Saturday, 16 April 2016

नमस्कार लाईव्ह १६-०४-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- टोकियो; आश्चर्याने डोळे विस्फारायला लावणारा हा व्हिडीओ 
२- जपान; भूकंपाच्या धक्‍क्‍याने जपान हादरले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- ...प्रियांका गांधीना 53 हजार भाडं परवडत नाही 
४- मुलायमसिंगांमुळे सोनियांचे "पीएम'पद दूर- स्वामी 
५- सिगारेटचे उत्पादन पुन्हा सुरू होणार 
६- औरंगाबाद; तुमची राष्ट्रभक्‍ती तुम्हाला लखलाभ- सबनीस 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
७- मुख्यमंत्र्यांनी 'भारत माता की जय' बोलण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवावे: अजित पवार 
८- .... अन्यथा दारु कंपन्यांच्या पाईपलाईन फोडून टाकू : अब्दुल सत्तार 
९- व्हायरस : फेसबुक मेसेजमधील अश्लिल व्हिडिओ उघडू नका, अन्यथा...
१०- हिंदूंनाच भगव्याखाली उभे राहावे लागेल - शिवसेना 
११- लॅपटॉप अवघ्या 10,999 रुपयात 
१२- तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे रखडली, कर्जत-कसारा मार्ग ठप्प 
१३- मनसेचा ‘आवाज’ गेला मर्यादेबाहेर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- हैद्राबाद; उन्हाचा कहर, रस्त्यावर फोडलेल्या अंड्याचं ऑम्लेट बनलं 
१५- अमरावतीत फोडाफोडी, पोटे-रवी राणा वाद टोकाला; भाजपचं कार्यालय फोडलं 
१६- नालासोपाऱ्यात क्षुल्लक कारणावरुन पत्नीची हत्या, पती अटकेत 
१७- रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला भरधाव बसनं चिरडलं 
१८- जळगाव; दारु कंपन्याना होणाऱ्या पाणीपुरवठ्याची चौकशी करा - गिरीश महाजन 
१९- पुणे; पुण्याच्या बालगंधर्व कलादालनात केकच केक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- IPL: झहीरच्या दिल्लीने खातं उघडलं, पंजाबवर मात 
२१- धोनी आणि आम्रपाली ग्रुपचं ब्रेकअप 
२२- प्रख्यात अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल 
२३- धोनी आणि आम्रपाली ग्रुपची पार्टनरशिप संपुष्टात 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२४- नवल पोकर्णा यांना पोलीस भरतीत लाखोंची रक्कम घेतल्याच्या आरोपावरू अटक 
२५- विश्नुपुरीत अवघा ५.३८ दलघमी पाणीसाठा; आसनाच्या पर्यायी पाणी पुरवठ्यामुळे चिंता नाही 
२६- ४३ दिवसांच्य बंदनंतर सराफा दुकानामध्ये गर्दी 
२७- ग्रामपंचायतीसाठी किनवट तालुक्यात दि. १७ रोजी मतदान 
२८- मारतळा; गळफास घेऊन शेतकर्याची आत्महत्या 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[आजचे वाढदिवस]
मधुकर जाधव, हाजी शेख, शेख अझीम, रवींद्र गायकवाड, संतोष सावंत, अरुणकुमार कबर, 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
या जगात मानाने जगायचे असेल तर लोकांपुढे वारंवार हात जोडू नका. मेहनत व परिश्रम करायला शिका. यश सदैव दुमच्या बरोबर राहील व लोक कायम यशस्वी लोकांच्या 

बरोबर असतात
(ओम आढाव, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 

=============================================

...प्रियांका गांधीना 53 हजार भाडं परवडत नाही

...प्रियांका गांधीना 53 हजार भाडं परवडत नाही!
नवी दिल्ली: आजपासून चौदा वर्षांपूर्वी म्हणजे 2002 साली काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका गांधी यांना 2765 स्क्वेअर मीटरच्या सरकारी बंगल्यासाठी फक्त रू. 53 हजार रूपये घरभाडे होतं, पण ते भरणं त्यांच्या क्षमतेपलिकडचं होतं, म्हणून तत्कालीन वाजपेयी सरकारने त्यांना घसघशीत सवलत देऊन ते चक्क रू. 8888 वर आणलं. 2765 स्क्वेअर मीटर म्हणजे मुंबईकरांना सवयीच्या असलेल्या फुटांच्या हिशेबात सुमारे तीस हजार स्क्वेअर फूट.

30 हजार स्क्वेअर फुटांच्या बंगल्यासाठी कमी झालेलं घरभाडं फक्त रू. 8888. ल्युटेन दिल्लीच्या  अतिसंरक्षित आणि व्हीआयपी समजल्या जाणाऱ्या परिसरातील अवाढव्य बंगल्यासाठी त्यावेळच्या सरकारी दराप्रमाणे निश्चित केलेलं घरभाडं रू. 53421 हे खूप जास्त आणि आपल्या आर्थिक कुवतीच्या बाहेरच्या असल्याचं सांगून प्रियांका गांधी यांनी कमी करून घेतलं होतं.

सध्या प्रियांका गांधी VI टाईपच्या 35, लोधी इस्टेट या सरकारी बंगल्यात राहतात. त्यासाठी त्यांना आता रू. 31300 घरभाडं भरावं लागतं. सरकारी धोरणांनुसार एसपीजी संरक्षण असल्यामुळे सरकारी बंगल्यात भाडे तत्वावर निवास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

7 मे 2002 रोजी प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रात असं नमूद केलं की रू. 53421 ही घरभाड्याची रक्कम त्यांच्यासाठी खूप मोठी आहे, एवढं प्रचंड भाडं भरणं त्यांना शक्य नाही. आपल्या पत्रात त्यांनी असंही नमूद केलं की त्या सरकारी बंगल्यात फक्त एसपीजीच्या विनंतीवरूनच राहिल्या आहेत. त्यांना देण्यात आलेल्या बंगल्यातील बराचसा भाग एसपीजी गार्डच वापरतात. त्यांचं कुटुंब या बंगल्याचा पूर्ण वापर करतच नाही असा युक्तीवादही त्यांनी केला.
=============================================

उन्हाचा कहर, रस्त्यावर फोडलेल्या अंड्याचं ऑम्लेट बनलं

उन्हाचा कहर, रस्त्यावर फोडलेल्या अंड्याचं ऑम्लेट बनलं !
हैदराबाद: तेलंगणा राज्यात उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे. उष्णतेची तीव्रता एवढी आहे की एखादं अंड फोडल्यावर त्याचं चक्क ऑम्लेट बनतंय.

तेलंगणातल्या करीमनगर भागात या महिलेनं आपल्या अंगणात फरशीवरच अंड फोडून टाकलं आणि काही वेळातच त्याचं ऑम्लेट तयार झालं.

गेले काही दिवस सतत 40 अंश सेल्सिअसच्या पुढे असलेल्या तापमानाच्या काट्यानं तेलंगणावासीय हैराण झाले आहेत. भाजणाऱ्या उन्हामुळे लोकं घराबाहेर जाणं टाळत आहेत.

दुसरीकडे उन्हापासून मेंढ्यांचं रक्षण करण्यासाठी त्यांना टोप्या घालण्यात आल्या आहेत.
=============================================

अमरावतीत फोडाफोडी, पोटे-रवी राणा वाद टोकाला; भाजपचं कार्यालय फोडलं

अमरावतीत फोडाफोडी, पोटे-रवी राणा वाद टोकाला; भाजपचं कार्यालय फोडलं
अमरावती: आमदार रवी राणा यांचं कार्यालय काल भाजप कार्यकर्त्यांनी फोडलं होतं, त्याचा बदला घेत मध्यरात्री आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाची तोडफोड केली आहे. राजापेठ परिसरातल्या भाजपच्या विभागीय कार्यालयावर रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल करत नासधूस केली आणि पोस्टरही फाडले.

रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कालच्या या तोडफोडीमुळे आज भाजपकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहावं लागेल. दरम्यान हा राडा होण्याआधी आमदार रवी राणा यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा. या मागणीसाठी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केलं.

दरम्यान याआधी रवी राणा यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. तोडफोड सुरु असताना पोलिस तिथे हजर असून कोणीही त्यांना जुमानलं नाही. पोलिसांसमोरच कार्यालयाच्या काचा फोडल्या आणि खुर्च्याही फेकल्या होत्या.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप, आमदार रवी राणा यांनी केला होता. अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटेंविरोधात केलेल्या विधानामुळे रवी राणांच्या ऑफिसची तोडफोड झाल्याचं म्हटलं जात आहे.
=============================================

मुख्यमंत्र्यांनी 'भारत माता की जय' बोलण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवावे: अजित पवार

मुख्यमंत्र्यांनी 'भारत माता की जय' बोलण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवावे: अजित पवार
पिंपरी-चिंचवड: देशासह राज्यातील जनतेचे मुलभूत प्रश्न सोडून नको त्या विषयांवर सरकार लक्ष केंद्रीत करत असल्याचं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते.

‘राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ‘भारत माता की जय’ म्हणत बसण्यापेक्षा इतर महत्वाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करावे.’ असा टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून अहिष्णूता, मनुचे विचार यांवरच बोलत आलं आहे. त्यामुळे राज्य सराकर मुख्य प्रश्नांना कधी सामोरं जाणार असा प्रश्न अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

या मुद्द्यासोबतच कन्हैय्यावर करण्यात आलेल्या चप्पल फेकप्रकरणीही अजित पवारांनी टीका केली. ‘कन्हैयाला त्याचा कार्यक्रम चालू असताना व्यासपीठावर चप्पल मारणे ही आपली सांस्कृती आहे का? तो ही भारताचा एक नागरिक आहे व त्याला बोलण्याचा अधिकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा अधिकार राज्य घटनेतच दिला आहे.’ असं पवार म्हणाले.
=============================================

प्रख्यात अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल

प्रख्यात अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल
मुंबई: प्रख्यात अभिनेते दिलीप कुमार यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

लीलावतीतल्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप कुमार आपल्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाले असून, त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु असल्याचं समजतं आहे. आणखी काही दिवस दिलीप कुमार यांना रुग्णालयातचं ठेवण्यात येईल असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.
=============================================

.... अन्यथा दारु कंपन्यांच्या पाईपलाईन फोडून टाकू : अब्दुल सत्तार

.... अन्यथा दारु कंपन्यांच्या पाईपलाईन फोडून टाकू : अब्दुल सत्तार
मुंबई : दारु कंपन्यांना देण्यात येणार पाणीबंदीबाबत येत्या 5 दिवसात निर्णय घ्या, अन्यथा ज्या दारु कंपन्यांना पाणी जातं, तिथल्या पाईप फोडून टाकू, असा थेट इशारा काँग्रेसने दिला आहे.

‘एबीपी माझा’च्या ‘माझा विशेष’ या कार्यक्रमांतर्गत “टंचाईमुळे दारु उद्योगांचं पाणी का थांबवू नये?” या विषयावर चर्चा सुरु होती. याबाबत बोलताना काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी सरकारला हा थेट इशारा दिला.

राज्यात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. लातुरसारख्या शहराला तर रेल्वेने पाणी पुरवण्यात येत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील दारु कंपन्यांना देण्यात येणारा पाणी पुरवठा रोखण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

हीच मागणी काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी ‘माझा विशेष’ कार्यक्रमात मांडली.

“दारु कंपन्यांना देण्यात येणारा पाणी पुरवठा थांबवला नाही, तर काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील. येत्या 5 दिवसाच्या आत सरकारने हा निर्णय घ्यावा. अन्यथा ज्या ज्या ठिकाणी पाणी जातं, त्या ठिकाणच्या पाईप फोडून टाकू, गुन्हे दाखल झाले तरी चालतील” असा इशारा काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी दिला.
=============================================

नालासोपाऱ्यात क्षुल्लक कारणावरुन पत्नीची हत्या, पती अटकेत

नालासोपाऱ्यात क्षुल्लक कारणावरुन पत्नीची हत्या, पती अटकेत
नालासोपारा: क्षुल्लक कारणावरुन नालासोपाऱ्यामध्ये पतीनं पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. चाळीतल्या कार्यक्रमाला गेल्याच्या कारणावरुन राजेंद्र सावंत यानं पत्नीवर घरातील चाकूनं सपासप वार केले. यामध्ये रंजना सावंत यांचा मृत्यू झाला.

चाळीत सांस्कृतिक कार्यक्रम चालू असल्याने, या उत्सवात रंजना सहभागी झाल्या होत्या. रात्री साडे नऊच्या सुमारास राजेंद्र कामावरुन घरी आल्यानंतर घरात कोणी नव्हते. घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले होते आणि त्याला झोपायचे होते. त्यामुळे मला झोपायचे आहे घर साफ करं असं त्यानं पत्नीला सांगितलं. पत्नीनं ते वेळेत साफ केलं नाही. यातून त्यांच्यात वाद झाला. याच रागातून राजेंद्र सावंतने चाकूने पत्नीवर सपासप वार केले.

तसेच हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या सूनेवरही राजेंद्र यांनी वार केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी राजेंद्रला पोलिसांनी अटक केली आहे. राजेंद्र पत्नीकडून घटस्फोट मागत होता. पण रंजना घटस्फोट देत नव्हत्या. त्याचाच राग मनात धरून आणि चाळीतल्या कार्यक्रमाचं कारण पुढे करत राजेंद्रनं पत्नीची हत्या केली.
=============================================

रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला भरधाव बसनं चिरडलं

रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला भरधाव बसनं चिरडलं
मुंबई: काल रात्री वांद्रेतील बीकेसीमध्ये झालेल्या अपघातात एका ४७ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. गिरधरभाई मुलानी हे आपल्या दुचाकीवर थांबले होते. यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका बसने या दुचाकीला धडक दिली.

दुचाकीवर असलेले मुलानी यांचा पाय या अपघातात बसच्या चाकाखाली आला आणि ते बससोबत जवळपास २५-३० फूट फरफटत गेले. डोक्याला गंभीर जखम झालेल्या मुलांनी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, बसचालकाला पोलिसांनी अटक केली असून आरोपीवर रँश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
=============================================

व्हायरस : फेसबुक मेसेजमधील अश्लिल व्हिडिओ उघडू नका, अन्यथा...

व्हायरस : फेसबुक मेसेजमधील अश्लिल व्हिडिओ उघडू नका, अन्यथा...
मुंबई :  सध्या फेसबूकच्या माध्यमातून एका व्हायरसने सोशल मीडियात मोठा धुमाकूळ घातला आहे. फेसबूकच्या मेसेज बॉक्सच्या माध्यमातून हा व्हायरस सध्या व्हायरल झाला आहे.

तुमच्या मित्राच्या अकाऊंटवरुन तुम्हाला तुमच्या मेसेज बॉक्समध्ये एखादा व्हिडिओ आला तर तो अजिबात उघडू नका. कारण तो अश्लिल व्हिडिओ असतो आणि एकदा तुम्ही तो उघडला की तो आपोआप तुमच्या मित्रयादीतील सगळ्या मित्रांना तो अश्लील व्हिडिओ पाठवला जातो.

तसेच काही जणांच्या फेसबूक वॉलवरही आपोआप अशा प्रकारचे व्हिडिओ पोस्ट होत असल्याचं दिसून आलं आहे.

धक्कादायक प्रकार म्हणजे तुमचं फेसबूक अकाऊंटही हॅक होऊ शकतं. त्यामुळे काळजी घ्या. आपापल्या फेसबूक अकाऊंटचे पासवर्ड तातडीने बदला.

दरम्यान, फेसबूकने अद्याप या व्हायरसबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.
=============================================

धोनी आणि आम्रपाली ग्रुपचं ब्रेकअप

धोनी आणि आम्रपाली ग्रुपचं ब्रेकअप !
नवी दिल्ली : रियल इस्टेट कंपनी आम्रपाली ग्रुप आणि टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांचं अखेर ब्रेक अप झालं आहे. धोनी यापुढे आम्रपाली ग्रुपचा ब्रँड अँबेसेडर नसेल. त्यामुळे धोनी यापुढे आम्रपाली ग्रुपच्या जाहिराती करणार नाही.

धोनीचे बिझनेस पार्टनर अरुण पांडे यांनी याबाबतची माहिती ABP न्यूज नेटवर्कला दिली. ‘आम्रपाली ग्रुप’सोबतचा करार संपल्याने यापुढे धोनी त्या ग्रुपच्या जाहिराती करणार नसल्याचं अरुण पांडे यांनी सांगितलं.

आम्रपाली बिल्डरने वेळेत घरं न दिल्याने या घरांच्या जाहिराती करणाऱ्या धोनीविरोधात सोशल मीडियावर मोहिम उघडण्यात आली होती. धोनीने आमची घरं मिळवून द्यावी, अशी मागणी सोशल मीडियावर होत होती.

आम्रपाली बिल्डर्स आणि कॅप्टन कूल माही यांचं नातं 6 वर्ष जुनं होतं. जेव्हा धोनी स्टार नव्हता, तेव्हा आम्रपाली बिल्डर्सने त्याच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला. त्यांच्या प्रत्येक नव्या प्रोजेक्टसाठी धोनीचाच चेहरा वापरण्यात येतो. मात्र याच नात्यामुळे धोनीचे हात दगडाखाली आले. आम्रपाली बिल्डरच्या आडमुठेपणामुळे जेरीस आलेल्या ग्राहकांनी ट्विटरवर धोनीविरोधातच मोहीम सुरु केली होती.

या प्रकारानंतर धोनीने आता आम्रपालीसोबतचा करार संपुष्टात आणला आहे.

=============================================

IPL: झहीरच्या दिल्लीने खातं उघडलं, पंजाबवर मात

IPL: झहीरच्या दिल्लीने खातं उघडलं, पंजाबवर मात
नवी दिल्ली: झहीर खानच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सनं किंग्स इलेव्हन पंजाबचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून आयपीएलच्या नवव्या मोसमात गुणांचं खातं उघडलं.

दिल्लीच्या फिरोझशाह कोटलावर झालेल्या या सामन्यात दिल्लीनं पंजाबला अवघ्या 111 धावांत रोखलं होतं. मग विजयासाठीच्या 112 धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा सलामीवीर क्विंन्टन डी कॉकनं अर्धशतक झळकावलं.

डी कॉकनं 42 चेंडूंत नऊ चौकार आणि एका षटकारासह नाबाद 59 धावांची खेळी उभारली. तर संजू सॅमसननंही 32 चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकारासह 33 धावांची खेळू रचून दिल्लीच्या विजयात हातभार लावला.

याआधी अमित मिश्राच्या फिरकी माऱ्यासमोर पंजाबच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. आणि 20 षटकांत पंजाबला नऊ बाद 111 धावांचीच मजल मारता आली. अमित मिश्रानं तीन षटकांत 11 धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स काढल्या. तर झहीर खानख्रिस मॉरिस आणि जयंत यादवनं प्रत्येकी एक विकेट काढली.

पंजाबसाठी मनन व्होरानं सर्वाधिक 32 धावांची खेळी केली. दरम्यान किंग्स इलेव्हन पंजाबचा आयपीएलमधला हा सलग दुसरा पराभव ठरला.
=============================================

लॅपटॉप अवघ्या 10,999 रुपयात

लॅपटॉप अवघ्या 10,999 रुपयात !
मुंबई : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘शॉपक्लूज’ने गुरुवारी  ‘पेंटा टी पॅड’ लॅपटॉप लाँच केला आहे. महत्त्वाचं म्हणजे या लॅपटॉपची किंमत अवघी 10,999 रुपये आहे.

हा लॅपटॉप टॅबलेटच्या रुपातही काम करू शकेल असं कंपनीने म्हटलं आहे.

ज्या लॅपटॉप युझर्सना हलका, स्वस्त, मल्टिटास्किंग डिव्हाईस हवा आहे, त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करून कंपनीने या लॅपटॉपची निर्मिती केली आहे.

या लॅपटॉपची स्क्रीन 10.1 इंच आहे. तर 1280×800 पिक्सल रिझॉल्यूशन असलेल्या या लॅपटॉपमध्ये विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टिम आहे. तर यामध्ये इंटेल X5 प्रोसेसर आहे.

या लॅपटॉपची बॅटरी सलग 6-7 तास चालू शकते, असा दावा कंपनीने केला आहे.

याशिवाय यामध्ये 2GB रॅम, 32GB रोम असून याची मेमरी 256 GB पर्यंत वाढवता येते. या लॅपटॉपचा रियर (पुढील) कॅमेरा 5 मेगा पिक्सलचा आहे.

‘पेंटा टी पॅड’चे फिचर्स
* स्क्रीन 10.1 इंच, 1280×800 पिक्सल रिझॉल्यूशन
* ऑपरेटिंग सिस्टिम – विंडोज 10
* इंटेल X5 प्रोसेसर
*बॅटरी बॅकअप 6-7 तास
*2GB रॅम, 32GB रोम, एक्स्पांडेबल मेमरी 256 GB
*रियर कॅमेरा 5 मेगा पिक्सल
=============================================

'दारु कंपन्याना होणाऱ्या पाणीपुरवठ्याची चौकशी करा'

'दारु कंपन्याना होणाऱ्या पाणीपुरवठ्याची चौकशी करा'
जळगाव: मराठवाड्यात घागरभर पाण्यासाठी लोकांची वणवण सुरु असताना दारु कारखान्यांसाठी होत असलेल्या भरमसाठ पाणी पुरवठ्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश जलसंपदा मंत्र्यांनी दिले आहेत.

गिरीश महाजन आज जळगाव दौऱ्यावर असताना एबीपी माझाशी बोलत होते.

औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नांदेड या तीन जिल्ह्यात असलेल्या दारु कारखान्यांसाठी कोट्यवधी लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. जोवर पाऊस पडत नाही तोवर हा पाणीपुरवठा बंद केल्यास शेकडो गावं, वाड्यावस्त्यांची तहान भागेल असं शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे.

एका वर्षात मराठवाड्यात 27 कोटी लीटर बीअरचं उत्पादन होतं. एका लीटर बीअरसाठी 4 लिटर पाणी लागतं. आणि ही चैन दुष्काळात परवडण्यासारखी नाही. त्यामुळं सध्या दारुकंपन्यांना होत असलेला पाणीपुरवठा तातडीनं बंद करण्याची मागणी जोर धरतेय.

दरम्यान जोवर पाऊस पडत नाही, तोवर म्हणजेच पुढचे दोन महिने दारुच्या कारखान्यांना होणारा पाणीपुरवठा तातडीनं बंद करायला पाहिजे अशी भूमिका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी घेतली आहे.
=============================================

आश्चर्याने डोळे विस्फारायला लावणारा हा व्हिडीओ

VIDEO: थरारक फोटोचा थरारक व्हिडीओ
टोकियो : आश्चर्याने डोळे विस्फारायला लावणारा हा फोटो पाहून अनेकांना अनेक प्रश्न पडले असतील. इलेक्ट्रिक पोलवर चढलेला चिम्पांझी आणि त्याला हटकणारा कर्मचारी या फोटोमध्ये दिसत आहेत. मात्र या फोटोमागील कहाणीही थरारक आहे.

चाचा नावाचा हा चिम्पाझी जपानच्या एका प्राणीसंग्रहालयातून पळाला होता. प्राणीसंग्रहालयाच्या कठडा पार करून ‘चाचा’ गुरुवारी पसार झाला.

या चिम्पांझीची शोधाशोध करून, प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांना अक्षरश: घाम आला.

प्राणीसंग्रहालयातील सीसीटीव्हीच्या आधारे 24 वर्षीय ‘चाचा’चा शोध सुरु झाला. मात्र प्राणीसंग्रहालयातील कर्मचारी मागावर असल्याचं दिसताच, ‘चाचा’ने थेट विद्युत खांबावर झेप घेतली. ‘चाचा’ सरसर चढत थेट खांबाच्या टोकावर पोहोचला. या खांबावरून विद्युत वाहिनी प्रवाहित होती.

मात्र या चिम्पांझीला तिथून खाली उतरवणं आवश्यक होतं. यासाठी प्राणी संग्रहालायातील कर्मचाऱ्यांनी त्याला बेशुद्ध करण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी एका क्रेनमध्ये चढून त्याला बेशुद्ध पाडणाऱ्या एकप्रकारचा बाण बंदुकीतून मारण्याचा ठरवलं. मात्र कर्मचाऱ्याची हालचाल पाहून ‘चाचा’ आक्रमक झाला आणि त्यानेच कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

यानंतर ‘चाचा’ने थेट पोलवरील वायर्सच्या सहाय्याने एका पोलवरून दुसऱ्या पोलच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी ‘चाचा’ खाली घसरला आणि खाली लावलेल्या जाळ्यात कोसळला.
VIDEO:

=============================================

पुण्याच्या बालगंधर्व कलादालनात केकच केक

पुण्याच्या बालगंधर्व कलादालनात केकच केक
पुणे : पुण्यातल्या बालगंधर्व कलादालनात सध्या सगळीकडे केकच केक पसरलेला दिसत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पार पडलेल्या कार्यक्रमात इथं तब्बल 2600 किलोंचा केक कापण्यात आला. मात्र कार्यक्रम झाला आणि जमेल तेवढा केक संपवून पालिकेचे अधिकारी निघून गेले. उरलेला केक दालनातच टाकण्यात आल्यानं संपूर्ण कलादालन कमालीचं अस्वच्छ झालं आहे.

पालिकेनं मात्र व्यवस्थापक सुट्टीवर आहेत असं सांगत आपली जबाबदारी झटकली.

नागपूरच्या एका हौशी फोटोग्राफर संस्थेचं इथं प्रदर्शन भरणारा आहे. त्यासाठी काल रात्री 8 वाजताच त्यांना हे दालन दिलं जाणार होतं. मात्र अस्वच्छतेमुळे ते त्यांना अजून मिळालेलं नाही. पालिकेच्या या बेजबाबदारपणावर चोहोबाजूंनी टीका केली जात आहे.
=============================================

धोनी आणि आम्रपाली ग्रुपची पार्टनरशिप संपुष्टात

  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. १६ - भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रिअल इस्टेट फर्म आम्रपाली ग्रुपची पार्टनरशिप अखेर संपुष्टात आली असून धोनीने कंपनीच्या ब्रँड अॅम्बेसेडर पदाचा राजीनामा दिला आहे. यापुढे धोनी आम्रपाली ग्रुपच्या जाहिराती करताना दिसणार नाही. 
    शेकडो नागरिकांनी आम्रपाली ग्रुपच्या नोएडा येथील प्रोजेक्टमध्ये घरं घेतली असून ते तेथे शिफ्टही झाले आहेत. मात्र असं असतानाही अद्याप ब-याच ठिकाणचे इलेक्ट्रिकल व इतर काम पूर्ण झाले नसून रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून नागरिकांनी सोशल मीडियावर या ग्रुपविरोधात मोहिम उघडून त्यात धोनीलाही टॅग केले होते. धोनीने आम्हाला आमची घरं मिळवून द्यावी अथवा या ग्रुपपासून स्वत:ला वेगळे करावे अशी मागणी नागरिकांनी सोशल मीडियावर केली होती. 
    यानंतर अखेर काल धोनीने गेल्या ६ वर्षांपासून आम्रपाली ग्रुपशी असलेले नातं संपवत ब्रँड अँम्बेसेडरपदाचा राजीनामा दिला.
=============================================

तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे रखडली, कर्जत-कसारा मार्ग ठप्प

  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. १६ - तांत्रिक बिघाडामुळे शनिवारी सकाळी मध्य रेल्वेच्या कल्याण-कर्जत व कल्याण-कसारा या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. 
    कल्याण-कसारा मार्गावरील वासिंद-आसनगाव स्थानकांदरम्यान शनिवारी सकाळी गीतांजली एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तर कल्याण-कर्जत मार्गावर कर्जत स्थानकाजवळ रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटल्याने तेथील वाहतुकीचाही बो-या वाजला. सकाळी ऐन गर्दीच्या वेळेस झालेल्या या खोळंब्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. अनेक स्थानकांवर तसेच गाड्यांमध्येही प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. 
    दरम्यान सध्या गीतांजली एक्स्प्रेसच्या इंजिनातील बिघाड दुरूस्त झाला आहे, मात्र गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत होण्यास अद्याप थोडा वेळ लागणार आहे.
=============================================

मनसेचा ‘आवाज’ गेला मर्यादेबाहेर

  • मुंबई : गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्याचा आवाज मर्यादेबाहेर होता, जेणेकरून ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे, असा निष्कर्ष नोंदवत सभेचे आयोजक नितीन सरदेसाई यांच्यावर कारवाई करा, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकार व मुंबई महापालिकेला शुक्रवारी दिला.
    शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या धर्तीवर मनसेने गुढीपाडव्यादिवशी (८ एप्रिल रोजी) शिवाजी पार्कवर मेळावा आयोजित केला होता. शिवाजी पार्क हे ‘शांतता क्षेत्र’ म्हणून घोषित असल्याने मनसेच्या या मेळाव्यास परवानगी देऊ नये, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती. मात्र त्यावर निर्णय देताना मेळाव्यादरम्यान ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन होणार नाही, अशी लेखी हमी आयोजक नितीन सरदेसाई यांच्याकडून घेत उच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. शिवाय मेळाव्यातील ध्वनीची तीव्रता नोंदविण्याचे आदेशही पोलीस आणि महापालिकेला दिले होते. या मेळाव्यात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना, रा.स्व. संघाचे मा. गो. वैद्य आणि विदर्भवादी श्रीहरी अणे यांच्यावर येथेच्च टिकेची झोड उठविली होती.
    मात्र, त्यांचा तो ‘आवाज’ मर्यादित ‘डेसिबल’पेक्षा अधिक नोंदला गेला. त्यामुळे सरदेसाई यांना नोटीस बजावताना ‘स्वकृतदर्शनी ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन झाल्याचे आम्हाला दिसत आहे. त्यामुळे आयोजकांवर (नितीन सरदेसाई) यांच्यावर अवमान नोटीस बजावण्यात येत आहे,’ असे न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने म्हटले.
=============================================
सिगारेटचे उत्पादन पुन्हा सुरू होणार
नवी दिल्ली - सिगारेटच्या पाकिटावर आरोग्याबाबतच्या इशाऱ्याचा आकार वाढविण्याच्या सरकारच्या आदेशांमुळे बंद करण्यात आलेले सिगारेटचे उत्पादन ‘आटीसी‘ ही कंपनी लवकरच सुरु करणार आहे.

तंबाखू व तंबाखूजन्य उत्पादनांच्या पाकिटावर 85 टक्के भागात आरोग्याबाबतचा वैधानिक इशारा छापण्याचा आदेश सरकारने दिले आहेत. यापूर्वी पाकिटावरील केवळ 20 टक्के जागेतच असा इशारा छापण्याचे बंधन होते. मात्र नवे धोरण अस्पष्ट असल्याचा दावा करत सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करून बहुतेक कंपन्यांनी सिगारेटचे उत्पादन थांबविले होते. या प्रकरणी "आयटीसी‘ या कंपनीने न्यायालयात धाव घेतली होती. 

‘उच्च न्यायालयाने कंपनीच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्यामुळे लवकरच सिगारेटचे उत्पादन सुरू करण्यात येईल‘, अशी माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र त्याबाबत सविस्तर तपशील देण्यास नकार दिला आहे. सिगारेटचे विविध ब्रॅण्ड बनविणाऱ्या "आयटीसी‘चे देशातील विविध ठिकाणी प्रकल्प आहेत.
=============================================
तुमची राष्ट्रभक्‍ती तुम्हाला लखलाभ- सबनीस
औरंगाबाद - ‘धर्मांधता हिंदूंच्या पातळीवर सुरू आहे. तुमची राष्ट्रभक्‍ती, राष्ट्रप्रेम तुम्हाला लखलाभ असो; तुमच्या राष्ट्रवादात जनावरांचे दु:ख भोगणारा समाज "आरआरएस‘च्या गाभ्याचा भाग होऊ शकत नाही, तोपर्यंत आरएसएसचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही,‘‘ अशा शब्दांत 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सुनावले आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त सिडको जयंती उत्सव समितीतर्फे आज डॉ. सबनीस यांचे "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित राष्ट्रवाद‘ या विषयावर संत तुकाराम नाट्यगृहात व्याख्यान झाले. ते म्हणाले,  ‘बाबासाहेब ज्या जातीत जन्मले त्यांचे प्रश्‍न संपले का, असा प्रश्‍न उपस्थित केल्यास त्याचे उत्तर नाही असेच आहे. आजही जातीवाद, विषमता दिसून येते आहे. जगाच्या इतिहासात इतर धर्मांत कुरूपता नसेल इतकी कुरूपता हिंदू धर्मात आहे आणि यालाच ते श्रेष्ठ संस्कृती म्हणतात. ज्या समाजाला अंधारात, वेशीबाहेर ठेवले, ज्यांचा स्पर्श विटाळ मानता, जनावरांपेक्षाही वाईट वागणूक देता, हा भाग हिंदू धर्माच्या क्रौर्याचा आहे. हे शोभादायक नाही. याची वारंवार सर्व पातळीवर तपासणी करून घेण्याची गरज आहे.‘‘

‘बाबासाहेब समजून घेता आले नाहीत, हे हिंदूंचेही दुर्दैव आहे. त्यांना मुस्लिम लीग, हिंदू महासभा, कॉंग्रेस, सर्व सवर्ण जातींनी विरोध केला. त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक दु:ख मोठे असतानाही त्यांनी आपला विवेक, राष्ट्रवाद डगमगू दिला नाही; तसेच सूडभावनाही ठेवली नाही. मार्क्‍सवादाच्या तत्त्वज्ञानातून नक्षलवादाचे मॉडेल जन्माला आले आहे, तर बाबासाहेबांच्या करुणेच्या तत्त्वज्ञानातून शोषणमुक्‍त समाजनिर्मिती झाली आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानातून दलित नक्षलवाद जन्माला आला का,‘‘ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 
=============================================
मुलायमसिंगांमुळे सोनियांचे "पीएम'पद दूर- स्वामी
नवी दिल्ली - समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यांच्यामुळेच कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण होऊ न शकल्याचा आरोप सोनिया गांधी करतात अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम्‌ स्वामी यांनी केली आहे. 

संयुक्त पुरोगामी आघाडी -1 (युपीए-1) उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाला संपवून टाकेल असे वक्तव्य माजी कायदा मंत्री हंसराज भारद्वाज यांनी केले होते. या पार्श्‍वभूमीवर स्वामी बोलत होते. ते म्हणाले, "मला आश्‍चर्य वाटले नाही. सोनिया गांधी मुलायमसिंगांचा द्वेष करतात. 1999 पासून ज्यावेळी सोनिया गांधींना पंतप्रधानपदावर विराजमान व्हावेसे वाटते, पण मुलायमसिंगांनी त्यांना नेहमीच विरोध केला. मुलायमसिंगांबाबतची सोनियांची भूमिका संशयास्पद आहे. 2004 मध्ये काही कायदेशीर बाबींमुळे गांधी पंतप्रधान होऊ शकल्या नाहीत. मात्र 1999 मध्ये त्यांनी राष्ट्रपतींकडे जाऊन पंतप्रधानपदाचा दावा केला. गांधी यांनी त्यांच्याकडे 272 जागा असल्याचा दावा केला होता. मात्र मुलायमसिंगांकडे 32 खासदार होते. मात्र सोनिया गांधी पंतप्रधानपदाच्या उमदेवार असणार नाहीत या अटीवर सर्वांनी त्यांना पाठिंबा दिला होता.‘
=============================================
हिंदूंनाच भगव्याखाली उभे राहावे लागेल - शिवसेना
संग्रहित चित्रमुंबई - ‘हिंदूंना आपल्याच हिंदुस्थानात खतम करण्याची भाषा होत असताना हिंदूंच्या सुरक्षेबाबत एकही राज्यकर्ता, पुढारी उसळून बोलत नाही. पठाणकोटच्या हल्ल्याचा बदला घेऊ असे एक विधान संरक्षण मंत्र्यांनी केले. तो बदला घेण्याचा दिवस जसा उजाडणार नाही तशी हिंदू रक्षणाची आरोळीही कधी कोणी ठोकणार नाही. हिंदूंनाच एकजुटीने भगव्याखाली उभे राहावे लागेल!‘, अशा शब्दांत शिवसेनेने "सामना‘ या मुखपत्राद्वारे हिंदू समाजाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, "कोणीही उठतो आणि हिंदुस्थानच्या कानफटात मारतो असे नेहमीच घडताना दिसत आहे. हिंदुस्थानातील हिंदूंचा खात्मा करण्याची भाषा "इसिस‘ने पुन्हा केली आहे. हिंदूंना खतम करण्याची भाषा यापूर्वी अल कायदा, तोयबासारख्या अतिरेकी संघटनांनी अनेकदा केली आहे. हिंदूंच्या मानेवर तलवार ठेवून धर्मांध अतिरेकी धमक्‍या देत आहेत.‘ तसेच हे सर्व चित्र भयंकर असले तरी हिंदूंच्या बाजूने ठामपणे उभा राहणारा एकही माईका लाल या भूमीत दिसत नाही, असे म्हणत चिंता व्यक्त केली आहे. 

"राममंदिरप्रश्‍नी भाजपने अलगद आपल्या काखा वर केल्या आहेत. येथील स्वत:स हिंदुत्ववादी मानणारे पुढारी अधूनमधून गर्जना करीत असतात, पण इसिससारख्या संघटनांशी मुकाबला करण्याच्या बाबतीत सगळ्यांच्याच मिश्‍या खाली पडत असतात. नागपुरात कन्हैयाकुमारच्या गाडीवर दोन दगड मारल्याने हिंदुत्व मजबूत होण्याऐवजी कन्हैयासारख्यांना वारेमाप प्रसिद्धी मिळत आहे व ते हिंदुत्वासाठी बरे नाही.‘ असेही अग्रलेखात पुढे म्हटले आहे.
=============================================
भूकंपाच्या धक्‍क्‍याने जपान हादरले
नऊ जण मृत्युमुखी तर 860 जखमी, घरे कोसळल्यामुळे अनेक जण बेघर 
माशिकी (जपान) - दक्षिण जपानला बसलेल्या जोरदार भूकंपाच्या धक्‍क्‍यामुळे अनेक ठिकाणी घरे कोसळली असून, ढिगाऱ्यांखाली गाडले गेलेल्यांच्या शोधासाठी मोठी मोहीम उघडण्यात आली आहे. गुरुवारी बसलेल्या या मोठ्या भूकंपाच्या धक्‍क्‍यात नऊ जण मृत्युमुखी पडले असून, शेकडो जण जखमी झाले आहेत. भूकंपामुळे अनेक ठिकाणी आग लागली, तर अनेक रस्ते बंद झाले आहेत. 

गुरुवारी रात्री जपानच्या दक्षिणेकडील भागाला भूकंपाचा धक्का बसला. माशिकी शहराजवळ या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाची तीव्रता रिश्‍टर स्केलवर 6.5 एवढी होती. 

दक्षिणेकडील क्‍युशू बेटांवर भूकंपामुळे मोठे नुकसान झाले असून, सुमारे दहा हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी घराबाहेर राहणे पसंत केले. या भूकंपाच्या धक्‍क्‍यामुळे अनेक घरे कोसळली असून, कंपन्यांनी आपले कामकाज थांबविले आहे. जपानमधील अतिवेगवान रेल्वेगाडी या भूकंपाच्या धक्‍क्‍यामुळे लोहमार्गावरून घसरली असून, कुमामोटो शहरातील अनेक प्रसिद्ध इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे.
=============================================
=============================================

No comments: