Sunday, 2 October 2016

नमस्कार लाईव्ह ०२-१०-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- अजित डोभाल यांचं ऐका, नाहीतर जगाच्या नकाशावरुन नष्ट व्हाल - हसन निसार  
२- चीननं ब्रम्हपुत्रेच्या उपनदीचं पाणी अडवलं, चीनकडून भारताची कोंडी 
३- पाकच्या या दुर्दशेस शरीफच कारणीभूत: मुशर्रफ 
४- पाकव्याप्त काश्‍मीरात पाकविरुद्ध मोठे आंदोलन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- चंदू चव्हाणच्या सुटकेसाठी डीजीएमओ स्तरावरची प्रक्रिया - संरक्षणमंत्री 
६- भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक अमरावतीऐवजी मुंबईत 
७- नागपुरात काँग्रेस नेत्यांकडून राष्ट्रगीताचा अवमान 
८- गांधीजींचा लढा प्रेरणादायी - पंतप्रधान 
९- रॉकेलचा काळाबाजार रोखण्यावर लक्ष -  केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली 
१०- आधारच्या साह्याने पेन्शन काढणे शक्य 
११- मोदी साधणार400 रेल्वे कर्मचाऱ्यांशी थेट संवाद 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१२- गुजरातमध्ये किनाऱ्याजवळ संशयास्पद बोट, बोटीतील सर्वजण ताब्यात 
१३- भुजबळांच्या समर्थनार्थ मोर्चाला सत्ताकाळातील समर्थकांनी पाठ 
१४- गोवा; संघातून बाहेर पडलेल्या वेलिंगकरांचा नवा पक्ष 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- मध्य प्रदेशात बस नदीत कोसळून 10 प्रवाशांचा मृत्यू 
१६- धरमशाला; पाकला दहशतवादी देश जाहीर करण्यासाठी त्याने रक्ताने लिहले पत्र 
१७- नीरा खोऱ्यातील सर्व धरणे 100 टक्के भरली 
१८- रिसोड- झेंडूला मिळाला ५ रुपये किलोचा दर 
१९- जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे वाघूर धरण 97 टक्के भरले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- पैलवान साक्षी मलिकच्या प्रशिक्षकाच्या बक्षिसावर चौघांचा दावा 
२१- भारताचे 8 गडी तंबूत; 339 धावांची आघाडी 
२२- "टाटां'ची 20 वर्षात 40 व्यवसायांतून 'एक्‍झिट’ 
२३- अज्ञान व्यक्तीने भरले करीना कपूरचे रिटर्न! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
===================
*दांडिया जल्लोष २०१६*

हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।

संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy

===================================

अजित डोभाल यांचं ऐका, नाहीतर जगाच्या नकाशावरुन नष्ट व्हाल - हसन निसार 

नवी दिल्ली : पाकिस्तानमधील वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हसन निसार यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. अजित डोभाल काय सांगतायेत ते ऐका, नाहीतर जगाच्या नकाशावरुन नष्ट व्हाल, असे म्हणत हसन निसार यांनी भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानला घरचा आहेर दिला आहे.
“भारताचे एनएसए अजित डोभाल जे सांगतायेत, ते मान्य करा. अन्यथा जगाच्या नकाशावरुन पाकिस्तान नष्ट होईल. पाकिस्तानात वेड्यांची सत्ता आहे. इथल्या लोकांना अणूबॉम्ब काय असतं, ते माहित नाहीय.”, अशा शब्दात हसन निसार यांनी पाकिस्तानला सुनावलं आहे.
“भारताची लोकसंख्या एक अब्जहून अधिक आहे आणि पाकिस्तानची लोकसंख्या केवळ 20 कोटी आहे. विचार करा, युद्ध झाल्यास काय  होईल? तुमचे 18 कोटी तर जातीलच. पण त्याचवेळी भारताचे चारपट जास्त लोक यात गेली, तरी 20 कोटी उरतील.”, असे हसन निसार म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “हा एकप्रकारचा मुर्खपणा आहे की, पाकिस्तानने स्वत:हून शत्रू निर्माण केले आहेत. आऊट ऑफ द वे जाऊन शत्रू केले आणि अण्वस्त्र तयार केले. अण्वस्त्र तयार केले आहेत. मात्र, इथल्या मुलांना शिक्षणासाठी पुस्तकं देत नाहीत, रुग्णांना औषधं देत नाहीत, लोकांना न्याय देत नाहीत.”
“पाकिस्तान येता-जाता भारताला अणूबॉम्बची धमकी देतो. मात्र, याचा कधीच विचार करत नाही की, भारताने पाकिस्तानविरोधात अण्वस्त्र हल्ला सुरु केला, तर पाकिस्तानचं काय होईल. पाकिस्तान जगाच्या नकाशावरुन नष्ट होईल आणि इतिहास बनून राहील.”, असे निसार म्हणाले.


===================================

गुजरातमध्ये किनाऱ्याजवळ संशयास्पद बोट, बोटीतील सर्वजण ताब्यात

गुजरातमध्ये किनाऱ्याजवळ संशयास्पद बोट, बोटीतील सर्वजण ताब्यात
अहमदाबाद : गुजरातच्या पोरबंदरजवळ भारतीय तटरक्षक दलाने एक संशयास्पद बोट पकडली आहे. आज सकाळी पकडलेल्या या बोटमधील 9 जणांना ताब्यात घेतलं आहे.

भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर किनाऱ्यालगतची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गुजरातमधील पोरबंदर किनाऱ्याजवळ भारतीय तटरक्षक दलाच्या ‘समुद्र पावक’ या जहाजावरील जवानांना संशयास्पद बोट भटकताना आढळली. सुरक्षेचा उपाय म्हणून या बोटीतील सर्वांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.

या संशयास्पद बोटीतील सर्वजण पाकिस्तानी मच्छीमार आसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तसंच पुढील चौकशीसाठी त्यांना पोरबंदरला नेण्यात आलं आहे, अशी माहिती गुजरातच्या नौदलातील विंग कमांडरकडून देण्यात आली आहे.


===================================

भुजबळांच्या समर्थनार्थ मोर्चाला सत्ताकाळातील समर्थकांनी पाठ

भुजबळांच्या समर्थनार्थ मोर्चाला सत्ताकाळातील समर्थकांनी पाठ?
नाशिक : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ उद्या नाशिकमध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. पण या मोर्चाला सत्ताकाळातील त्यांच्या समर्थकांनी पाठ फिरवल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे.

छगन भुजबळ यांची तब्येत सध्या बिघडलेली आहे. त्यातच राजकीय नेत्यांनी भुजबळांच्या भेटीचं सत्र सुरु केलं आहे. तसंच भुजबळांच्या समर्थनार्थ उद्या नाशिकमध्ये मोर्चाही आयोजित करण्यात आला आहे. शासनाने सुडबुद्धीतून भुजबळांवर कारवाई केल्याचा दावा समर्थकांनी केला आहे.

छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ काढण्यात येणारा मोर्चा कुठल्याही जाती-धर्मा विरुद्ध नसून केवळ भुजबळ समर्थकांचा विराट मोर्चा राहणार असल्याचं समर्थकांच्या बैठकीत जाहीर करण्यात आलं. सत्तेच्या काळात चिकटलेले अनेक जण अडचणीच्या काळात सोडून गेलेय याची खंत स्वत: छगन भुजबळांनाही आहे, असंही त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात आलं आहे.

===================================

मध्य प्रदेशात बस नदीत कोसळून 10 प्रवाशांचा मृत्यू

मध्य प्रदेशात बस नदीत कोसळून 10 प्रवाशांचा मृत्यू
भोपाळ : मध्यप्रदेशच्या विदिशामध्ये बस नदीत कोसळल्यामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताच्या वेळी बसमध्ये 30 ते 40 जण प्रवास करत असल्याची माहिती आहे.
नदीवरील पुलाचा कठडा तोडून बस नदीत कोसळली. बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातातील जखमींना शमशाबाद रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अपघातातील जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकारने उचलण्याचा निर्णय घेतला आहे. तर मृतांच्या नातेवाईकांना तात्काळ मदतीची घोषणा केली आहे.

===================================

पैलवान साक्षी मलिकच्या प्रशिक्षकाच्या बक्षिसावर चौघांचा दावा

पैलवान साक्षी मलिकच्या प्रशिक्षकाच्या बक्षिसावर चौघांचा दावा
नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिकची कांस्यविजेती पैलवान साक्षी मलिकच्या प्रशिक्षकाला देण्यात आलेली बक्षिसाची रक्कम कोणी घ्यायची यावरुन वाद निर्माण झाला आहे. दहिया आणि मनदीप यांच्याप्रमाणेच आणखी दोघांनी या रकमेवर दावा केला आहे.
साक्षीने पदक जिंकल्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी तिच्या प्रशिक्षकांना दहा लाख रुपयांचं इनाम जाहीर केलं होतं. हरियाणा सरकारच्या नियमांनुसार खेळाडूनं प्रतिज्ञापत्रात नावं दिलेल्या प्रशिक्षकांचाच पुरस्कारासाठी विचार केला जाऊ शकतो.
साक्षीनं दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ईश्वर दहिया आणि मनदीप सिंग यांचा उल्लेख आहे. दहिया यांनी साक्षीला सुरुवातीपासून प्रशिक्षण दिलं होतं तर सध्या ती मनदीप यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तर कुलदीप मलिक ब्राझिलला साक्षीसोबत गेले होते आणि राजबीर सिंग यांनी साक्षीला 2011 ते 2015 या कालावधीत प्रशिक्षण दिलं होतं. त्यामुळे त्यांनीही बक्षिसाच्या रकमेवर दावा केला आहे.

===================================

संघातून बाहेर पडलेल्या वेलिंगकरांचा नवा पक्ष

संघातून बाहेर पडलेल्या वेलिंगकरांचा नवा पक्ष
पणजी (गोवा) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून बाहेर पडल्यानंतर सुभाष वेलिंगकर यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. ‘भारतीय भाषा सुरक्षा मंच’ असं या पक्षाचं नाव आहे. गोव्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
गोव्यातील मराठी आणि कोकणी भाषेच्या अनुदानावरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मोठी फूट पडली होती. सुभाष वेलिंकरांनी यासंदर्भात केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर तोफही डागली होती. मात्र आता त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केलीय. गोवा विधानसभा निवडणुकीत हा पक्ष शिवसेनेसोबत जागा लढवणार आहे.
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची वेलिंगकरांवर टीका
“पक्ष काढताना आपल्या मागे किती लोक आहेत, हे पहिलं पहावं. येत्या निवडणुकीत कोण किती पाण्यात आहे हे कळेलच.”, अशी टीका मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सुभाष वेलिंगकर यांच्यावर केली आहे.

===================================

भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक अमरावतीऐवजी मुंबईत

भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक अमरावतीऐवजी मुंबईत
मुंबई: भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक अमरावतीऐवजी आता मुंबईत होणार आहे. येत्या 5 आणि 6 ऑक्टोबरला होणार असून गृह आणि नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हट्टापायी हा बदल करण्यात केल्याचे समजते.

डॉ. पाटील हे अमरावती पदवीधर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार आहेत. ही निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणे अपेक्षित होते. त्यामुळे या कार्यकारिणी बैठकीचा पाटील यांच्या निवडणुकीला फायदाच झाला असता. पण, निवडणूक आयोगाने मतदार याद्या नव्याने तयार करूनच ही निवडणूक घ्यावी, असे आदेश दिल्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलली गेली आहे.

त्यामुळे नवी मतदार नोंदणी करुन घेण्याचे काम भाजपासह सर्वच पक्षांना लागणार आहे. 1 ऑक्टोबरपासून एक महिना ही नोंदणी करावी लागणार असल्याने अमरावतीमध्ये होणारी बैठक मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासाठी कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन स्थळ बदलण्याची मागणी केली. त्याला दोघांनीही हिरवा कंदील दिल्याने ही बैठक मुंबईला होणार आहे.

===================================

चीननं ब्रम्हपुत्रेच्या उपनदीचं पाणी अडवलं, चीनकडून भारताची कोंडी

चीननं ब्रम्हपुत्रेच्या उपनदीचं पाणी अडवलं, चीनकडून भारताची कोंडी
नवी दिल्ली: चीनने तिबेटमध्ये सुरु असलेल्या आपल्या एका वीजनिर्मिती प्रकल्पासाठी ब्रम्हपुत्रा नदीच्या यरलुंग त्संगपो या उपनदीचे पाणी आडवले आहे. चीनच्या शिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चीन यापासून वीजनिर्मिती करणार असून, या नदीच्या पाण्याचा वापर सिंचनासाठी करणार आहे.

चीनने या नदीचे पाणी आडवल्याने भारत आणि बांगलादेश आदी देशांना अडचणींचा सामना करावा लागेल. कारण, यामुळे भारतातून वाहणाऱ्या या नदीच्या प्रवाहाच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांचे पाण्यासाठी हाल होणार आहेत.
तीन राज्यांवर परीणाम
यरलुंग त्संगपो या 2840 किलोमीटर लांब असलेल्या नदीचा उगम चीनमधील कैलास मानसरोवरात होतो. हीच नदी पुढे जाऊन भारतातून वाहणाऱ्या ब्रम्हपुत्रेला मिळते. ब्रम्हपुत्रा ही नदी भारतातील पूर्वोत्तर राज्यांतील अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि असम आदी राज्यातून वाहते. त्यामुळे या उपनदीचे पाणी आडवल्याने अरुणाचल प्रदेश आणि असमच्या नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे.
2019 पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित 
शिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, यरलुंग त्संगपो नदीवरील या वीजनिर्मिती प्रकल्पाचे काम 2014 मध्ये सुरु करण्यात आले, तर 2019 पर्यंत याचे काम पूर्ण होणार होते. मात्र तत्पूर्वीच चीनने या नदीचे पाणी आडवल्याने भारताची कोंडी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

पाकिस्तानकडून चीनच्या कुबड्या
भारताने सिंधू नदीचे पाणी आडवण्यासंबंधातील हालचाली सुरु केल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री सरताज अजीज यांनी भारताला ब्रम्हपुत्रा नदीचे पाणी आडवण्यावरुन धमकावलेही होते. कारण भारताने सिंधू नदीचे पाणी आडवले तर पाकिस्तानचा वाळवंट होऊ शकते. त्यामुळे अजीज यांनी चीनच्या कुबड्या घेऊन भारताला धमकावण्यास सुरुवात केली होती.

===================================

नागपुरात काँग्रेस नेत्यांकडून राष्ट्रगीताचा अवमान

नागपुरात काँग्रेस नेत्यांकडून राष्ट्रगीताचा अवमान
नागपूर: नागपुरात गांधी जयंतीच्या कार्यक्रमात काँग्रेस नेत्यांची राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा प्रकार घडला आहे. संपूर्ण राष्ट्रगीत सुरु असताना बसलेल्या नेत्यांना अखेरच्या दोन ओळी राहिल्या असताना जाग आली आणि ते उभे राहिले.

नागपुरातल्या चितार ओळीच्या गांधी पुतळ्याजवळ हा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमावेळी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, विजय वडेट्टीवार, माजी आमदार गेव्ह आवारी, आमदार सुनील केदार, माजी मंत्री नितिन राऊत हे या कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसले होते. शाळकरी मुलांनी राष्ट्रगीत सुरू केलं तरी नेतेमंडळींच्या गप्पा मारण्यात दंग होती.

शेवटी मध्येच नगरसेवक प्रफुल गुधडे यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी सर्वांना उभं केलं.

===================================

धरमशाला; पाकला दहशतवादी देश जाहीर करण्यासाठी त्याने रक्ताने लिहले पत्र



  • धरमशाळा, दि. २ - दहशतवादयांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला दहशतावादी देश जाहीर करण्यात यावे, या मागणीसाठी चक्क रक्ताने पत्र लिहण्यात आले आहे. भारतावर सतत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याला जनता देखिल कंटाळी आहे. यामळुचं धरमशाळा येथील कार्यकर्ते डॉ. महेश यादव यांनी आपल्या रक्ताने संयुक्त राष्ट्राच्या सचिवांना पत्र लिहिले आहे.
    यादव यांनी संयुक्त राष्ट्राचे सचिव बान की-मून यांना स्वत:च्या रक्ताने हिंदीमध्ये पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी पाकला दहशतवादी देश जाहीर करण्याची मागणी केली आहे. दरम्यान पाकव्याप्त काश्‍मिरमधील कोटली येथील स्थानिकांनी आज सकाळी पाकिस्तानचे लष्कर आणि आयएसआय करत असलेल्या अत्याचारांविरुद्ध रस्त्यावर येऊन निदर्शने केली आहेत.
  • ================================
  • रॉकेलचा काळाबाजार रोखण्यावर लक्ष -  केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली


    • नवी दिल्ली : अन्नधान्य आणि खतांची सबसिडी थेट लाभ्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नांनंतर केंद्र सरकार आता रॉकेलचा काळा बाजार आणि दुरुपयोग रोखण्यावर लक्ष देणार आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती शनिवारी दिली.
      एका कार्यक्रमात जेटली यांनी सांगितले की, देशाच्या काही भागात रॉकेलचा वापर इंधन म्हणून केला जातो. अनेक भागांत मात्र त्याचा दुरुपयोगच होतो. रॉकेलची मोठ्या प्रमाणात हेराफेरी होते. रॉकेलचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होतो. त्यामुळे राज्य सरकारे रॉकेल नियंत्रणमुक्त करण्यास इच्छुक आहेत. चंदीगड आणि हरियाणा ही राज्ये रॉकेलमुक्त झाली आहेत.
      जेटली म्हणाले की, रॉकेलचा पुरवठा तर्कसंगत बनविण्यासाठी आम्ही ठोस पावले हाती घेत आहोत. समाजाचा एक घटक आजही रॉकेलचा इंधन म्हणून वापर करीत असल्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी योग्य प्रणाली शोधावी लागणार आहे.

No comments: