Saturday, 15 October 2016

नमस्कार लाईव्ह १५-१०-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
1- इतिहासात पहिल्यांदाच काश्मीर खो-यात फडकले चीनचे झेंडे 
2- गोव्यात आजपासून ब्रिक्स; पंतप्रधान दाखल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
3- हाऊसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनाही इलेक्शन ड्यूटी 
4- जम्मूत सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद 
5- मोदी सरकाच्या आर्थिक धोरणांमुळे कामगार संघटना कमकुवत: बीएमएस 
6- भारतीय जवान बोलत नाहीत, करुन दाखवतातः मोदी 
7- प्रणव मुखर्जींच्या राष्ट्रपतीपदाच्या दुसऱ्या टर्मसाठी शिवसेना आग्रही?  
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
8- राजकुमार बडोलेंसारख्या लोकांना महाराष्ट्रातून हद्दपार करा: छत्रपती संभाजीराजे 
9- पैसेवाल्यांची आंदोलने यशस्वी होत आहेत: राजकुमार बडोले 
10- गिरीश महाजनांच्या वक्तव्यामुळं नाशकात हिंसाचार, नीलम गोऱ्हेंचा आरोप 
11- कुप्रसिद्ध गुंड बाबा बोडकेचा मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो व्हायरल 
12- बलात्काराचं गांभीर्य जातीवर ठरवणारा समाज सुसंस्कृत नाहीः मुणगेकर 
13- राज्यात सात दिवसात डेंग्यूचे ४०७ रुग्ण 
14- राजसत्ता भ्रष्ट होते तेव्हा धर्मसत्ता मार्गावर आणते, मुख्यमंत्री 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
15- कोल्हापूरच्या मूक मोर्चातील महिलांचा लक्षणीय सहभाग  
16- नाशिकमधील इंटरनेट सेवा आज दुपारपासून सुरु  
17- सुट्टीवर आलेल्या जवानाची महाडमध्ये राहत्या घरी आत्महत्या 
18- सुट्टीवर आलेल्या जवानाची महाडमध्ये राहत्या घरी आत्महत्या 
19- अहमदनगर; बदनामीची धमकी देत चुलत बहिणींवर बलात्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
20- रणजीत महाराष्ट्राच्या स्वप्निल-अंकितची विक्रमी भागीदारी 
21- दुरावलेली नाती दुःखात जवळ... पंकजांकडून धनंजय मुंडेंचं सांत्वन 
22- पाक कलाकारांना भारतात 'एन्ट्री' कायम 
23- दुष्काळग्रस्त भागात सामने नकोत 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
=======================================

राजकुमार बडोलेंसारख्या लोकांना महाराष्ट्रातून हद्दपार करा: छत्रपती संभाजीराजे

राजकुमार बडोलेंसारख्या लोकांना महाराष्ट्रातून हद्दपार करा: छत्रपती संभाजीराजे
कोल्हापूर: सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळं आता एक नवा वाद सुरु झाला आहे.

‘मराठा मोर्चांचं चुकीचं चित्रण करुन महाराष्ट्रात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सामाजिक न्याय मंत्र्यांना राज्यातून हद्दपार करा’, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. मराठा मोर्चाआधी ते आज कोल्हापुरात एबीपी माझाशी बोलत होते.

काय म्हणाले छत्रपती संभाजीराजे

‘शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती, बाराबलुतेदारांना एकत्र आणलं. तर शाहू महाराजांनी बहुजन समाजाला न्याय दिला. आता महाराष्ट्रात इतक्या चांगल्या पद्धतीने मोर्चे सुरु असताना आज कुठला तरी गृहस्थ काही तरी बडबड करतो,  सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. अशा माणसांना कोल्हापूर नाही तर महाराष्ट्रातून हद्दपार करायला हवं.

=======================================

पैसेवाल्यांची आंदोलने यशस्वी होत आहेत: राजकुमार बडोले 

पैसेवाल्यांची आंदोलने यशस्वी होत आहेत: राजकुमार बडोले

औरंगाबाद: कोपर्डीच्या नावाखाली जर अनुसुचित जातींच्या लोकांवर अन्याय होणार असेल, तर तो आम्ही सहन करणार नाही, प्रसंगी मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, तसेच आज पैसेवाल्यांची आंदोलनं यशस्वी होत आहेत, असं खळबळजनक वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केलं.ते काल औरंगाबादेत इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिवलमध्ये बोलत होते.

बडोले यांनी सध्या आरक्षणासाठी निघणाऱ्या मोर्चांवरही जोरदार हल्ला चढवला. ”कोणीही येतं आणि आरक्षणाची मागणी करतं. ज्याच्याकडं पैसे जास्त आहेत, त्यांची आंदोलनं यशस्वी होतात,” असंही ते यावेळी म्हणाले.

बडोलेंच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीने समाचार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बडोले मंत्रीपदाच्या शपथेचं उल्लंघन  करत असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

नवाब मलिक म्हणाले की, ”महाराष्ट्रामध्ये मुठभर लोकं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्धभवातात. समाजिक सलोखा बिघडवण्याचा भाजपचा प्रयत्न करत आहेत. राज्याचे मंत्री शपथेचं उल्लंघन करत आहेत. गिरीश महाजनांच्या वक्तव्यामुळे नाशिकचं वातावरण बिघडवलं. तेव्हा सामाजिक सलोख बिघडवणं राज्याला परवडणारं नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावर तत्काळ कारवाई केली पाहिजे,” अशी मागणी मलिक यांनी केली.

=======================================

गिरीश महाजनांच्या वक्तव्यामुळं नाशकात हिंसाचार, नीलम गोऱ्हेंचा आरोप

गिरीश महाजनांच्या वक्तव्यामुळं नाशकात हिंसाचार, नीलम गोऱ्हेंचा आरोप
मुंबई: तळेगावमधल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पेटलेलं नाशिक हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच, आता त्या घटनेवरून राजकारणाला सुरूवात झाली आहे.

नाशिकमधली परिस्थिती चिघळण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी केलेलं वक्तव्य जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी केला आहे. तसंच नाशकात दुफळी माजवणारे दुसरे तिसरे कोणी नसून, मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय होते असा मोठा आरोप सेनेकडून करण्यात येतो आहे.

‘अशा घटनांबाबत वक्तव्य करणं चुकीचं आहे. बलात्कार झाला की नाही हे वैद्यकीय अहवालानंतर पोलीस कोर्टाला त्याबाबत माहिती देतात. त्यामुळे गिरीश महाजनांनी त्याबाबत आधीच वक्तव्य करणं चुकीचं होतं. या प्रकरणामुळे आधीच लोकांमध्ये अस्वस्थता होती.’ असा आरोप निलम गोऱ्हेंनी केला आहे.

=======================================

हाऊसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनाही इलेक्शन ड्यूटी

हाऊसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनाही इलेक्शन ड्यूटी

मुंबई: शाळेतील शिक्षकांपाठोपाठ आता हाऊंसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनाही इलेक्शन ड्यूटी लागणार आहे. राज्य सरकारानं याबाबतचा अध्यादेश नुकताच जाहीर केला असून हा निर्णय लवकरच लागू होणार आहे.
राज्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी राज्य सरकारने बूथ स्तरावरील स्वयंसेवक निर्माण करण्याच्या दृष्टीने निवडणूक प्रक्रियेत हाऊसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी गुरुवारी एक अध्यादेश जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता एखाद्या गृहनिर्माण सोसासयटीचे चेअरमन वा सेक्रेटरी यांना इलेक्शन ड्यूटी लावण्यात येणार आहे.
सध्या महाराष्ट्रात एक लाखांहून अधिक हाऊसिंग सोसायटी असून यामध्ये जवळपास 22 लाख रहिवाशी राहतात. शहरी भागातील 40,000 सोसायट्यांची संख्या आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता राज्य सरकाराने हा निर्णय घेतला आहे.
ग्रामपंचायत, महापालिका किंवा अगदी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांत त्यांना मतदान केंद्रांवर स्वयंसेवक म्हणून काम पाहावं लागणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ही जबाबदारी अनिवार्य नसून ऐच्छिक असल्याचंही सरकारनं नमूद केलंय.

=======================================

जम्मूत सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

जम्मूत सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद
श्रीनगर : श्रीनगरच्या जकुरा पोलीस ठाण्याजवळ सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला आहे. तर एसएसबीचे 8 जवान, जम्मू-काश्मीर पोलिसचा एक जवान जखमी झाले आहेत. यामधील तीन जवानांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते आहे.
जकुरा पोलीस ठाण्यापासून 200 मीटर अंतरावर ही घटना घडली आहे. घटनेच्या वेळी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांचा ताफा कॅम्पकडे परतत होता. त्यावेळी 2 दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला.
दरम्यान, हल्ल्यानंतर दहशतवादी फरार झाले असून, त्यांचा शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे

=======================================

सुट्टीवर आलेल्या जवानाची महाडमध्ये राहत्या घरी आत्महत्या

सुट्टीवर आलेल्या जवानाची महाडमध्ये राहत्या घरी आत्महत्या
महाड: सुट्टीसाठी घरी आलेल्या जवानाने महाडमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजेश पिलावरे या 33 वर्षीय जवानाने महाडमध्ये राहत्या घरी, स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. मात्र, त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

राजेश पिलावरे हे १० ऑक्टोबरला सुट्टी घेऊन आले होते. ते पंजाबमध्ये कार्यरत होते. मात्र, या दरम्यान त्यांची पत्नी दसऱ्यासाठी मुलांसह माहेरी गेलेली. यावेळी राजेश हे देखील पत्नीच्या माहेरी गेले आणि त्यांनी त्यांच्या सासऱ्यांकडे ठेवलेली स्वतःची बंदूक घेऊन घरी परतले .

शुक्रवारी त्यांची पत्नी घरी आल्यावर हा प्रकार समोर आला. दरम्यान, पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

=======================================

कुप्रसिद्ध गुंड बाबा बोडकेचा मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो व्हायरल

कुप्रसिद्ध गुंड बाबा बोडकेचा मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो व्हायरल
पुणे : पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड बाबा बोडके याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्रालयातील एक फोटो व्हायरल झाला आहे. बाबा बोडके हा पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड असून, त्याच्यावर एकूण 12 गुन्हे आहेत. यामध्ये 3 हत्येचे गुन्हे असून, बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणीही गुन्हा दाखल आहे.
बाबा बोडकेची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय?
बोडके टोळीचा प्रमुख बाबा बोडकेवर एकूण 12 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामध्ये हत्येप्रकरणी तीन हत्येच्या गुन्ह्यांचा समावेश असून, खंडणी उकळणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, हत्येचा प्रयत्न असेही गंभीर गुन्हे दाखल आहेत. 12  पैकी 11 गुन्ह्यांमधुन कनिष्ठ न्यायालयाकडून सुटका झाली आहे. मात्र, एक गुन्हा अद्याप प्रलंबित आहे. 2003 मध्ये त्याला तडीपारही करण्यात आले होते.
BJp
भाजपकडून नगरसेवक होण्याच्या प्रयत्नात?
बाबा बोडके भाजपकडून नगरसेवक होण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे. कोथरुडच्या आमदार मेधा कुलकर्णींसोबत फ्लेक्सवर बाबा बोडकेचा फोटो झळकले होते, मात्र, बाबा बोडके अद्याप भाजपचा अधिकृत सदस्य नाही.
राष्ट्रवादीकडून एकाच दिवसात हकालपट्टी!
बाबा बोडकेला अजित पवारांच्या उपस्थितीत जाहीर सभेत राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला होता. मात्र, माध्यमातून त्यावर टीका झाल्यानंतर राष्ट्रवादीने एकाच दिवसात बोडकेला पक्षातून काढलं होतं.
मुख्यमंत्री कार्यालयाचे स्पष्टीकरण
“नवी मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर हावरे या अॅप उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात आल्या होत्या. त्यावेळी संबंधित व्यक्ती तिथे होती आणि तेव्हाच हा फोटो काढला गेला. मात्र, बाबा बोडके कोण आहे, याची माहिती मुख्यमंत्र्यांना नव्हती.”, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यलायाने दिले आहे.

=======================================

No comments: