Tuesday, 4 October 2016

नमस्कार लाईव्ह ०४-१०-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- भारताला ऑल आऊट करा, सर्जिकल स्ट्राईकनंतर जावेद मियाँदाद बरळला 
२- आता फेसबुकवरुनही वस्तूंची खरेदी-विक्री करा, 'मार्केटप्लेस' फीचर लॉन्च 
३- पाकिस्तानात लाहोरच्या हवाई हद्दीतून प्रवासाला विमानांना बंदी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही! 
५- पुण्याच्या दिशेने येणारी 'झेलम एक्सप्रेस' घसरली 
६- चांदीचा भाव घसरला; खरेदीमुळे सोने स्थिर 
७- व्याजदर कपातीच्या आशेने सेन्सेक्स उसळला 
८- जेटली कॅनडात; आर्थिक करारांचा घेणार आढावा 
९- PoKमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी लष्कराला हवेत 6 महिने 
१०- भाजपने घेतले 7 शेतकऱ्यांचे बळी: लालूप्रसाद 
११- "प्रसार भारती'चे CEO देणार राजीनामा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१२- सर्जिकल स्ट्राईकनंतर मुंबईतील सुरक्षेत वाढ, ड्रोन, पॅराग्लायडरवर बंदी 
१३- मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक, मोठ्या घोषणांची शक्यता 
१४- मराठवाड्यात अतिवृष्टी, 25 लाख हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त, 82 जणांचा मृत्यू 
१५- मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीवर 20 मोर्चे, 250 शिष्टमंडळे धडकणार 
१६- उद्धव ठाकरे शेषनाग नाही तर कालिया आहेत: विखे-पाटील 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- पंकजा मुंडेंचा बीडमधील नुकसानग्रस्त भागाचा दौरा 
१७- लातूर; कपडे धुताना पाण्यात बुडून एकाच कुटुंबातील चौघींचा मृत्यू 
१८- आलोकनाथ यांच्या  मुलाला अटक 
१९- बंगळूरू; शास्त्रज्ञाकडे सापडले २३१ कोटींचे ड्रग्स 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- भारत-पाकमध्ये शांततेची अपेक्षा करणाऱ्या आफ्रिदीने रंग बदलले! 
२१- नाईकांचा वाडा बंद होणार, 'रात्रीस खेळ चाले'चा आलविदा 
२२-4 GB रॅम, दमदार बॅटरी, 'मोटो झेड'ची भारतात लॉचिंग 
२३- पाक कलाकारांकडे व्हिसा, अवैध घुसखोरी नाही : ओम पुरी 
२४- बँकांनी गोठवले BCCI चे खाते; सामन्यांवर सावट! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
===================
*दांडिया जल्लोष २०१६*

हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।

संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
======================================

जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही! 

जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!
धुळे :  नजरचुकीनं एलओसी पार गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन न करण्याचा निर्धार, कुटुंबियांनी केला आहे.
एलओसी पार करुन चंदू पाकिस्तानात गेल्याची बातमी समजताच त्यांच्या आजीचा धक्क्यानं मृत्यू झाला. आज आजीचा दशक्रिया विधी असून, चंदू परतल्याशिवाय आजीच्या अस्थी विसर्जन न करण्याचा निर्धार, चंदूचे मोठे भाऊ आणि कुटुंबियांनी केला आहे.
नजरचुकीने एलओसी पार
27 आणि 28 सप्टेंबरच्या रात्री भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील 7 तळांना उद्ध्वस्त झाली. यामध्ये 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर 2 पाकिस्तानी सैनिक ठार झाले. या रात्रीतच चंदू चव्हाण हे नजरचुकीने पाकिस्तानात पोहोचल्याचं उघड झालं. खुद्द पाकिस्तान संरक्षण मंत्रालयानेच याबाबतची माहिती ट्विट करुन दिली होती.

======================================

मराठा मोर्चांचे आयोजक संजीव भोर यांना 6 जिल्ह्यातून हद्दपार?

मराठा मोर्चांचे आयोजक संजीव भोर यांना 6 जिल्ह्यातून हद्दपार?
अहमदनगर : मराठा मोर्चांच्या आयोजनातल्या प्रमुख कार्यकर्त्यांपैकी एक असलेल्या संजीव भोर यांना अहमदनगर पोलिसांनी नोटीस धाडली आहे.
संजीव भोर यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण करण्याच्या शक्यतेने ही कारवाई करण्यात आली आहे. तुम्हाला 6 जिल्ह्यातून हद्दपार का करु नये, अशी नोटीस अहमदनगर पोलिसांनी दिली आहे.
संजीव भोर यांच्यावर सामाजिक आंदोलनाचे सुमारे 8 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रीय एकात्मतेला बाधा येण्याची शक्यता आहे, अशी चिंता या नोटीसमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान भोर यांनी पोलीस उपाधीक्षकांसमोर आपली भूमिका मांडली आहे. तर 17 तारखेला अहमदनगरच्या प्रांतांसमोर त्यांना साक्ष नोंदवावी लागणार आहे.

======================================

सर्जिकल स्ट्राईकनंतर मुंबईतील सुरक्षेत वाढ, ड्रोन, पॅराग्लायडरवर बंदी

सर्जिकल स्ट्राईकनंतर मुंबईतील सुरक्षेत वाढ, ड्रोन, पॅराग्लायडरवर बंदी
मुंबई : दिवाळीआधी मुंबईवर दहशतवादी हवाई हल्ला करु शकतात, अशी शक्यता मुंबई पोलिसांनी व्यक्त केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरातील सुरक्षेत मोठी वाढ केली आहे.
मुंबईसह महाराष्ट्रभर सणासुदीचं वातावरण असताना, दहशतवादी हवाई हल्ला करण्याची शक्यता मुंबई पोलिसांनी व्यक्त केली आहे. पॅराग्लायडर, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअर क्राफ्ट, ड्रोन किंवा हवाई क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून मुंबईवर हल्ले करण्याची शक्यता आहे. असा हल्ला झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची भीती आहे. त्यामुळे 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या काळात पॅराग्लायडर, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअर क्राफ्ट, ड्रोन यांवर मुंबई आणि परिसरात बंदी घालण्यात आली आहे. अशी उपकरणं मुंबई परिसरात दिसल्यास पोलिसांकडून कडक करावाई केली जाणार आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांसह सर्वच सुरक्षा यंत्रणांकडून मुंबईच्या हवाई हद्दीतून जाणाऱ्या प्रत्येक एअरक्राफ्टवर नजर ठेवली जात आहे. ड्रोन असणाऱ्यांची आणि ड्रोनची विक्री करणाऱ्यांची माहिती सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून गोळा केली जात आहे.

======================================

भारत-पाकमध्ये शांततेची अपेक्षा करणाऱ्या आफ्रिदीने रंग बदलले!

भारत-पाकमध्ये शांततेची अपेक्षा करणाऱ्या आफ्रिदीने रंग बदलले!
इस्लामाबाद : पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने सरड्यासारखं रंग बदललं आहे. पाकिस्तान शांतताप्रिय देश असून, भारत-पाकने एकमेंकांविरोधात युद्ध पुकारु नये, असं म्हणणाऱ्या आफ्रिदीने स्वत:च्या वक्तव्यावरुन कोलांटउडी घेतली आहे. भारताला कोणत्याही पद्धतीने उत्तर देण्यासाठी पाकिस्तान तयार असल्याचं आता आफ्रिदीने म्हटलं आहे.
पाकिस्तानमधील पाठाण सीमेवर तैनात आहेत आणि आमचे पठाण भाराताला कोणत्याही पद्धतीने उत्तर देतील, असे शाहिद आफ्रिदीने म्हटलं आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधील भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान चवताळला आहे. राजकीय नेत्यांसह आता सिनेकलाकार आणि क्रिकेटरही भारताविरोधी गरळ ओकू लागले आहेत. शाहिद आफ्रिदी, जावेद मियाँदाद यांनीही भारतावर टीका केली आहे.
आफ्रिदी म्हणाला, “भारताने हे विसरायला नको की, पाकिस्तानी सैनिक सर्व बाजूंनी मजबूत स्थितीत आहेत. पाकिस्तानच्या सीमेवर पठाण सुरक्षा करत आहेत आणि पठाणच सर्वात आधी भारताच्या कोणत्याही कारवाईला उत्तर देण्यासाठी उभे राहतात.”

======================================

भारताला ऑल आऊट करा, सर्जिकल स्ट्राईकनंतर जावेद मियाँदाद बरळला

भारताला ऑल आऊट करा, सर्जिकल स्ट्राईकनंतर जावेद मियाँदाद बरळला
इस्लामाबादः भारताला नेस्तनाबूत करण्यासाठी पाकने भारताला ऑल आऊट करण्याची मोहिम हाती घ्यावी, असं वादग्रस्त विधान पाकचा माजी क्रिकेटर जावेद मियादाद याने केलं आहे. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्याने जावेदला संताप अनावर झाला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणावाचं वातावरण आहे. यातच जावेद मियांदादने हे संतापजनक विधान केलं आहे. पाकिस्तानने आता भारतावर हल्ला करावा, असं जावेदने म्हटलं आहे.

भारतीय लष्कराने उरी हल्ल्याचा बदला घेत पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून उरी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय जवानांच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये जवळपास 50 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. भारताने दहशतवादाविरोधात कारवाई केली आहे, तरीही पाकिस्तानच्या जनतेचा संताप होत आहे, हे विशेष.
======================================

मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक, मोठ्या घोषणांची शक्यता

मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक, मोठ्या घोषणांची शक्यता
औरंगाबाद : तब्बल आठ वर्षांनंतर औरंगाबादमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली आहे. मराठवाड्यातील परिस्थिती जाणून तातडीने निर्णय घेण्यासाठी 1981 पासून या बैठकीचं आयोजन करण्यात येतं. 2008 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळाची मराठवाड्यात बैठक झाली होती.

त्यावेळी 3 हजार 827 कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली होती. त्याचं नंतर काय झालं हे अजूनपर्यंत कळू शकलेलं नाही. त्यामुळे यंदा फडणवीस सरकार मराठवाड्याच्या पदरात काय टाकतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

तब्बल 8 वर्षांनंतर बैठक
मराठवाड्यातील सद्यस्थिती प्रत्यक्ष समजून घेऊन तातडीने निर्णय घेण्यासाठी 1981 पासून बैठकीची प्रथा सुरु झाली. तत्कालीन मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांनी औरंगाबादमधली पहिली बैठक घेऊन मराठवाड्याचा अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर सुरु झालेल्या या बैठकीचा सिलसिला 17 आणि 18 सप्टेंबर 2008 ला संपला.

======================================

सलमान खानवरील टीकेला सलीम खान यांचं उत्तर


सलमान खानवरील टीकेला सलीम खान यांचं उत्तर
मुंबई : पाकिस्तानी कलाकारांचं समर्थन करुन पुन्हा एकदा वादात अडकलेल्या अभिनेता सलमान खानच्या बचावासाठी सलमानचे वडील आणि ज्येष्ठ पटकथाकार सलीम खान सरसावले आहेत. सलमानचा बचाव किंवा माफी मागून प्रश्न निकालात काढण्याऐवजी सलीम खान यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
प्रकरण काय आहे?
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवरुन बॉलिवूडमध्ये दोन गट निर्माण झाले. एका गटात पाकिस्तानी कलाकारांच्या काम करण्याविरोधात आहेत, तर दुसरा गट पाकिस्तानी कलाकारांना विरोध करणाऱ्यांना विरोध करत आहे. सलमान दुसऱ्या गटात सहभागी झाला असून, त्याने या सर्व प्रकरणावर वादग्रस्त विधानही केले. “पाकिस्तानी कलाकारांचं दोष काय? ते दहशतवादी नाहीत.”, असे म्हणत सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांची पाठराखण केली होती.
======================================

मराठवाड्यात अतिवृष्टी, 25 लाख हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त, 82 जणांचा मृत्यू

मराठवाड्यात अतिवृष्टी, 25 लाख हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त, 82 जणांचा मृत्यू
मुंबई : मराठवाड्याला परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. मराठवाड्यात सुमारे 25 लाख हेक्टर पिकांचं नुकसान झालं आहे. तर पावसादरम्यान 82 जणांचा मृत्यू झाला आहे.  30 सप्टेंबरपासून अतिवृष्टीने 1763 गावे प्रभावित झाली आहेत. तर 762 जणावरं वाहून गेली आहेत, अशी माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.

मराठवाड्यात आज तब्बल आठ वर्षांनंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीदरम्यान अनेक घोषणा होण्याची शक्यता आहे. विशेषतः मराठवाड्यातील आपत्तीग्रस्त भागासाठी मदत जाहीर होण्याची शक्यता आहे.

अतिवृष्टीने प्रभावित गावे
नांदेड : 831
लातूर : 888
बीड : 44

======================================

मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीवर 20 मोर्चे, 250 शिष्टमंडळे धडकणार

मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीवर 20 मोर्चे, 250 शिष्टमंडळे धडकणार
औरंगाबाद : शहरात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी पक्ष, संघटनांचे सुमारे 20 मोर्चे विभागीय आयुक्तलयावर धडकणार आहेत. तर 250 पेक्षा अधिक शिष्टमंडळं मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडणार आहेत.

बैठकीसाठी शहरात राज्य राखीव दलाच्या चार तुकड्या, 9 आयपीएस अधिकाऱ्यांसह सुमारे चार हजार पोलिसांचा फौजफाटा विविध ठिकाणी तैनात करण्यात आला. यामुळे शहराला छावणीचे स्वरुप आलं आहे.

शहरातील वाहतूकीतही बदल
मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने बरेच मोर्चे काढण्यात येणार आहेत. शिवाय निवेदने देण्यासाठीही नागरिकांची गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर व्हीआयपींचा प्रवास विनाअडथळा व्हावा, यासाठी पोलिसांनी विभागीय आयुक्त, सुभेदारी विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मार्ग वाहनांसाठी बंद केले आहेत.


======================================

पाकिस्तानात लाहोरच्या हवाई हद्दीतून प्रवासाला विमानांना बंदी

पाकिस्तानात लाहोरच्या हवाई हद्दीतून प्रवासाला विमानांना बंदी
लाहोर : पाकव्याप्त काश्मीरात भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. कराचीच्या हवाई हद्दीतून 33 हजार फुटाखालून विमान उड्डाणाला पाकिस्तानने बंदी घातली आहे. त्यातच आता लाहोरच्या हवाई हद्दीतूनही व्यावसायिक जेट विमानांना 29 हजार फुटांखालून उडण्यास पाकने मनाई केली आहे.
कराचीच्या हवाई हद्दीतून विमान प्रवासाला घातलेली बंदी आठवड्याभरासाठी आहे, तर लाहोरच्या अवकाशातून उडण्यास 31 ऑक्टोबरपर्यंत मज्जाव घालण्यात आला आहे. कराची हे राजस्थान आणि गुजरातच्या सीमेनजीक आहे, तर लाहोर हे जम्मू काश्मीर
आणि पंजाबच्या जवळ आहे.
‘ऑपरेशनल रिझन्स’ असं पाकिस्तानने हवाई क्षेत्रातून विमानांना उड्डाण करण्यास बंदी घालण्याचं कारण पुढे केलं आहे. पाकच्या निर्णयामुळे पश्चिमेकडील आणि आखाती देशात जाणाऱ्या विमानांना त्रासदायक ठरु शकतं. पाकिस्तानला वळसा घालून जावं लागणार असल्याने या विमानांना प्रवासासाठी विलंब होईल.
पाकिस्तानी हवाई दल त्यांची ताकद आजमावण्यासाठी कसरती करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळेच पाकच्या हवाई हद्दीतून प्रवास करण्यास विमानांना बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी विमानांना भारताच्या हवाई हद्दीतून प्रवेश देण्याबाबत भारतीय सरकार विचार करत आहे.

======================================

पाक कलाकारांकडे व्हिसा, अवैध घुसखोरी नाही : ओम पुरी

पाक कलाकारांकडे व्हिसा, अवैध घुसखोरी नाही : ओम पुरी
नवी दिल्ली : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ओम पुरी यांना पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आलेला आहे. पाक कलाकारांकडे अधिकृत व्हिसा असून त्यांनी भारतात अवैध प्रवेश केलेला नाही, अशी कड ओम पुरी यांनी घेतली आहे.
‘पाकिस्तानी कलाकार हे अधिकृत वर्क व्हिसावरच भारतात काम करत आहेत. त्यामुळे अचानक त्यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्या चित्रपटात कोट्यवधी रुपये गुंतवणाऱ्या भारतीय निर्मात्यांनाच मोठा फटका बसणार आहे. हा निर्णय सरकारी पातळीवर घेतला गेला असता, तर गोष्ट वेगळी’ असं ओम पुरी म्हणाले.
मनसेच्या इशाऱ्यानंतर अनेक पाकिस्तानी कलाकारांनी भारतातून काढता पाय घेतला होता. त्यानंतर सलमान खानने पाक कलाकारांची बाजू घेतल्यानंतर त्याच्यावरही राज ठाकरे, नाना पाटेकर यांनी टीकेची झोड उठवली. मात्र ओम पुरी यांनाही पाकिस्तानी अभिनेत्यांचा कैवार घ्यावासा वाटल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
‘सरकार कारवाई करत असताना आपण शांत बसायला हवं. पाकिस्तानी कलाकारांना इथेच राहू देणं किंवा परत पाठवणं यामुळे फारसा काही फरक पडत नाही. मी सहा वेळा पाकला गेलो आहे. त्यांच्याकडून योग्य प्रेम आणि आदर मिळाला आहे’ असंही पुरी यांनी सांगितलं.

======================================

आलोकनाथ यांच्या  मुलाला अटक


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. 4 - चित्रपटांमधून संस्कारी बाबूजींची भुमिका निभावणा-या आलोकनाथ यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केलं आहे. ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह प्रकरणात पोलिसांनी शिवांग याला अटक केली आहे. मंगळवारी सकाळी त्याला वांद्रे न्यायालयात हजर केलं जाणार आहे.  
     
    आलोकनाथ यांचा मुलगा शिवांग मैत्रीणीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेला होता. घरी परतत असताना रस्त्यात पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता शिवांगने गाडी न थांबवता वेगाने पळवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी ताबडतोब पुढे नाकाबंदीला असणा-या पोलिसांनी गाडीची माहिती कळवली. त्यानंतर सांताक्रूझ पोलिसांनी त्याला अडवलं. मात्र आपली चूक मान्य करण्याऐवजी शिंवागने पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. 
======================================

No comments: