Monday, 3 October 2016

नमस्कार लाईव्ह ०३-१०-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- पाकचा खोटारडेपणा, आता म्हणतात चंदू चव्हाण आमच्याकडे नाहीच! 
२- तोंड लपविण्यासाठी पाकची मीडिया टूर 
३- संशयास्पद लोक ओळखण्यास चीनचे रोबो 
४- जपानी शास्त्रज्ञ ओहसुमी यांना वैद्यकशास्त्राचे नोबेल 
५- दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्या घटली- जागतिक बँक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
६- पॅरिस जलवायू कराराला भारताची मान्यता 
७- कोलकाता कसोटीतही तिरंगा फडकला, भारत अव्वलस्थानी विराजमान! 
८- केजरीवालांचा पंतप्रधान मोदींना सॅल्युट 
९- पडून असलेला पीएफ गहाण ठेवा, घर खरेदी करा 
१०- सीमेवरील तणावाच्या भीतीमुळे अस्वलाची पकड
११- जीएसटीच्या नऊ मुख्य व्याख्या 
१२- हवाई दलाचे विमान राजस्थानात कोसळले  
१३- दिवळीत होईल 1700 कोटींची उलाढाल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१४- मराठा आरक्षणावरुन नारायण राणेंनी ठाकरे बंधूंना झोडपलं! 
१५- मराठवाड्यातल्या महाप्रलयानं 16 लाख हेक्टर शेतं पाण्याखाली 
१६- वेगळ्या विदर्भासाठी प्रतिविधानसभा, वामनराव चटप प्रतिमुख्यमंत्री 
१७- बीएमसी निवडणूक: यंदा 15 वॉर्ड अनुसूचित जातींसाठी आरक्षित 
१८- कावेरी पाणीवाटपाप्रमाणे सीमा भागातील बांधवांनाही न्याय मिळावा - उद्धव ठाकरे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- मुंबई; बीएमसीमध्ये अनुसूचित जातींसाठी यंदा 15 वॉर्ड आरक्षित 
२०- पालघर; वाड्यात आदिवासी समाजाचं आंदोलन, विष्णू सावरांना महाघेराव 
२१- कॅमेऱ्यातून ‘अनोळखी’ चेहऱ्यांमधला आनंद शोधणारा अवलिया ! 
२२- कटारा खूनप्रकरणी यादवला 25 वर्षांचा कारावास 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- 'बाहुबली 2'चा फर्स्ट लूक रिलीज, 22 ऑक्टोबर रोजी पहिले पोस्टर 
२४- 'धोनीः दी अनटोल्ड स्टोरी'ची तिसऱ्या दिवशी विक्रमी कमाई 
२५- करण जोहर मिसेस फवाद खान, गायक अभिजितने डिवचले 
२६- लोढा शिफारशीमुळे बीसीसीआयचे मोठे नुकसान होईल : ठाकूर 
२७- मराठी मालिकेचे चित्रीकरण प्रथमच पाण्याखाली 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
===================
*दांडिया जल्लोष २०१६*

हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।

संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
=================================

कोलकाता कसोटीतही तिरंगा फडकला, भारत अव्वलस्थानी विराजमान!

कोलकाता कसोटीतही तिरंगा फडकला, भारत अव्वलस्थानी विराजमान!
कोलकाता: विराट कोहलीच्या टीम इंडियानं कानपूरपाठोपाठ कोलकात्यातही न्यूझीलंडचा धुव्वा उडवून तिरंगा फडकावला. दुसऱ्या कसोटीसह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. दुसऱ्या कसोटीत भारताने न्यूझीलंडचा 178 धावांनी धुव्वा उडवला.
या विजयामुळे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत निर्विवादरित्या अव्वल स्थानावर झेप घेतली. त्यामुळं आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत आता पाकिस्तानची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.
ईडन गार्डन्सवरच्या दुसऱ्या कसोटीत भारतानं न्यूझीलंडवर 178 धावांनी मात केली. या कसोटीत भारतानं दुसऱ्या डावात सर्व बाद 263 धावांची मजल मारून, न्यूझीलंडला विजयासाठी 376 धावांचं आव्हान दिलं होतं.
टॉम लॅथम आणि मार्टिन गप्टिल यांनी 55 धावांची सलामी देऊन खेळात संघर्षाचा रंग भरला. पण अश्विननं गप्टिलला बाद करून ही जोडी फोडली आणि ठराविक अंतरानं न्यूझीलंडच्या विकेट्स पडायला लागल्या. मग अश्विननंच टॉम लॅथमची झुंजार खेळी संपुष्टात आणली. त्यामुळं भारताचा विजयाचा मार्ग सुकर झाला.

=================================

मराठा आरक्षणावरुन नारायण राणेंनी ठाकरे बंधूंना झोडपलं!

मराठा आरक्षणावरुन नारायण राणेंनी ठाकरे बंधूंना झोडपलं!

मुंबई काँग्रेस नेते नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे. शिवाय, मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारचीच इच्छा नाही, असा आरोपही राणेंनी केला आहे.
मोर्चांच्या दणक्यामुळेच सेनेचा पाठिंबा!
मराठा क्रांती मोर्चाच्या दणक्यामुळेच शिवसेनेने मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला, असे म्हणत राणेंनी ‘सामना’ दैनिकातील मराठा मोर्चासंदर्भातील वादग्रस्त व्यंगचित्रावरुन उद्धव ठाकरे यांना धारेवर धरलं.
उद्धव ठाकरेंकडून स्वार्थापोटी माफी : राणे
“सामना दैनिकातील व्यंगचित्राचे पडसाद राज्यभर उमटल्यामुळे राजकीय स्वार्थापोटी उद्धव ठाकरेंना माफी मागावी लागली. शिवाय, शिवसेनेतील मराठा आमदार-खासदारांनी राजीनामे पाठवल्यानंतर त्यांना माफी मागितली.”, अशी टीका राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली.

=================================

केजरीवालांचा पंतप्रधान मोदींना सॅल्युट

केजरीवालांचा पंतप्रधान मोदींना सॅल्युट
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सॅल्युट केला आहे.
भारतीय जवानांनी LOC वर पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. मोदींनी दाखवलेल्या या इच्छाशक्तीबद्दल केजरीवालांनी त्यांना सॅल्युट केला आहे.
भारतीय जवानांनी 27 आणि 28 सप्टेंबरच्या रात्री सीमेजवळ सर्जिकल स्ट्राईक करुन सुमारे 40 अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय लष्कराने तसा दावा केला आहे.
दुसरीकडे पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तान लष्कराने भारताचा हा दावा सातत्याने फेटाळून लावला आहे. भारताने सर्जिकल स्ट्राईक केला नाही, तर नियंत्रण रेषेवर चकमक झाली, असं पाकिस्तानकडून सांगण्यात येत आहे.
केजरीवाल यांनी व्हिडीओ संदेश जारी केला आहे. “आपल्या पंतप्रधानांशी 100 मुद्द्यांवर मतभेद असू शकतात, मात्र पंतप्रधानांनी जी इच्छाशक्ती दाखवली आहे, त्याबद्दल मी त्यांना सॅल्युट करतो”, असं केजरीवालांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे केजरीवालांनी पाकिस्तानवरही निशाणा साधला आहे. “भारताच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. आता पाकिस्तान जागतिक मीडियात खोट्या बातम्या पसरवत आहे. इतकंच नाही तर बॉर्डरवर पत्रकारांना नेऊन, गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे” असंही केजरीवालांनी म्हटलं आहे.

=================================

बीएमसीमध्ये अनुसूचित जातींसाठी यंदा 15 वॉर्ड आरक्षित

बीएमसीमध्ये अनुसूचित जातींसाठी यंदा 15 वॉर्ड आरक्षित
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आज प्रभाग आरक्षणाची सोडत जारी झाली आहे. महापालिकेच्या 227 पैकी 15 वॉर्ड अनुसूचित जातींसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत.
वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात आज दुपारी ही सोडत जारी झाली.
26, 53, 93, 121, 142, 146,152, 155, 169, 173, 195, 198, 200, 210 आणि 225 हे 15 प्रभाग अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यापैकी 53,121, 142, 200, 210 आणि 225 हे प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित असतील.
याशिवाय अनुसूचित जमातींसाठी 59,99 या वॉर्डमध्ये आरक्षण असेल. यापैकी 59 क्रमांकाचा वॉर्ड अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित आहे.
15 राखीव प्रभागांना निवडणूक आयोगाची मान्यता
2017 च्या निवडणुकीसाठी महापालिकेने 227 पैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या जास्त असलेल्या 60 वॉर्डांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली होती. त्यापैकी 15 वॉर्ड राखीव ठेवण्यात आले आहेत. त्याला 30 सप्टेंबरला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्याची सोडत आज जाहीर झाली आहे.

मराठवाड्यातल्या महाप्रलयानं 16 लाख हेक्टर शेतं पाण्याखाली

मराठवाड्यातल्या महाप्रलयानं 16 लाख हेक्टर शेतं पाण्याखाली
बीड/ उस्मानाबाद : मराठवाड्यात गेल्या अनेक दिवसांपासून झालेल्या तुफान पावसानं दुष्काळ धुऊन निघाला, तरी शेतीचं मात्र मोठं नुकसान झालं आहे. या महाप्रलयाने तब्बल 16 लाख हेक्टर शेतं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
मराठवाड्यातल्या 16 लाख हेक्टर क्षेत्रावरच्या शेतजमिनीवर अद्यापही पाणी साचलं आहे. पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीनला बसला आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनला कोंब फुटल्याने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं पिक वाया गेलं आहे. या नुकसानीचे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

पाऊस ओसराला मात्र…
दरम्यान, आज मराठवाड्यातून पाऊस ओसरला, तरी अनेक ठिकाणी अद्यापही पूरस्थिती कायम आहे. तुफान पावसामुळे भोगावती नदीला पूर आला आहे. शहरासह जिल्ह्यातले सारे तलाव, नदी, नाले, ओसंडू वाहत आहेत.

=================================

पाकचा खोटारडेपणा, आता म्हणतात चंदू चव्हाण आमच्याकडे नाहीच!

पाकचा खोटारडेपणा, आता म्हणतात चंदू चव्हाण आमच्याकडे नाहीच!
नवी दिल्ली नजरचुकीने पाकिस्तानात गेलेले राष्ट्रीय रायफल्सचे जवान चंदू चव्हाण पाकिस्तानात आलेच नाहीत, असा कांगावा आता पाकिस्तानने केला आहे.
लष्कराचे डीजीएमओ रणबीर सिंग यांनी यांनी आज पाकिस्तानातील लष्कराच्या संबंधित अधिकाऱ्याशी फोनवरून बातचित केली आणि चंदू बाबुलाल चव्हाण या भारतीय जवानाला  सोडण्याची मागणी केली. पण आमच्याकडे भारतीय लष्कराचा कुठलाच सैनिक नसल्याचं पाकिस्ताननं म्हटलंय. त्यामुळे चंदू चव्हाणला परत आणण्याचं मोठं आव्हान भारतासमोर उभं ठाकलं आहे.
नजरचुकीने एलओसी पार
27 आणि 28 सप्टेंबरच्या रात्री भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील 7 तळांना उद्ध्वस्त झाली. यामध्ये 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर 2 पाकिस्तानी सैनिक ठार झाले.

=================================

वेगळ्या विदर्भासाठी प्रतिविधानसभा, वामनराव चटप प्रतिमुख्यमंत्री

वेगळ्या विदर्भासाठी प्रतिविधानसभा, वामनराव चटप प्रतिमुख्यमंत्री
नागपूर: वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन पेटलं असताना, आता विदर्भ राज्य आंदोलन समितीने परत एकदा प्रतिरूप विधानसभा भरवण्याचं ठरवलं आहे. यासाठी बैठकीही घेण्यात आली. मात्र वेगळ्या विदर्भासाठी कसोशीनं भूमिका मांडणाऱ्या श्रीहरी अणेंना यातून दूर ठेवल्याचं चित्र आहे.
शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप हे प्रतिरूप विधानसभेचे मुख्यमंत्री असून विदर्भवादी आंदोलकांच्या या विधानसभेत ६२ आमदार असतील पैकी ४० राज्यकर्ते तर २२ विरोधक. तर शेतकरी नेते राम नेवले विरोधपक्ष नेता असतील. याविरोधात मनसेनं जोरदार आंदोलन करत प्रतिविधानसभेला विरोध दर्शवला आहे.
या प्रतिरूप विधानसभा कामकाजात उरी हल्ल्यापासून ते अनेक बाबींचा समावेश आहे. मात्र याचं साधं आमंत्रणसुद्धा अणेंना दिलं नसल्यानं वाद उद्भवण्याची शक्यता आहे. तसचं या प्रतिविधानसभेसाठी कॅबिनेट बनवण्यात आलं असून प्रति चीफ जस्टीस हे प्रती राज्यपालांना उद्या शपथ देतील आणि राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांना शपथ देतील.

=================================

पॅरिस जलवायू कराराला भारताची मान्यता

पॅरिस जलवायू कराराला भारताची मान्यता
फोटो सौजन्य: संयुक्त राष्ट्र ट्विटर हॅण्डल
न्यूयॉर्क: ऐतिहासिक पॅरिस जयवायू करारावर भारताच्या मान्यतेनिमित्त संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात विशेष सोहाळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अनेक सन्मानित व्यक्ती उपस्थित होत्या. त्यांनी जागतिक तापमान वाढीच्या विरोधातील लढ्यात भारताने दिलेल्या सहकार्याबद्दल अभिनंदन केलं.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्नाटकातील प्रसिद्ध गायिका सुधा रघुनाथन यांनी आपली कला सादर केली. यावेळी महासभेचे अध्यक्ष पीटर थॉमसन, उपमहासचिव जान एलियासन, बांगलादेशचे वित्तमंत्री अबुल माल मुहिथ, संयुक्त राष्ट्रामधील भारताचे माजी दूत हरदीप सिंह पुरी आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमावेळी महासभेचे अध्यक्ष पीटर थॉमसन यांनी आपल्या भारत दौऱ्यातील नवी दिल्लीतील गांधी स्मारकाच्या भेटीची माहिती दिली. या भेटीत त्यांनी राजघाटावरील गांधीजींच्या समाधीचे दर्शन घेऊन तिथे काहीकाळ घालवला असल्याचे सांगितलं.

पॅरिस कराराला भारताची मान्यतेमुळे आनंद होत असल्याचं अध्यक्ष पीटर थॉमसन यांनी यावेळी बोलाताना सांगितलं. तसेच संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की मून यांनीही भारताने दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

=================================

पालघर; वाड्यात आदिवासी समाजाचं आंदोलन, विष्णू सावरांना महाघेराव

वाड्यात आदिवासी समाजाचं आंदोलन, विष्णू सावरांना महाघेराव
पालघर : आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज पालघर जिल्ह्यातील वाडामध्ये आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या घराला महाघेराव घालण्यात येणार आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आलं आहे.
आदिवासी शेतकरी, देवस्थान शेतकरी आणि जंगल निवासी जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात येणार आहे.


=================================

'बाहुबली 2'चा फर्स्ट लूक रिलीज, 22 ऑक्टोबर रोजी पहिले पोस्टर

'बाहुबली 2'चा फर्स्ट लूक रिलीज, 22 ऑक्टोबर रोजी पहिले पोस्टर
मुंबई: मोस्ट अवेटेड फिल्म ‘बाहुबली: द कनक्ल्यूजन’चा फर्स्ट लूक रिलीज झाला असून या सिनेमाचं पहिलं पोस्टर 22 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार, असल्याची घोषणा दिग्दर्शकाने केली आहे. चित्रपट दिग्दर्शक राजमौलीने ट्वीट करुन ही माहिती दिली.

=================================

पडून असलेला पीएफ गहाण ठेवा, घर खरेदी करा

पडून असलेला पीएफ गहाण ठेवा, घर खरेदी करा !
मुंबई घरासाठी धडपडत असलेल्या नोकरदारांच्या मदतीला, त्यांच्या हक्काची बचत पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधी येणार आहे. कारण आता पगारातून नव्हे तर जमा झालेल्या पीएफच्या रकमेतून घरासाठी हप्ते देण्याची सुविधा मिळणार आहे. ही सुविधा मार्च 2017 अखेर सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय भविष्यनिर्वाह निधी आयुक्त व्ही. पी. रॉय यांनी दिली.

सुमारे 4 कोटी पीएफधारकांना याची सुविधा मिळणार आहे. स्वस्त घरांसाठी नोकरदारांच्या पीएफमधील रक्कम कर्जांच्या हप्त्यांच्या रुपाने वापरता येईल, असं ईपीएफओच्या विचाराधीन आहे. पीएफ गहाण ठेवून, त्यावर गृहकर्ज मिळू शकेल.

पीएफचा घरासाठी कसा वापर होईल?
स्वस्त घराच्या खरेदीसाठी नोकरदाराला आपला पीएफ तारण ठेवता येणार आहे. तसंच या रकमेतून तो घरकर्जाचे हप्ते फेडू शकेल.

=================================

'धोनीः दी अनटोल्ड स्टोरी'ची तिसऱ्या दिवशी विक्रमी कमाई

'धोनीः दी अनटोल्ड स्टोरी'ची तिसऱ्या दिवशी विक्रमी कमाई
एमएस धोनी दी अनटोल्ड स्टोरीः 66 कोटी*
मुंबईः टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्र सिंह धोनीची बॉक्स ऑफिसवर जोरदार बॅटिंग चालू आहे. ‘धोनी दी अनटोल्ड स्टोरी’ सिनेमाने केवळ भारतात तीन दिवसात तब्बल 66 कोटींची कमाई केली आहे. समीक्षक तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे.

सिनेमाने शुक्रवारी 20.6 कोटींची कमाई केली, शनिवारी 20.60 कोटींची कमाई केली तर  तिसऱ्या दिवशीही सिनेमाची घोडदौड कायम राहीली. या वीकेंडमध्ये हा सिनेमा 60 कोटींपेक्षा जास्त कमाई करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र अपेक्षेपेक्षाही जास्त कमाई सिनेमाने केली.

No comments: