[अंतरराष्ट्रीय]
१- फ्रांस; बुरखा परिधान करणे हे गुलामगिरीचे समर्थन
२- दहशतवादाचा अंदाज घेण्यात राष्ट्रसंघाला अपयश - मोदी
३- दहशतवादविरोधी लढाईत पाकच्या बाजूनेच - ओबामा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- कोलकात्यातील पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा 24 वर
५- कोलकाता; 'पूल दुर्घटना ही देवाची इच्छा', कंपनीचं अजब उत्तर
६- सिमन्सने मोडलं भारताचं स्वप्न, विंडिजचा 7 विकेट्सने विजय
७- विजय मल्ल्यांच्या आलिशान एअरबस ए-३१९ चा लिलाव होणार
८- दहशतवाद दुस-याची समस्या हा विचार बदल - पंतप्रधान नरेंद्र मोदी
९- युरिया उत्पादनात यंदा वीस लाख टनांची वाढ
१०- भारतीय "गुप्तहेरा'बाबत सर्व जगाला माहिती
११- स्वच्छ भारत मोहिमेसाठी जागतिक बॅंकेची मदत
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१२- नवे आर्थिक वर्ष... नवे बदल!, बचतीवरचे व्याजदर आजपासून कमी
१३- मुंबईत पोटच्या 3 मुलांना आईने ऊसाच्या रसातून विष पाजलं
१४- निवृत्तीच्या प्रश्नावर धोनीकडून पत्रकाराची शाळा
१५- रेडीरेकनरच्या दरात किंचित वाढ, आजपासून नवे दर लागू
१६- एमपीएससीसाठी खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा वाढवली
१७- तमिळनाडूबाबत दोन दिवसांत निर्णय
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- मुंबई; जावयबापूचा सासूच्या पैशांवर डल्ला, 42 लाख रुपये लंपास
१९- पुणे; गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या महेश मोतेवारचा ताबा सीआयडीकडे
२०- गतिमान एक्सप्रेस ११० मिनिटात पार करणार २०० किमी अंतर
२१- केरळमध्ये भाजप यंदा आशावादी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- विराट कोहलीने एकाच सामन्यात मॅक्युलम आणि गेलचा विक्रम मोडला
२३- 3GB रॅम, 3000mAh बॅटरी, शाओमीचा Mi5 स्मार्टफोन लॉन्च
२४- चेन्नईत एसी लोकल तयार, लवकरच मुंबईकरांच्या सेवेत
२५- निवृत्तीच्या प्रश्नावर कॅप्टन कूलने पत्रकाराला शेजारी बसवून उत्तर दिले
२६- हा भारताचा पराभव नव्हे; वेस्ट इंडिजचा विजय
२७- नो बॉल, नो फायनल
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[आजचे वाढदिवस]
सोनल पाटील, रमेश काळे, प्रभाकर कोकरे, राहुल कांबळे, सचिन चीटमलवार, राजू बाजेकर, सुनील लुंगारे, सुर्यकांत पवार, युनुस शेख, रझ्झाक कुरेशी, माणिक
चव्हाण, श्रीनिवास पाटील, क़ुअदिर अहमद, राजेंद्र बनाइत,
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
ठरवलेले सर्व काही मिळत नाही पण जे आपण ठरवतो त्यासाठी आपले प्रयत्न कमी पडले तर जे आपण ठरवतो त्यासाठी आपण कधीच प्रामाणिक नसतो
(विराज पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
===========================================

===========================================












१- फ्रांस; बुरखा परिधान करणे हे गुलामगिरीचे समर्थन
२- दहशतवादाचा अंदाज घेण्यात राष्ट्रसंघाला अपयश - मोदी
३- दहशतवादविरोधी लढाईत पाकच्या बाजूनेच - ओबामा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- कोलकात्यातील पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा 24 वर
५- कोलकाता; 'पूल दुर्घटना ही देवाची इच्छा', कंपनीचं अजब उत्तर
६- सिमन्सने मोडलं भारताचं स्वप्न, विंडिजचा 7 विकेट्सने विजय
७- विजय मल्ल्यांच्या आलिशान एअरबस ए-३१९ चा लिलाव होणार
८- दहशतवाद दुस-याची समस्या हा विचार बदल - पंतप्रधान नरेंद्र मोदी
९- युरिया उत्पादनात यंदा वीस लाख टनांची वाढ
१०- भारतीय "गुप्तहेरा'बाबत सर्व जगाला माहिती
११- स्वच्छ भारत मोहिमेसाठी जागतिक बॅंकेची मदत
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१२- नवे आर्थिक वर्ष... नवे बदल!, बचतीवरचे व्याजदर आजपासून कमी
१३- मुंबईत पोटच्या 3 मुलांना आईने ऊसाच्या रसातून विष पाजलं
१४- निवृत्तीच्या प्रश्नावर धोनीकडून पत्रकाराची शाळा
१५- रेडीरेकनरच्या दरात किंचित वाढ, आजपासून नवे दर लागू
१६- एमपीएससीसाठी खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा वाढवली
१७- तमिळनाडूबाबत दोन दिवसांत निर्णय
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- मुंबई; जावयबापूचा सासूच्या पैशांवर डल्ला, 42 लाख रुपये लंपास
१९- पुणे; गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या महेश मोतेवारचा ताबा सीआयडीकडे
२०- गतिमान एक्सप्रेस ११० मिनिटात पार करणार २०० किमी अंतर
२१- केरळमध्ये भाजप यंदा आशावादी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- विराट कोहलीने एकाच सामन्यात मॅक्युलम आणि गेलचा विक्रम मोडला
२३- 3GB रॅम, 3000mAh बॅटरी, शाओमीचा Mi5 स्मार्टफोन लॉन्च
२४- चेन्नईत एसी लोकल तयार, लवकरच मुंबईकरांच्या सेवेत
२५- निवृत्तीच्या प्रश्नावर कॅप्टन कूलने पत्रकाराला शेजारी बसवून उत्तर दिले
२६- हा भारताचा पराभव नव्हे; वेस्ट इंडिजचा विजय
२७- नो बॉल, नो फायनल
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[आजचे वाढदिवस]
सोनल पाटील, रमेश काळे, प्रभाकर कोकरे, राहुल कांबळे, सचिन चीटमलवार, राजू बाजेकर, सुनील लुंगारे, सुर्यकांत पवार, युनुस शेख, रझ्झाक कुरेशी, माणिक
चव्हाण, श्रीनिवास पाटील, क़ुअदिर अहमद, राजेंद्र बनाइत,
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
ठरवलेले सर्व काही मिळत नाही पण जे आपण ठरवतो त्यासाठी आपले प्रयत्न कमी पडले तर जे आपण ठरवतो त्यासाठी आपण कधीच प्रामाणिक नसतो
(विराज पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
===========================================
नवे आर्थिक वर्ष... नवे बदल!, बचतीवरचे व्याजदर आजपासून कमी
मुंबई: नव्या आर्थिक वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. आज 1 एप्रिलपासून या नव्या वर्षात काही नवे नियम लागू होणार आहेत. त्यामुळे सामन्यांना अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागणार आहे. नुकतंच जाहीर करण्यात आलेलं आर्थिक संकल्प आजपासून लागू होणार आहे. त्यामुळे आजपासून बऱ्याच गोष्टी महाग होणार आहेत. पाहूयात नेमके काय काय बदल होणार आहेत.
मुंबईत पोटच्या 3 मुलांना आईने ऊसाच्या रसातून विष पाजलं
मुंबई : मुंबईतील एका महिलेने प्रियकराच्या सोबतीने पोटच्या तीन मुलांना ऊसाच्या रसातून विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या जुहू भागात ही खळबळजनक घटना घडली आहे.
तीनही मुलांवर विलेपार्ले पश्चिमला असणाऱ्या कूपर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यातील एका मुलाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.
आरोपी महिलेचे परपुरूषाशी प्रेमसंबंध असल्यानं ती त्याच्यासोबत राहते, 3 मुलं तिच्या पतीकडे राहतात. काल रात्री ही महिला मुलांना भेटायला आणि त्यांना ऊसाचा रस पाजला. त्यानंतर मुलांना त्रास होऊ लागल्यानं त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं.
डी.एन. नगर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून मुलांना जीवे मारण्याचा प्रयत्न कशासाठी केला, याचा तपास पोलीस करत आहेत.
===========================================
'पूल दुर्घटना ही देवाची इच्छा', कंपनीचं अजब उत्तर
कोलकाता: कोलकातामध्ये पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, हा पूल बांधणाऱ्या आयव्हीआरसीएल कंपनीनं या दुर्घटनेसाठी चक्क देवाला जबाबदार ठरवलं आहे. देवाच्या कृपेनं हा पूल पडल्याची अजब प्रतिक्रिया आयव्हीआरसीएल कंपनीनं दुर्घटनेनंतर काढलेल्या पत्रकात दिली आहे.
कंपनीच्या या प्रतिक्रियेवर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातो आहे. आयव्हीआरसीएल कंपनीला पूलाच्या बांधकामाचं कंत्राट मिळालं. गेल्या 6 वर्षांपासून या पूलाचं काम सुरु आहे. अजूनही या पूलाचं 45 टक्के बांधकाम होणं बाकी आहे.
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचं वातावरण तापलं असताना कोलकात्यात बांधकाम सुरु असलेला भलामोठा पूल काल कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला. पूलाचा ढिगारा हटवण्यासाठी एनडीआरएफ आणि लष्कराच्या जवानांनी जोरदार काम सुरु केलं आहे.
काल दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी उत्तर कोलकात्यातील गणेश टॉकीज परिसरात ही घटना घडली. हावडा ते उत्तर कोलकात्याला जोडणाऱ्या या पूलाचं काम राज्य सरकारनं ICRCL या कंपनीला दिलं होतं. 2009 साली हे काम सुरु झालं खरं, पण जमीन अधिग्रहणाच्या वादातून पुलाचं काम दोन वर्षातच बंद झालं. अखेर फेब्रुवारी 2016ला पुन्हा एकदा पुलाचं काम सुरु झालं.
काल या पुलाच्या दोन गर्डर खचल्याचं समोर आलं होतं. मात्र त्याकडं दुर्लक्ष झालं आणि दुपारी पूलाचा काही भाग कोसळला. ज्यात अनेक चारचाकी गाड्या, ट्रक, टेंपोसह शेकडो पादचारीही दबले गेले. दरम्यान, या घटनेनंतर ममता बॅनर्जींनी आपले सगळे नियोजित दौरे रद्द करुन थेट घटनास्थळी धाव घेतली.
===========================================
निवृत्तीच्या प्रश्नावर धोनीकडून पत्रकाराची शाळा
मुंबई: ट्वेन्टी20 विश्वचषकात टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आल्यावर आता कर्णधार धोनीचं काय होणार? असा प्रश्न पुन्हा उभा राहिला. गेला काही काळ अधूनमधून धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगताना दिसते.
साहजिकच विंडीजविरुद्धच्या पराभवानंतर धोनीला हाच प्रश्न त्याला पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. ऑस्ट्रेलियन पत्रकार सॅम फेरीस यांनी धोनीला निवृत्तीविषयी छेडलं असता, धोनीनं त्यांची चांगलीच शाळा घेतली.
===========================================
कोलकात्यातील पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा 24 वर
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचं वातावरण तापलं असताना कोलकात्यात बांधकाम सुरु असलेला भलामोठा पूल कोसळला आहे. या पुलाखाली जवळपास 150 जण अडकल्याची भीती व्यक्त होते आहे.
या दुर्घटनेत आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पूलाचा ढिगारा हटवण्यासाठी एनडीआरएफ आणि लष्कराच्या जवानांनी जोरदार काम सुरु केलं आहे.
काल दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी उत्तर कोलकात्यातील गणेश टॉकीज परिसरात ही घटना घडली. हावडा ते उत्तर कोलकात्याला जोडणाऱ्या या पूलाचं काम राज्य सरकारनं ICRCL या कंपनीला दिलं होतं.
2009 साली हे काम सुरु झालं खरं, पण जमीन अधिग्रहणाच्या वादातून पुलाचं काम दोन वर्षातच बंद झालं. अखेर फेब्रुवारी 2016 ला पुन्हा एकदा पुलाचं काम सुरु झालं. काल या पुलाच्या दोन गर्डर खचल्याचं समोर आलं होतं.
मात्र, त्याकडं दुर्लक्ष झालं, आणि आज दुपारी पूलाचा काही भाग कोसळला. ज्यात अनेक चारचाकी गाड्या, ट्रक, टेंपोसह शेकडो पादचारीही दबले गेले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर ममता बॅनर्जींनी आपले सगळे नियोजित दौरे रद्द करुन थेट घटनास्थळी धाव घेतली.
===========================================
रेडीरेकनरच्या दरात किंचित वाढ, आजपासून नवे दर लागू
मुंबई : घरांच्या किंमती वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या रेडीरेकनरच्या दरामध्ये राज्य सरकारनं एक एप्रिलपासून वाढ केली आहे. मुंबईमध्ये सरासरी 7 टक्के, तर पुण्यामध्ये सरासरी सर्वाधिक 11 टक्क्यांनी दरात वाढ करण्यात आली आहे.
ग्रामीण क्षेत्रासाठी ही वाढ 8 टक्के, नगर परिषद क्षेत्रासाठी 7 टक्के आणि राज्याची एकूण सरासरी वाढ 7 टक्के इतकी असणार आहे.
मागील 5 ते 6 वर्षांत रेडीरेकनरच्या दरात मोठी वाढ झाली होती. यावर्षी मंदी आणि दुष्काळी परिस्थितीचा विचार करून तुलनेत कमी वाढ करण्यात आली असल्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत जाहीर केलं आहे.
===========================================
जावयबापूचा सासूच्या पैशांवर डल्ला, 42 लाख रुपये लंपास
नवी मुंबई : जावयाने आपल्या सासूच्या पैशांवर डल्ला मारल्याची घटना नेरुळमध्ये समोर आली आहे. सासूच्या पैशांची चोरी करणाऱ्या या जावयाला नेरुळ पोलिसांनी केवळ चार तासात बेड्या ठोकल्या आहेत.
अमय शेठ असं या जावयाच नाव आहे. अमय आपली पत्नी शीतल आणि आपल्या लहान बाळासह नेरुळ सेक्टर 20मध्ये राहायास होता. काही दिवसांपूर्वीच अमयची सासु हंसा परमार या आपल्या मुलीकडे राहायला आल्या होत्या.
हंसा यांनी आपलं मुलुंडमधील घर काही दिवसांपूर्वीच विकलं असल्याने नवीन घर विकत घेईपर्यंत आपल्या मुलीकडे राहण्याचा निर्णय हंसा यांनी घेतला होता. आपलं मुलुंडमधील घर विकून जे 43 लाख रुपये हंसा यांच्या वाट्याला आले होते, ते सर्व पैसे त्यांनी आपली मुलगी शीतल हिच्याकडे ठेवण्यास दिले होते.
शीतलने हे पैसे आपका नवरा अमयच्या देखत घरातील कपाटात ठेवले होते. आज मुलुंडमध्येच नवीन घर विकत घेण्याच्या उद्देश्याने हंसा आणि शीतल यांनी या पैशातील 1 लाख रुपये काढून आपल्या सोबत नेले होते. हंसा आणि शीतल घरातून जाताच हंसा यांचा जावई अमयने कपाटातील 42 लाख रुपये आणि शीतलचे 4 लाख 67 हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केले.
===========================================
एमपीएससीसाठी खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा वाढवली
मुंबई : एमपीएससीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. खुल्या प्रवर्गातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्यामर्यादा वाढवण्यात आली आहे.
राजपत्रित अधिकाऱ्यांची वर्यामर्यादा 33 वरुन 38 वर्ष करण्यात आली आहे. तर पीएसआयची वर्यामर्यादा 28 वरुन 33 वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच पोलिस शिपाई पदाची वयोमर्यादा 25 वरुन 28 वर्ष करण्यात आली आहे.
खुल्या प्रवर्गातून परीक्षा देणाऱ्यांसाठी कमी संधी मिळत होती. त्यामुळे वर्यामर्यादा वाढवण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. अखेर खुल्या प्रर्वगाची वयोमर्यादा वाढवण्याच्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडाळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
===========================================
सिमन्सने मोडलं भारताचं स्वप्न, विंडिजचा 7 विकेट्सने विजय
मुंबई : भारतीय संघाचं टी ट्वेण्टी विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे. उपांत्य सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर तब्बल 7 विकेट्स राखून मात केली. भारताचं 192 धावांचं आव्हान विंडिजने अवघ्या 3 विकेट्सच्या मोबदल्यात 19.4 षटकांत पार केलं.
लिंडल सिमन्स वेस्ट इंडिजसाठी लकी ठरला. तो तब्बल तीन वेळा तो बाद होता होता वाचला. या संधीचा फायदा उचलत अखेर सिमन्स 82 धावांवर नाबाद राहिला. सिमन्सने 51 चेंडूत 82 धावा ठोकल्या. यामध्ये त्याने 5 दमदार सिक्सर आणि 7 चौकार ठोकले.
सिमन्सला अँड्रे रसेलची जबरदस्त साथ लाभली. रसेलनेही 20 चेंडूत 4 सिक्सर आणि तीन चौकार ठोकत नाबाद 43 धावा कुटल्या.
या दोघांच्या अभेद्य भागीदारीमुळे तमाम भारतीयांच्या अपेक्षांचा पालापाचोळा झाला.
भारताचं 192 धावांचं अशक्य वाटणारं लक्ष्य घेऊन विंडिजचे ख्रिस गेल आणि जॉन्सन चार्ल्स मैदानात उतरले. मात्र भारताने टाकलेल्या जाळ्यात ख्रिस गेल अलगद अडकला. गेलला बुमराहने त्रिफळाचीत करत तमाम भारतीयांच्या आशा उंचावल्या. पण याच उंचावलेल्या आशांनी भारतीय खेळांडूचा घात केला.
===========================================
गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या महेश मोतेवारचा ताबा सीआयडीकडे
पुणे : ‘समृद्ध जीवन’चा सर्वेसर्वा महेश मोतेवारचा ताबा सीबीआयकडून सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. मोतेवारला काल पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं 12 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे.
ओदिसामधील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने काही महिन्यांपूर्वी मोतेवारला अटक केली होती. सीबीआयचा ओदिसामधील तपास पूर्ण झाल्यानंतर मोतेवारला सीआयडीकडे सोपवण्यात आलं आहे.
दरम्यान, महेश मोतेवारने मोतेवारांनी गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याने राज्यात त्याच्यावर 14 गुन्हे नोंद आहेत. तसेच सेबीच्या नियमांचा भंग केल्याबद्दलही त्याच्यावर गुन्हा नोंद आहे .
===========================================
विराट कोहलीने एकाच सामन्यात मॅक्युलम आणि गेलचा विक्रम मोडला
मुंबई : विराट कोहलीच्या आणखी एक डॅशिंग खेळीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजसमोर 193 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. कोहलीने अवघ्या 47 चेंडूत धडाकेबाज नाबाद 89 धावा ठोकल्या. त्यामुळे भारताने निर्धारित 20 षटकात दोन बाद 192 धावा केल्या.
या सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं.
भारताकडून फलंदाजीसाठी रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे मैदानात उतरले. या दोघांनी अत्यंत सावध सुरुवात केली. मात्र एकदा जम बसल्यानंतर रोहित शर्माने हात सैल सोडला. रोहितने फटकेबाजी केला, त्यामुळे भारताने 35 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या.
मग रोहित शर्माने खेळाची सूत्रं हाती घेतली. रोहितने तीन चौकार आणि तीन षटकार ठोकून आतषबाजीला सुरुवात केली. मात्र बद्रीच्या चेंडूवर तो पायचित झाला. त्याने 31 चेंडूत 43 धावा केल्या.
यानंतर अजिंक्य रहाणेच्या साथीला जगातला सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली आहे. या दोघांनी एकेरी-दुहेरी धावा घेत, विंडिज खेळाडूंना चारी बाजूंनी पळवलं. रहाणे-कोहलीने जिथे एकही धाव होत नव्हती, तिथे एक, जिथे एक धाव शक्य होती, तिथे दोन धावा घेत विंडिज खेळाडूंचं क्षेत्ररक्षण भेदलं.
मात्र मधल्या काही षटकांत चौकार न गेल्याने धावांची गती तुलनेने कमी झाली. ही धावगती वाढवण्यासाठी रहाणेने प्रयत्न सुरु केले. त्याने खराब चेंडूवर फटके मारले. मात्र एक उत्तुंग फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. सीमारेषेजवळ डॅरेन ब्राव्होने त्याचा उत्कृष्ठ झेल टिपला.
===========================================
3GB रॅम, 3000mAh बॅटरी, शाओमीचा Mi5 स्मार्टफोन लॉन्च
मुंबई : फ्लॅश सेलच्या माध्यमातून भारतीय गॅझेटप्रेमींना हाय एन्ड फीचर्स तरीही स्वस्त स्मार्टफोन देणाऱ्या चीनच्या एमआय शाओमीने आज त्यांचा Mi5 हा फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात लाँच केला. 3GB रॅम आणि 32GB इनबिल्ट मेमरी स्टोरेज असलेल्या Mi5 ची किंमत रु. 24999 आहे. चीनमध्ये सर्वप्रथम एमआय 5 लाँच करण्यात आला होता.
मोबाईल वर्ल्ड काँग्रेस या खास गॅझेटच्या आंतरराष्ट्रीय ट्रेड शोमध्ये शाओमी एमआय 5 चे दोन व्हेरिएन्ट्स लाँच करण्यात आले होते. यामध्ये प्राईम एडिशन (3GB रॅम आणि 64GB स्टोरेज) तर एमआय 5 प्रो एडिशन (4GB रॅम आणि 128GB स्टोरेज) असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र भारतात फक्त एकच व्हेरिएन्ट आज लाँच करण्यात आलंय.
5.5 इंच स्क्रीन असलेल्या Mi5 मध्ये दोन नॅनो सिम वापरता येतात तसंच या स्मार्टफोनच्या स्क्रीनचं रिझोल्यूशन 1080X1920 म्हणजे फुल एचडी आहे. पीपीआय म्हणजे पिक्सेल डेन्सिटी 428 आहे. शाओमीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन 530 जीपीयूसह स्नॅपड्रॅगन क्वॉलकॉम 820 प्रोसेसरने सज्ज आहे. या स्मार्टफोनमध्ये फेस डिटेक्शन ऑटोफोकस आणि एलईडी फ्लॅश या सुविधांसह सोनीचा आयएमएक्स 298 कॅमेरा आहे. या स्मार्टफोनचा रिअर म्हणजे मुख्य कॅमेरा 16 मेगापिक्सेलचा तर फ्रंट म्हणजे सेल्फी कॅमेरा 4 अल्ट्रामेगापिक्सेल आणि 2 मायक्रॉन पिक्सेलचा आहे. या दोन्ही कॅमेऱ्यातून 4K दर्जाचा व्हिडीओ शूट करता येतो.
एमआय 5 ची बॅटरी 3000mAh क्षमतेची आहे. आज लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनची प्रत्यक्ष विक्री 6 एप्रिलपासून सुरु होणार आहे.
===========================================
चेन्नईत एसी लोकल तयार, लवकरच मुंबईकरांच्या सेवेत
मुंबई : मुंबईकरांसाठी आकर्षण असणारी पहिली एसी लोकल संपूर्णपणे तयार झाली आहे. चेन्नईच्या इंटेग्रल कोच फॅक्टरीमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी या लोकलला सजवण्यात आलं होतं.
ही लोकल एप्रिल महिन्याच्या अखेरीस मुंबईत दाखल होणार आहे. त्यानंतर काही चाचण्यांनंतर ही लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होईल. त्यामुळे लवकरच मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील प्रवाशांना कडाक्याच्या उन्हातही गारेगार प्रवास अनुभवता येणार आहे.
===========================================
विजय मल्ल्यांच्या आलिशान एअरबस ए-३१९ चा लिलाव होणार
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १ - किंगफिशर एअरलाईन्सकडून थकलेल्या कराची रक्कम वसूल करण्यासाठी सर्व्हीस टॅक्स विभागाने विजय मल्ल्या यांचे आलिशान एअरबस ए ३१९ विमानाचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. किंगफिशर एअरलाईन्सने सर्व्हीस टॅक्स विभागाचा आठशे कोटीहून अधिक रक्कमेचा कर थकवला आहे.या लिलावातून १५० कोटी रुपये मिळतील असा सर्व्हीस टॅक्स विभागाचा अंदाज आहे. १२ मे रोजी या विमानासोबत विमानातीला काही सामनाचाही लिलाव होणार आहे. सर्व्हीस टॅक्स विभागाने डिसेंबर २०१३ मध्ये एअरबस ए ३१९ ताब्यात घेतले होते.विमानाच्या विक्रीसाठी एअर इंडियाला टेक्निकल सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. योग्य खरेदीदाराने विमानाची प्रत्यक्ष पाहणी करण्यापूर्वी विमानाची साफसफाई, स्वच्छतेची जबाबदारी एअर इंडियाकडे आहे. मल्ल्या यांच्या खासगी वस्तू, त्यांच्या कुटुंबाचा फ्रेम केलेला फोटो अशा काही वस्तू विमानातून काढणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.या विमानाची मालकी सी.जे.लिजिंगकडे (केमॅन) आहे. हे विमान त्यांनी किंगफिशरला भाडयावर दिले आहे. या विमानाच्या लिलावात कायदेशीर अडथळा नसल्याचे मागच्यावर्षी मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. या विमानाशिवाय मल्ल्यांचे जेट, पाच एटीआर विमाने आणि दोन हॅलिकॉप्टर सर्व्हीस टॅक्स विभागाने जप्त केली आहेत.
===========================================
दहशतवाद दुस-याची समस्या हा विचार बदल - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. १ - अण्विक सुरक्षा परिषदेसाठी अमेरिकेत गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व देशांना दहशतवादा विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. दहशतवाद ही दुस-या कोणाची समस्या आहे हा विचार सोडून द्या.तो त्याचा दहशतवादी, हा माझा दहशतवादी नाही ही वृत्ती बदला असे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी रात्री अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आयोजित केलेल्या डिनर कार्यक्रमात बोलताना म्हणाले.दहशतवादाचे आज जगभर जाळे आहे. पण आपण या आव्हानाचा सामना करताना आपली कृती देशपातळीवर मर्यादीत रहात आहे. दहशतवादाचा सामना करण्यासाठी मोदींनी सर्व देशांना परस्परातील सहाकार्य वाढवण्याचे आवाहन केले. दहशतवादी आज २१ व्या शतकातील तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. दहशतवाद्यांना आज जगभरातून मदत मिळतेय पण त्यातुलनेत देशांमध्ये सहकार्य वाढलेले नाही असे मोदींनी सांगितले.
===========================================
गतिमान एक्सप्रेस ११० मिनिटात पार करणार २०० किमी अंतर
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १ - बहुप्रतिक्षित गतिमान एक्सप्रेसची पुढच्या आठवडयापासून सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. देशातील ही पहिली सेमी हाय-स्पीड ट्रेन आहे. दिल्ली-आग्रा मार्गावर १६० कि.मी. प्रतितास वेगाने धावणारी ही देशातील पहिली ट्रेन आहे. ११० मिनिटात ही ट्रेन २०० कि.मी. अंतर पार करणार आहे.ही देशातील पहिली अशी ट्रेन आहे ज्यामध्ये विमानातील हवाई सुंदरीप्रमाणे ट्रेन सुंदरी असतील. ट्रायल रनसह या ट्रेनच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असून, पुढच्या आठवडयात पाच एप्रिलला केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याहस्ते या ट्रेनचे उदघाटन होण्याची शक्यता आहे असे रेल्वे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.प्रवाशांना विमानात जशा उच्च दर्जाच्या सुविधा मिळतात तशाच खानपानापासून सर्व सुविधा या ट्रेनमध्ये देण्याचा प्रयत्न आहे. या ट्रेनच्या तिकीटासाठी शताब्दी एक्सप्रेसपेक्षा २५ टक्के जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. या ट्रेनमधील सुंदरी फूल देऊन प्रवाशाचे स्वागत करणार आहेत.
===========================================
निवृत्तीच्या प्रश्नावर कॅप्टन कूलने पत्रकाराला शेजारी बसवून उत्तर दिले
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १ - कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने गुरुवारी रात्री निवृत्तीच्या प्रश्नावर वेगळयाच कृतीतून उत्तर देऊन सर्वांनाच अवाक केले. ऑस्ट्रेलियन क्रिकेट कॉमचा पत्रकार सॅम्युल फेरीसने धोनीला वर्ल्डकपमधील भारताच्या पराभवानंतर तू यापुढेही खेळत रहाणार का ? असा प्रश्न विचारला.त्यावर धोनीने सॅम्युलला पुन्हा प्रश्न विचारण्यास सांगितले. सॅम्युलने पुन्हा तोच प्रश्न विचारताच धोनीने त्याला आपल्या शेजारी बसण्यासाठी बोलावले. 'इथे ये' आपण थोडी गंमत करु. धोनी असा रिअॅक्ट झाल्याने सॅम्युल काहीसा गोंधळला.धोनीने त्याच्या शेजारची खुर्ची थोडी सरकवली व तिथे सॅम्युलला बसण्यासाठी बोलावले. सॅम्युल आपल्या आसनावरुन धोनीच्या शेजारी जाऊन बसताच आता काय होणार ? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला. ते दृश्य कॅमे-यात टिपण्यासाठी क्लिकचा लखलखाट सुरु होता. सॅम्युल शेजारी बसल्यानंतर धोनीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला व त्याला विचारलेतुला वाटते का मी निवृत्त व्हावे ? त्यावर सॅम्युलने नाही मला असे वाटत नाही. मला तुमच्याकडून याच प्रश्नावर उत्तर हवे असे सांगितले.
===========================================
हा भारताचा पराभव नव्हे; वेस्ट इंडिजचा विजय
मुंबई - ‘टी 20‘ विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेला पाकिस्तान आणि तुलनेने कमी अनुभव असलेल्या बांगलादेशचा पराभव केल्यानंतर गुरुवारी भारताला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, तरीही क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त न करता मोठ्या मनाने पराभव स्वीकारला असून "हा भारताचा पराभव नव्हे तर वेस्ट इंडिजचा विजय आहे‘ असे म्हणत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
शुक्रवारचा सामना संपल्यानंतर सोशल मिडियावर कल्पक विनोदांचा बहर आला होता. त्यातील काही विनोद -
हा भारताचा पराभव नव्हे; वेस्ट इंडिजचा विजय
शुक्रवारचा सामना संपल्यानंतर सोशल मिडियावर कल्पक विनोदांचा बहर आला होता. त्यातील काही विनोद -
- जीवन खूप सुंदर आहे, फक्त "नो बॉल‘ नाही पडला पाहिजे...
- पाकिस्तनाला हरवलं विषय संपला.
- कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो. पण चॉकलेट चघळून चघळून खातो. त्याचप्रमाणे भारताचा पराभव विसरा आणि चांगल्या क्षणाचा मनापासून आनंद घ्या.
- अभ्यास केला "गेल‘चा आणि पेपर आला सिमन्सचा!
- अच्छा हुआ आज हारे, इंग्लंडके सामने हारते तो तीन गुणा लगान देना पडता!
===========================================
नो बॉल, नो फायनल
मुंबई - जेथे एकेक चेंडू महत्त्वाचा, तेथे नो बॉल म्हणजे गुन्हा ठरतो... तेथे भारतीयांनी दोनदा नो बॉल टाकले आणि या दोन्ही वेळेस बाद करणाऱ्या संधी असलेल्या लेंडल सिमन्सने भारतास या चुकीचे मोल चुकवायला लावले. विश्वकरंडक विजेतेपदाची सुरू केलेली भारताची मोहीम अखेर उपांत्य सामन्यात संपुष्टात आली. वेस्ट इंडीजने दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली.

वानखेडे स्टेडियम पुन्हा एकदा टीम इंडियाला अपयशी ठरले असले तरी, केलेल्या चुकाच त्यांना महागात पडल्या. पुन्हा एकदा कोहलीच्या विराट फलंदाजीमुळे 192 अशी उभारलेली भक्कम धावसंख्या विजय मिळवून देऊ शकली नाही. गेलचे वादळ आलेच नाही; पण स्पर्धेत प्रथमच खेळणारा सिमन्स (नाबाद 83), चार्ल्स (52) आणि रसेल (नाबाद 37) या तिघांच्या तुफानाने भारताचे आव्हान उद्ध्वस्त केले.
नो बॉल, नो फायनल
मुंबई - जेथे एकेक चेंडू महत्त्वाचा, तेथे नो बॉल म्हणजे गुन्हा ठरतो... तेथे भारतीयांनी दोनदा नो बॉल टाकले आणि या दोन्ही वेळेस बाद करणाऱ्या संधी असलेल्या लेंडल सिमन्सने भारतास या चुकीचे मोल चुकवायला लावले. विश्वकरंडक विजेतेपदाची सुरू केलेली भारताची मोहीम अखेर उपांत्य सामन्यात संपुष्टात आली. वेस्ट इंडीजने दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली.
वानखेडे स्टेडियम पुन्हा एकदा टीम इंडियाला अपयशी ठरले असले तरी, केलेल्या चुकाच त्यांना महागात पडल्या. पुन्हा एकदा कोहलीच्या विराट फलंदाजीमुळे 192 अशी उभारलेली भक्कम धावसंख्या विजय मिळवून देऊ शकली नाही. गेलचे वादळ आलेच नाही; पण स्पर्धेत प्रथमच खेळणारा सिमन्स (नाबाद 83), चार्ल्स (52) आणि रसेल (नाबाद 37) या तिघांच्या तुफानाने भारताचे आव्हान उद्ध्वस्त केले.
लेंडल सिमन्स हा मुंबई इंडियन्सचा खेळाडू. वानखेडे हे त्याच्यासाठी घरचे मैदान. ऐनवेळी संघात समावेश झाल्यामुळे तो स्पर्धेत आज पहिलाच सामना खेळला. तो 18 आणि 52 धावांवर असताना बाद झाला होता; परंतु पहिल्या वेळी अश्विनने आणि दुसऱ्या वेळी पंड्याचे ते चेंडू नो बॉल होते. अशी दोन जीवदाने दिलेल्या भारताने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला.
===========================================
केरळमध्ये भाजप यंदा आशावादी
केरळमध्ये भाजप यंदा आशावादी
नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेली काही वर्षे "पेरणी‘ केलेल्या केरळच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला लक्षणीय कामगिरीची आशा आहे. आसामच्या खालोखाल भाजपने केरळच्या निवडणुकीकडे लक्ष देण्याचे ठरविले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या राज्यात किमान पाच ते आठ जाहीर सभा घेतील, असे नियोजन आखण्यात आले आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा येत्या नऊ एप्रिलला केरळ प्रचार मोहिमेचा प्रारंभ करतील.
केरळच्या 160 सदस्यांच्या विधानसभेसाठी 16 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. सट्टेबाजीत अडकलेला क्रिकेटपटू एस. श्रीशांत याला भाजपने राजधानी तिरुअनंतपुरमची जागा पदार्पणातच दिल्याने पक्षाचे काही उच्चवर्गीय नेते नाराज झाल्याचे सांगितले जाते. श्रीशांतचे सासरे संघ कार्यकर्ते आहेत व त्यांनीच श्रीशांतचा भाजप प्रवेश घडवून आणल्याचे उघड आहे. शहांच्या पाठोपाठ मोदी यांच्याही सभांचा प्रारंभ तिरुअनंतपुरम येथूनच होणार असल्याचे सांगितले जाते. तिरुअनंतपुरम हा केरळमध्ये अल्प असणाऱ्या हिंदुबहुल (सुमारे 69 टक्के) मतदारसंघांतील एक आहे. शिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष कुम्मन राजशेखरन (वत्तीयोराकावू), ज्येष्ठ नेते ओ. राजगोपाल (नेमोम्म), माजी प्रदेशाध्यक्ष मुरलीधरन (कझाकोट्टम) आदी निवडक जागांवरच लक्ष केंद्रित करण्याची रणनीती भाजपने आखली आहे.
आसाम पाठोपाठ केरळमध्येही भाजपला गमावण्यासारखे काहीच नाही. आतापावेतो संघपरिवाराला बिलकूल थारा न देणाऱ्या या धर्मनिरपेक्ष राज्यात यंदा खाते उघडायचेच या ईर्षेने भगवा परिवार झपाटला आहे. 2011 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कोझीकोट्टम व तिरुअनंतपुरमसह राज्यातील किमान दहा मतदारसंघांतील भाजपची मतांची टक्केवारी चार ते पाच पटींनी (प्रत्येकी सुमारे 25 ते 30 हजार मतांनी) वाढल्याने भाजपचा उत्साह दुणावला आहे.
===========================================
युरिया उत्पादनात यंदा वीस लाख टनांची वाढ
युरिया उत्पादनात यंदा वीस लाख टनांची वाढ
नवी दिल्ली - देशात यंदा युरियाचे उत्पादन 245 लाख टन झाले असून, त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत वीस लाख टन एवढी विक्रमी वाढ झाली आहे. ते पाहता आगामी तीन वर्षांत भारताला युरिया उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्याचे उद्दिष्ट खत उत्पादक कंपन्यांनी गाठावे, असे आवाहन केंद्रीय खत व रसायन मंत्री अनंतकुमार यांनी केले.
युरियाचे विक्रमी उत्पादन झाल्याबद्दल खत व रसायन मंत्रालयातर्फे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कृषिमंत्री राधामोहनसिंह, खत व रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अनंतकुमार म्हणाले, की आतापर्यंत प्रथमच युरियाचे उत्पादन 245 लाख टनांपर्यंत पोहोचले असून, ते वीस लाख टनांनी वाढले आहे. मोदी सरकारचे युरिया धोरण गेल्या वर्षी जूनपासून लागू झाल्यानंतरची ही वाढ आहे. म्हणजे केवळ नऊ महिन्यांत उत्पादनात मोठी वाढ झाली. एप्रिलपासून धोरण लागू झाले असते, तर 25 लाख टनांवर उत्पादन पोचले असते.
युरियाची देशांतर्गत गरज 310 लाख टनांची असून दर वर्षी 80 लाख टन युरियाची आयात होते. यंदाच्या विक्रमी वाढीमुळे युरियाची आयात 60 ते 65 लाख टन एवढीच असेल. खत उत्पादक कंपन्यांची ही कार्यक्षमता पाहता आगामी तीन वर्षांत भारताला युरिया उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्याचा संकल्प सोडावा, असे आवाहन करताना अनंतकुमार म्हणाले, की या स्वयंपूर्णतेनंतर भारत "सार्क‘ देशांना युरियाची निर्यातही करू शकतो. शेतीला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आदी पोषक घटकांची असलेली आवश्यकता पाहता खत उत्पादक कंपन्यांनी युरियावर संशोधन करण्याची गरज आहे. देशाची अन्नसुरक्षा ही खत सुरक्षेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, त्यासाठी प्रथम युरिया उत्पादनात स्वयंपूर्णता आवश्यक असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.
===========================================
बुरखा परिधान करणे हे गुलामगिरीचे समर्थन'
पॅरिस - मुस्लिम महिलांनी स्वत:हून बुरखा परिधान करणे म्हणजे अमेरिकेतील कृष्णवर्णीय समुदायाने गुलामगिरीचे समर्थन करण्यासारखे असल्याचे विधान फ्रान्समधील एका महिला मंत्र्यांनी केल्यानंतर येथील सोशल मीडियावर वादळी प्रतिक्रिया उमटल्या आहेत. लॉरेन्स रोसिग्नोल यांनी हे विधान केले आहे.
इस्लाम धर्माचे अत्यंत धार्मिकतेने पालन करणाऱ्या मुस्लिम नागरिकांसाठी पारंपारिक इस्लामी पोशाखाच्या सतत नवनवीन "फॅशन्स‘ येत असून, या बाजारपेठेची वार्षिक उलाढाल 200 अब्ज पौंडांहूनही जास्त आहे. यामध्येच लक्षावधी मुस्लिम महिलांसाठी सतत नवनवीन प्रकारचे बुरखे बाजारामध्ये येत आहेत. मात्र, मुस्लिम महिलांनी हे नवनवीन प्रकारचे बुरखे स्वत:हून परिधान करणे म्हणजे कृष्णवर्णीय समुदायानेच गुलामगिरीचे समर्थन करण्यासारखे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. या विधानावर समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर रोसिग्नोल यांनी आपण मांडलेला मुद्दा योग्यच असल्याची भूमिका घेतली आहे.
===========================================
दहशतवादविरोधी लढाईत पाकच्या बाजूनेच - ओबामा
वॉशिंग्टन - लाहोरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दहशतवादविरोधी लढाईत पाकिस्तानच्याच बाजूने असल्याचे स्पष्ट केले. ओबामा यांनी आज पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना दूरध्वनी करत हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. सामान्य नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढत असून, यामुळे पाकिस्तानला दहशतवादाचा असलेला धोका अधोरेखित होत आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारच्या दहशतवादविरोधातील लढाईत अमेरिका त्यांना कायम साथ देईल, असे ओबामा यांनी शरीफ यांना सांगितले. इस्टर संडेला लाहोरमध्ये झालेल्या आत्मघाती स्फोटांत 74 नागरिकांचा मृत्यू झाला होता.
No comments:
Post a Comment