Wednesday, 26 October 2016

नमस्कार लाईव्ह २६-१०-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- राजौरीत पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर 
२- डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचा घेतला आधार; मोदींची स्तुती, आता घोषणांचीही कॉपी 
३- भारताकडून चोख प्रत्युत्तर; पाकचे 3 रेंजर्स ठार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- औरंगाबादमध्ये अनुदान लाटणाऱ्या बोगस मदरशांची चौकशी होणार 
५- राष्ट्रपतींना 200 टक्के वेतनवाढ मिळणार 
६- जेएनयूत आढळला मणिपुरी युवकाचा मृतदेह 
७- हिंदुत्वाची व्याख्या नव्याने नाही- न्यायालय 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
८- सहा लॉटरी कंपन्यांकडून महाराष्ट्र सरकारला 933 कोटींचा चुना 
९- शिवस्मारकासाठी 3600 कोटी रुपये, लवकरच भूमीपूजन 
१०- रिझल्ट देणं माझं काम : तुकाराम मुंढे 
११- अंगणवाडी सेविकांना एक हजार रुपये भाऊबीज भेट 
१२- पेग्विन मृत्यूप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसची होर्डिंगबाजी 
१३- प्रतिटन 3200 मिळाले तरच ऊसतोड- राजू शेट्टी 
१४- राज्यातील धरणांमध्ये 83 टक्के पाणी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- बाटलीत पेट्रोल न दिल्याने पिंपरीत पेट्रोल पंपाची तोडफोड 
१६- अहमदनगरमध्ये निवडणुकीच्या बंदोबस्तावरील पोलिसाला मारहाण
१७- पुणे; ब्राह्मणांचा अॅट्रॉसिटीमध्ये समावेश करा, ब्राह्मण महासंघाची मागणी 
१८- उत्तराखंडमध्ये व्हाईटनरवर बंदीचे आदेश 
१९- पाटणा रेल्वे स्थानकावर पॉर्न साईट ब्लॉक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीत भारताकडून चीनचा धुव्वा 
२१- 'फँड्री', 'सैराट'वर आमीर फिदा, आता थेट नागराजसोबत काम करणार? 
२२- विद्या बालनच्या 'कहानी 2' चा जबरदस्त ट्रेलर रिलीज 
२३- हृतिकच्या अॅक्शन थ्रिलर 'काबिल'चा ट्रेलर रिलीज 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
........................................................................

रिझल्ट देणं माझं काम : तुकाराम मुंढे

रिझल्ट देणं माझं काम : तुकाराम मुंढे
नवी मुंबई : नवी मुंबई पालिका आयुक्त म्हणून पदावर आजही कायम आहे. जोपर्यंत सरकार हटवत नाही, तोपर्यंत काम करत राहणार. कायद्यानुसार काम करणं, लोकांच्या समस्यांवर काम करणं, ही माझी जबाबदारी आहे, रिझल्ट देणं माझं काम आहे, असा निर्धार तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला.  वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांननी एबीपी माझाला खास मुलाखत दिली.
मी माणूस आहे, सर्वज्ञानी नाही.  जलद निर्णयांमुळेच कदाचित माझ्याबाबतीत जास्त वाद होत असतील, असं आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले.
वेळ देत नसल्याचा आरोप चुकीचा
मी वेळ देत नाही हा नगरसेवकांचा आरोप चुकीचा आहे. दर बुधवारी एक तास नगरसेवकांसाठी असतो. मी कोणालाही बसवून ठेवत नाही, असं तुकाराम मुंढे म्हणाले. माझ्याविषयी अनेक गैरसमज पसरवले जात आहेत, असंही मुंढे म्हणाले.
नियमाला धरुनच निर्णय
नवी मुंबईच्या नागरिकांसाठी आवश्यक ते सर्व निर्णय तातडीने घेतले. हे सर्व निर्णय नियमाला धरुनच घेतले. रस्त्यावरील फेरीवाल्यांवर आणि मनपाच्या जागेवर बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई केली, प्रकल्पग्रस्तांवर कुठलीही कारवाई केली  नाही, असंही तुकाराम मुंढेंनी सांगितलं.

........................................................................

औरंगाबादमध्ये अनुदान लाटणाऱ्या बोगस मदरशांची चौकशी होणार

औरंगाबादमध्ये अनुदान लाटणाऱ्या बोगस मदरशांची चौकशी होणार
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये सरकारी अनुदान लाटणाऱ्या बोगस मदरशांची चौकशी होणार आहे. उपजिल्हाधिकारी गणेश चव्हाण यासंदर्भात चौकशी करणार आहे.
‘एबीपी माझा’ने एका स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून मदरशांमधील हा घोटाळा समोर आणला होता. त्यानंतर आता प्रशासनाला जाग आल्याचं पाहायला मिळत आहे.
मुस्लिम मुलांच्या शिक्षणाचा आधार मिळावा, यासाठी मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी सरकारने डॉ. झाकीर हुसेन योजनेची घोषणा केली होती. मात्र औरंगाबादमध्ये या योजनेअंतर्गत अनुदान लाटलं, मात्र मदरशे सुरु नसल्याचं चित्र आहे.
‘माझा’ने यासोबतच याठिकाणी सुरु असलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यावरही प्रकाश टाकला होता.
मदरशांना वर्षाकाठी 4 लाख अनुदान मिळतं. एकट्या औरंगाबादेत 500 मदरसे आहेत. त्यातल्या 125 मदरशांना अनुदान मिळालं आहे. 65 मदरशांच्या हातात पैसे पडले आहे. तर 61 मदरशांचे पैसे जिल्हा प्रशासनाच्या खात्यात आहेत.

........................................................................

सहा लॉटरी कंपन्यांकडून महाराष्ट्र सरकारला 933 कोटींचा चुना

सहा लॉटरी कंपन्यांकडून महाराष्ट्र सरकारला 933 कोटींचा चुना
मुंबई: महाराष्ट्र सरकारला सहा लॉटरी कंपन्यांनी 2007 ते 2009 दरम्यान 933 कोटींचा चुना लावल्याचं समोर आलं आहे. यासंबंधीचं वृत्त मिड-डेनं दिलं असून याला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही दुजोरा दिला आहे.
या कंपन्यांनी अवैधरितीने अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि मिझोरम आदी राज्यातील ऑनलाईन लॉटरीची राज्यात विक्री केली, पण याचा कर राज्य सरकारकडे जमा केला नाही. यामुळे राज्य सरकारला मोठं नुकसान सहन करावं लागलं.
मुनगंटीवार यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून या सहा कंपन्यांपैकी स्वागत एजन्सीने 76.22 कोटी, समर्पण ट्रेडिंगने 134. 43 कोटी, कॅम्पलॉट गेमिंग सोल्यूशनने 38 कोटी, ज्यूपिटर गेमिंग 323.14 कोटी, एसएल मार्केटिंगने 133.10 कोटी आणि श्वेता एन्टरप्रायझेसने 228.30 कोटींचा महसूल बुडवला आहे.
दरम्यान, गुन्हे अन्वेषण विभागाने सेवरी पोलीस स्थानकात या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असल्याचे गुन्हे शाखेचे उपायुक्तांनी सांगितलं. तसेच या प्रकरणी लॉटरी ड्रॉ करणाऱ्या सहा कंपन्याना आरोपी बनवण्यात आलं असून यातील कर भरण्यासंदर्भातील तपास सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.

राष्ट्रपतींना 200 टक्के वेतनवाढ मिळणार

राष्ट्रपतींना 200 टक्के वेतनवाढ मिळणार?
नवी दिल्ली: देशाचे प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपतींना घटनेने अनेक अधिकार दिले आहेत. याचा वापर गरजेनुसार ते करतात. राष्ट्रपती या घटनात्मक पदावरील व्यक्तीला महिन्याला दीड लाखांचे वेतन मिळते. पण आता त्यामध्ये 200 टक्क्यांनी वाढ होणार आहे. कारण सध्याच्या तुलनेत राष्ट्रपतींच्या तुलनेत विद्यमान मंत्रिमंडळातील एखाद्या सचिवाचा वेतनपेक्षा जास्त असल्याने यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
देशात सर्वत्र सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या वेतनवाढीसंदर्भातील चर्चा सुरु झाली होती. याला मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी मिळाल्यानंतर, यासंबंधीचे विधेयक संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येईल. संसदेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर जानेवारी 2016 पासूनची वेतनवाढ राष्ट्रपतींना देण्यात येईल.
या निर्णयानंतर राष्ट्रपतींसोबत उपराष्ट्रपती आणि राज्यपालांच्याही वेतनात घसघशीत वाढ होणार आहे. 2008 मध्ये राष्ट्रपतींच्या वेतनात दुपटीने वाढ करण्यात आली होती. 2008 मध्ये राष्ट्रपतींचे 50 हजारावरुन दीड लाख  वेतन करण्यात आले होते. पण आता यात 200 टक्क्यांनी वाढ होणार आहे. या वाढीनंतर राष्ट्रपतींना एकूण 5 लाखांच्या आसपास वेतन मिळणार आहे. तर उपराष्ट्रपतींचा एक लाख 10 हजारावरुन 3 लाख 50 हजार  वेतन मिळणार आहे.
विशेष म्हणजे, या निर्णयानंतर राष्ट्रपतींच्या निवृत्तीनंतर त्यांना मिळणाऱ्या पेन्शनमध्येही वाढ होणार आहे. त्यांना निवृत्तीनंतर एक लाख 50 हजार पेन्शन मिळेल, तर त्यांचे पती किंवा पत्नीलाही 30 हजार रुपये मिळतील.

........................................................................

'फँड्री', 'सैराट'वर आमीर फिदा, आता थेट नागराजसोबत काम करणार?

'फँड्री', 'सैराट'वर आमीर फिदा, आता थेट नागराजसोबत काम करणार?
मुंबई : ‘फँड्री’ आणि ‘सैराट’वर फिदा झालेला बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खान आता थेट दिग्दर्शक नागराज मंजुळेसोबत काम करणार असल्याची चर्चा आहे. नव्या प्रोजेक्टसाठी दोघे एकत्र येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
याआधी आमीर खानने नागराज मंजुळेच्या ‘फँड्री’चं कौतुक केलं होतं. तर काही महिन्यापूर्वीच आलेला ‘सैराट’ पाहून आमीर भारावला होता. शिवाय चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहण्याचंही आवाहन केलं होतं.
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘सैराट’ने मराठीलाच नाही तर बॉलिवूडलाही भूरळ घातली. नागराजच्या दिग्दर्शन कौशल्यावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यामुळे परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला आमीरला आता नागराजसोबत काम करण्याचे वेध लागल्याची चर्चा आहे.
दरम्यान, ‘सैराट’चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचं संगीत. अजय-अतुल या संगीतकार जोडीने या सिनेमाला संगीत दिलं. ‘सैराट’च्या गाण्यांनी सगळ्यांना अक्षरश: याड लावलं आहे. अजय-अतुलने याआधी 2014 मध्ये आलेल्या ‘पीके’ सिनेमासाठी आमीरसोबत काम केलं आहे.

........................................................................

विद्या बालनच्या 'कहानी 2' चा जबरदस्त ट्रेलर रिलीज



........................................................................

हृतिकच्या अॅक्शन थ्रिलर 'काबिल'चा ट्रेलर रिलीज

हृतिकच्या अॅक्शन थ्रिलर 'काबिल'चा ट्रेलर रिलीज
नवी दिल्लीः बॉलिवूड स्टार हृतिक रोशनच्या सस्पेंस थ्रिलर ‘काबिल’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झाल्यानंतर आता सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
दोन दृष्टिहीन प्रेमीयुगुलींची प्रमकथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. दोघेही प्रेमातून एकमेकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र त्यांच्या कहाणीत अचानक खलनायकाची एंट्री होते. त्यानंतर सिनेमात खरा सस्पेंस असण्याची शक्यता आहे.

........................................................................

शिवस्मारकासाठी 3600 कोटी रुपये, लवकरच भूमीपूजन

शिवस्मारकासाठी 3600 कोटी रुपये, लवकरच भूमीपूजन
मुंबईः अरबी समुद्रात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी 3 हजार 600 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. आचारसंहितेतही निवडणूक आयोगाच्या परवानगीने निधी मंजूर केला जाईल, अशी माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली.
शिवस्मारकाचा आराखडा यापूर्वीच तयार करण्यात आला आहे. आता त्यासाठीच्या टेंडर प्रक्रिया सुरु केल्या जातील. मात्र आचारसंहितेमुळे सध्या ते शक्य नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून परवानगी घेण्यात येणार आहे, असं मेटेंनी सांगितलं.
पहिला टप्पा 2019 पर्यंत पूर्ण होणार
निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यास टेंडर प्रक्रिया पूर्ण करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमीपूजन करण्यात येईल, अशी माहिती विनायक मेटे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना दिली.

........................................................................

अंगणवाडी सेविकांना एक हजार रुपये भाऊबीज भेट

अंगणवाडी सेविकांना एक हजार रुपये भाऊबीज भेट
मुंबईः एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील अंगणवाडी सेविकांना एक हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात आली आहे. महिला बालविकास विभागाने या बाबतीत परिपत्रकाद्वारे माहिती दिली.
अंगणवाडी सेविकांना दरवर्षी दिवाळीच्या बोनसची मागणी करावी लागते. त्यासाठी आंदोलनाची देखील वेळ येते. या वर्षासाठी अंगणवाडी सेविकांना भाऊबीज भेट देण्याचा विषय सरकारच्या विचाराधीन होता. त्यामुळे बोनस जाहीर केला, असं परिपत्रकात म्हटलं आहे.
मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांसह, मदतनिस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. बोनसची रक्कम दिवाळीपूर्वी देण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

........................................................................

No comments: