[आंतरराष्ट्रीय]
१- एका मिनिटासाठी google.com चा मालक झालेल्या सन्मयला गुगलने दिले आठ लाखाचे बक्षीस
२- काबूलमध्ये पोलिस आवारात शक्तिशाली स्फोट
३- नरेंद्र मोदी मुस्लिम विरोधी- परवेझ मुशर्रफ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- छगन भुजबळांच्या मालमत्तेवर छापे, भुजबळ तुरुंगाच्या मार्गावर - सोमय्यांचा दावा
५- धोब्यामुळे सीतेवर अन्याय, प्रभू रामांविरोधात कोर्टात खटला
६- जमशेदपूर; बलात्कार पीडितेवर रुग्णालयात पुन्हा बलात्कार
७- पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी पोखरण येथील टपाल कार्यालयातील अधिकाऱ्याला गुप्तहेर संघटनेने ताब्यात घेतले
८- काबूलमधील पोलिस तळावर बॉम्बस्फोट, कोणतीही जीवितहानी नाही
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- अह्म्बाबाद; जमिनीच्या 20 फूट खाली भारतातलं पहिलं अंडरवॉटर रेस्टॉरंट
१०- 12 वीच्या नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलैमध्ये
११- लोकलमधून पडून डोंबिवलीच्या तरुणीचा मृत्यू
१२- चर्चगेट लोकलमध्ये भरदिवसा छेडछाड
१३- रेल्वे रुळावर सेल्फी काढणाऱ्या तरुणाचा मृत्यू
१४- मुरूडच्या समुद्रात बुडालेले सर्व विद्यार्थी इनामदार कॉलेडचे विद्यार्थी.
१५- रायगडजवळ १० पर्यटक समुद्रात बुडाल्याचे वृत्त
१६- मुंबई : भिवंडीत शाळेच्या बसला आग, दोन विद्यार्थी ५० टक्के भाजले
१७- पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या घरातून ८० क्रूड बॉम्ब जप्त
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- लहानशा मधमाशीने बुलडाण्याच्या शेतकऱ्याला लक्षाधीश बनवलं
१९- दिल्ली पोलिसांची मर्दुमकी, आंदोलक मुलींचे केस उपटून बेदम मारहाण
२०- मरोळ; खड्ड्यांमुळे गमावला मुलाने जीव, खड्डे बुजवून वडिलांची अनोखी श्रद्धांजली
२१- नागपट्टणम; तिरंगा जाळतानाचे फोटो 'त्यानं' FBवर टाकले
२२- वसमत; कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे विनोद झंवर हे १४४ मतांनी विजयी तर अपक्ष लक्ष्मीनारायण मुरक्या हे १४६ मतांनी विजयी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- स्मार्टफोनमुळे करंगळीत वाकडेपणा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
जो जिभेवर ताबा मिळवितो, तो मन जिंकतो......
जो मन जिंकतो, तो जग जिंकतो
(पांडुरंग पोटे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
घरांची आर्टिफिशिअल सजावट
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
************************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
http://goo.gl/uS8DX4
*************************************************************************************************************
लहानशा मधमाशीने बुलडाण्याच्या शेतकऱ्याला लक्षाधीश बनवलं
बुलडाणा: असा कोणता शेतीपूरक व्यवसाय तुम्हाला माहित आहे, जो तुम्हाला लक्षाधीश बनवू शकतो? ज्याला ना कोणत्या भांडवलाची गरज, ना शेतजमिनीची. देशभर फिरायचं आणि लाखो रुपये कमवायचे.
तो व्यवसाय आहे मधमाशी पालन..
लहानशा दिसणाऱ्या या माशीनं बुलडाण्याच्या राजेंद्र बैरागी या तरुण शेतकऱ्याच्या जीवनात गोडवा आणला आहे. त्याला लक्षाधीश बनवलं आहे. याच्या व्यावसायाची उलाढाल पोहोचलीय तब्बल 45 लाखांवर.
राजेंद्रकडं वडिलोपार्जित 8 एकर शेती आहे. ज्यात तो शेवग्याचं पीक घ्यायचा. मात्र फुलगळीनं मोठं नुकसान व्हायचं. उत्पन्नही जेमतेमच येत होतं. यावर कृषी विभागानं एक गोड सल्ला दिला. मधमाशी पालनाचा.
मधमाशी पालनासाठी राजेंद्रनं खादी ग्रामद्योगमधून प्रशिक्षण घेतलं. इंटरनेटवरून बाजारपेठांची माहिती घेतली. स्वत: च्या शेतापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज इतर राज्यातही पसरला आहे.
राजेंद्र आता महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात फिरून मध गोळा करतो. पेट्या लावण्याआधी तो लागवड केलेली पीकं आणि भौगोलिक परिस्थितीचं बारकाईने निरिक्षण करतो. यामुळं मधाच्या गुणवत्तेत आणि उत्पादनात वाढ होत असल्याचं राजेंद्र सांगतो.
==========================================
दिल्ली पोलिसांची मर्दुमकी, आंदोलक मुलींचे केस उपटून बेदम मारहाण
नवी दिल्ली: नेहमी आपल्या गलथानपणानं चर्चेत राहणाऱ्या दिल्ली पोलिसांचा सैतानी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. कारण रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी जनावराप्रणाणे मारलं आहे. पोलिसांच्या कर्तृत्त्वाची हद्द म्हणजे त्यांनी आंदोलक तरुणींचे केस उपटून त्यांना बेदम मारहाण केली.
30 जानेवारीला रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या निषेधार्थ दिल्लीत मोर्चा काढण्यात आला.
‘आईसा’ या डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेनं दिल्लीच्या संघ कार्यालयावर हा मोर्चा काढला होता. मात्र मध्येच पोलिसांनी हा मोर्चा अडवला आणि त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना अक्षरश: जनावरांप्रमाणे मारहाण केली.
यावेळी मोर्चात सहभागी झालेले विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये वाद होऊन त्याचं रुपांतर मारामारीत झालं. हाती आलेल्या व्हिडीओनुसार दिल्ली पोलिस मोर्चातील सहभागी विद्यार्थ्यांना अक्षरशः लाथा बुक्क्यांनी तुडवताना दिसतात.
=============================================
अह्म्बाबाद; जमिनीच्या 20 फूट खाली भारतातलं पहिलं अंडरवॉटर रेस्टॉरंट
अहमदाबाद : तुम्ही जेवत असताना अचानक एखादा मासा तुमच्या बाजूने पोहत गेला तर? कल्पना विचित्र वाटत असली, तरी हे सत्य आहे. भारतातलं पहिलं-वहिलं अंडरवॉटर रेस्टॉरंट अहमदाबादमध्ये सुरु झालं आहे.
जमिनीपासून 20 फूट खाली सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेल्या जागेत बसून खवय्यांना जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. रेस्टॉरंटमध्ये नाश्ता आणि जेवणासोबत विविध जातींचे, रंगीबेरंगी मासे पाहण्याची संधीही तुम्हाला मिळणार आहे.
अहमदाबादच्या बोपल भागात रिअल पोसिडॉन- अंडर वॉटर रेस्टॉरंट उभारण्यात आलं आहे. तब्बल 3 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या रेस्टॉरंटमध्ये एका वेळेस 32 जण बसू शकतात. एक लाख 60 हजार लीटर पाणी हॉटेलच्या सभोवताली आहे.
==========================================
धोब्यामुळे सीतेवर अन्याय, प्रभू रामांविरोधात कोर्टात खटला
पाटणा : धोब्याच्या सांगण्यावरुन सीतेला सोडल्याचा आरोप करत प्रभू रामचंद्रांविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. बिहारमधल्या सीतामढी शहरातले वकील ठाकूर चंदन सिंह यांनी हा अजब खटला दाखल केला आहे.
प्रभू रामचंद्रानी एका तिऱ्हाईताच्या सांगण्यावरुन आपल्या पत्नीवर अत्याचार केल्याचा आरोप चंदन सिंह यांनी केला आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने हा खटला दाखल करुन घेतला असून आज सीतामढीमध्ये या खटल्यावर सुनावणी होणार आहे.
अशा प्रकारचे खटले हे सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.
का दाखल केला खटला?
कोणत्याही धर्माच्या भावना दुखावण्यासाठी नाही, तर सीतामाईला न्याय मिळवून देण्यासाठी आपण हा खटला दाखल केला असल्याचा दावा चंदन सिंह यांनी केला आहे. जोपर्यंत सीतामाईंना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत या देशात स्त्रियांवरचे अत्याचार थांबणार नाहीत, असा दावाही ते करतात.
त्यामुळे आज सीतामढीच्या कोर्टात आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या प्रभू रामचंद्रांवर कोर्ट काय सुनावणी करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
==================================================
छगन भुजबळांच्या मालमत्तेवर छापे, भुजबळ तुरुंगाच्या मार्गावर - सोमय्यांचा दावा
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचलानलयाकडून पुन्हा छापे मारण्यात आले आहेत.
छगन भुजबळ लवकरच तुम्हाला तुरुंगात दिसतील अशी प्रतिक्रिया भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी या छाप्यांवर दिली आहे. छगन भुजबळ तसेच पंकज व समीर भुजबळ यांच्या विविध ठिकाणच्या नऊ मालमत्तांवर छापे मारण्यात आल्याचे वृत्त आहे.
सक्तवसुली संचालनालयाच्या वरीष्ठ अधिका-यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, एक डझनपेक्षा जास्त अधिका-यांची टीम छाप्यांमध्ये सहभागी आहे. तसेच भुजबळांच्या फक्त मुंबईतल्याच मालमत्तांवर छापे टाकण्यात आले आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत तपास संपवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भुजबळ यांच्या मालकीचा बांद्रे येथील एक मोकळा भूखंड व सांताक्रूझ येथील एक नऊ मजली इमारत या दोन्ही मालमत्तांवर टाच आणली होती.
=================================================
खड्ड्यांमुळे गमावला मुलाने जीव, खड्डे बुजवून वडिलांची अनोखी श्रद्धांजली
रस्त्यावरील उघड्या पॉटहोलला धडकून बाईकच्या झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे दु:ख विसरता यावे आणि अशी परिस्थिती इतर कोणावरही येऊ नये यासाठी दादाराव बिल्होरे गेल्या महिन्याभरापासून रस्त्यावरील उघडी पॉटहोल्स माती-विटांनी भरत आहेत. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, मरोळचे रहिवासी असलेले बिल्होरे यांनी गेल्या महिन्याभरात एक डझन वा त्याहून अधिक पॉटहोल्स भरत आपल्या मुलाला श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न केला आहे.
मरोळमधील विजयनगर येथे भाजी विकण्याचा व्यवसाय करणारे बिल्होरे यांनी रात्रंदिवस मेहनत करून आपल्या मुलांना शिकवलं. १६ वर्षीय प्रकाश हा इंग्रजी मीडियममध्ये शिकणारा त्यांच्या कुटुंबातील पहिला सदस्य होता. मात्र गेल्या वर्षी २८ जुलै रोजी तो त्याचा चुलतभाऊ रामसह भांडूपच्या नवजीवन एज्युकेशन सोसायटीच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन परत येत होता. तेव्हा मुसळधार पावसामुळे जोगेश्वरी-विक्रोली लिंक रोडवर पाणी साचल्याने उघडा असलेला पॉटहोल न दिसल्याने त्यांच्या बाईकचा अपघात झाला आणि प्रकाशला जीव गमवावा लागला तर त्याचा भाऊ रामलाही डोक्याला गंभीर जखम झाली.
मात्र या घटनेनंतर दादाराव यांचे अवघे आयुष्यच बदलले. प्रकाशला न्याय मिळावा आणि निष्काळजीपणे रस्ता खोदून, पॉटहोल्स उघडी टाकणा-यांना कठोर शिक्षा मिळावी यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून ते लढा देत आहेत. मात्र कायदेशीर लढा सुरू असतानाच इतर कोणत्याही निष्पाप नागरिकांना असा त्रास वा कोणाचाही वियोग सहन करावा लागू नये यासाठी ज्या रस्त्यावर उघडे पॉटहोल्स दिसतात, त्यावर दादाराव स्वत:च्या हातांनी दगड-विटा टाकून ते बुजवात. ' माझ्या मुलाबाबतीत जे झाले ते इतर कोणाबाबतीत व्हावे असे मला वाटत नाही, माझ्या मुलालाही तसं वाटलं नसतं. तो अतिशय हुशार, भरभूरन जगणारा आणि मनमिळावू मुलगा होता. त्याच्या मृत्यूला जबाबदार असणा-यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी तर मी लढा देईनच. पण जे मला आणि माझ्या कुटुंबाला सहन करावं लागलं, तशी वेळ इतरांवर येऊ नये असं मला वाटतं' असा भरल्या डोळ्यांनी दादाराव सांगतात.
स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून इतरांच्या भल्यासाठी हे काम करणा-या दादाराव यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांच्या परिसरातील इतर नागरिकांनाही त्यांना मदत करण्यास सुरूवात केली आहे.
======================================================
12 वीच्या नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलैमध्ये
मुंबई: शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दहावीप्रमाणेच बारावीच्या विद्यार्थ्यांनाही आनंदाची बातमी दिली आहे. कारण बारावीच्या नापास विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यांचीही जुलै महिन्यातच परीक्षा घेण्यात येणार आहे.
यापूर्वी दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याकरिता नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै २०१५ मध्ये घेण्यात आली होती. त्याचपद्धतीने आता २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १२ वीची फेरपरीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबर ऐवजी जुलै-ऑगस्टमध्ये घेण्याचा निर्णय तावडेंनी घेतला आहे.
या निर्णयामुळे १२ वीच्या नियमित परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधी तातडीने मिळणार आहे.
गेल्या वर्षी १० वी परीक्षेमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ जुलै ते ५ ऑगस्ट, २०१५ या कालावधीत आयोजित करून त्याचा निकाल २५ ऑगस्ट, २०१५ रोजी जाहीर करण्यात आला होता. या फेरपरीक्षेमध्ये ५७,५१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे त्यांचं वर्ष वाया जाण्यापासून वाचलं होतं.
======================================================
भुजबळांच्या मालमत्तेवर पुन्हा छापेमारी
मुंबई: बेहिशेबी मालमत्ताप्रकरणात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या 9 मालमत्तांवर छापेमारी केली आहे. भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती दिली.
छगन भुजबळ यांच्यासह मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांच्याही मालमत्तांचा यामध्ये समावेश आहे.
त्यामुळे छगन, समीर आणि पंकज भुजबळ यांनी आता कुठल्या जेलमध्ये जायचं हे ठरवायला हवं, असा टोला सोमय्यांनी लगावला.
भुजबळ गटातीलच काही लोक आमच्यासेबत आले आहेत, ते एसीबी ला माहिती देत आहेत. भुजबळ कुटुंबियांच्या नावाने ६३ बोगस बँक अकाउंट उघडण्यात आले आहेत. छगन भुजबळांनी इंडोनेशियात कोळसा खाण विकत घेतल्याचं सांगितलं होतं. मात्र ही माहिती संपूर्ण खोटी असल्याचं समोर आल्याचा दावा सोमय्यांनी लगावला.
यापूर्वी महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी एसीबीनं गेल्या वर्षी जून महिन्यात छगन भुजबळ यांच्या तब्बल 16 मालमत्तावर छापे टाकले होते. मुंबई, मनमाड, येवला, पुणे यासारख्या 16 ठिकाणी एसीबीच्या 15 पथकांनी भुजबळांच्या संपत्तीची कसून तपासणी केली.
यानंतर काही दिवसांनीच मलबजावणी संचालनालय अर्थात ईडीनेही धाडी टाकल्या होत्या.
======================================================
लोकलमधून पडून डोंबिवलीच्या तरुणीचा मृत्यू
मुंबई: मुंबई लोकल आणि अपघात हे जणू सूत्रच बनत असल्याचं चित्र आहे. कारण अपघाताच्या अनेक घटना दररोज समोर येत आहेत.
लोकलमधून पडून आज सकाळी एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. धनश्री नंदकिशोर गोडवे असं मृत्यू झालेल्या 25 वर्षीय तरुणीचं नाव असून ती डोंबिवलीची राहणारी होती.
सकाळी जलद लोकलने प्रवास करताना डोंबिवली आणि कोपर या स्थानकादरम्यान पडून तिचा अपघात झाला. अपघातानंतर तिला शास्त्रीनगर हॉस्पीटलमधे दाखल केले असता त्यांना मृत घोषीत करण्यात आलं.
कालच धावत्या लोकलमध्ये चढण्याची घाई एका प्रवाशाच्या जीवावर बेतली होती. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये धावत चढण्याच्या नादात प्लॅटफॉर्मवरुन पडून एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर काही दिवसांपूर्वीच अतीगर्दीमुळे लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता.
======================================================
बुलढाणा; लहानशा मधमाशीने बुलडाण्याच्या शेतकऱ्याला लक्षाधीश बनवलं
बुलडाणा: असा कोणता शेतीपूरक व्यवसाय तुम्हाला माहित आहे, जो तुम्हाला लक्षाधीश बनवू शकतो? ज्याला ना कोणत्या भांडवलाची गरज, ना शेतजमिनीची. देशभर फिरायचं आणि लाखो रुपये कमवायचे.
तो व्यवसाय आहे मधमाशी पालन..
लहानशा दिसणाऱ्या या माशीनं बुलडाण्याच्या राजेंद्र बैरागी या तरुण शेतकऱ्याच्या जीवनात गोडवा आणला आहे. त्याला लक्षाधीश बनवलं आहे. याच्या व्यावसायाची उलाढाल पोहोचलीय तब्बल 45 लाखांवर.
राजेंद्रकडं वडिलोपार्जित 8 एकर शेती आहे. ज्यात तो शेवग्याचं पीक घ्यायचा. मात्र फुलगळीनं मोठं नुकसान व्हायचं. उत्पन्नही जेमतेमच येत होतं. यावर कृषी विभागानं एक गोड सल्ला दिला. मधमाशी पालनाचा.
मधमाशी पालनासाठी राजेंद्रनं खादी ग्रामद्योगमधून प्रशिक्षण घेतलं. इंटरनेटवरून बाजारपेठांची माहिती घेतली. स्वत: च्या शेतापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज इतर राज्यातही पसरला आहे.
राजेंद्र आता महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात फिरून मध गोळा करतो. पेट्या लावण्याआधी तो लागवड केलेली पीकं आणि भौगोलिक परिस्थितीचं बारकाईने निरिक्षण करतो. यामुळं मधाच्या गुणवत्तेत आणि उत्पादनात वाढ होत असल्याचं राजेंद्र सांगतो.
मधमाशा पीकांवर बसल्यामुळे संबंधीत पीकही भरभरून येतं.
मधमाशांच्या पेट्या लावल्याचा फायदा फक्त राजेंद्रलाच होतो असं नाही तर यामुळं पिकांचं उत्पादनही वाढत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना आला आहे.
आयुर्वेदातील मधाचं महत्त्व पाहाता याला बाजारात मोठी मागणी आहे. यामुळं राजेंद्रला दरही चांगला मिळतो.
राजेंद्रचा मधमाशा पालनाचा व्यवसाय
*सध्या राजेंद्रकडं मधमाशांच्या 700 पेट्या आहेत.
*यापासून त्याला वर्षाकाठी 10 ते 15 टन मधाचं उत्पादन मिळतं
*त्याला बाजारात सरासरी 300 रुपये किलोचा दर मिळतो..
*म्हणजे यातून वर्षाकाठी 45 लाखांचं उत्पन्न.
*यातून वाहतूक, जागा सर्व्हेक्षण आणि इतर 50 टक्के उत्पादन खर्च वगळला तरी राजेंद्रला या व्यावसायातून 20 ते 25 लाखांचा निव्वळ नफा होतो.
राजेंद्रचा हा व्यवसाय देशभर आपली मुळं रोवतोय. मध उत्पादनात राज्याचा वाटा वाढवतोय. नापिकीनं हैराण झालेल्या विदर्भातील शेतकऱ्यांना राजेंद्रच्या या व्यवसायातून नवी उमेद मिळेल यात शंका नाही.
======================================================
एका मिनिटासाठी google.com चा मालक झालेल्या सन्मयला गुगलने दिले आठ लाखाचे बक्षीस
एका मिनिटासाठी गुगल डॉट कॉमचा मालका झालेल्या सन्मय वेदला गुगलने तब्बल आठ लाख रुपये दिले आहेत. सप्टेंबरमध्ये गुजरातमधल्या सन्मय वेद या तरूणाला गुगलची डोमेन बघता बघता असं आढळलं की google.com हे डोमेन विक्रीसाठी उपलब्ध आहे. गुगलचाच माजी कर्मचारी असलेल्या सन्मयने ते चक्क अवघ्या १२ डॉलर्सना खरेदी केलं. गुगलने हा खरेदी विक्रीचा व्यवहार रद्द करेपर्यंत त्याला गुगलच्या वेबमास्टर टूलचा ताबाही मिळाला. अखेर, सन्मयने ते डोमेन गुगलला सुमारे चार लाख रुपयांना परत केले. परंतु हा किस्सा इथं संपला नाही.
सन्मयने त्याला मिळालेले चार लाख रुपये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कामासाठी दान केले. आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था देशभरात सुमारे ४०४ मोफत शिक्षण देणा-या शाळा चालवते आणि जवळपास ३९,२०० मुलं तिथं शिकतात. सन्मयने या संस्थेला हे पैसे दिल्याचे कळताच, गुगलने स्वत:हून ही रक्कम दुप्पट करत सन्मयला आठ लाख रुपये दिले आहेत.
गुगलची सुरक्षा किती अभेद्य आहे हे बघण्यासाठी जगभरातल्या तंत्रज्ञांसाठी गुगल सेक्युरिटी रिवॉर्ड प्रोग्राम राबवते. यामध्ये सहभागी झालेल्या व गुगलच्या यंत्रणेतल्या त्रुटी दाखवलेल्या जवळपास ३०० तरुणांना गुगलने गेल्या वर्षी दोन दशलक्ष डॉलर्स दिले आहेत. २०१० मध्ये ही संकल्पना त्यांनी राबवण्यास सुरुवात केली आणि आत्तापर्यंत सहा दशलक्ष डॉलर्स बक्षीसापोटी दिले आहेत.
======================================================
जमशेदपूर; बलात्कार पीडितेवर रुग्णालयात पुन्हा बलात्कार
बलात्काराच्या यातना सोसलेल्या अल्पवयीन पीडित तरुणीवर पुन्हा रुग्णालयात बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना जमशेदपूरमध्ये घडली आहे. दोन दिवसांपूर्वी या तरुणीवर बलात्कार झाला होता. त्यानंतर तिला उपचारासाठी जमशेदपूरच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तिथे डयुटीवर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाने पुन्हा या तरुणीवर बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले असून, मुख्य आरोपी फरार झाला आहे.
मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी खासगी सुरक्षा रक्षकाला पकडण्यासाठी तपास सुरु केला आहे. मुख्यमंत्री रघुबर दास यांनी एमजीएम रुग्णालयाची पाहणी करुन गेल्यानंतर काही तासांनी ही घटना घडली.
======================================================
चर्चगेट लोकलमध्ये भरदिवसा छेडछाड
चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या लोकलमध्ये आज भरदुपारी एका गर्दुल्ल्याने दोन महिलांची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून डब्यातील धाडसी प्रवाशांनी या गर्दुल्ल्याला चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे.
आज दुपारी २.३० च्या सुमारास प्रथम श्रेणीच्या डब्यात हा प्रकार घडला. चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या लोकलमध्ये शिरलेल्या या गर्दुल्ल्याने दोन महिलांची छेड काढली. या गर्दुल्ल्याला प्रथम या महिलांनी प्रतिकार केलाच पण, नंतर अन्य प्रवाशांनीही या गर्दुल्ल्याची गचांडी पकडली व त्याला बेदम चोप दिला. दरम्यान, या प्रकारामुळे अंधेरी स्टेशनमध्ये काही मिनिटं गाडी थांबवण्यात आली. तेथे संतप्त प्रवाशांनी धक्के देतच या गर्दुल्ल्याला डब्यातून बाहेर काढले आणि रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. या आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची रेल्वे पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या घटनेने लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
======================================================
नागपट्टणम; तिरंगा जाळतानाचे फोटो 'त्यानं' FBवर टाकले
भारताचा तिरंगा जाळत असतानाचे आपले फोटो फेसबुकवर शेअर करून देशवासियांच्या भावना भडकवणाऱ्या चेन्नईतील तरुणाला शोधण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. दिलीपन महेंद्रन असं त्यांचं नाव असून त्याच्या देशद्रोही कृत्याचा सर्वच स्तरातून निषेध होतोय.
नागपट्टणम इथे राहणारा २५ वर्षीय दिलीपन स्वतःला 'पेरियरिस्ट' (प्रख्यात तामिळ सामाजिक प्रवर्तक पेरियर यांची तत्व मानणारे) म्हणवतो. तामिळनाडूतील एसव्हीएस योगा मेडिकल कॉलेजमधील तीन विद्यार्थ्यांची आत्महत्या आणि रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनांमध्ये तो सहभागी झाला होता. दलित आणि मागासवर्गीयांवरील अत्याचाराच्या घटनांवरून त्यानं आपल्या फेसबुक पेजवरून सरकारवर टीकेची झोडही उठवली होती. पण, शुक्रवारी त्यानं जो प्रताप केला, तो कुठल्याही देशप्रेमी नागरिकाच्या संतापाचा उद्रेक होईल असाच होता.
नागपट्टणम इथे राहणारा २५ वर्षीय दिलीपन स्वतःला 'पेरियरिस्ट' (प्रख्यात तामिळ सामाजिक प्रवर्तक पेरियर यांची तत्व मानणारे) म्हणवतो. तामिळनाडूतील एसव्हीएस योगा मेडिकल कॉलेजमधील तीन विद्यार्थ्यांची आत्महत्या आणि रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनांमध्ये तो सहभागी झाला होता. दलित आणि मागासवर्गीयांवरील अत्याचाराच्या घटनांवरून त्यानं आपल्या फेसबुक पेजवरून सरकारवर टीकेची झोडही उठवली होती. पण, शुक्रवारी त्यानं जो प्रताप केला, तो कुठल्याही देशप्रेमी नागरिकाच्या संतापाचा उद्रेक होईल असाच होता.
देशाचा तिरंगा फाडून आपण तो हसत-हसत जाळल्याचे फोटो दिलीपनने पोस्ट केले. सोशल मीडियावर ते वाऱ्याच्या वेगानं पसरले आणि त्याच्यावर अक्षरशः शिव्यांचा भडिमारच झाला. अर्थात, दिलीपनच्या कृत्याचं समर्थनही काहींनी केलं. स्वतःला देशप्रेमी म्हणवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग दिनी झेंड्याचा अपमान केला, त्याचं काय?, असा सवाल या समर्थकांनी केला. पण, देशप्रेमींनी आणि मोदींच्या चाहत्यांनी त्यांचाही समाचार घेतला.
दरम्यान, खासगी विमान कंपनीतील पायलट सी. आर. नवीनकुमार यांच्यासह दोघांनी दिलीपन महेंद्रनविरुद्ध चेन्नई शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतलीय. तसंच, हे फोटो आता फेसबुकवरून काढून टाकण्यात आलेत.
दरम्यान, खासगी विमान कंपनीतील पायलट सी. आर. नवीनकुमार यांच्यासह दोघांनी दिलीपन महेंद्रनविरुद्ध चेन्नई शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतलीय. तसंच, हे फोटो आता फेसबुकवरून काढून टाकण्यात आलेत.
======================================================
काबूलमध्ये पोलिस आवारात शक्तिशाली स्फोट
काबूल- मध्य शहरातील पोलिस कार्यालयाच्या आवारात आज (सोमवार) शक्तिशाली आत्मघाती स्फोट घडवून आणण्यात आला आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पोलिस कार्यालयाच्या आवारात एका मोटारीने प्रवेश केला. काही वेळातच या मोटारीमधून शक्तिशाली आत्मघाती स्फोट घडवून आणण्यात आला. परिसरात मोठे धुराचे लोट पसरले आहेत. या घटनेमध्ये कोणी जखमी अथवा मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. परंतु, परिसरामध्ये 10 मृतदेह विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. अद्याप कोणत्याही संघटनेने स्फोटाची जबाबदारी घेतली नसली तरी तालिबानी दहशतवादी संघटनेने स्फोट घडवून आणल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पोलिस कार्यालयाच्या आवारात एका मोटारीने प्रवेश केला. काही वेळातच या मोटारीमधून शक्तिशाली आत्मघाती स्फोट घडवून आणण्यात आला. परिसरात मोठे धुराचे लोट पसरले आहेत. या घटनेमध्ये कोणी जखमी अथवा मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. परंतु, परिसरामध्ये 10 मृतदेह विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. अद्याप कोणत्याही संघटनेने स्फोटाची जबाबदारी घेतली नसली तरी तालिबानी दहशतवादी संघटनेने स्फोट घडवून आणल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
======================================================
स्मार्टफोनमुळे करंगळीत वाकडेपणा
आजच्या तरुणाईसाठी स्मार्टफोन अत्यावश्यक बनला आहे, मात्र त्याच्या अतिवापराचे दुष्परिणामही दिसू लागले आहेत. स्मार्टफोनच्या अतिवापराचा एक दुष्परिणाम आता समोर आला असून, तुम्हीही असे करत असल्यास तुमच्या करंगळीकडे निरखून पाहा! सतत स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या करंगळीमध्ये वाकडेपणा येऊ शकतो.
आजच्या तरुणाईसाठी स्मार्टफोन अत्यावश्यक बनला आहे, मात्र त्याच्या अतिवापराचे दुष्परिणामही दिसू लागले आहेत. स्मार्टफोनच्या अतिवापराचा एक दुष्परिणाम आता समोर आला असून, तुम्हीही असे करत असल्यास तुमच्या करंगळीकडे निरखून पाहा! सतत स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या करंगळीमध्ये वाकडेपणा येऊ शकतो.
सिडनी मॉर्निंग हेरल्डच्या म्हणण्यानुसार, दिवसातून कमीत कमी सहा तास स्मार्टफोन वापरणाऱ्या युजर्सच्या करंगळीमध्ये थोडासा बाक येऊ शकतो. करंगळीच्या या वाकडेपणाला "स्मार्टफोन पिंकी‘ असे नाव देण्यात आले आहे. तासन्तास स्मार्टफोन वापरल्यामुळे करंगळीतील नाजूक पेशींवर दाब पडतो व त्यामुळे हा वाकडेपणा येऊ शकतो. स्मार्टफोनच्या बाजारात नव्या आलेल्या मॉडेल्सचे वजन जास्त असून, त्यांचा आकारही वाढत चालला आहे. त्यामुळे करंगळीवर अतिरिक्त भार पडत आहे. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे अंगठ्याची अधिक हालचाल होत असल्यामुळे अंगठ्याचेही नुकसान होत आहे. त्यातच, आता करंगळी वाकडी होण्याच्या या प्रकारामुळे युजर्सनी सावध होण्याची गरज आहे. युजर्सनी स्मार्टफोनचा सलग वापर न करण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे. कॅंडी क्रश खेळण्यापासून व्हॉटस ऍप वापरण्याच्या नावाखाली स्मार्टफोनच्या आहारी जाणाऱ्यांनी हा सल्ला गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
======================================================
नरेंद्र मोदी मुस्लिम विरोधी- परवेझ मुशर्रफ
======================================================
रेल्वे रुळावर सेल्फी काढणाऱ्या तरुणाचा मृत्यू
नरेंद्र मोदी मुस्लिम विरोधी- परवेझ मुशर्रफ
इस्लामाबाद- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुस्लिम विरोधी असून पाकिस्तानला ते फसवत आहेत, असे पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुशर्रफ म्हणाले, ‘मोदी हे पाकिस्तान व मुस्लिम विरोधी नेते आहेत. त्यांचा पाकिस्तान दौरा ठीक आहे. परंतु, यामधून काही साध्य होणार नाही. पाकिस्तानला ते फसवतच आहेत.‘======================================================
रेल्वे रुळावर सेल्फी काढणाऱ्या तरुणाचा मृत्यू
चेन्नई - सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात जीव गमाविल्याच्या अनेक घटना ताज्या असतानाच, चेन्नईमध्ये एका 17 वर्षीय तरुणाचा रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेसमोर सेल्फी काढण्याचा प्रयत्न त्याच्या जीवावर बेतला.
रविवारी सायंकाळी चेन्नईत ही घटना घडली. पुनामल्ली अरींग्नार अण्णा शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात शिकत असलेला देना सुकुमार हा सतरा वर्षीय तरुण रेल्वे रुळावर उभारुन धावत्या रेल्वेसमोर सेल्फी काढत होता. त्यावेळी तो मित्रांबरोबर सेल्फीचा अँगल ठरवत असताना त्याच रेल्वेने त्याला उडविले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
सेल्फीमुळे नुकतेच मुंबईतील किनाऱ्यावर दोन तरुणींचा मृत्यू झाला होता. तर, मध्य प्रदेशात नर्मदा नदीत दोघे जण बुडाले होते. यामुळे मुंबईतील सोळा समुद्र किनाऱ्यांवर नो सेल्फी झोन बनविण्यात आला आहे. जगभरात गेल्यावर्षी 27 जणांचा सेल्फी काढताना मृत्यू झाला आहे. यामध्ये अर्धे भा
======================================================
वसमत; कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे विनोद झंवर हे १४४ मतांनी विजयी तर अपक्ष लक्ष्मीनारायण मुरक्या हे १४६ मतांनी विजयी




No comments:
Post a Comment