रवाशांना खाली उतरविण्यात आलं होतं. ज्यामुळे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुसरीकडे आंदोलनकर्त्यांमुळं महामार्ग 16 वरीलही वाहतूक विस्कळीत झाली.
 आरक्षणासाठी कापू समाजानं जोरदार आंदोलन पुकारलं. मात्र, या आंदोलनानं हिंसक वळण घेतल्यानं गालबोट लागलं आहे. आंदोलनकर्त्यांनी ट्रेनच्या इंजिनावरही आणि पोलिसांवरही दगडफेक केली. तसेच रेल्वे स्टेशनचीही तोडफोड केली. या सगळ्या प्रकारामुळं सात ट्रेन रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या एका प्रवक्त्यानं दिली आहे.
या घटनेनंतर आरक्षणाबाबत बोलताना मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू म्हणाले की, ‘आम्ही कापू समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहोत. त्यासाठी एक आयोगही गठीत करण्यात आला आहे.’
=======================================================

राणीच्या रत्नहाराला सुवर्णझळाळी, पुन्हा पिवळे एलईडी बसवले



मुंबई : हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबईतील राणीचा रत्नहार म्हणजेच मरिन ड्राईव्हला पुन्हा त्याची सोनेरी झळाळी प्राप्त झाली आहे. 4.3 किलोमीटर भागातील मरिन ड्राईव्हचे पांढरे एलईडी दिवे पालिकेने बदलून पुन्हा पिवळे केले आहेत.
दक्षिण मुंबईची ओळख असलेल्या क्वीन्स नेकलेसच्या दर्शनी भागाचे दिवे बदलण्यात आले आहेत. पण मरिन लाईन्स स्टेशनपासून बाबूलनाथ मंदिरापर्यंतच्या दिव्यांचं काम अद्याप बाकी आहे.
विजेची बचत करण्यासाठी एलईडी दिवे बसवल्यानं मरिन ड्राईव्हचं सौंदर्य हरपल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्याच याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत मरिन ड्राईव्हवरचे दिवे बदलण्याचे आदेश दिले होते. 
या आदेशानुसार काही दिवे बदलण्याचं काम बाकी आहे. त्यामुळे उर्वरित काम लवकर पूर्ण झालं नाही, तर या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वादाचे दिवे लागण्याची शक्यता आहे.
=======================================================

'माझ्यासोबतही त्यानं गैरवर्तन केलेलं', योगगुरु बिक्रम चौधरीवर महिलेचा आरोप


मुंबई: भारतीय वंशाचा अमेरिकी योग गुरू बिक्रम चौधरीला लॉस एंजलिसच्या न्यायालयानं महिला वकिलाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी ९.२४ लाख डॉलर्सची नुकसानभरपाई ठोठावली. मात्र, चौधरीच्या संदर्भात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
मुंबईतल्या मनदीप कौर संधु या महिलेनं 2009मध्ये बिक्रम चौधरीनं गैरवर्तन केल्याचं म्हटलं आहे. 2009मध्ये अमेरिकेत योगाचे धडे घेण्यासाठी गेले असता हा संपूर्ण प्रकार घडल्याचं संधु यांचं म्हणणं आहे. तसंच इतर महिलांसोबतही बिक्रम चौधरी गैरवर्तन करत होता, असंही संधु यांचं म्हणण आहे. त्यामुळं बिक्रम चौधरीला योग्य शिक्षा मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
बिक्रम चौधरी हा एका खास योगासाठी प्रसिद्ध आहे. 40 डिग्री तापमानात योगाचे धडे देतो. त्यामुळं याला हॉट योगा म्हणतात. अमेरिकेसह जगभरात त्याच्या या खास अंदाजातील योगा ब्रिकम योगा नावाने प्रसिद्ध आहे.
69 वर्षीय बिक्रम चौधरीवर याआधीही 6 महिलांनी बलात्कार आणि गैरवर्तन केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तर बिक्रमची पत्नी राजश्री चौधरी हिने देखील मागील वर्षीच बिक्रमला घटस्फोटाची नोटीस धाडली आहे.
=======================================================

डोक्यात धुण्याची बॅट घालून आईची हत्या, दादरमधील धक्कादायक प्रकार


मुंबई: मुंबईतल्या दादर परिसरात एका 40 वर्षीय मानसिक रुग्णानं कपडे धुण्याच्या बॅटनं त्याच्याच आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तेजस संघवी असं या व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
गेल्या वर्ष भरापासून नोकरी गमावून बसल्यानं तेजस मानसिक दृष्ट्या खचला होता आहे. काल काही कारणावरुन त्याचं त्याच्या आईशी किरकोळ भांडण झालं. त्यातच संतापलेल्या तेजसनं कपडे धुण्याची बॅटने त्याच्या आईच्या डोक्यात मारली. यात त्या गंभीर जखमी झाल्या, उपचारादरम्यान रेखा संघवी यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी तात्काळ तेजसला अटक केली असून, त्याच्या आईचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला आहे. आज तेजसला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
=======================================================

बुलडाणा: काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदांना अटक

बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगावचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांना काल रात्री अटक करण्यात आली. त्यांच्या राहत्या घरातून त्यांना अटक केल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
नगरपालिकेच्या एका भ्रष्टाचार प्रकरणात त्यांना अटक करण्यात आल्याचं समजतं आहे. सानंदा यांना अटक केल्याचं समजताच त्यांच्या समर्थकांनी पोलिस स्टेशनच्या परिसरात गर्दी केली.
सानंदा हे काँग्रेसकडून गेली पंधरा वर्ष आमदार राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी बरीच गर्दी केली होती. त्यामुळे गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवला आहे.
=======================================================

देवनारमध्ये कचरा घोटाळ्यामुळंच आग, सोमय्यांचा घणाघाती आरोप


मुंबई : मुंबईच्या देवनारमध्ये काल लागलेल्या आगीमुळे आता शिवसेना-भाजपचं राजकारण तापलं आहे. देवनार डम्पिंगला लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर कचरा घोटाळा समोर आल्याचं भाजप खासदार किरीट सोमय्यांनी म्हंटलं आहे.
डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीला थेट पालिका प्रशासनाला जबाबदार धरत सोमय्यांनी शिवसेनेवर टीका केली.
कचऱा घोटाळ्यात पालिकेचे संबंधित अधिकारी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच कचरा घोटाळ्याची चौकशी करुन पालिका अधिकारी आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
=======================================================

रोहित दहशतवाद्यांचा समर्थक, भाजप नेते विजयवर्गीयांचं वादग्रस्त वक्तव्य


नवी दिल्ली : रोहित वेमुलाच्या आत्महत्येवर भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
ज्या तरुणानं दहशतवाद्याचं समर्थन आणि बीफ पार्टी करण्याची भाषा करणारा आत्महत्या करुन शकत नसल्याचं विजयवर्गीय यांनी म्हटलं आहे. त्यामुळे रोहितच्या आत्महत्येची चौकशी करण्याचीही मागणी विजयवर्गीय यांनी केली आहे. विजयवर्गीय यांच्या वक्तव्यानं पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
17 जानेवारी रोजी रोहित वेमुलालानं हैदराबाद विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर 22 जानेवारी रोजी मोदींनी रोहितच्या आत्महत्येवर बोलताना भावूक झाले होते.
मात्र आता भाजपच्याच महासचिवांनी केलेल्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

=======================================================
श्रद्धेने मंदिरात जावं, हट्टापायी नको- पंकजा मुंडे


महिलांनी श्रद्धेने मंदिरात जावं, हक्काने नाही. शनिशिंगणापूर इथल्या मंदिरात हट्टाने जाणार्‍या महिलांनी समाजातील शांतता भंग करू नये, असं वादग्रस्त वक्तव्य महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केलं.
शनीदर्शनाचा हक्क मिळावा यासाठी 26 जानेवारीला भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी मैदान गाजवलं. त्यांना काही शनीदेवाचं दर्शन घेता आलं नाही. मात्र या प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटले. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर विश्वस्तांनी सारवासारव केली. त्यामुळे आता विश्वस्तांकडून लवकरच भूमाता ब्रिगेडला चर्चेचं निमंत्रण दिलं जाणार आहे. तर दुसरीकडे शिंगणापूरच्या शनिचौथर्‍यावर जाण्यावरून उद्भवलेल्या वादाबाबत पंकजा मुंडे यांना विचारले असता “मंदिरात दर्शन घेणं हा श्रद्धेचा भाग आहे. मंदिरात हट्टाने प्रवेश मिळवताना महिलांनी सामाजिक शांतता भंग करू नये. आतापर्यंत जातीभेदाची लढाई लढलो आता ही स्त्री-पुरुष भेदाची लढाई कशासाठी?”, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

=======================================================
लातूरजवळच्या अनसरवाडामध्ये डोंबार्‍यांना झरे गुरुजींनी दिली नवी ओळख

महाराष्ट्रात अनेक समाज अजूनही वेशीबाहेर जगत आहेत. “जेवण शिजवून खायचं असतं का?”,असा प्रश्न तुम्हाला कोणी केला तर तुम्ही आवाक झाल्याशिवाय राहणार नाही! मात्र महाराष्ट्रात अशा अनेक जाती आहेत, ज्यांना अजूनही स्व:ताच जेवणही बनविण्याची सवय झाली नाहीय! घर, शाळा, अंघोळ, विज, आरोग्य या सुविधापासून हे आजही वंचित आहेत. गेल्या अनेक पिढ्यापासून हे सर्व आपल्या समाजाचा भाग असले तरी त्यांना अजून लोकशाहीत ओळखच मिळालेली नाहीये! पण हे ही दिवसही बदलतायत आणि असा बदल घडवणारी माणसंही कुठल्याही पुरस्काराची अपेक्षा न ठेवता आपली वाटचाल चालुच ठेवतायत.
लातूरपासून मैलाच्या अंतरावर असलेला अनसरवाडा…डोंबार्‍याची वस्ती…अंग मेहनतीचे खेळ दाखवून… भिक्षा मागून हा समाज पोटाची खळगी भरतो. बरोबरीने कमालीची अंधश्रद्धा, जात पंचायतीचा पगडा. घर, आरोग्य, शिक्षणापासून हा समाज आजही खुप दुर आहे. मात्र एका शिक्षकाने ही परिस्थिती बदलली आहे.
डोंबार्‍यांच्या या वस्तीला झरे गुरुजींनी “गोपाळखेळकरी” अशी ओळख मिळवून दिली. स्व:ताचं नाव आणि गाव नसलेल्या या समाजाला झरे गुरुजींनी नवी ओळख द्यायच ठरवलं. सुरुवातीला काही मोजक्या लोकांच प्रबोधन केलं. त्यांना खर्‍या अर्थाने जीवन जगायला शिकवल. स्वयंपाक, अंघोळ, शेतीकामापासून नमस्कार-रामरामही शिकवला.
फक्त जगण्यासाठीचे शिक्षण नाही तर लिहायला वाचयला येण्यासाठी मराठीच शिक्षण देणं हे गरजेचं होतं. या वस्तीचा आता कायापालट झालीये. मागून खाणारे हात आत तांदूळ शिजवतात… मणी ओवण्यापासून सुरू झालेलं काम आता पायपूसण्या तयार करण्यापर्यंत आलंय.
वस्तीतल्या मुलांना गुरुंजीनी बँडच प्रशिक्षण दिलं. आज या वस्तीत जिल्हाभर प्रसिद्ध असलेली नऊ बँड पथकं आहेत. वर्षाकाठी अडीच लाखाची कमाई होते. एवढच नाही तर दारू, गांजा ही व्यसनं हा आता इतिहास आहे. नव्याने स्थायिक कुंटुबांना गुरुंजीच्या आचारसंहितेतून जावं लागतंय.
महिला बरोबरच मुलंही आता स्वच्छतेचे धडे गिरवायला लागलीयेत. गावकरी आणि झरे गुरुजींच्या प्रयत्नातून इथं जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळाही सुरू झालीय.
भटक्या समाजाला एकत्रित आणून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झरे गुरुजींच्या कार्याला गावकरीही साथ देत आहेत. आता या समाजाला खर्‍या अर्थानं राष्ट्रीयत्व मिळालंय. या गावकर्‍यांना आणि झरे गुरुजीच्या प्रयत्नाला सलाम.
=======================================================
पुरस्कार परत करण्याऐवजी कलाकृतीतून विरोध नोंदवावा 
संवेदनशीलता ही कलावंताची खरी ओळख आहे. त्यामुळे एखाद्या घटनेचा विरोध करतांना हिंसक पध्दतीने आंदोलन करण्याऐवजी सर्वच कलावंतांना एखाद्या घटनेचा त्रास होत असेल, तर थेट पुरस्कार वापसी किंवा टोकाची भूमिका घेण्याऐवजी नाटक, चित्रपट, कविता अथवा चित्र, अशी कलाकृती निर्माण करून विरोध करायला हवा, असे स्पष्ट मत ज्येष्ठ नाटय़ व चित्रपट दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल यांनी व्यक्त केले. खरा कलावंत हा पुण्या-मुंबईत नव्हे, तर ग्रामीण भागातच जन्माला येतो, असेही ते म्हणाले. ६५ व्या विदर्भ साहित्य संमेलनात अजय गंपावार यांनी डॉ. जब्बार पटेल यांची मुलाखत घेतांना त्यांना विविध विषयांवर बोलते केले. ते म्हणाले, पंढरपूर येथे जन्म, सोलापुरात प्राथमिक शिक्षण आणि पुण्यात वैद्यकीय शिक्षणासह नाटय़ आणि चित्रपटक्षेत्रातील प्रवास, हे सारेच एखाद्या अपघातासारखे होते. कलावंत अपघातानेच घडतो आणि आपणही बालपणी झालेल्या एका सुखद अपघातानेच या क्षेत्राकडे वळलो. वडील रेल्वेत होते. सतत बदली. त्यामुळे आत्या आणि काकांकडे राहायचो. याच वेळी प्राथमिक शिक्षणासाठी वडीलांनी ऊर्दू शाळेत टाकले. मात्र, माझे मराठी भाषेवरील प्रेम आणि सर्व सवंगडी मराठी असल्याचे वडीलांना उमजल्यावर त्यांनीच पालिकेच्या मराठी शाळेत पाठविले. याच वेळी चाळीत वास्तव्याला असतांना कवी राणा यांच्या संपर्कात आलो. त्यांच्यामुळे अवघ्या ८ व्या वर्षी चेहऱ्यावर मेकअप लावून आचार्य अत्रे यांच्या नाटकात काम केले. या संधीचे सोने करून रंगमंचावर पहिला डॉयलॉग बोलताच रसिकांच्या टाळ्यांच्या कडकडाटांनी स्वागत झाले. आजही तो आवाज शरीरात घुमतो. त्याच क्षणी कलावंत होण्याचा निर्णय घेतला. पुढे वडीलांची पुन्हा इतरत्र बदली झाली. यावेळी मात्र त्यांनी श्रीराम पुजारी या माझ्या शिक्षकाकडेच शिक्षणासाठी ठेवले. त्यांच्याच घरी वास्तव्याला असतांना पं.भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, मंगेश पाडगावकर, कवी अनिल, मर्ढेकर, बोरकर यांच्यासारख्यांचा सहवास लाभल्याने घडत गेलो. वैद्यक शिक्षणासाठी पुण्यात आलो. पीडीएशी जोडला गेलो आणि स्नेहसंमेलनात ‘प्रेमा तुझा रंग कसा’ सादर करतांना परीक्षकांकडून हा मुलगा अतिशय सुंदर काम करतोय, अशी दाद मिळाली. त्यानंतर विजय तेंडूलकरांचे ‘श्रीमंत’सारखे बंडखोर नाटक स्नेहसंमेलनात सादर केले. नाटकांचे धडे डॉ. श्रीराम लागू यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाले. विजय तेंडूलकरांसोबत सर्वाधिक कामे केली. त्यांचे ‘अशी पाखरे येती’ राज्य नाटय़ स्पध्रेत सर्वप्रथम आले आणि सर्व बक्षीसेही मिळाली. त्यामुळेच पुढे विजय तेंडूलकर यांचे ‘घाशीराम कोतवाल’ मिळाले. या नाटकाची ९ पाने लिहिलेली असतांनाच त्यांनी वाचायला दिली. पुढे तीन महिन्यात त्यांनी ते पूर्ण केले आणि भास्कर चंदावरकर, मोहन आगाशे यांच्यासह ते नाटक बसवले. पेशवाईच्या शेवटच्या काळावरील हे नाटक ढासळलेली राज्यव्यवस्था कशी रसातळाला येते, राज्य व्यवस्था एका व्यक्तीला मोठे करते आणि एका क्षणात त्याला जमीनदोस्तही करते, हे यात होते. १९७२ मध्ये ते आले आणि त्यानंतर १९७७ मध्ये इंदिरा गांधींची आणीबाणी आली. त्या काळी बंडखोर नाटक म्हणून ते बरेच वादग्रस्त ठरले. मात्र, या नाटकाला पुणेकरांनी उचलून धरले, तर मुंबईत तीव्र विरोध झाला. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड, जपानमध्येही त्याचे प्रयोग झाले. त्यासाठी डॉ. मोहन आगाशे यांनी सर्वार्थाने यशस्वी प्रयत्न केले. या नाटकाचे संपूर्ण श्रेय तेंडूलकर व डॉ. आगाशे यांचच, असेही त्यांनी नम्रपणे कबूल केले. या नाटकासाठी विदेशात जातांना तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी कशी विमानातून आम्हाला थेट सहारा एअरपोर्ट व तेथे विदेशात पाठविले, याचाही किस्सा त्यांनी सांगितला. त्यामुळे या नाटकाचे विरोधक खिंडीत सापडले आणि आम्ही हवेतून विदेशात पोहोचलेलो होते. ‘घाशीराम’मुळेच सर्व काही मिळाल्याची प्रांजळ कबुली त्यांनी दिली. याच वेळी रामदास फुटाणे यांनी ‘सामना’ची घोषणा करून दिग्दर्शक म्हणून संधी दिली. त्यासाठीही तेंडूलकरांचीच पटकथा होती. यातील ‘सख्या रे घायाळ मी हरणीह्ण हे गीत लता मंगेशकर यांनी गायले आणि यासाठी एक पैसाही मानधन घेतले नाही. ‘सामना’ची बर्लिन चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली होती. यापूर्वी या महोत्सवात केवळ भारताचे दारिद्रय़ दाखविणारे चित्रपट गेले होते. मात्र, दारिद्रय़ कशामुळे, हे दाखविणारा ‘सामना’ हा एकमेव चित्रपट होता, अशी कौतूकाची थाप बर्लिनवासियांकडून मिळाली. पुढे ‘सिंहासन’ आला. त्याचीही पटकथा तेंडूलकरांचीच. त्यानंतर लता मंगेशकर यांचा ‘जैत रे जैत’ केला. यात ह्रदयनाथ मंगेशकरांची १९ गाणी आणि ती सर्व लतादीदींनी गायलेली होती. आज मुले सुफी संगीतात रमलेली आहेत. मात्र, रफी, लताकडे त्यांना यावेच लागेल. राज्य घटना हा सर्वात मोठा धर्मग्रंथ असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘उंबरठा’ही चांगलाच गाजला. यातून स्मिता पाटील ही गुणी अभिनेत्री मिळाली. सुरुवातीला तेंडूलकरांना ती नको होती. कारण, त्यांनी तिला ‘जैत रे जैत’मध्ये त्यांनी बघितले होते, परंतु ‘उंबरठा’च्या प्रिमियरनंतर त्यांनी स्मिताचे कौतूक केले. यावेळी स्मिताही त्यांच्या खांद्यावर डोके ठेवून रडल्याची आठवण त्यांनी सांगितली. यानंतर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’चे दिग्दर्शन केले. याच्या रिसर्चसाठी शरद पवार यांनी मृणाल गोरेंच्या सांगण्यावरून १ कोटी रुपये दिले होते. कोलंबिया युनिव्हर्सिटीनेही चित्रीकरणासाठी पैसे घेतले नाही. तसेच महाडमध्ये चित्रीकरणात लोक स्वखर्चाने सहभागी झाली.
=======================================================
संयुक्त राष्ट्रांतील राजदूत पाक-अमेरिकेतील मध्यस्थ

अमेरिकेच्या सध्याच्या अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार हिलरी क्लिंटन या परराष्ट्रमंत्री असतानाचे काही ई-मेल जाहीर करण्यास नकार देण्यात आला असला, तरी अन्य ई-मेलमधील माहिती उघड करण्यात आली आहे. त्यानुसार पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत मलिहा लोधी या तत्कालीन लष्करप्रमुख अशफाक कयानी यांचे संदेश ओबामा प्रशासनाला पोहोचवित होत्या, असे निष्पन्न झाले आहे. लोधी यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला काय संदेश पाठवले होते हे संपूर्ण समजलेले नाही. ‘मला मलिहा लोधी यांचा फोन आला होता, त्या सध्या लंडनमध्ये आहेत. (मलिहा या काही काळ अमेरिका व ब्रिटनमध्ये राजदूत होत्या.) त्यांनी कयानींचा संदेश दिला आहे,’ असे अफगाणिस्तान-पाकिस्तान विषयक खास प्रतिनिधींचे सल्लागार वली एस नसर यांनी लिहिले आहे, हा संदेश २१ जानेवारी २०११ मधील आहे. लोधी यांनी कयानींचा पाठवलेला संदेश दोन परिच्छेदांचा असून तो त्याच दिवशी श्रीमती क्लिंटन यांना पाठवण्यात आला होता. या संदेशाची छापील प्रत घ्यावी असे क्लिंटन यांनी ३० जानेवारीला सांगितले, त्या वेळी अमेरिकी राजनैतिक अधिकारी रेमंड डेव्हीस यांना पाकिस्तानात दोन व्यक्तींच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्तान व अमेरिका यांच्यातील संदेशात तणाव निर्माण झाला होता. श्रीमती क्लिंटन यांनी लॉरेन जिलोटी यांना पाठवलेल्या संदेशात म्हटले होते, की या संदेशाची छापील प्रत घ्यावी. ‘लेटेस्ट फ्रॉम पाकिस्तान ऑन कयानी ३.०’ या नावाने हा संदेश होता. शुक्रवारी परराष्ट्र खात्याने क्लिंटन यांच्या संदेशाची १००० पाने खुली केली असून त्यात क्लिंटन यांनी खासगी ई-मेल व सव्‍‌र्हरचा वापर केल्याचे दिसून आले आहे. अमेरिकी न्यायालयाच्या निकालानुसार ई-मेलमधील माहिती जाहीर केली जात आहे. पाकिस्तानशी संबंधित अनेक ई-मेलमधील माहिती प्रसारित करण्यात आली असून त्यात क्लिंटन व पाकिस्तानच्या तेव्हाच्या परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार यांच्यात ३ जुलै २०१२ रोजी झालेले संभाषण आहे. ‘सलाला येथे गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेबाबत मी खेद व्यक्त करते. जे पाकिस्तानी सैनिक मारले गेले, त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. परराष्ट्रमंत्री खार व मी, पाकिस्तानी लष्करातील जीवितहानी झाली ही चूकच होती, हे मान्य करीत आहोत. पाकिस्तान व अफगाणिस्तान या दोन देशांशी बरोबर काम करणे गरजेचे आहे तरच अशा घटना पुन्हा घडणार नाहीत,’ असे क्लिंटन यांनी एका संदेशात म्हटले आहे. ‘पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना सलाला घटनेनंतर त्या देशाच्या सार्वभौमत्वाबाबत आदरच असल्याचे मी सांगितले होते. परस्पर सामंजस्य व विश्वासाने काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पाकिस्तान व अमेरिकेला धोकादायक असलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध समन्वित कारवाई करण्याविषयी आजच्या दूरध्वनीत परराष्ट्रमंत्री खार व मी बोलले, अफगाणिस्तानची सुरक्षा, स्थिरता व समेट यावर आम्ही भर दिला व लोकपातळीवर संवाद वाढवण्याचे ठरले, दोन देशांमध्ये सामरिक संबंध असायला हवेत, त्यातून दोन्ही देशांची सुरक्षा वाढली पाहिजे, शिवाय भरभराटही झाली पाहिजे,’ असे क्लिंटन म्हणतात.
=======================================================

नायजेरीयात बोको हरामच्या अतिरेक्यांनी लहान मुलांना जिवंत जाळले, ८६ ठार


नायजेरीयातील बोको हराम या क्रूर दहशतवादी संघटनेने शनिवारी रात्री मेडूगुरी येथील डालोरी गावावर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात लहान मुलांसह ८६ जण ठार झाले. अतिरेक्यांनी डालोरी गाव आणि जवळ असलेल्या २५ हजार शरणार्थींच्या दोन तळावर हल्ला केला. बोको हरामच्या तीन आत्मघातकी हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार आणि बॉम्बस्फोट केले. 
गावातील घरांना आगी लावून लहान मुलांना जिवंत जाळले. जवळपास चार तास मुक्तपणे या दहशतवाद्यांचा हिंसाचार सुरु होता पण नायजेरीयन सुरक्षा पथकांकडून गावक-यांना कोणतीही मदत उपलब्ध झाली नाही. तीन आत्मघातकी महिला हल्लेखोरांनी स्वत:ला स्फोटामध्ये उडवून घेतले. 
काही जणांनी झाडाझुडपाचा आश्रय घेऊन स्वत:चा जीव वाचवला. मेडूगुरीमध्ये लष्करी तळ असूनही लगेच मदत मिळाली नाही अशी तक्रार या हल्ल्यातून बचावलेल्या नागरीकांनी केली. बोको हरामने नायजेरीयात आतापर्यत केलेल्या विविध दहशतवादी हल्ल्यात २० हजार नागरीक ठार झाले आहेत. 

=======================================================