Sunday, 17 April 2016

नमस्कार लाईव्ह १७-०४-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- इस्लामाबाद; 'रॉ' च्या दोन एजंटसना अटक केल्याचा पाकिस्तानचा दावा 
२- कोलंबो; श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मलिंगा आयपीएलमधून बाहेर 
३- लंडन; बुडीत कर्जाची एकसमान व्याख्या करण्याचा प्रस्ताव 
४- जर्मनीतल्या गुरुद्वारामध्ये झालेल्या स्फोटात 3 जखमी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- गुजरातमध्ये पटेल आंदोलनाला हिंसक वळण, मेहसाणामध्ये संचारबंदी 
६- पश्चिम बंगालमध्ये एकावाजेपर्यंत ५५ टक्के मतदान, काही ठिकाणी हिंसाचार 
७- 'युपी'नंतर उत्तराखंडमध्ये सुरु झाले "पोस्टर नाट्य' 
८- ...तर विजय गोयलांवर कारवाई करू - आप 
९- परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज इराणहून रशियातील मॉस्कोसाठी रवाना 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- वक्तव्याचा विपर्यास, पंकजा मुंडे माध्यमांवर भडकल्या 
११- कोलकाता; पश्चिम बंगालमध्ये मतदानाला तूफान प्रतिसाद 
१२- आमीरच्या भेटीवरुन साताऱ्यात वादंग 
१३- शेअर्स हस्तांतरणाचा तपास ३१ मेपर्यंत पूर्ण करा - उच्च न्यायालय 
१४- बुलडाणा जामोद जातीय दंगल प्रकरणी १११ जणावर गुन्हे दाखल, ८७ जणांना अटक ७९ जणांना कोर्टात हजर
१५- पाटीदार अनामत आंदोलन समितीने उद्या गुजरात बंद पुकारला. 
१६- केरळमधलं पुत्तिंगल देवीचं मंदिर पुन्हा दर्शनासाठी खुलं 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- धुळे जिल्हा बँकेत अग्नितांडव; कम्प्युटर, कागदपत्रे जळून खाक 
१८- वर्धा; कौटुंबिक वादातून मेव्हण्यांवर चाकूहल्ला, एकाचा मृत्यू, पत्नी गंभीर 
१९- पुणे; वाळू माफियांची मुजोरी, इंदापूरच्या तहसीलदारांवर हल्ल्याचा प्रयत्न 
२०- उदगीर; मुलाच्या लग्नात भाजपा नेत्याचे शाही लक्षभोजन 
२१- आझमगड; नेताजींच्या 116 वर्षांच्या गाडीचालकानं बँकेत खोललं खातं 
२२- प्रत्येकजण स्वतःला पंतप्रधान समजतो - सुभाष घई 
२३- पुणे; आंबेडकर जयंतीचा खर्च दुष्काळग्रस्तांना, हमाल पंचायतीचा उपक्रम
२४- 20 ट्रक नारळ अन्‌ 10 हजार गुलाल पोती; चैत्र यात्रेसाठी जोतिबावर व्यापारी सज्ज
२५- बारामती; वाहनाच्या समोरासमोर झालेल्या अपघात ५ महिला ठार, ३ मुली गंभीर जखमी.
२६- हरिद्वारजवळ गंगेच्या प्रवाहात 4 लोक बुडाले, दोघांचे मृतदेह सापडले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२७- आयपीएलच्या पहिल्या आठवडयात प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद 
२८- पुण्याचे पंजाबसमोर 153 धावांचे आव्हान 
२९- शिल्पानंतर आता मराठमोळी अभिनेत्रीच साकारणार अंगुरी भाभी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
यश मिळवायचं असेल तर स्वतःच स्वतःवर बंधन घाला
(सुरज पहाडे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये, 
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


==============================================

वक्तव्याचा विपर्यास, पंकजा मुंडे माध्यमांवर भडकल्या

वक्तव्याचा विपर्यास, पंकजा मुंडे माध्यमांवर भडकल्या
लातूर : मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना पाणी पुरवण्याच्या मुद्यावरुन टीकेचे धनी झालेल्या पंकजा मुंडे आज माध्यमांवर भडकल्या. प्रसारमाध्यमांनी माझ्या वक्त्तव्याचा विपर्यास केला असा आरोप पंकजा मुंडे यांनी केला आहे.

पंकजा मुंडे लातूर दौऱ्यावर असून त्यांनी लातूर रेल्वे स्टेशनला भेट देऊन पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेतला. दरम्यान पंकजा मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना पाहून पंकजा मुंडेंचा पारा चढला.

मी काही बोलणार नाही, तुम्ही शूटींग बंद करा अशी तंबी पंकजा मुंडेंनी दिली. ऐन दुष्काळात महाराष्ट्र होरपळत असताना उद्योगांसाठी राखीव असलेलं पाणी दारुच्या कारखान्यांना देण्यात काहीच गैर नाही अशा अनुषंगाचं वक्तव्य काल पंकजा मुंडेंनी केलं होतं. त्यानंतर सर्वच स्तरातून पंकजा
मुंडेंवर टीका होत आहे.


दुष्काळी मराठवाड्यात पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष्य असताना, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अजब वक्तव्य केलं आहे. “दारु किंवा उद्योगधंद्याना देण्यात येणारं पाणी हे आरक्षित केलेलं असतं. त्यामुळे अशा उद्योगांचं पाणी बंद करणं अयोग्य होईल. त्यांना जर पिण्याचं पाणी देण्यात येत असेल तर बंद करावं”, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं
==============================================

धुळे जिल्हा बँकेत अग्नितांडव; कम्प्युटर, कागदपत्रे जळून खाक

धुळे जिल्हा बँकेत अग्नितांडव; कम्प्युटर, कागदपत्रे जळून खाक
धुळे : धुळे, नंदुरबार अशी दोन जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य इमारतीला आग लागली. या आगीत बँकेतील 25 ते 30 कम्प्युटर आणि महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत.

रविवारी सकाळी साडे आठ ते साडे नऊच्या दरम्यान लागलेल्या या आगीने क्षणार्धात रौद्र रुप घेत बँकेचा तिसरा आणि चौथा माळा गाठला. अग्निशमन दलाच्या जवानांना चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.

ही आग विझवण्यासाठी धुळे महानगरपालिकेच्या पाच अग्निशमन सह, शिरपूर, मालेगाव, दोंडाईचा, अमळनेर इथून गाड्या दाखल झाल्या होत्या. आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. आग विझवताना सुविधांच्या अभावी फायर ब्रिगेडचे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.

या आगीत बँकेचं मोठं नुकसान झालं असलं तरी बँकेचा डेटा सेंटर, रेकॉर्ड रुम सुरक्षित असल्याचा दावा बँकेच्या वतीने करण्यात आला आहे. मात्र यासंदर्भात कॅमेरासमोर कोणीही बोलायला तयार नाही.

बँकांच्या मागे लागलेला चौकशीचा ससेमिरा, भ्रष्टाचार, विवादित कर्ज प्रकरण यामुळे बँक आधीच चर्चेत आहे. बँकेवर राष्ट्रवादी, काँग्रेसच वर्चस्व आहे. धुळे महानगरपालिकेत देखील राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आहे. महानगर पालिकेतील वसुली विभागाची भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी सुरु असताना 17 जून 2011 या दिवशी या विभागाला आग लागून हा विभाग जळून खाक झाला होता. या घटनेचे विस्मरण धुळेकरांना होत नाही तोच बँकेला लागलेल्या आगीत संशयाचे धूर असल्याची चर्चा धुळे , नंदुरबार जिल्ह्यात सुरु आहे.
==============================================

पश्चिम बंगालमध्ये मतदानाला तूफान प्रतिसाद

पश्चिम बंगालमध्ये मतदानाला तूफान प्रतिसाद
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. सात जिल्ह्यांमधल्या 56 मतदारसंघात आज मतदान होत आहे.

1 वाजेपर्यंत 55 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. आजच्या मतदानासाठी पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी पोलिसांनी कडेकोड बंदोबस्त ठेवला आहे. मालदा, बीरभूम परिसरात गेल्या काही दिवसात अनेक हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या.

त्या पार्श्वभूमीवर सध्या पोलिसांनी या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून मोठा बंदोबस्त ठेवला आहे. तृणमूल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत 8 जण जखमी झाले आहेत.

अलीपुरद्वार, जलपायगुडी, दार्जिलिंग, उत्तर दिनाजपुर, दक्षिण दिनाजपुर, बीरभूम आणि मालदा जिल्ह्यात जवळपास एक कोटी 22 लाख मतदार 383 उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. यात 33 महिला उमेदवारांचाही समावेश आहे.
==============================================

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मलिंगा आयपीएलमधून बाहेर

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मलिंगा आयपीएलमधून बाहेर
कोलंबो : श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा यंदाच्या आयपीएल मोसमात मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व करु शकणार नाही. मुंबई इंडियन्सच्या वैद्यकीय पथकानं केलेल्या चाचणीत तो अनफिट असल्याचं आढळून आलं आहे.

मलिंगाच्या डाव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याने आणखी चार महिने सक्तीची विश्रांती घेण्याची गरज असल्याचं निदान मुंबई इंडियन्सच्या वैद्यकीय पथकानं केलं आहे. त्यामुळे मलिंगाला श्रीलंका संघाच्या इंग्लंड दौऱ्यातून आणि कॅरेबियन प्रीमियर लीगमधूनही माघार घ्यावी लागण्याची चिन्हं आहेत.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे डॉक्टर 20 एप्रिलला मलिंगाच्या दुखापतीची वैद्यकीय चाचणी करणार आहेत. मलिंगाच्या डाव्या गुडघ्यावर शस्त्रक्रियेची गरज आहे की नाही, याचं निदान या चाचणीत करण्यात येईल.

दरम्यान, श्रीलंका क्रिकेट बोर्डानं मलिंगाला कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचंही वृत्त आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या परवानगीशिवाय मलिंगा भारतात दाखल झाला आणि तो मुंबई इंडियन्सच्या टीममध्येही सामील झाल्याचं कारण बोर्डानं दिलं आहे.
==============================================

कौटुंबिक वादातून मेव्हण्यांवर चाकूहल्ला, एकाचा मृत्यू, पत्नी गंभीर

कौटुंबिक वादातून मेव्हण्यांवर चाकूहल्ला, एकाचा मृत्यू, पत्नी गंभीर
मयत देवानंद कांबळे
वर्धा : कौटुंबिक वादातून माहेरी गेलेल्या पत्नीला घरी आणण्यासाठी गेलेल्या पतीने मेव्हण्याची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. वर्धा शहरातल्या समतानगरमध्ये रात्री उशीरा हा प्रकार घडला.

आरोपी राजू भगतचा त्याच्या पत्नीशी वाद झाला. या वादानंतर राजूची पत्नी आपल्या मुलीला घेऊन माहेरी निघून गेली. पत्नीनं सोबत नेलेल्या आपल्या मुलीला परत आणण्यासाठी राजू भगत सासुरवाडीला गेला असता. तेव्हा त्याचा मेव्हणा देवानंद कांबळे याच्याशी त्याचा वाद झाला. या
वादातून राजू भगतने मेव्हणा देवानंदवर चाकूनं हल्ला केला.

या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानं देवानंदला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात आरोपीची पत्नी आणि तिचा आणखी एक भाऊ जखमी झाला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
==============================================

वाळू माफियांची मुजोरी, इंदापूरच्या तहसीलदारांवर हल्ल्याचा प्रयत्न

वाळू माफियांची मुजोरी, इंदापूरच्या तहसीलदारांवर हल्ल्याचा प्रयत्न
पुणे : इंदापूर वाळू माफियांची मुजोरी वाढतच आहे. वाळू वाहतूकदाराने चक्क तहसीलदार वर्षा लांडगे यांच्यावर हल्ला केला. अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करत असताना ही घटना घडली. सुदैवाने या हल्ल्यात वर्षा लांडगे-खत्री थोडक्यात बचावल्या.

पुणे-सोलापूर रोडवर इंदापूरमध्ये आज पहाटे अनधिकृत वाळ वाहतूकदारांवर कारवाई सुरु होती. यावेळी  वाळू वाहतूकदार करणाऱ्या ट्रक मालकाने त्याची गाडी तहसीलदारांच्या गाडीसमोर लावून त्यांना जीवे मारहण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी या प्रकरणी ट्रक चालकाला अटक केली असून चौकशी केली सुरु आहे.
==============================================

शिल्पानंतर आता मराठमोळी अभिनेत्रीच साकारणार अंगुरी भाभी

शिल्पानंतर आता मराठमोळी अभिनेत्रीच साकारणार अंगुरी भाभी!
मुंबई : मोठ्या वादानंतर ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून बाहेर पडलेल्या शिल्पा शिंदेची जागा एक मराठमोळी अभिनेत्रीच घेणार आहे. अंगुरी भाभीच्या भूमिकेसाठी शुभांगी अत्रेची निवड करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून शिल्पा शिंदे आणि मालिकेच्या निर्मात्यांमध्ये वाद सुरु आहे. शिल्पाने अचानक मालिका सोडली. त्यानंतर सिन्टा शिल्पावर आजीवर बंदी घालणार असल्याची चर्चा होती.

शिल्पाने मालिका सोडल्यानंतर निर्माते नव्या अंगुरी भाभीचा शोध घेत होते. या भूमिकेसाठी  रश्मी देसाई तसंच शीतल खंडाल यांची नावं समोर आली होती. मात्र आता शुभांगी अत्रेच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे ‘सही पकडे है…’ असं म्हणत शुभांगी अंगुरी भाभीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

शुभांगीने चिडीया घर, कसौटी जिंदगी की, कस्तुरी, दो हंसो का जोडा, अधुरी कहानी हमारी यांसारख्या मालिकांमधून अभिनय केला आहे.

 महत्त्वाचं म्हणजे मालिकेत शिल्पाला रिप्लेस करण्याची शुभांगीची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी ‘चिडीया घर’ या मालिकेत शिल्पा साकारत असलेली कोयलची भूमिका नंतर शुभांगीला मिळाली होती.
==============================================

आमीरच्या भेटीवरुन साताऱ्यात वादंग

  • ऑनलाइन लोकमत
    सातारा, दि. १७ -   'वॉटर कप' स्पर्धेसाठी रविवारी साताऱ्यात आलेल्या अभिनेता आमीर खानचा खाजगी दौरा जिल्ह्यात भलताच वादग्रस्त ठरला. सुटीच्या दिवशी अख्खं प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालयात आमीरच्या दिमतीला आलेलं पाहून चिडलेल्या स्थानिक आमदारांनी अधिकाऱ्यांवर जोरदार टिकास्त्र सोडलं.  
       
    'दुष्काळावर मात करत असल्याची कार्पोरेट शोबाजी बंद करा अन अगोदर दुष्काळग्रस्तांसाठी मूलभूत गरज असलेल्या टँकर - छावण्यांचे प्रस्ताव मंजूर करा,' अशा भाषेत राष्ट्रवादीचे माजी मंत्री शशिकांत शिंदे अन कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला टार्गेट केलं. 
       
    रविवारी साताऱ्यात आमीरनं दुष्काळी भागातील 'वॉटर कप' स्पर्धेवर चर्चा करण्यासाठीअधिकाऱ्यांची मिटींग घेतली, यावेळी जिल्ह्यातील अनेक प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी बाहेर पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, टँकरची मागणी करण्यासाठी भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांना  बाहेरच्या बाहेरच हाकलून दिल्यानंतर संतापाची लाट उसळली. दोन्ही कॉंग्रेसचे आमदारही यानंतर प्रशासनाच्या भूमिकेवर तुटून पडले.

==============================================

पश्चिम बंगालमध्ये एकावाजेपर्यंत ५५ टक्के मतदान, काही ठिकाणी हिंसाचार

  • ऑनलाइन लोकमत 
    कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यामध्ये काही ठिकाणी हिंसाचार झाला आहे. सकाळी सातवाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत ५५.९४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. ५६ जागांसाठी एकूण ३८३ उमेदवार रिंगणात असून, यात ३३ महिला आहेत. एकूण १.२ कोटी नागरीकांकडे मतदानाचा अधिकार आहे. 
    माओवाद्यांच्या धोक्यामुळे बीरभूम जिल्ह्यातील सात मतदारसंघात मतदानाची वेळ चारवाजेपर्यंत आहे. अन्य मतदारसंघात सहावाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवूनही काही भागात हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. 
    बीरभूममधील दमरत गावातील मतदान केंद्राजवळ तृणमुल काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले. या हिंसाचारात आठ जण जखमी झाले. दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी तीन-तीन कार्यकर्त्यांना अटक केली आहे. शनिवारी रात्री उत्तर दिनाजपूरमधील सीपीआय (एम), काँग्रेसच्या कार्यालयात घुसून काही जणांनी तोडफोड केली. 
    या हिंसाचारासाठी काँग्रेसने तृणमुल कार्यकर्त्यांवर आरोप केला आहे. मालदामध्ये मतदान केंद्राबाहेर सीपीआय(एम) आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. 
==============================================

गुजरातमध्ये पटेल आंदोलनाला हिंसक वळण, मेहसाणामध्ये संचारबंदी

  • ऑनलाइन लोकमत 
    मेहसाणा, दि. १७ - पाटीदार पटेल समाजाचा नेता हार्दिक पटेलच्या सुटकेसाठी रविवारी गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत पोलिसांसह दोन डझन लोक जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी मेहसाणामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 
    हार्दिक पटेलची तुरुंगातून सुटका करण्याच्या मागणीसाठी आंदोलकांना रॅली काढायची होती.  मात्र या रॅलीला परवानगी नाकारल्यानंतर हिंसाचार सुरु झाला. पटले समाजाचे महत्वाचे नेते लालजी पटेलही या आंदोलनात जखमी झाले. पोलिसांनी रॅली रोखल्यानंतर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक सुरु केली. 
    हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्या. पोलिसांनी लाठीचार्जही केला. काही पोलिसही दगडफेकीत जखमी झाले. परवानगी नसतानाही आंदोलकांनी रॅली काढली. पोलिसांवर दगडफेक झाली त्यामुळे मग पोलिसांनीही कायद्यानुसार कारवाई केली असे मेहसानाच्या जिल्हाधिका-यांनी सांगितले. 
    पटेल अनामत आंदोलन समितीने उत्तर गुजरातमध्ये उद्या बंदची हाक दिली आहे. शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोक-यांमध्ये आरक्षण मिळावे यासाठी मागच्यावर्षीपासून पटेल समाजाचे आंदोलन सुरु आहे. २३ वर्षांचा हार्दिक पटेल या आंदोलनाचे नेतृत्व करत असून, त्याला मागच्यावर्षी ऑक्टोंबर महिन्यात राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली. तेव्हापासून तो तुरुंगात बंद आहे. 
==============================================

आयपीएलच्या पहिल्या आठवडयात प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद

  • ऑनलाइन लोकमत 
    मुंबई, दि. १७  - इंडियन प्रिमीयर लीग स्पर्धेला अन्य हंगामांच्या तुलनेत पहिल्या आठवडयात थंड प्रतिसाद मिळाला आहे. सामन्यांचे थेट प्रक्षेपण करणा-यांना टीव्ही रेटींग्सची चिंता सतावत आहे तर, आयपीएलच्या पहिल्या आवठडयात महत्वाच्या स्टेडियम्समधील स्टँण्डस रिकामी असल्याचे दृश्य दिसले. 
    नुकत्याच संपलेल्या टी-२० वर्ल्डकपमुळे चाहत्यांचा आयपीएल बद्दलचा उत्साह कमी झाल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. पहिल्या आठवडयात आयपीएलमध्ये पदार्पण करणा-या गुजरात लायन्सच्या घरच्या मैदानावरील सामन्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. पण राजकोटच्या मैदानाची प्रेक्षकांना सामावून घेण्याची क्षमता कमी आहे. 
    किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे घरचे मैदान मोहाली, कोलकाता नाईट रायडर्सचे ईडन गार्डन्स, मुंबई इंडियन्सचे वानखेडे स्टेडियम इथे नेहमीपेक्षा प्रेक्षकसंख्या कमी दिसली. टी-२० वर्ल्डकपमध्ये याच मैदानांवरील सामन्यांच्या तिकीटांसाठी प्रेक्षकांच्या उडया पडल्या होत्या. तिकीट न मिळाल्याने चाहते निराश होऊन परतताना दिसले होते. 
    वानखेडे स्टेडियमवरील मुंबई इंडियन्सच्या सामन्यांना प्रेक्षकांची उपस्थिती कमी दिसली. अन्य स्टेडियम्सपेक्षा नेहमी मुंबईमधील सामन्यांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो. क्रिकेटच्या ओव्हरडोसमुळे क्रिकेट चाहत्यांची संख्या रोडावल्याचा विश्लेषकांचे म्हणणे आहे. 
    वर्ल्डकपपूर्वी वानखेडेवर भारत-दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या सराव सामन्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. एमसीएच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रेक्षक आल्याने शेवटच्या मिनिटाला तिकीटांची छपाई करावी लागली होती. भारत-दक्षिण आफ्रिका सराव सामन्याच्यावेळी महागडे तिकीट ५०० रुपयांचे होते. पण यंदाच्या आयपीएलमध्ये प्रेक्षकांचा तो उत्साह हरवलेला दिसत आहे. 
==============================================

'रॉ' च्या दोन एजंटसना अटक केल्याचा पाकिस्तानचा दावा

  • ऑनलाइन लोकमत 
    इस्लामाबाद, दि. १७ - दक्षिण सिंध प्रांतातून 'रॉ' च्या दोन एजंटना अटक केल्याचा दावा पाकिस्तानने शनिवारी केला. 'रॉ' ही भारतीय गुप्तचर संस्था असून, बलूचिस्तान आणि सिंध प्रांतातील दहशतवादी कारवायांमध्ये 'रॉ' चा सहभाग असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. 
    न्यूज इंटरनॅशनलच्या वृत्तानुसार थट्टा शहरातून 'रॉ' च्या दोन एजंटना अटक केली. सद्दाम हुसैन आणि बाचाल अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. मच्छीमार म्हणून वावरणारे हे दोघे रॉ साठी काम करत होते असे दहशतवाद विरोधी विभागाचे अधिकारी नावीद ख्वाजा यांनी सांगितले. 
    कोणाच्याही लक्षात येऊ नये यासाठी भारताने दोघांना कोड दिले होते असा दावा ख्वाजा यांनी पत्रकारपरिषदेत केला. संवेदनशील ठिकाणांचे फोटो दोघांकडून जप्त केल्याचे ख्वाजा यांनी सांगितले. चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर प्रकल्पात घातपात घडवण्याची त्यांची योजना होती असा दावा ख्वाजा यांनी केला. 
==============================================

मुलाच्या लग्नात भाजपा नेत्याचे शाही लक्षभोजन

  • उदगीर (जि. लातूर) : राज्यात भीषण दुष्काळ अन् पाणीटंचाई असतानाही शनिवारी सायंकाळी उदगीरमध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी आपल्या चिरंजीवाच्या लग्नात शाही थाट केला़ या सोहळ्यात एक लाख वऱ्हाडींची पंगत उठली़ पंगतीला बसलेल्या प्रत्येक माणसाला स्वतंत्र बाटलीबंद पाणी हे या लग्नाचे वैशिष्ट्य होते.
    गोविंद केंद्रे यांच्या मुलाचा शनिवारी सायंकाळी राजेशाही थाटात विवाह सोहळा पार पडला़ केंदे्र यांचा मतदारसंघ असलेला उदगीर भीषण पाणीटंचाईने होरपळत असताना येथे या शाही सोहळ्याची चर्चा रंगत होती़ तीस एकराहून अधिक क्षेत्रावर उभारलेला खुला मंडप, भव्यदिव्य स्वागतद्वार, विवाहमंच अन् त्यावरील रोषणाई, डोळे दिपवणारी प्रकाशव्यवस्था, विवाहानंतर झालेली आतषबाजी या सर्व उधळपट्टीचे सत्ताधारी मंत्री साक्षीदार राहिले़ विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, गृहराज्यमंत्री राम शिंदे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, विजयकुमार देशमुख, खासदार प्रीतम मुंडे, डॉ़ सुनील गायकवाड यांच्यासह राज्यभरातील आजी-माजी आमदारांची या सोहळ्याला उपस्थिती होती़
==============================================

नेताजींच्या 116 वर्षांच्या गाडीचालकानं बँकेत खोललं खातं

  • ऑनलाइन लोकमत
    आझमगढ, दि. १७- स्वातंत्र्यवीर सेनानी सुभाषचंद्र बोस हे गुमनामी बाबाच्या नावानं वावरत असल्याची अनेकदा चर्चा झाली. नेताजींच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब करणारा त्यांचा गाडीचालक कोलोनेल निझामुद्दीन यांनी 116व्या वर्षी बँकेत खातं उघडलं आहे. त्यामुळे नेताजींचे हे 116 वर्षांचे गाडीचालक कोलोनेल निझामुद्दीन चर्चेत आले आहेत.
    निझामुद्दीन यांच्या मतदार ओळखपत्र आणि पासपोर्टनुसार त्यांचा जन्म 1900 साली झाल्याचं स्पष्ट होतं आहे. बँकेत खातं खोलण्यासाठी त्यांनी दिलेल्या पुराव्यांवरून हे सिद्ध झालं आहे. फेब्रुवारीमध्ये जपानमध्ये 114 वर्ष वयाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. कोलोनेल निझामुद्दीन ही सर्वात वयस्कर व्यक्ती असल्याचं यामुळे निष्पन्न झालं आहे. कोलोनेल निझामुद्दीन यांनी वयाचे 116 वर्षं 3 महिने 14 दिवस पूर्ण केले आहेत.
    कोलोनेल यांची पत्नी अज्बुनिशा यांचं वयही 107वर्षं आहे. या दाम्पत्यानं हल्लीच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं उघडलं आहे. कोलोनेल निझामुद्दीन यांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळेच ते 116 वर्षांपर्यंत जगू शकले आहेत. 
==============================================

शेअर्स हस्तांतरणाचा तपास ३१ मेपर्यंत पूर्ण करा

  • मुंबई : सकाळ ग्रुपच्या संचालक लीला परुळेकर यांच्या बँक खात्यांमध्ये आणि शेअर्स हस्तांतरणात मार्च २०१० नंतर झालेल्या उलाढालीचा तपास ३१ मे पर्यंत पूर्ण करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने पुणे शहर, गुन्हे अन्वेषण विभागाला शनिवारी दिले. पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांनी महिनाभरापूर्वी उच्च न्यायालयात तपासासंदर्भातील सीलबंद अहवाल सादर केला. तसेच तपास पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली होती.
    ‘सकाळ’ या मराठी दैनिकाचे संस्थापक नानसाहेब परुळेकर यांच्या कन्या लीला परुळेकर ‘सकाळ’ ग्रुपच्या संचालक आहेत. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे व मानसिक स्थिती नीट नसल्याने त्या कोणताच निर्णय घेऊ शकत नाहीत. मार्च २०१० पासून त्या अंथरुणावर खिळून आहेत. कोणताच निर्णय घेण्याची क्षमता नसतानाही परुळकेर यांच्या बँक खात्यातून वारंवार मोठी रक्कम काढण्यात येत आहे. तसेच सकाळ ग्रुपला शेअर्स हस्तांतरीत करण्यावरून वाद असतानाही परुळेकर आजारी पडल्यानंतर मोठ्या प्रमाणावर परुळेकर यांचे शेअर्स सकाळ ग्रुपच्या नावे हस्तांतरीत होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, यासाठी परुळकेर यांच्याबरोबर प्राण्यांच्या कल्याणासाठी काम केलेल्या प्रणोती व्यास आणि याच क्षेत्रात परुळेकर यांना आपला गुरु मानणाऱ्या व आयटी कंपन्यांना सल्लागार म्हणून काम करणाऱ्या मनोज ओस्वाल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. या याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे होती.
==============================================
पुण्याचे पंजाबसमोर 153 धावांचे आव्हान
मोहाली - इंडियन प्रीमिअर लीगमधील किंग्स्‌ इलेव्हन पंजाबविरुद्ध रायझिंग पुणे सुपर जायंटस पुणे या "टी 20‘ क्रिकेट सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पुण्याने पंजाबसमोर विजयासाठी 153 धावांचे आव्हान ठेवले आहे. 

सर्वप्रथम नाणेफेक जिंकून पुणे संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पुण्याचा आघाडीचा फलंदाज अजिंक्‍य रहाणे अवघ्या दहा धावांवर बाद झाला. तरीही पुणे संघाने धावगती कायम राखण्यात यश मिळविले आहे. पुण्याच्या वतीने फाफ टू प्लेसी याने 53 चेंडूत 8 चौकरांच्या मदतीने 67 धावा केल्या. तर स्टिव्ह स्मिथने 5 चौकरांच्या मदतीने 26 चेंडूत 38 धावा केल्या. त्यानंतर कोणालाही फारसा प्रभाव दाखवता आला नाही. केवीन पिटरसनने 15 चेंडूत 15 धावा केल्या तर महेंद्रसिंह धोनीही अवघी एक धाव करून बाद झाला. अखेर पुणे संघाने वीस षटकात 7 बाद 152 धावा जोडल्या. पंजाबच्यावतीने मोहित शर्माने जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन करत चार षटकांत 23 धावा देऊन तीन बळी मिळविले. तर संदीप शर्मानेही दोन बळी घेतले. 
==============================================
प्रत्येकजण स्वतःला पंतप्रधान समजतो-सुभाष घई
नागपूर - एकविसाव्या शतकातील तरुणाई विचलित झाली आहे. आपल्या विचारांनाच मूल्य मानायला लागली आहे. जेएनयू असो वा एफटीआय, मला कुण्या एका व्यक्तीचे नाव घ्यायचे नाही, पण, स्वतःलाच पंतप्रधान समजण्याची नवी संस्कृती जन्माला येत आहे, असा टोला सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांनी आज मारला. 



नागपुरातील सुप्रसिद्ध व्यावसायिक विनित मोहंता यांच्या "प्रुडेंट पंचेस‘ या कवितासंग्रहाचे प्रकाशन आज सुभाष घई यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. "सतरा ते चोवीस या वयोगटातील तरुणांचे सळसळते रक्त कुठल्याही दिशेने पळू शकते. ते दहशतवादी होऊ शकतात आणि सैन्यातही जाऊ शकतात. याच वयातील विचार त्यांना राजकारणात आणतात किंवा कलावंतही बनवू शकतात. पण, दिशा भटकली की ते वाद-विवादात पडू लागतात. त्यांची स्वातंत्र्याची परिभाषा बदलते. आता तर तंत्रज्ञानाचा असा काही प्रभाव आहे, की दर मिनिटाला मतदान करण्याची सवय लागली आहे. देश आणि समाज कसा चालायला हवा, हे प्रत्येकजण सांगायला लागला आणि डोक्‍यात विचारांचे कोलाहल होऊ लागले की ते स्वतःलाच पंतप्रधान समजू लागतात‘, असे सुभाष घई म्हणाले. याचवेळी तरुणांना योग्य मार्गदर्शन करण्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची असायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
==============================================
आंबेडकर जयंतीचा खर्च दुष्काळग्रस्तांना
हमाल पंचायतीचा उपक्रम; हरीओम ग्रुपकडून पाणपोईपुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाची साठ वर्षांच्या परंपरा मोडून हमाल पंचायतीने जयंतीचा खर्च दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी दिला आहे. तर पुणे स्टेशन येथील हरीओम ग्रुपनेही "डिजे‘च्या खणखणाटाला आवर घालून पाणपोई, पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी व भिक्षेकऱ्यांना केकवाटप करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. 

हमाल पंचायतीतर्फे दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. आंबेडकर व शिवजयंतीनिमित्त पंचायतीच्या भवानी पेठ कार्यालयापासून भव्य मिरवणूक काढली जाते. मात्र राज्यातील भीषण स्थिती लक्षात घेऊन जयंतीचा नाहक खर्च टाळून दहा हजार रुपयांचा निधी पंचायतीचे उपाध्यक्ष सुबराव बनसोडे यांनी महात्मा फुले प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांच्याकडे सुपूर्द केला.

पुणे स्टेशन येथील ढोले पाटील रस्त्यावरील हरीओम ग्रुपनेही जयंतीचा कार्यक्रम व डीजे रद्द करून विधायक उपक्रम राबविला. मुख्य चौकात पाणपोई आणि पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी परिसरातील सोसायट्यांमध्ये 125 भांडी ठेवण्यात आली. सव्वाशे किलोचा केक गरिबांना वाटण्यात आला. सुजित यादव, संदीप ढोले पाटील, दीपक मोहिते पाटील, शशिकला ढोले पाटील या वेळी उपस्थित होते. याज्ञिक ढोले पाटील, अनंत बनसोडे, विशाल कांबळे, तुषार सोपकुतळे, विनायक साळवी, सागर पटेकर, मिलिंद भडकवाड, अतुल वाघमारे आदींनी जयंतीला विधायक वळण दिले.

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षानेही जयंतीचे औचित्य साधत 125 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले. पक्षाचे अध्यक्ष रमेश साळवे, गणेश भोसले, अरुण भिंगारदिवे, अप्पा गायकवाड, फिरोज मुल्ला, राजेश नायर उपस्थित होते. 
==============================================
20 ट्रक नारळ अन्‌ 10 हजार गुलाल पोती
चैत्र यात्रेसाठी जोतिबावर व्यापारी सज्ज - खोबरे वाटीचे तुकडे करण्यास सुरवात 
जोतिबा डोंगर - दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेसाठी यंदा वीस ट्रक नारळ, दहा हजार पोती गुलाल व एक हजार पोती सुके खोबरे व्यापारी, दुकानदार यांनी विक्रीसाठी ठेवले आहे. लहान दुकानदारांनी गुलाल, नारळ, खोबरे यांची विक्री सुरू केली असून, खोबरे वाटीचे तुकडे करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. 

‘जोतिबाच्या नावानं चांगभलं‘चा जयघोष करत गुलाल-खोबऱ्याची उधळण करण्याची पारंपरिक परंपरा चैत्र यात्रेत आहे. हाताच्या मुठीत गुलाल, खोबरे घेऊन ते मंदिर शिखर व सासनकाठीवर उधळले जाते. जोतिबाच्या दर्शनासाठी राज्यातून आलेल्या भाविकांचे सर्वांग गुलालात न्हाऊन निघते. भाविकांच्या अंगावर पडलेला हा गुलाल महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांतील कानाकोपऱ्यात जोतिबा चैत्र यात्रेची महती घेऊन जातो.
गुलाल इस्लामपूर, कुंडल (सांगली), टाकळी (पंढरपूर) व वाई परिसरात तयार केला जातो. डोंगरावर आणला जाणारा सर्रास गुलाल हा केमिकलयुक्त आहे.
पूर्वी गुलाल सुगंधयुक्त होता. तो फुलापासून व साबूपासून तयार केला जात असे. त्याने कोणत्याही प्रकारची इजा होत नव्हती. त्यामुळे डोंगरावर केमिकल नसलेला पारंपरिक गुलाल ठेवण्याची सक्ती प्रशासनाने करणे गरजेचे आहे.
डोंगरावर येणारा नारळ, खोबरे वाटी कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश येथून येते. नारळांमध्ये शेंडी व कंगणार असे दोन प्रकार आहेत.

जोतिबा देवास दवणा वाहण्याची प्राचीन परंपरा असून वात, कफ, पित्त या त्रिदोषांवर औषधी असलेले सुगंधी दवणा हे जोतिबा देवाचे आवडते फूल आहे. डोंगरावर आलेला प्रत्येक भक्त देवाच्या चरणी दवणा वाहतोच. संस्कृतमधील दवणा या नावावरून वीत ते दीड वीत असणाऱ्या भुरकट पांढऱ्या वनस्पतीस दवणा हे नाव पडले. मूळची ही वनस्पती काश्‍मीरमधील आहे. 
==============================================
'युपी'नंतर उत्तराखंडमध्ये सुरु झाले "पोस्टर नाट्य'
डेहराडून - उत्तर प्रदेशमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसविरुद्ध पोस्टर लावल्यानंतर उत्तराखंडमध्ये भाजपविरुद्ध पोस्टर झळकले आहे. उत्तराखंड सरकारविरोधात बंड करणाऱ्या आमदारांना बकऱ्याच्या स्वरुपात दाखवून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना त्यांचे खरेदीदार दाखवणारे पोस्टर उत्तराखंडमध्ये झळकत आहे. उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप-कॉंग्रेसचे हे "पोस्टर नाट्य‘ सुरू झाल्याची चर्चा आहे. 

यापूर्वी भारतीय जनता पक्षाने वाराणसी येथे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना कौरवाच्या भूमिकेत दाखवणारे पोस्टर उत्तर प्रदेशमध्ये लावले होते. कॉंग्रेसने त्याचा बदला उत्तराखंडमध्ये घेतला आहे. उत्तर प्रदेशमधील भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष केशवप्रसाद मौर्य यांना शुभेच्छा देताना भाजप कार्यकर्त्यांनी मौर्य यांना कृष्णाच्या, तर राहुल गांधी, अखिलेशसिंह यादव व मायावती यांना द्रौपदीचं वस्त्रहरण करणाऱ्या कौरवांच्या रूपात दाखवणारे पोस्टर वाराणसीत लावले होते. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने भाजपला तीन विकाऊ आमदारांची गरज आहे, असा आशय असलेला हिंदीतील संदेश लिहून कॉंग्रेसविरुद्ध बंड करणाऱ्या झारखंडमधील आमदारांना पोस्टरवर बकऱ्याच्या रुपात दाखविले आहे. तसेच या सर्वांच्या गळ्यात बांधलेली दोरी अमित शहा यांच्या हातात दाखविलेले पोस्टर डेहराडूनमध्ये गर्दीच्या ठिकाणी ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत. पोस्टरबाबत बोलताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष किशोर उपाध्याय यांनी या लोकभावना असल्याची माहिती दिली.
==============================================
बुडीत कर्जाची एकसमान व्याख्या करण्याचा प्रस्ताव
लंडन : आंतरराष्ट्रीय बँकिंग नियमन संस्था ‘बीआयएस‘ने बुडीत कर्जांची एकसमान व्याख्या करण्याचा व बँकांची बोजा पेलण्याची मर्यादा (फोरबिअरन्स) निश्चित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्सने (बीआयएस) ‘प्रुडेन्शिअल ट्रीटमेंट ऑफ प्रॉब्लेम अॅसेट्स-डेफिनेशन ऑफ नॉन-परफॉर्मिंग एक्सपोजर्स अँड फोरबिअरन्स‘ नावाने सादर केलेल्या अहवालात हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. 

भारतात सध्या बुडित कर्जांची समस्या निर्माण झाली आहे. अशावेळी या अहवालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतातील बँकांसमोर सध्या बुडित कर्जाचा डोंगर तयार झाला आहे. देशातील सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये तब्बल 8 लाख कोटी रुपयांची अनुत्पादित कर्जे आहेत. 

स्वित्झर्लंडमधील बाझेलस्थित समितीचे बँकिंग नियंत्रण मार्गदर्शक तत्वे सादर करण्यामागे कर्जाचे वर्गीकरण करण्यासाठी संख्यात्मक व गुणात्मक निकषांचा मेळ घालण्याचे उद्दिष्ट आहे. 
कर्जांच्या समस्यांचे वर्गीकरण करण्यासाठी एकसमान आंतरराष्ट्रीय व्याख्या नाही. बँकांकडून वेगवेगळ्या प्रकारे बुडित कर्जांचे वर्गीकरण केले जाते. त्यामुळे बुडित कर्जाची व्याख्या केल्यानंतर कर्जाचे वर्गीकरण करण्यासाठी 90 दिवसांपेक्षा जास्त काळ न फेडण्यात आलेले किंवा परतफेडीची आशा नसलेले कर्ज हा एक निकष तयार होईल, असे बीआयएसने म्हटले आहे. तसेच कर्जधारकाच्या आर्थिक स्थितीमुळे कर्जाची पुनर्रचना फोरबिअरन्सशी निगडीत आहे.  
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन बीआयएसचे उपाध्यक्ष आहेत. समितिमध्ये 60 देशांच्या मध्यवर्ती बँकांचे सदस्य आहेत. 
==============================================
...तर विजय गोयलांवर कारवाई करू - आप
नवी दिल्ली - दिल्लीतील सम-विषम योजनेतील नियमांचा भंग केला तर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभेतील खासदार विजय गोयल यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे आम आदमी पक्षाने स्पष्ट केले आहे. 

दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष गोयल यांनी सम-विषम योजना हा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा प्रसिद्धीसाठीचा स्टंट असल्याची टीका केली आहे. तसेच या योजनेचा निषेध म्हणून आम्ही सोमवारी या योजनेतील नियमांचा भंग केल्याचेही जाहीर केले आहे. या पार्श्‍वभूमीवर बोलताना दिल्लीतील परिवहन मंत्री गोपाल राय यांनी म्हटले आहे की, "सम-विषम योजनेतील नियमांचा भंग करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही. भाजप नेत्याला (गोयल) नियमांचा भंग केल्याबद्दल यापूर्वी स्वयंसेवकांनी ‘गांधीगिरी‘चा भाग म्हणून दोन वेळा फूल दिले होते. जर त्यांनी पुन्हा एकदा नियमांचा भंग केला त्यांना दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल.‘
==============================================

No comments: