Thursday, 13 October 2016

नमस्कार लाईव्ह १३-१०-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
1- भारताच्या सर्जिकल स्ट्राईकला अमेरिकेचं समर्थन, पाकिस्तानला चपराक
2- भारत आता निव्वळ एक गांडूळ: मसूद अझर 
3- ट्रम्प ऑक्टोपससारखे शरीराला चिकटले - महिलेचा आरोप 
4- बॉब डिलन यांना साहित्यातील नोबेल जाहीर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
5- 'जेएनयू'मध्ये मोदींच्या प्रतिमेसह रावणाच्या पुतळ्याचं दहन 
6- शिवसेनेमुळे ईबीसी सवलत मिळाली: उद्धव ठाकरे 
7- केजरीवालांनी जाळलेल्या रावणाच्या पुतळ्यात औरंगाबादच्या तरुणाचा फोटो 
8- समान नागरी कायद्याची अंमलबजावणी अशक्‍यच - माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली 
9- दुबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचा एल्गार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
10- हैदराबादेत एकाच व्यक्तीच्या खात्यात 10 हजार कोटी : नायडू 
11- मराठा आरक्षण प्रकरणी आज मुंबई हायकोर्टात सुनावणी 
12- ईबीसी सवलत सहा लाखांवर, मंत्रीमंडळ बैठकीतील प्रमुख निर्णय
13- मराठा आरक्षणाबाबत हायकोर्टाने सरकारला फटकारलं नाही : मुख्यमंत्री 
14- गुजरातमध्ये दोन पाकिस्तानी एजंट अटकेत 
15- ६ लाख उत्पन्न मर्यादा असणा-या सर्वांना मिळणार शैक्षणिक सवलत 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
16- नाशिकमध्ये बससेवा सुरु, इंटरनेट मात्र अद्याप बंदच 
17- प्रसिद्ध फोटोग्राफर जगदिश औरंगाबादकर यांची आत्महत्या 
18- वांद्र्यात इमारत कोसळून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू, 3 जखमी
19- उस्मानाबाद - गूढ आवाजाने कळंब तालुक्यातील काही भाग हादरला 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
20- सुरेश रैना न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन डेतून आऊट
21- कपिल शर्माची 'अविवाहित' पिंकी बुआ घटस्फोटाच्या मार्गावर 
22- सचिनने दिलेली 'BMW' नाकारणार कशी - दीपा कर्माकर 
23- मिथून चक्रवर्तींवर अमेरिकेत उपचार 
24- अश्विनच्या पत्नीच्या उत्तराने सेहवाग झाला निरुत्तर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
===============================

हैदराबादेत एकाच व्यक्तीच्या खात्यात 10 हजार कोटी : नायडू

हैदराबादेत एकाच व्यक्तीच्या खात्यात 10 हजार कोटी : नायडू
हैदराबाद : हैदराबादमधील एका व्यक्तीने आपल्या खात्यात 10 हजार कोटी रुपये असल्याची माहिती दिल्याचं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जाहीर केलं आहे. काळा पैसा योजनेच्या आधारे नायडूंनी हा दावा केला आहे.
हैदराबादमध्ये काळा पैसा योजने अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या 13 हजार कोटी रुपयांपैकी 10 हजार कोटी रुपये एकाच व्यक्तीकडे असल्याचं नायडूंनी म्हटलं आहे. या दाव्यातून नाव न घेता नायडूंनी एकप्रकारे त्यांच्या राजकीय शत्रूंकडे अंगुलीनिर्देश केल्याचं म्हटलं जातं.
काळा पैसा रोखण्यासाठी चलनातून एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्दबातल करण्याची मागणीही चंद्राबाबू नायडूंनी उचलून धरली आहे.
‘देशभरातून 65 हजार कोटी रुपयांचं काळ धन जाहीर करण्यात आलं आहे. त्यापैकी 20 टक्के म्हणजे 13 हजार कोटी रुपये एकट्या हैदराबादेत आहेत. त्यातलेही 10 हजार कोटी रुपये एकाच व्यक्तीच्या खात्यात आहेत. कायद्यानुसार ही व्यक्ती कोण, हे आम्ही जाणून घेऊ शकत नाही. एखाद्या व्यावसायिकाला इतकी मोठी रक्कम जाहीर करणं शक्य आहे का?’ असा सवाल नायडू यांनी एका पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
‘नजीकच्या भविष्यात म्हणजे येत्या दोन-तीन किंवा पाच वर्षांत ते काळा पैसा नियमित करुन घेतील. 40 ते 45 टक्के दंड भरायचा आणि ब्लॅक मनी व्हाईट होणार. हे चांगलं नाही का? कोणीच प्रश्न उपस्थित करु शकत नाही.’ अशी टिपणीही चंद्राबाबूंनी केली.

===============================

'जेएनयू'मध्ये मोदींच्या प्रतिमेसह रावणाच्या पुतळ्याचं दहन

'जेएनयू'मध्ये मोदींच्या प्रतिमेसह रावणाच्या पुतळ्याचं दहन
नवी दिल्ली : दसऱ्याच्या मुहूर्तावर रावणाच्या पुतळ्याचं दहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचा वापर केल्यानं पुन्हा एकदा जेएनयू कॅम्पस वादात सापडलं आहे. या रावणदहनाचा व्हिडिओ समोर आला आहे.
दसऱ्याच्या संध्याकाळी एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी हे पुतळा दहन केल्याचा दावा केला जात आहे. मात्र या पुतळ्याचं दहन एनएसयूआयनेच केले आहे का? याची पुष्टी मात्र अद्याप झालेली नाही.
एनएसयूआयचे नेते सनी धीमान आणि अनिल मिणा यांनी हा व्हिडिओ फेसबुकवर टाकला आहे. त्यामुळे हे कृत्य एनएसयूआयचंच असावं अशी चर्चा आहे.
फक्त मोदीच नाही, तर रामदेवबाबा, अमित शाह यांच्यासह अनेक भाजप नेत्यांचे फोटो या पुतळ्यामध्ये वापरण्यात आले होते. शिवाय भाजपच्या या साऱ्या नेत्यांविरोधात घोषणाबाजीही सुरु होती. हे पुतळादहन नक्की कुणी केलं याची माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

===============================

केजरीवालांनी जाळलेल्या रावणाच्या पुतळ्यात औरंगाबादच्या तरुणाचा फोटो 

केजरीवालांनी जाळलेल्या रावणाच्या पुतळ्यात औरंगाबादच्या तरुणाचा फोटो
औरंगाबाद : दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी दहन केलेल्या रावणाच्या पुतळ्यामधल्या एका डोक्यावरील चेहऱ्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. दहा तोंडांपैकी एका चेहऱ्यावर औरंगाबादमधल्या एका सर्वसामान्य माणसाचा फोटो असल्याचं समोर आलं आहे.
हा चेहरा औरंगाबादमध्ये राहणाऱ्या फैज सय्यद यांचा असल्याची माहिती आहे. आयोजकांनी या पुतळ्यामध्ये पाकिस्तानातील अतिरेक्यांचे फोटो लावले होते. मग त्या पंक्तीमध्ये आपला फोटो का लावला असा सवाल फैज यांनी विचारला आहे.
फैज सय्यद हे औरंगाबादेत इस्लामिक रिसर्च सेंटर चालवतात. फैज यांनी या प्रकरणी आक्षेप घेतला असून मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल अडचणीत येण्याची शक्यता आहे.


===============================

No comments: