[अंतरराष्ट्रीय]
१- कॅलिफोर्निया; बलात्काऱ्याला तब्बल दीड हजार वर्षांची शिक्षा
२- पाकच्या गोळीबारात बीएसएफचा जवान हुतात्मा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- मुलायम सिंह यांना विश्वासात न घेता काका शिवपाल यादवांसह इतर ३ मंत्र्यांची पुन्हा हकालपट्टी
४- ‘शहीदांच्या बलिदानाची किंमत ५ कोटी समजायची का?’ - सामना
५- रेणुका शहाणे यांच्या नणंदेला सुरेश प्रभूंच्या एका ट्वीटमुळे तत्काळ वैद्यकीय उपचार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
६- हाजी अलीच्या मजारपर्यंत महिलांना प्रवेश देऊ, अखेर ट्रस्ट नमलं !
७- 'मुख्यमंत्री फडणवीस जातीयवादी आहेत', नारायण राणेंची जोरदार टीका
८- फडणवीसांनी 5 कोटींना देशभक्ती विकत घेतली : शबाना आझमी
९- बालहट्टामुळे एका पेंग्विनचा मृत्यू, नितेश राणेंचा निशाणा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१०- आयुक्त हवेत मुंढे; तुकाराम मुंढेंसाठी नवी मुंबईकर रस्त्यावर
११- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ३ अपघात, २ ठार ६ जखमी
१२- मुंबईत ज्येष्ठ नागरिकांकडून 'इको मोक्ष'ची बांधणी
१३- चिंचवड; एकाच कुटुंबातील तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न, महिलेचा मृत्यू
१४- डेंग्यूला रोखण्यासाठी नाशकात डास प्रतिबंधक समिती
१५- लेफ्टनंट कर्नल जाधव यांची प्रेयसीवर हल्ला करुन आत्महत्या
१६- नगरमध्ये आज बहुजन क्रांती मोर्चा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१६- एकाच वन डे सामन्यात धोनीचे तीन मोठे विक्रम!
१७- टीम इंडियाचा दणदणीत विजय, न्यूझीलंडवर सात विकेट्सनी मात
१८- जिओ वेलकम ऑफरसोबत रिलायन्सचा LYF F1 स्मार्टफोन लाँच
१९- जगातल्या सर्वात लठ्ठ महिलेचे वजन...500 kg
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स*
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा.
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
=====================================
दक्षिण कोरियाच्या सेऊलमधील कोएक्स अॅक्वेरिअममधून मुंबईतील जिजामाता उद्यानात एकूण आठ पेंग्विन आणण्यात आले होते. यापैकी एका मादी पेंग्विनला यकृतातील जीवाणू संसर्गामुळे जीव गमवावा लागल्याचं समोर आलं आहे. रविवारी सकाळी 8.15 च्या सुमारास पेंग्विनचा मृत्यू झाला.

हाजी अलीच्या मजारपर्यंत महिलांना प्रवेश देऊ, अखेर ट्रस्ट नमलं !
नवी दिल्ली : अखेर हाजी अली ट्रस्ट सुप्रीम कोर्टात नमलं आहे. कारण हाजी अली दर्ग्याच्या मजारपर्यंत महिलांना प्रवेश देण्यास ट्रस्ट राजी झालं आहे. सुप्रीम कोर्टात ट्रस्टने त्याबाबतचं आश्वासन दिलं आहे.
यापूर्वी भारतीय मुस्लिम महिला आंदोलन या स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ती मान्य करत हायकोर्टाने महिलांना दर्ग्यात प्रवेश देण्याचे आदेश दिले होते. जिथे पुरुषांना जाण्याची परवानगी आहे, तिथे महिलांनाही जाण्याचा अधिकार आहे, असं म्हणत मुंबई हायकोर्टाने हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेशावरील बंदी उठवली होती. 26 ऑगस्ट 2016 रोजी मुंबई हायकोर्टाने यासंदर्भात निर्णय दिला होता.
मात्र हाजी अली ट्रस्टने या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं.
यावरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टात ट्रस्टींनी महिलांना मजारपर्यंत प्रवेश देऊ असं सांगितलं. जिथपर्यंत पुरुषांना प्रवेश आहे, तिथपर्यंत महिलांनाही प्रवेश देऊ, असं ट्रस्टींनी सांगितलं.
=====================================
मुलायम सिंह यांना विश्वासात न घेता काका शिवपाल यादवांसह इतर ३ मंत्र्यांची पुन्हा हकालपट्टी

मुलायम सिंह यांना विश्वासात न घेता काका शिवपाल यादवांसह इतर ३ मंत्र्यांची पुन्हा हकालपट्टी
नवी दिल्ली: गेल्या दीड महिन्यांपासून उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव आणि मुलगा अखिलेश यादव यांच्यात सुरु असलेली लढाई निर्णायक टप्प्यांवर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर यूपीत मुलायमसिंहांची महत्त्वाची बैठक सुरु आहे.
उत्तर प्रदेशच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि त्याचवेळी देशातल्या सर्वात मोठ्या राज्याची सत्ता सांभाळणाऱ्या यादव कुटुंबात अंतर्गत कलहाची नांदी सुरु झाली आहे. एका बाजूला 42 वर्षाचा मुलगा आणि दुसऱ्या बाजूला त्याचा सख्खा बाप, काका आणि इतर काही बाहेरचे कळलावे नारद.
अखिलेश यादव स्वतःला मुलायम सिंह यांचे राजकीय वारसदार मानतात. त्यामुळेच त्यांनी काल मुलायम सिंह यांना विश्वासात न घेता काका शिवपाल यादवांसह इतर ३ मंत्र्यांची पुन्हा हकालपट्टी केली.
यानंतर मुलायम सिंहदेखील आक्रमक झाले. त्यांनीही काही तासातच अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मुलायमसिंहांचे चुलतबंधू रामगोपाल यादव यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे या वादाने टोक गाठलं आहे.
=====================================
‘शहीदांच्या बलिदानाची किंमत ५ कोटी समजायची का?’ - सामना

‘शहीदांच्या बलिदानाची किंमत ५ कोटी समजायची का?’ - सामना
मुंबई: ‘शहीदांच्या बलिदानाची किंमत ५ कोटी समजायची का?’ असा जहरी वार आज शिवसेनेचं मुखपत्र सामनातून करण्यात आला आहे. अर्थातच मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यावरच शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
‘सत्तेच्या दरबारात मांडवली झाल्यानं महाराष्ट्रावरचं संकट टळलं.’ अशी बोचरी टीकाही शिवसेनेनं केली आहे.
=====================================
तुकाराम मुंढेंसाठी नवी मुंबईकर रस्त्यावर
नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात मंगळवारी नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणण्याची तयारी केली असताना, दुसरीकडे नवी मुंबईकर मुंढेंच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. आता नवी मुंबईकरांनी ‘सेव्ह तुकाराम मुंढे मोहीम’ देखील सुरु केली आहे.
=====================================
रेणुका शहाणे यांच्या नणंदेला सुरेश प्रभूंच्या एका ट्वीटमुळे तत्काळ वैद्यकीय उपचार

रेणुका शहाणे यांच्या नणंदेला सुरेश प्रभूंच्या एका ट्वीटमुळे तत्काळ वैद्यकीय उपचार
मुंबई: रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यतत्परतेचं पुन्हा एक उदाहरण पुढे आलं आहे. रेणुका शहाणे यांच्या नणंदेला सुरेश प्रभूंच्या एका ट्वीटमुळे तत्काळ वैद्यकीय उपचार मिळाले आहेत.
रेणुका शहणे यांची नणंद आणि कलाकार आशुतोष राणा यांच्या बहीण सुविधा एक्स्प्रेसनं प्रवास करत होती. त्यावेळी त्यांच्या छातीत त्रास होऊ लागल्यानं त्यांना वैद्यकीय उपचाराची गरज होती.
त्यामुळे रेणुका शहाणे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या ट्विटर अकांऊटवर ट्वीट केलं. यानंतर अवघ्या 15 मिनिटातच रेल्वे प्रशासन कामाला लागलं आणि डॉक्टर पोहोचेल, व त्यांनी वैद्यकीय उपचाराला सुरुवात केली.
दरम्यान, रेणुका शहाणेंनी यावरुन रेल्वे मंत्र्यांसोबत प्रशासनाचेही आभार मानले आहेत. तसेच रेल्वे प्रशासनाचे कौतुकही केलं आहे.
=====================================
जगातल्या सर्वात लठ्ठ महिलेचे वजन...
काहिरा: इजिप्तच्या एका महिलेचे वजन तब्बल अर्धा टन, म्हणजे 500 किलो असल्याचे नोंदवण्यात आलं आहे. डेली मेलने दिलेल्या रिपोर्टनुसार, इमान अहम अब्दुलाती (वय.36)ने गेल्या 25 वर्षांपासून अलेक्झेंडरीयामधलं आपलं घर सोडलं नाही. सध्या ती आपल्या बेडवरुनही उठण्यास असमर्थ आहे. तिच्या लठ्ठपणामुळे तिला एका जागेवरुन हलताही येत नाही.
ती दैनंदिन क्रियेसाठी पूर्णपणे आपली आई आणि बहीण चायमा अब्दुलातीवर अवलंबून आहे. या दोघीही तिची रोज सुश्रूशा करतात. अल अलबेरियानुसार, इमानाच्या जन्मावेळी तिचे वजन 5 किलो होते. तिच्या जन्मानंतर ती हात्तीपाय सदृश्य रोगाने ग्रस्त असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हात्तीपाय हा एकप्रकारे परजीवी संक्रमण असून, ज्याने संपूर्ण अंग सुजतं.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, शरिरातील ग्रंथी नष्ट होण्याने, शरिरात पाणी जमा होऊ लागते. इमाना लहान असताना एखाद्या लहान मुलाप्रमाणेच खेळत-बागडत होती. मात्र, तिने 11 व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर, तिच्या पायाच्या वजनामुळे तिला तिच्या पायावर उभे राहण्यास त्रास होऊ लागला. यानंतर तिने घरातच रांगण्यास सुरुवात केली.
त्यातच तिला अर्धांगवायूच्या झटका आल्यामुळे तिला शाळा सोडावी लागली. यानंतर ती आपल्या खोलीतून बाहेरच पडू शकली नाही. तसेच अनेक शारिरीक क्रिया करण्यासही ती असमर्थ ठरली. मृत्यूच्या भितीने तिच्या कुटुंबीयांनी एक ऑनलाईन याचिका दाखल करुन इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतह अल-सीसीकडे वैद्यकीय सहकार्याची मागणी केली आहे.
=====================================
मुंबईत ज्येष्ठ नागरिकांकडून 'इको मोक्ष'ची बांधणी
मुंबई : मुंबईतल्या सांताक्रुझमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी ‘इको मोक्ष’ ची बांधणी केली. लोकसहभागातून तब्बल 3 कोटी रुपये गोळा करुन ‘इको मोक्ष’ची स्थापना करण्यात आली आहे. राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते याचं लोकार्पण करण्यात आलं.
सांताक्रुझ पश्चिम येथील स्मशानभूमी परिसरातच इको मोक्षची बांधणी केली आहे. पीएनजी पाईप गॅसवर चालणाऱ्या दोन दाहिन्या उभारण्यात आल्या असून याठिकाणी प्रशस्त सभागृह आणि आसनव्यवस्थाही उभारण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे लाकडाची व वीजेची बचत होणार असून वायू प्रदूषणही होणार नाही.
लोकसहभागातून उभा राहिलेला मुंबईतला हा पहिलाच प्रकल्प आहे. या कार्य़क्रमाला राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह उपमहापौर अलका केरकर आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.
=====================================
बालहट्टामुळे एका पेंग्विनचा मृत्यू, नितेश राणेंचा निशाणा
मुंबई : राणीच्या बागेत दक्षिण कोरियाहून आणलेल्या आठ पेंग्विनपैकी एका पेंग्विनचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू बालहट्टामुळे झाल्याचा घणाघात काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
नितेश राणे यांनी ट्वीट करत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ट्वीटमध्ये नितेश यांनी वीरमाता जिजाबाई उद्यानाकडून पेंग्विनच्या मृत्यूबाबत प्रसारित केलेल्या परिपत्रकाची प्रत जोडली आहे.
दक्षिण कोरियाच्या सेऊलमधील कोएक्स अॅक्वेरिअममधून मुंबईतील जिजामाता उद्यानात एकूण आठ पेंग्विन आणण्यात आले होते. यापैकी एका मादी पेंग्विनला यकृतातील जीवाणू संसर्गामुळे जीव गमवावा लागल्याचं समोर आलं आहे. रविवारी सकाळी 8.15 च्या सुमारास पेंग्विनचा मृत्यू झाला.
26 जुलै 2016 रोजी पहिल्या टप्प्यात आणण्यात आलेल्या या पेंग्विन्समध्ये 3 नर आणि 5 मादींचा समावेश आहे. राणीच्या बागेतील क्वारेंटाईनमध्ये सर्व पेंग्विनना ठेवण्यात आलं होतं. दक्षिण कोरियासारखं तापमानही राणीच्या बागेत तयार करण्यात आलं आहे. वॉटर क्वॉलिटीही पेंग्विनला अनुकूल ठेवण्यात येत आहे. या पेंग्विनची काळजी घेण्यासाठी एका ऑस्ट्रेलियन कंपनीला जवळपास 8 कोटींचं कंत्राट देण्यात आलं.
=====================================
पीडित मुलीची ओळख उघड होऊ नये म्हणून आरोपी असलेल्या तिच्या वडिलांचे नाव बातमीत गुप्त ठेवण्यात आले आहे. फ्रेस्नो येथील सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी ऐतिहासिक निकाल देत आरोपीला एक हजार 503 वर्षांची कठोर शिक्षा ठोठावली आहे. दोषी ठरलेल्या व्यक्तीने 2009 ते 2013 या काळात स्वतःच्याच मुलीवर सातत्याने बलात्कार केला. सध्या 23 वर्षांच्या असलेल्या पीडित मुलीने न्यायालयाला सांगितले, की तिच्यावर केलेल्या अत्याचारांबद्दल तिच्या वडिलांनी कधीही पश्चाताप व्यक्त केला नाही.
पीडित मुलीचे संपूर्ण बालपण तिच्या वडिलांनी उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी सरकारी पक्षाच्या वकिलांनी न्यायालयाला केली होती. अंतिम शिक्षा ठोठाविण्यापूर्वी आरोपीला गुन्हा कबूल करण्याची दोन वेळा संधी देण्यात आली होती. गुन्हा कबूल केल्यास 22 वर्षांची शिक्षा होईल, असे त्याला सांगण्यात आले होते. मात्र, हे दोन्ही प्रस्ताव आरोपीने फेटाळून लावले होते. त्यानंतर त्याला न्यायाधीशांनी एक हजार 503 वर्षांची कोठर शिक्षा ठोठावली आहे.
- बलात्काऱ्याला तब्बल दीड हजार वर्षांची शिक्षा
फ्रेस्नो (कॅलिफोर्निया) : स्वतःच्याच किशोरवयीन मुलीवर सुमारे चार वर्षे सतत बलात्कार केल्याबद्दल अमेरिकेतील एका व्यक्तीला न्यायालयाने तब्बल एक हजार 503 वर्षांची अतिशय कठोर शिक्षा ठोठावली आहे.
पीडित मुलीची ओळख उघड होऊ नये म्हणून आरोपी असलेल्या तिच्या वडिलांचे नाव बातमीत गुप्त ठेवण्यात आले आहे. फ्रेस्नो येथील सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी ऐतिहासिक निकाल देत आरोपीला एक हजार 503 वर्षांची कठोर शिक्षा ठोठावली आहे. दोषी ठरलेल्या व्यक्तीने 2009 ते 2013 या काळात स्वतःच्याच मुलीवर सातत्याने बलात्कार केला. सध्या 23 वर्षांच्या असलेल्या पीडित मुलीने न्यायालयाला सांगितले, की तिच्यावर केलेल्या अत्याचारांबद्दल तिच्या वडिलांनी कधीही पश्चाताप व्यक्त केला नाही.
पीडित मुलीचे संपूर्ण बालपण तिच्या वडिलांनी उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी सरकारी पक्षाच्या वकिलांनी न्यायालयाला केली होती. अंतिम शिक्षा ठोठाविण्यापूर्वी आरोपीला गुन्हा कबूल करण्याची दोन वेळा संधी देण्यात आली होती. गुन्हा कबूल केल्यास 22 वर्षांची शिक्षा होईल, असे त्याला सांगण्यात आले होते. मात्र, हे दोन्ही प्रस्ताव आरोपीने फेटाळून लावले होते. त्यानंतर त्याला न्यायाधीशांनी एक हजार 503 वर्षांची कोठर शिक्षा ठोठावली आहे.
=====================================

No comments:
Post a Comment