[अंतरराष्ट्रीय]
१- ब्रिटनच्या पंतप्रधान 6 नोव्हेंबरला येणार भारत दौ-यावर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- गूळ उत्पादकांसाठी यंदा ‘अच्छे दिन’!
३- शेजारील देशच दहशतवाद्यांची जन्मभूमी - मोदी
४- सूरतमध्ये अरविंद केजरीवाल यांना दाखवण्यात आले काळे झेंडे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
५- जळगावात थेट मुख्यमंत्र्यांनाच मराठा मोर्चांचं निवेदन
६- मुख्यमंत्र्यांच्या जळगावातील कार्यक्रमाला खडसेंची दांडी
७- सोेलापूर : ४३.६८ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त
८- मिनी गॅस सिलिंडरच्या रूपात स्फोटके सहज उपलब्ध
९- 2018 पर्यंत राज्यातील सर्व शाळा डिजिटल करणार- मुख्यमंत्री
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१०- मुंबईतील कलिनामध्ये आरटीआय कार्यकर्त्याची हत्या
११- नोएडात 9 संशयित नक्षलवाद्यांना अटक
१२- वाशिम: माकड रस्त्यात आल्याने आॅटो पलटी होऊन झालेल्या अपघातात, एक जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी.
१३- कोलकाता येथे रस्ता अपघातात 2 जणांचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१४- पहिल्या वन डेत भारतासमोर 191 धावांचं माफक आव्हान
१५- बॉक्स ऑफिसवर धोनीच्या बायोपिकचे कमाईचे द्विशतक
१६- न्यूझीलंडचा निम्मा संघ तंबूत परत, हार्दिक पंड्याला तिसरी विकेट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स*
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा.
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
==================================

पहिल्या वन डेत भारतासमोर 191 धावांचं माफक आव्हान
धर्मशाला: धर्मशालातल्या पहिल्या वन डेत धोनीच्या टीम इंडियानं न्यूझीलंडचा अख्खा डाव 190 धावांत गुंडाळण्याचा पराक्रम गाजवला. त्यामुळं या सामन्यात भारतासमोर विजयासाठी 191 धावांचं माफक लक्ष्य आहे.
या सामन्यात भारतीय गोलंदाजांसमोर किवींची अक्षरश: दाणादाण उडाली. हार्दिक पंड्यानं तीन विकेट्स काढून आपलं वन डे पदार्पण दिमाखात साजरं केलं. तर अमित मिश्रानंही न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं. उमेश यादव आणि केदार जाधवनं प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या.
न्यूझीलंडसाठी टॉम लॅथम आणि टीम साऊदीने चांगली भागिदारी करुन न्यूझीलंडची धावसंख्या 190 वर नेली. या सामन्यात टॉम लॅथमने 79 तर टीम साऊदीने 55 धावा ठोकल्या.
==================================
जळगावात थेट मुख्यमंत्र्यांनाच मराठा मोर्चांचं निवेदन
फाईल फोटो
जळगाव : ठाणे आणि चिपळूणमध्ये मराठा क्रांती मोर्चा सुरु असताना तिकडे जळगावातही त्याची धग पहायला मिळत आहे. महाराजस्व अभियानाच्या शिबीराला पोहोचलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मराठा मोर्चाच्या आयोजकांनी निवेदन दिलं आहे.
मराठा समाजाच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे. कोपर्डीच्या आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी, मराठा आरक्षण आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदलासह काही महत्त्वाच्या मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यापूर्वी त्यांनी यासंदर्भात माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचीही भेट घेतली. महाराजस्व अभियानाअंतर्गत आज जळगावात समाधान शिबिराचं उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसोबतच कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक मंत्र्यांची उपस्थिती असणार आहे.
==================================
मुख्यमंत्र्यांच्या जळगावातील कार्यक्रमाला खडसेंची दांडी
जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यामधील दुरावा अजूनही कमी झाला नसल्याचं चित्र आज जळगावच्या जामनेरमध्ये पहायला मिळालं.
महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या शिबिराला मुंबईहून मुख्यमंत्री दाखल झाले. पण त्यांच्याच जिल्ह्यात होत असलेल्या कार्यक्रमाला एकनाथ खडसे यांनी दांडी मारली.
कालच या कार्यक्रमाच्या रुपरेषेसाठी आयोजित करण्यात आलेल्या नियोजन बैठकीत एकनाथ खडसे समर्थकांनी गोंधळ घातला होता. एकनाथ खडसे यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेच्या तळाला असल्यानं खडसे समर्थकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे आज अपेक्षेप्रमाणेच खडसे यांनी अनुपस्थिती लावून विस्तव कायम असल्याचेच संकेत दिले.
दरम्यान, या कार्यक्रमाला पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर, सहकार मंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
==================================
No comments:
Post a Comment