Wednesday, 19 October 2016

नमस्कार लाईव्ह १९-१०-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- नव्या 'ब्राह्मोस'च्या टप्प्यात संपूर्ण पाकिस्तान 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
२- चहा करता येतो, मी पंतप्रधान होऊ शकतो : आझम खान 
३- कोपर्डी प्रकरणी अॅड. उज्ज्वल निकम यांना प्रत्येक सुनावणीची फी... 
४- एसबीआयच्या 6 लाख ग्राहकांची डेबिट कार्ड्स पूर्वसूचनेविना ब्लॉक 
५- जीएसटीमुळे राज्यांना होणारी नुकसान भरपाई केंद्र देणार! 
६- पंतप्रधान झाल्यावर प्रत्येकी 20 लाख देईन- आझम खान 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
७- कर्नाटकचं नंदिनी दूध आता महाराष्ट्रात, जानकर लाँचिंगला 
८- निवडणुकीत नागराज मंजुळेंसारखं दिग्दर्शन कराः अजित पवार 
९- एनओसीशिवाय वीज कनेक्शन मिळणार 
१०- मुलभूत सुविधांसाठी मोर्चा काढणं हे अपयशः नाना 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
११- कोल्हापुरात चालकाचा ताबा सुटल्याने बस थेट शेतात 
१२- कोल्हापूर ते मुंबई विमानसेवेला केंद्राचा हिरवा कंदील 
१३- बारामतीत महाविद्यालयीन विद्यार्थ्याची आत्महत्या 
१४- अॅसिड कंटेनर उलटल्याने ठाण्यात वाहतूक विस्कळीत, शाळांना सुट्टी 
१५- नागपूर; प्रफुल्ल गुप्ता या वकिलाची गळफास घेऊन आत्महत्या
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१६- माजी क्रिकेटर संजय मांजरेकरची मनसेवर बोचरी टीका 
१७- पाकिस्तानी चहावाला, निळ्या डोळ्याने तरुणींवर 'सर्जिकल स्ट्राईक' 
१८- स्टार कबड्डीपटू रोहित चिल्लरच्या पत्नीची आत्महत्या 
१९- कर्नाटकातही मराठा समाज एकवटणार, मूक मोर्चाचं आयोजन 
२०- पाक कलाकारांना सिनेमात घेणार नाही : करण जोहर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
==================================

माजी क्रिकेटर संजय मांजरेकरची मनसेवर बोचरी टीका

माजी क्रिकेटर संजय मांजरेकरची मनसेवर बोचरी टीका
मुंबई: उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदीबाबत देशभरात चर्चा सुरु असताना आता या वादात माजी क्रिकेटर संजय मांजरेकरनही उडी घेतली आहे. मनसेकडून ‘ए दिल है मुश्किल’ सिनेमाच्या प्रदर्शनला होणाऱ्या विरोध पाहून मांजरेकरनं त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

‘ऐ दिल है मुश्किल हा सिनेमा शूट केला तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे ऐ दिल है मुश्किल हा सिनेमा प्रदर्शित होऊ द्यावा, यापुढे पाकिस्तानी कलाकारांना घेऊन सिनेमा करणार नाही”, असं करण जोहरने म्हटलं आहे. पण तरीही मनसेचा विरोध मावळलेला नाही.

पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे प्रदर्शित करण्यास मनसे विरोध केला. ‘मल्टिप्लेक्सच्या काचा खूप महागड्या असतात हे विसरु नका’ असा धमकीवजा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

मनसेच्या या भूमिकेनंतर संजय मांजरेकरनं ट्वीटरवरुन मनसेवर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.

‘केवळ एक आमदार असलेला पक्ष मनसेनं काहीही धडा घेतलेला नाही. गुंडगिरी आणि धमक्या देऊन त्यांनी ठरवलं आहे की, आगामी निवडणुकीत ते शून्य आमदार असलेला पक्ष बनणार’ असं त्यानं ट्वीट केलं आहे.


.==================================

कर्नाटकचं नंदिनी दूध आता महाराष्ट्रात, जानकर लाँचिंगला

कर्नाटकचं नंदिनी दूध आता महाराष्ट्रात, जानकर लाँचिंगला
मुंबई : गुजरातच्या ‘अमूल’ने महाराष्ट्रात बस्तान बसवल्यानंतर आता कर्नाटकच्या दुधाचा ब्रँडही राज्यात एन्ट्री घेत आहे. ‘नंदिनी’ या दुधाच्या ब्रँडचं मुंबईत लाँचिंग होणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कार्यक्रमाला दुग्धविकासमंत्री महादेव जानकर या उद्घाटनाला हजेरी लावणार आहेत.
महाराष्ट्राच्या ‘आरे’ची दयनीय व्यवस्था असताना खुद्द दुग्धविकासमंत्री महादेव जानकर या उद्घाटनाला हजेरी लावणार असल्यामुळे राज्य सरकारच कर्नाटकच्या दुधाच्या ब्रँडला पायघड्या घालत असल्याचं चित्र आहे.
राज्यात आणि मुंबईत सध्या सहकारी दूध उत्पादक संस्थांची अवस्था बिकट आहे. खासगी दुग्ध उत्पादकांची मक्तेदारी मोडित काढण्यासाठी गोकूळ, वारणा, कात्रज या संस्थांच्या मदतीने महाराष्ट्राचा एकच ब्रँड आणण्याचा मनोदय नुकतंच जानकर यांनी बोलून दाखवलं होतं. मात्र आता तेच कर्नाटक सरकारच्या दुधाच्या ब्रँडच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.
भारतातील दुसरा क्रमांकावरील दूध ब्रँड म्हणून नंदिनी ओळखला जात असल्याची जाहिरात केली जाते. राज्यातील दैनंदिन दूध संकलन सुमारे 14 कोटी लिटर असलं, तरी त्यात खासगी दुधाचा वाटा 55 ते 60 टक्क्यांपर्यंत आहे.

.==================================

पाकिस्तानी चहावाला, निळ्या डोळ्याने तरुणींवर 'सर्जिकल स्ट्राईक'

पाकिस्तानी चहावाला, निळ्या डोळ्याने तरुणींवर 'सर्जिकल स्ट्राईक'
इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये सध्या एक चहावाला सर्वाधिक चर्चेत आहे. हा चहावाला त्याच्या निळ्या डोळ्यांमुळे सर्वांचं, विशेषत: तरुणींचं लक्ष वेधून घेत आहे. याच्या निळ्या नजरेने पाकिस्तानातीलच नव्हे तर भारतातील मुलीही अक्षरश: घायाळ झाल्या आहेत.
या चहावाल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर तमाम तरुणींनी आपली ‘दिवानगी’ जाहीर केली आहे. अर्शद खान असं या चहावाल्याचं नाव असून, तो अवघ्या 18 वर्षांचा आहे.
या चहावाल्याची तुलना थेट बॉलिवूड कलाकारांशी होत आहे.
केवळ पाकिस्तानातच नाही तर भारतातही या चहावाल्याची मोठी चर्चा रंगली आहे.
Arshad Khan Pakistan Chaiwala (Photo - insta jiah_ali ) 4
जिया अलीच्या अकाऊंटवरुन सर्वात आधी या चहावाल्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यानंतर या फोटोला लाईक आणि शेअरचा अक्षरश: महापूर आला.
14 तारखेला सोशल मीडियावर स्टार झाल्यावर या अर्शदला आता मॉडेलिंगचीही ऑफर मिळाली आहे. इस्लामाबादच्या एका ऑनलाईन शॉपिंग सेंटरच्या व्यापाऱ्याने अर्शदचे फोटोही पोस्ट केलेत. आणि तो आपल्या ब्रँडसाठी मॉडेलिंग करेल असं जाहीरही करुन टाकलं आहे.
सध्या भारतातही अर्शद चहावाल्याचे फोटो ग्रुपग्रुपवर फिरत आहेत. सध्या भारत-पाकमध्ये जो तणाव आहे, त्यापार्श्वभूमीवर या निली आखोंवाल्या अर्शदला सोशल मिडियावर न्यूक्लिअर वेपन आणि सर्जिकल स्ट्राईक ऑन इंडियन गर्ल्स म्हणूनही संबोधलं जातंय.
निळ्या डोळ्यांच्या चहावाल्याचा 10 गोष्टी
1) नाव – अर्शद खान
2) अर्शदचं वय – 18 वर्ष
3) अर्शदला तब्बल 16 भावंडं आहेत
4) अर्शद हा मर्दन या खैबर पक्खुतन्वा प्रांतातील आहे.
5) अर्शदचं कुटुंब गेल्या 25 वर्षांपासून इस्लामाबादमध्ये राहतं. अर्शद यापूर्वी फळविक्रेता होता. तीन महिन्यांपूर्वीच त्याने चहाचा गाडा सुरु केला.
6) अर्शदला चहावाला म्हटल्याचा राग येत नाही
7) अर्शदला मॉडेलिंग/अक्टिंगच्या ऑफरची आवड आहे
8) अर्शदला तशा अनेक ऑफर्सही आल्या आहेत
9) अर्शद खानचं स्वत:चं सोशल मीडियावर अकाऊंट नाही
10) आपण शाहरुख खानसारखं दिसतो, असं अर्शदला वाटतं.


.==================================

निवडणुकीत नागराज मंजुळेंसारखं दिग्दर्शन कराः अजित पवार

निवडणुकीत नागराज मंजुळेंसारखं दिग्दर्शन कराः अजित पवार
करमाळा (सोलापूर) : नागराज मंजुळेंनी ‘सैराट’चं जसं यशस्वी दिग्दर्शन केलं, तसंच यशस्वी दिग्दर्शन आगामी निवडणुकीत करा, असा सल्ला राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
नगरपालिका निवडणुकांच्या घोषणा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराची सुरुवात करमाळ्यातून केली. यावेळी झालेल्या भाषणात अजित पवारांनी ‘सैराट’चं आणि नागराज मंजुळेंचं कौतुक केलं.


.==================================

चहा करता येतो, मी पंतप्रधान होऊ शकतो : आझम खान

चहा करता येतो, मी पंतप्रधान होऊ शकतो : आझम खान
नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. खान यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मलाही चहा करता येतो, नीटनेटका पोशाख करता येतो आणि ड्रम वाजवता येतो, म्हणजे मी पंतप्रधानपदासाठी पात्र
उमेदवार आहे, अशी खोचक टिपणी आझम खान यांनी केली.
‘पंतप्रधान होण्यासाठी सर्व आवश्यक गुण माझ्यात आहेत. मी चहा करु शकतो, ड्रम वाजवू शकतो, जेवण बनवू शकतो आणि आकर्षक पोशाख घालू शकतो. त्याशिवाय मी इतकाही कुरुप नाही आणि भ्रष्टाचारीही नाही’ असं आझम खान म्हणाले. इ-रिक्षा वितरण समारंभात ते बोलत होते.
‘जर मी पंतप्रधान झालो तर सहा महिन्यात 130 कोटी जनतेच्या खात्यात मी 20 लाख रुपये जमा करेन. मी आश्वासनं मोडणाऱ्यांपैकी नाही.’ असं म्हणत आझम खान यांनी मोदींनी प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15 लाख जमा करण्याच्या दिलेल्या आश्वासनावर ताशेरे ओढले.



.==================================

कोपर्डी प्रकरणी अॅड. उज्ज्वल निकम यांना प्रत्येक सुनावणीची फी... 

कोपर्डी प्रकरणी अॅड. उज्ज्वल निकम यांना प्रत्येक सुनावणीची फी...
मुंबई : कोपर्डी बलात्कार प्रकरणावर मंगळवारपासून अहमदनगर सत्र न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सरकारतर्फे खिंड लढवत आहेत. कामकाज पाहण्यासाठी शासनातर्फे निकम यांना प्रतिदिन 35 हजार रुपये फी दिली जात आहे.
प्रतिदिन परिणामकारक सुनावणीसाठी 35 हजार रुपये, विचार विनिमय करण्यासाठी 10 हजार रुपये फी देण्यात येईल. विचार विनिमयाची फी प्रतितास असून त्याची कमाल मर्यादा दरदिवशी 30 हजारांपर्यंत असेल. त्याशिवाय हॉटेल लॉजिंग बोर्डिंगसाठी 5 हजार रुपये फी देण्यात येईल.
परिणामकारक सुनावणीचे दिवस संबंधित प्रकरणाच्या पर्यवेक्षीय पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून प्रमाणित करुन घ्यावेत, असं परिपत्रकात म्हटलं आहे. कोणत्याही प्रकारचे  अतिरिक्त शुल्क प्रदान होणार नाही, याची दक्षता घेण्याचंही यात नमूद केलं आहे. निकम यांना अपरिणामकारक सुनावणीची फी देण्याची परवानगी नसल्याचाही उल्लेख आहे.


.==================================

कोल्हापुरात चालकाचा ताबा सुटल्याने बस थेट शेतात

कोल्हापुरात चालकाचा ताबा सुटल्याने बस थेट शेतात
कोल्हापूर : कोल्हापुरात बसचालकाचा ताबा सुटल्याने बस शेतात घुसल्याची घटना समोर आली आहे. कसबा-बाडवा रोडवर केएमटीच्या बसला हा अपघात झाला.
कोल्हापुरातील कसबा-बावडा रोडवर केएमटी चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे बस थेट रस्त्यालगतच्या शेतात घुसली. बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
बस दुसऱ्या वाहनावर न धडकता शेतात घुसल्याने सुदैवाने मोठा अपघात होण्यापासून टळला. या अपघातात 9 जण किरकोळ जखमी झाले आहेत.


.==================================

एनओसीशिवाय वीज कनेक्शन मिळणार

आता एनओसीशिवाय वीज कनेक्शन मिळणार!
मुंबईः वीज जोडणीसाठी आता कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचं ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे एनओसी घेण्याची गरज नाही. केवळ अधिकृत ओळखपत्र आणि वास्तव्याचा अधिकृत पुरावा आणि आवश्यक शुल्क भरल्यास वीज जोडणी देता येईल, असं परिपत्रक उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाने जारी केलं आहे.
कोणत्याही जागेच्या मालकाने वीज जोडणीसाठी अर्ज केल्यास त्या जागेसाठी वीज वितरण परवानाधारकाकडून वीज पुरवठा करण्याची तरतूद विद्युत अधिनियमात आहे. काही वीज वितरण कंपन्या ना हरकत प्रमाणपत्राची मागणी वीज जोडणीसाठी करतात.
एनओसीशिवाय आतापर्यंत वीज जोडणी दिली जात नव्हती. मात्र शासनाच्या या नव्या नियमाने सर्वसामान्यांना सरकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याचा त्रास वाचणार आहे.


.==================================

मुलभूत सुविधांसाठी मोर्चा काढणं हे अपयशः नाना

मुलभूत सुविधांसाठी मोर्चा काढणं हे अपयशः नाना
रायगडः जाती-जातीत वाढत चाललेलं अंतर कमी करण्याची गरज असल्याचं मत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं आहे. जातीनिहाय मोर्चे निघण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन मोर्चे काढून न्याय मागावा,असंही ते म्हणाले.
रायगडमधील रोह्यात एका पुरस्कार वितरणप्रसंगी नाना बोलत होते. यावेळी त्यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केलं.
माणूस ही सर्वात सोपी जात आहे. आपल्या मूलभूत सुविधांसाठी मोर्चे काढावे लागत आहेत, हे आपलं अपयश आहे, असंही नाना पाटेकर यावेळी म्हणाले. नामच्या माध्यमातून केलेलं काम हे आपल्या आजवरच्या सर्व पुरस्कारांपेक्षा मोठं असल्याचं समाधानही नानांनी व्यक्त केलं.


.==================================

No comments: