Monday, 17 October 2016

नमस्कार लाईव्ह १७-१०-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय]
1- एनएसजी गटाच्या सदस्यत्वासाठी भारताला ब्राझीलचा पाठिंबा
2- पाकिस्तानात बस अपघातात 30 ठार 50 जखमी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
3- सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय संघाच्या प्रशिक्षणाला : मनोहर पर्रिकर
4- अमित शहा हे 'जनरल डायर' - केजरीवाल
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
5- नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीच्या तारखा जाहीर
6- ...म्हणून अरुण गवळीला पॅरोल रजा देण्याचे कोर्टाचे आदेश
7- कोहलीच्या गर्लफ्रेंडचं नाव काय? नववीच्या पेपरमध्ये प्रश्न
8- जिल्हाधिकाऱ्यांना सालगडी समजता का? : अजित पवार
9- बेकायदेशीर दुकाने थाटून फटाके विकणाऱ्यांवर कारवाई करा - हायकोर्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
10- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुण्यात मोर्चा
11- औरंगाबाद, नांदेड, गडचिरोली मध्ये १८ डिसेंबर रोजी निवडणूका
12- मुंबई - खड्य़ांच्या मुद्यावर मनसे आक्रमक, उद्या आयुक्तांना घालणार घेराव
13- मुंबई - विनाअनुदानित शाळांसाठी आमदारांचे बेमुदत उपोषण सुरु
14- परभणी; अॅट्रॉसिटी कायद्याच्या सर्मथनार्थ दलित समाजाचा आज मोर्चा
15- सोलापुरात पाच शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
16- 'ऐ दिल..' प्रदर्शित केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा
17- राज ठाकरेंच्या मुलाला अमिताभ यांचं मौल्यवान रिटर्न गिफ्ट!
18- रेनॉल्टनं क्विड कार परत मागवल्या!
19- पाटणा रेल्वे स्थानकावर सर्वाधिक पाहिले जाते पॉर्न
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स*
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा.
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
=======================================

नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीच्या तारखा जाहीर

नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीच्या तारखा जाहीर
मुंबई: राज्यातील 212 नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. चार टप्प्यात या निवडणुका होणार आहे.
पहिल्या टप्प्यात 27 नोव्हेंबरला 25 जिल्ह्यातल्या 165 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे. तर  मतमोजणी 28 नोव्हेंबरला असेल.
दुसऱ्या टप्प्यात 14 डिसेंबरला  पुणे आणि लातुर जिल्ह्यात ज्या नगरपरिषद आणि नगरपंचायती आहेत त्यांचं मतदान आणि  15 डिसेंबरला मतमोजणी होईल.
तिसऱ्या टप्प्यात 18 डिसेंबरला औरंगाबाद, नांदेड, भंडारा आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यातील 22 नगरपंचायत/नगरपरिषदेसाठी मतदान, तर 19 डिसेंबरला मतमोजणी असेल.
तर चौथ्या टप्पात 8 जानेवारीला नागपूर आणि गोंदियातील 11 नगरपंचायत/नगरपरिषदेसाठी मतदान होत असून,  9 जानेवारीला मतमोजणी असेल.
मुंबई, ठाणे आणि मुंबई उपनगर हे तीन जिल्हे वगळता आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

=======================================

...म्हणून अरुण गवळीला पॅरोल रजा देण्याचे कोर्टाचे आदेश

...म्हणून अरुण गवळीला पॅरोल रजा देण्याचे कोर्टाचे आदेश
नागपूर : कुख्यात गुंड अरुण गवळी पुन्हा एकदा पॅरोलवर तुरुंगाबाहेर येणार आहे. अरुण गवळीला पॅरोल रजा देण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 21 ऑक्टोबरला डॉन अरुण गवळीला तुरुंगातून पॅरोलवर सोडण्याचे आदेश दिला आहेत. गवळीची पत्नी आजारी असल्याने गवळीने पॅरोलची विनंती केली होती.
गवळीने तुरुंग प्रशासनाकडे पॅरोलची विनंती केली होती. मात्र, तुरुंग प्रशासनाने पॅरोल नाकारल्याने न्यायालयात याचिका दाखल केली होती.
येत्या 25 ऑक्टोबरला मुंबईतील हॉस्पिटलमध्ये अरुण गवळीच्या पत्नीचं ऑपरेशन होणार आहे. त्यानिमित्ताने पॅरोलजची रजा मिळणार आहे. मात्र, 2 नोव्हेंबरला पुन्हा तुरुंगात परतण्याचे आदेशही नागपूर खंडपीठाने दिले आहेत.

=======================================

पाक कलाकारांबाबत आमीरची पत्नी म्हणते...



पाक कलाकारांबाबत आमीरची पत्नी म्हणते...
मुंबई: उरी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानी कलाकार असलेल्या चित्रपटांना बंदी घाला, त्यांना भारतात राहू देऊ नका, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यातच आता अभिनेता आमीर खानची पत्नी किरण रावने आपलं मत व्यक्त केलं आहे.
पूल बनवून आपल्या कामाने माणसं जोडणं हे कलाकारांचं काम आहे, अशी प्रतिक्रिया किरण रावने दिली आहे.
किरण राव या मुंबई अॅकॅडमी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल म्हणजेच ‘मामी’च्या चेअरमन आहेत.
‘मामी’मध्ये पाकिस्तानी सिनेमा ‘जागो हुआ सवेरा’च्या प्रस्तावित स्क्रीनिंगला विरोध होत आहे.  मात्र या समस्येतूनही सुटका होईल, असा विश्वास किरण राव यांना आहे.
“सध्या कसोटीचा काळ आहे. सर्वजण भावनिक आहेत, त्यामुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. कोणताही देश असो, माणसं जोडणं हे कलेचं काम आहे. कलाकार म्हणून सामंजस्य निर्माण करणं हे आमचं काम आहे” असं किरण रावने म्हटलं आहे.
याशिवाय सीमेवर जवान शहीद होत आहेत, याच्याविरोधात आम्ही आहोच. पण क्रिएटिव्ह आणि आर्टिस्टिक कम्युनिटीचे सदस्य या नात्याने, पूल बनवून माणसं जोडणं हे आमचं काम आहे, असंही किरण राव यांनी सांगितलं.
मुंबईत 20 ऑक्टोबरपासून ‘मामी’ महोत्सवाला सुरुवात होत असून 54 देशातील 180 सिनेमे दाखवण्यात येणार आहेत.
=======================================

कोहलीच्या गर्लफ्रेंडचं नाव काय? नववीच्या पेपरमध्ये प्रश्न

कोहलीच्या गर्लफ्रेंडचं नाव काय? नववीच्या पेपरमध्ये प्रश्न
चार दिवसांपूर्वी म्हणजे 13 ऑक्टोबरला पीटीचा पेपर होता.
मुंबई : स्पर्धा परीक्षेच्या पेपरमध्ये अवाक् करणारे प्रश्न विचारल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र आता शाळेतील प्रश्नपत्रिकेतही असेच आश्चर्यकारक प्रश्न विचारल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे.
विराट कोहलीच्या गर्लफ्रेंडचं नाव काय? असा प्रश्न चक्क नववीच्या परीक्षेत विचारण्यात आला.
चाचा नेहरु हिंदी हायस्कूल, भिवंडी या शाळेतील नववीच्या शारीरिक शिक्षण अर्थात पीटीच्या लेखी परीक्षेत हा प्रश्न विचारण्यात आला. हा पेपर एबीपी माझाच्या हाती लागला आहे.
विराट कोहलीच्या गर्लफ्रेंडचं नाव काय? असा प्रश्न विचारुन तीन पर्याय देण्यात आले आहेत. या पर्यायांमध्ये प्रियांका, अनुष्का, दीपिका यांची नावं आहेत.

=======================================

राज ठाकरेंच्या मुलाला अमिताभ यांचं मौल्यवान रिटर्न गिफ्ट!

राज ठाकरेंच्या मुलाला अमिताभ यांचं मौल्यवान रिटर्न गिफ्ट!
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे सध्या भलत्याच खुशीत आहेत. या आनंदामागचं कारणही मोठं आहे. कारण बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट म्हणून अमित ठाकरेंना चक्क त्यांचं लकी घड्याळ दिलं.
राज ठाकरे यांनी उशिराच म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी अमिताभ बच्चन यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट दिलं. हे गिफ्ट म्हणजे राज ठाकरे यांनी स्वत: रेखाटलेलं बिग बी याचं स्केच. हे स्केच अमित ठाकरे यांनीच अमिताभ यांना ‘जलसा’ बंगल्यावर जाऊन दिलं. इतकंच नाही तर आवडत्या अभिनेत्यासोबत दोन तास बोलण्याची संधीही त्यांना मिळाली. 11 ऑक्टोबर रोजी अमिताभ यांचा वाढदिवस होता.
मात्र अमित ठाकरेंना सुखद धक्का तर दुसऱ्या दिवशी बसला. कारण महानायकाने चक्क त्यांचं लकी मनगटी घड्याळ अमित यांना रिटर्न गिफ्ट म्हणून दिलं होतं. फ्लोरोसंट ग्रीन रंगाचं हे घड्याळ अमिताभ काही वर्षांपासून वापरत आहेत. अनेक कार्यक्रमातही अमिताभ यांच्या मनगटावर हे घड्याळ दिसतं. फ्लोरोसंट ग्रीन रंगाचं हे घड्याळ बच्चन यांचं स्टाईल स्टेटमेंट बनलं होतं.

=======================================
=======================================

No comments: