Sunday, 9 October 2016

नमस्कार लाईव्ह ०९-१०-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- येमेन - शोकसभेवेळी हवाई हल्ला, १४० नागरिकांचा मृत्यू 
२- नौगाम सेक्टरमध्ये घुसलेले दहशतवादी पाकिस्तानचेच, लष्कराच्या हाती पुरावे 
३- फवाद खाननंतर माहिरा खानलाही आली जाग, केला दहशतवादाचा निषेध 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- शालेय क्रिकेट संघात 14 खेळाडूंच्या सचिनच्या प्रस्तावाला एमसीएची मान्यता 
५- एखाद्याला फाडून खाईन इतकी ताकद आहे माझीः नामदेव शास्त्री
६- दसरा-दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या दरात घसरण
७- आता दीड वर्षांसाठी मोफत डेटा, रिलायन्स जिओचा पुन्हा धमाका 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
८- नामदेव शास्त्री आणि पत्रकारातील संभाषण जसेच्या तसे 
९- जायकवाडीतील पाण्यावर हिरवा तवंग, पाण्याची तपासणी होणार 
१०- मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही : अजित पवार 
११- मुंबईत आज तिन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक 
१२- भगवान गड वादः नामदेव शास्त्रींचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
१३- सरकारकडून मराठा समाजाचे मोर्चे हायजॅक: नितेश 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- हैदराबाद; 64 दिवसांच्या उपवासाची बळजबरी, 13 वर्षीय तरुणीचा मृत्यू 
१५- सांगली; तरुणाचे अश्लील मेसेज, बापलेकीचा आत्महत्येचा प्रयत्न 
१६- मनसेचे संदीप देशपांडे, संतोष धुरी यांना न्यायालयीन कोठडी
१७- लोणावळ्यात टायगर पॉइंटवर स्टंटबाजी, मुंबईकर तरुणाचा मृत्यू
१८- सोलापुरात बंधारा फुटला, महाड दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली
१९- पतियाळा; महिलांच्या कपाळावर गोंदणाऱ्या पोलिसांना शिक्षा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- कबड्डी वर्ल्ड कपः भारताचा ऑस्ट्रेलियावर एकतर्फी विजय 
२१- पंकजांचं भाषण होणारच, शास्त्रींना 25 ग्रामपंचायतींचं आव्हान 
२२- कोहलीनंतर रहाणेचेही शतक; भारत 3 बाद 354 
२३- रिक्षा-टॅक्सी चालकांचेही आता येणार ‘अ‍ॅप’ 
२४- रणजी स्पर्धेत छत्तीसगडचे ऐतिहासिक विजयी पदार्पण 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
==============================

नामदेव शास्त्री आणि पत्रकारातील संभाषण जसेच्या तसे

नामदेव शास्त्री आणि पत्रकारातील संभाषण जसेच्या तसे
अहमदनगर : भगवानगडावरच्या वादावरुन सुरु झालेला ऑडिओ क्लीपचा वाद आता वेगळंच वळण घेत आहे. काल पंकजा मुंडेंनंतर नामदेवशास्त्रींची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली. यात शास्त्री एखाद्याला फाडून खाण्याची भाषा करत आहेत.
मला ब्लॅकमेल करण्यासाठी हा फोन गर्जे नावाच्या पत्रकारानं केला असावा, अशी शंका नामदेवशास्त्रींनी व्यक्त केली आहे. मात्र या पत्रकारासोबतचं संपूर्ण संभाषण ऐकल्यानंतर हा पत्रकार नामदेवशास्त्रींना ब्लॅकमेल करत आहे, असं प्राथमिकदृष्टया कुठेही आढळत नाही. त्यामुळे नामदेवशास्त्रींनी ब्लॅकमेल करण्याचा आरोप हा बिनबुडाचा असल्याचं पत्रकार गर्जे यांनी म्हटलं आहे.
भगवानगडावर दसऱ्या मेळाव्यानिमित्त राजकीय वा इतर कोणतंही भाषण होऊ नये, अशी भूमिका गडाचे महंत नामदेवशास्त्रींनी घेतली आहे. तर पंकजा मुंडे मात्र भाषणावर ठाम राहिल्यानं हा वाद उभा राहिला आहे.
मी शास्त्रींना ब्लॅकमेलिंग केलेलं नाही, त्यांनी तसे पुरावे द्यावेत, मी दोषी आढळल्यास कारवाई करावी, मात्र तसं न झाल्यास मी त्यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा करणार, असा इशारा पत्रकार गर्जे यांनी दिला आहे.
नामदेव शास्त्री आणि पत्रकारातील संभाषण :
पत्रकार – हॅलो
नामदेव शास्त्री – बोला सरजी काय म्हणता ?
पत्रकार – काय नाय बाबा थोडंसं बोलायचं होतं
नामदेव शास्त्री – बोला ना बोला
पत्रकार  – मी म्हटलं, हा विषय संपवूनच टाकू डायरेक्ट, मी बोलू का मग ताईंशी ? काय तिचं म्हणणं आहे, कारण की विषय क्लोज केलेलाच परवडला, काय लय डोक्याला ताण होऊ लागलाय याचा.
नामदेव शास्त्री – गर्जे मी नामदेव शास्त्री आहे, माझ्या मागे पण लोकं आहेत.. मी सत्तेसोबत लढतोय.. मी माणसं थांबवली आहेत.. जरी तुम्हाला तुमच्या नगरचं कळत असेल ना, तरी मी फाडून खाईल एखाद्याला एवढी ताकत आहे माझ्यात.. मी समाज आहे म्हणून शांत आहे अजून, नाहीतर लोक आमची एवढी खवळली आहेत ना.. त्यांना कळत नाही का भगवान गडासाठी करतो
म्हणून.. तुम्ही ऐका.. या भानगडीत तुम्ही पडूच नका गर्जे..
माझं कुठलंही लफडं नाही.. ते जे फोटो आहेत ना, ते भगवान बाबांच्या नातींचे आहेत. एक इंजिनीअर आहे, एक एमबीए आहे.. तुमच्या माहितीसाठी सांगतो जरा तपास करा तुम्ही..
पत्रकार – नाही नाही फोटोंचा काय विषयच नाही बाबा.. मी त्यासाठी फोनच नाही केला..
नामदेव शास्त्री – मला रमेश घुले काय करतो, किंवा अजून कोण काय करतो ना हे सगळं लक्षात आहे.. तुम्हाला कशाला काय बोलणार आहेत महाराज एवढे मोठे मोठे लोक दमलेत.. तुम्ही काय मिटवणार आहे ते..  जाऊन भेटा तुम्ही, भाषण सोडून मला सगळं मान्य आहे..
भाषण गडावर करायचं नाही, बाकी सगळं मला मान्य आहे.. शुभेच्छा नाही, स्टेज नाही, काहीच नाही… यायला बंदी नाही, हे मी टीव्हीवर बोललोय.. आणि मला काय राजकारण नाही करायचं
गर्जे… माणसं थांबवलीत मी.. तुम्हाला माहितीय परिसर कसा आहे..
पत्रकार- बरोबर आहे, महाराज मी तुमच्यापेक्षा एवढा लहान आहे ना.. पण या विषयाचा मला खूप त्रास होतोय..
नामदेव शास्त्री – काही त्रास करून घेऊ नका गर्जे.. मी मजबूत आहे..
पत्रकार- नाही परत काय घडलं बिडलं..
नामदेव शास्त्री – अहो मरू द्या हो, मरू द्या.. काय त्यांना आसाराम बापू करू द्या.. कसंय ना गर्जे..  ज्या कुळात जन्माला आलो ना त्या संताला त्रास देणं हे आपलं कर्तव्य आहे.. तुम्ही ज्या कुळात जन्माला आलेत ना… तो घुले असेल, तुम्ही असेल, मी असेल. कारण एवढा चांगला गड केलाय ना.. कारण की आपल्या आई बापाचा उद्धार, भगवानबाबाचा उद्धार तुम्ही केलाच पाहिजे, आपली खानदान ती आहे
पत्रकार – बरोबर आहे पण हे कुठंतरी सपलं पाहिजे..
नामदेव शास्त्री – मी कशाला संपवू.. मला थोडीच राजकारण करायचं आहे.. मी काय सांगितलं की मी भाषण करू देणार नाही.. बाकी सगळ्या तडजोडी मला मान्य आहे..
पत्रकार – कसंय ना बाबा तुमचा पण सन्मान व्हायला पाहीजे ना
नामदेव शास्त्री – गर्जे गर्जे… तुमच्यासोबत बोललो ना मी आता.. तेवढं समजून घ्या आता..

==============================

शालेय क्रिकेट संघात 14 खेळाडूंच्या सचिनच्या प्रस्तावाला एमसीएची मान्यता

शालेय क्रिकेट संघात 14 खेळाडूंच्या सचिनच्या प्रस्तावाला एमसीएची मान्यता
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं शालेय क्रिकेट संघांमध्ये प्रत्येकी 14 खेळाडूंचा समावेश असावा असा प्रस्ताव मुंबई क्रिकेट असोसिएशनसमोर ठेवला होता. एमसीएनंही सचिनच्या या प्रस्तावाला अनुकुलता दर्शवली आहे. रोटेशनल बेसिसवर हे 14 खेळाडू मैदानात उतरतील, त्यामुळं आता शालेय क्रिकेटचा ढाचा बदलण्याची शक्यता आहे.

शालेय क्रिकेटमध्ये अधिकाधिक मुलांना खेळण्याची संधी मिळावी यासाठी सचिननं एमसीएसमोर हा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर एमसीएनं मुंबई स्कूल्स स्पोर्टस असोसिएशनला पत्र लिहून या प्रस्तावाविषयी माहिती दिली. मुंबई स्कूल्स स्पोर्टस असोसिएशननंही गाईल्स शिल्ड आणि हॅरिस शिल्डमध्ये 14 खेळाडूंच्या समावेशाबाबत सकारात्कता दर्शवली. नव्या नियमानुसार फुटबॉल आणि हॉकीप्रमाणेच प्रत्येक संघात 14 खेळाडू असतील. त्यातील 11 जण क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरतील. विशेष म्हणजे संघातील सर्व चौदाजण गोलंदाजी करु शकतात. त्यामुळं मुलांमधली खेळातील आवड कमी होणार नाही आणि ड्रेसिंग रुममधल्या प्रत्येकाला खेळण्याची संधी मिळेल.

गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण म्हणजेच पर्यायाने क्रिकेटचा दर्जा उंचावण्यासाठी या नव्या फॉरमॅटची मदत होणार आहे. सचिनच्या म्हणण्यानुसार, जर एका मोसमात 300 सामने खेळवण्यात आले, तर प्रत्येक सामन्यात सहा नव्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल. त्यानुसार प्रत्येक मोसमात 1800 नव्या खेळाडूंना वाव मिळेल अशी माहिती सचिननं एमसीएला दिली आहे.

==============================

जायकवाडीतील पाण्यावर हिरवा तवंग, पाण्याची तपासणी होणार

जायकवाडीतील पाण्यावर हिरवा तवंग, पाण्याची तपासणी होणार
औरंगाबाद : जायकवाडी धरणातील पाण्यावर हिरव्या रंगाचा तवंग पसरल्यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र प्रशासनाच्या वतीने नागरिकांना घाबरुन न जाण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
जायकवाडी धरणातील जलाशय अवघ्या पाच दिवसात हिरव्या रंगाच्या तवंगाने व्यापला आहे. पाण्यावर 5 चौरस किलोमीटर परिसरात हिरव्या रंगाचा तवंग पसरला आहे. यंदा धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी आलं. प्रथमदर्शनी शेवाळामुळे हा प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे.
आरोग्याचा दृष्टीने जलाशयातील पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार आहे. पाण्याचा हिरवा रंग शेवाळामुळे आहे की एखाद्या केमिकलमुळे याचा शोध घेतला जाईल. मात्र नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, तसंच पाणी पिण्यास कोणताही धोका नसल्याचं प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

==============================

मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही : अजित पवार

मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही : अजित पवार
पिंपरी : मुख्यमंत्री हा राज्याचा असतो, कुठल्या एका पक्षाचा नाही, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडी अशी भाषा शोभत नसल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.
विरोधकांच्या कुंडल्या आपल्या हाती आहेत, असं वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. ते काल पिंपरीत बोलत होते. ‘यशवंतराव चव्हाण यांच्यापासून अनेक मुख्यमंत्री झाले, पण यापूर्वी असं कोणी बोललं नव्हतं’, असं सांगत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली.
अजित पवारांनी भगवान गडाच्या वादावरुन पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. पदाचा गैरवापर करणाऱ्या मंत्री फडणवीस यांना कशा चाललात, असा सवालही अजित पवारांनी यावेळी उपस्थित केला. ‘सरकारमधला मंत्रीच धमकी देत असेल तर ते चुकीचे आहे, राज्याची जनता असले प्रकार खपवून घेणार नाही’ असंही ते म्हणाले.

==============================

64 दिवसांच्या उपवासाची बळजबरी, 13 वर्षीय तरुणीचा मृत्यू

64 दिवसांच्या उपवासाची बळजबरी, 13 वर्षीय तरुणीचा मृत्यू
हैदराबाद : 13 वर्षीय मुलीला 64 दिवसांचा उपवास धरण्याची केलेली बळजबरी पालकांना चांगलीच महागात पडली आहे. उपवास न झेपल्यामुळे हैदराबादमध्ये एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू ओढावला आहे.
परंपरांचा भाग म्हणून आराधना नावाच्या तरुणीला तिच्या आई-वडिलांनी दोन महिने म्हणजे साधारण 64 दिवसांचा उपवास करण्यास भाग पाडलं होतं. मात्र ते सहन झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. हैदराबाद पोलिसांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
आराधनाच्या कुटुंबीयांचा सिकंदराबादमधील पोटबाजार परिसरात दागिन्यांचा व्यवसाय आहे.
बालल हक्कुला संघम या स्थानिक एनजीओने हैदराबाद पोलिस आयुक्तांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली आहे. आराधनाचे पालक आणि त्यांच्या समाजातील ज्येष्ठांनी तिला चातुर्मासाच्या नावाखाली उपवास धरण्याची सक्ती केल्याचा आरोप या पत्रात केला आहे.
आराधना सेंट फ्रान्सिस शाळेमध्ये आठव्या इयत्तेत शिकत होती. 1 ऑक्टोबरला तिचा 64 दिवसांचा उपवास संपला. उपवास संपल्यानंतर दोन दिवस ती फक्त द्रवपदार्थांचं सेवन करत होती. त्यानंतर तिसऱ्या दिवशी तिचं ब्लड प्रेशर खालावलं. तिला खाजगी रुग्णालयात नेलं असता मृत घोषित करण्यात आलं.
आराधनाच्या अंत्ययात्रेला सहाशेहून जास्त जण उपस्थित होते. यावेळी तिचा ‘बाल तपस्वी’ असा उल्लेख करत तिची शोभायात्रा काढण्यात आली. आराधनाच्या कुटुंबीयांवर भेटवस्तूंचा वर्षाव करत तिच्या मृत्यूचा सोहळा साजरा केल्याचंही म्हटलं जातं.

==============================

No comments: