[अंतरराष्ट्रीय]
१- सर्जिकल स्ट्राईक काय असतात आम्ही दाखवू, हाफिज सईदची दर्पोक्ती
२- अमेरिकेपाठोपाठ ब्रिटनकडून पाकला 'दहशतवादी देश' घोषित करण्याची प्रक्रिया सुरू
३- सर्जिकल स्ट्राईक काय असतात भारताला दाखवू, हाफिज सईदने ओकली गरळ
४- 'उरी' हल्ल्यानंतर घाबरलेल्या पाकिस्तानने आधीच हलवले दहशतवाद्यांचे तळ
५- फवाद खान बरळला, 'बॉलिवूड कोणाच्या बापाचं नाही'
६- जिहादी भारतावर करतील अण्वस्त्रांचा हल्ला - हिलरी क्लिंटन
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
७- सर्जिकल स्ट्राईकनंतर दहशतवाद्यांना धडकी, पाकव्याप्त काश्मीरमधून पळ
८- चंदू चव्हाण यांना भारतात नक्की परत आणू: राजनाथ सिंह
९- पेट्रोलच्या दरात वाढ, डिझेल मात्र स्वस्त
१०- एटीएमद्वारे बूक करा विमानाचं तिकीट आणि खरेदी करा सोन्याची नाणी
११- सेन्सेक्सची ४६५ अंकांनी घसरण
१२- उच्च न्यायालयाचा आदेश पाळायला व्हॉट्स अॅपचा नकार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१३- मराठवाड्यात पुन्हा जोरदार पावसाची हजेरी, पिकांना फटका
१४- आजपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ
१५- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 'गोल्डन अवर्स', अवजड वाहनांना बंदी
१६- देशात तब्बल 65 हजार कोटींचा काळा पैसा, मुंबई दुसऱ्या नंबरवर
१७- बबनराव पाचपुतेंना दणका, हिरडगावचा साईकृपा कारखाना जप्त
१८- 'आधुनिक वाल्मिकी' अर्थात ग.दि.माडगूळकर जयंती
१९- अबू आझमींनी केले सल्लूमियाँच्या भूमिकेचे समर्थन
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२०- सुधाकर शिंदे पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी
२१- पुण्यात कस्टमकडून एक कोटीचे ड्रोन पकडले
२२- औरंगाबादमध्ये कुऱ्हाडीने पोलिस कॉन्स्टेबलचा हात धडावेगळा
२३- पुण्यात तीन अल्पवयीन मुलींची आत्महत्या
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- न्यूझीलंडची खराब सुरुवात, फक्त 17 धावांवर 2 गडी तंबूत
२५- बांगलादेशला हरवून भारतीय युवा ‘आशिया चॅम्पियन’
२६- आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विघ्नेशचे कांस्यपदक
२७- कपिलने केला दुसऱ्या कसोटीचा शुभारंभ
२८- ..म्हणून आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवणे अवघड - महेश भूपती
२९- शिखर धवनच्या खराब फॉर्मवरून ट्विटरवर खिल्ली
३०- सलमानच्या चित्रपटांवर बहिष्कार टाका, राज ठाकरेंचा हल्लाबोल
३१- सलीम खान यांनी सलमानला घरात कोंडून ठेवावं: शिवसेना
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स*
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा.
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*दांडिया जल्लोष २०१६*
हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।
संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
================================

सर्जिकल स्ट्राईक काय असतात आम्ही दाखवू, हाफिज सईदची दर्पोक्ती
इस्लामाबाद : उरी हल्ल्याचा भारतीय सैन्याने वचपा काढल्यानंतर काल पाकिस्तानमधला जमात-उद-दावाचा म्होरक्या आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईदने पुन्हा एकदा गरळ ओकली. उरी हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये 38 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याने तिळपापड झालेल्या सईदने सर्जिकल स्ट्राईक काय असतात, हे आम्ही भारताला दाखवू अशी धमकी दिली आहे.
शुक्रवारी फैसलाबादमध्ये सईदच्या सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी त्याने भारताला धमकी देताना भारतीय माध्यमांवरही आगपाखड केली. तो म्हणाला की, ” उरी हल्ल्यानंतर भारतीय माध्यमांनी केवळ त्यांचे 20च जवान मारले गेल्याचा दावा केला. पण हे साफ खोटं आहे. या हल्ल्यात 177 हून अधिक भारतीय ठार झाले आणि इतर अनेकजण जखमी झाले. आमच्यावर सूड उगवण्यासाठी एक झलक दाखवण्यात आली. यासाठी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले. पण आम्ही सर्जिकल स्ट्राईक कशाला म्हणतात, हे भारताला दाखवून देऊ असं तो म्हणाला. यावेळी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनाही लक्ष्य केलं.
================================
सुधाकर शिंदे पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी
मुंबई : नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी सुधाकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुधाकर शिंदे हे सध्या नगरविकास विभागात उपसचिव आहेत. सुधाकर शिंदे हे राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचे बंधू आहेत.
नगरपालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी मंगेश चितळे महापालिकेचे नवे उपायुक्त असतील, अशी आधीच घोषणा झाली होती. मात्र, आयुक्त कोण असतील, याबाबत उत्सुकता होती. अखेर सुधाकर शिंदे यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पनवेल नगरपालिका ते पनवेल महापालिका
देशातील पहिली नगरपालिका म्हणून ओळख असेलल्या पनवेल नगरपालिकेची स्थापना 25 ऑगस्ट 1852 रोजी झाली. वाढत्या शहरीकरणामुळे पनवेलचं आता महापालिकेत रुपांतर करण्यात आले आहे. खरंतर महापालिका करण्याची मागणी गेल्या 25 वर्षांपासूनची होती. मात्र, अखेर पनवेलकरांच्या मागणीला न्याय मिळाला. राज्यातील 27 वी आणि रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका म्हणून पनवेल ओळखले जाणार आहे.
================================
मराठवाड्यात पुन्हा जोरदार पावसाची हजेरी, पिकांना फटका
पाहा मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पावसाच्या लाईव्ह अपडेटः
लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात 75 मिमी पावसाची नोंद, नद्या-नाल्यांना पूर
बीड जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन, यंदा सरासरीच्या 111.1 टक्के पावसाची नोंद, सर्वच तालुक्यात पाऊस
तेरणा नदीवरील आठही उच्च स्तरीय बंधाऱ्याची दरवाजे उघडले. नदी पात्रात चार मीटर उंचीने पाणी वाहत आहे.
मांजरा नदीवरील बॅरेजेसचे आठही उघडण्यात आले आहेत. नदी पात्रात पाच मीटरने पाणी वाहत आहे.
——————————————-

सर्जिकल स्ट्राईकनंतर दहशतवाद्यांना धडकी, पाकव्याप्त काश्मीरमधून पळ
श्रीनगर : पाकव्याप्त काश्मीरमधील भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर दहशतवाद्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. कारवाईच्या भीतीने पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक तळ रिकामे करत दहशतवाद्यांनी पळ काढला आहे.
आधी 500 हून अधिक दहशतवादी, आता फक्त 200 !
गुप्तचर यंत्रणेच्या रिपोर्टनुसार, सर्जिकल स्ट्राईकआधी पाकव्याप्त काश्मीरमधील ट्रेनिंग कॅम्पमध्ये 500 हून अधिक दहशतवादी होते. मात्र, आता तिथे जवळपास 200 च दहशतवादी आहेत. भारतीय लष्कराच्या सर्जिकल ऑपरेशननंतर पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी प्रचंड भीतीच्या वातावरणात आहेत.
भारताच्या भीतीने कॅम्प रिकामे!
पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने याआधीच 18 दहशतवादी ट्रेनिंग कँपना लष्कराच्या ठिकाणांवर स्थलांतरित केलं होतं. मात्र, उरलेले 24 ट्रेनिंग कॅम्प आता दहशतवाद्यांनी भारताच्या भीतीनेच रिकामे केले आहेत.
लष्कर-ए-तोयबाचे कॅम्पही रिकामे!
भारतीय लष्कराच्या भीतीने जे कॅम्प रिकामे केले गेले, त्यांमध्ये मुजफ्फराबादजवळील लष्कर-ए-तोयबाचा मानशेरा कॅम्पही आहे, जिथे 26/11 च्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं गेलं होतं.
300 हून अधिक दहशतवाद्यांचा पळ
गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी भीती आहे की पुढील सर्जिकल स्ट्राईक त्यांच्या कॅम्पवर होऊ नये आणि आपलाही खात्मा होऊ नये. म्हणूनच 300 हून अधिक दहशतवाद्यांनी पळ काढला आहे.
काही घरी पळून गेले, काहींना सुरक्षित स्थळी हलवलं!
पाकव्याप्त काश्मीरमधील कॅम्पमधून पळ काढलेले दहशतवादी आपापल्या घरात पळून गेलेत, तर काहींना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयने सुरक्षित स्थळी हलवले आहे. जैश, लष्कर आणि हिजबुलचे 200 हून अधिक दहशतवादी ट्रेनिंगनंतर घुसखोरीसाठी तयार होते.
================================
पुण्यात कस्टमकडून एक कोटीचे ड्रोन पकडले
(फोटो सौजन्य: विकिपीडिया)
पुणे : उरी हल्ल्यानंतर देशात सर्वत्र हायअलर्ट दिलेला असताना, पुण्यात तब्बल एक कोटी रुपयांचे ड्रोन पकडण्यात आले आहेत. सीमा शुल्क विभागाने तब्बल एक कोटी रुपयांचे सात ड्रोन (कस्टम) लोहगाव विमानतळावर पकडले असून, या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्या आले आहे.
सीमा शुल्क विभागाने ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव अमित तटके असे असून यांच्याविरुद्ध सीमाशुल्क कायदा 1962 आणि दूरसंचार अधिनियमन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीमाशुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तटके वेबनॉईज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कर्मचारी आहेत. त्यांनी कॅनडामधून येताना प्रिसीजन हॅक या कंपनीने तयार केलेले सात ड्रोन सोबत आणले होते.
लोहगाव विमानतळावर त्यांच्या साहित्याच्या तपासणीदरम्यान बॅगेत सात ड्रोन आढळले. या ड्रोनची विक्री हाईट्स नेक्स्ट कंपनीचे मालक विकास कुमार यांना केली जाणार होती, असे तटकेने सीमाशुल्क विभागाला सांगितले.
दरम्यान, या प्रकरणी आता कस्टम्सकडून वेबनॉईज आणि हाईट्स नेक्स्ट या कंपन्यांमधील व्यवहारांची चौकशी केली जाणार आहे.
================================
औरंगाबादमध्ये कुऱ्हाडीने पोलिस कॉन्स्टेबलचा हात धडावेगळा
औरंगाबादः कौटुंबिक वादातून पोलिस कॉन्स्टेबलवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. चुलत भावांनी पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश बमणे यांचा हात तोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रकाश बमणे हे औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात कार्यरत आहेत.
प्रकाश बमणे कामावरुन परतत असताना औरंगाबादच्या हर्सुल नाका येथे त्यांना नातेवाईकांनी गाठलं. नातेवाईकांनी त्यांना बेदम मारहाण करत त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. यामध्ये त्यांचा एक हात धडावेगळा करण्यात आला.
प्रकाश बमणेंवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हर्सुल पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. त्यामुळे पोलिस का गप्प आहेत, हा प्रश्नही सर्वांना पडला आहे.
================================
================================
================================
================================
================================
================================
================================
================================
================================
================================
================================
================================
================================
No comments:
Post a Comment