Tuesday, 25 October 2016

नमस्कार लाईव्ह २५-१०-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांचे नवी दिल्लीत आगमन. 
२- जम्मू-काश्मीर- आरएस पुरामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- यूपीत 'यादवी' : हकालपट्टी केलेल्या चारही मंत्र्यांची कॅबिनेटमध्ये वापसी होणार 
४- राहुल गांधी लवकरच होणार कॉंग्रेसचे अध्यक्ष! 
५- मल्ल्या यांनी परदेशातील मालमत्ता जाहीर करावी - सर्वोच्च न्यायालय 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
६- महायुतीत आणखी एका पक्षाची मोट, जनसुराज्यचा समावेश होणार 
७- दिवाळीपूर्वी खड्डे बुजवा, मुंबई पालिकेला हायकोर्टाने झापलं 
८- 2017च्या निवडणुकीतील बहुमतानंतर मुख्यमंत्र्याचा निर्णय : मुलायम 
९- आरोपांबाबत मला बोलण्याची संधीच मिळाली नाहीः तुकाराम मुंढे 
१०- ओडिशा- पुलावरून नदीत बस कोसळून चार जणांचा मृत्यू 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
११- तुकाराम मुंढेंविरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांची पोलिसात धाव 
१२- बुरख्याच्या आत चोरकप्पा, अचाट चोरी CCTV मध्ये कैद 
१३- सांगली :ताकारी, म्हैसाळ उपसासिंचन योजनांसाठी १६०० कोटी मंजू 
१४- जळगाव: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ.पी.पी.पाटील 
१५- रायगड : राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष अश्विनीताई पाटील यांचा भाजपात प्रवेश 
१६- जळगाव: बसस्थानकामध्ये सव्वा लाख रुपये किमतीचा खवा जप्त 
१७- लातूरमध्ये तीन जणांना ३ रिव्हॉल्व्हरसह अटक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- मॉडेल अर्शी खान पुण्यातील सुधारगृहातून पळाली 
१९- अॅपलचं नवं स्मार्टवॉच 28 ऑक्टोबरपासून भारतात उपलब्ध 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
=======================================

तुकाराम मुंढेंविरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांची पोलिसात धाव

तुकाराम मुंढेंविरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांची पोलिसात धाव
नवी मुंबई: आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर, सर्वपक्षीय नगरसेवकांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे.
तुकाराम मुंढे यांना नवी मुंबई महापालिकेत येण्यास मज्जाव करावा, अन्यथा कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असं महापौर सुधाकर सोनावणे आणि सर्वपक्षीय नगरसेवकांनी पोलिसांत म्हटलं आहे.

=======================================

महायुतीत आणखी एका पक्षाची मोट, जनसुराज्यचा समावेश होणार

महायुतीत आणखी एका पक्षाची मोट, जनसुराज्यचा समावेश होणार
मुंबई : महायुतीत आणखी एक पक्ष दाखल होण्याच्या तयारीत आहेत. विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष महायुतीत सामील होणार आहे. महायुतीत शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, स्वाभिमानी आणि शिवसंग्राम पक्ष आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य पक्ष महायुतीत सहभागी होणार आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर या तीन जिल्ह्यांत होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत जनसुराज्यशक्ती पक्ष भाजपबरोबर युती करणार आहे.
मुंबईत उद्या यासंदर्भात घोषणा करण्यात येणार आहे. विनय कोरे हे वारणा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष असून दूध आणि साखर व्यवसायात त्यांचा जम बसला आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात त्यांचा प्रभाव आहे.
विनय कोरे यांनी अपारंपरिक ऊर्जा आणि फलोत्पादन या खात्याचे मंत्री म्हणून जबाबदारी निभावली आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते.

=======================================

मॉडेल अर्शी खान पुण्यातील सुधारगृहातून पळाली

मॉडेल अर्शी खान पुण्यातील सुधारगृहातून पळाली
पुणे : मॉडेल अर्शी खान पुण्यातील हडपसरच्या महिला सुधारगृहातून पळून गेली आहे. अर्शीने दलालांच्या मदतीने पलायन केल्याचं म्हटलं जात आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल सर्विस सेलने एका हॉटेलमधून अर्शी खानला अटक केली होती. तिच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तिची रवानगी हडपसरच्या महिला सुधारगृहात करण्यात आली होती. आज मात्र एका दलालाच्या मदतीने तिने त्या सुधारगृहातून पळ काढला.
या सुधारगृहातून गेल्या काही दिवसात अशा पद्धतीने अनेक महिला पळून गेल्या आहेत.

=======================================

No comments: