Sunday, 2 October 2016

नमस्कार लाईव्ह ०२-१०-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- चीन पाकच्या प्रेमात अंधळा, UN मध्ये मसूद अझहरचा बचाव 
२- पाकमध्ये भारतीय चॅनल्स बंद 
३- ब्रह्मपुत्रचा प्रवाह चीनने अडवला  
४- मसूद अझरला अतिरेकी घोषित करण्यामध्ये चीनने पुन्हा घातला खोडा
५- मेक्सिकोत ज्वालामुखीचा उद्रेक; शेकडो नागरिकांचे विस्थापन 
६- बगदाद; इसिसच्या दोन दहशतवाद्यांचे शीर कापून चक्क शिजवले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
७- पठाणकोट बॉर्डरजवळ पाकिस्तानकडून धमकीचा फुगा 
८- ६५,२५0 कोटींचे काळे धन घोषित 
९- दिल्ली व परिसरात हाय अ‍ॅलर्ट घोषित 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- तेरणा धरण 2010 नंतर पहिल्यांदाच ओव्हरफ्लो 
११- लोकांचा सहकारावरील विश्वास उडालाय: सहकारमंत्री सुभाष देशमुख 
१२- एमएमआरडीएकडून रिलायन्स मेट्रोचं पितळ उघड
१३- आठ दिवसांत मुंबईतल्या रेल्वे स्थानकांचा कायापालट 
१४- उद्धव ठाकरेंच्या माफीनाम्याला काहीही अर्थ नाही: निलेश राणे 
१५- सार्वजनिक भूखंड धार्मिक स्थळांना ‘दान’ करू नका - उच्च न्यायालयाच्या राज्य सरकारला सूचना 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- तेलंगाना; नदीच्या पुरात कार वाहून गेल्यानं एका महिलेसह 5 मुलींचा दुर्दैवी मृत्यू 
१७- पिंपरी-चिंचवड; प्रभाग आराखडा फुटल्याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांची चौकशी करा: खा. साबळे 
१८- मराठवाड्यात पावसाचा कहर, लातूर-नांदेड वाहतूक बंद 
१९- भाजप आमदार अनिल बोंडेंची तहसीलदाराला मारहाण 
२०- माफीनामा हे उद्धव ठाकरेंना उशीरा सुचलेलं शहाणपण: विखे-पाटील 
२१- 'सामना'तील व्यंगचित्राबद्दल उद्धव ठाकरेंकडून जाहीर माफी 
२२- नाशिक; विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, नवऱ्यासह चौघांना अटक
२३- पुण्यातील 'त्या' अल्पवयीन मुलींची आत्महत्या की घातपात? 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- ...म्हणून सलमानला पाकिस्तानी कलाकारांचा पुळका
२५- 'सामना'तून हसोबा प्रसन्न गायब 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
===================
*दांडिया जल्लोष २०१६*

हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।

संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
==================================

पठाणकोट बॉर्डरजवळ पाकिस्तानकडून धमकीचा फुगा 

पठाणकोट बॉर्डरजवळ पाकिस्तानकडून धमकीचा फुगा
फोटो सौजन्य: एएनआय
नवी दिल्ली: भारतीय सैन्यदलाने पीओकेवर यशस्वी सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर भारत-पाक सीमेवर तणावाचे वातावरण आहे. भारतीय सैन्य दलाच्या कारवाईनंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. त्यातच शनिवारी रात्री उशीरा पंजाबमधील पठाकोटपासून जवळच असणाऱ्या बमियाल सेक्टरमधून दोन पिवळ्या रंगाचे फुगे जप्त करण्यात आले.

या फुग्यांसोबत एक पत्रही मिळाले आहे. उर्दूमध्ये लिहलेल्या या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देण्यात आली आहे. या पत्रात, ”मोदी ऐका, अयूबीची तलवार आजही आमच्याकडे आहे. मोदी सरकार युद्ध करु शकत नाही,” असं म्हटलं आहे. या पत्राच्या खाली पाकिस्तानी जनता असे नमुद करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी पठाणकोटच्या हवाईतळावर दहशतवादी घुसले होते. या हल्ल्यात चारही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, तर भारतीय लष्कराचे तीन जवानांना वीरमरण आलं होतं.

==================================

चीन पाकच्या प्रेमात अंधळा, UN मध्ये मसूद अझहरचा बचाव

चीन पाकच्या प्रेमात अंधळा, UN मध्ये मसूद अझहरचा बचाव

नवी दिल्ली: संपूर्ण जगाची डोकेदुखी बनलेल्या मसूद अझहरचा बचाव करण्यासाठी चीनने कंबर कसली आहे. संयुक्त राष्ट्रात चीनने पुन्हा वीटोचा वापर करुन त्याचा बचाव केला आहे. जर चीनने वीटोचा वापर केला नसता, तर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या मागणीला हिरवा कंदिल मिळाला असता.

काल वीटोची कालमर्यादा समाप्त होणार होती, मात्र त्याच दरम्यान चीनने मसूदला वाचवण्यासाठी पुन्हा वीटोचा वापर केला. त्यामुळे मसूदला पुन्हा सहा महिन्यांचे मोकळे रान मिळाले आहे. तसेच तो आता पाकिस्तानात बसून पुन्हा दहशतवादी कारवाया सुरु करेल.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदच्या एका कमेटीसमोर भारतने मसूदला दहशतवादी घोषित करण्याची मागणी केली आहे, या मागणीला 14 देशांनी मान्यता दिली आहे. मात्र, भारताच्या या प्रयत्नात खोडा घालण्यासाठीच चीनने वीटोचा वापर करुन मसूदला वाचवले आहे. जर भारताची मागणी मान्य केली गेली असती, तर मसूदच्या जगातील सर्व संपत्तीवर टाच आली असती. तसेच त्याला कुठेही मुक्त संचार करण्याची संधी मिळाली नसती.

पण पाकिस्तानच्या अंधळ्या प्रेमात असलेल्या चीनने वीटोचा वापर करुन मसूदचा बचाव केल्याने भारताच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले आहे.

अजहर मसूद कोण आहे?

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या अझहर मसूदने काही दिवसांपूर्वीच पठाणकोटमधील भारताच्या हवाईदलावर दहशतवादी हल्ला घडवून आणला होता. तसेच नुकत्याच झालेल्या उरीमधील हल्ल्यामध्येही त्याचा हात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

यापूर्वीही त्याने संसदेवरही हल्ला घडवून आणला होता. तसेच 1999 मध्ये कंदहार विमान अपहरण प्रकरणात दहशतवाद्यांनी मसूदच्या सुटकेची मागणी केली होती. नईलाजाने तत्कालिन सरकारला ती मान्य करुन त्याची सुटका करावी लागली. पण आता हाच मसूद केवळ भारतच नव्हे, तर साऱ्या जगाची डोकेदुखी बनला आहे.

==================================

तेरणा धरण 2010 नंतर पहिल्यांदाच ओव्हरफ्लो

LIVE : तेरणा धरण 2010 नंतर पहिल्यांदाच ओव्हरफ्लो
उस्मानाबाद : मराठवाड्यात पावसाने कहर केला आहे. तुफान पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच, अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.


==================================

...म्हणून सलमानला पाकिस्तानी कलाकारांचा पुळका

...म्हणून सलमानला पाकिस्तानी कलाकारांचा पुळका
मुंबई: एकीकडे उरी हल्ल्यानंतर सर्व स्तरावर पाकची कोंडी सुरू असताना, बॉलिवूडचा सल्लू मात्र पाकिस्तानी कलाकारांच्या पाठीशी उभा राहीला. पण सलमान खानला पाकिस्तानच्या कलाकारांच्या पाठिशी का उभा राहिला? या मागे आर्थिक गणितं आहेत.

पाकिस्तानमध्ये सलमान खानच्या चित्रपटांची कमाई कोट्यवधींच्या घरात आहे. अनेकवेळा तर सलमानच्या चित्रपटांनी मूळच्या पाकिस्तानी चित्रपटांपेक्षा जास्त गल्ला कमवलाय.

सलमानच्या सुल्तान, बजरंगी भाईजान, किक, दबंग-2 आदी सिनेमांनी पाकिस्तानमध्ये कोट्यवधींचा गल्ला गोळा केला आहे. सलमानचे हे सगळे चित्रपट पाकिस्तानमध्ये सुपर-डुपर हिट ठरलेत. त्यामुळं पाकिस्तानातून होणाऱ्या कमाईवर पाणी सोडावं लागू नये म्हणून सलमाननं पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा दर्शवल्याची चर्चा सुरु असल्याचं दिसतं

सलमान खानच्या चित्रपटांनी पाकिस्तानमध्ये कमाई
  • सुलतान : 11.6 कोटी
  • बजरंगी भाईजान : 60 लाख
  • किक : 9.48 कोटी
  • दबंग-2 : 38 लाख

==================================

लोकांचा सहकारावरील विश्वास उडालाय: सहकारमंत्री सुभाष देशमुख

लोकांचा सहकारावरील विश्वास उडालाय: सहकारमंत्री सुभाष देशमुख
सांगली: सहकार क्षेत्रावर लोक अविश्वास दाखवतात. लोकांचा उडालेला विश्वास परत मिळवण्यासाठी सरकार सोर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देखमुख यांनी दिली.

सहकार क्षेत्राला लागलेल्या आजाराला संपवण्यासाठी चांगला डॉक्टर आणि चांगल्या औषधाची गरज आहे. हा आजार संपवण्यासाठी ऑपरेशन करण्याची आता वेळ आली असून लवकरात लवकर आम्ही ऑपरेश करु आणि सहकार क्षेत्राला पुनरुज्जीवन करण्याचा आमचा प्रयत्न सुरु असल्याचे मत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलं.

सांगलीत महाराष्ट्र शासनाच्यावतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

==================================

एमएमआरडीएकडून रिलायन्स मेट्रोचं पितळ उघड

एमएमआरडीएकडून रिलायन्स मेट्रोचं पितळ उघड
प्रातिनिधिक फोटो
मुंबई: मुंबईत मेट्रो सेवा सुरु होऊन वर्ष उलटत नाही तोच भाडेवाढीचं तुणतुणं वाजवणाऱ्या रिलायन्स मेट्रोचा खोटेपणा उघड झाला आहे. मेट्रो प्रकल्पाच्या करारानुसार 8 वर्षापर्यंत भाडेवाढ केली जाणार नव्हती असा दावा एमएमआरडीएनं उच्च न्यायालयात केला आहे.

प्रवास भाडे निश्चिती समितीनं रिलायन्सला मेट्रोची भाडेवाढ करण्यास परवानगी दिली आहे. त्याविरोधात एमएमआरडीए याचिका दाखल केली आहे.

एमएमआरडीएनं खासगी कंपनीसोबत करार करताना किमान 8 वर्षानंतर भाडेवाढ करावी अशी अट घालण्यात आली होती. भाडं कमी ठेवल्यास प्रवासी वाढतील आणि खासगी कंपनीलाही फायदाच होईल असा विचार त्यामागे होता. प्रवासी वाढावेत याचसाठी मेट्रोचं भाडं बेस्ट बसपेक्षाही कमी ठेवण्यात आलं होतं. असं असताना रिलायन्स मेट्रोनं वारंवार भाडेवाढीची मागणी करणं अयोग्य असून कराराचा भंग करणारं आहे. असा युक्तिवाद एमएमआरडीएनं केला.

==================================

आठ दिवसांत मुंबईतल्या रेल्वे स्थानकांचा कायापालट

येत्या आठ दिवसांत मुंबईतल्या रेल्वे स्थानकांचा कायापालट
प्रातिनिधिक फोटो
मुंबई: मुंबईतल्या रेल्वे स्थानकांचा येत्या आठ दिवसांत कायापालट होणार आहे. ‘मॅड आणि फर्स्ट मुंबई’ या संस्थेच्या वतीनं ‘हमारा स्टेशन, हमारी शान’ ही योजना राबवण्यात येणार आहे. त्याअंतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील ३६ स्थानकं आकर्षक रंगात रंगवण्यात येणार आहेत.

रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरणासाठी मंत्रालय, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थी, रेल्वप्रेमी असे सगळेच जण हातात ब्रश घेऊन या स्थानकांचा कालापालट करणार आहेत. येत्या आठ दिवसात हे काम पूर्ण होणार असल्याचे संस्थेच्यावतीने सांगण्यात येत आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्या या योजनेचा शुभारंभ होणार आहेत.

==================================

पुण्यातील 'त्या' अल्पवयीन मुलींची आत्महत्या की घातपात?

पुण्यातील 'त्या' अल्पवयीन मुलींची आत्महत्या की घातपात?
पुणे: पुण्याच्या भवानी पेठेतील कासेवाडी भागातून बेपत्ता झालेल्या तीन विद्यार्थिनींपैकी दोघींचे मृतदेह काल रात्री हाती लागले मात्र एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा अद्यापही शोध लागलेला नाही. त्यामुळे या मुलींनी आत्महत्या केली की घातपात? हा प्रश्न उपस्थित होतो आहे.
श्रुती दिगंबर वाघमारे, वय 16 वर्षे

अबेदा लुकमान शेख, वय 13 वर्षे

मुस्कान इम्तियाज मुलतानी वय 14 वर्षे

या तीन अल्पवयीन मुलींपैकी श्रुती आणि अबेदाचे मृतदेह सापडला आहे. मात्र मुस्कानचा अजूनही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे या मुलींनी मुठा कालव्यात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला की त्यांच्यासोबत काही घातपात झाला? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
कारण मुस्कानच्या मोबाईलवर मृत्यूपूर्वी तब्बल 40 फोन आले आहेत आणि त्यांनी ते उचलले आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मुलींशी मोबाईलवर बोलणाऱ्या तीन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. मात्र, याप्रकरणी कॅमेऱ्यावर बोलण्यासाठी पोलिसांनी स्पष्ट नकार दिला आहे.

श्रुती, अबेदा आणि मुस्कान भवानी पेठ परिसरातल्या कासेवाडी भागात राहतात. आबेदा आणि मुसकान आझम कँपसमधील अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलमध्ये आठवी आणि नववीत शिकत होत्या, तर श्रुती रास्ता पेठेतील धनराज कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकत होती.

प्रेम प्रकरणाची कुणकुण कुटुंबीयांना लागल्यामुळे मुलींनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. पण मुस्कानचा अजूनही शोध लागला नाही. त्यामुळे तिन्ही मुलींची आत्महत्या आहे की घातपात याचा तपास करणं आवश्यक आहे.

No comments: