Tuesday, 18 October 2016

नमस्कार लाईव्ह १८-१०-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- सप्टेंबरने तोडला 136 वर्षांचा रेकॉर्ड, सर्वाधिक तापमानाची नोंद 
२- दहशतवादी हल्ल्याचे सावट, मुंबईसह देशभरात हायअॅलर्ट 
३- हायवेवरून झेपावणार हवाई दलाची विमाने 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- सर्जिकल स्ट्राईक : आधी इस्त्राईल करत होतं, आता भारताने केलं : मोदी 
५- 'मी दलित आहे', रोहित वेमुलानेच दिला पुरावा 
६- 'लॉलिपॉप नका देऊ, राम मंदिर बांधा' - भाजपा खासदार विनय कटियार 
७- बनावट पदवी प्रकरणी स्मृती इराणी यांना दिलासा
८- बीसीसीआयला सर्वोच्च न्यायालयाचा दणका 
९- ट्रिपल तलाकच्या प्रथेमुळे महिलांचे नुकसान - व्यंकय्या नायडू. 
१०- इरॉम शर्मिला यांनी स्वत:च्या पक्षाची केली स्थापना. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
११- मी पूर्ण फी भरेन, गरजूंना सवलत द्या, ऊर्जाचं शिक्षणमंत्र्यांना पत्र 
१२- दीपाच्या बीएमडब्लूसाठी घरापर्यंत गुळगुळीत रस्ता बनवणार 
१३- आगामी अधिवेशनात मुख्यमंत्र्याविरोधात अविश्वास ठराव आणणार - नारायण राणे 
१४- समाजवादी पार्टी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- ट्रेलरवरील कॉईल रस्त्यावर कोसळल्याने मुंबई-गोवा माहामार्गावर सुकोळी खिंडीत वाहतूक कोंडी 
१६- परभणी : आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाज बांधवांचा मोर्चा 
१७- चिंचपोकळी यार्डातील रुळांवरून घसरलेला डबा हटवण्यात आला 
१८- शिर्डी - पिकअप वाहन उलटल्याने 15 जण जखमी 
१९- राजस्थानमध्ये १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चौघांना अटक. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- 'मोनोपॉली' नोट देऊन रिक्षावाल्याकडून अभिनेत्रीची फसवणूक 
२१- मनसेच्या इशाऱ्यानंतर करण जोहरचं पोलिस आयुक्तांना साकडं
२२- बरेली; अनैतिक संबंधात आड येणाऱ्या पत्नीची हत्या, पतीला अटक 
२३- भारत-पाक महिला क्रिकेट मालिका रद्द? 
२४- कुस्तीपटू नरसिंह यादव डोपिंग टेस्टप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
=====================================

सर्जिकल स्ट्राईक : आधी इस्त्राईल करत होतं, आता भारताने केलं : मोदी

सर्जिकल स्ट्राईक : आधी इस्त्राईल करत होतं, आता भारताने केलं : मोदी
मंडी :  भारतीय जवानांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केलं आहे. आधी इस्त्राईल सैन्य करायचं, मात्र आता जगाने पाहिलं की भारतीय सैन्यही कमी नाही.पूर्वी इस्त्राईलच्या जवानांची जगभरात चर्चा व्हायची, आता भारतीय जवानांची होते, असं मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. मंडी येथील जाहीर सभेत बोलताना त्यांनी याबाबतचं वक्तव्य केलं.
आधी इस्राईलची आता भारताची चर्चा
मोदी म्हणाले, “हिमाचल केवळ देवभूमी नाही तर वीरभूमीही आहे. आज जगभरात आपल्या सैन्याच्या पराक्रमाची चर्चा होत आहे. यापूर्वी इस्राईलच्या सैन्याची चर्चा होती, मात्र आता भारतीय जवानांची चर्चा होत आहे. इथे (हिमाचल) प्रत्येक कुटुंबात एक सैनिक आहे. मी त्या सर्व जवानांना आणि वीरांना वंदन करतो”
दरम्यान, मोदींनी मंडी इथं विविध विकासकामांचं उद्घाटन केलं.

=====================================

मी पूर्ण फी भरेन, गरजूंना सवलत द्या, ऊर्जाचं शिक्षणमंत्र्यांना पत्र

मी पूर्ण फी भरेन, गरजूंना सवलत द्या, ऊर्जाचं शिक्षणमंत्र्यांना पत्र
मुंबई: जर माझे आई-वडील माझी फी भरण्यासाठी सक्षम असतील, तर मी सवलतीचा फायदा का घ्यावा, असा सवाल करत, एका विद्यार्थिनीने ‘गिव इट अप गर्ल्स कन्सेशन’ असं आवाहन केलं आहे. ऊर्जा भारतीय असं या विद्यार्थिनीचं नाव असून, ती रुईया महाविद्यालयात अकरावीत शिकते.
ऊर्जाने याबाबत थेट शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाच पत्र लिहिलं आहे.
मुंबईसारख्या महानगरात जिथं आईवडिल दोघेही कमावते असतात, लाखो रुपये भरुन मुलांना क्लासेसना पाठवतात, तरीही महाविद्यालयात मात्र सवलतीचा फायदा का घ्यावा? .सवलत त्यांनाच मिळावी, ज्यांना गरज आहे आणि ज्यांना गरज नाही त्यांनी स्वतःहून सवलत नाकारायला हवी असं ऊर्जाचं मत आहे.
अकरावीला रुईया महाविद्यालयात कला( Arts) साठी प्रवेश घेताना, मुलांना 500 रुपये आणि मुलींना 250 रुपये फी आहे. आपले आई -वडील पाचशे रुपये फी भरू शकतात, तर फी सवलत का घ्यायची असा प्रश्न तिला पडला आणि तिने रुईया महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना आणि शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिलं.
मुलींना मिळणाऱ्या फी सवलतीविरोधात मी नाही. मात्र गरजू मुलांनाच ती सवलत मिळावी म्हणून ही फी सवलत नाकारत असल्याचं ऊर्जा सांगते.
ऊर्जाने आपल्या इतर मित्र- मैत्रिणी,कुटुंबातील भावंडानाही फी देऊ शकत असाल, तर सवलत नाकारा, असं आवाहन केलं आहे. आज शहरात मुलं मॅक्डोनल्ड सारख्या ठिकाणी एका फटक्यात 200-300 रुपये उडवतात, तर कॉलेजची पूर्ण का फी भरू नये असा प्रश्न ऊर्जाला पडलाय.

=====================================

'मोनोपॉली' नोट देऊन रिक्षावाल्याकडून अभिनेत्रीची फसवणूक

'मोनोपॉली' नोट देऊन रिक्षावाल्याकडून अभिनेत्रीची फसवणूक
मुंबई : खोट्या नोटा देऊन फसवणूक करण्याचा प्रकार अनेक वेळा ऐकायला मिळतो. या नोटा बहुतांश वेळा पाचशे किंवा एक हजार रुपयांच्या असतात. मात्र मुंबईतील एका अभिनेत्रीची चक्क 100 रुपयांची खोटी नोट देऊन फसवणूक करण्यात आली आहे. रिक्षावाल्याने ‘मोनोपॉली’ खेळातली नोट देऊन मेघा चक्रवर्तीला गंडवलं.
हुबेहुब बनवण्यात आलेल्या नोटांमुळे काहीवेळा ग्राहकांची फसगत होते. मात्र टीव्ही अभिनेत्री मेघा चक्रवर्तीला ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ असं लिहिलेली शंभर रुपयांची नोट रिक्षावाल्याने दिली. रात्री एक वाजता मेघाने ही नोट घेतली. अंधारात हा प्रकार लक्षात न आल्याने घरी गेल्यावर तिला आपली फसवणूक झाल्याचं समजलं.
मूळ कोलकात्याच्या असलेल्या मेघाने हा प्रकार फेसबुकवर शेअर केला आहे. मात्र तिच्या मित्र-मैत्रिणी आणि चाहत्यांनी मेघावरच तोंडसुख घेतलं आहे. ‘तुझीच चूक आहे, अशी कशी मूर्ख बनलीस’ अशा कमेंट्स करत मेघालाच वेड्यात काढलं गेलं आहे. आरबीआय गव्हर्नर ऐवजी
सांताक्लॉजची सही असलेली नोट मेघाच्या हातात देण्यात आली.
शंभर रुपये कूपन असं लिहिलेल्या या खेळातल्या नोटा वांद्रा पूर्वेकडच्या स्कायवॉकवर मोठ्या प्रमाणात आढळल्याचंही सांगितलं जात आहे. मेघाने शेअर केलेला हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. 10 हजारांहून जास्त लाईक्स आणि दोन हजारांपेक्षा जास्त वेळा फेसबुक शेअर असलेल्या फोटोतून मात्र मेघाचीच खिल्ली उडवली जात आहे.

=====================================

मनसेच्या इशाऱ्यानंतर करण जोहरचं पोलिस आयुक्तांना साकडं

मनसेच्या इशाऱ्यानंतर करण जोहरचं पोलिस आयुक्तांना साकडं
मुंबई : ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला मनसेने विरोध केल्यानंतर दिग्दर्शक, निर्माता करण जोहरने पोलिसात धाव घेतली आहे. मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे करणने सुरक्षेची मागणी केली आहे. पुरेशी सुरक्षा देण्याचं आश्वासन मुंबई पोलिसांनी दिलं आहे.
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सच्या टीमने पोलिस आयुक्तांची भेट घेतली. त्याचप्रमाणे फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष मुकेश भट्ट, फॉक्स स्टार इंडियाचे सीईओ विजय सिंह, मामि फिल्म फेस्टिव्हलच्या अनुपमा चोप्रा, निर्माते सिद्धार्थ रॉय कपूरही यावेळी उपस्थित होते.
‘ऐ दिल..’ प्रदर्शित केल्यास मनसे स्टाईल उत्तर देण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मल्टिप्लेक्स चालकांना दिला आहे. मनसेने पत्र लिहून मल्टिप्लेक्स चालकांना ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट प्रदर्शित न करण्याची मागणी केली आहे. तसं न केल्यास मनसे स्टाईल विरोधाला सामोरं जाण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
पाकिस्तानी कलाकारांची भूमिका असलेले चित्रपट प्रदर्शित करण्यास मनसेने विरोध दर्शवला आहे. ‘मल्टिप्लेक्सच्या काचा खूप महागड्या असतात हे विसरु नका’ असा दमही मनसेने भरला आहे.
ऐ दिल है मुश्किलचा वाद काय आहे?
‘ऐ दिल है मुश्किल’ या करण जोहरच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याची भूमिका आहे. पाकिस्तानी कलाकारांना आपल्या सिनेमात घेऊ नये, यासाठी मनसेने आवाज उठवला होता. त्यानंतर फवाद खान आणि इतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडलं. मात्र, करण जोहरच्या सिनेमात फवादची भूमिका असल्याने तो वादात सापडला.

=====================================

दीपाच्या बीएमडब्लूसाठी घरापर्यंत गुळगुळीत रस्ता बनवणार

दीपाच्या बीएमडब्लूसाठी घरापर्यंत गुळगुळीत रस्ता बनवणार
आगरताळा : ऑलिम्पिकपटू दीपा कर्माकरने नुकतंच गिफ्ट मिळालेली बीएमडब्ल्यू कार, खराब रस्ते आणि सर्व्हिस सेंटर अभावी परत करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दीपाच्या या निर्णयानंतर त्रिपुरा सरकार खडबडून जागं झालं आहे.
त्रिपुरा सराकरने दीपाच्या बीएमडब्लूसाठी थेट तिच्या घरापर्यंत गुळगुळीत रस्ता करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसात रस्त्याचं कामही चालू होणार आहे.
दीपाच्या घराजवळचे रस्ते खराब झाले आहेत. मात्र लवकरच त्याची दुरुस्ती करण्यात येईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं.

=====================================

बरेली; अनैतिक संबंधात आड येणाऱ्या पत्नीची हत्या, पतीला अटक

=====================================

VIDEO: 'मी दलित आहे', रोहित वेमुलानेच दिला पुरावा



  • हैदराबाद, दि. 18 - हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला दलित नसल्याचा अहवाल काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या आयोगाने सादर केला होता. मात्र आपण दलितच असल्याचा पुरावा स्वतः रोहित वेमुलाने दिला आहे. रोहित स्वतः 'मी दलित आहे' असे सांगत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण प्राप्त झाले आहे. 'जय भीम, माझे नाव रोहित वेमुला, मी दलित असून गुंटुर जिल्ह्यातील रहिवासी आहे, 2010 पासून मी हैदराबाद केंद्रीय विद्यापीठामध्ये शिकत आहे', असे रोहित या व्हिडिओद्वारे सांगताना दिसत आहे. जवळपास दोन ते तीन मिनिटांचा हा व्हिडीओ आहे. 
    रोहितने आत्महत्या करण्यापूर्वी 5 ते 10 जानेवारीदरम्यान हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. मात्र, पोलीस आणि मनुष्यबळ विकास मंत्रालय आतापर्यंत रोहित वेमुलाच्या दलित असण्यावर प्रश्न उपस्थित करत आले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ रोहित दलित असल्याचा पुरावा देणारा  आहे, असे त्याच्या मित्र परिवाने म्हटले आहे. फेसबुकवरील मोहीमेसाठी रोहितने हे रेकॉर्डिंग केले होते. दरम्यान, या व्हिडीओची सत्यता पडताळण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================

No comments: