Friday, 7 October 2016

नमस्कार लाईव्ह ०7-१०-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- कोलंबियाच्या अध्यक्षांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार 
२- भारत-पाकिस्तान सीमा सील करणार : गृहमंत्री 
३- आक्रा; घाना विद्यापीठातील गांधीजींचा पुतळा हटविणार 
४- पाकिस्तानमध्ये रेल्वे रुळावर बॉम्बस्फोट; 4 ठार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- चाकणमधल्या विरोधामुळे पुरंदरमधून विमानतळाचं टेकऑफ 
६- रक्ताची दलाली शब्दप्रयोगाने राहुल गांधींनी मर्यादा ओलांडली: अमित शाह 
७- आईवडिलांपासून पतीला तोडणे क्रूर: स.न्यायालय 
८- पाक कलाकारांसोबत काम करणार नाही- देवगण 
९- जैश-ए-मोहम्मद भाजपाचं पिल्लू, कपिल सिब्बल यांचा सनसनाटी आरोप 
१०- रस्त्यांवरच्या खड्यांमुळे शत्रुही संतापले, मुख्यमंत्र्यांनी केलं एअरलिफ्ट 
११- काळ्या पैशाच्या मुद्यावर भारताला हवे स्वित्झर्लंडकडून आणखी सहकार्य 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१२- मराठा मोर्चा: कोल्हापूर आयोजकांचा पालकमंत्र्यांना विरोध? 
१३- अखेर कोपर्डी बलात्कारप्रकरणी आरोपपत्र दाखल 
१४- पाच टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाजाचा मोर्चा 
१५- ठाणे; पाच टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाजाचा मोर्चा 
१६- धनगर आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध, राम शिंदेंचं आश्वासन
१७- भगवान गडावर येणारच, पंकजा मुंडेंचा व्हिडीओ मेसेज 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- नामवंत परफ्यूम एक्सपर्ट मोनिका घुरदेंची गोव्यात हत्या 
१९- पोरबंदरच्या नौदल तळावर गोळीबाराची अफवा 
२०- सप्तश्रुंगी गडावर एसटी अपघातात 30 जखमी 
२१- सोलापूरमध्ये एँगल अंगावर पडून 2 जणांचा मृत्यू 
२२- जालना - परतूर तालुक्यातील सेलगावमध्ये अन्नातून 8 मुलांना विषबाधा. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- विरोधकांना आपली कमजोरी कधीच कळू देऊ नका: सचिन 
२४- जेम्स बॉण्ड पान मसाल्याच्या जाहिरातीत, ट्विटरवर जोक्सचा धुमाकूळ 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
===================
*दांडिया जल्लोष २०१६*

हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।

संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
================================

मराठा मोर्चा: कोल्हापूर आयोजकांचा पालकमंत्र्यांना विरोध?

मराठा मोर्चा: कोल्हापूर आयोजकांचा पालकमंत्र्यांना विरोध?
कोल्हापूर कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा मोर्चाचं निवेदन स्वत: स्वीकारण्याची घोषणा केली. मात्र कोल्हापुरातील मराठा मोर्चा आयोजकांनी आमचं निवेदन हे जिल्हाधिकाऱ्यांनाच देऊ, असा निर्णय घेतला आहे.
“राज्यात सर्व ठिकाणी ज्या पद्धतीने मोर्चे निघत आहेत, त्याच पद्धतीने कोल्हापुरातही मोर्चा निघेल. निवेदन स्वीकारण्यासाठी कोण येत आहे हे आम्हाला माहित नाही. यापूर्वी सर्व जिल्ह्यातील निवदेनं हे त्या – त्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारलं. त्यामुळे कोल्हापुरातही निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनाच देणार” असं मराठा मोर्चाच्या आजोयकांनी सांगितलं.

================================

अखेर कोपर्डी बलात्कारप्रकरणी आरोपपत्र दाखल

अखेर कोपर्डी बलात्कारप्रकरणी आरोपपत्र दाखल!
अहमदनगर कोपर्डी बलात्कारप्रकरणी अखेर 86 दिवसांनी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल झालं आहे. आरोपपत्रात प्रमुख आरोपी म्हणून जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांची नावं आहेत. त्यांच्यावर कलम 302 अर्थात हत्या आणि कलम 376 (अ) म्हणजेच बलात्कार या कलमा अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.
कोपर्डी बलात्कारप्रकरणी महिनाभरात चार्जशीट दाखल करु, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र कोपर्डी बलात्काराला घटनेला 86 दिवस उलटूनही आरोपींवर चार्जशीट दाखल झालेलं नव्हतं.
नियमाप्रमाणे जर एखाद्या गुन्ह्यात 90 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल झालं नाही, तर आरोपींना जामीन मिळण्याचीही शक्यता असते.
आरोपपत्र दाखल होत नसल्यानं विरोधी पक्ष आणि मराठा संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. त्यामुळेच स्वत: मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणाची दखल घेतली होती.

================================

ठाणे; पाच टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाजाचा मोर्चा

पाच टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाजाचा मोर्चा
ठाणे/नाशिक : मुस्लिम समाजाला नोकरी आणि शिक्षणात पाच टक्के आरक्षण द्या या मागणीसाठी आज ठाण्यातील मुंब्रा आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये मुस्लिमांनी मोर्चा काढला.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्र्यातील मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चाला मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणालाही पाठिंबा देण्यात आला.
नाशकातील मालेगावमध्येही मोर्चाचं आयोजन केलं होतं. सच्चक आयोगाच्या शिफारसी लागू करा, वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवा, जमिनीच्या मोबदल्यात मिळणारे पैसे मुस्लिम समाजाच्या विकासासाठी खर्च करा अशा मोर्चेकऱ्यांच्या मागण्या आहेत. या मागण्यांवर फडणवीस सरकार काय निर्णय घेतं, हे पाहणं महत्वाचं आहे


================================

धनगर आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध, राम शिंदेंचं आश्वासन

धनगर आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध, राम शिंदेंचं आश्वासन
सांगली : धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे, असं जलसंधारण मंत्री राम शिंदेंनी म्हटलं आहे. राज्यात मराठा समाजापाठोपाठ दलित, ओबीसींचेही विविध मागण्यांसाठी मोर्चे निघत आहेत. त्यात आता धनगर समाजाचीही भर पडली आहे.
धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावं अशी मागणी करत सांगलीतल्या आरेवाडीमध्ये बिरोबाच्या वनात दसरा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं राम शिंदेंनी म्हटलं.
आघाडी सरकारनं आरक्षणाचं आश्वासन पाळलं नाही, त्यामुळे आज मोर्चे निघत असल्याचं म्हणत राम शिंदेंनी शरद पवारांवरही टीका केली. या कार्यक्रमाला जलसंपदामंत्री राम शिंदे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर आणि धनगर समाजाचे नेते हजर आहेत.

================================

चाकणमधल्या विरोधामुळे पुरंदरमधून विमानतळाचं टेकऑफ

चाकणमधल्या विरोधामुळे पुरंदरमधून विमानतळाचं टेकऑफ
पुणे : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली खरी, परंतु ज्या सात गावांमधे हा विमानतळ होणार आहे त्या गावांमधील ग्रामपंचायतींनी विमानतळाच्या विरोधात एकमताने ठराव संमत केले आहेत. त्याचबरोबर या सात गावांमध्ये महात्मा फुलेंच्या खानवडी या मूळ गावाचाही समावेश आहे. त्यामुळे महात्मा फुलेंच्या स्मारकाचं काय असा प्रश्नही स्थानिक विचारत आहेत.
कऱ्हेच्या खोऱ्यात छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा झाली आहे. त्यामुळे पुण्याजवळून थेट सातासमुद्रापार झेप घेता येईल. पुणे विमानतळाच्या विस्ताराच्या मर्यादा असल्यानेच पुरंदरच्या जागेला प्राधान्य देण्यात आलं आहे.
पुरंदर हे छत्रपती संभाजीराजे यांचं जन्मस्थान. या ऐतिहासिक स्थळापासून प्रस्तावित विमानतळाची जागा केवळ 15 किलोमीटरवर आहे. त्यामुळे विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.
या विमानतळाला जवळपास 2400 हेक्टर जागा लागणार आहे. चार किलोमीटरच्या दोन धावपट्ट्या असतील. विमानतळामुळे उद्योग आणि शेती व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. पण खानवडी, पारगावसह सात गावातील लोकांनी विमानतळाला विरोध सुरु केला आहे.
ज्या सात गावांचा विरोध आहे त्यात महात्मा फुलेंच्या खानवडी या मुळ गावाचाही समावेश आहे. त्यामुळे इथं असलेल्या महात्मा फुलांच्या स्मारकाचा मुद्दा संवेदनशील बनू शकतो.


================================

नामवंत परफ्यूम एक्सपर्ट मोनिका घुरदेंची गोव्यात हत्या

नामवंत परफ्यूम एक्सपर्ट मोनिका घुरदेंची गोव्यात हत्या
पणजी : देशातील नामवंत परफ्यूम एक्सपर्ट मोनिका घुरदे यांचा मृतदेह त्यांच्या घरी आढळून आला आहे. मोनिका या मूळच्या महाराष्ट्राच्या असून त्यांची गोव्यात निर्घृण हत्या करण्यात आली.
गोव्यात भाड्यानं घेतलेल्या घरात त्यांचं वास्तव्य होतं आणि याच घरी हातपाय बांधलेल्या नग्न अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. 39 वर्षीय मोनिका यांच्या हत्येपूर्वी त्यांच्यावर शारीरिक अत्याचारही झाले होते का, याचा पोलिस तपास करत आहेत.
गुरुवारी मोनिका यांची हत्या झाल्याचा अंदाज आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पुरावे गोळा करण्याचं काम सुरु आहे.
मोनिका या जे.जे स्कूल ऑफ आर्टस् च्या विद्यार्थिनी होत्या आणि परफ्यूम इंडस्ट्री मध्ये येण्याआधी त्यांनी फोटोग्राफर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही काम केलं आहे.

================================

No comments: