Tuesday, 11 October 2016

नमस्कार लाईव्ह ११-१०-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- बीजिंग; वडिलांच्या मिठीमुळे इमारत कोसळूनही चिमुरडी वाचली 
२- दुसऱ्या फेरीनंतरही हिलरींची आघाडी
३- कॉन्ट्रॅक्ट थिअरी मांडणाऱ्या दोघांना अर्थशास्त्राचे नोबेल
४- पाकिस्तानचा काश्मीरला पाठिंबा, शरीफ पुन्हा बरळले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची गरज : अमिताभ 
६- संपूर्ण काश्मीर भारताचाच: सरसंघचालक मोहन भागवत 
७- मुंबईत विकासकाकडून फसवणूक, ग्राहकाची PMO कडून दखल 
८- सर्जिकल स्ट्राईकवरून सरसंघचालकांनी थोपटली मोदींची पाठ 
९- पाकिस्तानला होणारी कापूस निर्यात घसरली 
१०- 'बारामती'चं वाटोळं केल्याशिवाय शांत बसणार नाही : महादेव जानकर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
११- मीरा रोडमध्ये आणखी चार बनावट कॉल सेंटर्सवर छापा 
१२- भगवान गड व्हाया गोपीनाथ गड, पंकजा मुंडेंची आज सभा 
१३- हिरानंदानी रुग्णालय किडनी रॅकेट प्रकरणी चार्जशीट दाखल 
१४- ‘वेडिंग ऑन व्हिल्स’; महाराजा एक्स्प्रेसमधून शाही विवाहसोहळा पार पाडता येणार 
१५- भगवान बाबांच्या आजोळी नामदेव शास्त्रींना बंदी 
१६- ‘अच्छे दिन’च्या रणभेदी फुंकल्या तरी ‘रावणां’चा आकडा तेवढाच - उद्धव ठाकरे 
१७- पुढच्या दसरा मेळाव्याला महंतच मुलगी म्हणून गडावर बोलवतील : पंकजा 
१८- भगवानगडावर शक्तीप्रदर्शन नव्हे, भक्तीप्रदर्शन : एकनाथ खडसे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- पम्पोरमध्ये 24 तासांपासून चकमक सुरु, शासकीय इमारतीवर दहशतवादी हल्ला 
२०- मुंबईतल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी दिल्लीत खलबतं  
२१- पुण्यात महालक्ष्मीला तब्बल 14 किलोंची सोन्याची साडी 
२२- सप्तश्रुंगी गडावर बंदुकीची गोळी लागून तीन भाविक जखमी 
२३- अहंकाराचा, कारस्थानाचा बुरुज तुमच्यासाठी उतरले - पंकजा मुंडे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- इंटेक्सचा 32 इंच LED टीव्ही लाँच, किंमत रु. 16,490 
२५- लतादीदींनी दिल्या विराटला शुभेच्छा 
२६- चांगला पाऊस पडूनही खतांची विक्री घटली 
२७- भारताची 'विजयादशमी', अश्विनने केले किवीचे 'दहन' 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
========================================

संपूर्ण काश्मीर भारताचाच: सरसंघचालक मोहन भागवत 

संपूर्ण काश्मीर भारताचाच: सरसंघचालक मोहन भागवत
नागपूर: सर्जिकल स्ट्राईकनंतर सरकारला शाबासकी देणाऱ्या सरसंघचालकांनी आज अखंड काश्मीरची घोषणा केली. नागपूरमध्ये संघाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विजयादशमी मेळाव्यानंतर मार्गदर्शनपर भाषणात ते बोलत होते.

काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याचं काम सीमेपलिकडूनच सुरु आहे. पण पाकव्याप्त काश्मीरसह अखंड काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग असल्याचं मत मोहन भागवत यांनी मांडलं. मोदी सरकारने अलिकडेच केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचंही मोहन भागवत यांनी कौतुक केलं. शिवाय भारतानं पाकिस्तानला जगभरात एकटं पाडल्याचंही ते म्हणाले.

एकीकडे गोरक्षकांना कायद्याच्या चौकटीत राहण्याचे सल्ले देताना दुसरीकडे मोहन भागवत यांनी गोरक्षकांना पाठिंबाही दिला. गोरक्षकांनी बचावाचा प्रयत्न केल्याचं ते म्हणाले. इतकंच नाही, तर पशू रक्षणाच्या कायद्याचा भंग झाल्यास असे प्रकार घडतच राहणार, असंही ते म्हणाले.

दरम्यान, हे सरकार काम करणारं आहे. त्यामुळे नक्कीच बदल घडेल, असाही विश्वास मोदींनी व्यक्त केला.

========================================

भगवान गड व्हाया गोपीनाथ गड, पंकजा मुंडेंची आज सभा

भगवान गड व्हाया गोपीनाथ गड, पंकजा मुंडेंची आज सभा
अहमदनगर : पंकजा मुंडे आज भगवानगडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घेणार आहेत. नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडेंच्या भगवानगडावरील भाषणाच्या वादावादीनंतर आज काय परिस्थिती असेल याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.
पंकजा मुंडे सकाळी गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करतील. त्यानंतर 12 वाजण्याच्या सुमारास त्या भगवानगडावर पोहचतील. गोपीनाथ गड ते भगवान गड अशी रॅली काढण्यात येणार असून प्रीतम मुंडे त्याचं नेतृत्व करणार आहेत.
पंकजा मुंडेंना भगवान गडाच्या पायथ्याशी सभा घेण्याची परवानगी काल मिळाली. त्यामुळे भगवान गडावर दरवर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्याची परंपरा खंडीत झाल्याचं म्हटलं जात आहे. गडाच्या मालकीच्या जागेशिवाय अन्यत्र सभा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गडाच्या पायथ्याशी गेट नंबर 22 वर पंकजांची सभा होईल.

========================================

हिरानंदानी रुग्णालय किडनी रॅकेट प्रकरणी चार्जशीट दाखल 

हिरानंदानी रुग्णालय किडनी रॅकेट प्रकरणी चार्जशीट दाखल
मुंबई : पवईतील हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेटप्रकरणी पवई पोलिसांनी आरोपपत्र सादर केलं आहे. अंधेरी न्यायालयात एक हजार पानांची चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. यामध्ये दोन डॉक्टरांसह चार जणांना पोलिसांनी पसार घोषित केलं आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाचा अहवाल आल्यानंतर, दोन्ही डॉक्टरांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. किडनी रॅकेटमध्ये सहभाग असलेल्या ब्रिजकिशोर जयस्वाल यांचा मृत्यू झाल्याचाही आरोपपत्रात उल्लेख करण्यात आला आहे.
पवईच्या हिरानंदानी रुग्णालयात सुरु असलेल्या किडनी रॅकेटचा जुलै महिन्यात पदार्फाश करण्यात आला होता. पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करत रुग्णालयाचे सीईओ डॉ. सुजीत चॅटर्जी, डॉ. मुकेश शेट्टे, डॉ. मुकेश शहा, डॉ. प्रकाशचंद्र शेट्टी, डॉ. कर्नल अनुराग नाईक यांच्यासह आरोपी भजेंद्र हिरालाल भिसेन, ब्रिजकिशोर जयस्वाल, त्याचा पुत्र किशन जयस्वाल, इक्बाल सिद्धीकी, भारतभूषण शर्मा, निलेश कांबळे, ख्वाजा पटेल, युसूफना दिवाण, शोभना दिनेशभाई ठाकूर उर्फ शोभादेवी यांना अटक केली होती.
पवई रुग्णालय किडनी रॅकेटमधील आरोपी ब्रिजकिशोर जयस्वाल यांचा दरम्यानच्या काळात गुजरातमधील राहत्या घरी मृत्यू झाला होता. याच्या वैद्यकीय अहवालासोबतच अनेक पुरावे आरोपपत्रासोबत जोडले आहेत.

========================================
‘वेडिंग ऑन व्हिल्स’ या संकल्पनेसह महाराजा एक्स्प्रेसमधून शाही विवाहसोहळा पार पाडता येणार 
ट्रेनमध्ये शुभमंगल! आठ दिवसांचा राजेशाही प्रवास, किंमत...
मुंबई : डेस्टिनेशन वेडिंग हे सध्या अनेक विवाहोच्छुक जोडप्यांचं स्वप्न असतं. मात्र एकाच वेळी अनेक डेस्टिनेशन्सना भेट देत आयुष्याचा प्रवास हा प्रवासाने सुरु करण्याची संधी भारतीय रेल्वे देत आहे. ‘वेडिंग ऑन व्हिल्स’ या संकल्पनेसह महाराजा एक्स्प्रेसमधून शाही विवाहसोहळा पार पाडता येणार आहे.
राजेशाही लग्नसोहळ्यासाठी साडेपाच कोटी रुपये मोजण्याची तुमची तयारी असेल, तर आठ दिवसांचा हा प्रवास खास तुमच्यासाठी आहे. आयआरसीटीसीने वधू-वर आणि वऱ्हांडीसाठी हा सोहळा अविस्मरणीय बनवण्यासाठी चंग बांधला आहे.
महाराजा एक्स्प्रेसमध्ये 88 प्रवाशांसाठी आठ दिवसांचं लक्झरी वेडिंग पॅकेज उपलब्ध करुन देण्यात येईल. मुंबई ते दिल्ली हा प्रवासाचा मार्ग असेल. या प्रवासात अजंठा, उदयपूर, जोधपूर, बिकानेर, जयपूर, रणथंबोर, ग्वाल्हेर, लखनऊ, वाराणसी, खजुराहो आणि आग्रा यांचा समावेश असेल.
ट्रेनला 24 कोच असून त्यात 43 गेस्ट केबिन्स आहेत. यापैकी

========================================

मुंबईतल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी दिल्लीत खलबतं

मुंबईतल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी दिल्लीत खलबतं
नवी दिल्ली : मुंबईतल्या झोपडपट्टींच्या पुनर्वसनासंदर्भात दिल्लीत खलबतं झाली. भाजपच्या खासदारांची केंद्रीय जहाज आणि रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासोबत बैठक झाली.
यावेळी बीपीटीच्या जागेवरच्या 47 हजार झोपडपट्ट्याचं पुनर्वसन व्हावं यासाठी पाठपुरावा करण्यात आला. तसंच रेल्वेच्या जागेवर झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करण्यासाठी रेल्वेनं स्वतंत्र योजना राबवावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
संजय गांधी नॅशनल पार्कच्या परिसरातील इको सेन्सिटीव्ह बफर झोन कमी करुन 100 मीटरवर आणावा, अशी मागणी भाजप खासदारांनी जावडेकरांकडे केली आहे.

========================================
========================================
========================================
========================================
========================================
========================================
========================================
========================================
========================================

No comments: