Friday, 14 October 2016

नमस्कार लाईव्ह १४-१०-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- ब्रिक्स परिषदेसाठी रशियाचे राष्ट्रपती आज भारतात 
२- भारतीय जवान चंदू चव्हाण आमच्याच ताब्यात, पाकिस्तानची कबुली 
३- पाकिस्तानी वृत्तपत्रातील 'सर्जिकल स्ट्राईक'ची बातमी निराधार 
४- सौदी सरकारला वाटतेय, ७0 वर्षे टिकणार तेलसाठे 
५- बांगलादेशला चीनकडून 24 अब्ज डॉलर्सचे कर्ज 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
६- सर्जिकल स्ट्राईकची जाहीर वाच्यता करणं चुकीचं: सुशीलकुमार शिंदे 
७- बहुप्रतिक्षीत 'अण्णा : किसन बाबूराव हजारे' आजपासून देशभरात प्रदर्शित 
८- मनमाडजवळ चालत्या रेल्वेत चाकूचा धाक दाखवत प्रवाशांची लूट 
९- पोलिस, न्याय व्यवस्थेला सेनादलाप्रमाणेच सन्मान मिळावाः हायकोर्ट  
१०- भाजपनंतर सिद्धू काँग्रेसच्या वाटेवर?
११- पाक कलाकारांचा एकही सिनेमा दाखवणार नाही, सिनेमा ओनर्स असोसिएशनचा निर्णय
१२- 'ट्रिपल तलाक'ला समान नागरी कायद्याशी जोडू नका - नायडू 
१३- लादेन, वनी, हाफिज सईदच्या पंक्तीत केजरीवाल? सुरतमध्ये झळकली पोस्टर्स 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१४- नाशिकमधील आंदोलनात एसटीचं कोट्यवधीचं नुकसान 
१५- पंडीतअण्णा मुंडेंवर आज अंत्यसंस्कार, पंकजा मुंडेही उपस्थित 
१६- पतीला पोटगी द्या, सोलापूर कोर्टाचे पत्नीला आदेश 
१७- बहुप्रतीक्षित पुणे मेट्रोला अखेर पीआयबीची मंजुरी 
१८- नाशिक : हिंसाचाराप्रकरणी 117 जणांना अटक, सायबर क्राईमअंतर्गत 8 गुन्हे 
१९- मतदार नोंदणीसाठी ५५ हजार २३९ नवे अर्ज 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२०- भोपाळमध्ये शहीद जवानांच्या शौर्य स्मारकाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन 
२१- उल्हासनगर; ट्रकखाली येऊन तरुणीचा मृत्यू; खड्डयामुळे अपघात, कुटुंबीयांचा आरोप 
२२- पुण्यातील चेन स्नॅचरला अटक, लाखो रुपयांचे दागिने जप्त 
२३- ठाणे; पँटच्या खिशात मोबाईल फोनचा स्फोट, तरुणाचा पाय भाजला 
२४- वसईत सापडला ७ फुटांचा अजगर 
२५- पाकणीतील अपघातात एकाच कुटुंबातील 4 ठार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२६- इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी यष्टीरक्षक साहाला कोच कुंबळेच्या खास टीप्स 
२७- 26/11 हल्ल्यात जिगरबाज कामगिरी करणारा सिझर काळाच्या पडद्याआड 
२८- सॅमसंगला नोट-7 मुळे 3 अब्ज डॉलरचा फटका 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
================================

नाशिकमधील आंदोलनात एसटीचं कोट्यवधीचं नुकसान 

नाशिकमधील आंदोलनात एसटीचं कोट्यवधीचं नुकसान
नाशिक: तळेगावातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात उफाळलेल्या संतापात एसटीचं सर्वात मोठं नुकसान झालं आहे. 2 ते 3 दिवस चाललेल्या या आंदोलनात तब्बल 19 एसटी बस जाळल्या गेल्या. तर एसटी  सेवा बंद राहिल्यामुळे एसटी महामंडळाला 3 कोटींपेक्षा अधिकचं नुकसान झालं आहे.

सध्या नाशिकमधली परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. शाळा आणि बस सेवा कालपासून सुरळीत सुरु आहे. मात्र, बंद असलेली इंटरनेट सेवा अजून सुरु करण्यात आलेली नाही. उद्यापर्यंत इंटरनेट सेवा सुरु होणार असल्याची माहिती समजते आहे.

महाराष्ट्रात पहिल्यांदाच इंटरनेट सेवा बंद

मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच वेळ होती. यापूर्वी जम्मू-काश्मीर, गुजरातमध्ये इंटरनेट सेवा बंद केली होती. बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यात उसळलेल्या दंगलीनंतर काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद होती. तर गुजरातमध्ये हार्दिक पटेलच्या नेतृत्त्वातील पटेल आंदोलदरम्यान इंटरनेट सेवा ठप्प होती.

================================

ब्रिक्स परिषदेसाठी रशियाचे राष्ट्रपती आज भारतात

ब्रिक्स परिषदेसाठी रशियाचे राष्ट्रपती आज भारतात
फाईल फोटो (AFP PHOTO)
पणजी: गोव्यात होणाऱ्या ब्रिक्स संमेलनात भाग घेण्यासाठी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन आज भारतात दाखल होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात यावेळी द्विपक्षीय चर्चा होणार असून दोन्ही देशांमध्ये काही महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे.

एस-400 मिसाईल डिफेन्स सिसस्टिम आणि 200 कामोव हेलिकॉप्टर भारत रशियाकडून खरेदी करु शकते. एस-400 हे तब्बल 39 हजार कोटी रुपयांचं तंत्रज्ञान असल्याचं कळतं आहे. याद्वारे शत्रूची शेकडो किलोमीटर अंतरावरची मिसाईल्स पाडता येऊ शकतात. तसेच शत्रूच्या जहाजांनाही लक्ष्य करता येऊ शकतं.

================================

बहुप्रतिक्षीत 'अण्णा : किसन बाबूराव हजारे' आजपासून देशभरात प्रदर्शित

बहुप्रतिक्षीत 'अण्णा : किसन बाबूराव हजारे' आजपासून देशभरात प्रदर्शित
मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कारकीर्दीवर बनवलेला सिनेमा आजपासून देशभरात प्रदर्शित झाला आहे. ‘अण्णा : किसन बाबूराव हजारे’ असं या सिनेमाचं नाव आहे. 130 मिनिटांच्या या सिनेमात किसन बाबुराव हजारे ते अण्णा हजारे हा प्रवास दाखवण्यात आला आहे.

अण्णांचा जीवनपट उलगडणाऱ्या या सिनेमाचं शूटिंग राळेगणसिद्धीसह मुंबई, नवी दिल्ली, जम्मू-काश्मीर आणि राजस्थानमध्ये झालं आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अण्णांनी जवळपास 10 महत्त्वाच्या कार्यक्रमात भाग घेतला आहे. मुंबईतील काही चित्रपटगृहामध्येही अण्णा हजेरी लावणार आहेत.

अण्णांच्या जीवनावर आधारित या सिनेमात शशांक उदापूरकर अण्णांची भूमिका वठवणार आहे. राईज पिक्चर्सची निर्मिती असलेल्या सिनेमाचं दिग्दर्शन शशांक उदापूरकरनेच केलं आहे. अभिनेत्री तनिषा मुखर्जीने एका पत्रकाराची भूमिका साकारली आहे. या सिनेमात 3 गाणीही असतील, ज्यांचं संगीत रविंद्र जैन यांनी दिलं आहे. लवकरच हा सिनेमा इंग्रजीसह अन्य भारतीय भाषांमध्येही प्रदर्शित केला जाणार आहे.

================================

पतीला पोटगी द्या, सोलापूर कोर्टाचे पत्नीला आदेश

पतीला पोटगी द्या, सोलापूर कोर्टाचे पत्नीला आदेश
सोलापूर : पतीने पत्नीला पोटगी देण्याचे अनेक निकाल आतापर्यंत पाहिले असतील. मात्र पत्नीने पतीला पोटगी देण्याचा आदेश सोलापूर सत्र न्यायालयाने दिला आहे.
किरकोळ कारणावरुन पतीला घरातून हाकलवणाऱ्या मुख्याध्यापिकेला सोलापूर सत्र न्यायालयाने दणका दिला. पतीला महिना दोन हजार रुपयांची पोटगी देण्याचा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिला आहे.
धनंजय माने आणि जयदीप माने वकिलांच्या या जोडगोळीने पीडित पतीच्या बाजूने कोर्टात युक्तीवाद केला.
घरकाम करताना दूध सांडल्याने मुख्याध्यापक पत्नीने पतीला शिवीगाळ करुन घराबाहेर काढलं. पीडित पतीने पतीच्या अत्याचाराविरोधात कोर्टात धाव घेतली होती. सुनावणीदरम्यान पतीला महिन्याकाठी दोन हजारांची पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने पत्नीला दिले आहेत.
हिंदू विवाह कायदा कलम 25
पती किंवा पत्नीकडे उदरनिर्वाहासाठी कोणताच पर्याय नसेल तर न्यायालय प्रकरणान्वये पती किंवा पत्नीला पोटगीची रक्कम देण्याचे आदेश देऊ शकतं.

================================
================================
================================
================================
================================
================================

No comments: