Monday, 10 October 2016

नमस्कार लाईव्ह १०-१०-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- दुबईत व्हीआयपी नंबरप्लेटसाठी भारतीय व्यावसायिकाकडून 60 कोटींची बोली 
२- हार्ट आणि हॉमस्ट्रॉम यांना अर्थशास्त्राचे नोबेल 
३- श्रीलंका क्रिकेट संघावरील हल्ल्याचा सूत्रधार ठार 
४- राजकीय फायद्यासाठी भारताला मसूद अझरवर बंदी हवी - चीन 
५- परवानगीशिवाय कोणत्याही महिलेला किस केलं नाही - ट्रम्प 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
६- संसदेवर हल्ला करून ' जैश-ए-मुहम्मद' घेणार 'सर्जिकल स्ट्राईक'चा बदला? 
७- 'कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नही होगा' म्हणणाऱ्या जवानाला धमकी 
८- सर्जिकल स्ट्राईकनंतर दहशतवाद्यांचा संसदेवर हल्ल्याचा कट
९- सैनिकांच्या पेन्शनमध्ये तब्बल 18000 रुपयांनी कपात 
१०- रेल्वे प्रवासात लॅपटॉप आणि मोबाईलला विमा कवच 
११- सरकारवर टीका केल्यास सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१२- शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं विघ्न दूर, लाऊडस्पीकरला परवानगी
१४- भगवानगडाला पोलिस छावणीचं स्वरुप, मेळाव्याचं ड्रोनने शूटिंग! 
१५- भाजपचं लक्ष केवळ भगवानगडावरच्या मेळाव्यावर : शेलार 
१६- काश्मीरी युवकांनी वाचविला जवानाचा जीव 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- पुण्यात बागेत दारु पिणाऱ्यांचा पोलिसांवर हल्ला, एक पोलिस गंभीर जखमी 
१८- नाशिकमधील मोबाईल इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद 
१९- नाशिक तळेगाव प्रकरण : 15 दिवसांत आरोपपत्र दाखल करणार : केसरकर 
२०- पम्पोरमध्ये शासकीय इमारतीवर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान जखमी 
२१- औरंगाबादच्या बैठकीत मराठा मोर्चासाठी राज्यव्यापी समिती स्थापन 
२२- बोरीवलीत ट्रेनखाली अडकलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू 
२३- उत्तर प्रदेशात जीप नदीत कोसळून आठ ठार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- किवींचा पहिला डाव 299 धावात आटोपला, अश्विनने घेतले ६ बळी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
=====================================

'कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नही होगा' म्हणणाऱ्या जवानाला धमकी

'कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नही होगा' म्हणणाऱ्या जवानाला धमकी
नवी दिल्ली: उरी हल्ल्यानंतर हिमाचल प्रदेश पोलीस दलातील एका जवानाने सादर केलेल्या कवितेने कोट्यवधी भारतीयांच्या मनामध्ये राष्ट्र चेतनेचं स्फूरण चढवलं होतं. त्याने ‘कश्मीर तो होग लेकिन पाकिस्तान नही होगा’ या कवीतेतील या शेवटच्या शब्दांचा व्हिडिओ उरी हल्ल्यानंतर कमालीचा व्हायरल झाला होता. पण ही कविता सादर करणाऱ्या जवानाला दहशतवाद्यांकडून धमक्या मिळत आहेत.

उरी हल्ल्यानंतर हिमाचल प्रदेशच्या पोलीस दलातील कॉन्स्टेबल मनोज कुमारने सादर केलेली कविता सोशल मीडियावर कमालीची व्हायरल झाली होती. या कवितेत त्याने दहशतवाद्यांना चांगलेच फटकारले होते. तसेच दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानला ललकारले होते. या व्हायरल व्हिडिओमुळे मनोज कुमार हा कोट्यावधी भारतीयांच्या गळ्यातला ताईत बनला होता.

=====================================

भाजपचं लक्ष केवळ भगवानगडावरच्या मेळाव्यावर : शेलार

भाजपचं लक्ष केवळ भगवानगडावरच्या मेळाव्यावर : शेलार
नवी दिल्ली : भाजपचं लक्ष केवळ भगवानगडावरच्या दसरा मेळाव्याकडे लागलं आहे, असं म्हणत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोला लगावला. ते नवी दिल्लीत बोलत होते.
मुंबईतील शिवाजी पार्कवर दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. मात्र आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकता आहे.
याबाबत आशिष शेलार यांना विचारलं असता ते म्हणाले की, भाजपचं लक्ष जर कुठल्या दसरा मेळाव्याकडे लागलं असेल तर भगवानगडावरच्या मेळाव्याकडे.
भाजप शतप्रतिशत पंकजा मुंडेंच्या पाठिशी
तसंच भगवानगड वादामध्ये भाजप शतप्रतिशत पंकजा मुंडे यांच्या पाठिशी आहे. त्यांच्या भूमिकेकडे पक्षाचं लक्ष असल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं.
सोमय्यांचं विधान पक्षाची अधिकृत भूमिका नाही
मुंबई महापालिका निवडणुकीविषयी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, भाजपने सहा महिने आधीच तयारी सुरु केली आहे. खासदार किरीट सोमय्या यांनी पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याच्या मनातील भावना मांडली. पण सोमय्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत यावर चर्चा करु आणि त्यानंतर मुख्यमंत्री भाजपच्या अधिकृत भूमिकेवर निर्णय घेतील.

=====================================

पुण्यात बागेत दारु पिणाऱ्यांचा पोलिसांवर हल्ला, एक पोलिस गंभीर जखमी

पुण्यात बागेत दारु पिणाऱ्यांचा पोलिसांवर हल्ला, एक पोलिस गंभीर जखमी
पुणे : बागेत दारु पित बसलेल्या मद्यपींनी पोलिसांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. दारुच्या बाटल्या आणि दगडं फेकून पोलिसांना मद्यपींनी जखमी केले. या घटनेत पोलिस कॉन्स्टेबल प्रदीप राळे यांच्या डोक्याला जबर मार बसला असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
या सर्व प्रकरणी फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. मआज अख्तर शेख असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
प्रदीप राळे हे फरासखाना पोलिस ठाण्यामध्ये नेमणुकीस आहेत. राळे आणि त्यांचे सहकारी पाटील रात्रपाळी असल्याने बीट मार्शल गस्तीवर होते. कसबा पेठेत असलेल्या उद्यानामध्ये काहीजण दारु पित बसलेले असतात, अशी माहिती त्यांना मिळाली होती. तेव्हा स्मशानभूमीच्या भिंतीलगत असलेल्या सुरक्षारक्षकाच्या खोलीजवळ तीन ते चार जण दारु पित बसलेले दिसले. राळे यांनी एकाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो हिसका देत भिंतीवरुन उडी मारुन पळाला. त्याने जाता जाता पोलिसांच्या दिशेने बिअरची बाटली फेकून मारली. ती बाटली राळे यांच्या कपाळावर लागली. अन्य दोघांनी त्यांच्यावर दगडफेक केली. राळे यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांच्या डोक्यामधून रक्त येऊ लागले होते. त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.

=====================================

नाशिकमधील मोबाईल इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद

नाशिकमधील मोबाईल इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद
नाशिक : चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्यानंतर नाशिकमध्ये तणावाचं वातावरण आहे. तसंच या घटनेबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात असल्याने नाशिकमधील मोबाईल इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली आहे.
मोबाईलवरुन मोठ्या प्रमाणात अफवाचं पीक पसरत असल्यामुळे नाशिक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार, नाशिकमधील आमची इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. सेवा पुन्हा सुरु झाल्यावर तुम्हाला कळवण्यात येईल, असा मेसेज मोबाईल कंपन्या ग्राहकांना पाठवत आहे.

=====================================

सर्जिकल स्ट्राईकनंतर दहशतवाद्यांचा संसदेवर हल्ल्याचा कट

सर्जिकल स्ट्राईकनंतर दहशतवाद्यांचा संसदेवर हल्ल्याचा कट
नवी दिल्ली: पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर आता दहशतवादी पुन्हा एका संसदेवर हल्ला करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुप्तचर यंत्रणेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनंतर संसदेच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISIनं दहशतवाद्यांना सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्याचे आदेश दिले असल्याची माहिती, सुत्रांकडून समजते आहे.
एका खास रिपोर्टनुसार, दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदनं संसदेवर पुन्हा एकदा हल्ला करण्याचा कट रचला आहे. जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरनं हा कट रचल्याची माहिती समजते आहे.
2001 साली भारतीय संसदेवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला जैश-ए-मोहम्मदनं केला होता. या हल्ल्यात अफजल गुरु हा देखील सहभागी होता. काही वर्षापूर्वीच त्याला फाशी देण्यात आली.

=====================================

सैनिकांच्या पेन्शनमध्ये तब्बल 18000 रुपयांनी कपात

सैनिकांच्या पेन्शनमध्ये तब्बल 18000 रुपयांनी कपात
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर देशभरातून जवानांच्या कामगिरीचे कौतुक झालं. त्याचबरोबर केंद्र सरकारच्याही या निर्णयक्षमतेचं अभिनंदन करण्यात आलं. पण या उत्साहावर विरजण पडलं आहे. कारण, केंद्र सरकारने सैन्यातील जखमी सैनिकांच्या पेन्शनमध्ये मोठी कपात केली आहे.

‘बिझनेस स्टॅण्डर्ड’ने दिलेल्या वृत्तनुसार, युद्धात अथवा सैन्य दलाच्या एखाद्या मोहीमेत जखमी सैनिकांना स्वेच्छानिवृत्तीनंतर 45,200 पेन्शन दिली जाते. मात्र, त्यात 18,000 रुपयांनी कपात करुन पेन्शन 27,200 रुपये करण्यात केली आहे. यासंबंधीचा अध्यादेश मंत्रालयाच्या वतीने 30 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आला. विशेष म्हणजे ही कपात 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आल्याचेही यात नमूद करण्यात आलं आहे. संरक्षण मंत्रालयाने यासाठी हा अध्यादेश आपल्या संकेत स्थळावरुन जाहीर केला आहे.

सर्जिकल स्ट्राईकमध्ये सहभागी असलेल्या आणि सैन्य दलासाठी 10 वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना 70,000 रुपये, तसेच 26 वर्षांची सेवा बजावणाऱ्या नायब सुभेदारांना 40,000 रुपये पेन्शन मिळत होती. पण आता यामध्ये मोठी कपात करण्यात आली आहे.

=====================================

भगवानगडाला पोलिस छावणीचं स्वरुप, मेळाव्याचं ड्रोनने शूटिंग!

भगवानगडाला पोलिस छावणीचं स्वरुप, मेळाव्याचं ड्रोनने शूटिंग!
अहमदनगर : दसऱ्यानिमित्त होणाऱ्या भाषणाच्या पार्श्वभूमीवर भगवानगडावर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. 1 अतिरिक्त पोलिस अधीक्षक, तीन उपअधीक्षक, 11 पोलिस निरीक्षक, 21 सहाय्यक निरीक्षक, फौजदार, 325 पोलिस कर्मचारी, 75 महिला पोलिस, दोन आरसीपी प्लाटून, दोन राखीव पोलिस दलाच्या तुकड्या, याशिवाय बाहेरच्या जिल्ह्यातून फौजफाटा मागवण्यात आला आहे.

=====================================

रेल्वे प्रवासात लॅपटॉप आणि मोबाईलला विमा कवच

रेल्वे प्रवासात लॅपटॉप आणि मोबाईलला विमा कवच
नवी दिल्ली : आयआरसीटीसी आता प्रवाशांच्या मोबाईल आणि लॅपटॉपसारख्या उपकरणांसाठीही विमा योजना सुरु करण्याच्या विचारात आहे. रेल्वे प्रवाशांसाठी सुरु केलेल्या विमा योजनेच्या यशानंतर रेल्वे प्रशासनाने हा विचार चालवला आहे. यासंबंधी आयआरसीटीसी आणि विमा कंपन्याच्या अधिकाऱ्यांची पहिली बैठकही झाली आहे. आयआरसीटीसीचे अध्यक्ष ए के मनोचा यांनी ही माहिती दिली.

“विमा कंपन्यांनी खोट्या दाव्यांबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. आम्ही काही पर्याय दिले आहेत आणि त्यावर विमा कंपन्यांची मतं मागितली आहेत. प्रवासी विम्यासोबतच आम्ही गॅझेट्ससाठी विमा सुरु करण्याच्या विचारात आहोत. त्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचारही आम्ही सुरु केला आहे. सुरुवातीला ही विमा योजना क्रेडिट कार्ड धारक आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देण्याच्या विचारात आहोत.” असंही ते म्हणाले.


=====================================

सरकारवर टीका केल्यास सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

सरकारवर टीका केल्यास सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
नवी दिल्ली: सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारवर टीका अथवा सरकारी धोरणांवर ताशेरे ओढल्यास त्यांच्यावर आता यापुढे शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.

सरकारच्या धोरणानं तूरडाळ महाग झाली, राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती वाईट आहे, वाहतूक व्यवस्था चांगली नाही, कुठे आहेत अच्छे दिन? अशा तक्रारी सरकारी कर्मचाऱ्यांना करता येणार नाहीत. असं केल्यास कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल अशी तंबी केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना दिली आहे.

कर्मचाऱ्यांना दिलेल्या सेवा नियमांचा दाखला पुढे करण्यात आला आहे. अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अर्थखात्यानं याबाबतचा आदेश नुकताच जारी केला आहे. आणीबाणीची आठवण करून देणाऱ्या या नियमाला सरकारी कर्मचाऱ्यांकडून तीव्र विरोध केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मोदी सरकारवर एकाधिकारशाहीचा सुरुवातीपासूनच आरोप सुरु आहे. त्यामुळे अशा आदेशामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते आहे.

=====================================
काश्मीरी युवकांनी वाचविला जवानाचा जीव
श्रीनगर - गेल्या दोन महिन्यांपासून काश्मीर खोऱ्यात तणावाचे वातावरण असताना, रविवारी काश्मीरमधील युवकांनी अपघातग्रस्त गाडीतून लष्कराच्या जवानाचा जीव वाचविल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगर बायपास रस्त्यावर लसजान येथे लष्कराच्या ताफ्यातील ट्रक नियंत्रण सुटल्याने झाडावर आदळला. या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि एक जवान अडकून बसला होता. लष्कराचे जवान ट्रक बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. पण, यश मिळत नव्हते. अखेर स्थानिक काश्मीर युवकांनी ट्रक आणून खड्ड्यात अडकलेला लष्कराचा ट्रक बाहेर काढला आणि जवानाचा जीव वाचविला.

यावेळी स्थानिक नागरिकांनी मोबाईलवर या मदकार्याचा व्हिडिओ चित्रित करून सोशल मिडीयावर प्रसिद्ध केला. हा व्हिडिओ फेसबुक, यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे.

=====================================

=====================================

No comments: