[अंतरराष्ट्रीय]
१- वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीटच्या वेळी पाककडून दगडफेक
२- डोनाल्ड ट्रम्प यांनी 18 वर्षांपासून करच भरला नाही!
३- काबूलमध्ये लष्कराच्या गाडीत मॅग्नेटिक आईडीचा स्फोटा झाल्याने दोघांचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- बारामुल्ला हल्ला : 2 दहशतवादी पसार, सीमेवर रेड अलर्ट
५- आधी फुगा आता कबुतर, पाकिस्तानकडून धमकी सुरुच
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
६- भुजबळांना त्वरीत सोडा, अन्यथा परिणाम भोगा
७- उदयनराजेंच्या साताऱ्यात आज मराठा मूकमोर्चा
८- जातीवर आधारित आरक्षणाला ठाम विरोध : राज ठाकरे
९- लायकी नसलेल्यांना महत्त्व नको, सलमानला नानांचे फटके
१०- जैतापूर प्रकल्पाविरोधात प्रकल्पग्रस्तांचे धरणे
११- मुंबई; अवैध दारू निर्मिती व विक्री निर्मूलन मोहिमेस प्रारंभ
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी गावाचं नामकरण 'मराठानगर'!
१३- उजनी धरण काठोकाठ, 7 दरवाजांमधून विसर्ग सुरु
१४- भुजबळांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये मोर्चा, ओबीसींच्या मोर्चेबांधणीचा प्रयत्न
१५- लातूर-तुळजापूर मार्ग बंद, तुळजापुरातील भाविक अडकले
१६- पंजाब - गुरुदासपूरमधील डोरंगला गावात काही संशयित दिसल्याची माहिती
१७- उजनी धरणाचे सात दरवाजे 23 सेमीने उघडले, 5 हजार क्यूसेकने पाणी भीमा नदीत विसर्ग
१८- मुंबई: दादर-माटुंगा स्थानकादरम्यान रूळाला तडा; वाहतूक विस्कळीत.
१९- अकोला: वानधरणाचे २ दरवाजे उघडले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- पॅरिसमध्ये अभिनेत्री किम कर्दाशियनच्या डोक्यावर बंदूक रोखली!
२१- फ्लिपकार्टचं 'बिग बिलियन डे' सेल, आयफोनसह अनेक स्मार्टफोनवर बंपर सूट
२२- कसोटी क्रीडापटूंच्या मानधनात दुपटीहून अधिक वाढ
२३- रोहित, विराट, रहाणेची ईडन गार्डन्सच्या स्टँडमध्ये साफसफाई
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स*
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा.
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
===================
*दांडिया जल्लोष २०१६*
हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।
संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
==================================

भुजबळांना त्वरीत सोडा, अन्यथा परिणाम भोगा
नाशिक: छगन भुजबळांना लवकरात लवकर सोडा, अन्यथा त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा भुजबळ समर्थकांनी दिला. याशिवाय मुंडेंना संपवलं, आता भुजबळांना संपवू देणार नाही अशा शब्दात छगन भुजबळ समर्थकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तुरुंगात असलेल्या भुजबळांच्या समर्थनासाठी नाशिकमध्ये आज मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात गर्दी जमत आहे.
प्रमुख मागण्या
1) बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळांना सोडा,
2) ओबीसी नेत्यांचं खच्चीकरण थांबवा
3) ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका
या प्रमुख मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात येत आहेत.
विजय माल्याचं काय केला?
या मोर्चासाठी विविध जिल्ह्यातून अनेक भुजबळ समर्थक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. छगन भुजबळांना जेलमधून सोडा ही त्यांची प्रमुक मागणी आहे. विजय माल्या 9 हजार कोटींचा घोटाळा करुन गेला, त्याला सरकार काहीही करु शकलं नाही. मात्र भुजबळांवर 870 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. त्यांना जामीन न देता, केवळ सूडाचं राजकारण म्हणून अडकवून ठेवल्याची प्रतिक्रिया समर्थकांनी दिली.
==================================
बारामुल्ला हल्ला : 2 दहशतवादी पसार, सीमेवर रेड अलर्ट
बारामुल्ला : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पवर रविवारी रात्री दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. या हल्ल्यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची बातमी ताजी असतानाच, ते दोन्ही दहशतवादी पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.
बारामुल्लामध्ये रात्री साडेदहाच्या सुमारास 46 राष्ट्रीय रायफल्स आणि बीएसएफच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. रात्री दीडच्या सुमारास गोळीबार बंद झाल्याने दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची शक्यता वर्तवली होती. मात्र सकाळच्या सर्च ऑपरेशनमध्ये मृतदेह हाती न लागल्याने, दहशतवादी पसार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या हल्ल्यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला असून एक जवान जखमी झाल्याचं समजतं.
==================================
आधी फुगा आता कबुतर, पाकिस्तानकडून धमकी सुरुच
पठाणकोट: पठाणकोट जवळील भारतीय सीमेजवळ रविवारी फुग्यातून धमकीचे पत्र पाठवल्यानंतर, आता पाकिस्तानने कबुतराचा वापर करुन भारताला पुन्हा धमकावले आहे. बीएसएफच्या जवानांनी बमियाल सेक्टरमधील सिंबल चौकीवर एक संशयित कबुतर घिरट्या घालताना दिसल्याने त्याला ताब्यात घेतलं आहे. या कबुतराच्या पायाला उर्दू भाषेतील पत्र बांधून पाठवलं आहे. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून धमकी देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ”मोदीजी तुम्ही आम्हाला 1971 च्या युद्धाप्रमाणे समजू नका. आता प्रत्येक मुलगा भारताविरोधात लढण्यासाठी तयार आहे,” असं या पत्रात म्हटलं आहे.
नारोटा जयमाला सिंह पोलीस ठाण्याचे अधिक्षक रमेश कुमार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ”काळ्या-पांढऱ्या रंगाचा हा कबुतर बीएसएफ जवानांच्या चौकीजवळ घिरट्या घालताना दिसला. या कबुतराच्या एका पायाला उर्दू भाषेतील पत्र बांधले होतं.”
दरम्यान, रविवारी याच परिसरातील गुरुदासपुरच्या दीनानकरमधील घेसल गांवातून दोन फुगे जप्त करण्यात आले होते. या फुग्यांसोबतही असेच एक पत्र पाठवून त्याद्वारे भारताला धमकावण्यात आलं होतं.
==================================
उदयनराजेंच्या साताऱ्यात आज मराठा मूकमोर्चा
सातारा : मराठा मूकमोर्चाचं वादळ आज साताऱ्यात धडकणार आहे. साताऱ्यातील शाहू स्टेडियमपासून या मोर्चाला सुरुवात होईल. साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसलेदेखील या मोर्चात सहभागी होणार आहेत.
कोपर्डीत प्रकरणातल्या दोषींना फाशी द्या, मराठ्यांना आरक्षण द्या, आणि अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करा, या मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत.
उदयनराजे सुरुवातीपासूनच मराठा मोर्चाच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत. त्यामुळे उदयनराजेंच्या मतदारसंघात मोठ्या संख्येने मराठा समाज एकवटण्याची शक्यता आहे.
राज्यभरात लाखोच्या संख्येने निघणाऱ्या विराट मोर्चांची राज्यासह देशात चर्चा सुरु आहे. प्रत्येक मोर्चा संख्येचे नवनवीन उच्चांक प्रस्तापित करत आहे. अनेक गावातील गावकरी मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यामुळे साताऱ्याचा मोर्चातही विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे.
==================================
मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी गावाचं नामकरण 'मराठानगर'!
साताराः अवघ्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या मराठा क्रांतीने आता शिखर गाठलंय असं म्हणायला हरकत नाही. कारण मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातल्या गुंडेवाडी या गावाने ठराव करून आपल्या गावाचं नामकरण ‘मराठानगर’ असं केलं आहे. गावाची संख्या 1400 असून, या गावात सर्वच मराठा समाजातील लोक आहेत.
काल महाराष्ट्रातल्या तब्बल 22 ते 25 हजार अधिक ग्रामपंचायतींमध्ये मराठा क्रांती मोर्चातील मागण्यांच्या अनुषंगाने ठराव केले गेले. यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी, शेतीला हमीभाव मिळण्यासाठी स्वाभिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, अरबी समुद्रातील शिवस्मारक तातडीने पूर्ण करावे असे ठराव करण्यात आले.
विदर्भातील दोन-तीन जिल्हे वगळता राज्यातील जवळ जवळ सर्व गावांच्या ग्रामसभांत मराठा क्रांती मोर्चातील मागण्यांच्या अनुषंगाने ठराव करण्यात आले. मराठवाड्यातील सुमारे 90 टक्के ग्रामपंचायतींनी ग्रामसभांचे आयोजन करून अशा प्रकारचे ठराव केले. मराठवाड्यातील ग्रामसभांमध्येही स्वच्छ भारत अभियान, घरकुल योजना या विषयांसह ऐनवेळी मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे ठराव घेण्यात आले.
==================================
पॅरिसमध्ये अभिनेत्री किम कर्दाशियनच्या डोक्यावर बंदूक रोखली!
पॅरिस : रिअॅलिटी शोमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि मॉडेल किम कर्दाशियन वेस्टच्या डोक्यावर बंदूक रोखल्याचा प्रकार समोर आला आहे. पॅरिसमधील एका हॉटेलमध्ये ही घटना घडल्याचं वृत्त ‘सीएनएन’ने दिले आहे.
किम कर्दाशियन सध्या फ्रान्समधील पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभागी होण्यासाठी पॅरिसमध्ये आहे. किमसोबत पॅरिसमध्ये तिची आई क्रिस जेन्नर, बहीण कोर्टनी कर्दाशियन आणि केन्डल जेन्नर आहे.
पॅरिस फॅशन वीकसाठी आलेली किम कर्दाशियन ज्या हॉटेलमध्ये थांबली होती. तिथे पोलिसांच्या यूनिफॉर्मधील दोघा अज्ञातांनी किमच्या डोक्यावर बंदूक रोखली. यावेळी किम आणि त्या अज्ञात व्यक्तींमध्ये झटापट झाली. सुदैवाने किमला कोणत्याही प्रकारची शरीरिक दुखापत झाली नाही.”, असे किम कर्दाशियनच्या प्रवक्त्याने ‘सीएनएन’शी बोलताना सांगितले.
==================================
No comments:
Post a Comment