Tuesday, 25 October 2016

नमस्कार लाईव्ह २५-१०-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- दहशतवादाचं मूळ पाकमध्येच, पाकिस्तानची कबुली 
२- बलुचिस्तानात पोलीस ट्रेनिंग सेंटरवर दहशतवादी हल्ला, 59 प्रशिक्षणार्थींचा मृत्यू 
३- रियाध; लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले म्हणून दिला घटस्फोट 
४- पाक; क्वेटा दहशतवादी हल्ला; 57 पोलिसांचा मृत्यू 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- केंद्राकडून दिवाळी गिफ्ट, 70 रुपये किलोने डाळ मिळणार! 
६- दिवाळीत भारतीय जवानांची आठवण ठेवण्याचं पंतप्रधांनाचं आवाहन 
७- टाटा सन्स घेणार अभिषेक मनु सिंघवी आणि हरीश साळवेंची मदत
८- सायरस मिस्त्रींना हटवल्याने टाटाचे शेअर्स गडगडले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
९- मनसेच्या 5 कोटींच्या मागणीला माझा विरोधच होता : मुख्यमंत्री 
१०- आंध्र-ओडिशा सीमेवर आणखी 3 नक्षलवादी ठार 
११- मराठा समाजाने चर्चेसाठी पुढे यावे- मुख्यमंत्री 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- नागपुरात मराठा मोर्चाचं वादळ, ड्रोनला परवानगी नाकारली 
१३- चायनिज लायटिंगला कोल्हापुरी लायटिंगची फाईट 
१४- पिंपरी: माजी नगरसेवक सचिन शेळके हत्येप्रकरणी आणखी पाच अटकेत 
१५- नागपुरात सेंट्रल जेलमधील कैद्याचा रुग्णालयात मृत्यू 
१६- नागपुर; पोलिसांच्या ढिलाईमुळे बलात्कार पीडितेचा आरोपीकडून छळ 
१७- मी सुट्टीवर जाणार नाही, नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढें 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- फक्त 22 रुपयांत अनुभवा बीएमडब्ल्यूची सफर 
१९- मुंबईच्या 19 वर्षीय पठ्ठ्याची सुसाट कार 
२०- टाटा समुहाच्या शेअर्समध्ये घसरण 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
=====================================

मनसेच्या 5 कोटींच्या मागणीला माझा विरोधच होता : मुख्यमंत्री

मनसेच्या 5 कोटींच्या मागणीला माझा विरोधच होता : मुख्यमंत्री
मुंबई : ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपट प्रदर्शनाच्या मोबदल्यात 5 कोटींची मदत सैनिक कल्याण निधीला देण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात मी होतो, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘ऐ दिल है मुश्किल’च्या वादावर हे स्पष्टीकरण दिलं आहे.

=====================================

नागपुरात मराठा मोर्चाचं वादळ, ड्रोनला परवानगी नाकारली

नागपुरात मराठा मोर्चाचं वादळ, ड्रोनला परवानगी नाकारली
नागपूरः मराठा मोर्चाचं वादळ आज राज्याच्या उपराजधानीत धडकणार आहे. मात्र, आजच्या मोर्चाला सुरक्षेच्या कारणास्तव ड्रोन कॅमेरा वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
मोर्चा ज्या ठिकाणाहून सुरु होतो त्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे. जिथे संपतो त्या ठिकाणी विधानभवन असल्याने ड्रोनला परवानगी नाकारली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या डेडलाईनच्या आधीचा हा शेवटचा मोर्चा आहे.
मागण्या मान्य न केल्यास यानंतर थेट हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरच मोर्चा काढला जाईल, असा इशारा मराठा आयोजकांनी दिला आहे. सकाळी 11 वाजता रेशीमबागेतून हा मोर्चा सुरु होणार आहे.
मराठा मोर्चात 15 रुग्णवाहिकांसह 200 डॉक्टरांच्या चमूचा सहभाग राहणार आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज, शासकीय दंत महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, केडीके डेंटल कॉलेज आणि लता मंगेशकर हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा समावेश असणार आहे.

=====================================

दहशतवादाचं मूळ पाकमध्येच, पाकिस्तानची कबुली

दहशतवादाचं मूळ पाकमध्येच, पाकिस्तानची कबुली
इस्लामाबादः दहशतवादाचं मूळ पाकिस्तानातच पोसलं जात असल्याचं पाकिस्ताननेही कबूल केलं आहे. पाक सरकारकडून जैश-ए-महम्मदच्या मसूद अजहरसह 5 हजार 100 दहशतवादी संघटनांचे बँक खाते गोठवण्यात आले आहेत.
देशात दहशतवादी असल्याचं पाकिस्तानने अधिकृतपण मान्य केलं आहे. खाते गोठण्यासाठी पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने 5 हजार 100 दहशतवाद्यांची यादी बँकांना पाठवली आहे. पाकिस्तानात बसून जगभरात दहशत माजवणाऱ्या दहशतवाद्यांचा या यादीत समावेश आहे.
दहशतवाद्यांच्या खात्यात एकूण 40 कोटींपेक्षा अधिक रक्कम आहे. जैश-ए-महम्मदच्या मसूद अजहर याचं स्टेट बँक ऑफ पाकिस्तानमधील खातंही गोठवण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये 27 दहशतवाद्यांचे खाते आहेत.

=====================================

चायनिज लायटिंगला कोल्हापुरी लायटिंगची फाईट

चायनिज लायटिंगला कोल्हापुरी लायटिंगची फाईट
कोल्हापूर: कुठलाही सण, उत्सव आला की, बाजारात चायनिज लायटिंग्जना चांगलीच मागणी असते. स्वस्तात उपलब्ध होणाऱ्या या लायटिंगच्या माळा हल्ली घरोघरी दिसतात. मात्र, आता या चायनिज लायटिंग्जला अस्सल भारतीय बनावटीची कोल्हापुरी लायटिंग फाईट देते आहे.
सतत कुरापती करणाऱ्या पाकिस्तानच्या मदतीसाठी चीन धावून येतो. उरी हल्ल्यानंतरही साऱ्या जगाने पाकिस्तानविरोधी भूमिका घेतली असताना, दुसरीकडे चीनने मात्र,पाकिस्तानच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. याला संतापातूनच सध्या व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावरुन चीनच्या वस्तू न खरेदी करण्याचे मेसेजही फिरता आहेत.
यात यंदाच्या दिवाळीत चायनिज वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले जात असताना, देशातला पैसा देशातच राहावा, यासाठी कोल्हापुरातल्या काही व्यावसायिकांनी एलईडी बब्लच्या लायटिंगचा पर्याय पुढे आणला आहे.
विशेष म्हणजे, कोल्हापुरी या लायटिंगच्या व्यवसायामुळं 500 हून अधिक महिलांना घरबसल्या रोजगार मिळाला आहे. चायना लायटिंगची काही गॅरंटी नाही. मात्र, कोल्हापुरी लायटिंग टिकाऊ असल्यानं यंदाच्या दिवाळीसाठी  या लायटिंगला मोठी मागणी मिळत आहे.
पंतप्रधान मोदींनी ‘मेक इन इंडिया’चा नारा दिला. मात्र तो नारा यशस्वी करायचा असेल तर फक्त सरकारवर अवलंबून भागणार नाही. तर गरज आहे अशाच कोल्हापुरी प्रयत्नांची.

=====================================

फक्त 22 रुपयांत अनुभवा बीएमडब्ल्यूची सफर

फक्त 22 रुपयांत अनुभवा बीएमडब्ल्यूची सफर
मुंबई: श्रीमंतीचं प्रतिक आणि अलिशान असलेली बीएमडब्लू कार आता मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणार आहे. कारण बीएमडब्लू कार आता टॅक्सीच्या रुपात मुंबईत धावाताना लवकरच दिसणार आहे.
बीएमडब्लू आणि ओलानं एकत्रित येऊन यासंदर्भात घोषणा केली आहे. 22 रुपये किलोमीटर दरानं ही गाडी ओलाच्या अॅपवर उपलब्ध होणार आहे.
मुंबई, दिल्ली आणि बंगळरुमध्ये ओला ही सेवा सुरु होणार असून या शहरात बीएमडब्ल्यूच्या प्रवासासाठी कमीतकमी 250 रुपये आणि प्रतिकिलोमीटर 21 ते 22 रुपये आकारले जातील. त्यासाठी ओलाकडून पुढील सहा महिन्यात एक हजार गाड्या रस्त्यावर उतरवल्या जातील.
दरम्यान, यासाठी ओलाकडून बीएमडब्ल्यू चालवण्याची इच्छा असणाऱ्यासाठी स्वस्तदरात कर्जही उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

=====================================

मुंबईच्या 19 वर्षीय पठ्ठ्याची सुसाट कार

नवी मुंबईच्या 19 वर्षीय पठ्ठ्याची सुसाट कार
नवी मुंबई : निष्णात कार डिझायनर्सच्या तोडीची एक कार खारघरच्या एका तरुणाने तयार केली आहे. विशेष म्हणजे ऑटोमोबाईलचं कोणतंही शिक्षण नसताना रिक्षाचालकाच्या मुलाने ही भन्नाट कार बनवली आहे.
यूट्युबवरचे व्हिडिओ बघता बघता प्रेम ठाकूरने त्याची ड्रीम कार साकारली आहे. अवघ्या 19 वर्षांच्या पठ्ठ्याने ही सुसाट कार बनवली आहे. मुंबई, कुर्ला, शिळफाटा या भागातून प्रेमने काही भंगारातलं सामान खरेदी केलं आणि चार महिन्यांच्या अथक मेहनतीतून कारचं स्वप्न सत्यात उतरवलं.
रिक्षाचालकाच्या मुलाला कार बनवणं म्हणजे पैशांची चणचण आलीच. पाच गियरच्या या कारचा स्पीड 100 च्या वर आहे. आणि सध्या ही कार 10 किमीपर्यंत धावते. त्यामुळे जवळच्या अंतरासाठी तिचा उत्तम उपयोग होत आहे. त्यामुळे केवळ पुस्तकी अभ्यास महत्वाचा की प्रॅक्टीकल शिक्षण याचा पुन्हा एकदा विचार करायला हवा.

No comments: