Monday, 17 October 2016

नमस्कार लाईव्ह १७-१०-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, एक जवान शहीद 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
२- राज्याच्या 'डाळ दर नियंत्रण' विधेयकाच्या मसुद्याला केंद्राचा लाल दिवा 
३- सुप्रिया, राहुलसह 28 खासदारांना सर्जिकल स्ट्राईकची माहिती देणार 
४- गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती मृत्यू प्रकरणी आरोपी ड्रायव्हरवर खटला चालणार 
५- जातीय राजकारणातून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न: मनमोहन वैद्य 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
६- काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रिता बहुगुणा जोशी भाजपच्या मार्गावर? 
७- मैथिली जावकरकडून महिला आयोगातील पांडेंविरोधी केस मागे 
८- मुंबईच्या कापड बाजारातील कामगार आजपासून बेमुदत संपावर 
९- दिवाळीसाठी 600 जादा एसटी बस, तिकीट दरात मात्र वाढ 
१०- बडोलेंच्या मराठा मोर्चा संदर्भातील वक्तव्याला रामदास आठवलेंचं समर्थन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
११- जयपूर; लग्नाहून परतताना काळाचा घाला, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू 
१२- माजी नगराध्यक्ष सचिन शेळकेंच्या हत्येप्रकरणी चार जण ताब्यात
१३- वसई; एसीचा धूर वरच्या मजल्यावर गेल्याने गुदमरुन वृद्धाचा मृत्यू 
१४- कुस्तीपटू साक्षी मलिकचा प्रियकर सत्यव्रतसोबत साखरपुडा संपन्न! 
१५- पनवेल; प्रेयसीसोबत रिकाम्या इमारतीत जाण्यास रोखलं, प्रियकराची सुरक्षारक्षकाला मारहाण 
१६- जालना; भाजप जिल्हाध्यक्षांना 'अच्छे दिन', ‘स्कॉर्पिओ’ची दिवाळी भेट 
१७- उत्तराखंड - ट्रक अपघातात एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी 
१८- अनंतनाग; टीव्ही टॉवरची सुरक्षा करणा-या पोलिसांच्या बंदुका दहशतवाद्यांनी पळवल्या.
१९- उत्तराखंड- नेपाळच्या सीमावर्ती भागाला 4.0 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- मोटो झेड सीरिज आजपासून फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर 
२१- 'XXX 3' ट्रेलरमध्ये दीपिकाचा सुपरअॅक्शन अवतार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
===================================

राज्याच्या 'डाळ दर नियंत्रण' विधेयकाच्या मसुद्याला केंद्राचा लाल दिवा

राज्याच्या 'डाळ दर नियंत्रण' विधेयकाच्या मसुद्याला केंद्राचा लाल दिवा
नवी दिल्ली : राज्याच्या ‘डाळी दर नियंत्रण’ विधेयकाच्या मसुद्यातील काही तरतुदींना आक्षेप घेत केंद्र सरकारने तो राज्य सरकारला परत पाठवला आहे. त्यामुळे हा प्रस्तावित कायदा लांबणीवर पडणार आहे.
तूर, उडीद डाळीच्या दरांचा भडका उडून तो 200 ते 250 रुपयांच्या घरात गेल्याने मागील वर्षी हिवाळी अधिवेशानात राज्य सरकारने हा कायदा मंजूर केला होता. त्याचे प्रारुप तयार होण्यासाठी काही महिने झाल्यावर तो केंद्राच्या परवानगीसाठी पाठवण्यात आला होता.
या प्रस्तावाला केंद्र सरकारच्या गृह, अन्न आणि नागरीपुरवठा खात्यांच्या मंजुऱ्यांनंतर राष्ट्रपतींची मंजुरी अपेक्षित होती. मात्र शिक्षेच्या तरतुदीसह चार-पाच बाबींना केंद्राने काही आक्षेप घेऊन आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यासाठी, प्रस्ताव राज्य सरकारला परत पाठवला आहे.

===================================

लग्नाहून परतताना काळाचा घाला, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

लग्नाहून परतताना काळाचा घाला, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
फोटो : दिव्य मराठी
जयपूर : राजस्थानमध्ये झालेल्या कार अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लग्नाहून परतताना चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानंतर हा अपघात घडला.
गोयल कुटुंबातील तीन महिला आणि दोन चिमुरड्यांचा या अपघातात मृत्यू झाला. सादुल शहरातील नवीन कुमार गोयल विवाहित बहीण रितू आणि तिची मुलगी मारिया यांना सोडण्यासाठी अबोहरला चालला होता. त्यावेळी वाटेत हा अपघात घडला.
बठिंडाजवळ पहाटे पाच वाजता एका प्राण्याला वाचवण्याच्या नादात नवीन यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी एका ऑईल टँकरला धडकून हा भीषण अपघात घडला.
अपघातात नवीन यांची बहिण रितू, तिची मुलगी मारिया, नवीन यांची आई निर्मला, पत्नी गरिमा आणि मुलगा गणेश यांचा मृत्यू झाला. नवीन आणि गरिमा यांची दुसरी मुलगी आलिना गंभीर जखमी झाली आहे.

===================================

सुप्रिया, राहुलसह 28 खासदारांना सर्जिकल स्ट्राईकची माहिती देणार

सुप्रिया, राहुलसह 28 खासदारांना सर्जिकल स्ट्राईकची माहिती देणार
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची माहिती 28 खासदारांनी देण्यात येणार आहे. या 28 जणांमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा समावेश आहे.
परराष्ट्र सचिव आणि डीजीएमओ दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या सर्जिकल स्ट्राइकबद्दल परराष्ट्र मंत्रालयाच्या संसदीय समितीला माहिती देतील. काँग्रेसचे दिग्गज नेते शशी थरुर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत राहुल गांधी, वरुण गांधी, सुप्रिया सुळे यांच्यासह 28 खासदारांचा समावेश आहे.
लोकसभा सचिवालयाच्या माहितीनुसार परराष्ट्र मंत्रालयाच्या संसदीय समितीची मंगळवारी बैठक होईल. या बैठकीत परराष्ट्र सचिव, संरक्षण सचिव आणि लष्करी कारवाईचे महासंचालक (डीजीएमओ) हे खासदारांना सर्जिकल स्ट्राइकबाबत माहिती देतील. संसदीय समितीला अशी माहिती देण्यास सरकारने आधी नकार दिला होता.
भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये 28 सप्टेंबरला सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी सरकारला पाठिंबा दर्शवला होता. मात्र अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्ट्राईकबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

===================================

माजी नगराध्यक्ष सचिन शेळकेंच्या हत्येप्रकरणी चार जण ताब्यात

माजी नगराध्यक्ष सचिन शेळकेंच्या हत्येप्रकरणी चार जण ताब्यात
पिंपरी-चिंचवड : तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या हत्येप्रकरणी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हल्लेखोरांनी रविवारी सकाळी सचिन शेळके यांना अडवून बंदुकीचा धाकाने गाडीतून खाली उतरवलं. त्यानंतर शेळकेंवर कोयत्याने वार करुन गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली.
निवडणुकीच्या तोंडावरच हा प्रकार घडल्यामुळे तळेगावमध्ये तणावाचे वातावरण आहे.
पूर्ववैमनस्यातून सचिन शेळकेंचा खून केल्याच्या आरोपाखाली श्याम रामचंद्र दाभाडे याच्यासह दहा जणांवर भारतीय दंड विधान कलम 302, 34 भारतीय आर्म्स अॅक्ट 352, 427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंटी दाभाडे, खंडू पचपिंड, संदीप पचपिंड आणि आकाश लोखंडे या चौघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
भाजप नेते सचिन शेळकेंवर वार केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. हल्लेखोर कोण आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेळकेंना पवना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
खांडगे पेट्रोल पंपासमोर सकाळी सव्वाअकराच्या सुमारास ही घटना घडली. सकाळी शेळके हे पेट्रोल पंपासमोरून त्यांच्या कारमधून येत होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अडवून बंदुकीचा धाक दाखवून गाडीतून खाली उतरवले. त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने वार करून गोळ्या झाडल्या.
यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शेळकेंना पवना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचरादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

===================================

No comments: