Tuesday, 4 October 2016

नमस्कार लाईव्ह ०४-१०-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- ब्रिटनमधील संशोधकांना फिजिक्समधील नोबेल जाहीर 
२- पाकिस्तानने भारताचे आभार मानले पाहिजेत - अदनान सामी 
३- नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याचा भारतीय चौक्यांवर गोळीबार 
४- वेलिंग्टन; २९ वेळा भोसकून गर्भवती प्रेयसीची केली हत्या 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- सैन्याचा अपमान करु नका, भाजपचा केजरीवालांवर हल्लाबोल 
६- गुजरातनंतर आता पंजाबमध्येही संशयित बोट 
७- रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो दरात पाव टक्क्यांची कपात 
८- देशाची मान झुकू देणार नाही- राजनाथ सिंह 
९- 'स्पाइस जेट'ची स्पेशल ऑफर, केवळ 888 रूपयांत विमान प्रवास
१०- ऑनलाइन पोर्टल्सवर लॅपटॉप, मोबाईल्सची लयलुट
११- व्याजदर पाव टक्क्यांनी घटले, गृहकर्जे, वाहन कर्जे स्वस्त होण्याचे संकेत
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१२- शिवसैनिकाकडूनच संजय राऊतांवर शाई फेकीचा प्रयत्न 
१३- पंचनाम्याशिवाय शेतकऱ्यांना मदत देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा 
१४- सर्जिकल स्ट्राईक निव्वळ बनाव, संजय निरुपम यांचा सनसनाटी आरोप 
१५- मराठा मोर्चांचे आयोजक संजीव भोर यांची 6 जिल्ह्यातून हद्दपारी? 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- धुळ्यात अतिवृष्टी, साक्री तालुक्यात दोन पाझर तलाव फुटले 
१७- राजधानीतील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता 
१८- सर्वोच्च न्यायालयाचे कर्नाटक सरकारला 7 ते 18 ऑक्टोबरपर्यंत 2000 क्युसेक्स पाणी सोडण्याचे आदेश.
१९- ९२९१ कोटींच्या सिंचन प्रकल्पाना मान्यता - फडणवीस
२०- नांदेडम; विद्यार्थिनीने गोदावरीत नदीत मारली उडी 
२१- जळगाव : अन्न व औषध विभागाने पकडला खवा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- व्हॉटसअॅपवर स्नॅपचॅटसारखं नवं फीचर उपलब्ध 
२३- भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेवर कोणतंही संकट नाहीः लोढा समिती 
२४- 'बाहुबली 2' मधील भल्लाल देवची जबरदस्त शरीरयष्टी! 
२५- भारत-पाकिस्तान मालिकेचा प्रश्नच येत नाही - अनुराग ठाकूर
२६- भारत-न्यूझीलंड मालिका रद्द होणार नाही - लोढा समिती
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
===================
*दांडिया जल्लोष २०१६*

हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।

संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
===================================

शिवसैनिकाकडूनच संजय राऊतांवर शाई फेकीचा प्रयत्न

शिवसैनिकाकडूनच संजय राऊतांवर शाई फेकीचा प्रयत्न
लखनऊ : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर शाईफेकीचा प्रयत्न झाला आहे.  उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये हा प्रकार घडला. धक्कादायक प्रकार म्हणजे शिवसैनिकानेच शाईफेकीचा प्रयत्न केला. एएनआय या वृत्तसंस्थेने हा दावा केला आहे. सूर्य भान असं शाई फेकणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.

===================================

सैन्याचा अपमान करु नका, भाजपचा केजरीवालांवर हल्लाबोल

सैन्याचा अपमान करु नका, भाजपचा केजरीवालांवर हल्लाबोल
नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकबाबत प्रश्न उपस्थित करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजपने हल्लाबोल केला आहे. अरविंद केजरीवाल भारतीय सैन्याचा अपमान करत असल्याचा आरोप, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केला आहे.
सर्जिकल स्ट्राईकबाबत पाकिस्तान खोटा दावा करत असून गैरसमज पसरवत आहे. पाकिस्तानच्या या खोट्या प्रचाराचा सरकारने पर्दाफाश करावा, असं केजरीवाल म्हणाले होते.

===================================

पंचनाम्याशिवाय शेतकऱ्यांना मदत देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

पंचनाम्याशिवाय शेतकऱ्यांना मदत देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
औरंगाबाद : आधी दुष्काळ आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि इतर पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंचनाम्याची गरज नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल दिला की त्यांना तातडीनं मदत दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
तब्बल आठ वर्षानंतर मराठवाड्याच्या प्रश्नावर औरंगाबादमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते.
दोन दिवसात झालेल्या पावसाने 10 लाख हेक्टर सोयाबीन आणि 5 लाख हेक्टर इतर पिकांचं नुकसान झाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. याशिवाय मराठवाड्यात 9200 कोटींच्या सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. येत्या चार वर्षात ते पूर्ण होतील अशा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

===================================

व्हॉटसअॅपवर स्नॅपचॅटसारखं नवं फीचर उपलब्ध

व्हॉटसअॅपवर स्नॅपचॅटसारखं नवं फीचर उपलब्ध
नवी दिल्ली: व्हॉटसअॅपनं आपलं नवं फीचर अॅड केलं आहे. या नव्या फीचरमुळं आता व्हॉटसअॅपवरुन फोटो आणि व्हिडिओ पाठवताना त्यामध्ये टेक्स्टही वापरता येणार आहे. व्हॉटसअॅपचं हे नवं फीचर स्नॅपचॅटप्रमाणेच आहे. व्हॉटसअॅपचं हे नवं फीचर अॅड्राइडवरच उपलब्ध असून लवकरच iOS वरही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

===================================

No comments: