[अंतरराष्ट्रीय]
१- 'माझ्यासोबतही त्यानं गैरवर्तन केलेलं', योगगुरु बिक्रम चौधरीवर महिलेचा आरोप
२- संयुक्त राष्ट्रांतील राजदूत पाक-अमेरिकेतील मध्यस्थ
३- नायजेरीयात बोको हरामच्या अतिरेक्यांनी लहान मुलांना जिवंत जाळले, ८६ ठार
४- सिरियाची राजधानी दमास्कसजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात ४५ जण ठार, तर ११० जण जखमी
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- आंध्रप्रदेशात आरक्षणाची धग, रत्नांचल एक्स्प्रेसच्या 5 बोगी पेटवल्या
६- देवनारमध्ये कचरा घोटाळ्यामुळंच आग, सोमय्यांचा घणाघाती आरोप
७- रोहित दहशतवाद्यांचा समर्थक, भाजप नेते विजयवर्गीयांचं वादग्रस्त वक्तव्य
८- पुरस्कार परत करण्याऐवजी कलाकृतीतून विरोध नोंदवावा - जब्बार पटेल
९- थकीत वेतन न मिळाल्याबद्दल एमसीडी कर्मचा-यांची दिल्लीचे पर्यटन मंत्री कपिल मिश्रा यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन.
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- श्रद्धेने मंदिरात जावं, हट्टापायी नको- पंकजा मुंडे
११- राणीच्या रत्नहाराला सुवर्णझळाळी, पुन्हा पिवळे एलईडी बसवले
१२- मुंबई; पुरणपोळी-वडापावला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध करणार
१३- डोक्यात धुण्याची बॅट घालून आईची हत्या, दादरमधील धक्कादायक प्रकार
१४- बुलडाणा: काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदांना अटक
१५- अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर शनिशिंगणापूरला जाणार.
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- चंद्रपूर; शिवसेना आमदाराची तलाठ्याला जीवे मारण्याची धमकी
१७- पत्नी, मुलींची हत्या करुन इसमाचीही आत्महत्या, कल्याणमधील खळबळजनक घटना
१८- लातूरजवळच्या अनसरवाडामध्ये डोंबार्यांना झरे गुरुजींनी दिली नवी ओळख
१९- रत्नागिरीच्या धामापूर गावात पहिलीत शिकणा-या मुलीची शेजा-याने केली हत्या.
२०- पंढरपूर - टेंभुर्णी भीमानगर परिसरात वाळू माफियांवर कारवाई, १३ ट्रक ताब्यात
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२१- मग्रारोहयो भ्रष्टाचार प्रकरणी मुखेड कॉंग्रेस तालुकाध्यक्ष स्थागुशाच्या जाळ्यात
२२- नांदेड प्रेस फोरमचे या वर्षीचे पुरस्कार जाहीर
२३- मागासवर्ग महिला, कर्मचारी व विद्यार्थ्याचा मोर्चा; रोहितवर अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी
२४- शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सर्वांचे प्रामाणिक प्रयत्न आवश्यक - खा. चव्हाण
२५- हिमायतनगर; अशोक चक्राऐवजी तिरंग्यात 'स्टार'; तणावाचे वातावरण
२६- लोहा; उमरा गावालगत कडब्याच्या गंजीस आग; दोन गोठ्यासह घरातील संसारोपयोगी साहित्य खाक
२७- गाडीपुरा खूनप्रकरणी दोषींवर आज सुनावणी
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
व्यंकट पवळे, ज्ञामेश्वर चापके, सौरभ वाहने, बालाजी बोखारे, शिवाजी पावडे, दिनकर दगजानन छोटे, देसाई, महेंद्र वाठोरे, हरीश चौधरी, सतीश डाखोरे, राज दाभाडे, रवी रामेश्वर, सोनाबा शिंदे, सुनील धोबे
~~~~~~~~~~~~~~~
स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते,पण....
एखाद्याच्या मनात घर करणे,यापेक्षा सुंदर काहीच नसते...यापेक्षा सुंदर काहीच नसते
(प्राची पवार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
घरांची आर्टिफिशिअल सजावट
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
http://goo.gl/uS8DX4
=======================================================
=======================================================
=======================================================
श्रद्धेने मंदिरात जावं, हट्टापायी नको- पंकजा मुंडे
=======================================================
लातूरजवळच्या अनसरवाडामध्ये डोंबार्यांना झरे गुरुजींनी दिली नवी ओळख
संवेदनशीलता ही कलावंताची खरी ओळख आहे. त्यामुळे एखाद्या घटनेचा विरोध करतांना हिंसक पध्दतीने आंदोलन करण्याऐवजी सर्वच कलावंतांना एखाद्या घटनेचा त्रास होत असेल, तर थेट पुरस्कार वापसी किंवा टोकाची भूमिका घेण्याऐवजी नाटक, चित्रपट, कविता अथवा चित्र, अशी कलाकृती निर्माण करून विरोध करायला हवा, असे स्पष्ट मत ज्येष्ठ नाटय़ व चित्रपट दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल यांनी व्यक्त केले. खरा कलावंत हा पुण्या-मुंबईत नव्हे, तर ग्रामीण भागातच जन्माला येतो, असेही ते म्हणाले. ६५ व्या विदर्भ साहित्य संमेलनात अजय गंपावार यांनी डॉ. जब्बार पटेल यांची मुलाखत घेतांना त्यांना विविध विषयांवर बोलते केले. ते म्हणाले, पंढरपूर येथे जन्म, सोलापुरात प्राथमिक शिक्षण आणि पुण्यात वैद्यकीय शिक्षणासह नाटय़ आणि चित्रपटक्षेत्रातील प्रवास, हे सारेच एखाद्या अपघातासारखे होते. कलावंत अपघातानेच घडतो आणि आपणही बालपणी झालेल्या एका सुखद अपघातानेच या क्षेत्राकडे वळलो. वडील रेल्वेत होते. सतत बदली. त्यामुळे आत्या आणि काकांकडे राहायचो. याच वेळी प्राथमिक शिक्षणासाठी वडीलांनी ऊर्दू शाळेत टाकले. मात्र, माझे मराठी भाषेवरील प्रेम आणि सर्व सवंगडी मराठी असल्याचे वडीलांना उमजल्यावर त्यांनीच पालिकेच्या मराठी शाळेत पाठविले. याच वेळी चाळीत वास्तव्याला असतांना कवी राणा यांच्या संपर्कात आलो. त्यांच्यामुळे अवघ्या ८ व्या वर्षी चेहऱ्यावर मेकअप लावून आचार्य अत्रे यांच्या नाटकात काम केले. या संधीचे सोने करून रंगमंचावर पहिला डॉयलॉग बोलताच रसिकांच्या टाळ्यांच्या कडकडाटांनी स्वागत झाले. आजही तो आवाज शरीरात घुमतो. त्याच क्षणी कलावंत होण्याचा निर्णय घेतला. पुढे वडीलांची पुन्हा इतरत्र बदली झाली. यावेळी मात्र त्यांनी श्रीराम पुजारी या माझ्या शिक्षकाकडेच शिक्षणासाठी ठेवले. त्यांच्याच घरी वास्तव्याला असतांना पं.भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, मंगेश पाडगावकर, कवी अनिल, मर्ढेकर, बोरकर यांच्यासारख्यांचा सहवास लाभल्याने घडत गेलो. वैद्यक शिक्षणासाठी पुण्यात आलो. पीडीएशी जोडला गेलो आणि स्नेहसंमेलनात ‘प्रेमा तुझा रंग कसा’ सादर करतांना परीक्षकांकडून हा मुलगा अतिशय सुंदर काम करतोय, अशी दाद मिळाली. त्यानंतर विजय तेंडूलकरांचे ‘श्रीमंत’सारखे बंडखोर नाटक स्नेहसंमेलनात सादर केले. नाटकांचे धडे डॉ. श्रीराम लागू यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाले. विजय तेंडूलकरांसोबत सर्वाधिक कामे केली. त्यांचे ‘अशी पाखरे येती’ राज्य नाटय़ स्पध्रेत सर्वप्रथम आले आणि सर्व बक्षीसेही मिळाली. त्यामुळेच पुढे विजय तेंडूलकर यांचे ‘घाशीराम कोतवाल’ मिळाले. या नाटकाची ९ पाने लिहिलेली असतांनाच त्यांनी वाचायला दिली. पुढे तीन महिन्यात त्यांनी ते पूर्ण केले आणि भास्कर चंदावरकर, मोहन आगाशे यांच्यासह ते नाटक बसवले. पेशवाईच्या शेवटच्या काळावरील हे नाटक ढासळलेली राज्यव्यवस्था कशी रसातळाला येते, राज्य व्यवस्था एका व्यक्तीला मोठे करते आणि एका क्षणात त्याला जमीनदोस्तही करते, हे यात होते. १९७२ मध्ये ते आले आणि त्यानंतर १९७७ मध्ये इंदिरा गांधींची आणीबाणी आली. त्या काळी बंडखोर नाटक म्हणून ते बरेच वादग्रस्त ठरले. मात्र, या नाटकाला पुणेकरांनी उचलून धरले, तर मुंबईत तीव्र विरोध झाला. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड, जपानमध्येही त्याचे प्रयोग झाले. त्यासाठी डॉ. मोहन आगाशे यांनी सर्वार्थाने यशस्वी प्रयत्न केले. या नाटकाचे संपूर्ण श्रेय तेंडूलकर व डॉ. आगाशे यांचच, असेही त्यांनी नम्रपणे कबूल केले. या नाटकासाठी विदेशात जातांना तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी कशी विमानातून आम्हाला थेट सहारा एअरपोर्ट व तेथे विदेशात पाठविले, याचाही किस्सा त्यांनी सांगितला. त्यामुळे या नाटकाचे विरोधक खिंडीत सापडले आणि आम्ही हवेतून विदेशात पोहोचलेलो होते. ‘घाशीराम’मुळेच सर्व काही मिळाल्याची प्रांजळ कबुली त्यांनी दिली. याच वेळी रामदास फुटाणे यांनी ‘सामना’ची घोषणा करून दिग्दर्शक म्हणून संधी दिली. त्यासाठीही तेंडूलकरांचीच पटकथा होती. यातील ‘सख्या रे घायाळ मी हरणीह्ण हे गीत लता मंगेशकर यांनी गायले आणि यासाठी एक पैसाही मानधन घेतले नाही. ‘सामना’ची बर्लिन चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली होती. यापूर्वी या महोत्सवात केवळ भारताचे दारिद्रय़ दाखविणारे चित्रपट गेले होते. मात्र, दारिद्रय़ कशामुळे, हे दाखविणारा ‘सामना’ हा एकमेव चित्रपट होता, अशी कौतूकाची थाप बर्लिनवासियांकडून मिळाली. पुढे ‘सिंहासन’ आला. त्याचीही पटकथा तेंडूलकरांचीच. त्यानंतर लता मंगेशकर यांचा ‘जैत रे जैत’ केला. यात ह्रदयनाथ मंगेशकरांची १९ गाणी आणि ती सर्व लतादीदींनी गायलेली होती. आज मुले सुफी संगीतात रमलेली आहेत. मात्र, रफी, लताकडे त्यांना यावेच लागेल. राज्य घटना हा सर्वात मोठा धर्मग्रंथ असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘उंबरठा’ही चांगलाच गाजला. यातून स्मिता पाटील ही गुणी अभिनेत्री मिळाली. सुरुवातीला तेंडूलकरांना ती नको होती. कारण, त्यांनी तिला ‘जैत रे जैत’मध्ये त्यांनी बघितले होते, परंतु ‘उंबरठा’च्या प्रिमियरनंतर त्यांनी स्मिताचे कौतूक केले. यावेळी स्मिताही त्यांच्या खांद्यावर डोके ठेवून रडल्याची आठवण त्यांनी सांगितली. यानंतर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’चे दिग्दर्शन केले. याच्या रिसर्चसाठी शरद पवार यांनी मृणाल गोरेंच्या सांगण्यावरून १ कोटी रुपये दिले होते. कोलंबिया युनिव्हर्सिटीनेही चित्रीकरणासाठी पैसे घेतले नाही. तसेच महाडमध्ये चित्रीकरणात लोक स्वखर्चाने सहभागी झाली.
=======================================================
संयुक्त राष्ट्रांतील राजदूत पाक-अमेरिकेतील मध्यस्थ
अमेरिकेच्या सध्याच्या अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार हिलरी क्लिंटन या परराष्ट्रमंत्री असतानाचे काही ई-मेल जाहीर करण्यास नकार देण्यात आला असला, तरी अन्य ई-मेलमधील माहिती उघड करण्यात आली आहे. त्यानुसार पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत मलिहा लोधी या तत्कालीन लष्करप्रमुख अशफाक कयानी यांचे संदेश ओबामा प्रशासनाला पोहोचवित होत्या, असे निष्पन्न झाले आहे. लोधी यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला काय संदेश पाठवले होते हे संपूर्ण समजलेले नाही. ‘मला मलिहा लोधी यांचा फोन आला होता, त्या सध्या लंडनमध्ये आहेत. (मलिहा या काही काळ अमेरिका व ब्रिटनमध्ये राजदूत होत्या.) त्यांनी कयानींचा संदेश दिला आहे,’ असे अफगाणिस्तान-पाकिस्तान विषयक खास प्रतिनिधींचे सल्लागार वली एस नसर यांनी लिहिले आहे, हा संदेश २१ जानेवारी २०११ मधील आहे. लोधी यांनी कयानींचा पाठवलेला संदेश दोन परिच्छेदांचा असून तो त्याच दिवशी श्रीमती क्लिंटन यांना पाठवण्यात आला होता. या संदेशाची छापील प्रत घ्यावी असे क्लिंटन यांनी ३० जानेवारीला सांगितले, त्या वेळी अमेरिकी राजनैतिक अधिकारी रेमंड डेव्हीस यांना पाकिस्तानात दोन व्यक्तींच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्तान व अमेरिका यांच्यातील संदेशात तणाव निर्माण झाला होता. श्रीमती क्लिंटन यांनी लॉरेन जिलोटी यांना पाठवलेल्या संदेशात म्हटले होते, की या संदेशाची छापील प्रत घ्यावी. ‘लेटेस्ट फ्रॉम पाकिस्तान ऑन कयानी ३.०’ या नावाने हा संदेश होता. शुक्रवारी परराष्ट्र खात्याने क्लिंटन यांच्या संदेशाची १००० पाने खुली केली असून त्यात क्लिंटन यांनी खासगी ई-मेल व सव्र्हरचा वापर केल्याचे दिसून आले आहे. अमेरिकी न्यायालयाच्या निकालानुसार ई-मेलमधील माहिती जाहीर केली जात आहे. पाकिस्तानशी संबंधित अनेक ई-मेलमधील माहिती प्रसारित करण्यात आली असून त्यात क्लिंटन व पाकिस्तानच्या तेव्हाच्या परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार यांच्यात ३ जुलै २०१२ रोजी झालेले संभाषण आहे. ‘सलाला येथे गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेबाबत मी खेद व्यक्त करते. जे पाकिस्तानी सैनिक मारले गेले, त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. परराष्ट्रमंत्री खार व मी, पाकिस्तानी लष्करातील जीवितहानी झाली ही चूकच होती, हे मान्य करीत आहोत. पाकिस्तान व अफगाणिस्तान या दोन देशांशी बरोबर काम करणे गरजेचे आहे तरच अशा घटना पुन्हा घडणार नाहीत,’ असे क्लिंटन यांनी एका संदेशात म्हटले आहे. ‘पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना सलाला घटनेनंतर त्या देशाच्या सार्वभौमत्वाबाबत आदरच असल्याचे मी सांगितले होते. परस्पर सामंजस्य व विश्वासाने काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पाकिस्तान व अमेरिकेला धोकादायक असलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध समन्वित कारवाई करण्याविषयी आजच्या दूरध्वनीत परराष्ट्रमंत्री खार व मी बोलले, अफगाणिस्तानची सुरक्षा, स्थिरता व समेट यावर आम्ही भर दिला व लोकपातळीवर संवाद वाढवण्याचे ठरले, दोन देशांमध्ये सामरिक संबंध असायला हवेत, त्यातून दोन्ही देशांची सुरक्षा वाढली पाहिजे, शिवाय भरभराटही झाली पाहिजे,’ असे क्लिंटन म्हणतात.
=======================================================
=======================================================
१- 'माझ्यासोबतही त्यानं गैरवर्तन केलेलं', योगगुरु बिक्रम चौधरीवर महिलेचा आरोप
२- संयुक्त राष्ट्रांतील राजदूत पाक-अमेरिकेतील मध्यस्थ
३- नायजेरीयात बोको हरामच्या अतिरेक्यांनी लहान मुलांना जिवंत जाळले, ८६ ठार
४- सिरियाची राजधानी दमास्कसजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात ४५ जण ठार, तर ११० जण जखमी
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- आंध्रप्रदेशात आरक्षणाची धग, रत्नांचल एक्स्प्रेसच्या 5 बोगी पेटवल्या
६- देवनारमध्ये कचरा घोटाळ्यामुळंच आग, सोमय्यांचा घणाघाती आरोप
७- रोहित दहशतवाद्यांचा समर्थक, भाजप नेते विजयवर्गीयांचं वादग्रस्त वक्तव्य
८- पुरस्कार परत करण्याऐवजी कलाकृतीतून विरोध नोंदवावा - जब्बार पटेल
९- थकीत वेतन न मिळाल्याबद्दल एमसीडी कर्मचा-यांची दिल्लीचे पर्यटन मंत्री कपिल मिश्रा यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन.
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- श्रद्धेने मंदिरात जावं, हट्टापायी नको- पंकजा मुंडे
११- राणीच्या रत्नहाराला सुवर्णझळाळी, पुन्हा पिवळे एलईडी बसवले
१२- मुंबई; पुरणपोळी-वडापावला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध करणार
१३- डोक्यात धुण्याची बॅट घालून आईची हत्या, दादरमधील धक्कादायक प्रकार
१४- बुलडाणा: काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदांना अटक
१५- अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर शनिशिंगणापूरला जाणार.
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- चंद्रपूर; शिवसेना आमदाराची तलाठ्याला जीवे मारण्याची धमकी
१७- पत्नी, मुलींची हत्या करुन इसमाचीही आत्महत्या, कल्याणमधील खळबळजनक घटना
१८- लातूरजवळच्या अनसरवाडामध्ये डोंबार्यांना झरे गुरुजींनी दिली नवी ओळख
१९- रत्नागिरीच्या धामापूर गावात पहिलीत शिकणा-या मुलीची शेजा-याने केली हत्या.
२०- पंढरपूर - टेंभुर्णी भीमानगर परिसरात वाळू माफियांवर कारवाई, १३ ट्रक ताब्यात
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२१- मग्रारोहयो भ्रष्टाचार प्रकरणी मुखेड कॉंग्रेस तालुकाध्यक्ष स्थागुशाच्या जाळ्यात
२२- नांदेड प्रेस फोरमचे या वर्षीचे पुरस्कार जाहीर
२३- मागासवर्ग महिला, कर्मचारी व विद्यार्थ्याचा मोर्चा; रोहितवर अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी
२४- शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सर्वांचे प्रामाणिक प्रयत्न आवश्यक - खा. चव्हाण
२५- हिमायतनगर; अशोक चक्राऐवजी तिरंग्यात 'स्टार'; तणावाचे वातावरण
२६- लोहा; उमरा गावालगत कडब्याच्या गंजीस आग; दोन गोठ्यासह घरातील संसारोपयोगी साहित्य खाक
२७- गाडीपुरा खूनप्रकरणी दोषींवर आज सुनावणी
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
व्यंकट पवळे, ज्ञामेश्वर चापके, सौरभ वाहने, बालाजी बोखारे, शिवाजी पावडे, दिनकर दगजानन छोटे, देसाई, महेंद्र वाठोरे, हरीश चौधरी, सतीश डाखोरे, राज दाभाडे, रवी रामेश्वर, सोनाबा शिंदे, सुनील धोबे
~~~~~~~~~~~~~~~
स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते,पण....
एखाद्याच्या मनात घर करणे,यापेक्षा सुंदर काहीच नसते...यापेक्षा सुंदर काहीच नसते
(प्राची पवार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
घरांची आर्टिफिशिअल सजावट
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
http://goo.gl/uS8DX4
=======================================================
चंद्रपूर; शिवसेना आमदाराची तलाठ्याला जीवे मारण्याची धमकी
चंद्रपूर : शिवसेनेचे आमदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्याविरोधात तलाठ्याला जीवे मारण्याची धमकी आणि अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. धानोरकर हे चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा मतदार संघातील आमदार आहेत.
वाळू तस्करांवर कारवाई केल्याच्या रागातून धानोरकर यांनी एकनाथ गाडेकर या तलाठ्याला घरी बोलावून जीवे मारण्याची धमकी दिली आणि अश्लील शिवीगाळही केली. गाडेकर यांनी हे संपूर्ण संभाषण मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं आहे.
वरोरा तालुक्यातील चारगाव परिसरात असलेल्या वाळू वाहतुकीवर या तलाठ्याने गुरुवारी संध्याकाळी जप्तीची कारवाई केली होती. त्यानंतर हे वाळू तस्कर थेट आमदार बाळू धानोरकर यांच्या दरबारात पोहचले आणि त्यांनी तलाठी गाडेकर यांची तक्रार केली.
आपल्या मर्जीतील वाळू तस्करावर कारवाई केल्याच्या रागातून आमदारांनी ही धमकी दिल्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. या प्रकरणात आमदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या विरोधात वरोरा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या संभाषणात केंद्रीय मंत्री हंसराज अहीर आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही शिवीगाळ करत असल्याचं रेकॉर्ड झालं आहे. त्यामुळे शिवसेना आता काय कारवाई करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
=======================================================पत्नी, मुलींची हत्या करुन इसमाचीही आत्महत्या, कल्याणमधील खळबळजनक घटना
कल्याण: कल्याणजवळील म्हारळ गावामध्ये पोटच्या दोन मुली आणि पत्नीची हत्या करून एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून हे संपूर्ण कुटुंब गायब होत. मात्र, घरातून घाण वास येत असल्यामुळे शेजाऱ्यांनी घर तोडून आत प्रवेश केला असता हे घटना उघड झाली.
म्हारळ गावातील मोहन टॉवर इमारतीत रणजित यशवंतराव (45 वर्ष) हे पत्नी स्वाती (38 वर्ष) आणि दोन मुली श्रद्धा (14 वर्ष), आर्या (7 वर्ष) यांच्यासह राहत होते. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कामाला असणारे रणजित 5 दिवसांपूर्वी शेजारी आणि नातेवाईक यांना शेगावला जात आहोत असं सांगितलं होतं. मात्र 4 ते 5 दिवस त्यांचा मोबाइलही बंद होता. त्याच दरम्यान, इमारतीतील रहिवाशांना त्यांच्या घरातून कुजल्यासारखा वास येऊ लागला. अखेर पाच दिवसांनंतर शेजाऱ्यांनी खिडकी तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी ही घटना समोर आली.
दोन लहान मुलींसह रणजित आणि त्यांची पत्नी स्वाती या चोघांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. पत्नी स्वाती, चौदा वर्षीय श्रद्धा आणि सात वर्षीय आर्या यांचे मृतदेह वेगवेगळ्या रुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. तर रणजितचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला.
कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट न मिळाल्यानं या प्रकरणातील गूढ अद्यापही कायम आहे. मात्र, पोलिसांच्या मते, रणजित गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता त्यामुळेच त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं असू शकतं.
मुंबई; पुरणपोळी-वडापावला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध करणार
मुंबई : मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचं फास्टफूड मानला जाणारा वडापाव आणि महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीतील गोडाधोडाच्या पदार्थांची राणी म्हणावी अशी पुरणपोळी आता जगभरात ओळख मिळवणार आहे. लहान-मोठ्या हॉटेल व्यावसायिकांशी हातमिळवणी करुन पुरणपोळी आणि वडापावला आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
महाराष्ट्रातल्या लहानमोठे व्यावसायिक आणि केटरर्ससोबत टाय-अप करुन पुरणपोळी आणि वडापावला जागतिक पातळीवर ओळख मिळवून देण्याचा मानस आहे, अशी माहिती पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग सचिव वल्सा नायर सिंग यांनी दिली.
वडापाव कसा खाद्यप्रेमींचा लाडका झाला?
दिवसभर घडाळ्याच्या काट्यांवर धावणाऱ्या मुंबईकरांना वडापावच्या रुपाने गेल्या काही वर्षांत एक नवा पर्याय उपलब्ध झाला. राज्यात प्रसिद्ध असलेले बटाटेवडे पावात जाऊन बसले आणि त्यांच्या एकत्रित चवीची चटक अनेकांना लागली. एका हातात धरुन खाता येणाऱ्या फ्रँकी, सँडविच सारख्या विदेशी पदार्थांच्या तुलनेत वडापाव या महाराष्ट्रीय पदार्थांने बाजी मारली. फक्त मुंबईकरच नव्हे तर दिल्लीसारख्या अनेक मेट्रोसिटीजमध्ये हा पदार्थ खवय्यांच्या पसंतीस उतरला आहे.
=======================================================आंध्रप्रदेशात आरक्षणाची धग, रत्नांचल एक्स्प्रेसच्या 5 बोगी पेटवल्या
विजयवाडा: आंध्रप्रदेशमध्ये आरक्षणाचा प्रश्नावर कापू समाजाचं आंदोलनानं आज हिंसक वळण घेतलं. आंदोलनकर्त्यांनी पूर्व गोदावरी जिल्ह्यातील तुनी रेल्वे स्टेशनवर रत्नांचल एक्सप्रेसच्या चार डब्ब्यांना आग लावली. ज्यामुळं विजयवाडा आणि विशाखापट्ट्णम मार्गावरील ट्रेनच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला आहे. या हिंसेत 15 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
आंध्रप्रदेशमधील या आंदोलनानं चांगलचंत हिंसक वळण घेतलं. आंदोलनकर्त्यांनी ट्रेनला आग लावण्याआधी त्यातील प्रवाशांना खाली उतरविण्यात आलं होतं. ज्यामुळे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुसरीकडे आंदोलनकर्त्यांमुळं महामार्ग 16 वरीलही वाहतूक विस्कळीत झाली.
आरक्षणासाठी कापू समाजानं जोरदार आंदोलन पुकारलं. मात्र, या आंदोलनानं हिंसक वळण घेतल्यानं गालबोट लागलं आहे. आंदोलनकर्त्यांनी ट्रेनच्या इंजिनावरही आणि पोलिसांवरही दगडफेक केली. तसेच रेल्वे स्टेशनचीही तोडफोड केली. या सगळ्या प्रकारामुळं सात ट्रेन रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या एका प्रवक्त्यानं दिली आहे.
या घटनेनंतर आरक्षणाबाबत बोलताना मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू म्हणाले की, ‘आम्ही कापू समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहोत. त्यासाठी एक आयोगही गठीत करण्यात आला आहे.’
=======================================================राणीच्या रत्नहाराला सुवर्णझळाळी, पुन्हा पिवळे एलईडी बसवले
मुंबई : हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबईतील राणीचा रत्नहार म्हणजेच मरिन ड्राईव्हला पुन्हा त्याची सोनेरी झळाळी प्राप्त झाली आहे. 4.3 किलोमीटर भागातील मरिन ड्राईव्हचे पांढरे एलईडी दिवे पालिकेने बदलून पुन्हा पिवळे केले आहेत.
दक्षिण मुंबईची ओळख असलेल्या क्वीन्स नेकलेसच्या दर्शनी भागाचे दिवे बदलण्यात आले आहेत. पण मरिन लाईन्स स्टेशनपासून बाबूलनाथ मंदिरापर्यंतच्या दिव्यांचं काम अद्याप बाकी आहे.
विजेची बचत करण्यासाठी एलईडी दिवे बसवल्यानं मरिन ड्राईव्हचं सौंदर्य हरपल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्याच याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत मरिन ड्राईव्हवरचे दिवे बदलण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानुसार काही दिवे बदलण्याचं काम बाकी आहे. त्यामुळे उर्वरित काम लवकर पूर्ण झालं नाही, तर या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वादाचे दिवे लागण्याची शक्यता आहे.
=======================================================
'माझ्यासोबतही त्यानं गैरवर्तन केलेलं', योगगुरु बिक्रम चौधरीवर महिलेचा आरोप
मुंबई: भारतीय वंशाचा अमेरिकी योग गुरू बिक्रम चौधरीला लॉस एंजलिसच्या न्यायालयानं महिला वकिलाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी ९.२४ लाख डॉलर्सची नुकसानभरपाई ठोठावली. मात्र, चौधरीच्या संदर्भात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
मुंबईतल्या मनदीप कौर संधु या महिलेनं 2009मध्ये बिक्रम चौधरीनं गैरवर्तन केल्याचं म्हटलं आहे. 2009मध्ये अमेरिकेत योगाचे धडे घेण्यासाठी गेले असता हा संपूर्ण प्रकार घडल्याचं संधु यांचं म्हणणं आहे. तसंच इतर महिलांसोबतही बिक्रम चौधरी गैरवर्तन करत होता, असंही संधु यांचं म्हणण आहे. त्यामुळं बिक्रम चौधरीला योग्य शिक्षा मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
बिक्रम चौधरी हा एका खास योगासाठी प्रसिद्ध आहे. 40 डिग्री तापमानात योगाचे धडे देतो. त्यामुळं याला हॉट योगा म्हणतात. अमेरिकेसह जगभरात त्याच्या या खास अंदाजातील योगा ब्रिकम योगा नावाने प्रसिद्ध आहे.
69 वर्षीय बिक्रम चौधरीवर याआधीही 6 महिलांनी बलात्कार आणि गैरवर्तन केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तर बिक्रमची पत्नी राजश्री चौधरी हिने देखील मागील वर्षीच बिक्रमला घटस्फोटाची नोटीस धाडली आहे.
=======================================================डोक्यात धुण्याची बॅट घालून आईची हत्या, दादरमधील धक्कादायक प्रकार
मुंबई: मुंबईतल्या दादर परिसरात एका 40 वर्षीय मानसिक रुग्णानं कपडे धुण्याच्या बॅटनं त्याच्याच आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तेजस संघवी असं या व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
गेल्या वर्ष भरापासून नोकरी गमावून बसल्यानं तेजस मानसिक दृष्ट्या खचला होता आहे. काल काही कारणावरुन त्याचं त्याच्या आईशी किरकोळ भांडण झालं. त्यातच संतापलेल्या तेजसनं कपडे धुण्याची बॅटने त्याच्या आईच्या डोक्यात मारली. यात त्या गंभीर जखमी झाल्या, उपचारादरम्यान रेखा संघवी यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी तात्काळ तेजसला अटक केली असून, त्याच्या आईचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला आहे. आज तेजसला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
=======================================================बुलडाणा: काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदांना अटक
बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगावचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांना काल रात्री अटक करण्यात आली. त्यांच्या राहत्या घरातून त्यांना अटक केल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
नगरपालिकेच्या एका भ्रष्टाचार प्रकरणात त्यांना अटक करण्यात आल्याचं समजतं आहे. सानंदा यांना अटक केल्याचं समजताच त्यांच्या समर्थकांनी पोलिस स्टेशनच्या परिसरात गर्दी केली.
सानंदा हे काँग्रेसकडून गेली पंधरा वर्ष आमदार राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी बरीच गर्दी केली होती. त्यामुळे गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवला आहे.
=======================================================देवनारमध्ये कचरा घोटाळ्यामुळंच आग, सोमय्यांचा घणाघाती आरोप
मुंबई : मुंबईच्या देवनारमध्ये काल लागलेल्या आगीमुळे आता शिवसेना-भाजपचं राजकारण तापलं आहे. देवनार डम्पिंगला लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर कचरा घोटाळा समोर आल्याचं भाजप खासदार किरीट सोमय्यांनी म्हंटलं आहे.
डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीला थेट पालिका प्रशासनाला जबाबदार धरत सोमय्यांनी शिवसेनेवर टीका केली.
कचऱा घोटाळ्यात पालिकेचे संबंधित अधिकारी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच कचरा घोटाळ्याची चौकशी करुन पालिका अधिकारी आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
=======================================================रोहित दहशतवाद्यांचा समर्थक, भाजप नेते विजयवर्गीयांचं वादग्रस्त वक्तव्य
नवी दिल्ली : रोहित वेमुलाच्या आत्महत्येवर भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
ज्या तरुणानं दहशतवाद्याचं समर्थन आणि बीफ पार्टी करण्याची भाषा करणारा आत्महत्या करुन शकत नसल्याचं विजयवर्गीय यांनी म्हटलं आहे. त्यामुळे रोहितच्या आत्महत्येची चौकशी करण्याचीही मागणी विजयवर्गीय यांनी केली आहे. विजयवर्गीय यांच्या वक्तव्यानं पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
17 जानेवारी रोजी रोहित वेमुलालानं हैदराबाद विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर 22 जानेवारी रोजी मोदींनी रोहितच्या आत्महत्येवर बोलताना भावूक झाले होते.
मात्र आता भाजपच्याच महासचिवांनी केलेल्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
श्रद्धेने मंदिरात जावं, हट्टापायी नको- पंकजा मुंडे
महिलांनी श्रद्धेने मंदिरात जावं, हक्काने नाही. शनिशिंगणापूर इथल्या मंदिरात हट्टाने जाणार्या महिलांनी समाजातील शांतता भंग करू नये, असं वादग्रस्त वक्तव्य महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केलं.
शनीदर्शनाचा हक्क मिळावा यासाठी 26 जानेवारीला भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी मैदान गाजवलं. त्यांना काही शनीदेवाचं दर्शन घेता आलं नाही. मात्र या प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटले. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर विश्वस्तांनी सारवासारव केली. त्यामुळे आता विश्वस्तांकडून लवकरच भूमाता ब्रिगेडला चर्चेचं निमंत्रण दिलं जाणार आहे. तर दुसरीकडे शिंगणापूरच्या शनिचौथर्यावर जाण्यावरून उद्भवलेल्या वादाबाबत पंकजा मुंडे यांना विचारले असता “मंदिरात दर्शन घेणं हा श्रद्धेचा भाग आहे. मंदिरात हट्टाने प्रवेश मिळवताना महिलांनी सामाजिक शांतता भंग करू नये. आतापर्यंत जातीभेदाची लढाई लढलो आता ही स्त्री-पुरुष भेदाची लढाई कशासाठी?”, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
=======================================================
लातूरजवळच्या अनसरवाडामध्ये डोंबार्यांना झरे गुरुजींनी दिली नवी ओळख
महाराष्ट्रात अनेक समाज अजूनही वेशीबाहेर जगत आहेत. “जेवण शिजवून खायचं असतं का?”,असा प्रश्न तुम्हाला कोणी केला तर तुम्ही आवाक झाल्याशिवाय राहणार नाही! मात्र महाराष्ट्रात अशा अनेक जाती आहेत, ज्यांना अजूनही स्व:ताच जेवणही बनविण्याची सवय झाली नाहीय! घर, शाळा, अंघोळ, विज, आरोग्य या सुविधापासून हे आजही वंचित आहेत. गेल्या अनेक पिढ्यापासून हे सर्व आपल्या समाजाचा भाग असले तरी त्यांना अजून लोकशाहीत ओळखच मिळालेली नाहीये! पण हे ही दिवसही बदलतायत आणि असा बदल घडवणारी माणसंही कुठल्याही पुरस्काराची अपेक्षा न ठेवता आपली वाटचाल चालुच ठेवतायत.
लातूरपासून मैलाच्या अंतरावर असलेला अनसरवाडा…डोंबार्याची वस्ती…अंग मेहनतीचे खेळ दाखवून… भिक्षा मागून हा समाज पोटाची खळगी भरतो. बरोबरीने कमालीची अंधश्रद्धा, जात पंचायतीचा पगडा. घर, आरोग्य, शिक्षणापासून हा समाज आजही खुप दुर आहे. मात्र एका शिक्षकाने ही परिस्थिती बदलली आहे.
डोंबार्यांच्या या वस्तीला झरे गुरुजींनी “गोपाळखेळकरी” अशी ओळख मिळवून दिली. स्व:ताचं नाव आणि गाव नसलेल्या या समाजाला झरे गुरुजींनी नवी ओळख द्यायच ठरवलं. सुरुवातीला काही मोजक्या लोकांच प्रबोधन केलं. त्यांना खर्या अर्थाने जीवन जगायला शिकवल. स्वयंपाक, अंघोळ, शेतीकामापासून नमस्कार-रामरामही शिकवला.
फक्त जगण्यासाठीचे शिक्षण नाही तर लिहायला वाचयला येण्यासाठी मराठीच शिक्षण देणं हे गरजेचं होतं. या वस्तीचा आता कायापालट झालीये. मागून खाणारे हात आत तांदूळ शिजवतात… मणी ओवण्यापासून सुरू झालेलं काम आता पायपूसण्या तयार करण्यापर्यंत आलंय.
वस्तीतल्या मुलांना गुरुंजीनी बँडच प्रशिक्षण दिलं. आज या वस्तीत जिल्हाभर प्रसिद्ध असलेली नऊ बँड पथकं आहेत. वर्षाकाठी अडीच लाखाची कमाई होते. एवढच नाही तर दारू, गांजा ही व्यसनं हा आता इतिहास आहे. नव्याने स्थायिक कुंटुबांना गुरुंजीच्या आचारसंहितेतून जावं लागतंय.
महिला बरोबरच मुलंही आता स्वच्छतेचे धडे गिरवायला लागलीयेत. गावकरी आणि झरे गुरुजींच्या प्रयत्नातून इथं जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळाही सुरू झालीय.
भटक्या समाजाला एकत्रित आणून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झरे गुरुजींच्या कार्याला गावकरीही साथ देत आहेत. आता या समाजाला खर्या अर्थानं राष्ट्रीयत्व मिळालंय. या गावकर्यांना आणि झरे गुरुजीच्या प्रयत्नाला सलाम.
=======================================================
पुरस्कार परत करण्याऐवजी कलाकृतीतून विरोध नोंदवावा संवेदनशीलता ही कलावंताची खरी ओळख आहे. त्यामुळे एखाद्या घटनेचा विरोध करतांना हिंसक पध्दतीने आंदोलन करण्याऐवजी सर्वच कलावंतांना एखाद्या घटनेचा त्रास होत असेल, तर थेट पुरस्कार वापसी किंवा टोकाची भूमिका घेण्याऐवजी नाटक, चित्रपट, कविता अथवा चित्र, अशी कलाकृती निर्माण करून विरोध करायला हवा, असे स्पष्ट मत ज्येष्ठ नाटय़ व चित्रपट दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल यांनी व्यक्त केले. खरा कलावंत हा पुण्या-मुंबईत नव्हे, तर ग्रामीण भागातच जन्माला येतो, असेही ते म्हणाले. ६५ व्या विदर्भ साहित्य संमेलनात अजय गंपावार यांनी डॉ. जब्बार पटेल यांची मुलाखत घेतांना त्यांना विविध विषयांवर बोलते केले. ते म्हणाले, पंढरपूर येथे जन्म, सोलापुरात प्राथमिक शिक्षण आणि पुण्यात वैद्यकीय शिक्षणासह नाटय़ आणि चित्रपटक्षेत्रातील प्रवास, हे सारेच एखाद्या अपघातासारखे होते. कलावंत अपघातानेच घडतो आणि आपणही बालपणी झालेल्या एका सुखद अपघातानेच या क्षेत्राकडे वळलो. वडील रेल्वेत होते. सतत बदली. त्यामुळे आत्या आणि काकांकडे राहायचो. याच वेळी प्राथमिक शिक्षणासाठी वडीलांनी ऊर्दू शाळेत टाकले. मात्र, माझे मराठी भाषेवरील प्रेम आणि सर्व सवंगडी मराठी असल्याचे वडीलांना उमजल्यावर त्यांनीच पालिकेच्या मराठी शाळेत पाठविले. याच वेळी चाळीत वास्तव्याला असतांना कवी राणा यांच्या संपर्कात आलो. त्यांच्यामुळे अवघ्या ८ व्या वर्षी चेहऱ्यावर मेकअप लावून आचार्य अत्रे यांच्या नाटकात काम केले. या संधीचे सोने करून रंगमंचावर पहिला डॉयलॉग बोलताच रसिकांच्या टाळ्यांच्या कडकडाटांनी स्वागत झाले. आजही तो आवाज शरीरात घुमतो. त्याच क्षणी कलावंत होण्याचा निर्णय घेतला. पुढे वडीलांची पुन्हा इतरत्र बदली झाली. यावेळी मात्र त्यांनी श्रीराम पुजारी या माझ्या शिक्षकाकडेच शिक्षणासाठी ठेवले. त्यांच्याच घरी वास्तव्याला असतांना पं.भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, मंगेश पाडगावकर, कवी अनिल, मर्ढेकर, बोरकर यांच्यासारख्यांचा सहवास लाभल्याने घडत गेलो. वैद्यक शिक्षणासाठी पुण्यात आलो. पीडीएशी जोडला गेलो आणि स्नेहसंमेलनात ‘प्रेमा तुझा रंग कसा’ सादर करतांना परीक्षकांकडून हा मुलगा अतिशय सुंदर काम करतोय, अशी दाद मिळाली. त्यानंतर विजय तेंडूलकरांचे ‘श्रीमंत’सारखे बंडखोर नाटक स्नेहसंमेलनात सादर केले. नाटकांचे धडे डॉ. श्रीराम लागू यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाले. विजय तेंडूलकरांसोबत सर्वाधिक कामे केली. त्यांचे ‘अशी पाखरे येती’ राज्य नाटय़ स्पध्रेत सर्वप्रथम आले आणि सर्व बक्षीसेही मिळाली. त्यामुळेच पुढे विजय तेंडूलकर यांचे ‘घाशीराम कोतवाल’ मिळाले. या नाटकाची ९ पाने लिहिलेली असतांनाच त्यांनी वाचायला दिली. पुढे तीन महिन्यात त्यांनी ते पूर्ण केले आणि भास्कर चंदावरकर, मोहन आगाशे यांच्यासह ते नाटक बसवले. पेशवाईच्या शेवटच्या काळावरील हे नाटक ढासळलेली राज्यव्यवस्था कशी रसातळाला येते, राज्य व्यवस्था एका व्यक्तीला मोठे करते आणि एका क्षणात त्याला जमीनदोस्तही करते, हे यात होते. १९७२ मध्ये ते आले आणि त्यानंतर १९७७ मध्ये इंदिरा गांधींची आणीबाणी आली. त्या काळी बंडखोर नाटक म्हणून ते बरेच वादग्रस्त ठरले. मात्र, या नाटकाला पुणेकरांनी उचलून धरले, तर मुंबईत तीव्र विरोध झाला. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड, जपानमध्येही त्याचे प्रयोग झाले. त्यासाठी डॉ. मोहन आगाशे यांनी सर्वार्थाने यशस्वी प्रयत्न केले. या नाटकाचे संपूर्ण श्रेय तेंडूलकर व डॉ. आगाशे यांचच, असेही त्यांनी नम्रपणे कबूल केले. या नाटकासाठी विदेशात जातांना तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी कशी विमानातून आम्हाला थेट सहारा एअरपोर्ट व तेथे विदेशात पाठविले, याचाही किस्सा त्यांनी सांगितला. त्यामुळे या नाटकाचे विरोधक खिंडीत सापडले आणि आम्ही हवेतून विदेशात पोहोचलेलो होते. ‘घाशीराम’मुळेच सर्व काही मिळाल्याची प्रांजळ कबुली त्यांनी दिली. याच वेळी रामदास फुटाणे यांनी ‘सामना’ची घोषणा करून दिग्दर्शक म्हणून संधी दिली. त्यासाठीही तेंडूलकरांचीच पटकथा होती. यातील ‘सख्या रे घायाळ मी हरणीह्ण हे गीत लता मंगेशकर यांनी गायले आणि यासाठी एक पैसाही मानधन घेतले नाही. ‘सामना’ची बर्लिन चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली होती. यापूर्वी या महोत्सवात केवळ भारताचे दारिद्रय़ दाखविणारे चित्रपट गेले होते. मात्र, दारिद्रय़ कशामुळे, हे दाखविणारा ‘सामना’ हा एकमेव चित्रपट होता, अशी कौतूकाची थाप बर्लिनवासियांकडून मिळाली. पुढे ‘सिंहासन’ आला. त्याचीही पटकथा तेंडूलकरांचीच. त्यानंतर लता मंगेशकर यांचा ‘जैत रे जैत’ केला. यात ह्रदयनाथ मंगेशकरांची १९ गाणी आणि ती सर्व लतादीदींनी गायलेली होती. आज मुले सुफी संगीतात रमलेली आहेत. मात्र, रफी, लताकडे त्यांना यावेच लागेल. राज्य घटना हा सर्वात मोठा धर्मग्रंथ असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘उंबरठा’ही चांगलाच गाजला. यातून स्मिता पाटील ही गुणी अभिनेत्री मिळाली. सुरुवातीला तेंडूलकरांना ती नको होती. कारण, त्यांनी तिला ‘जैत रे जैत’मध्ये त्यांनी बघितले होते, परंतु ‘उंबरठा’च्या प्रिमियरनंतर त्यांनी स्मिताचे कौतूक केले. यावेळी स्मिताही त्यांच्या खांद्यावर डोके ठेवून रडल्याची आठवण त्यांनी सांगितली. यानंतर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’चे दिग्दर्शन केले. याच्या रिसर्चसाठी शरद पवार यांनी मृणाल गोरेंच्या सांगण्यावरून १ कोटी रुपये दिले होते. कोलंबिया युनिव्हर्सिटीनेही चित्रीकरणासाठी पैसे घेतले नाही. तसेच महाडमध्ये चित्रीकरणात लोक स्वखर्चाने सहभागी झाली.
=======================================================
संयुक्त राष्ट्रांतील राजदूत पाक-अमेरिकेतील मध्यस्थ
अमेरिकेच्या सध्याच्या अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार हिलरी क्लिंटन या परराष्ट्रमंत्री असतानाचे काही ई-मेल जाहीर करण्यास नकार देण्यात आला असला, तरी अन्य ई-मेलमधील माहिती उघड करण्यात आली आहे. त्यानुसार पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत मलिहा लोधी या तत्कालीन लष्करप्रमुख अशफाक कयानी यांचे संदेश ओबामा प्रशासनाला पोहोचवित होत्या, असे निष्पन्न झाले आहे. लोधी यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला काय संदेश पाठवले होते हे संपूर्ण समजलेले नाही. ‘मला मलिहा लोधी यांचा फोन आला होता, त्या सध्या लंडनमध्ये आहेत. (मलिहा या काही काळ अमेरिका व ब्रिटनमध्ये राजदूत होत्या.) त्यांनी कयानींचा संदेश दिला आहे,’ असे अफगाणिस्तान-पाकिस्तान विषयक खास प्रतिनिधींचे सल्लागार वली एस नसर यांनी लिहिले आहे, हा संदेश २१ जानेवारी २०११ मधील आहे. लोधी यांनी कयानींचा पाठवलेला संदेश दोन परिच्छेदांचा असून तो त्याच दिवशी श्रीमती क्लिंटन यांना पाठवण्यात आला होता. या संदेशाची छापील प्रत घ्यावी असे क्लिंटन यांनी ३० जानेवारीला सांगितले, त्या वेळी अमेरिकी राजनैतिक अधिकारी रेमंड डेव्हीस यांना पाकिस्तानात दोन व्यक्तींच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्तान व अमेरिका यांच्यातील संदेशात तणाव निर्माण झाला होता. श्रीमती क्लिंटन यांनी लॉरेन जिलोटी यांना पाठवलेल्या संदेशात म्हटले होते, की या संदेशाची छापील प्रत घ्यावी. ‘लेटेस्ट फ्रॉम पाकिस्तान ऑन कयानी ३.०’ या नावाने हा संदेश होता. शुक्रवारी परराष्ट्र खात्याने क्लिंटन यांच्या संदेशाची १००० पाने खुली केली असून त्यात क्लिंटन यांनी खासगी ई-मेल व सव्र्हरचा वापर केल्याचे दिसून आले आहे. अमेरिकी न्यायालयाच्या निकालानुसार ई-मेलमधील माहिती जाहीर केली जात आहे. पाकिस्तानशी संबंधित अनेक ई-मेलमधील माहिती प्रसारित करण्यात आली असून त्यात क्लिंटन व पाकिस्तानच्या तेव्हाच्या परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार यांच्यात ३ जुलै २०१२ रोजी झालेले संभाषण आहे. ‘सलाला येथे गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेबाबत मी खेद व्यक्त करते. जे पाकिस्तानी सैनिक मारले गेले, त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. परराष्ट्रमंत्री खार व मी, पाकिस्तानी लष्करातील जीवितहानी झाली ही चूकच होती, हे मान्य करीत आहोत. पाकिस्तान व अफगाणिस्तान या दोन देशांशी बरोबर काम करणे गरजेचे आहे तरच अशा घटना पुन्हा घडणार नाहीत,’ असे क्लिंटन यांनी एका संदेशात म्हटले आहे. ‘पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना सलाला घटनेनंतर त्या देशाच्या सार्वभौमत्वाबाबत आदरच असल्याचे मी सांगितले होते. परस्पर सामंजस्य व विश्वासाने काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पाकिस्तान व अमेरिकेला धोकादायक असलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध समन्वित कारवाई करण्याविषयी आजच्या दूरध्वनीत परराष्ट्रमंत्री खार व मी बोलले, अफगाणिस्तानची सुरक्षा, स्थिरता व समेट यावर आम्ही भर दिला व लोकपातळीवर संवाद वाढवण्याचे ठरले, दोन देशांमध्ये सामरिक संबंध असायला हवेत, त्यातून दोन्ही देशांची सुरक्षा वाढली पाहिजे, शिवाय भरभराटही झाली पाहिजे,’ असे क्लिंटन म्हणतात.
=======================================================
नायजेरीयात बोको हरामच्या अतिरेक्यांनी लहान मुलांना जिवंत जाळले, ८६ ठार
नायजेरीयातील बोको हराम या क्रूर दहशतवादी संघटनेने शनिवारी रात्री मेडूगुरी येथील डालोरी गावावर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात लहान मुलांसह ८६ जण ठार झाले. अतिरेक्यांनी डालोरी गाव आणि जवळ असलेल्या २५ हजार शरणार्थींच्या दोन तळावर हल्ला केला. बोको हरामच्या तीन आत्मघातकी हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार आणि बॉम्बस्फोट केले.
गावातील घरांना आगी लावून लहान मुलांना जिवंत जाळले. जवळपास चार तास मुक्तपणे या दहशतवाद्यांचा हिंसाचार सुरु होता पण नायजेरीयन सुरक्षा पथकांकडून गावक-यांना कोणतीही मदत उपलब्ध झाली नाही. तीन आत्मघातकी महिला हल्लेखोरांनी स्वत:ला स्फोटामध्ये उडवून घेतले.
काही जणांनी झाडाझुडपाचा आश्रय घेऊन स्वत:चा जीव वाचवला. मेडूगुरीमध्ये लष्करी तळ असूनही लगेच मदत मिळाली नाही अशी तक्रार या हल्ल्यातून बचावलेल्या नागरीकांनी केली. बोको हरामने नायजेरीयात आतापर्यत केलेल्या विविध दहशतवादी हल्ल्यात २० हजार नागरीक ठार झाले आहेत.

No comments:
Post a Comment