[अंतरराष्ट्रीय]
१- चीनच्या अंतराळ यानाचे यशस्वी प्रक्षेपण
२- ब्राझीलच्या तुरुंगात दंगल : २५ कैदी ठार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- ऐन दिवाळीच्या तोंडावर हरभरा डाळीचे दर दुप्पट
४- सगळ्यात आधी देश, मग कला आणि संस्कृती - मुकेश अंबानी
५- मुंबई विमानतळावर लँडिंगवेळी एअर इंडिया विमानाचा टायर फुटला
६- हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेश बंदी कायम
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
७- ठाण्यात शिवसेनेला भगदाड, हजारो पदाधिकारी-कार्यकर्ते मनसेत
८- निवासी वसाहतीत विनापरवानगी फटाके स्टॉलवर कारवाई होणार
९- जिभेला लगाम घाला, 'सामना'तून शिवसेनेचा बडोलेंना सल्ला
१०- मुंबई विमानतळावरील डागडुजीमुळे अनेक उड्डाणं रद्द
११- निवडणुकीसाठी सेना-मनसे सज्ज, उद्धव आणि राज ठाकरेंच्या शाखांना भेटी
१२- भुवनेश्वरमध्ये रुग्णालयात आग, 22 जणांचा मृत्यू
१३- शिर्डीत होणारी दलित-मराठा ऐक्य परिषद कोल्हापुरात
१४- मुंबईमध्ये हंता व्हायरसची साथ, एका मुलाचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- नाशकात मनसे, राष्ट्रवादीला धक्का, तीन नगरसेवक शिवसेनेत
१६- कफ परेडमधील आगीत बजाज कुटुंब बचावलं, दोन नोकरांचा मृत्यू
१७- आपटी बार, अॅटम बॉम्ब, तडतड्या वाजवू नका: ठाणे पोलीस
१८- पुण्यात तरुणीची निर्घृण हत्या, आरोपी तिच्याच दुचाकीवरुन पसार
१९- कल्याण-डोंबिवली पालिका कर्मचाऱ्यांची कार्यालयातच दारुपार्टी
२०- इचलकरंजीत घरगुती गॅसचा स्फोट, चौघे गंभीर जखमी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- दीपिका पदूकोणच्या 'XXX: द रिटर्न ऑफ जेंडर केज' चा ट्रेलर हिंदीतून रीलिज
२२- भारत-पाक महिला क्रिकेट मालिका रद्द?
२३- इन्फोसिसच्या चार उद्योग खंडांची १५ शाखांत विभागणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स*
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा.
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
===============================
===============================
===============================
===============================
===============================
===============================
===============================
===============================
===============================
===============================
१- चीनच्या अंतराळ यानाचे यशस्वी प्रक्षेपण
२- ब्राझीलच्या तुरुंगात दंगल : २५ कैदी ठार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- ऐन दिवाळीच्या तोंडावर हरभरा डाळीचे दर दुप्पट
४- सगळ्यात आधी देश, मग कला आणि संस्कृती - मुकेश अंबानी
५- मुंबई विमानतळावर लँडिंगवेळी एअर इंडिया विमानाचा टायर फुटला
६- हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेश बंदी कायम
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
७- ठाण्यात शिवसेनेला भगदाड, हजारो पदाधिकारी-कार्यकर्ते मनसेत
८- निवासी वसाहतीत विनापरवानगी फटाके स्टॉलवर कारवाई होणार
९- जिभेला लगाम घाला, 'सामना'तून शिवसेनेचा बडोलेंना सल्ला
१०- मुंबई विमानतळावरील डागडुजीमुळे अनेक उड्डाणं रद्द
११- निवडणुकीसाठी सेना-मनसे सज्ज, उद्धव आणि राज ठाकरेंच्या शाखांना भेटी
१२- भुवनेश्वरमध्ये रुग्णालयात आग, 22 जणांचा मृत्यू
१३- शिर्डीत होणारी दलित-मराठा ऐक्य परिषद कोल्हापुरात
१४- मुंबईमध्ये हंता व्हायरसची साथ, एका मुलाचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- नाशकात मनसे, राष्ट्रवादीला धक्का, तीन नगरसेवक शिवसेनेत
१६- कफ परेडमधील आगीत बजाज कुटुंब बचावलं, दोन नोकरांचा मृत्यू
१७- आपटी बार, अॅटम बॉम्ब, तडतड्या वाजवू नका: ठाणे पोलीस
१८- पुण्यात तरुणीची निर्घृण हत्या, आरोपी तिच्याच दुचाकीवरुन पसार
१९- कल्याण-डोंबिवली पालिका कर्मचाऱ्यांची कार्यालयातच दारुपार्टी
२०- इचलकरंजीत घरगुती गॅसचा स्फोट, चौघे गंभीर जखमी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- दीपिका पदूकोणच्या 'XXX: द रिटर्न ऑफ जेंडर केज' चा ट्रेलर हिंदीतून रीलिज
२२- भारत-पाक महिला क्रिकेट मालिका रद्द?
२३- इन्फोसिसच्या चार उद्योग खंडांची १५ शाखांत विभागणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स*
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा.
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
===============================
ठाण्यात शिवसेनेला भगदाड, हजारो पदाधिकारी-कार्यकर्ते मनसेत
मुंबई/ठाणे : ठाण्यात शिवसेनेला मोठं भगदाड पडण्याची चिन्हं आहेत. ठाणे शहर विभागातून शिवसेनेचे हजारपेक्षा जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत.
शिवसेनेचे हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते थोड्याच वेळात कृष्णकुंजवर मनसेमध्ये प्रवेश घेणार आहेत. ठाण्याचे शहर प्रमुख अविनाश जाधव यांनी हा दावा केला आहे. कळवा-दिव्यातील 90 टक्क्यांहून जास्त कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे.
नाशकात मनसे, राष्ट्रवादीला धक्का, तीन नगरसेवक शिवसेनेत
नाशिक/मुंबई : नाशिकमध्ये राष्ट्रवादी आणि मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसे नगरसेवक अशोक सातभाई आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवाजी चुंबळे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
नाशकातील राष्ट्रवादीचे नगरसेवक असलेले शिवाजी चुंबळे हे छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक मानले जातात. मात्र नाशकात राष्ट्रवादीची साथ सोडून चुंबळे धनुष्यबाण हाती घेण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे चुंबळे यांची नगरसेविका पत्नी कल्पना चुंबळेही शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
दुसरीकडे, नाशिकरोड भागातील मनसेचे नगरसेवक अशोक सातभाई हेसुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज दुपारी 12 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर प्रवेश करणार आहेत.
दीपिका पदूकोणच्या 'XXX: द रिटर्न ऑफ जेंडर केज' चा ट्रेलर हिंदीतून रीलिज
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ‘XXX: द रिटर्न ऑफ जेंडर केज’ या हॉलिवूड सिनेमाचा दुसरा ट्रेलर नुकताच रीलिज झाला आहे. बिग बॉस 10 च्या प्रीमिअरवेळी हा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.
दीपिकाचा हॉलिवूडमधील हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमात दीपिका डॅशिंग भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वीच्या ट्रेलरमध्ये दीपिका काही सेकंदासाठीच दिसली होती. ज्यामुळे तिच्यावर टीकाही झाली होती.
या सिनेमाच्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये दीपिकाचे बरेच सीन पाहायला मिळणार आहेत. हॉलिवूड अभिनेता विन डिझेलसोबत दीपिका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 20 जानेवारी 2017 ला सिनेमा जगभरात प्रदर्शित होणार आहे.
पाहा व्हिडीओ :
कफ परेडमधील आगीत बजाज कुटुंब बचावलं, दोन नोकरांचा मृत्यू
मुंबई : मुंबईतील कफ परेडच्या मेकर टॉवरमध्ये लागलेल्या आगीत दोघा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बजाज ग्रुपचे अध्यक्ष शेखर बजाज यांचं कुटुंब या आगीतून सुखरुप बचावलं असून दोघा नोकरांना जीव गमवावा लागला आहे.
कफ परेडमधल्या मेकर टॉवरच्या विसाव्या मजल्यावर पहाटे सव्वासहाच्या सुमारास आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात दोन तासांच्या प्रयत्नांनी यश आलं असून बजाज यांच्या घरातील दोन नोकरांचा यात मृत्यू झाला. तर 11 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.
आगीची घटना घडली तो फ्लॅट शेखर बजाज यांच्या नावे आहे. आग लागली त्यावेळी शेखर बजाज, त्यांची पत्नी, मुलगी, मुलगा, सून आणि एक वर्षांचा नातू फ्लॅटमध्ये अडकले होते. बजाज यांचा फ्लॅट 8 बीएचके असून त्यातील सर्व्हंट रुममध्ये आग लागली होती.
अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांनी आग आटोक्यात आणली. तसंच तीन अँब्युलन्स आणि चार वॉटर टँकरही घटनास्थळी दाखल झाले होते. इमारतीच्या 20व्या मजल्यावर आग लागल्याने हायड्रॉलिक शिडीचा वापर करुन आग विझवण्यात आली. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
आपटी बार, अॅटम बॉम्ब, तडतड्या वाजवू नका: ठाणे पोलीस
ठाणे: दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, यंदा दिवाळीत केवळ टिकल्या आणि लवंगीवर समाधान मानावं लागणार आहे. कारण की, ठाणे पोलिसांनी मोठ्या आवाजांच्या फटक्यांवर बंदी घातली आहे. तसे पत्रकच जारी करण्यात आले आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी यासंबंधी आदेश काढून मोठ्या फटाक्यांवर बंदी घातली आहे.
मोठ्या आवाजांंचे फटाके वाजविण्यास बंदी
आपटी बार, तडतड्या, उखळी बार आणि अॅटम बॉम्ब वाजविण्यावर ठाणे पोलिसांनी बंदी घातली आहे. या फटाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घातक पदार्थ असतात. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होतं. त्यामुळे या फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आकाशातून जाऊन फुटणाऱ्या मोठ्या आवाजांच्या फटाक्यांवर देखील बंदी घालण्यात आली आहे.
निवासी वसाहतीत विनापरवानगी फटाके स्टॉलवर कारवाई होणार
मुंबई : निवासी वसाहतींमध्ये विनापरवानगी फटाक्याची दुकानं उघडणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. बेकायदा दुकानं थाटून फटाक्यांचा साठा आणि विक्री करणार्यांविरोधात तात्काळ कारवाईचा करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.
फटाक्यांचा स्फोट झाल्यास होणारी जीवितहानी ही गंभीर बाब आहे. निवासी वसाहतींत बेकायदा दुकाने थाटून फटाक्यांचा साठा करणार्यांचे केवळ परवाने रद्द करुन भागणार नाही तर त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली पाहिजे, असं मतही खंडपीठाने नोंदवलं आहे.
फटाक्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी निवासी वसाहतींमधील फटाक्यांच्या बेकायदा दुकानांवर कारवाईची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये फटाके फोडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शाळातून जनजागृती केली जात असल्यामुळे हे प्रमाण कमी होत आहे. अशीच जनजागृती सर्वत्र केली पाहिजे अशा शब्दांत न्यायालयाने मुंबईचे कौतुक केलं आहे.
कल्याण-डोंबिवली पालिका कर्मचाऱ्यांची कार्यालयातच दारुपार्टी
कल्याण : कल्याण-डोंबिवलीतल्या पालिका कर्मचाऱ्यांचा प्रताप समोर आला आहे. पालिकेच्या ग प्रभागक्षेत्रातील कार्यालयात फेरीवाला विरोधी पथकानं चक्क दारुपार्टी केल्याचं उघडकीस आलं आहे.
सोमवारी रात्री 9 च्या सुमारास तीन ते चार पालिका कर्मचाऱ्यांची ही दारुपार्टी सुरु होती. पार्टीची चाहूल पत्रकारांना लागली असता कर्मचाऱ्यांनी ठिकाणावरुन पळ काढला.
कार्यालयातील तळ मजल्यावर असलेल्या फेरीवाला पथकाच्या स्टोअररुमला बाहेरुन टाळं लावल्यानं पत्रकारांना संशय आला. दार उघडतानाचा आवाज आल्यानं दारुड्या कर्मचाऱ्यांनी पोबारा केला.
स्टोअर रुममध्ये विदेशी दारुची बाटली, सिगरेट, दारुचा ग्लास, चणे या गोष्टी आढळल्या. कामाच्या ठिकाणी दारुपार्टीत मश्गुल असणाऱ्या तळीरामांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई विमानतळावरील डागडुजीमुळे अनेक उड्डाणं रद्द
मुंबई : मुंबई विमानतळावरील अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन धावपट्ट्यांच्या डागडुजीचं काम करण्यात येणार असल्यानं जवळपास 2100 उड्डाणं रद्द होणार आहेत.
आजपासून सुरु होणाऱ्या डागडुजीचं काम 28 नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. 18, 20, 24 आणि 27 ऑक्टोबर त्याचप्रमाणं 3, 7, 14, 17, 21, 24 आणि 28 नोव्हेंबर या दिवशी प्रामुख्यानं डागडुजीचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या १२ दिवसांत अनेक उड्डाणं रद्द केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान मुंबईतून होणाऱ्या उड्डाणांवर याचा परिणाम होणार आहे.
दरम्यान जाहीर करण्यात आलेल्या 12 दिवसांत प्रतिदिवशी 175 उड्डाणं रद्द होतील असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र नेमकी कोणती उड्डाणं रद्द होणार आणि कोणत्या उड्डाणांच्या वेळेत बदल केले जाणार याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
===============================
No comments:
Post a Comment