[अंतरराष्ट्रीय]
१- हाफिजला का पाळलंय? शरीफना पक्षाकडून घरचा अहेर
२- सौदीतील जेद्दामधला स्फोट बीडच्या फैय्याजनं घडवला?
३- सर्जिकल स्ट्राईक झाला : पाक सुरक्षातज्ज्ञ
४- भारत-पाक सीमेवर लवकरच काँक्रिट भिंत उभारणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- जम्मूवरुन दोन अतिरेकी दिल्लीकडे निघाले?
६- शहिदांच्या रक्ताची दलाली करत आहेत: राहुल गांधी
७- सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्यांना संरक्षण मंत्र्यांचं उत्तर
८- सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्यांवर अक्षय भडकला!
९- आम्ही 4 वेळा सर्जिकल स्ट्राईक केेला, पण गवगवा केला नाही : शरद पवार
१०- काळ्या पैशाच्या मुद्यावर भारताला हवे स्वित्झर्लंडकडून आणखी सहकार्य
११- भारतीय बँका बुडीत कर्जांमुळेच कमजोर - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१२- मुंबईकर आता हवेतूनही प्रवास, लवकरच 'रोप वे' दिमतीला
१३- कोपर्डी बलात्कारप्रकरणी आज आरोपपत्र दाखल होणार?
१४- बिहारमधील मराठी 'सिंघम' शिवदीप लांडेंची महाराष्ट्रात प्रतिनियुक्ती
१५- काही नेत्यांना सत्ता गेली की जात आठवते: नितीन गडकरी
१६- दिवाळीसाठी मध्य रेल्वेच्या 92 विशेष गाड्या
१७- आमच्या कुंडल्या आहे तर कोणता शनी आडवा येतो?: विखे-पाटील
१८- नवी मुंबईत पार्किंगविना फ्लॅटला परवानगी नाही : हायकोर्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, मनसेच्या नगरसेवकांविरोधात गुन्हे दाखल
२०- ठाणे महापालिका निवडणुकांसाठीचं आरक्षण आधीच फुटलं, मनसेचा आरोप
२१- ठाणे; प्रेतासोबत सेक्स करणारा आरोपी रिमांड होममधून पळाला
२२- गुडगाव; मोबाईलच्या फ्लॅश लाइटमध्ये जन्मला 'वंशाचा दिवा'
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- अश्विन, जाडेजाला विश्रांती, वन डे टीममधून धवनला वगळलं
२४- फिटनेस टेस्ट उत्तीर्ण तरीही युवीला संघात स्थान नाही!
२५- मोटो Z आणि मोटो G4 सीरिजला अँड्रॉईड 7.0 नोगट अपडेट
२६- सुरेश रैनाचे न्यूझीलंडविरुद्ध मालिकेसाठी वनडे संघात पुनरागमन
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स*
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा.
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
======================================
१- हाफिजला का पाळलंय? शरीफना पक्षाकडून घरचा अहेर
२- सौदीतील जेद्दामधला स्फोट बीडच्या फैय्याजनं घडवला?
३- सर्जिकल स्ट्राईक झाला : पाक सुरक्षातज्ज्ञ
४- भारत-पाक सीमेवर लवकरच काँक्रिट भिंत उभारणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- जम्मूवरुन दोन अतिरेकी दिल्लीकडे निघाले?
६- शहिदांच्या रक्ताची दलाली करत आहेत: राहुल गांधी
७- सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्यांना संरक्षण मंत्र्यांचं उत्तर
८- सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्यांवर अक्षय भडकला!
९- आम्ही 4 वेळा सर्जिकल स्ट्राईक केेला, पण गवगवा केला नाही : शरद पवार
१०- काळ्या पैशाच्या मुद्यावर भारताला हवे स्वित्झर्लंडकडून आणखी सहकार्य
११- भारतीय बँका बुडीत कर्जांमुळेच कमजोर - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१२- मुंबईकर आता हवेतूनही प्रवास, लवकरच 'रोप वे' दिमतीला
१३- कोपर्डी बलात्कारप्रकरणी आज आरोपपत्र दाखल होणार?
१४- बिहारमधील मराठी 'सिंघम' शिवदीप लांडेंची महाराष्ट्रात प्रतिनियुक्ती
१५- काही नेत्यांना सत्ता गेली की जात आठवते: नितीन गडकरी
१६- दिवाळीसाठी मध्य रेल्वेच्या 92 विशेष गाड्या
१७- आमच्या कुंडल्या आहे तर कोणता शनी आडवा येतो?: विखे-पाटील
१८- नवी मुंबईत पार्किंगविना फ्लॅटला परवानगी नाही : हायकोर्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, मनसेच्या नगरसेवकांविरोधात गुन्हे दाखल
२०- ठाणे महापालिका निवडणुकांसाठीचं आरक्षण आधीच फुटलं, मनसेचा आरोप
२१- ठाणे; प्रेतासोबत सेक्स करणारा आरोपी रिमांड होममधून पळाला
२२- गुडगाव; मोबाईलच्या फ्लॅश लाइटमध्ये जन्मला 'वंशाचा दिवा'
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- अश्विन, जाडेजाला विश्रांती, वन डे टीममधून धवनला वगळलं
२४- फिटनेस टेस्ट उत्तीर्ण तरीही युवीला संघात स्थान नाही!
२५- मोटो Z आणि मोटो G4 सीरिजला अँड्रॉईड 7.0 नोगट अपडेट
२६- सुरेश रैनाचे न्यूझीलंडविरुद्ध मालिकेसाठी वनडे संघात पुनरागमन
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स*
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा.
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
======================================
मुंबईकर आता हवेतूनही प्रवास, लवकरच 'रोप वे' दिमतीला
मुंबई: उपनगरांमधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकारक आणि आरामदायी करण्यासाठी एमएमआरडीएनं आता ‘रोप वे’चा पर्याय समोर ठेवला आहे. पाश्चात्य देशांप्रमाणेच सर्वांचंच आकर्षण असलेले ‘रोप’ने आता मुंबई ते घाटकोपर आणि बोरीवली ते ठाणे दरम्यान उभारण्याची योजना एमएमआऱडीएनं हाती घेतली आहे.
मेट्रो, मोनोसारख्या प्रकल्पांमधून लाखो प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला. मात्र एवढ्यावरच न थांबता कमी वेळेत प्रवासाची सोय उपलब्ध करण्यासाठी ‘रोप वे’चा पर्याय एमएमआरडीएनं हाती घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या प्रकल्पाची संकल्पना मांडली असून त्यांच्याच सूचनेनुसार तीन प्रकल्पांची आखणी करण्यात आली आहे.
या मार्गांवरुन रोप वेने प्रवास
मार्ग
|
रोप वेचं अंतर
|
प्रस्तावित खर्च
|
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते ठाणे घोडबंदर रोड
|
11 किमी
|
सुमारे १२०० ते १५०० कोटी रुपये
|
वाशीच्या सागर विहार जेटी ते घाटकोपर बस डेपो
|
8 किमी
|
800 ते 900 कोटी रुपये
|
भिवपुरी रोड स्थानक ते माथेरानमधील गार्बेट लॉर्डस गार्डन
|
3.5 किमी
|
======================================
सौदीतील जेद्दामधला स्फोट बीडच्या फैय्याजनं घडवला?
मुंबई : सौदी अरबच्या जेद्दामध्ये झालेला आत्मघातकी स्फोट, हा मूळचा बीडचा रहिवासी असलेल्या फैय्याज कागजीने घडवून आणल्याचा संशय तपास पथकांना आहे.
याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी केंद्राला पत्र लिहून, मृत अतिरेकी अब्दुल्ला कलझर खान आणि फैय्याज कागजी यांचा काही संबंध आहे का? याची खातरजमा सौदी अरबच्या दूतावासाकडून करुन घेण्यासाठी पत्र लिहिलं आहे.
4 जुलै रोजी सौदीमध्ये झालेल्या साखळी आत्मघातकी स्फोटांमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी 19 जणांना अटक करण्यात आली होती. यामध्ये 12 पाकिस्तानी आणि 7 सौदी आरोपींचा समावेश होता. पण हा आत्मघातकी हल्ला अब्दुल्ला कलझर खान या पाकिस्तानी वंशाचा नागरिकाने घडवून आणल्याचा दावा आहे. पण हा अब्दुल्ला हाच बीडचा फय्याज कागजी असल्याचा संशय आहे. त्यामुळे तपासाची चक्रे आता बीडमध्ये येऊन थांबली आहे.
फैय्याज कागजी हा शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांच्या रडारवर होता. पण 2006 साली तो बांगलादेशमार्गे पाकिस्तानात गेला. तिथून त्याने अबू जुंदालसह मुंबईवरच्या अतिरेकी हल्ल्याच्या प्लॅनिंगमध्ये भाग घेतल्याचाही आरोप आहे. त्याच कागजीचे डीएनए सॅम्पल्स मिळवून, फय्याजच्या आई वडिलांच्या डीएनएशी तपासून पाहिले जाणार आहेत.
======================================
जम्मूवरुन दोन अतिरेकी दिल्लीकडे निघाले?
नवी दिल्ली: भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर देशात घातपाताची शक्यता लक्षात घेता, अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यातच जम्मू काश्मीरमध्ये घुसलेले दोन अतिरेकी दिल्लीकडे निघाल्याची माहिती मिळत आहे.
खाजगी वाहनाने हे अतिरेकी दिल्लीकडे कूच करत आहेत. हे दहशतवादी दिल्लीत घातपात घडवण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीत रेडअलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिल्लीत चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. प्रत्येक टोल, मेट्रो स्टेशन आणि खाजगी वाहनांची कसून चौकशी सुरु आहे.
======================================
कोपर्डी बलात्कारप्रकरणी आज आरोपपत्र दाखल होणार?
अहमदनगर: कोपर्डी बलात्कारप्रकरणी आज आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे. आरोपपत्र दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळं काल उशिरापर्यंत अहमदनगर पोलिसांकडून यासंबंधीचे काम सुरु होते.
साधारणत: 300 पानांचे हे आरोपपत्र असण्याची शक्यता आहे.
कोपर्डी बलात्कारप्रकरणी महिनाभरात चार्जशीट दाखल करु, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र कोपर्डी घटनेला 86 दिवस झाले आहेत. तरीही आरोपींवर चार्जशीट दाखल झालेलं नाही.
नियमाप्रमाणे जर एखाद्या गुन्ह्यात 90 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल झालं नाही, तर आरोपींना जामीन मिळण्याचीही शक्यता असते.
आरोपपत्र दाखल होत नसल्यानं विरोधी पक्ष आणि मराठा संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळेच स्वत: मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणाची दखल घेतली आहे.
पोलिसांच्या आरोपपत्रात नेमका काय उल्लेख आढळतो, किती जणांना आरोपी करण्यात येते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
कोपर्डीत चिमुकलीवर पाशवी बलात्कार
कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात 13 जुलैला अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या नराधमांना अटक करण्यात आली आहे.
======================================
सर्जिकल स्ट्राईक झाला : पाक सुरक्षातज्ज्ञ
नवी दिल्ली: भारतीय राजकारण्यांकडून सर्जिकल स्ट्राईकच्या पुराव्यांविषयी विचारणा होत असतानाच, पाकिस्तानच्या सुरक्षातज्ज्ञ आयशा सिद्धिका यांनी सर्जिकल स्ट्राईकला दुजोरा दिला आहे.
भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचं सिद्धिका यांनी एबीपीशी बोलताना स्पष्ट केलं.
भारतीय सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तसंच काही पाकिस्तानी सैनिकही यादरम्यान ठार झाल्याचं आयशा यांनी मान्य केलं.
त्यांनी भारतीय सैन्याच्या सर्जिकल ऑपरेशनबद्दल काही पुरावे गोळा केले आहेत. ज्या आधारे त्यांनी भारतीय सैनिकांनी केलाला सर्जिकल स्ट्राईक मान्य केला आहे.
======================================
बिहारमधील मराठी 'सिंघम' शिवदीप लांडेंची महाराष्ट्रात प्रतिनियुक्ती
मुंबई: बिहारचा सिंघम अशी ओळख असलेल्या मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात येणार आहे.
शिवदीप लांडे यांनी वैयक्तिक कारणासाठी महाराष्ट्रात नियुक्तीची विनंती केली होती. त्यानुसार पुढील तीन वर्षासाठी लांडे यांना महाराष्ट्रात पाठवण्यात येणार आहे.
2006च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या शिवदीप लांडे हे सध्या बिहारच्या स्पेशल टास्क फोर्समध्ये अधीक्षक आहे. त्यांच्या बेधडक कामाच्या पद्धतीमुळं ते बिहारमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहे.
======================================
शहिदांच्या रक्ताची दलाली करत आहेत: राहुल गांधी
नवी दिल्ली: सर्जिकल स्ट्राईकनंतर भाजप सरकार शहिदांच्या रक्ताची दलाली करत असल्याचं वादग्रस्त विधान काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलं आहे.
पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले की, ‘आमच्या ज्या जवानांनी जम्मू काश्मीरमध्ये आपले प्राण दिले, सर्जिकल स्ट्राईक केलं त्यांच्या खुनाची तुम्ही दलाली करीत आहे. ही गोष्ट अतिशय चूक आहे.’
एवढं बोलूनच राहुल गांधी थांबले नाही. तर त्यांनी पंतप्रधान मोदींना सल्लाही दिला. ‘लष्करानं आपलं काम केलं आहे, तुम्ही तुमचं काम करा.’
सर्जिकल स्ट्राईकनंतर राहुल गांधींनी मोदींचं आधी कौतुकही केलं होतं. सहा दिवसांपूर्वीच राहुल गांधी म्हणाले होते. की, ‘जेव्हा पंतप्रधान एका पंतप्रधानासारखं काम करतात तेव्हा मी त्यांचं समर्थन करतो. मी त्यांचे आभार मानतो की, त्यांनी अडीच वर्षात पहिलीच अशी अॅक्शन घेतली आहे जी पंतप्रधानपदाला साजेशी आहे. आणि माझं त्यांना पूर्ण समर्थन आहे.’
राहुल गांधींच्या किसान यात्रेचा आज शेवटचा दिवस होता. ही यात्रा 26 दिवस सुरु होती.
======================================
काही नेत्यांना सत्ता गेली की जात आठवते: नितीन गडकरी
मुंबई: ‘सत्ता असताना कधीही जातीचं भले न करणाऱ्या काही नेत्यांना सत्ता गेली की जात आठवते.’ अशा शब्दात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समाचार घेतला आहे.
‘भाजपसाठी गरीब माणूस केंद्रबिंदू आहे आणि असा विषमतामुक्त समृद्ध देश निर्माण करायचा आहे. ज्यात कुणालाही आरक्षण मागायची वेळ येणार नाही.’ असं सांगालयाही ते विसरले नाहीत. राज्य कार्यकारणीच्या बैठकीत बोलताना गडकरींनी हे वक्तव्य केलं.
‘सरकारची चांगली काम कार्यकर्त्यांनी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवावं. विकास हेच विरोधकांना उत्तर आहे.’ असंही सांगण्यास गडकरी विसरले नाही.
======================================
दिवाळीसाठी मध्य रेल्वेच्या 92 विशेष गाड्या
मुंबई: दिवाळीसाठी मध्य रेल्वेने 92 विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. यामध्ये मुंबई-जम्मूतावी, मुंबई-वाराणसी, मुंबई-गया, मुंबई-हाटिया, दादर-सावंतवाडी आणि दादर-रत्नागिरी या मार्गांचा समावेश आहे. यातील 48 गाड्या कोकण मार्गावर चालवण्यात येणार आहेत.
दादर-सावंतवाडी (0113) ही गाडी 21 ते 30 ऑक्टोबरमध्ये रविवार, मंगळवार, शुक्रवारी चालवण्यात येणार असून या गाडीच्या 10 फेऱ्या असतील. ही गाडी दादरहून स. 7.50 वाजता सुटून त्याच दिवशी रात्री 8 वाजता सावंतवाडीला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी 0114 सावंतवाडी-दादर गाडी सोमवार, बुधवार, शनिवारी सावंतवाडीहून स. 6.40 वा. सुटून त्याच दिवशी सायं. 4.30 वाजता दादरला पोहोचेल.
दादर-सावंतवाडी (01095/96) ही गाडी 1 ते 30 नोव्हेंबर दरम्यान चालवली जाणार आहे. तिच्या 26 फेऱ्या चालवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले. 01095 ही दादर-सावंतवाडी गाडी रविवार, मंगळवार, शुक्रवारी दादरहून स. 7.50 वाजता सुटून त्याच दिवशी सावंतवाडी येथे रात्री आठ वाजता पोहोचेल. 01096 सावंतवाडी-दादर सोमवार, बुधवार आणि शनिवारी सावंतवाडीतून स. 5.30 वाजता सुटून त्याच दिवशी दु. 3.50 वाजता दादरला पोहोचेल.
======================================
सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्यांना संरक्षण मंत्र्यांचं उत्तर
नवी दिल्ली: सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या विरोधकांना संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्यदलाने सर्जिकल स्ट्राईक 100 टक्के यशस्वी केलं. विशेष म्हणजे याचे पुरावे आम्हाला द्यायची गरज नाही, कारण सध्या पाकिस्तानच याचं उत्तर देत आहेत, असे ते म्हणाले.
एका कार्यक्रमानिमित्त आग्र्यात आलेल्या मनोहर पर्रिकरांचे एखाद्या युद्ध जिंकून आलेल्या जवानांप्रमाणे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना ”काही लोक सध्या सैन्यदलाकडून पुरावे सादर करण्याची मागणी करत आहेत. पण आम्ही त्यांच्यासमोर कसलेही पुरावे सादर करणार नसल्याचे,” त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने पाकिस्तानचा सर्जिकल स्ट्राईक संदर्भातील खोटारडेपणा उघडा पाडण्यासाठी पुरावे सादर करण्याची मागणी होत आहे. त्यासंदर्भात बोलताना पर्रिकरांनी ही प्रतिक्रीया दिली.
======================================
No comments:
Post a Comment