[अंतरराष्ट्रीय]
१- अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रात पुन्हा उघड पाडलं
२- पाक संसदेत शरीफ यांचा बुरहान वाणीला हिरो ठरवण्याचा प्रयत्न
३- सर्जिकल स्ट्राईक झाला होता', PoKमधील पोलीस अधिका-याची माहिती
४- चीनने सुरू केल्या ‘5G’च्या चाचण्या
५- एरियन-५ प्रक्षेपकाद्वारे भारताच्या GSAT-१८ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- राष्ट्रीय रायफल्स'च्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला, तिघांचा खात्मा
७- ताजमहालाचं सौंदर्य वर्षभरासाठी झाकलं जाणार!
८- ऐन दिवाळीत पेट्रोल-डिझेल पंप चालकांचा संपाचा इशारा
९- सर्जिकल स्ट्राईकवरुन शेखी मिरवणाऱ्या मंत्र्यांना मोदींची तंबी
१०- त्यांना खड्ड्यात घालू: किशोरी पेडणेकरांंचा सोमय्यांवर निशाणा
११- आम्ही नरकात राहतोय, PoK मधील रहिवाशांची हतबलता
१२- गोळी झेलली लष्कराने, मोदी का घेत आहेत श्रेय - हार्दिक पटेल
१३- 'सर्जिकल स्ट्राईक'चा व्हिडीओ सर्वांसाठी नाही होणार खुला!
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१४- राज्यभरात सर्व तर मुंबईत विनाअनुदानित शाळा बंद
१५- दसऱ्याला भगवान गडावर येणारच: पंकजा मुंडे
१६- भगवान गडावर ये, पण भाषण नको, नामदेवशास्त्रींची पंकजा मुंडेंना अट
१७- नवाजुद्दीनाच्या नावाला विरोध, शिवसेनेनं मुज्जफरनगरातील रामलीलेपासून रोखलं
१८- सुप्रियाताई स्वपक्षालाच सुळावर का चढवता?: आशिष शेलार
१९- विरोधकांचं नाक दाबण्याच्या अनेक कुंडल्या हाती : मुख्यमंत्री
२०- नैराश्यातून रोहित वेमुलाने केली आत्महत्या - चौकशी आयोग
२१- म्हाडाकडून नोंदणी आणि आॅनलाइनसाठी मुदतवाढ
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२२- मुंबईत 35 च खड्डे, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचा पुनरुच्चार
२३- गोंदिया; 26 वर्षांपूर्वी चिमुकलीवर अत्याचार करणारा नराधम अटकेत
२४- हैदराबादला मराठा मोर्चा- हजारो उतरले रस्त्यावर
३५- जळगाव - नगरदेवला येथील अग्नावती प्रकल्पाला गळती
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२७- तृप्ती देसाईंच्या आयुष्यावर चित्रपट
२८- फोर्डच्या 'या' कारच्या किंमतीत तब्बल 2.82 लाखांची कपात
२९- चित्रपटातून काढून टाकलं जाईल या भीतीने स्टंट करायचो - अमिताभ बच्चन
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स*
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा.
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
======================================








१- अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रात पुन्हा उघड पाडलं
२- पाक संसदेत शरीफ यांचा बुरहान वाणीला हिरो ठरवण्याचा प्रयत्न
३- सर्जिकल स्ट्राईक झाला होता', PoKमधील पोलीस अधिका-याची माहिती
४- चीनने सुरू केल्या ‘5G’च्या चाचण्या
५- एरियन-५ प्रक्षेपकाद्वारे भारताच्या GSAT-१८ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- राष्ट्रीय रायफल्स'च्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला, तिघांचा खात्मा
७- ताजमहालाचं सौंदर्य वर्षभरासाठी झाकलं जाणार!
८- ऐन दिवाळीत पेट्रोल-डिझेल पंप चालकांचा संपाचा इशारा
९- सर्जिकल स्ट्राईकवरुन शेखी मिरवणाऱ्या मंत्र्यांना मोदींची तंबी
१०- त्यांना खड्ड्यात घालू: किशोरी पेडणेकरांंचा सोमय्यांवर निशाणा
११- आम्ही नरकात राहतोय, PoK मधील रहिवाशांची हतबलता
१२- गोळी झेलली लष्कराने, मोदी का घेत आहेत श्रेय - हार्दिक पटेल
१३- 'सर्जिकल स्ट्राईक'चा व्हिडीओ सर्वांसाठी नाही होणार खुला!
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१४- राज्यभरात सर्व तर मुंबईत विनाअनुदानित शाळा बंद
१५- दसऱ्याला भगवान गडावर येणारच: पंकजा मुंडे
१६- भगवान गडावर ये, पण भाषण नको, नामदेवशास्त्रींची पंकजा मुंडेंना अट
१७- नवाजुद्दीनाच्या नावाला विरोध, शिवसेनेनं मुज्जफरनगरातील रामलीलेपासून रोखलं
१८- सुप्रियाताई स्वपक्षालाच सुळावर का चढवता?: आशिष शेलार
१९- विरोधकांचं नाक दाबण्याच्या अनेक कुंडल्या हाती : मुख्यमंत्री
२०- नैराश्यातून रोहित वेमुलाने केली आत्महत्या - चौकशी आयोग
२१- म्हाडाकडून नोंदणी आणि आॅनलाइनसाठी मुदतवाढ
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२२- मुंबईत 35 च खड्डे, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचा पुनरुच्चार
२३- गोंदिया; 26 वर्षांपूर्वी चिमुकलीवर अत्याचार करणारा नराधम अटकेत
२४- हैदराबादला मराठा मोर्चा- हजारो उतरले रस्त्यावर
३५- जळगाव - नगरदेवला येथील अग्नावती प्रकल्पाला गळती
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२७- तृप्ती देसाईंच्या आयुष्यावर चित्रपट
२८- फोर्डच्या 'या' कारच्या किंमतीत तब्बल 2.82 लाखांची कपात
२९- चित्रपटातून काढून टाकलं जाईल या भीतीने स्टंट करायचो - अमिताभ बच्चन
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स*
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा.
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
======================================
राष्ट्रीय रायफल्स'च्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला, तिघांचा खात्मा
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) : हंदवाडातील लंगेटमधील ’30 राष्ट्रीय रायफल्स’च्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.
मात्र भारतीय जवान आणि अतिरेक्यांमध्ये चकमक अजूनही सुरु आहे. सध्या या परिसरात जमावबंदी करण्यात आली असून, कसून तपासणी सुरु आहे.
हंदवाडातील लंगेटमधील ’30 राष्ट्रीय रायफल्स’च्या कॅम्पवर हल्ला करत दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय रायफल्सवर निशाणा साधला. ’30 राष्ट्रीय रायफल्स’च्या लष्करी कॅम्पवर सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. भारतीय सैन्यानेही दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. दहशतवादी आणि भारतीय सैन्यामध्ये सलग 15 ते 20 मिनिटं गोळीबार सुरु होता.
गोळीबारानंतर दहशतवाद्यांनी पळ काढला. राष्ट्रीय रायफल्सचा परिसर, जिथे दहशतवादी हल्ला झाला, त्या साऱ्या परिसरात भारतीय लष्कराने सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे.
हंदवाडामधील ’30 राष्ट्रीय रायफल्स’चं कॅम्प बारामुल्लाच्या राष्ट्रीय रायफल्स कॅम्पच्या अगदी जवळच आहे. तीन दिवसांआधी बारामुल्लाच्या ’46 राष्ट्रीय रायफल्स’ कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. बारामुल्लातील हल्ल्यानंतरही दहशतवाद्यांनी पळ काढला होता.
======================================
राज्यभरात सर्व तर मुंबईत विनाअनुदानित शाळा बंद
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये झालेल्या शिक्षकांच्या राड्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शाळा आणि कॉलेज आज बंद आहेत. शिक्षकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध म्हणून मुख्याध्यापक संघाने हे पाऊल उचललं आहे.
राज्यभरात सर्व शाळा आणि कॉलेज बंद असले तरी मुंबईत मात्र फक्त विनाअनुदानित शाळा बंद असून अनुदानित शाळा सुरु आहेत. तर पुण्यातील बहुतांश शाळा आज सुरुच राहणार आहेत.
दरम्यान, विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी शिक्षकांनी औरंगाबादेतील मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा काढला होता. मात्र हा मोर्चा पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्याला उत्तर म्हणून संतप्त शिक्षकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये काही पोलिस आणि शिक्षक जखमी झाले.
शिवाय मुंबई पोलिसातील कर्मचारी राहुल कांबळे यांच्या या मोर्चादरम्यान मृत्यू झाला.
======================================
दसऱ्याला भगवान गडावर येणारच: पंकजा मुंडे
मुंबई: गेल्या काही दिवसांपूर्वी भगवानगडावरील दसरा मेळाव्यावरुन पंकजा मुंडे आणि महंत नामदेवशास्त्री यांच्यामध्ये चांगली जुंपली होती. भगवानगडावरील दसरा मेळावा पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्येच झाला पाहिजे, नाही तर तीव्र आंदोलन करु, असा इशारा वंजारी सेवा संघाच्या वतीनं देण्यात आला होता. तर दुसरीकडे पंकजा मुंडेचे येथे भाषण होणार नाही, अशी भूमिका गडाचे महंत नामदेवशास्त्री सानप यांनी घेतली होती.
त्यातच आज पंकजा मुंडेंच्या फेसबूक पेजवरुनही त्या दसरा मेळाव्यासाठी भगवान गडावर जाणार असल्याचं सांगितलंय. त्यामुळे पंकजा मुंड विरुद्ध नामदेव शास्त्री हा संघर्ष वाढणार असल्याची चिन्हे आहेत.
======================================
ताजमहालाचं सौंदर्य वर्षभरासाठी झाकलं जाणार!
नवी दिल्ली: जगभरातील पर्यटकांसाठी सौंदर्याची खाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताजमहालचं सौंदर्य वर्षभरासाठी पर्यटकांना पाहाता येणार नाही. कारण आग्र्यातील ताजमहालच्या मुख्य घुमटावर मातीचा मुलामा चढवला जाणार आहे.
संपूर्ण संगमरवरी असलेल्या ताजमहालला गेल्या अनेक वर्षांपासून पिवळेपणाची झाक चढली आहे. त्यामुळे हा पिवळेपणा कमी करण्यासाठी मातीचा मुलामा चढवण्याचा निर्णय पुरातत्व खात्यानं घेतलाय.
एप्रिल 2015 पासून ही प्रक्रिया सुरु आहे. मुख्य घुमटावर 2 मिमी जाडीचा मातीचा मुलामा लावला जाणार आहे. हा थर सुकल्यानंतर नॉयलॉनच्या ब्रशनं बाजूला काढून फिल्टर पाण्यानं धुतला जाणार आहे.
======================================
अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रात पुन्हा उघड पाडलं
न्यूयॉर्क: भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी राजदूत सैय्यद अकबरुद्दीन यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला फटकारलं आहे. काल अकबरुद्दीन यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भाषण केलं. यावेळी त्यांनी मसूद अजहरला पाठीशी घालणाऱ्या सुरक्षा परिषदेच्या सदस्यांना धारेवर धरलं. तसंच जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा वेळदेखील संपला असल्याचं त्यांनी यावेळी ठणकावलं.
संयुक्त राष्ट्रातील ‘रिपोर्ट ऑफ सेक्रेटरी जनरल ऑन द वर्क ऑफ द ऑर्गनायझेशन’मध्ये पाकिस्तानच्या यूएनमधील राजदूत महीला लोधी यांनी काश्मीरचा मुद्दा उकरुन काढत, भारतावर टीका केली. त्याला अकबरुद्दीन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
अकबरुद्दीन म्हणाले की, ”काश्मीरप्रश्नी जगाची दिशाभूल करणाऱ्या पाकिस्तानला सर्वत्र मात खावी लागत आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेवेळीही पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काश्मीरचा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळीही त्यांना समर्थन मिळाले नाही. त्यामुळे यावर आधिक बोलण्याची गरज नाही.”
त्याचबरोबर त्यांनी सुरक्षा परिषदेलाही धारेवर धरलं. संयुक्त राष्ट्रांना भारत-पाकिस्तानच्या वादात हस्तक्षेप करायला तयार नाही. पण, दहशतवादी मसूद अजहरला क्लिनचीट देण्याची सुरक्षा परिषदेला खूप घाई आहे, असा टोला अकबरुद्दीन यांनी लगावला.
======================================
नवाजुद्दीनाच्या नावाला विरोध, शिवसेनेनं मुज्जफरनगरातील रामलीलेपासून रोखलं
मुंबई: मुजफ्फरनगरमध्ये होणाऱ्या रामलिला कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने घेतला आहे. नवाजुद्दीन मुस्लीम असल्याने त्याला स्थानिक शिवसेनेने या कार्यक्रमापासून दूर राहण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याने हा निर्णय घेतला आहे.
मुजफ्फनगरच्या बुढानामध्ये होणाऱ्या रामलिला कार्यक्रमात नवाजुद्दीन मारीच राक्षसाची भूमिका साकारणार होता. पण स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केवळ मुस्लीम असल्याच्या कारणावरुन त्याला या कार्यक्रमात सहभागी होण्यास विरोध केला.
दरम्यान, नवाजुद्दीने यामागे धार्मिक कारण नसल्याचं म्हटलं आहे. तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तो मुस्लीम असल्यानेच त्याला विरोध असल्याचं म्हटलं आहे.
======================================
सुप्रियाताई स्वपक्षालाच सुळावर का चढवता?: आशिष शेलार
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधल्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी टीका केली आहे.
‘ताई पवार म्हटलं की, सल्ले द्यायलाच हवे का?, कशाला स्वपक्षालाच सुळावर चढवता?’ असं म्हणत त्यांनी शेलार यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे.
‘मुख्यमंत्री चांगलंच काम करीत आहेत. ते जनतेला दिसत देखील आहे. विरोधात बसल्यावर संतुलन बिघडलं आहे. ताई तिथं बसणं देखील किती जड जात आहे हे देखील जनता पाहत आहे.’ असा हल्लाबोल शेलारांनी केला आहे.
कोपर्डी प्रकरणी सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. त्याला देखील शेलार यांनी उत्तर दिलं आहे. ‘कोपर्डी प्रकरणी चार्जशीट दाखल होणारच. त्यामुळे रस्त्यावर उतरण्याची किंवा बोंबाबोंब करुन श्रेय लाटण्याची ताई घाई कशाला करता?’ असं म्हणत शेलारांनी टोला हाणला आहे.
======================================
सर्जिकल स्ट्राईकवरुन शेखी मिरवणाऱ्या मंत्र्यांना मोदींची तंबी
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने केल्याले सर्जिकल स्ट्राईकची चर्चा विविध स्तरांवर सुरु आहे. मात्र यावरुन शेखी मिरवणाऱ्या नेत्यांचे कान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपटले आहेत. अधिकृत प्रवक्त्यांनीच सर्जिकल स्ट्राईकबाबत सार्वजनिक वक्तव्य करावीत, असं मोदींनी सुनावलं आहे.
सर्जिकल स्ट्राईकवरुन उर बडवणाऱ्या आणि गरजेपेक्षा जास्त बोलणाऱ्या नेत्यांना मोदींनी सक्त ताकीद दिली आहे. विरोधी पक्षांकडून वाकयुद्ध टाळण्याच्या दृष्टीने मोदींनी ही सावध पावलं उचलली आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर सर्वच पक्षांमध्ये एकजूट पाहायला मिळाली आहे. काँग्रेससह सर्वच विरोधीपक्षांनी मोदी सरकारला पाठिंबा दर्शवला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र मोदींकडे स्ट्राईकचे पुरावे मागितले. त्यानंतर काँग्रेसमधील दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांच्यासह मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनीही सर्जिकल स्ट्राईकच्या सत्यतेबाबत सवाल उपस्थित केले होते. त्यानंतर मात्र काँग्रेसनेही भाजप राजकीय स्वार्थापायी स्ट्राईकचा वापर करत असल्याचा आरोप केला.
दहशतवादाविरोधात भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचं श्रेय लाटणं, हे असमंजसपणाचं लक्षण असल्याचं मोदींसह भाजपाध्यक्ष अमित शाहंनी पक्षातील सर्वांनाच सुनावलं आहे.
======================================
गोंदिया; 26 वर्षांपूर्वी चिमुकलीवर अत्याचार करणारा नराधम अटकेत
======================================
No comments:
Post a Comment