[अंतरराष्ट्रीय]
१- 2011 च्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये 3 पाक जवानांचा शिरच्छेद?
२- येमेनमध्ये अंत्ययात्रेवर हल्ला, 140 जणांचा मृत्यू, 525 जखमी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- शक्तीशिवाय काहीही अशक्य, भागवतांकडून सर्जिकल स्ट्राईकचं समर्थन
४- मायावतींच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरीत तिघांचा मृत्यू, अनेक जखमी
५- मोदींमुळेच भारत-पाक संबंध बिघडले - अझीझ
६- भारताला मनीआॅर्डरद्वारे मिळणारी रक्कम ५ टक्के घटणार
७- खरेदीदार सावध; सेन्सेक्स आणखी घसरला
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांकडून भगवान गडावरील सुरक्षेचा आढावा
९- रिक्षा-टॅक्सी चालकांचेही आता येणार ‘अॅप’
१०- ... तर मुंबईतही मोर्चा काढू, आंदोलकांचा इशारा
११- नाशिकच्या घटनेला जबाबदार असणा-यांना तातडीनं अटक करा- शरद पवार
१२- आरोपीला शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅकवर कारवाई करू- मुख्यमंत्री
१३- तमिळनाडूत प्रभारी मुख्यमंत्री नेमण्यास विरोध
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- संतप्त जमावाकडून मुंबई-आग्रा हायवेवर रास्तारोको, वाहतूक ठप्प
१५- बीडमध्ये तीन सख्ख्या भावंडांना जलसमाधी
१६- मराठा मोर्चाचं वादळ आता परराज्यात, दमणमधील मराठी भाषिक रस्त्यावर
१७- तळेगाव पडसाद; संतप्त जमावावर लाठीचार्ज, अश्रुधूरांचा वापर
१८- तळेगाव- पोलिसांची वाहने जाळली, हवेत गोळीबार
१९- पुणे; पोलिसांवर बिअर बाटली फेकून मारणाऱ्या तीन दारुड्यांना अटक
२०- रांची- कोकरमध्ये एका घरातून 6 जणांचे मृतदेह सापडले
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- इंदूर कसोटीः न्यूझीलंडच्या दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद 28 धावा
२२- इंदूर कसोटीत कोहलीचं द्विशतक, विक्रमाचीही नोंद
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स*
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा.
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
=================================








१- 2011 च्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये 3 पाक जवानांचा शिरच्छेद?
२- येमेनमध्ये अंत्ययात्रेवर हल्ला, 140 जणांचा मृत्यू, 525 जखमी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- शक्तीशिवाय काहीही अशक्य, भागवतांकडून सर्जिकल स्ट्राईकचं समर्थन
४- मायावतींच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरीत तिघांचा मृत्यू, अनेक जखमी
५- मोदींमुळेच भारत-पाक संबंध बिघडले - अझीझ
६- भारताला मनीआॅर्डरद्वारे मिळणारी रक्कम ५ टक्के घटणार
७- खरेदीदार सावध; सेन्सेक्स आणखी घसरला
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांकडून भगवान गडावरील सुरक्षेचा आढावा
९- रिक्षा-टॅक्सी चालकांचेही आता येणार ‘अॅप’
१०- ... तर मुंबईतही मोर्चा काढू, आंदोलकांचा इशारा
११- नाशिकच्या घटनेला जबाबदार असणा-यांना तातडीनं अटक करा- शरद पवार
१२- आरोपीला शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅकवर कारवाई करू- मुख्यमंत्री
१३- तमिळनाडूत प्रभारी मुख्यमंत्री नेमण्यास विरोध
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- संतप्त जमावाकडून मुंबई-आग्रा हायवेवर रास्तारोको, वाहतूक ठप्प
१५- बीडमध्ये तीन सख्ख्या भावंडांना जलसमाधी
१६- मराठा मोर्चाचं वादळ आता परराज्यात, दमणमधील मराठी भाषिक रस्त्यावर
१७- तळेगाव पडसाद; संतप्त जमावावर लाठीचार्ज, अश्रुधूरांचा वापर
१८- तळेगाव- पोलिसांची वाहने जाळली, हवेत गोळीबार
१९- पुणे; पोलिसांवर बिअर बाटली फेकून मारणाऱ्या तीन दारुड्यांना अटक
२०- रांची- कोकरमध्ये एका घरातून 6 जणांचे मृतदेह सापडले
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- इंदूर कसोटीः न्यूझीलंडच्या दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद 28 धावा
२२- इंदूर कसोटीत कोहलीचं द्विशतक, विक्रमाचीही नोंद
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स*
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा.
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
=================================
... तर मुंबईतही मोर्चा काढू, आंदोलकांचा इशारा
औरंगाबादः मुंबईतील मराठा क्रांती मोर्चा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय मराठा मोर्चा संयोजकांनी घेतला आहे. मात्र 14 डिसेंबरला नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक विचार केला नाही तर मुंबईत मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती मराठा मोर्चा संयोजकांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेमध्ये दिली.
औरंगाबादमध्ये मराठा मोर्चा संयोजकांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीसाठी 32 जिल्ह्यातील 11 प्रतिनिधी आले होते. बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांविषयी एकूण 11 निर्णय घेण्यात आले.
बैठकीत काय झालं?
औरंगाबादच्या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, सहा महिन्यात कोपर्डी बलात्कार घटनेतील आरोपींना फाशी द्यावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात यासह एकूण 11 मागण्या करण्यात आल्या.
=================================
संतप्त जमावाकडून मुंबई-आग्रा हायवेवर रास्तारोको, वाहतूक ठप्प
नाशिक : नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याचे तीव्र पडसाद उमटलेले पाहायला मिळाले आहेत. संतप्त नागरिकांनी मुंबई-आग्रा हायवेवरची वाहतूक रोखून धरली आहे.
जमावाने मुंबई-आग्रा हायवेवर रास्तारोको केला आहे. ओझरजवळ एका एसटी बसची तोडफोड केल्याचीही माहिती आहे. पोलिसांच्या तीन गाड्याही नागरिकांनी जाळल्या आहेत. मुंबई-आग्रा हायवेवर रास्तारोको, घोटीजवळ वाहतूक ठप्प झाली आहे.
घोटी, इगतपुरी बाजारपेठ बंद असून नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ताही बंद करण्यात आला आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार केला होता.
नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर 15 वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाला होता. मात्र मेडिकल रिपोर्टनुसार बलात्कार झाला नसून, अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याचं स्पष्टीकरण नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिलं आहे.
=================================
जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांकडून भगवान गडावरील सुरक्षेचा आढावा
अहमदनगरः भगवान गड दसरा मेळाव्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरचे पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी भगवान गडाला भेट दिली. पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी आणि जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी गडावरील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.
=================================
बीडमध्ये तीन सख्ख्या भावंडांना जलसमाधी
बीड : बीड तालुक्यातील कामखेडा गावात तीन सख्ख्या भावंडांचा नदीच्या बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला आहे. यावेळी बुडणाऱ्या मुलांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतलेल्या आईला गावकऱ्यांनी वाचवलं.
बीडमधील कामखेडामध्ये परवीन शेख आपल्या तीन मुलांसह कपडे धुण्यासाठी गावाजवळील बंधाऱ्यावर गेल्या होत्या. यावेळी जिशान या मुलाचा पाय घसरुन तो पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या सानिया आणि अफ्फान या बहिण-भावाचा बुडून मृत्यू झाला. एकमेकांचा जीव वाचवताना तिघांनाही आपल्या जीवाला मुकाव लागलं आहे.
बुडणाऱ्या मुलांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी टाकलेल्या परवीन शेख यांना ग्रामस्थांनी वाचवलं आहे. मात्र तिन्ही भावंडांना वाचविण्यात यश आले नाही. या मुलांचे पिता शेतकरी असून त्यांचा कापूस विक्रीचा व्यवसाय असल्याचं देखील कळालं आहे.
=================================
मराठा मोर्चाचं वादळ आता परराज्यात, दमणमधील मराठी भाषिक रस्त्यावर
नंदुरबार : अहमदनगरमधील कोपर्डीच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये लाखोंच्या संख्येत मराठा क्रांती मोर्चे निघाले. आता मराठा मोर्चाचं वादळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात राज्यात पाहायला धडकलं आहे.
दमणमध्ये आज मराठा मोर्चाचं वादळ पाहायला मिळालं. उत्तर महाराष्ट्रातील बहुसंख्य मराठी भाषिक लोक गुजरात आणि दमणमध्ये कायमस्वरूपी स्थायिक झाले आहेत. त्यामुळे दमण ग्रामपंचायतीत मराठा भाषिक लोकांचं प्रभाव पाहायला मिळतो.
कोपर्डीच्या घटनेचा निषेध आणि अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा, मागणीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. विशेषतः महिलांचा आणि तरुणींचा सहभाग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. दरम्यान, दमणनंतर आता गुजरात राज्यातील सुरतला मोर्चाची तयारी सुरु आहे.
=================================
2011 च्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये 3 पाक जवानांचा शिरच्छेद?
मुंबई : 2011 साली भारतीय सैनिकांनी एलओसी पार करुन सर्जिकल स्ट्राईक केल्याची खबळजनक बातमी ‘द हिंदू’ या वृत्तपत्रानं दिली आहे. जुलै 2011 मध्ये पाकिस्तानी सैनिकांच्या हल्ल्यात 6 भारतीय जवान शहीद झाले होते.
शहीद झालेल्या सहा जवानांपैकी दोघांचे शीर धडावेगळे करुन पाकिस्तानात नेण्यात आलं होतं. पण त्याच कारवाईचा बदला भारतीय सैनिकांनी काही दिवसातच पाकव्याप्त काश्मीरच्या जिंजर भागात धडक कारवाई घेतला.
2011 मधील सर्जिकल स्ट्राईकमध्ये 8 पाकिस्तानी सैनिकांना ठार करण्यात आलं होतं. इतकंच नाही, तर त्यातल्या तीन सैनिकांचे शीर धडावेगळे करुन भारताच्या हद्दीतही आणले होते.
दरम्यान ‘द हिंदू’ या वृत्तपत्रानं छापलेल्या बातमीला भारतीय लष्कराने किंवा सरकारने अद्याप दुजोरा दिलेला नाही.
=================================
शक्तीशिवाय काहीही अशक्य, भागवतांकडून सर्जिकल स्ट्राईकचं समर्थन
नागपूर : जगात कुठलीही गोष्ट शक्तीच्या वापराशिवाय शक्य नाही, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं समर्थन केलं आहे.
इतके दिवस आपण शक्तीच्या भाषेचा वापर करत होतो, तेव्हा अमेरिका आपल्याला शांत बसवायची. मात्र आता त्यांना न विचारता आपण शक्तीचा वापर केला तर अमेरिकाही आपल्या पाठीशी असल्याचं भागवतांनी म्हटलं.
एखादी गोष्ट चांगली असो वा वाईट, शक्तीच्या वापराशिवाय ती साध्य नसल्याचंही मोहन भागवत म्हणाले. नागपूरमध्ये आयोजित एका खासगी कार्यक्रमात ते बोलत होते.
=================================
येमेनमध्ये अंत्ययात्रेवर हल्ला, 140 जणांचा मृत्यू, 525 जखमी
सना : येमेनमधील एका अंत्ययात्रेवर झालेल्या हवाई हल्ल्यात तब्बल 140 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर अंदाजे 525 जण जखमी झाल्याची माहिती आहे. सौदीच्या नेतृत्वात हा हवाई हल्ला करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली असून सौदीतील हथी बंडखोरांनी हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हवाई हल्ल्यात शेकडो निष्पाप नागरिकांना प्राण गमवावं लागणं, आणि 525 जणांना दुखापती होणं ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचं सना शहरातील आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.
अंत्ययात्रेसाठी एका सभागृहात सर्व नागरिक जमले होते, त्याचवेळी हा हल्ला झाला. प्रत्यक्षदर्शीनी घटनास्थळी रक्ताचे पूर वाहिल्याचं म्हटलं आहे. मार्च 2015 मध्ये सुरु झालेल्या अँटी बॉम्बिंग कॅम्पेननंतर झालेल्या सर्वात शक्तिशाली हल्ल्यांपैकी हा एक असल्याचं म्हटलं जातं.
=================================
मायावतींच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरीत तिघांचा मृत्यू, अनेक जखमी
- लखनऊ, दि. 9 - बहुजन समाजवादी पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांच्या रॅलीत अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. एका मृत महिलेची ओळख पटली असून, ती कानपूरमधल्या बिल्होरमधली रहिवासी आहे.रॅलीमध्ये जखमी झालेल्या लोकांना तात्काळ उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मात्र या प्रकरणावर बहुजन समाजवादी पार्टीचे लखनऊ शहराध्यक्ष रामअचल यांनी रॅलीत कोणतीही चेंगराचेंगरी झाला नसल्याचा दावा केला आहे. लखनऊमध्ये उकाडा जाणवत असल्यानं उष्माघातानं महिलेचा मृत्यू झाल्याचं खळबळजनक वक्तव्य रामअचल यांनी केलं आहे.बहुजन समाजवादी पार्टीचे संस्थापक कांशीराम यांच्या 10व्या पुण्यतिथीप्रीत्यर्थ लखनऊमध्ये आयोजित केलेल्या रॅलीमध्ये हा प्रकार घडला आहे. याच सभेत मायावतींनी नरेंद्र मोदींवर टीकेचे प्रहार केले आहेत.
=================================
=================================
=================================
=================================
No comments:
Post a Comment