Monday, 24 October 2016

नमस्कार लाईव्ह २४-१०-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- मेलबर्न; पत्र पोहोचण्यास लागली अवघी 50 वर्षे ! 
२- टायटॅनिकच्या 'लॉकर की'चा 85 हजार पौंडांना लिलाव 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- सायरस मिस्त्रींना 'टाटा', चेअरमनपदी पुन्हा रतन टाटा ! 
४- गळाभेटीदरम्यानच अखिलेश-शिवपाल मंचावर भिडले 
५- हिंदुंनो, लोकसंख्या वाढवाच: गिरिराज सिंह 
६- ट्रिपल तलाकला राजकीय मुद्दा बनवू नका - मोदी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
७- एक पेंग्विन गेला, आता राणीच्या बागेत दुसरा पेंग्विन 
८- ''ए दिल.. वादः मुख्यमंत्री, राज ठाकरेंच्या बैठकीची माहिती सार्वजनिक करा'' 
९- पनवती लोकांकडून पेंग्विनबाबत टीका : उद्धव ठाकरे 
१०- बंडखोरांनी केलेल्या गोळीबारात मणिपूचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी बचावले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
११- आंध्र-ओडिशा सीमेवर चकमकीत 21 नक्षलवादी ठार 
१२- कोल्हापूरः पोटच्या मुलीचा खून करून आईची आत्महत्या 
१३- सोलापूर : कोंडी परिसरातील अवैध धंद्यावर पोलिसांचा छापा 
१४- सोलापूर :रंगभवन चौकात डंपरने तिघांना उडविले, एक महिला जागीच ठार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१५- सेहवाग आणि ब्रिटीश पत्रकार मॉर्गन पुन्हा भिडले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
===================================

सायरस मिस्त्रींना 'टाटा', चेअरमनपदी पुन्हा रतन टाटा !

सायरस मिस्त्रींना 'टाटा', चेअरमनपदी पुन्हा रतन टाटा !
मुंबई: सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या चेअरमनपदावरुन हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी पुन्हा रतन टाटा चेअरमनपदाची धुरा सांभाळणार आहेत. चार महिन्यांसाठी रतन टाटा चेअरमनपदी असतील. त्यानंतर सर्च पॅनेल नव्या चेअरमनची निवड करेल.
सायरस मिस्त्री यांनी चार वर्षापूर्वीच म्हणजे 2012 मध्ये टाटा समूहाच्या चेअरमनपदाची धुरा सांभाळली होती. चारवर्षापूर्वी रतन टाटांनी सायरस मिस्त्री ही जबाबदारी सांभाळतील असा विश्वास व्यक्त केला होता.
सायरस मिस्त्री त्यावेळी शापूरजी पालोनजी ग्रुपचे प्रबंध निर्देशक होते. सायरस मिस्त्री २००६ पासून टाटा
ग्रृपच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये आहेत.
सायरस मिस्त्री यांचं शिक्षण लंडनमध्ये झालंय. इंपेरियल कॉलेजमध्ये त्यांनी सिव्हिल इंजीनिअरिंगचं शिक्षण
घेतलंय. सायरस मिस्त्री यांनी त्यानंतर लंडन बिझनेस स्कूलमधून मॅनेजमेंटमधून शिक्षण घेतलं.
एक लाखांत चार चाकी गाडीचे स्वप्न ते जॅग्वारसारख्या बड्या कंपनीतील भागीदारी, अशा तमाम विक्रमांना नावावर करणारे रतन टाटा चार वर्षांपूर्वी टाटा समूहाच्या सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा चार महिन्यांसाठी ते चेअरमनपदी विराजमान होतील.

===================================

एक पेंग्विन गेला, आता राणीच्या बागेत दुसरा पेंग्विन

एक पेंग्विन गेला, आता राणीच्या बागेत दुसरा पेंग्विन
मुंबई : मुंबईतील राणीच्या बागेत मृत्यू झालेल्या पेंग्विनच्या बदल्यात दुसरं पेंग्विन आणलं जाणार आहे. काल संध्याकाळी राणीच्या बागेतील एका पेंग्विनचा जीवाणू संसर्गामुळे मृत्यू झाला होता.

राणीच्या बागेत ठेवण्यासाठी दक्षिण कोरियाहून आठ पेंग्विनचा आणण्यात आले होते. या आठ पेंग्विनपैकी एका मादीचा जीवाणू संसर्गामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. पेंग्विनची काळजी घेण्यासाठी गोवा ट्रेड फार्मिंग कंपनी, थायलंड या एजन्सीला तीन महिन्यांसाठी केअर टेकींगचं कंत्राटही देण्यात आलं होतं.

तीन महिन्याच्या आतच राणीच्या बागेतील एका पेंग्वीनचा मृत्यू झाला. या पेंग्विनच्या बदली दुसरं पेंग्विन पाठवण्यासाठी राणीची बाग प्रशासन गोवा ट्रेड फार्मिंग कंपनीला पत्र लिहिणार आहे. 30 नोव्हेंबर पर्यंत नागरिकांसाठी पेंग्वीन दर्शन खुलं करण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही राणीची बाग प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

===================================

''ए दिल.. वादः मुख्यमंत्री, राज ठाकरेंच्या बैठकीची माहिती सार्वजनिक करा''

''ए दिल.. वादः मुख्यमंत्री, राज ठाकरेंच्या बैठकीची माहिती सार्वजनिक करा''
मुंबईः काँगेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी ‘ए दिल है मुश्किल’च्या प्रकरणावरून मुख्यमंत्री आणि मनसेवर जोरदार तोफ डागली आहे. मुख्यमंत्र्यांनी एका ब्रोकरची भूमिका पार पाडत राज ठाकरे आणि निर्मात्यांची बैठक घडवून आणली, असा आरोप निरूपमांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि निर्मात्यांच्या बैठकीचा सविस्तर तपशील बाहेर येणं अपेक्षित आहे. बैठकीत कोण काय बोललं याची माहिती द्यावी, अन्यथा कोर्टात जाण्याचा इशारा निरूपमांनी दिला आहे.
आर्मीला राजकारणात ओढण्याचा प्रयत्नः निरुपम
धमक्या देणाऱ्या राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांनी अटक करायचं सोडून त्यांना वर्षा बंगल्यावर बैठकीला बोलावलं. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर कायदेशीर कारवाई करायला हवी होती.
मात्र बैठक बोलवून सेटलमेंट केली, असा आरोप निरुपमांनी केला आहे. देशभक्तीची किंमत ठरवणारे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री कोण, असा सवाल निरुपम यांनी पत्रकार परिषदेत केला.
भारतीय सेनेला राजकारणात ओढण्याचा प्रयत्न झाला आहे. आर्मी फंड देण्याच्या भूमिकेत मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेणं ही लाजिरवाणी बाब आहे. आर्मी फंडाला 5 कोटी रुपये देण्याचा हक्क यांना कोणी दिला, असा सवालही निरुपमांनी केला आहे.

===================================

गळाभेटीदरम्यानच अखिलेश-शिवपाल मंचावर भिडले

गळाभेटीदरम्यानच अखिलेश-शिवपाल मंचावर भिडले
लखनऊअखिलेशने सरकार चालवावं, तर शिवपालने पक्ष चालवावा असे आदेश देत समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम यांनी पक्षातील सत्तासंघर्षावर तात्पुरती मलमपट्टी केली.
बैठकीतील आरोप-प्रत्यारोपांनंतर मुलामय यांनी काका-पुतण्याची गळाभेटही घडवून आणली..मात्र अवघ्या काही सेंकदात दोघांमध्ये पुन्हा ठिणगी पडली. अखिलेश खोटे बोलतो असा आऱोप शिवपाल यांनी केला. विशेष म्हणजे व्यासपीठावरच दोघांमध्ये धक्काबुक्कीही झाली.
अमरसिंहांवर आसूड ओढणाऱ्यांना, मुलायम यांनी अमरसिंह आणि शिवपालला कधीच अंतर देणार नाही असं ठकणावलं आहे.त्यामुळे मुलायम यांचा तात्पुरता इलाज किती काळ टिकणार हे पाहावं लागेल. पक्ष चालवण्यावरुन अखिलेश आणि शिवपाल यांच्यात अनेक मतभेद सातत्यानं उफाळून येत असल्यानं यादव कुटुंबात गृहकलह निर्माण झाला आहे.

===================================

पत्र पोहोचण्यास लागली अवघी 50 वर्षे !


  • ऑनलाइन लोकमत 
    मेलबर्न, दि. 24, -  पोस्टातून पाठवलेले पत्र वेळेत न पोहोचणे, टपाल गहाळ होणे अशा गोष्टी भारतीयांसाठी सवयीच्या झालेल्या आहेत. पण अशी दिरंगाई, भोंगळपणा केवळ भारतातच होतो असे समजायचे कारण नाही. ऑस्ट्रेलियन पोस्ट खात्याने एक पत्र थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 50 उशिराने पोहोचवण्याचा पराक्रम केला आहे. त्यानंतर या दिरंगाईसाठी ऑस्ट्रेलियाच्या पोस्ट खात्याने रविवारी माफीही मागितली आहे. 
    अॅडलेड येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याला फ्रेंच पॉलिनेशियातील बेट असलेल्या ताहिती येथून आलेले एक जुनाट पोस्ट कार्ड मिळाले. या पोस्ट कार्डवर पोस्टाचा 1966 सालचा शिक्का असून, हे पत्र ख्रिस नावाच्या व्यक्तीने रॉबर्ट जॉर्जिओला पाठवले होते. दरम्यान, हे पत्र मिळालेले  टीम डफी म्हणतात, "हे पत्र या घराच्या जुन्या मालकाला पाठवण्यात आले असावे. हे पत्र इटालियन व्यक्तीने 1963  लिहिले असावे. तसेच या पत्रावर मला 1966 ची तारीख आढळली आहे.  तसेच हे पत्र पाठवणारा बोटने प्रवास करत असावा."
===================================

टायटॅनिकच्या 'लॉकर की'चा 85 हजार पौंडांना लिलाव


  • ऑनलाइन लोकमत
    लंडन, दि. 23 - टायटॅनिक जहाजावरील एका लॉकरची चावी नुकत्याच झालेल्या लिलावामध्ये तब्बल 85 हजार पौंडांना विकली गेली. टायटॅनिकला अपघात घडल्यावर या चावीचा वापर करत लाइफ जॅकेट असलेले लॉकर उघडण्यात आले होते.  
    लंडनमध्ये झालेल्या या लिलावात टायटॅनिकशी संबधित 200 वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. या लिलावात लॉकरच्या चावीवर 50 हजार पौंडपर्यंत बोली लागेल अशी अपेक्षा लिलावकर्त्यांना होती. मात्र तिला अपेक्षेहून अधिक किंमत मिळाली. या चावीला मिळालेली किंमत ही तिचे महत्त्व आणि उपयुक्तता सिद्ध करते, असे लिलावकर्ते अँड्र्यू अल्डिज म्हणाले. 
    ही चावी तृतीय श्रेणीचे कारभारी सिडने सेडर्नी यांच्या ताब्यात होती. 1912 साली जेव्हा टायटॅनिक हिमनगाला धडकून  अपघातग्रस्त झाले तेव्हा या चावीच्या योग्य वेळी करण्यात आलेल्या वापराने अनेकांचे प्राण वाचवण्यास मदत झाली होती. 
===================================

सेहवाग आणि ब्रिटीश पत्रकार मॉर्गन पुन्हा भिडले

सेहवाग आणि ब्रिटीश पत्रकार मॉर्गन पुन्हा भिडले
गेल्या शनिवारी इराणसोबत झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय कबड्डी संघाने इराणला 39-29 ने धूळ चारत कबड्डीच्या विश्वचषकावर आठव्यांदा आपलं नाव कोरलं. भारतीय संघाने हा चषक सलग तिसऱ्यांदा आपल्या नावावर केला आहे. भारतीय कबड्डी संघाच्या या विजयानंतर टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने ट्विटरवरुन भारतीय संघाचे अभिनंदन केले. याशिवाय त्याने ब्रिटीश पत्रकार पियर्स मॉर्गनला पुन्हा सुनावलं.

===================================

No comments: