[अंतरराष्ट्रीय]
१- बीजिंग; वेटर्सचं काम करणारे रोबो, रोबोंना पाहण्यासाठी हॉटेल फुल्ल
२- लंडन; ब्रिटनच्या ११६ वर्षांतल्या स्टील उत्पादनापेक्षा चीनची दोन वर्षातली निर्मिती जास्त
३- इस्लामाबाद; पाकिस्तानमधले हिंदू भारतीय - पाकिस्तानी शालेय पुस्तकांची शिकवण
४- सांगलीच्या शिल्पकाराचे शिल्प ‘युनो’मध्ये विराजमान
५- नेदरलॅंड; पेट्रोल, डिझेलच्या वाहनांवर बंदीची शक्यता
६- बीजिंग; महिलांनो, परकीयांच्या प्रेमापासून सावधान - चीन
७- भारत-पाक चर्चेत भारताकडूनच अडथळा - पाक
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
८- देशभरातल्या धरणांमधली पाण्याची पातळी 23 टक्क्यांवर
९- भारताला एक डोळ्याचा राजा संबोधणे चुकीचे - सीतारामन
१०- 'या' कारणांसाठी तुम्ही पीएफची संपूर्ण रक्कम काढू शकाल
११- बालविवाहप्रकरणी कडक कारवाई करा: महिला आयोग
१२- जम्मू-काश्मीरः तब्बल बावीस वर्षांनी बंकर हटविला
१३- लग्न समारंभातील गोळीबारावर शिक्षाच उपाय - किरण बेदी
१४- जम्मू-काश्मीर म्हणजे 'छोटा भारत'- नरेंद्र मोदी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१५- दुष्काळात तेरावा महिना, डाळींचे दर भडकले
१६- रायगड; मुरुड दुर्घटनेप्रकरणी अडीच महिन्यांनी गुन्हा
१७- पुणे; स्वस्त घरासाठी 'मॅपल'च्या केंद्रावर आजही पुणेकरांच्या रांगा
१८- मुंबई; बेस्ट बसच्या तिकीट दरात कपात होण्याची शक्यता
१९- पुणे; पाच लाखात घर देणा-या मॅपलच्या कार्यालयाची मनसेकडून तोडफोड
२०- मिरज; ‘हैदरखान’ विहीर बनली लातूरकरांची जीवनदायिनी
२१- पुणे; मोतेवारांच्या मालमत्तेचा पंचनाम्याचे काम सुरू
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२२- अमृतसर; किरपाल सिंग यांचा मृतदेह भारताच्या ताब्यात
२३- यवतमाळ; टिपेश्वर अभयारण्यात आग, परिसरात 10-12 वाघांसह अनेक प्राणी
२४- अहमदनगर; पंकजा मुंडेंच्या सेल्फीला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचं समर्थन
२५- दहिसर; लोकल ट्रेनसमोर उडी मारुन तरुणाची आत्महत्या
२६- रांची; धोनीची पावती फाडणाऱ्या एसपींचं आणखी एक धाडस
२७- दिल्ली; लग्न समारंभातील गोळीबारादरम्यान मुलीचा मृत्यु
२८- दिल्ली; जादा शुल्काबद्दल ओला, उबेरच्या 18 गाड्या जप्त
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३०- 'सुलतान'मधील सलमानच्या रांगडेपणाला फोटोशॉपची साथ
३१- अक्षयकुमारची महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना 50 लाखांची मदत
३२- अहमदाबाद; गुलाम अली यांचा गुजरातमधील कार्यक्रम रद्द
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
चिडणे हा विरोधावर मात करण्याचा मार्ग नव्हे तर संयम आणि निराशेने तुमच्यावर मात केल्याचे लक्षण आहे.
( मनीषा बिरादार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये,
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
============================================

अक्षय कुमारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जलयुक्त शिवार योजनेसाठी मदत करत असल्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भातलं ट्विट केलं होतं.
अक्षय कुमारने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी तब्बल 90 लाखांची मदत जाहीर केली होती. यानुसार तो महिन्याला 15 लाख अशी रक्कम सहा महिने देणार आहे.
अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळग्रस्तांसाठी मदत करण्यास सुरुवात केल्यानंतर बळीराजाला मदत करण्यासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला आहे. अभिनेता आमीर खान, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनीही दुष्काळग्रस्तांना मदत केली होती.

खातेधारक स्वतः किंवा कुटुंबातील सदस्यांच्या मोठ्या वैद्यकीय उपचारांसाठी, मुलांच्या मेडिकल, डेंटल किंवा इंजिनिअरिंग शिक्षणासाठी किंवा स्वतःच्या आणि मुलांच्या लग्नासाठी संपूर्ण रक्कम काढली जाऊ शकते. 1 ऑगस्टपासून हा नवा निर्णय लागू होणार आहे.
पीएफ खातेधारकांना या नव्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सध्याच्या नियमानुसार (30 एप्रिलपर्यंत लागू असलेला नियम) कुठलीही व्यक्ती नोकरी सोडल्यानंतर दोन महिन्यांच्या अंतराने पीएफमधील संपूर्ण रक्कम काढू शकत असे. त्याचप्रमाणे नोकरीत असतानाही 54 व्या वर्षी रक्कम काढण्याची तरतूद होती.

गेल्या काही वर्षांत प्रवाशांची रोडावलेली संख्या आणि त्यामुळे घसरत चाललेलं उत्पन्न यावर उपाय काढण्यासाठी बेस्ट प्रशासन भाडेसूत्रात बदल करण्याच्या विचारात आहे. हे भाडं कमी झाल्यास रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करणारे प्रवासी बेस्टकडे वळतील असा विश्वास प्रशासनाला वाटतो.
विशेष म्हणजे बदललेल्या भाडेसूत्रानुसार वातानुकूलित बसचे दरही कमी होतील. सध्या बेस्टच्या प्रवासी संख्येत कमालीची घट झाली असून ती 28 लाखांवर आली आहे. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी बेस्ट प्रशासन अनेक मार्ग अवलंबताना दिसत आहे.

टिपेश्वर अभयारण्यात आग, परिसरात 10-12 वाघांसह अनेक प्राणी
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील टायगर झोनमध्ये आग लागली आहे. या टायगर झोनमध्ये 10 ते 12 वाघांसह अनेक प्राणी राहत असल्याची माहित मिळते आहे.
केळापूर तालुक्यातील मारेगावच्या शेतीक्षेत्रात आग लागली आणि पुढे पसरत टिपेश्वर अभयारण्यापर्यंत पोहोचली. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असून, 50 ते 60 अधिकारी आणि कर्मचारी आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत.
आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु असले, तरी या भागातील वाघांसह इतर वन्य प्राण्यांच्या जीवाला आगीमुळे धोका निर्माण झाला आहे.
============================================
पंकजा मुंडेंच्या सेल्फीला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचं समर्थन
अहमदनगर : महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंच्या सेल्फीवरुन सुरु झालेला वाद थांबता थांबत नाहीत. पंकजा मुंडेंच्या सेल्फीवरुन विरोधक एकवटले असतानाच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात मात्र पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ उतरले आहेत. “काम केलंय म्हणून फोटो काढला”, असं म्हणत थोरातांनी पंकजा मुंडेंच्या सेल्फीचं समर्थन केलं आहे.
“पंकजा मुंडेंनी काम केलं आहे, म्हणून फोटो काढला. पंकजा तरुण उत्साही मंत्री आहेत”, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
“पंकजा मुंडेंवर टीका करणाऱ्यांनी काय केलंय?”
“पंकजा मुंडेंवर टीका करणाऱ्यांनी काय केलंय?” असा सवाल करत थोरातांनी स्वपक्षीयांना घरचा आहेर दिला आहे. “आपण काय करतोय, ते आगोदर बघा. पंकजा भर दुपारी फिरते आहे, हे कुणी पाहिलं नाही.”, असे म्हणत थोरात पंकजा यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत.
“पंकजा मुंडेंवर टीका करणाऱ्यांनी आपल्या घरातील एसी बंद केले का?” असा सवालही बाळासाहेब थोरात यांनी टीकाकारांना केला आहे.
============================================
दुष्काळात तेरावा महिना, डाळींचे दर भडकले
मुंबई : दुष्काळात तेरावा महिना कशाला म्हणतात, त्याचा अनुभव सध्या राज्यातील लोक घेत आहेत. कारण एकीकडे पाण्यासाठी वणवण सुरु आहे, तर दुसरीकडे हिरवा भाजीपाला पाणी नसल्यानं बाजारात नाही, आणि जो आहे, तो प्रचंड महाग आहे.
डाळींच्या दरात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ
त्यामुळं पोटाला आणि बजेटला आधार म्हणून असलेल्या डाळींच्या दरांनीही उचल खाल्ली आहे. किरकोळ बाजारात डाळींचे दर 15 ते 20 टक्के दरांनी वाढले आहेत. त्यामुळे सामान्यांचे प्रचंड हाल होणार असं दिसतं आहे.
किरकोळ बाजारात डाळींचे भाव
किरकोळ बाजारात तुरीच्या डाळीनं 180 रुपयाचा दर गाठला आहे. चनाडाळ किरकोळ बाजारात 120 रुपयांवर पोहोचली आहे. मूगाची डाळ 135 रुपये किलो, उडीद डाळ 200 ते 220 रुपये किलो, तर मसूर डाळ किमान 100 रुपयांवर पोहोचली आहे.
============================================
लोकल ट्रेनसमोर उडी मारुन तरुणाची आत्महत्या
मुंबई : मुंबई लोकलच्या दहिसर रेल्वे स्टेशनवर एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्लॅटफॉर्मवर असलेल्या या तरुणाने धावत्या लोकल ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केली.
मुख्तार सिद्दीकी शेख असं या मृत तरुणाचं नाव आहे. 30 वर्षीय मुख्तार बोरीवलीचा रहिवासी आहे. मुख्तार पेंटिंगचं काम करायचा. घटनेच्या दिवशी तो दहिसरहून भाईंदरला जात होता.
ही घटना महिनाभरापूर्वी घडल्याचं म्हटलं जात आहे. परंतु घटनास्थळावरील हा व्हिडीओ महिनाभरानंतर आता व्हायरल झाला आहे.
दहिसरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरही घटना घडली होती. दहिसर स्टेशनवर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये मुख्तार ट्रेनच्या समोर उडी मारताना स्पष्टपणे दिसत आहे. ट्रेन काही फुटांवर आल्यानंतर त्याने प्लॅटफॉर्मवरुन रुळावर उडी मारली. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
============================================
धोनीची पावती फाडणाऱ्या एसपींचं आणखी एक धाडस
रांची : वाहतुकीच्या नियमावर बोट ठेवत, बाईकवरून जाणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीची पावती फाडणाऱ्या जिल्हा पोलीसप्रमुखांनी आणखी एक डॅशिंग कारवाई केली आहे.
झारखंडची राजधानी रांचीमध्ये एसपी एस कार्तिक यांनी आगीत उडी घेत अग्नितांडवात अडकलेल्यांची मदत केली. कार्तिक यांना आगीत अडकलेल्या एकाला वाचवण्यात यश आलं, मात्र ते अन्य तिघांना वाचवू शकले नाहीत.
रांचीजवळ एका परिसरात आग लागल्याचं एस कार्तिक यांना समजलं. या आगीत काही रहिवाशी अडकल्याची माहिती नंतर त्यांच्या कानावर आली. मग कार्तिक यांनी कोणताही विलंब न लावता, स्वत: घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह पेटलेल्या घरात धाव घेतली. एका रहिवाशाला बाहेर काढण्यात कार्तिक यांना यश आलं. मात्र उर्वरित तीन जणांचा मृत्यू झाला.
कार्तिक हे 2010 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. कार्तिक हे रांचीचे जिल्हा वाहतूक विभाग प्रमुख होते, तेव्हा चांगलेच चर्चेत होते. गेल्या वर्षी टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने वाहतुकीचे नियम तोडल्यामुळे, त्याला दंड ठोठावल्यामुळे कार्तिक यांचं नाव देशासमोर आलं होतं.
त्यावेळी धोनी नंबरप्लेट चुकीच्या ठिकाणी असलेली विंजेट बुलेट घेऊन रांचीच्या रस्त्यावर फेरफटका मारत होता. बाईकवर चुकीच्या ठिकाणी नंबर प्लेट लावल्याने पोलिसांनी धोनीवर 450 रुपयांचा दंड लावला.
============================================
मुरुड दुर्घटनेप्रकरणी अडीच महिन्यांनी गुन्हा
रायगड : मुरुड दुर्घटनेप्रकरणी सुमारे अडीच महिन्यांनी गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील आझम कॅम्पसच्या संस्थाचालक आणि शिक्षकांवर मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मुरुडच्या समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या पुण्यातील कॉलेजच्या 14 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. संस्थाचालक आणि शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळेच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या आरोपाखाली या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पुण्यातील आझम कॅम्पस संस्थेच्या आबेदा इनामदार महाविद्यालयातील विद्यार्थी 1 फेब्रुवारी रोजी मुरूडला सहलीसाठी गेले होते. त्यापैकी काही जण पोहण्यासाठी समुद्रात उतरले. मात्र, समुद्रात उतरलेल्या या विद्यार्थ्यांना खोल पाण्याचा अंदाज आला नाही. त्यातच 14 विद्यार्थ्यांचा बुडून मत्यू झाला होता. तब्बल अडीच महिन्यानंतर कलम ३०४अ, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने पुढील कारवाई होणार आहे.
============================================
'सुलतान'मधील सलमानच्या रांगडेपणाला फोटोशॉपची साथ
मुंबई : सुपरस्टार सलमान खान ‘सुलतान’ सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच ‘सुलतान’चा टीझर रिलीज झाला असून एका आठवड्यात एक कोटींहून अधिक लोकांनी हा टीझर पाहिला आहे. रांगड्या पैलवानाच्या भूमिकेत असलेल्या सलमानला पाहिल्यानंतर वयाची 50 वर्ष हा त्याच्यासाठी केवळ आकडा आहे. वयाचा परिणाम सल्लूच्या बलदंड शरीरावर मात्र अजिबात दिसून येत नाही.
‘सुलतान’चा टीझर रिलीज, रांगड्या पैलवानाच्या भूमिकेत सलमान
टीझर आणि पोस्टरमधील सलमानचं शरीर ज्या पद्धतीने दाखवण्यात आलं आहे, ते पाहून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सलमानने सुलतानच्या फर्स्ट लूकचं पोस्टर ट्विटरवर शेअर केलं होतं. पण पोस्टर आणि टीझरमध्ये दिसत असलेलं सलमानचं पीळदार शरीर खरं नसून फोटोशॉप केल्याची शंका उपस्थित केली.
काहींनी सलमानच्या या लूकची थट्टा केली. एवढं खराब फोटोशॉप यापूर्वी कधीच झालं नव्हतं, असं मत ट्विपल्सनी नोंदवलं.
सोशल मीडियावर सलमानच्या बॉडीबाबत सुरु असलेल्या चर्चेनंतर चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी सलमानचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला. या फोटोमध्ये सलमान व्यायाम करताना दिसत आहे. सल्लूच्या शरीरावर प्रश्न उपस्थित करु नये असा प्रयत्न या फोटोद्वारे त्यांनी केला आहे. शिवाय या फोटोतही सलमानच्या शरीराकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे आता फोटो पाहून तुम्हीच ठरवा की खरंच हे फोटोशॉप आहे की सल्लूची मेहनत.
या सिनेमात सलमान खान एका हरियाणाच्या कुस्तीपटूची भूमिकेत आहे. या चित्रपटात अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ‘ईद’ला रिलीज होणार आहे.
============================================
अक्षयकुमारची महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना 50 लाखांची मदत
मुंबई : महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या झळा सोसत आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना दिलासा दिला आहे. जलयुक्त शिवार अभियानासाठी अक्षयने 50 लाखांची मदत केली आहे.
अक्षय कुमारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जलयुक्त शिवार योजनेसाठी मदत करत असल्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भातलं ट्विट केलं होतं.
अक्षय कुमारने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी तब्बल 90 लाखांची मदत जाहीर केली होती. यानुसार तो महिन्याला 15 लाख अशी रक्कम सहा महिने देणार आहे.
अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळग्रस्तांसाठी मदत करण्यास सुरुवात केल्यानंतर बळीराजाला मदत करण्यासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला आहे. अभिनेता आमीर खान, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनीही दुष्काळग्रस्तांना मदत केली होती.
============================================
'या' कारणांसाठी तुम्ही पीएफची संपूर्ण रक्कम काढू शकाल
नवी दिल्ली : पीएफ खात्यातून संपूर्ण रक्कम काढण्याबाबत कामगार मंत्रालयाने काही नियम शिथील केले आहेत. पीएफ खातेधारक घरखरेदी, वैद्यकीय उपचार, विवाह किंवा मुलांचं शिक्षण सारख्या काही कारणांसाठी पीएफमधील संपूर्ण रक्कम काढू शकतात.
खातेधारक स्वतः किंवा कुटुंबातील सदस्यांच्या मोठ्या वैद्यकीय उपचारांसाठी, मुलांच्या मेडिकल, डेंटल किंवा इंजिनिअरिंग शिक्षणासाठी किंवा स्वतःच्या आणि मुलांच्या लग्नासाठी संपूर्ण रक्कम काढली जाऊ शकते. 1 ऑगस्टपासून हा नवा निर्णय लागू होणार आहे.
पीएफ खातेधारकांना या नव्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सध्याच्या नियमानुसार (30 एप्रिलपर्यंत लागू असलेला नियम) कुठलीही व्यक्ती नोकरी सोडल्यानंतर दोन महिन्यांच्या अंतराने पीएफमधील संपूर्ण रक्कम काढू शकत असे. त्याचप्रमाणे नोकरीत असतानाही 54 व्या वर्षी रक्कम काढण्याची तरतूद होती.
पीएफची रक्कम काढताना त्यावर कर आकारण्याचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी ठेवण्यात आला होता. मात्र याला मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यामुळे केंद्राने हा प्रस्ताव मागे घेतला. आतापर्यंत असलेल्या नियमानुसार कर्मचारी नोकरी सोडल्यावर दोन महिने बेरोजगार राहिल्यास त्याला पूर्ण रक्कम काढता येत असे.
============================================
स्वस्त घरासाठी 'मॅपल'च्या केंद्रावर आजही पुणेकरांच्या रांगा
पुणे : पुण्यात 5 लाखात घर देण्याची घोषणा करणाऱ्या मॅपल कंपनीवर गुन्हेगारी कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले खरे, पण या कंपनीवर अशी कोणतीही कारवाई अद्याप झाली नसल्याचं चित्र दिसतंय.
नेहमीप्रमाणे आज सकाळपासून मॅपलच्या विविध केंद्रांवर घरांच्या नोंदणीसाठी झुंबड उडाली आहे. ज्यांनी एबीपी माझाची बातमी पाहिली, ते शहानिशा करण्यासाठी केंद्रावर रांगा लावत आहेत, पण त्याचेळी नव्याने नोंदणी करणाऱ्यांच्याही रांगा लागल्या आहेत.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 5 लाख रुपयात स्वस्तातलं घर देण्याची योजना मॅपल ग्रुपनं जाहीर केली. ज्यात पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही फोटो झळकत होता.
त्यामुळं मॅपल ग्रुपची बदमाशी बापटांच्या आशीर्वादानं सुरु होती का? अशी चर्चा सुरु झाली.
भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर या ग्रुपविरोधात गुन्हेगारी कारवाई करण्याचे आदेश सरकारनं दिले होते. पण आताचा रागरंग पाहाता, अशी कोणतीही कारवाई झाली नसल्याचं दिसतंय.
============================================
वेटर्सचं काम करणारे रोबो, रोबोंना पाहण्यासाठी हॉटेल फुल्ल
बीजिंग : चीनच्या गैयांग प्रांतात चक्क रोबो हॉटेल सुरू करण्यात आलं आहे. इथे तुमची ऑर्डर घ्यायला वेटर्स नाही तर रोबो येतात. तुमची ऑर्डर घेतात आणि ती आणूनही देतात.
अतिशय आकर्षक रंगसंगतीचे हे रोबो पाहायला या हॉटेलमध्ये एकच गर्दी उसळतेय. रोबोंना मध्येच थांबवून त्यांच्यासोबत फोटोही काढले जात आहेत. रोबो वेटर्स हे इथल्या ग्राहकांचं आकर्षण बनत आहेत. शिवाय ते बोलत नसल्यानं ग्राहकांसोबतचे वादही टाळले जात असल्याचं हॉटेलचे मालक सांगतात.
न थकता सतत काम करणारे हे रोबो एकाचवेळी दोन माणसांचं काम करत आहेत. रोबोंच्या या हॉटेलला सध्या गैयांगमध्ये चांगलीच पसंती मिळत आहे.
============================================
बेस्ट बसच्या तिकीट दरात कपात होण्याची शक्यता
मुंबई : मुंबईतील बेस्ट बस प्रवासाच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे. यानुसार बेस्टचं किमान भाडं एका रुपयानं कमी होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांत प्रवाशांची रोडावलेली संख्या आणि त्यामुळे घसरत चाललेलं उत्पन्न यावर उपाय काढण्यासाठी बेस्ट प्रशासन भाडेसूत्रात बदल करण्याच्या विचारात आहे. हे भाडं कमी झाल्यास रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करणारे प्रवासी बेस्टकडे वळतील असा विश्वास प्रशासनाला वाटतो.
विशेष म्हणजे बदललेल्या भाडेसूत्रानुसार वातानुकूलित बसचे दरही कमी होतील. सध्या बेस्टच्या प्रवासी संख्येत कमालीची घट झाली असून ती 28 लाखांवर आली आहे. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी बेस्ट प्रशासन अनेक मार्ग अवलंबताना दिसत आहे.
============================================
पाच लाखात घर देणा-या मॅपलच्या कार्यालयाची मनसेकडून तोडफोड
- ऑनलाइन लोकमतपुणे, दि. १९ - पुण्यात पाच लाखात घर देण्याचा दावा करणा-या मॅपल बिल्डर्सच्या कार्यालयात घुसून मंगळवारी मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. शिवाजीनगर येथील मॅपल बिल्डर्सच्या कार्यालयाबाहेर मनसैनिकांनी आंदोलन केले. या आंदोलनानंतर घरासाठींचे बुकिंग थांबवण्यात आले आहे.पंतप्रधान आवास योजनेतंर्गत पाच लाखात घर देण्याची जाहीरात मॅपल ग्रुपने केली होती. या जाहीरातील पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रे वापरण्यात आली होती. या छायाचित्रांवरुन सरकारी योजना असल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर मुंबईतील भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी रीतसर तक्रार दाखल केली.सरकारनेही आपला या योजनेशी कोणताही संबंध नसल्याचा खुलासा केला. त्यानंतर या कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले. पण अद्यापही या कपंनीच्या कार्यालयाबाहेर रांगा लागल्या आहेत. त्यामुळे या कंपनीवर कोणतीही कारवाई झालेली नाही.
============================================
‘हैदरखान’ बनली लातूरकरांची जीवनदायिनी
- - शरद जाधव, सांगलीमिरजेतील रेल्वे स्थानकाला सव्वाशे वर्षांहून अधिक काळ पाणीपुरवठा करणाऱ्या ४३३ वर्षांच्या हैदरखान विहिरीने ऐतिहासिक वारशाची परंपरा आजही जपली आहे. लातूरला रेल्वेने पाणी पुरविण्याची योजना प्रत्यक्षात उतरल्यानंतर तर या विहिरीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. या विहिरीमुळेच टँकरने पाणी पाठवण्यात सुलभता आली आहे. झाडाझुडपात हरवलेल्या या विहिरीची स्वच्छता पूर्ण झाल्याने सोमवारी तिचे भव्य रूप पाहायला मिळाले.पाणीटंचाईने व्याकूळ झालेल्या लातूर शहराची तहान भागविण्याचे औदार्य सांगली-मिरजकरांनी दाखविले आणि राज्यभरातून या दातृत्वाचे कौतुक होऊ लागले. लातूरला दिवसाआड २५ लाख लिटर पाणी पुरविण्याची क्षमता असलेला प्रकल्पही आता अंतिम टप्प्यात आला आहे. या भागातील नैसर्गिक बाबींमुळे लातूरला पाणी देण्याचा मार्ग मोकळा झाला. यात सर्वाधिक महत्त्वाची भूमिका सध्या बजावत आहे, ती हैदरखान विहीर. याच विहिरीतून वाघिणींमध्ये पाणी भरण्यासाठी जात असल्याने तिचे महत्त्व दिसून येते.ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मिरजेत आदिलशहाचा सरदार हैदरखान याने १५८३ ला ही विहीर बांधली. त्यावेळी तिच्या पाण्याचा वापर प्रामुख्याने शेतीसाठी होऊ लागला. याचदरम्यान या विहिरीतून मिरजेतील प्रसिध्द दर्गा परिसरात असलेल्या कारंजासाठी पाणी पुरविण्यात येत असल्याच्या ऐतिहासिक नोंदी सापडतात. कारंजापर्यंत पाणी नेण्यासाठी दगडी नळांचा वापर करण्यात येत असे. या विहिरीला हत्तीची मोट होती. आदिलशाहीच्या काळातील वास्तुकलेचा आदर्श नमुना म्हणूनही या विहिरीकडे पाहिले जाते. कालांतराने ही विहीर मिरज संस्थानच्या ताब्यात गेली. मिरजेत रेल्वे स्थानकाची उभारणी झाल्यानंतर १८८७ मध्ये ही विहीर रेल्वेने ताब्यात घेतली. कारण ती रेल्वेस्थानक परिसरातच आहे. तेव्हापासून मिरजेतून देशभर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये या विहिरीचेच पाणी भरले जाऊ लागले.
============================================
देशभरातल्या धरणांमधली पाण्याची पातळी 23 टक्क्यांवर
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १९- देशातल्या धरणांमध्ये 13 एप्रिलपर्यंत फक्त 35.839 बिलियन क्युबिक मीटर पाणी शिल्लक असल्याची माहिती केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. या धरणांची पाणी साठवण क्षमता जवळपास 157.799 बिलियन क्युबिक मीटर इतकी आहे. जवळपास 91 मोठ्या प्रकल्पांत क्षमतेपेक्षा 23 टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती जलसंधारण मंत्रालयानं दिली आहे.गेल्यावर्षी याच काळात या धरणांमध्ये 33 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. जवळपास 10 वर्षांत पहिल्यांदाच पाण्याची पातळी एवढी खालावल्याचं समोर आलं आहे. हिमाचल प्रदेश, तेलंगणा, पंजाब, वेस्ट बंगाल, ओडिशा, राजस्थान, झारखंड, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ या राज्यांमधल्या धरणांमधली पाणीपातळी कमालीची खालावली आहे. तर आंध्र प्रदेश आणि त्रिपुरा या दोन राज्यांतल्या धरणांमध्ये फक्त पाण्याची पातळी समाधानकारक आहे.
============================================
सांगलीच्या शिल्पकाराचे शिल्प ‘युनो’मध्ये विराजमान
- सांगली : सांगली जिल्ह्यातील कडेगावचे शिल्पकार चंद्रजित यादव यांनी तयार केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे लवकरच अमेरिकेतील संयुक्त राष्ट्रसंघात (युनो) अनावरण होणार आहे. दि. १४ एप्रिलला डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीवेळी याच शिल्पाची युनोच्या मुख्यालयात मिरवणूकही काढण्यात आली. केवळ बारा दिवसात तयार केलेल्या या सुंदर शिल्पामुळे यादव यांच्या कलेची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती जगभर साजरी करण्यात आली. १७० देशांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या युनोमध्येही त्यांना अभिवादन करण्यात आले. मात्र याच युनोमध्ये अनावरण होत असलेले आणि जयंतीदिनी तिथे मिरवणूक काढण्यात आलेले डॉ. आंबेडकरांचे शिल्प मूळच्या कडेगावच्या, पण सध्या मुंबईत वास्तव्यास असलेल्या चंद्रजित यादव यांनी बनविलेले आहे, याची कल्पना कोणालाच नव्हती!यादव येथील कलाविश्व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी. ते महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष असून, त्यांनी केवळ बारा दिवसात हे शिल्प तयार केले आहे. १७० देश सदस्य असलेल्या युनोमध्ये अजूनही भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व नाही. मात्र तेथील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी युनोमध्ये डॉ. आंबेडकरांची जयंती साजरी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेल्या आंबेडकरांचे शिल्प युनोमध्ये असावे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. त्यास परवानगी मिळाल्यानंतर हा पुतळा देण्याची जबाबदारी मुंबईतील कल्पना सरोज फाऊंडेशनने उचलली होती.हे शिल्प तयार करण्यासाठी चंद्रजित यादव यांचे नाव माजी आयुक्त आर. डी. शिंदे यांनी या फाऊंडेशनला सुचविले. या प्रस्तावानुसार अर्धपुतळा तयार करण्यासाठी केवळ बारा ते तेरा दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र, इतक्या कमी वेळात यादव यांनी अत्यंत सुबक आणि आकर्षक पुतळा तयार केला आहे. विटा येथील व औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळाही यादव यांनीच तयार केला आहे. आता कोकणातील लोणेरे तंत्रशिक्षण विद्यापीठासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा १४ फुटी पुतळा तयार करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले
============================================
ब्रिटनच्या ११६ वर्षांतल्या स्टील उत्पादनापेक्षा चीनची दोन वर्षातली निर्मिती जास्त
- ऑनलाइन लोकमतलंडन, दि. १९ - आज जागतिक स्टील उद्योगात निर्माण झालेल्या मंदीसाठी मोठया प्रमाणात चीन जबाबदार आहे. चीनच्या वेगवान स्टील उत्पादनामुळे आज जागतिक स्टील उद्योगाला अस्थिरतेचा सामना करावा लागत आहे. जागतिक बाजारात स्वस्तात उपलब्ध होणा-या चीनच्या स्टीलमुळे आज टाटा स्टीलला ब्रिटनमधला आपल्या उद्योग बंद करण्यावाचून पर्याय राहीलेला नाही. चीनच्या प्रचंड व स्वस्त उत्पादन क्षमतेचा फटका इंग्लंडमधल्या स्टील उद्योगास बसल्याचे स्पष्ट दिसत आहे.टाटा स्टील ब्रिटनमधील सर्वात मोठी पोलाद उत्पादन कंपनी आहे. ब्रिटनने १९०० सालापासून आतापर्यंत ११६ वर्षात जेवढया स्टीलचे उत्पादन केले चीनने तितकेच स्टीलचे उत्पादन फक्त दोन वर्षात केले. बाजारात उत्पादन आणि मागणीचे गणित बिघडले तर, एकतर महागाई वाढते किंवा उत्पादनची किंमत घसरते. स्टीलच्या बाबततही तेच झाले आहे. चीनच्या स्टीलमुळे बाजारात स्टीलच्या किंमती पडल्या त्याचा फटका टाटा स्टीललाच नव्हे तर, अनेक स्टील कंपन्यांना सोसावा लागत आहे.सर्वत्रच वाईट स्थिती आहे असे नाही जगातील काही भागात अजूनही स्टील एक चांगला व्यवसाय आहे. चीनमध्ये जितक्या स्टीलचे उत्पादन होते त्यातील फक्त १२ टक्के स्टील चीन निर्यात करते. ब्राझील २४ टक्के तर, रशिया २९ टक्के स्टीलची निर्यात करतो. आगामी काळात मध्य पूर्वेत स्टील उत्पादन ५० टक्के, आफ्रिकेत २० टक्के आणि लॅटिन अमेरिकेत दहा टक्क्यांनी वाढणार आहे.
============================================
पाकिस्तानमधले हिंदू भारतीय - पाकिस्तानी शालेय पुस्तकांची शिकवण
- ऑनलाइन लोकमतइस्लामाबाद, दि. 19 - पाकिस्तानमधील हिंदू हे बाहेरचे आहेत, मुस्लीम धर्म, संस्कृती व समाजव्यवस्था इतकी वेगळी आहे की हिंदूंबरोबर सहचर्यानं राहणं अशक्य आहे, अशाप्रकारची गरळ पाकिस्तानमधल्या शालेय पुस्तकांमध्ये ओकण्यात आल्याचं समोर आले आहे. युएस कमिशन ऑन इंटरनॅशनल रीलिजिअस फ्रीडम या संस्थेने या अभ्यास केला आहे. पाकिस्तानमधली पुढची पिढी असं शिक्षण घेतल्यानंतर हिंदू बहुसंख्य असलेल्या भारताबरोबर शांततेनं राहूच शकत नाही असा निष्कर्ष या संस्थेने काढला आहे.पाकिस्तानमधल्या 4.1 कोटी विद्यार्थ्यांच्या मनावर भारत व हिंदूविरोधी संस्कार पद्धतशीरपणे करण्यात येत असून पाकिस्तानातल्या अल्पसंख्याकांबाबत चुकीची माहिती प्रसृत केली जात असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.केवळ भारतातल्या हिंदूंबाबतच नाही तर पाकिस्तानातल्या हिंदूंनाही बाहेरचे ठरवणारे हे शिक्षण असल्यामुळे पुढच्या पिढ्या हिंदूंसोबत शांततेनं जगूच शकणार नाहीत अशी भीती व्यक्त होत आहे.पाकिस्तानची ओळख मुस्लीम देश अशी करून देताना पाकिस्तानचं भारताशी शत्रुत्व धर्मावरून असल्याचं मुलांच्या मनावर बिंबवलं जात आहे.भारतामधल्या हिंदू संघटना मुस्लीमांचं शिरकाण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यात येत आहे. बाबरी मशिदीचं पतन आणि गुजरातमधल्या दंगलींचा यासाठी शालेय शिक्षणामध्ये दाखला देण्यात येत आहे.पाकिस्तानमधल्या विद्यार्थ्यांना सर्व धर्मांबाबत आदराची भावना शिकवण्याची गरज असल्याचे मत या संस्थेने व्यक्त केले असून, अन्यथा येत्या काळामध्ये भारताबरोबर शांतीपूर्ण संबंध राहणे शक्य नसल्याची भीती व्यक्त केली आहे.
============================================
भारताला एक डोळ्याचा राजा संबोधणे चुकीचे
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारतासंबंधी केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राजन यांनी वॉशिंग्टनमधील एका मुलाखतीत भारताला ‘अंधांच्या राज्यातील एक डोळ्याचा राजा‘ असे संबोधले होते. परंतु भारताचे वर्णन करताना राजन यांनी चुकीचे शब्द निवडले असे मत सीतारामन यांनी व्यक्त केले.

"राजन यांची शब्दांची निवड मला पटलेली नाही. मला वाटते आताच्या सरकारने केलेल्या उपाययोजनांचा परिणाम दिसून येत आहे. एफडीआयमध्ये होत असलेली वाढ ही उत्पादन क्षेत्रात होत असलेल्या सुधारणेचे हे थेट निदर्शक आहे. महागाई, चालू खात्यातील तूटदेखील नियंत्रणात आहे", असे सीतारामन पत्रकार परिषदेत म्हणाल्या.
वॉलस्ट्रीट डिजिटल नेटवर्कच्या डाऊ जोन्सने प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या ‘मार्केटवॉच‘ वेबसाईटसाठी मुलाखात देताना राजन बोलत होते. "मला वाटते भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती अजून तितकीशी समाधानकारक नाही. "अंधांच्या राज्यात एक डोळ्याचा राजा" अशी आमच्याकडे म्हण आहे. सध्या भारताची अशीच काहीशी परिस्थिती आहे," असे राजन म्हणाले होते.

नेदरलॅंड:पेट्रोल, डिझेलच्या वाहनांवर बंदीची शक्यता
ऍमस्टरडॅम (नेदरलॅंड) - अपारंपरिक ऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्यावर भर देण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून नेदरलॅंडमध्ये लवकरच पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या विक्रीवर बंदी येण्याची शक्यता आहे.
2025 पर्यंत पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या विक्रीवर बंदी आणण्याचा प्रस्ताव लेबर पार्टीने सादर केला आहे. रस्त्यावर धावणारी वाहने ही केवळ इलेक्ट्रिक किंवा हायड्रोजनवर चालतील. तसेच एकदा का पेट्रोल, डिझेलच्या वाहनांवर बंदी घातली तर रस्त्यांचे आयुर्मान वाढेल आणि रस्त्यावर केवळ "ग्रीन कार्स‘ धावतील असे प्रस्तावात म्हटले आहे. पर्यावरणवाद्यांसह बहुतेक लोकप्रतिनिधींनी जरी या प्रस्तावाचे स्वागत केले असले तरीही मोटार उत्पादकांमध्ये नाराजी पसरली आहे. नेदरलॅंडमध्ये इलेक्ट्रिक किंवा हायब्रीड मोटारींची विक्री वाढत असल्याची माहिती एका संशोधनातून समोर आली आहे.

बालविवाहप्रकरणी कडक कारवाई करा: महिला आयोग
नवी दिल्ली - राजस्थानमध्ये सहा वर्षांच्या बालिकेच्या विवाहप्रकरणी राज्य सरकारने दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी केली आहे.
राजस्थानमधील चित्तोरगढ येथे सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाहाची घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर मालिवाल बोलत होत्या. त्या म्हणाल्या, "एका बाजूला आपण महिला सक्षमीकरणासंदर्भात बोलत असताना दुसरीकडे अशाप्रकारची घटना समोर येणे केवळ राजस्थानसाठीच नव्हे संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी बाब आहे. राज्य सरकारने या प्रकाराची दखल घेऊन तातडीने तपास करावा. तसेच दोषींवर कारवाई करून यापुढे कोणत्याही पालकांना असा भयानक प्रकार करण्याआधी दहा वेळा विचार करावा लागेल असे उदाहरण दाखवून द्यावे.‘
‘बालविवाह प्रतिबंध कायदा 2006‘ नुसार भारतामध्ये बालविवाहांवर बंदी आहे. युनीसेफ एका अहवालानुसार बालविवाहांच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो.
बालविवाहप्रकरणी कडक कारवाई करा: महिला आयोग
राजस्थानमधील चित्तोरगढ येथे सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाहाची घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर मालिवाल बोलत होत्या. त्या म्हणाल्या, "एका बाजूला आपण महिला सक्षमीकरणासंदर्भात बोलत असताना दुसरीकडे अशाप्रकारची घटना समोर येणे केवळ राजस्थानसाठीच नव्हे संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी बाब आहे. राज्य सरकारने या प्रकाराची दखल घेऊन तातडीने तपास करावा. तसेच दोषींवर कारवाई करून यापुढे कोणत्याही पालकांना असा भयानक प्रकार करण्याआधी दहा वेळा विचार करावा लागेल असे उदाहरण दाखवून द्यावे.‘
‘बालविवाह प्रतिबंध कायदा 2006‘ नुसार भारतामध्ये बालविवाहांवर बंदी आहे. युनीसेफ एका अहवालानुसार बालविवाहांच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो.
============================================
जम्मू-काश्मीरः तब्बल बावीस वर्षांनी बंकर हटविला
श्रीनगर- गेल्या बावीस वर्षांपासून हंडवाडा चौकात असलेले बंकर आज (मंगळवार) हटविण्यात आले. गेल्या आठवड्यात झालेल्या या संघर्षामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर हे बंकर हटविण्यासाठी स्थानिकांनी आंदोलन केले होते.
आंदोलनामुळे प्रशासनाला येथे संचारबंदीही लागू करावी लागली होती. आज परिस्थिती पूर्वपदावर आल्याने संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. लष्कराने हे बंकर रिकामे केल्यानंतर स्थानिक प्रशासनाने ते तोडून टाकले. हे बंकर तोडले जात असताना स्थानिकांनी मोठा जल्लोष केला.

लग्न समारंभातील गोळीबारावर शिक्षाच उपाय
नवी दिल्ली - लग्नसमारंभातील गोळीबारादरम्यान किशोरवयीन मुलीच्या मृत्युच्या पार्श्वभूमीवर अशा गोळीबारावर कठोर शिक्षा हाच उपाय असल्याच्या प्रतिक्रिया माजी पोलिस अधिकारी तथा भारतीय जनता पक्षाच्या नेत्या किरण बेदी यांनी व्यक्त केल्या आहेत.
राजधानी दिल्लीत रविवारी एका लग्न समारंभादरम्यान एक किशोरवयीन मुलगी गंभीर जखमी झाली. दरम्यान आज तिचा मृत्यु झाला. या पार्श्वभूमीवर बोलताना बेदी म्हणाल्या, "काही भागातील लग्नसमारंभात गोळीबार करण्याची असलेली पद्धत बरोबर नाही. पुन्हा पुन्हा अशा घटना घडणे म्हणजे जागरूकतेचा अभाव आहे. कायदा शिक्षा करत नसल्याने तरुणांमध्ये कायदा न पाळण्याची संस्कृती रूजत आहे. ती चिंताजनक आहे. अशा प्रकरणांमध्ये केवळ अटक करणे हा पर्याय नसून संबंधित आरोपीला तुरुंगात पाठवावे. तसेच त्यांच्याकडून पीडितांना किंवा पीडितांच्या नातेवाईकांनी योग्य ती नुकसान भरपाई देण्यास सांगावे. अटक, तपास आणि दंडापलिकडे कठोर शिक्षेची तरतूद असावी.‘

जम्मू-काश्मीर म्हणजे 'छोटा भारत'- नरेंद्र मोदी
श्रीनगर- जम्मू-काश्मीर म्हणजे छोटा भारत आहे. भारताने विकासाची नवीन पातळी पार केली आहे. भारतातील 80 कोटी युवक देशाला उच्च पातळीवर नेऊन ठेवतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरमधील कात्रा गावाजवळ 300 कोटी रुपये खर्च करून श्री माता वैष्णोदेवी देवस्थानने रुग्णालय उभारले आहे. रुग्णालयाच्या उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आले. शिवाय, श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, ‘जम्मू-काश्मीरमध्ये युवकांची मोठी संख्या आहे. जम्मू-काश्मीर म्हणजे छोटा भारत आहे. युवकांच्या हातात मोठी शक्ती आहे. 21वे शतक हे माहिती-तंत्रज्ञानाचे आहे. कोणीतरी होण्यासाठी काहीतरी स्वप्न पहावे लागते. त्यामुळे युवकांनी काहीतरी होण्यासाठी स्वप्ने पाहिली पाहिजेत.‘
जम्मू-काश्मीर म्हणजे 'छोटा भारत'- नरेंद्र मोदी
जम्मू-काश्मीरमधील कात्रा गावाजवळ 300 कोटी रुपये खर्च करून श्री माता वैष्णोदेवी देवस्थानने रुग्णालय उभारले आहे. रुग्णालयाच्या उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आले. शिवाय, श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, ‘जम्मू-काश्मीरमध्ये युवकांची मोठी संख्या आहे. जम्मू-काश्मीर म्हणजे छोटा भारत आहे. युवकांच्या हातात मोठी शक्ती आहे. 21वे शतक हे माहिती-तंत्रज्ञानाचे आहे. कोणीतरी होण्यासाठी काहीतरी स्वप्न पहावे लागते. त्यामुळे युवकांनी काहीतरी होण्यासाठी स्वप्ने पाहिली पाहिजेत.‘
============================================
लग्न समारंभातील गोळीबारादरम्यान मुलीचा मृत्यु
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत रविवारी एका लग्न समारंभादरम्यान करण्यात आलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या किशोरवयीन मुलीचा आज (मंगळवार) मृत्यू झाला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाच्या लग्नाच्या वरातीत गोळीबार करण्यात आल्याच्या घटना ताजी असतानाचा हा प्रकार समोर आला आहे. दिल्लीतील मोंगोलपुरी परिसरात रविवारी एका लग्न समारंभाची वरात निघाली होती. वरातीच्या मार्गावरील एका इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरून राहणारी अंजली नावाची बाराव्या इयत्तेतील विद्यार्थीनी आपल्या घरातील गॅलरीतून ही वरात पाहात होती. दरम्यान वरातीमध्ये करण्यात येत असलेला गोळीबारातील गोळी अंजलीला लागली. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज (मंगळवारी) सकाळी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून लग्नातील वराच्या एका भावाची ओळख पटली आहे.
जडेजाच्या वरातीतील गोळीबार प्रकरणावरून गुजरातच्या पोलिस महासंचालक ‘मी उत्तर प्रदेशचा आहे. तिथे तर प्रत्येक लग्न समारंभात बंदुकीच्या 100-200 फैरी झाडल्या जातातच‘ असे वक्तव्य केले आहे.

महिलांनो, परकीयांच्या प्रेमापासून सावधान!: चीन
बीजिंग - परकीय नागरिक असलेल्या पुरुषांच्या प्रेमापासून सावध राहण्याचा सल्ला चीनमधील सरकारी विभागांमध्ये कार्यरत असलेल्या महिलांना येथे नुकत्याच साजऱ्या करण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा शिक्षण दिवसाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आला आहे.
चीनी महिलांबरोबरील प्रेमकरण हा देशाची गुप्त माहिती मिळविण्याच्या कटाचा भाग असू शकतो, असा इशारा या ‘डेंजरस लव्ह‘ मोहिमेमधून देण्यात आला आहे. येथील सरकारने या पार्श्वभूमीवर एक ‘प्रतीकात्मक कथा‘ सांगणारे पोस्टर प्रकाशित केले असून त्यामध्ये सरकारी विभागांत कार्यरत असलेल्या चीनी महिलांना इशारा देण्यात आला आहे.
महिलांनो, परकीयांच्या प्रेमापासून सावधान!: चीन
चीनी महिलांबरोबरील प्रेमकरण हा देशाची गुप्त माहिती मिळविण्याच्या कटाचा भाग असू शकतो, असा इशारा या ‘डेंजरस लव्ह‘ मोहिमेमधून देण्यात आला आहे. येथील सरकारने या पार्श्वभूमीवर एक ‘प्रतीकात्मक कथा‘ सांगणारे पोस्टर प्रकाशित केले असून त्यामध्ये सरकारी विभागांत कार्यरत असलेल्या चीनी महिलांना इशारा देण्यात आला आहे.
============================================
मोतेवारांच्या मालमत्तेचा पंचनाम्याचे काम सुरू
पुणे- "समृद्ध जीवन‘चे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांच्या मालमत्तेचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. ही माहिती एकत्रित करून त्याबाबतचा विस्तृत अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येईल, अशी माहिती राज्य गुन्हे अन्वेषणच्या (सीआयडी) आर्थिक गुन्हे शाखेचे अधीक्षक एम.बी. तांबडे यांनी आज (मंगळवार) दिली.
मोतेवार सध्या ओडिशा येथील कटकमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. "समृद्ध जीवन‘च्या सातारा रस्त्यावरील एका इमारतीला सहा महिन्यांपूर्वी सील केले होते. परंतु, त्यानंतर कोणतीही मालमत्ता सील केलेली नाही. गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्याच्या उद्देशाने मोतेवार यांच्या मालमत्तेची माहिती घेतली जात आहे. राज्यातील पाच ठिकाणांच्या मालमत्तेचा पंचनामा करण्यात येत आहे. "समृद्ध जीवन‘च्या फर्ग्युसन रस्त्यावरील कार्यालयातील संगणकाच्या हार्ड डिस्क जप्त केल्या आहेत. त्यांच्या मालमत्तेची माहिती एकत्रित करून राज्य ठेवीदार संरक्षण (एमपीआयडी) कायद्यानुसार सक्षम प्राधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देण्यात येईल, असे तांबडे यांनी स्पष्ट केले.
मोतेवारांच्या मालमत्तेचा पंचनाम्याचे काम सुरू
मोतेवार सध्या ओडिशा येथील कटकमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. "समृद्ध जीवन‘च्या सातारा रस्त्यावरील एका इमारतीला सहा महिन्यांपूर्वी सील केले होते. परंतु, त्यानंतर कोणतीही मालमत्ता सील केलेली नाही. गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्याच्या उद्देशाने मोतेवार यांच्या मालमत्तेची माहिती घेतली जात आहे. राज्यातील पाच ठिकाणांच्या मालमत्तेचा पंचनामा करण्यात येत आहे. "समृद्ध जीवन‘च्या फर्ग्युसन रस्त्यावरील कार्यालयातील संगणकाच्या हार्ड डिस्क जप्त केल्या आहेत. त्यांच्या मालमत्तेची माहिती एकत्रित करून राज्य ठेवीदार संरक्षण (एमपीआयडी) कायद्यानुसार सक्षम प्राधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देण्यात येईल, असे तांबडे यांनी स्पष्ट केले.
============================================
भारत-पाक चर्चेत भारताकडूनच अडथळा- पाक
लंडन - पाकिस्तानने पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान दरम्यानच्या शांतता प्रक्रियेत भारतच अडथळा आणत असल्याचा आरोप केला आहे. परराष्ट्र व्यवहारासंदर्भातील पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अझीझ यांनी एका कार्यक्रमात बोलताना भारतावर आरोप केले आहेत.
ब्रिटिशमधील अभ्यासक आणि पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाने सोमवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अझीझ बोलत होते. ते म्हणाले, ‘भौगोलिक-राजकीय विकासासाठी पाकिस्तान सध्या संघर्ष करत आहे आणि भारताचा पाकिस्तानकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक नाही. त्यामुळेच भारत-पाक सीमेवर शांतता प्रस्थापित होत नाही. पाकिस्तानचे अफगाणिस्तान आणि भारतासोबतचे संबंध अतिशय गुंतागुंतीचे आहेत. पाकिस्तानच्या पुरेश्या प्रयत्नांनंतरही हे संबंध सामान्य होऊ शकत नाहीत. आम्हाला भारताशी चर्चा करायची आहे.‘
अलिकडेच संयुक्त राष्ट्रसंघातील (यूएन) पाकिस्तानच्या कायमस्वरूपी प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी पाकिस्तानबरोबरची चर्चेची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याबाबत भारतातर्फे चाल-ढकल केली जात असल्याचा आरोप केला होता. तसेच भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानच्या संबंधांच्या दृष्टिकोनातून चांगली सुरूवात झाली होती. मात्र, असे असतानाही अतिशय तकलादू कारणे देत भारताने द्विपक्षीय चर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेतला, असा आरोपही लोधी यांनी केला होता.

जादा शुल्काबद्दल ओला, उबेरच्या 18 गाड्या जप्त
जादा शुल्काबद्दल ओला, उबेरच्या 18 गाड्या जप्त
नवी दिल्ली : टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या प्रमुख कंपन्या ओला व उबेर यांच्या अठरा टॅक्सी दिल्ली सरकारने जप्त केल्या आहेत. सम-विषम वाहतूक योजना लागू असताना ग्राहकांकडून प्रवासाचे अतिरिक्त शुल्क आकारल्यामुळे सरकारने ही जप्ती आणली आहे.
दिल्लीमध्ये सध्या 15 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान दुसऱ्या टप्प्यात सम-विषम वाहतूक योजना राबविण्यात येत आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी दिल्लीतील आप सरकार प्रयत्नशील आहे. भाजपचे खासदार विजय गोयल यांनी काल सम-विषम वाहतुकीचा नियम मोडल्याबद्दल त्यांची गाडी अडवून दिल्ली पोलिसांनी त्यांना गुलाबाचे फुल देऊन त्यांना नियम पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता जादा शुल्क आकारल्याबद्दल टॅक्सी सेवा देणाऱ्या या दोन प्रमुख कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
"अतिरिक्त शुल्क आकारणीसंदर्भात ग्राहकांकडून वारंवार आलेल्या तक्रारींमुळे आम्ही या कंपन्यांच्या टॅक्सी जप्त केल्या आहेत. त्यापैकी बहुतांश टॅक्सी या उबेरच्या आहेत," अशी माहिती दिल्ली येथील सरकारी अधिकाऱ्याने दिली.
दोन्ही टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांनी ‘सर्ज प्राइसिंग‘ बंद केले. याअंतर्गत ग्राहकांकडून मागणी कमी असेल अशा वेळी देखील टॅक्सी सेवा देण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत होते.
============================================
गुलाम अली यांचा गुजरातमधील कार्यक्रम रद्द
अहमदाबाद - पाकिस्तानचे ख्यातनाम गझल गायक गुलाम अली यांचा गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील नियोजित कार्यक्रम "काही अपरिहार्य कारणांमुळे‘ रद्द झाल्याची घोषणा आज (मंगळवार) करण्यात आली.
सुप्रसिद्ध धार्मिक व्यक्तिमत्त्व असलेल्या मोरारजी बापु यांच्या नेतृत्वाखालील एका संस्थेने भावनगर जिल्ह्यामधील एका गावामध्ये "अस्मिता पर्व‘ या चार दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. "अस्मिता पर्व‘मध्ये गुलाम अली यांच्या गायनाचा कार्यक्रम आज होणार होता. परंतु, "काही अपरिहार्य कारणांमुळे या कार्यक्रमास उपस्थित राहु शकत नसल्याचे त्यांनी कळविल्याची,‘ माहिती आयोजकांनी आज दिली.
या कार्यक्रमाच्या जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार, अली यांना कार्यक्रमाच्या अखेरच्या दिवशी "हनुमंत पुरस्कारा‘नेही गौरविण्यात येणार होते. परंतु, ते अखेरच्या दिवशीही उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.
गुलाम अली यांचा गुजरातमधील कार्यक्रम रद्द
सुप्रसिद्ध धार्मिक व्यक्तिमत्त्व असलेल्या मोरारजी बापु यांच्या नेतृत्वाखालील एका संस्थेने भावनगर जिल्ह्यामधील एका गावामध्ये "अस्मिता पर्व‘ या चार दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. "अस्मिता पर्व‘मध्ये गुलाम अली यांच्या गायनाचा कार्यक्रम आज होणार होता. परंतु, "काही अपरिहार्य कारणांमुळे या कार्यक्रमास उपस्थित राहु शकत नसल्याचे त्यांनी कळविल्याची,‘ माहिती आयोजकांनी आज दिली.
या कार्यक्रमाच्या जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार, अली यांना कार्यक्रमाच्या अखेरच्या दिवशी "हनुमंत पुरस्कारा‘नेही गौरविण्यात येणार होते. परंतु, ते अखेरच्या दिवशीही उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.
============================================
किरपाल सिंग यांचा मृतदेह भारताच्या ताब्यात
अमृतसर- पाकिस्तानमधील कोट लखपत कारागृहात रहस्यमयरीत्या मरण पावलेल्या किरपाल सिंग यांचा मृतदेह पाकिस्तानने आज (मंगळवार) भारताच्या ताब्यात दिला.
लाहोर येथील जिन्ना रुग्णालयातून शवविच्छेदन केल्यानंतर किरपाल यांचा मृतदेह वाघा सीमेवरून आज भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पाकिस्तानमधील कोट लखपत कारागृहात गेल्या 24 वर्षांपासून शिक्षा भोगत असलेले किरपाल सिंग यांचा मृत्यू 11 एप्रिल रोजी झाला होता. हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याचे पाकिस्तानने कळविले होते.
दरम्यान, वाघा सीमेवरून पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केल्याबद्दल किरपाल सिंह (वय 50) यांना 1992 मध्ये अटक करण्यात आली होती. हेरगिरीच्या आरोपासह पंजाब प्रांतात झालेल्या बॉंबस्फोटाचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. भारतातील गुरुदासपूर येथील रहिवासी असलेले किरपाल यांनी डोके दुखत असल्याची तक्रार केली होती. परंतु, काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. लाहोर उच्च न्यायालयाने दोन्ही आरोपांमधून किरपाल यांची मुक्तता केली होती. मात्र, कारागृहातून त्यांची सुटका करण्यात आलेली नव्हती. आर्थिक परिस्थितीमुळे आवाज उठवू शकलो नाही. मदतीसाठी कोणताही नेता पुढे आला नाही, असा आरोप किरपाल यांच्या कुटुंबीयांनी केला होता.

No comments:
Post a Comment