[अंतरराष्ट्रीय]
१- इस्लामाबाद; परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट
२- कैरो; तिसऱ्या मजल्यावर चेनने बांधलेल्या कुत्रीने मारली उडी, शेवट गोड
३- बीजिंग; चीनकडून स्टील उत्पादनात मोठी कपात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- विजय मल्ल्यांची तिस-यांचा ईडीला हुलकावणी, हजर राहण्यासाठी मागितली वेळ
५- 26/11 चा हिरो 'मॅक्स'चा देशवासियांना अलविदा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
६- आयपीएल सामन्यांसाठी पिण्याचे पाणी नाही - मुख्यमंत्री
७- नागपूर; ..तर मी शंभरी साजरी करेन, मा.गोंचं राज ठाकरेंना उत्तर
८- पुणे: कार पेटली नाही, तर एकतर्फी प्रेमातून आत्मदहन
९- सांगली; मिरज-लातूर पाणी एक्स्प्रेसला तांत्रिक खोडा
१०- दोन तासात संप मागे घ्या, हायकोर्टाचे 'मार्ड'ला आदेश
११- उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मार्डच्या डॉक्टरांचा संप मागे
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- NIT प्रकरणाला धार्मिक रंग देणे चुकीचे- मुफ्ती
१३- नागपूर; राज यांनाही पृथ्वीवरून स्वतंत्र व्हावे लागेल- वैद्य
१४- पश्चिम बंगाल; पंतप्रधान, मला अटक करून दाखवाच- ममता
१५- नांदेड मध्ये पाच लाखात पोलिस बनवणारा ठकसेन सापडला; गुन्हा दाखल
१६- डेमो वाटर ट्रेन लातूरच्या स्थानकात दाखल
१७- लातूर; मांजरा नदीच्या खोलीकरणासाठी दिवसभरात एक कोटी ९३ लाखांचा निधी जमा; साडेसात कोटी खर्च अपेक्षित
१८- नांदेड; पावसाचे पाणी बोअर, विहिरी, तलावामध्ये पुनर्भरण केल्यास भविष्याकाळात पाणी टंचाई भासणार नाही - काकाणी
१९- बालक सशक्त आणि सुदृढ राहण्यासाठी पालकांनी त्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी - जि.प.माजी सदस्य संजय भोसीकर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- आयपीएलच्या विजेतेपदासाठी बुकीजची रॉयल चॅलेंजर्सला पसंती
२१- भारतात कार विक्रीचा टॉप गीअर; ७.८ टक्के वाढ
२२- मलेशिया; साईनाचा उपांत्य फेरीत पराभव
२३- प्रियांका चोप्रा दुसऱ्यांदा ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ची मानकरी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
अनुभव हा उत्तम शिक्षक आहे पण तो मोबदला मात्र जबर घेतो
(रवींद्र थोरात, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये,
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
============================================

26/11 चा हिरो 'मॅक्स'चा देशवासियांना अलविदा
मुंबई : मुंबई दहशतवादी हल्ल्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या ‘मॅक्स’ या श्वानाचा मृत्यू झाला. त्याच्यावर आज अंतिम संस्कार करण्यात आले.
‘मॅक्स’ने मुंबईवरील 26/11 हल्ल्यावेळी मोलाची भूमिका बजावली होती. ‘मॅक्स’ने 8 किलो आरडीएक्स आणि 25 ग्रेनाईड पकडून दिल्यानं शेकडोंचे प्राण वाचले होते. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याला ‘गोल्ड मेडल’ने गौरवण्यात आलं होतं.
याशिवाय ‘झवेरी बाजार’ मधील स्फोटात ‘मॅक्स’ने स्फोटकं शोधली होती.
28 ऑक्टोबर 2004 रोजी जन्माला आलेला मॅक्स 2 महिन्याचा असताना मुंबई बॉम्बस्फोटक पथकात दाखल झाला होता. पुण्याच्या प्रशिक्षण केंद्रात त्याला प्रशिक्षण दिलं होतं.
============================================
पुणे: कार पेटली नाही, तर एकतर्फी प्रेमातून आत्मदहन
पुणे: हडपसरमधील कारमध्ये होरपळून मृत्यू झालेल्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा अपघात नव्हता तर प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्रेयसीने दुसऱ्या तरुणासोबत लग्न केल्यानंतरही, पिच्छा पुरवणाऱ्या प्रियकराने तिच्या घरासमोरच स्वत:ला मोटारीमध्ये कोंडून जाळून घेत आत्महत्या केली.
काय आहे प्रकरण?
हडपरच्या गाडीतळाजवळ धावत्या ओमनी कारने अचानक पेट घेतल्याने कार चालक अजित आत्माराम इंगळेचा होरपळून मृत्यू झाला होता. ग्लायडिंग सेंटरजवळ सकाळी साडे सहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली होती.
संबंधित मारुती व्हॅन ही गॅसकिटवर चालणारी असल्यामुळेच कारला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता.
मात्र अधिक तपासानंतर अजितने एकतर्फी प्रेमातून आत्महत्या केल्याची माहिती आता समोर आली आहे.
गाडीत कोंडून घेऊन आत्मदहन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंगळे याचे त्याच्याच नात्यातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्यांनी लग्नाबाबत तरुणीच्या घरच्यांना विचारले होते. परंतु कुटुंबीयांनी नकार दिला होता. त्यानंतर या तरुणीचे दुसऱ्या मुलासोबत 20 डिसेंबर 2015 रोजी लग्न झाले होते. तरुणीचे लग्न झाल्यानंतर तिने इंगळेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र, त्याने पुन्हा तिचा पिच्छा पुरवायला सुरुवात केली. तरुणीशी पुन्हा संपर्क साधून त्याने लग्न करण्याची तयारी दर्शवली. त्याच्याशी लग्न न केल्यास घरासमोर आत्महत्या करण्याची तो धमकी देत होता.
गुढी पाडव्याच्या सणासाठी ही तरुणी माहेरी आली होती. याची माहिती मिळताच इंगळे फलटणवरुन एक मोटार घेऊन पुण्यामध्ये आला. तिच्या घरासमोरील रस्त्याच्या दुस-या बाजूला मोटार उभी केली. मोटारीच्या काचा बंद केल्यानंतर त्याने दरवाजे लॉक करुन घेतले. मोटारीमध्येच त्याने स्वत:ला पेटवून घेतले. गाडीमधून मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागल्यावर नागरिकांनी गाडीच्या काचा फोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाऱ्यामुळे आग आणखीनच भडकली. या आगीत अजित इंगळेचा मृत्यू झाला.
============================================
..तर मी शंभरी साजरी करेन, मा.गोंचं राज ठाकरेंना उत्तर
नागपूर : रा. स्व. संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांच्यावर टीका करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मा. गो. यांनी मार्मिक उत्तर दिलं आहे. मला मारायचं असेल तर पिस्तुल घेऊन यावं अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला.
मा. गो. वैद्य यांना महाराष्ट्र म्हणजे वाढदिवसाचा केक वाटला का, त्यांची पृथ्वीपासून स्वतंत्र होण्याची वेळ आली आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. त्यावर उत्तर देताना ‘देशात लोकशाही आहे, त्यानुसार प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. माझं वय जास्त आहे आणि सर्वांनाच एके दिवशी जायचंय. मात्र मला 100 वर्ष जगण्याची इच्छा आहे. आता त्याआधीच जर मला मारायचं असेल
तर पिस्तुल घेऊन यावं’ अशा शब्दात मा. गो. वैद्यांनी राज ठाकरेंना उत्तर दिलं.
93 वर्षांचे मा. गो. वैद्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते आहेत. गेल्या आठवड्यातच त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी राज्याचे 4 तुकडे करा, असं मत मांडलं होतं. ज्यात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्र अशी विभागणी होती. त्यावरुनच राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यात घणाघाती टीका केली होती.

मिरज-लातूर पाणी एक्स्प्रेसला तांत्रिक खोडा
सांगली: मिरज – लातूर पाणी एक्प्रेसला तांत्रिक अडचणींमुळे आणखी आठ दिवस खोडा लागणार आहे. त्यामुळे मिरजहून लातूरला निघणारी पाणी एक्स्प्रेस आता लांबणार आहे. पाणी उपसण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींमध्ये काही तांत्रिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत.
वारणा धरणातून पाणी उपसण्यासाठी आवश्यक त्या क्षमतेचा पंपही उपलब्ध नाही. शिवाय पंपापासून यार्डपर्यंत जी पाईपलाईन गरजेची आहे., तिला अद्याप तांत्रिक मान्यताही मिळालेली नाही. साधारण साडे चार किलोमीटर अंतर असणाऱ्या या पाईपलाईनसाठी १ कोटी ८० लाखांचा खर्ज येणार आहे
दोन दिवस प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने पंप हाऊस ते यार्ड काम रखडलं. हे काम पूर्ण होण्यासाठी आठ दिवस लागणार आहेत. म्हणजे तोपर्यंत कोट्याहून निघालेली गाडी यार्डातच थांबून राहणार.
मिरजेत ज्या ठिकाणाहून पाणी नेण्यात येणार आहे, त्या ठिकाणी साडे चार किलो मिटरची पाईप लाईन सोडून रेल्वेच्या पंप हाऊसवर एक मोठा पंप बसवायचा आहे. ते काम अपूर्ण आहे. या साडेचारकोटीच्या पाईपलाईनला तांत्रिक मान्यता मिळाली नाही. ही मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम चालू होऊन, पाणी भरून, रेल्वे सुटण्यासाठी अजून आठ दिवस लागतील.
============================================
दोन तासात संप मागे घ्या, हायकोर्टाचे 'मार्ड'ला आदेश
मुंबई: रुग्णांना होण्याऱ्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टानं ‘मार्ड’च्या संपकरी डॉक्टरांना चांगलंच फटकारलं असून दोन तासात संप मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर मार्डच्या डॉक्टरांनी संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं आहे.
जे. जे. महाविद्यालयाचे डीन तात्याराव लहाने यांच्या बदलीसंदर्भात मात्र अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. दत्ता माने यांनी यासंदर्भातली याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी सुरु आहे. तुमच्या भावनांचा आदर करतो पण संप मागे घ्या, असं कोर्टानं मार्डला म्हटलं.
मुंबईतल्या जे. जे. महाविद्यालयाचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांची बदली केली जावी, अशी मागणी काही स्थानिक डॉक्टरांनी केली होती. डॉ. लहानेंकडून आपला मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप या डॉक्टरांनी केला आहे. त्यासाठी गेल्या ६ दिवसांपासून डॉक्टरांनी संप पुकारला आहे.
दुसरीकडे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडेंसोबत आज मार्ड संघटनेच्या डॉक्टरांची बैठक होत आहे. या बैठकीनंतर डॉक्टर संप मागे घेतील, अशी आशा आहे.
============================================
विजय मल्ल्यांची तिस-यांचा ईडीला हुलकावणी, हजर राहण्यासाठी मागितली वेळ
- ऑनलाइन लोकमत -नवी दिल्ली, दि. ९ - बँकांचे जवळपास ९००० कोटी रुपयांचे कर्ज बूडवून पसार झालेल्या वादग्रस्त उद्योगपती विजय मल्ल्यांनी तिस-यांदा सक्तवसुली संचलनालयाला (ईडी) हुलकावणी देत गैरहजर राहिले आहेत. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विजय मल्ल्या यांना तिसरे आणि शेवटचे समन्स पाठवून ९ एप्रिलपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र विजय मल्ल्यांनी यावेळीही हुलकावणी देत मे महिन्याच्या शेवटची तारीख देण्यात यावी अशी मागणी केली आहे.मल्ल्यांना यापूर्वी दोन वेळा समन्स बजावण्यात आले होते. दुसऱ्या समन्समध्ये त्यांना २ एप्रिल रोजी ‘ईडी’च्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, ते आलेच नाहीत. त्यांनी हजर होण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी लेखी मागणी केली होती. पीएमएलएनुसार तीनवेळाच समन्स बजावले जाऊ शकते आणि त्या नियमाप्रमाणे मल्ल्यांना तीन समन्स देण्यात आले आहेत.मल्ल्यांच्या कंपन्यांना स्टेट बँक ऑफ इंडियासह १७ सरकारी बँकांनी दिलेली ९,००० कोटी रुपयांची कर्जे थकलेली आहेत. यापैकी चार हजार कोटी रुपये येत्या सप्टेंबरपर्यंत फेडण्याचा सशर्त प्रस्ताव मल्ल्या यांनी गेल्या तारखेला दिला होता. यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी थोडासा सुधारित प्रस्ताव दिला होता. न्या. कुरियन जोसेफ व न्या. रोहिंग्टन नरिमन यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी सुनावणी झाली तेव्हा मल्यांचे हे दोन्ही प्रस्ताव आपल्याला अमान्य असल्याचे बँकांनी न्यायालयास सांगितले.
============================================
परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट
- ऑनलाइन लोकमत -इस्लामाबाद. दि ९ - दहशतवादविरोधी न्यायालयाने पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटकाढला आहे. 2007मध्ये न्यायाधीशांना ताब्यात घेतल्या प्रकरणी सुनावणीला न्यायालयात हजेरी न लावल्याने परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात हा अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने परदेशी जाण्यावरील निर्बंध हटवल्यानंतर परवेझ मुशर्रफ गेल्या महिन्यात उपचारासाठी दुबईला निघून गेले होते.न्यायाधीश सोहेल अक्रम यांनी परवेझ मुशर्रफ यांच्या गैरहजेरीवर नाराजी व्यक्त करत परदेशी दुबईला जाण्याअगोदर त्यांनी न्यायालयाची परवानगी घेणं आवश्यक असल्याचं सांगितलं. पाकिस्तानचे अध्यक्ष असताना २००७ मध्ये मुशर्रफ यांनी देशात आणीबाणी लादली होती. त्यावेळी त्यांनी न्यायाधीशांना ताब्यात घेतलं होतं त्याचप्रकरणी सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी आपलं मत मांडलं. यानंतर न्यायाधीशांनी परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला.याअगोदरही मुशर्ऱफ यांना अनेकवेळी वेगवेगळ्या न्यायालयांनी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र सुरक्षा तसंच तब्बेतीची कारणे देत त्यांनी उपस्थित राहणं टाळलं होतं. याच दहशतवादविरोधी न्यायालयाने गेल्या सप्टेंबर महिन्यात मुशर्रफ यांनी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र मुशर्ऱफ यांनी हजर राहण्यास नकार देत आपण आजारी असल्याचं कारण सांगत वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केलं होतं.
============================================
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मार्डच्या डॉक्टरांचा संप मागे
- ऑनलाइन लोकमत -मुंबई, दि. ९ - मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या आश्वासनानंतर मार्डच्या डॉक्टरांनी संप मागे घेतला असून संध्याकाळी सहा वाजल्यापासून कामावर रुजू होणार आहेत. जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने व नेत्रचिकित्सा विभाग प्रमुख रागिणी पारेख यांची बदली करण्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून संपावर असलेल्या डॉक्टरांनीसंप मागे घ्यावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. कोर्टाच्या आदेशानंतर संप मागे घेण्याचे आश्वासन 'मार्ड'तर्फे देण्यात आले होते त्यानुसार त्यांनी संप मागे घेतला आहे.गेल्या सहा दिवसांपासून जे. जे. च्या निवासी डॉक्टरांनी गरीब रुग्णांना वेठीस धरले आहे. काही रुग्णांना जबरदस्तीने डिस्चार्ज घेण्यास सांगण्यात येत आहे. तसेच नवीन रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी घेण्यात येत नाही. संपूर्ण राज्यातून जे. जे. मध्ये उपचारासाठी येणा:या गरीब रुग्णांचे हाल होत असल्याने डॉक्टरांना संप मागे घेण्याचा आदेश द्यावा, असा अर्ज उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला होता. ४ ते ६ एप्रिल या काळात एकूण 13 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते अफाक मांडविया यांनी अर्जाद्वारे केला होता. या अर्जावर आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने डॉक्टरांना संप त्वरित मागे घेण्याचे आदेश दिले. आज दुसरा शनिवार, उच्च न्यायालयाच्या सुटीचा दिवस असूनही या अर्जावर सुनावणी करण्यासाठी न्यायालयाने विशेष सुनावणी घेतली.
============================================
तिसऱ्या मजल्यावर चेनने बांधलेल्या कुत्रीने मारली उडी, शेवट गोड
- ऑनलाइन लोकमतकैरो, दि. 9 - कैरोमध्ये एका व्यक्तिने जर्मन शेफर्ड जातीचं कुत्र्याचं पिल्लू पाळलं आणि आपल्या तिसऱ्या मजल्यावरील घरातील बाल्कनीत साखळीनं बांधून ठेवलं. परंतु या जखडलेल्या जीवनाला कंटाळून या लहानग्या कुत्रीनं बाल्कनीबाहेर उडी मारली.जवळपास पाचतास तशीच लोंबकळलेल्या अवस्थेत ती राहिल्याचा अंदाज आहे, परिणामी तिचा गळ्याला गंभीर इजा झाली. परंतु तिचं हो धाडस अखेर फळाला आलं. खालून जाणाऱ्या एका वाटसरूनं प्राणीमित्रांना ही गोष्ट सांगितली आणि बेला नावाच्या या कुत्रीची सुटका झाली. इजिप्शियन सोसायटी फॉर मर्सी टू अॅनिमल्स या संस्थेमुळे बेलाचे प्राण वाचले तर स्पेशल नीड्स अॅनिमल रेस्क्यू अँड रिहॅबिलेशन किंवा स्नार या संस्थेने बेलाच्या पुनवर्सनासाठी प्रयत्न केले.बेलाला सांभाळण्यासाठी अमेरिकेतल्या मॅसॅच्युसेट्समधल्या एका महिलेने तयारी दर्शवली आणि बेलाला नवीन घर मिळालं आता तिला मस्त मैदानात हुंदडता येतं, पाण्यात खेळता येत आणि अन्य कुत्र्यांच्या संगतीत राहता येतं.
============================================
आयपीएल सामन्यांसाठी पिण्याचे पाणी नाही
- मुख्यमंत्री : सामने राज्याबाहेर गेले तरी चालेलमुंबई : आयपीएल क्रिकेटचे सामने राज्याबाहेर गेले तरी चालेल, पण या सामन्यांसाठी कोणत्याही परिस्थितीत पिण्याचे पाणी दिले जाणार नाही, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. तर राज्य शासनाच्या वतीने उच्च न्यायालयातही हीच बाजू मांडण्यात येणार असल्याने राज्यात होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.आयपीएलच्या शनिवारी मुंबईत होणाऱ्या शुभारंभी सामन्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिलेली आहे. मुंबईसह नागपूर आणि पुणे येथेही खेळल्या जाणाऱ्या २0 सामन्यांसाठी लाखो लीटर पाणी वापरले जाणार असल्याने हे सामने राज्याबाहेर हलवावेत, अशी याचिका एका एनजीओने उच्च न्यायालयात केली आहे. राज्य सरकार, आयपीएलच्या आयोजकांवर ताशेरे ओढताना आयपीएलसाठी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय हे गुन्हेगारी कृत्य असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.>पाणी नेमके कुठले?आयपीएल सामन्यांसाठीचे पाणी हे पिण्याचे आहे की इतर वापरासाठीचे अशी विचारणा न्यायालयाने महापालिका व राज्य शासनाला केली असून, त्यावर राज्य शासन काय भूमिका घेते याबाबत उत्सुकता आहे. बीसीसीआयने मात्र, मैदानांच्या देखभालीसाठीचे पाणी पिण्याचे नसते अशी भूमिका मांडली आहे.
============================================
आयपीएलच्या विजेतेपदासाठी बुकीजची रॉयल चॅलेंजर्सला पसंती
- डिप्पी वांकाणी, मुंबईइंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल-२०१६) हंगामात बुकीजची प्रथम पसंती अंतिम विजेतेपदासाठी बंगळुरुच्या रॉयल चॅलेंजर्सला आहे. मुंबई इंडियन्स उपविजेतेपद पटकावेल आणि किंग्ज इलेव्हन पंजाब ते स्थान जिंकण्याची खूपच कमी शक्यता आहे, असे भाकित त्यांनी व्यक्त केले आहे.नऊ एप्रिलपासून आयपीएलला सुरुवात होत आहे. येथे वास्तव्यास असलेल्या बुकीजनी ‘लोकमत’ला सांगितले की या स्पर्धेत होणाऱ्या ५६ सामन्यांतील प्रत्येक सामन्यावर साधारणत: ६०० ते ७०० कोटी रुपयांची उलाढाल होईल. अंतिम विजेता निश्चित होईपर्यंत या संपूर्ण स्पर्धेत ६५ ते ७० हजार कोटी रुपयांची उलाढाल होण्याची अपेक्षा आहे.त्याचप्रमाणे पहिल्या दहा षटकांत किती धावा निघतील, अशा सेशन्स पैजांचीही उलाढाल ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि त्या एका सामन्याच्या अंतिम निकालावर ६०० ते ७०० कोटी रुपयांची उलाढाल होईल, असे त्याने सांगितले. नुकत्याच संपलेल्या टी टष्ट्वेंटी स्पर्धेचे अजिंक्यपद वेस्ट इंडिजने जिंकल्यामुळे पंटरांना फार मोठा फटका बसला होता. हे नुकसान ते आयपीएलच्या स्पर्धेत भरून काढण्याचा प्रयत्न करतील, असे हा बुकी म्हणाला.
============================================
भारतात कार विक्रीचा टॉप गीअर; ७.८ टक्के वाढ
- नवी दिल्ली : २0१५-१६ या आर्थिक वर्षात भारतातील कारविक्रीने टॉप गीअर टाकल्याचे ताज्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले. या वर्षात कारविक्री ७.८७ टक्क्यांनी वाढली. हा गेल्या वर्षातील उच्चांक ठरला. आव्हानात्मक परिस्थितीत नवे मॉडेल आणि आकर्षक सवलती यांच्या माध्यमातून कार उद्योगाने मार्ग काढला.सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम) जारी केलेल्या माहितीनुसार, २0१५-१६ या आर्थिक वर्षात २0,२५,४७९ कारची विक्री झाली. २0१४-१५ या वर्षात १८,७७,७0६ कारची विक्री झालीहोती.सियामचे उप महासंचालक सुगातो सेन यांनी सांगितले की, या आधी २0१0-११ मध्ये कारविक्रीत २९.0८ टक्क्यांची वाढ झाली होती. २0१५-१६ हे वर्ष वाहन उद्योगासाठी खरे तर खडतर होते. तथापि, नवे मॉडेल सादर करून आणि आकर्षक सूट योजना राबवून कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यात यश मिळविले.चढे व्याजदर, अस्थाई धोरणे आणि ग्राहकांचा नरमाईचा कल ही आव्हाने उद्योगासमोर होती. अस्थायी धोरणांमुळे डिझेल कार उद्योगास अनेक अडचणींचा सामना करावा लागला. वस्तू उत्पादन क्षेत्रांपैकी सर्वाधिक कर वाहन उद्योगाकडून येतो. तथापि, या उद्योगाचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. आजघडीला या क्षेत्रातील केवळ ६0 टक्के क्षमतेचाच वापर होतो.
============================================
छत्तीसगढमध्ये 122 नक्षलवाद्यांची शरणागती
सुकमा (छत्तीसगढ) - येथील 11 महिलांसह 122 नक्षलवाद्यांनी आज (शनिवार) सुकमा येथील पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे.
नक्षलवाद्यांनी बस्तरचे पोलिस महानिरीक्षक एस. आर. पी. कल्लुरी, सुकमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निरज बन्सोड, सुकमा येथील पोलिस निरीक्षक डी. श्रावण यांच्यासमोर 122 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. शरणागती पत्करलेल्या नक्षलवाद्यांमध्ये 11 महिलांचाही समावेश आहे. बस्तर विभागात नक्षलवाद्यांनी पत्करलेली ही आतापर्यंतची ही सर्वांत मोठी शरणागती आहे.
छत्तीसगढमध्ये 122 नक्षलवाद्यांची शरणागती
नक्षलवाद्यांनी बस्तरचे पोलिस महानिरीक्षक एस. आर. पी. कल्लुरी, सुकमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निरज बन्सोड, सुकमा येथील पोलिस निरीक्षक डी. श्रावण यांच्यासमोर 122 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. शरणागती पत्करलेल्या नक्षलवाद्यांमध्ये 11 महिलांचाही समावेश आहे. बस्तर विभागात नक्षलवाद्यांनी पत्करलेली ही आतापर्यंतची ही सर्वांत मोठी शरणागती आहे.
============================================
चीनकडून स्टील उत्पादनात मोठी कपात
बीजिंग - संकटात सापडलेल्या स्टील उद्योगामुळे चीनने स्टीलच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात कपात करण्याचा निर्णय घेतला असून येत्या पाच वर्षांत स्टील उत्पादनात 1.13 अब्ज टन कपातीचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती चीनमधील एका अधिकाऱ्याने दिली.
उत्पादनात कपातीचे उद्दिष्ट ठेवल्यानंतरही चीनमध्ये स्टीलचे उत्पादन मागणीपेक्षा गरजेपेक्षा जास्त राहणार आहे. स्टील उत्पादन क्षेत्रात चीन सक्रिय असल्याने या निर्णयाचा जगातील इतर स्टील उत्पादन करणाऱ्या व्यावसायिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चीनने फेब्रुवारीमध्ये कच्च्या स्वरुपातील स्टील उत्पादनात 100 दशलक्ष टनांची कपात केली आहे. परंतु या उद्योगात प्रभावी सुधारणा घडवून आणण्यासाठी आणखी कपात करणे आवश्यक असल्याचे मत उद्योग व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या रॉ मटेरियल्स विभागाचे अध्यक्ष लुओ टियुन यांनी व्यक्त केले आहे.
चीनमध्ये वर्ष 2015 मध्ये 400 दशलक्ष टन स्टीलचे अतिरिक्त उत्पादन झाले. त्यामुळे कारखाने बंद करणे आणि नव्या स्टील प्रकल्पांवर चीनला बंदी घालावी लागली. दरम्यान स्टील उत्पादकांच्या एका संघटनेने या वर्षीदेखील उत्पादन क्षमतेत वाढ होण्याचा इशारा दिला आहे. यावर उपाय म्हणून चीनने देशात तयार झालेल्या अतिरिक्त स्टीलची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली आहे. गेल्यावर्षी चीनमधून 112 दशलक्ष टन स्टीलची निर्यात झाली आहे. इतर देशांपेक्षा कमी किंमत दिल्याने चीनला निर्यातीमध्ये आणखी वाढ करणे शक्य झाले नाही.

NIT प्रकरणाला धार्मिक रंग देणे चुकीचे- मुफ्ती
NIT प्रकरणाला धार्मिक रंग देणे चुकीचे- मुफ्ती
श्रीनगर - श्रीनगरमधील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत (एनआयटी) विद्यार्थ्यांच्या दोन गटात झालेल्या वादावादीला धार्मिक रंग देणे चुकीचे असल्याचे असल्याचे, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे.
मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, एनआयटीतील प्रकरण हा मोठा विषय नाही. याविषयी मी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्याशी चर्चा केली आहे. येथील परिस्थितीबाबत सर्व माहिती त्यांना देण्यात आली आहे. मोजक्या बिगर काश्मीरी विद्यार्थ्यांची इच्छा आहे, की त्यांनी काश्मीरबाहेर जाऊन शिकावे. फुटीरतावादी नेते सैय्यद अली शाह गिलानी यांनीही काश्मीरी विद्यार्थ्यांना शांतता कायम ठेवण्याचे अपील केले आहे. यापूर्वीही एनआयटी काश्मीरमधून बाहेर नेण्याची मागणी झालेली आहे व ती फेटाळून लावण्यात आलेली आहे.
ट्वेंटी-20 विश्वकरंडकात भारताचा वेस्टइंडीजकडून पराभव झाल्यानंतर एनआयटीत शिक्षण घेत असलेल्या काश्मीरी विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला होता. याला विरोध म्हणून एनआयटीतील बिगर काश्मीरी विद्यार्थ्यांनी काश्मीरी विद्यार्थ्यांच्या निषेधार्थ तिरंगा फडकाविला होता. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला होता. या घटनेचे देशभरात पडसाद उमटत आहेत.
============================================
राज यांनाही पृथ्वीवरून स्वतंत्र व्हावे लागेल- वैद्य
राज यांनाही पृथ्वीवरून स्वतंत्र व्हावे लागेल- वैद्य
नागपूर - राज ठाकरे जी भाषा बोलतात ती मी वापरत नाही. मला त्यांचा रागही आला नाही. पृथ्वीवरून एक दिवस सर्वांनाच जावे लागते. राज यांनाही कधीतरी पृथ्वीवरून स्वतंत्र व्हावे लागणार आहे, असे सांगून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते व ज्येष्ठ विचारवंत मा. गो. वैद्य यांनी राज ठाकरे यांना आज (शनिवार) प्रत्युत्तर दिले.
नाशिकराव तिरपुडे कॉलेजच्यावतीने शनिवारी "लहान राज्यांची संकल्पना व विकास ‘ या विषयावर मा. गो. वैद्य यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. हिंदी भाषेची अनेक राज्ये आहेत. तेलगू भाषेचीही दोन राज्ये आहेत. मराठी भाषेची एकापेक्षा जास्त राज्ये झाली तर मराठी माणसाचे काही नुकसान होणार नाही. उलट मराठी माणसांचा फायदाच होईल, असेही मा. गो. वैद्य म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी राज्याचे चार तुकडे करायला महाराष्ट्र केक आहे का? असा सवाल उपस्थित केला होता. सोबतच स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्या मा. गो. वैद्य यांची पृथ्वीवरूनच स्वतंत्र व्हायची वेळ आली असल्याची टीका केली होती. यावर वैद्य यांनी आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी भाषेचा अहंकार सोडून त्याचा आदर करण्याचा सल्ला त्यांना दिला.
आपल्या देशात 20 कोटी लोकसंख्या असलेले राज्ये आहेत. दुसरीकडे 10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेलेही राज्ये आहेत. त्यामुळे राज्य पुनर्गठण आयोग नेमण्याची पुन्हा आवश्यकता आहे. एका भाषेचे एकच राज्य असावे हा आग्रहच चुकीचा. भाषेपेक्षा राज्यांचा विकास आणि नागरिकांची सोय जास्त महत्त्वाची आहे. महाराष्ट्राची चार राज्य झाले तर भाषा मराठीचा राहील. त्यामुळे मराठी भाषा आणि मराठी माणसांचेच भले होईल. अस्मितेलाही तडा जाणार नाही, असेही वैद्य म्हणाले.
============================================
पंतप्रधान, मला अटक करून दाखवाच- ममता
आसनसोल (पश्चिम बंगाल) - भारतीय जनता पक्ष हा "भयानक जाली पक्ष‘ (भयानक गैरव्यवहार करणारा पक्ष) असल्याची टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. तसेच "पंतप्रधानांनी मला अटक करून दाखविण्याचे धाडस दाखवावे‘ असे आव्हानही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले.

बॅनर्जी आसनसोल येथील निवडणूकीच्या प्रचारसभेत बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘मी मान उंच करून लढत आहे. मी कोणासमोर कधीही झुकत नाही. जर पंतप्रधानांची इच्छा असेल तर त्यांनी मला अटक करून दाखवण्याची हिंमत दाखवावी. मला त्याची काळजी नाही.‘ तसेच ‘माझ्या राजकीय विरोधकांवर मी कधीही वैयक्तिक टीका करत नाही. मी मोदींवर कधीही वैयक्तिक टीका केली नाही. जरी मला त्यांचे राजकारण आवडत नसले तरीही मी त्यांच्यावर वैयक्तिक टीका करत नाही.‘ मोदींच्या "मन की बात‘ या कार्यक्रमावर टीका करताना बॅनर्जी म्हणाल्या की, ‘देव असल्याप्रमाणे मोदी "मन की बात‘ करतात. मोठी भाषण देणे सोपे असते. पण लोकांसाठी काम करणे कठीण असते. पंतप्रधान हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतील स्वयंसेवक असल्याप्रमाणे बोलतात.‘
गुरुवारी मोदी यांनी आसनसोल येथील सभेत बोलताना बॅनर्जींवर टीका करताना म्हटले होते, ‘पश्चिम बंगालमध्ये मागील विधानसभा निवडणुकीत "मां, माटी, मानुष‘ ही घोषणा ऐकायला मिळाली होती. आता त्याऐवजी कधी मृत्यूचा तर कधी पैशांचा आवाज येत असतो.‘

साईनाचा उपांत्य फेरीत पराभव
साईनाचा उपांत्य फेरीत पराभव
शाह आलम (मलेशिया) - भारताच्या तिसऱ्या मानांकित साईना नेहवालला मलेशिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. साईनाचा तैवानच्या तॅई झु यिंग हिने 21-19, 21-13 असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला.
जागतिक क्रमवारीत 9 व्या स्थानावर असलेल्या तॅई झु यिंग हिने आतापर्यंत आठवेळा साईनाचा पराभव केलेला आहे. या दोघींमध्ये झालेल्या गेल्या पाचही लढतीत साईना पराजित झाली आहे. साईनाला गेल्या तीन स्पर्धांमध्ये उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
साईनाने उपांत्यपूर्व फेरीत पॉर्नतिप बुरानप्रासेर्त्सुक हिचे कडवे आव्हान 19-21, 21-14, 21-14 असे परतवले होते. भारताच्या पी. व्ही. सिंधूला मात्र इंडिया ओपन विजेत्या रॅचनॉक हिच्याविरुद्ध अवघ्या अर्ध्या तासात 7-21, 8-21 अशी एकतर्फी हार पत्करावी लागल्याने बाहेर जावे लागले होते. साईना आता 12 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या सिंगापूर ओपन सहभागी होणार आहे.
============================================
नांदेड मध्ये पाच लाखात पोलिस बनवणारा ठकसेन सापडला; गुन्हा दाखल
सध्या राज्यभर सुरु असलेल्या पोलिस भरतीमध्ये उमेदवारांना लाखो रुपयांना गंडवण्याचा प्रकार नांदेड मध्ये घडला आहे. एकाने पाच लाख रुपयात पोलिस बनवतो असे सांगून रक्कम उकळ्यानंतर त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात पोलिस भरती सुरु आहे नांदेड जिल्ह्यात सुद्धा आज पोलिस भरती प्रक्रियेचा शारीरिक चाचणीचा शेवटचा दिवस आहे. एका माणसाने एका पोलिसाला विचारले की, रोख पैसे देवून पोलिस होता येते काय ? यावर पोलिस म्हणाला असे होत नाही. मग त्याने ती माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. मग पोलिस आणि नागरिक यांनी त्या माणसाशी दिनांक २,५,७ आणि ८ एप्रिल २०१६ रोजी बोलणी केली. त्यानुसार मला या पोलिस भरतीत पोलिस शिपाई या पदावर भारती करण्याचे अधिकार आहेत असे भासवून पाच लाख रुपये दिले तर मी पोलिस करू शकतो असे दाखवले. मग पाच लाख रुपये देण्याची तयारी करून पोलिसांनी काल दिनांक ८ एप्रिल रोजी रात्री त्या माणसास पकडले.
पोलिस चालक प्रविणसिंह राजूसिंह चंदेल नेमणूक लिंबगाव यांनी दिलेल्या तक्रारी नुसार मनोज मिठूलाल बाफना वय ४५ रा. गोवर्धनघाट नांदेड याने हे पाच लाखात पोलिस बनवण्याचे आमिष लोकांना दाखवले आहे.पाच लाख रुपये देतांना त्यास पकडले आहे. या मनोज बाफनाचे नांदेडच्या जैनप्रिय हॉटेल जवळ मनोज ड्रेसेस नावाचे दुकान पण आहे. बाफना विरुद्ध भादवीच्या कलम ३८४,४१७,४१९ आणि ४२० नुसार गुन्हा वजिराबाद पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तपास स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे हे करीत आहेत.
मनोज बाफना यास अटक झाली कि नाही हे अद्याप कळू शकले नाही. माहितगार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या गुन्ह्यात सात वर्ष पर्यंतची शिक्षा असते त्यातील गुन्हेगारांना अटक करण्याची गरज नाही त्यांना फक्त नोटीस देवून सोडता येते. तेव्हा अनेक चर्चा या बाबत होत आहेत. जाणकारांच्या सांगण्यानुसार मनोज बाफना यांची एक बहिण धार्मिक क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहे. त्यासुद्धा नांदेडला आल्या असल्याची माहिती प्राप्त होत आहे. पण दुजोरा कोणी देत नाही, अश्या प्रकारे नांदेड पोलिस दलाची भरती या गुन्ह्याने चर्चेत नक्कीच आली आहे.

डेमो वाटर ट्रेन लातूरच्या स्थानकात दाखल
आठ एप्रिलला लातूरला रेल्वेने पाणी पाठवू असा निर्धार सरकारनं व्यक्त केला होता. अनेकजण या रेल्वेचं स्वागत करायला उत्सुक होते. मध्येच या पाणी रेलला वेळ लागेल असं सांगण्यात आलं तेव्हा स्वागताचा उत्साह मावळला. पण सरकारनं आपलं वचन काही प्रमाणात पूर्ण केलं. पाण्याची एक रिकामी वॅगन घेऊन रेल्वे लातूर स्थानकात दाखल झाली आहे. ही रेल्वे एसआर देशमुख यांच्या विहीरीजवळ थांबली असून या रेल्वेच्या टॅंकरमधून विहिरीत पाणी कसे सोडायचे याचे मोजमाप, अंदाज आणि अभ्यास करणे सुरु आहे. या सोबतच या ठिकाणी २४ तास वीज उपलब्ध व्हावी यासाठी वीज वितरणचे अधिकारी सुरेश फेरेही उपस्थित होते. दरम्यान लातूरला पाणी देण्यासाठी लागणारी ५० वॅगनची गाडी मिरजेकडे रवाना झाल्याचे वृत्त असून १२ तारखेला हे पाणी लातूरच्या स्थानकावर उपलब्ध होईल अशी शक्यता आहे. पण त्यासाठी लातूर तयार नाही. कारण हे पाणी काकांच्या विहिरीतून हरंगुळला नेण्याचा बेत आहे. त्यासाठी किमान तीन किलोमीटरची पाईपलाईन टाकली जाणार आहे. याला लागणारा वेळ मोठा आहे. पण एसआर देशमुखांची विहिर ते आरवीचा बूस्टर पंप जवळ आहे, तेथून पाणी वितरण करणे सोपे आहे हा पर्याय प्रशासनास सुचवण्यात आला आहे.
============================================
लातूर; मांजरा नदीच्या खोलीकरणासाठी दिवसभरात एक कोटी ९३ लाखांचा निधी जमा; साडेसात कोटी खर्च अपेक्षित
लातूर; मांजरा नदीच्या खोलीकरणासाठी दिवसभरात एक कोटी ९३ लाखांचा निधी जमा; साडेसात कोटी खर्च अपेक्षित
उग्र रूप धारण करीत असलेल्या आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न बनलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लातूरकरांनी लोकसहभागातून मांजरा नदीचे १८ किलोमीटर खोलीकरण करण्याचा संकल्प शुक्रवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोडला. नदीच्या सखोलीकरणाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवातही झाली आणि अवघ्या दिवसभरात तब्बल एक कोटी ९३ लाख रुपयांचा निधीही जमा झाला! या सखोलीकरणासाठी साडेसात कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग, नाम फाऊंडेशन या संघटनांनी या कामी पुढाकार घेतला व पाहता पाहता अनेक संघटना या योजनेत सहभागी झाल्या. सरकारवर अवलंबून न राहता हे संपूर्ण काम लोकसहभागातून करण्याचा संकल्प सोडून प्रत्यक्ष कामास प्रारंभही झाला. दहा पोकलेन मशीनच्या साह्य़ाने साई बंधारा १८ किलोमीटर लांब, ८० मीटर रुंद व ३ मीटर खोल करण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. या खोलीकरणामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात १८ दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता निर्माण होईल. ४३ दशलक्ष घनमीटर गाळ निघेल. दोन महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. नदीला मिळणारे नालेही खोल केले जाणार आहेत. या कामासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगने एक कोटी, इंडियन मेडिकल असोसिएशन लातूर शाखेने ५१ लाख रुपये तर जनकल्याण समितीने ११ लाख ११ हजार ११ रुपये दिले. जनकल्याण समिती टप्प्याटप्प्याने आणखीही निधी देणार आहे. कंत्राटदार संघटनाही ११ लाख रुपये देणगी देणार आहे. विविध पत्रकारांनीही २१ हजार रुपयांचा निधी घोषित केला. अन्य काही देणगीदारांमध्ये सिद्धेश्वर देवस्थान (१ लाख ५१ हजार), राज मोटर्सचे अनिल िशदे (१ लाख ५१ हजार), बी. बी. ठोंबरे (१ लाख ५१ हजार), दिलीप माने (१ लाख ११ हजार), सनरिचचे बालकिशन मुंदडा (१ लाख), विलास चामे (१ लाख), अभाविप विवेकानंद संस्कार संस्था (१ लाख), ज्ञानेश्वर विद्यालय (१ लाख), भाई उद्धवराव पाटील प्रतिष्ठान (५१ हजार), राजस्थान विद्यालय १९७८ची बॅच (५१ हजार), विशाल अग्रवाल (५१ हजार), शिवशंकर लातुरे (२५ हजार), अॅड. मनोहरराव गोमारे (११ हजार) यांचा समावेश आहे. हे काम संपेपर्यंत एक मशीन सरकारतर्फे दिले जाणार असून महसूल कर्मचारी संघटनेतर्फे एक दिवसाचा पगार दिला जाईल, असे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी जाहीर केले.
============================================
प्रियांका चोप्रा दुसऱ्यांदा ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ची मानकरी
प्रियांका चोप्रा दुसऱ्यांदा ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ची मानकरी
बॉलीवूड आणि हॉलीवूडला आपल्या अभिनयाने भुरळ पाडणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला नुकताच ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे तिला हा पुरस्कार दुस-यांदा मिळणार आहे. प्रियांका यापूर्वी ‘सात खून माफ’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाकरिता दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर आता दादासाहेब फाळकेंच्या १४७ जयंतीनिमित्त देण्यात येणारा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा पुरस्कार प्रियंकाला मिळणार आहे. येत्या २४ एप्रिलला हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. मात्र, प्रियांका या सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही हे अद्याप कळू शकलेले नाही.
============================================
पावसाचे पाणी बोअर, विहिरी, तलावामध्ये पुनर्भरण केल्यास भविष्याकाळात पाणी टंचाई भासणार नाही, याकरीता लोकसहभाग आवश्यक - जिल्हाधिकारी सुरेश काकाणी
पावसाचे पाणी बोअर, विहिरी, तलावामध्ये पुनर्भरण केल्यास भविष्याकाळात पाणी टंचाई भासणार नाही, याकरीता लोकसहभाग आवश्यक - जिल्हाधिकारी सुरेश काकाणी
नांदेड,9- पावसाचे पाणी बोअर, विहिरी, तलावामध्ये पुनर्भरण केल्यास भविष्याकाळात पाणी टंचाई भासणार नाही, याकरीता लोकसहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले.
कंधार तालुक्यातील पानभोसी येथील नाला सरळीकरणाच्या कामांची पाहणी शनिवार दिनांक 9 एप्रिल रोजी काकाणी यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर, अपर जिल्हाधिकारी बि.एम.कांबळे, उप विभागीय अधिकारी अश्विनी पाटील, जिल्हा कृषि अधिक्षक कृषि अधिकारी तुकाराम मोटे, सरपंच सुवर्णा नाईकवाडे, कॉग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर, प्राचार्य राजेंद्र भोसीकर, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे, गट शिक्षणाधिकारी बालाजी कपाळे आदींची उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले, गाव परिसरातील नदी, नाले, छोटी-छोटी धरणे, नैसर्गिक कालवे यांच्या खोलीकरणाची कामे लोकसहभागातून केल्यास जलस्त्रोतांचे बळकटीकरण होण्यास मदत होणार असून परिसरातील शेतक-यांच्या विहीरीच्या पाणी पातळीतही वाढ होईल. दुष्काळ परिस्थितीमुळे निर्माण होणा-या जलसंकटासाठी यामुळे कमी प्रमाणात टंचाईची झळ बसेल. तसेच राज्य शासनाने हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून पिण्याचे पाणी व पिकास संरक्षित सिंचन देण्याची व्यवस्था निश्चितपणे निर्माण होईल असा विश्वास जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी व्यक्त केला.
प्रारंभी पानभोसी येथील नाला सरळीकरणाच्या कामाची पाहणी करुन त्यांनी समाधान व्यक्त केले. उर्वरीत राहीलेल्या नाला सरळीकरणाच्या पुढील कामासाठी ग्रामस्थांनी लोकसहभागातून एक लाख रुपयांचा निधी दिल्याबद्ल जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी गावक-यांचे अभिनंदन केले. या कामासाठी लागणारी यंत्रसामुग्री पुरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. यावेळी संजय भोसीकर यांनी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांचा शॉल, पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार केला. या प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या डिजीटल शाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी उर्ध्वमनार मधून गावास पाणी पुरवठा करणे, ग्राम पंचायतीस संगणकासारखे अत्याधुनिक सुविधा पुरविणे आणि जलसंवर्धनासाठी पुरेसा निधी देण्यासंदर्भात ग्राम पंचायतीच्या वतीने जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी कार्यकारी अभियंता सांवत, कृषि अधिकारी र्इश्वांबर मंगनाळे, उप अभियंता गंगाधर एंबडवार, मिनी बिडीओ गोविंद मांजरमकर, अभियंता विशाल कदम, शाखा अभियंता एकनाथ कार्ले, केंद्र प्रमुख के.एस.शेट्टे, मुख्याध्यापक बी.एन.केंद्रे, तलाठी मुंडे मॅडम, ग्रामसेवक डी.जी.देवकत्ते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर घोडके यांच्यासह गावकरी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
============================================
बालक सशक्त आणि सुदृढ राहण्यासाठी पालकांनी त्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी - जि.प.माजी सदस्य संजय भोसीकर
बालक सशक्त आणि सुदृढ राहण्यासाठी पालकांनी त्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी - जि.प.माजी सदस्य संजय भोसीकर
नांदेड,9- बालक सशक्त आणि सुदृढ राहण्यासाठी पालकांनी त्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय भोसीकर यांनी केले.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त कंधार तालुक्यातील पानभोसी उपकेंद्रात मिशन इंद्रधनुष्य लसिकरणाचा सुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. प्राचार्य राजेंद्र भोसीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात शिक्षणाधिकारी बी.एल.कपाळे, मन्मथ नाईकवाडे, बालाजी भातमोडे, शेख बाबुसाब, पर्यवेक्षीका सौ.कुंभारे, सौ.वाघमारे यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी उपकेंद्रात गावातील बालकांचे लसिकरण करण्यात आले. पुढे ते म्हणाले, ग्रामीण भागातील नागरीकांना आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र वरदान ठरले असून नागरीकांनी या सुविधांचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शेख ईस्माईल, गजानन नाईकवाडे, ग्रामसेवक जे.डी.देवकत्ते, शेख पाशा, हरीभाऊ नाईकवाडे, दिनानाथ जोंधळे, हनमंत पेटकर आदींची उपस्थिती होती.
============================================

No comments:
Post a Comment