Thursday, 21 April 2016

नमस्कार लाईव्ह २१-०४-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- बार्बाडोस; क्रिकेटच्या दौऱ्यांवर 650 मुलींबरोबर मजा केली - वेस्ट इंडिजचा फास्ट बॉलर 
२- लंडन; सेक्स गुलामीला नकार देणा-या २५० मुलींची इसिसकडून हत्या 
३- न्युयोर्क;  डब्लू डब्लू ई रेसलर ते पॉर्न स्टार प्रवास करणा-या च्यानाचा मृत्यू 
४- बीजिंग; शी जिनपिंग हे आता चीनचे लष्करप्रमुखही 
५- इस्लामाबाद; पाक लष्करातील 12 भ्रष्ट अधिकाऱ्यांची हकालपट्टी 
६- लंडन; जगातील 2 अब्ज लोकसंख्येस "झिका'चा धोका 
७- ओकाझाकी; 'मितसुबिशी'ने मागितली मान वाकवून माफी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
८- पटना; हिंदुंना दोन मुलगे तर, मुस्लिमांनाही दोनच मुलगे पाहिजेत - गिरीराज सिंह 
९- देहरादून; उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट हटवली 
१०- बीड; आमीरची 'वॉटर कप स्पर्धा' जोमात, दुष्काळ कायमचा हटवण्याचा निर्धार 
११- दोन आठवडेआधीच मॉन्सूनचा अंदाज 
१२- राफेल करार अद्याप पूर्ण नाही : पर्रीकर 
१३- व्यवसायात एखादी नियमबाह्य कृती योग्य- सर्व्हे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१४- हाजी अली दर्ग्यात महिलांच्या प्रवेशासाठी पुरोगामी एकवटले 
१५- पीएचडी करुन कन्हैया रुग्णांची सेवा कशी करणार 
१६- पुणे; ‘मेपल’चे बँक खाते सील 
१७- 'त्या' कंपन्यांच्या बैठकीत बच्चन होते सहभागी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- नागपुरात 24 तासात 3 हत्या, हप्तावसुलीला विरोध, तरुणाची हत्या 
१९- धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा प्रक्रिया लांबणीवर 
२०- कोल्हापूर; चांगभलेच्या' गजरात सजली जागली 'चैत्राची रात्र 
२१- पणजी; इतिहासाच्या पाऊलखुणांवर अनास्थेची धूळ 
२२- गुवाहाटी; बलात्कार करणाऱ्याचे लिंग कापून मृतदेह जाळला 
२३- देहरादून; 'शक्तिमान'च्या मृत्यूने दुःख- भाजप आमदार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- राजकीय मैदानात श्रीशांतचा नो बॉल, सोशल मीडियावर खिल्ली 
२५- कपिलचा नवा शो, गुत्थी आता डॉक्टर, दादी कोणत्या भूमिकेत 
२६- हैदराबाद; स्लिम म्हणजे सेक्सी नव्हे - सानिया मिर्झा 
२७- डिसेंबरमध्ये भारतात होणार 'दिवस-रात्र' कसोटी 
२८- बंगळूर; राहुल द्रविडच्या दहा वर्षीय मुलाने केले शतक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
समृध्दता हे एक जगण्याचे साधन आहे, त्याची पूजा करून दैवत बनायचे नसते.
(संदीप सावते, नमस्कार लाईव्ह वाचक )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये, 
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

=============================================

आमीरची 'वॉटर कप स्पर्धा' जोमात, दुष्काळ कायमचा हटवण्याचा निर्धार

आमीरची 'वॉटर कप स्पर्धा' जोमात, दुष्काळ कायमचा हटवण्याचा निर्धार
बीड: राज्यातील दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी अभिनेता आमीर खान आणि लेखक- दिग्दर्शक सत्यजीत भटकळ यांनी पुढाकार घेतला आहे. त्यादृष्टीने ‘पाणी फाऊंडेशन’मार्फत राज्यभरात गावागावात जाऊन जलसंधारणाची कामं करण्यात येत आहेत. आमीर – सत्यजीतची या कामांसाठी भन्नाट कल्पना आहे.

‘पाणी फाऊंडेशन’ने ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ या स्पर्धेचं आयोजन केलं आहे.  महत्त्वाचं म्हणजे ‘पाणी फाऊंडेशन’च्या या उपक्रमाशी सचिन तेंडुलकर, रतन टाटा यासारख्यांचाही सहभाग आहे.
=============================================

पीएचडी करुन कन्हैया रुग्णांची सेवा कशी करणार

'पीएचडी करुन कन्हैया रुग्णांची सेवा कशी करणार?'
मुंबई : देश तोडण्याच्या धमक्या देणारा कन्हैया पीएचडी करुन डॉक्टर झाल्यावर रुग्णांची सेवा कशी करणार, असं वक्तव्य करत वीरसेनेचे अध्यक्ष निरंजन पाल यांनी आपल्या अगाध ज्ञानाचं दर्शन घडवलं आहे.

‘देश तोडण्याच्या धमक्या देणारा कन्हैया पीएचडी करुन डॉक्टर बनत आहे. मात्र मला समजत नाही, हा असला डॉक्टर पेशंटची काय सेवा करणार, त्यांना कसा तपासणार, कसे ऑपरेशन करणार?’ असे अकलेचे तारे समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वीरसेनेचे अध्यक्ष निरंजन पाल यांनी तोडले.

कन्हैया कुमारच्या नागपूर दौऱ्यावरुन मोठं घमासान झालं होतं. अभाविप आणि बजरंग दल या संघटनांचा कन्हैयाच्या कार्यक्रमाला विरोध असताना डाव्या संघटनांनी मात्र हा कार्यक्रम करण्यावर ठाम  भूमिका घेतली होती. तर मनसेचे नेते प्रशांत पवार यांनी कन्हैयाला थेट जेवणाचंच निमंत्रण दिलं.
=============================================

उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट हटवली

उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट हटवली
देहरादून : नैनीताल उच्च न्यायालयाने मोदी सरकारला जोरदार झटका दिला आहे. उत्तराखंडमध्ये केंद्र सरकारने लागू केलेली राष्ट्रपती राजवट हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवून ती त्वरीत हटवण्याचे आदेश दिले आहे.

मुख्यमंत्री हरीश रावत यांनी नैनीताल हायकोर्टात राष्ट्रपती राजवटीविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देत हायकोर्टाने हरीश रावत यांना दिलासा दिला आहे.

हा निर्णय देताना सरकारने मोदी सरकारला कडक शब्दात फटकारलं आहे. “सर्वंकश सत्ता ही कुणाचंही मन मलीन करु शकते. एखाद्यावेळी राष्ट्रपती सुद्धा चुकीचा निर्णय घेऊ शकतात. अशावेळी कायद्याच्या कसोटीवर अशा निर्णयांची छाननी होणं गरजेचं आहे. भारतीय न्यायव्यवस्थेला त्याचा पूर्ण अधिकार आहे.”

उत्तराखंड विधानसभेत 70 आमदार आहेत. त्यातील 36 काँग्रेसचे तर 28 जण भाजपचं प्रतिनिधित्व करतात. तर इतर पक्षांचे 6 आमदार आहेत.

काँग्रेसच्या 9 आमदारांनी बंड केल्याने हरीश रावत सरकार अस्थिर झालं होतं. 27 मार्चला रावत सरकारला बहुमत सिद्ध करायचं होतं, पण ती संधी न देताच केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू केली होती.
=============================================

राजकीय मैदानात श्रीशांतचा नो बॉल, सोशल मीडियावर खिल्ली

राजकीय मैदानात श्रीशांतचा नो बॉल, सोशल मीडियावर खिल्ली
तिरुअनंतपूरम :  आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली जेलची हवा खाऊन आलेला क्रिकेटपटू एस. श्रीशांत भाजपकडून केरळ विधानसभेची निवडणूक लढवत आहे. श्रीशांत भाजपचा तिरुअनंतपूरम मतदारसंघातील उमेदवार आहे. मात्र सध्या श्रीशांत ट्विटराईट्सच्या निशाण्यावर आहे.

केरळला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी आपण काय-काय करणार याबाबतचं ट्विट केलं. मात्र त्याने ट्विटमध्ये केरळ राज्याचा उल्लेख शहर असा केल्याने, नेटीझन्सनी त्याची चांगलीच खिल्ली उडवली.

“केरळमध्ये बदल आवश्यक आहे, तो बदल यावेळी नक्की होईल. जर आपण एकजुटीने काम केलं, तर आपण जगातील सुंदर शहर बनवू” असं ट्विट श्रीशांतने केलं.

श्रीशांतच्या या ट्विटनंतर  नेटीझन्सनी त्याला चांगलंच धारेवर धरलं. केरळ हे राज्य आहे, शहर नाही, अशा आशयाचे ट्विट रिप्लाय श्रीशांतला करण्यात आले. इतकंच नाही तर केरळमध्ये बदल हवा आहे, असं श्रीशांत म्हणत आहे, मात्र केरळचा उल्लेख शहर असा झाल्याने आता बदल झालाच आहे, असा टोमणाही अनेकांनी लगावला आहे.
=============================================

कपिलचा नवा शो, गुत्थी आता डॉक्टर, दादी कोणत्या भूमिकेत

कपिलचा नवा शो, गुत्थी आता डॉक्टर, दादी कोणत्या भूमिकेत?
मुंबई : रोजच्या धावपळीच्या आयुष्यात थोडा विरंगुळा म्हणून लवकर कपिल शर्मा आणि त्याची टीम तुमच्या भेटीला येत आहे. या शोचं नाव ‘द कपिल शर्मा शो’ असेल. शिवाय हा शो ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’पेक्षा पूर्णपणे वेगळा असल्याचं सांगण्यात येत आहे.

आधीच्या शोमध्ये कपिल म्हणजे बिट्टू त्याच्या कुटुंबासोबत राहत होता. पण आता तो कप्पू ही भूमिका साकारणार असून तो नातेवाईकांकडे राहताना दिसेल.

दादीची भूमिका साकारणारा अली असगर आता कपिलचा नातेवाईक असेल, जो शांतीवन को-ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये राहत आहे. ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ मध्ये प्रेक्षकांना हसवण्याची जबाबदारी बिट्टूटूच्या कुटुंबाने घेतली होती, मात्र आता ते काम ही को-ऑपरेटिव्ह सोसायटी करेल.

याशिवाय कपिलच्या कॉमेडी कुटुंबात ‘गुत्थी’ या पात्राने आजवर सगळ्यांना खूप हसवलं. पण यावेळी सुनील ग्रोव्हर डॉक्टरच्या भूमिकेत असून, दोन सुंदर नर्ससोबत तो लाफ्टरचं इंजेक्शन देताना दिसेल.
=============================================

नागपुरात 24 तासात 3 हत्या, हप्तावसुलीला विरोध, तरुणाची हत्या

नागपुरात 24 तासात 3 हत्या, हप्तावसुलीला विरोध, तरुणाची हत्या
नागपूर: नागपूरमध्ये गेल्या 24 तासात 3 जणांची हत्या करण्यात आली आहे. काल नागपुरच्या तांडापेठ भागात हप्तावसुलीला विरोध करणाऱ्या एका युवकाची गुंडानी सर्वांच्यादेखत हत्या केली. संजय खापेकर असं या तरुणाचं नाव आहे.

तांडापेठ भागात अनेक कारखाने आहेत. इथे स्थानिक गुंड हप्तावसुलीसाठी स्थानिकांना सतत हैराण करत असतात. 16 तारखेला राधेश्याम खोब्रागडे, शुभम बोणेकर आणि इतर गुंड संजय खापेकर काम करत असलेल्या कारखान्यात आले आणि त्यांनी महिना 4 हजार रुपयांचा हप्ता मागितला.  यावेळी संजयने या गुंडाना विरोध केला. त्यानंतर संजयने आपल्या इतर साथीदारांनाही या गुंडाना भीक न घालण्यास सांगितलं.

त्यामुळे परिसरात आपली दहशत कमी होईल या भितीतून या गुंडानी भर रस्त्यात संजय खापेकरची हत्या केली.

या प्रकरणात पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीसह 3 आरोपींना अटक केली आहे.
=============================================

क्रिकेटच्या दौऱ्यांवर 650 मुलींबरोबर मजा केली - वेस्ट इंडिजचा फास्ट बॉलर

  • ऑनलाइन लोकमत
    बार्बाडोस (वेस्ट इंडिज), दि. 21 - टिनो बेस्ट, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 पेक्षा जास्त विकेट घेतलेल्या वेस्ट इंडिजच्या या वेगवान गोलंदाजाने रंगील्या रात्रींचे किस्से आत्मचरीत्रात लिहिले असून जवळपास 650 मुलींसोबत शय्यासोबतीचा आनंद लुटल्याचे त्याने म्हटले आहे. ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो आदी आपल्या सहकाऱ्यांच्या आवडीनिवडी व अनुभवही त्याने लिहिले असून हे आत्मचरीत्र लवकरच प्रसिद्ध होत आहे.
    डिसेंबर 2013मध्ये शेवटची कसोटी खेळलेल्या टिनोनं ऑस्ट्रेलिया, अफ्रिका आदी दौऱ्यावर असताना, शहरात फिरायचं, चांगल्या मुलींबरोबर मैत्री करायची आणि रात्री त्यांना हॉटेलवर घेऊन यायचं हा नित्यक्रम असल्याचं म्हटलं आहे. स्वत:ला ब्लॅक ब्रॅड पिट असं म्हणवणाऱ्या टिनोनं, एकेका वेळी दोन ते चार मुलींना सोबत आणल्याचा आणि काहीवेळी मदतीसाठी टीममधल्या अन्य खेळाडूंना सहभागी करून घेतल्याचा अनुभवही शेअर केला आहे. अशा कृत्यांमध्ये ड्वेन ब्राव्हो आपला चांगला जोडीदार होता, असं सांगणाऱ्या टिनोनं ख्रिस गेल मात्र, चांगला माणूस असल्याचं म्हटलं आहे.
=============================================

सेक्स गुलामीला नकार देणा-या २५० मुलींची इसिसकडून हत्या

  •  ऑनलाइन लोकमत 
    लंडन, दि. २१ - आदेश न मानणा-यांना अत्यंत क्रूरपणे संपवणा-या इसिसने उत्तर इराकमध्ये सेक्स गुलाम बनायला नकार देणा-या २५० मुलींची हत्या केल्याचे समोर आले आहे. इराकमधील सर्वात मोठे शहर मोसूलमध्ये हे हत्याकांड घडले. 
    इसिसने या मुलींना अतिरेक्यांबरोबर विवाबंधनामध्ये रहाण्याचा आदेश दिला होता.  एक प्रकारे हा सेक्स गुलामगिरीचा आदेश होता. पण ज्या मुलींनी नकार दिला त्यांची अत्यंत निदर्यतेने इसिसने हत्या केली. मोसूलचा ताबा घेतल्यानंतर इसिसने मुलींना निवडून त्यांच्यावर अतिरेक्यांबरोबर विवाह करण्यासाठी जबरदस्ती सुरु केली. हा तात्पुरता विवाह  असल्याचे त्यांना सांगण्यात येत होते. 
    पण ज्या मुलींनी नकार दिला त्यांची हत्या केली असे कुर्दीश लोकशाही पक्षाचे प्रवक्ते सैद मामुझिनी यांनी सांगितले. सेक्शुअल जिहाद नाकारणा-या आतापर्यंत २५० मुलींची इसिसने हत्या केली असून, काहीवेळा त्या मुलींच्या कुटुंबालाही संपवले असे मामुझिनी यांनी सांगितले. 

=============================================

स्लिम म्हणजे सेक्सी नव्हे - सानिया मिर्झा

  • ऑनलाइन लोकमत 
    हैदराबाद, दि. २१ - सडपातळ, स्लिम दिसलात म्हणून तुम्ही सेक्सी ठरत नाहीत. तुम्ही तंदुरुस्त, मजबूत असाल तर तुम्ही सेक्सी आहात अस मत भारताची दुहेरीतील अव्वल टेनिसटपटू सानिया मिर्झाने व्यक्त केले. टाईम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपल्या फिटनेसवर बोलताना सानियाने हे वक्तव्य केले. 
    मी माझ्या शरीराला विशेष आकार देण्यावर मेहनत घेत नाही. माझ्यासाठी माझ्या शरीराचा फिटनेस महत्वाचा आहे. टेनिसला माझे पहिले प्राधान्य आहे. टेनिस खेळण्यासाठी विशिष्ट स्तराचा फिटनेस आणि शक्ती लागते. त्यासाठी जेवढी गरज असेल तेवढी मी माझ्या फिटनेसवर मेहनत घेईन.  
    मी चांगले टेनिस खेळले नाही तर, कोणाला माझा फोटो काढायला आवडणार नाही. शारीरीकदृष्टया मजबूती म्हणजे सेक्सी असण आहे. माझ्या दुष्टीने स्लिमनेस म्हणजे आकर्षकपणा नाही असे सानियाने सांगितले. 
=============================================

हिंदुंना दोन मुलगे तर, मुस्लिमांनाही दोनच मुलगे पाहिजेत - गिरीराज सिंह

  • ऑनलाइन लोकमत 
    पाटणा, दि. २१ - भारताने सर्व धर्मांसाठी दोन मुलांचा नियम सक्तीचा केला नाही तर, भारतात हिंदु मुली सुरक्षित रहाणार नाहीत. पाकिस्तानप्रमाणे मुलींना बुरख्यामध्ये ठेवावे लागेल असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केले आहे. भारताने आपले लोकसंख्येचे धोरण बदलणे आवश्यक आहे असे गिरीराज सिंह यांनी सांगितले. 
    पश्चिम चंपारणमध्ये बाघा येथे सांस्कृतिक यात्रेमध्ये ते बोलत होते.  या कार्यक्रमाला अनेक साधू आणि आरएसएसचे स्वयंसेवक प्रेक्षकांमध्ये बसले होते. हिंदुंना दोन मुलगे असतील तर, मुस्लिमांनाही दोन मुलगे असले पाहिजेत. आपली लोकसंख्या कमी होत आहे. बिहारमध्ये सात जिल्हे असे आहेत जिथे हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे. 
    लोकसंख्या नियंत्रणाचा नियम बदलला पाहिजे तेव्हाच हिंदू मुली सुरक्षित रहातील. नाहीतर, आपल्यालाही पाकिस्तानप्रमाणे आपल्या मुलींना बुरख्यामध्ये ठेवावे लागेल असे गिरीराज म्हणाले. किशनगंज, अरारीया या जिल्ह्यांचे त्यांनी आपल्या भाषणाता उदहारण दिले.  हिंदू पेक्षा इथे मुस्लिम लोकसंख्येचा टक्का वाढत असल्याचा दावा त्यांनी केला. 
=============================================

हाजी अली दर्ग्यात महिलांच्या प्रवेशासाठी पुरोगामी एकवटले

  • मुंबई : हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून पुरोगामी संघटना आणि व्यक्तींनी एकत्र येत ‘हाजी अली सब के लिए’ फोरमची स्थापना केली आहे. या फोरममध्ये भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही उडी घेतली आहे. २८ एप्रिलला हाजी अली दर्ग्याबाहेर धरणे आंदोलन केले जाणार आहे.
    हाजी अली दर्ग्यात २०११ सालापर्यंत महिलांना प्रवेश देण्यात येत होता. मात्र त्यानंतर ट्रस्टची कमिटी बदलली आणि महिलांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यासाठी वेगवेगळी कारणे देण्यात आली. त्यामुळे महिलांना प्रवेश नाकारण्यामागे कोणतेही धार्मिक कारण नसल्याचा युक्तिवाद फोरमचे जावेद आनंद यांनी केला आहे. आनंद म्हणाले की, कोणत्याही धर्माला किंवा जातीला फोरमचा विरोध नाही. चुकीच्या रूढी-परंपरांना विरोध आहे. माहिमच्या मगदूम शाह बाबा दर्गामध्ये महिलांना प्रवेश दिला जात असताना हाजी अलीला प्रवेश नाकारणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्ही दर्गाच्या विश्वस्तपदी एकच समिती असल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.
    त्र्यंबकेश्वरच्या घटनेचा निषेध
    त्र्यंबकेश्वरमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या महिलांना झालेल्या अमानुष मारहाणीचा तृप्ती देसाई यांनी निषेध व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, पोलिसांच्या उपस्थितीत महिलांना बेदम मारहाण होत असेल, तर गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी याचे स्पष्टीकरण द्यायला हवे. शिवाय कोर्टाच्या आदेशानंतरही महिलांना प्रवेश नाकारणाऱ्या मंदिराच्या ट्रस्टी या स्वत: न्यायाधीश आहेत. त्यामुळे सरकारने त्यांना सरकारी सेवेतून पायाउतार करण्याची मागणीही त्यांनी केली. गुरूवारी या घटनेचा समाचार घेण्यासाठी त्र्यंबकेश्वरला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
=============================================

‘मेपल’चे बँक खाते सील

  • पुणे : मेपल ग्रुपच्या पाच लाखांत घर देण्याच्या योजनेत फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न होत असून, आॅनलाइन नोंदणीसाठी उघडण्यात आलेले कंपनीचे एक बँक खाते सील करण्यात आले आहे. चौकशीसाठी सर्व कागदपत्रे घेऊन हजर राहण्याची नोटीसही संचालकांना बजावण्यात आली आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांनी दिली. दरम्यान, मेपल ग्रुपने आज सायंकाळी या योजनेत ज्यांनी पैसे गुंतवले त्यांचे पैसे विनाअट परत करण्याची घोषणा आपल्या वेबसाइटवर केली आहे़
    साकोरे यांनी दिलेल्या
    माहितीनुसार, या प्रकरणी कंपनीचे संचालक सचिन अशोक अगरवाल, नवीन अशोक अगरवाल, विक्री व्यवस्थापक प्रियांका अगरवाल यांच्यासह कंपनीच्या इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    >मेपल ग्रुपने आपल्या वेबसाइटवर केलेल्या घोषणेत म्हटले की, महाराष्ट्र हाऊसिंग डे ही योजना थांबविण्यात आली आहे. यात ज्यांनी पैसे गुंतविले आहेत व ज्यांना पैसे परत हवे आहेत, त्यांनी कंपनीच्या शिवाजीनगर येथील कार्यालयात सकाळी १०़३० ते सायंकाळी ६़३० या वेळेत यावे़ सोबत पैसे भरल्याची पावती व ओळखीचा पुरावा घेऊन यावे़ ज्यांना आॅनलाइन पैसे हवे आहेत, त्यांनाही ते आॅनलाइन देण्याची सोय करण्यात आली आहे़
=============================================

धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा प्रक्रिया लांबणीवर

  • मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदा ५ मे रोजी काढण्यात येतील. शिवाय यासंदर्भातील मागण्यांसाठी आंदोलकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घालून दिली जाईल, असे आश्वासन धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निर्मलकुमार देशमुख यांनी आंदोलकांना दिले. या आश्वासनानंतर आंदोलकांनी बुधवारी आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा केली.
    धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सेक्टर एकमधील रहिवाशांना ३५० ऐवजी ७५० चौरस फुटांचे घर देण्यात यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली होती. शिवाय या मागणीसाठी वांद्रे येथील म्हाडाच्या मुख्यालयासमोर तीन दिवसांपासून आंदोलनही छेडले होते. माटुंगा लेबर कॅम्प, शाहूनगर, बालिगा नगर, गीतांजली नगर, आर. पी. नगरमधील रहिवाशांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. जोवर मागण्या मान्य होत नाहीत तोवर धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा काढण्यात येऊ नये, असे म्हणणेही लावून धरले होते.
    बुधवारी यासंदर्भातील निविदा काढण्यात येणार होत्या. परंतु आंदोलकांनी आंदोलन अधिक तीव्र केल्यानंतर निर्मलकुमार देशमुख यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. शिवाय समस्या जाणून घेत संबंधितांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिले. महत्त्वाचे म्हणजे यासंदर्भातील निविदा ५ मे रोजी काढल्या जातील, असेही नमूद केले. या आश्वासनाचे आंदोलकांनी स्वागत करत जल्लोष केला. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी डीआरपीच्या निविदा काढण्यात येणार होत्या. परंतु विकासकांनी थंड प्रतिसाद दिल्याने ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे
=============================================

डब्लू डब्लू ई रेसलर ते पॉर्न स्टार प्रवास करणा-या च्यानाचा मृत्यू

  • ऑनलाइन लोकमत 
    न्यूयॉर्क, दि. २१ - वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट ते पॉर्न कलाकार असा प्रवास करणारी जोआन लॉरर ऊर्फ च्याना बुधवारी कॅलिफोर्नियामधील रहात्या घरी मृतावस्थेत आढळली. जोआनचा मृत्यू अनेकांसाठी धक्का आहे. च्याना घरचा फोन उचलत नसल्यामुळे तिचा मित्र तिला भेटण्यासाठी घरी आला. तेव्हा च्यानाचा मृत्यू झाल्याचे समजले. 
    आजचे डब्लूडब्लूई वर्ल्ड रेसलिंग फेडरेशन (डब्लू डब्लू एफ) असताना १९९७ मध्ये च्यानाने रेसलिंगमध्ये पदार्पण केले. डब्लू डब्लू ई चा फड गाजवताना च्यानाने धोकादायक रेसलर म्हणून ओळखल्या जाणा-या पॉल मायकल लिव्हीसक्यू उर्फ ट्रीपल एच बरोबर युती केली होती. डब्लू डब्लू ई मध्ये तिने २००१ साली महिला चॅम्पियनशिपचा किताब जिंकला. २३१ दिवसांसाठी ती चॅम्पियन होती. 
    १९९९ मध्ये आंतरखंडीय चॅम्पियनशिपचा किताब जिंकून तिने इतिहास रचला. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला होती. १९९९ आणि त्यानंतर सन २००० तिने हा किताब जिंकला. १९९७ ते २००१ असे डब्लू डब्लू ई मध्ये नाव कमावल्यानंतर च्याना च्याना मॉडलिंग आणि शरीरसौष्ठवाकडे वळली. तिने पॉर्न चित्रपटातही काम केले. प्लेबॉय मॅगझिनमध्येही तीचे फोटो प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर ती काही रिअॅलिटी शो मध्येही सहभागी झाली होती.   
=============================================
शी जिनपिंग हे आता चीनचे लष्करप्रमुखही
बीजिंग - चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे आता चीनचे लष्करप्रमुखही (कमांडर इन चीफ) झाले आहेत. शी यांच्याकडे याआधीच कम्युनिस्ट पक्षाचे महासचिवपद (जनरल सेक्रेटरी) आणि "पीपल्स लिबरेशन आर्मी‘मधील लष्करी अधिकाऱ्यांची सर्वोच्च संस्था असलेल्या सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्षपद आहे. या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेली ही घोषणा अत्यंत संवेदनशील मानली जात आहे. 

या नव्या पदग्रहणामधून आता लष्करावर थेट सत्ता गाजविण्याची शी यांची मनीषा दिसून आल्याचे मानले जात आहे. गेल्या काही वर्षांत चीनच्या परराष्ट्र धोरणामधील आक्रमकता स्पष्ट झाली आहे. लष्कर हे "नि:शंकपणे एकनिष्ठ‘ आणि "युद्धे जिंकण्याच्या क्षमतेचे‘ असावयास हवे, असे शी यांनी पार्श्‍वभूमीवर बोलताना सांगितले. 
=============================================
डिसेंबरमध्ये भारतात होणार 'दिवस-रात्र' कसोटी
नवी दिल्ली : कसोटी सामन्यांसाठी प्रेक्षकांच्या घटत्या संख्येवर उपाय म्हणून सुरू झालेल्या ‘दिवस-रात्र कसोटी‘चे आयोजन आता भारतामध्येही होणार आहे. येत्या डिसेंबरमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये ‘दिवस-रात्र‘ कसोटी सामना होईल. यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज (गुरुवार) घोषणा केली. 

यापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये दिवस-रात्र कसोटी सामन्याचे यशस्वी आयोजन झाले होते. या कसोटीसाठी गुलाबी रंगाचा चेंडू वापरला जातो. ‘बीसीसीआय‘चे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले, "वर्षअखेरीस न्यूझीलंडविरुद्ध एक ‘दिवस-रात्र‘ कसोटी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्याची पूर्वतयारी म्हणून दुलीप करंडक स्पर्धा या पद्धतीने आयोजित केली जाईल. भारतीय उपखंडातील वातावरणामध्ये गुलाबी चेंडूने खेळण्याचा परिणाम काय होऊ शकतो, याची दुलीप करंडक स्पर्धेद्वारे चाचपणी करणे शक्‍य होईल.‘‘
=============================================
दोन आठवडेआधीच मॉन्सूनचा अंदाज
नवी दिल्ली - आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भारतालाही आता दोन आठवडेआधीच मॉन्सूनचा वेध घेता येणार आहे. पश्‍चिम घाट आणि उत्तर पाकिस्तानातील तापमान आणि आर्द्रतेमध्ये होणाऱ्या बदलाचा अभ्यास करून मॉन्सूनचा वेध घेणे शक्‍य असल्याचे युरोपियन शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. सध्या भारतीय हवामान खाते सर्वसाधारणपणे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मॉन्सूनच्या आगमनाची घोषणा करते; पण प्रत्यक्षात त्याचे आगमन मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये होते. 

साधारणपणे वर्षाच्या 125व्या दिवशी मॉन्सूनचा अंदाज वर्तविला जातो. कोणत्याही स्थितीमध्ये 5 मेच्या सुमारास हा अंदाज दिला जातो; तसेच मॉन्सूनच्या प्रगतीपूर्वी 30 दिवस आधीच त्याबाबतची माहिती मिळू शकते. उत्तर पाकिस्तानातील तापमानात होणाऱ्या बदलांवर अंतिम अंदाज अवलंबून असतो, असे पॉट्‌सडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्‍लायमेट इम्पॅक्‍ट रिसर्च आणि झुरीच विद्यापीठातील प्रमुख संशोधक व्हेरोनिका स्टोलबोव्हा यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. ही नवी पूर्वानुमान प्रणाली संशोधकांनी भारतीय हवामान खात्याला मोफत देण्याची तयारी दर्शविली आहे. ""आम्ही भारताच्या उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या संपर्कात असून, भारतीय हवामान खात्याशीही याबाबत पत्रव्यवहार केला जाईल. जैवविज्ञानावर युरोपियन जिओसायन्स युनियनने आयोजित केलेल्या परिषदेमध्ये आम्ही याचे निष्कर्ष सादर करू,‘‘ असेही स्टोलबोव्हा यांनी नमूद केले. 
=============================================
चांगभलेच्या' गजरात सजली जागली 'चैत्राची रात्र
कोल्हापूर- दुष्काळ, महागाई, पाणी टंचाई, तापलेल्या उन्हाच्या झळांपासून ते सामाजिक स्तरावरील भेदभावाची वाढती दरी अशा साऱ्या व्यक्तीगत सामाजिक समस्यांचा ढिगारे बाजूला करून विविध राज्यातील भक्त गंगा दख्खनच्या राजा जोतिबा चरणी लीन झाल्या आहेत. 
जगण्याच्या प्रत्येक पावलावर उभे असलेल्या संकटावर टाच मारून आलेल्या लाखो भाविकांनी दख्खनच्या राजा जोतिबाच्या दर्शनासाठी "चांगभलेच्या‘ गजरात हलगी घुमक्‍याच्या ताल सूरात रात्र जागवली. श्रध्दा, भक्तीच्या उर्जेवर अबालवृध्दांचे जथ्थे शेकडो सासनकाठ्या नाचवत रात्रभर घुमत नाचत रहाताना भक्तगण नादबह्मात दंगून गेला.

गेल्या तीन दिवसापासून मराठवाडा, कर्नाटक सीमा भाग, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेशातील जवळपास दोन लाख भाविक जोतिबा डोंगवर बुधवारी दाखल झाले. बहुतेकजण कुटूंबकबिल्यासह आले. एसटी, ट्रक, टेंपोपासून ते बैलगाडीपर्यंत अशा मिळेल त्या वाहने भाविकांचा ओघ डोंगरावर सुरू होता. प्रत्येकांच्या मनात जोतिबाच्या दर्शनाचा भाव दाटलेला. 
गुरूवारी यात्रेचा मुख्य दिवशी दर्शन घडावे, एवढ्याच धडपडीने पायपीट करीत, गर्दीची चेंगराचेंगरी अनुभवत, दिवसभर उन्हाच्या झळा, उकाडा, खाच खळग्यांचे रस्ते पार करीत थकून भागून आलेल्या अनेकांनी घनदाट झाडीत, रिकाम्या मैदानात अनेकांनी अंग टाकले. तर कांहीनी चक्क खडकाळ, मुरमाळ तर गल्लीबोळातील रिकाम्या पायऱ्यांवर अंग टाकले याच वेळी आपल्याच कुटूंबातील अनेक सोबती मात्र सासनकाठी नाचवत मंदिराची वाट चालू लागले.
=============================================
पाक लष्करातील 12 भ्रष्ट अधिकाऱ्यांची हकालपट्टी
इस्लामाबाद- पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल राहील शरीफ यांनी गुरुवारी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून बारा अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. त्यामध्ये दोन जनरल पदावरील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

देशातून भ्रष्टाचार हद्दपार करण्यासाठी सर्व स्तरांमध्ये पारदर्शकता आवश्यक आहे असे शरीफ यांनी नुकतेच म्हटले होते. त्यानंतर दोन दिवसांतच ही कारवाई केली आहे. पाकिस्तानी लष्करात एवढ्या प्रमाणात अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची पहिलीच वेळ आहे. 

काढून टाकण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये लेफ्टनंट जनरल ओबाईदुल्लाह खट्टक, तसेच एक मेजर जनरल, पाच ब्रिगेडियर, चार कर्नल आणि एक मेजर यांचा समावेश आहे, असे वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे.
=============================================
इतिहासाच्या पाऊलखुणांवर अनास्थेची धूळ

पणजी- किल्ला म्हणजे राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक संक्रमणाचा साक्षीदार. राज्यात इतिहासाच्या या पाऊलखुणांवर अनास्थेची धूळ चढली आहे. 42 किल्ल्यांपैकी 35 किल्ले दुर्लक्षित आहेत. बहुतांशी किल्ले पालापाचोळ्यांनी वेढलेल्या आणि कोलमडलेल्या अवस्थेत आहेत. वारसा पर्यटन स्थळाच्या त्यांच्या क्षमतांचा विकास होत नसल्याची खंत इतिहास अभ्यासक प्रजल साखरदांडे यांनी व्यक्त केली. 

गोवा म्हणजे अवघ्या तीन हजार 702 चौरस किलोमीटरचा भूभाग... संपन्नतेचं आगार... या संपन्नतेनं कधी राजेरजवाड्यांना आकर्षित केले तर कधी वसाहतवाद्यांना. त्यातून घडल्या बिघडल्या गोमंतकाचे साक्षीदार म्हणजे राज्यातले किल्ले. डोंगरकपारीनं वेढलेल्या राज्यात 42 किल्ले आहेत. काही किल्ले आदिलशहाच्या वास्तुकलेची संपन्नता सांगतात, तर काही किल्ले पोर्तुगीजांच्या हुकमी चालींची. बेतूलमधला किल्ला अगदी शिवाजी महाराजांशी नातं सांगतो, पण हे डोंगरकपारीतील दगडविटांचे इतिहासतज्ज्ञ शासनाची त्यांच्यावर नजर पडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. 
पर्यटनाच्या शक्‍यता लक्षात घेऊन आग्वाद, रईस मागूस, तेरेखोल, शापोरा, खोर्जुवे, काब-द-राम यासारख्या किल्ल्यांना नवसंजीवनी मिळाली, पण यातले अनेक किल्ले व्यावसायीकरणाच्या रेट्यात भरडलेही गेले. त्यात त्यांची वारसामूल्येही पणाला लागली, पण राज्यातील इतर 35 किल्ल्यांच्या नशिबी तो विकासही नसल्याची खंत प्रजल साखरदांडे व्यक्त करतात. 
=============================================
बलात्कार करणाऱ्याचे लिंग कापून मृतदेह जाळला
गुवाहाटी (आसाम)- एका महिलेसह तिच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याचे लिंग कापून मैत्रिणींच्या मदतीने त्याचा मृतदेह जाळल्याची घटना उघड झाली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाराजुली या गावामध्ये ही घटना घडली आहे. कृष्णा भुमिज असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर पूर्वी दोन गुन्हे दाखल झाले होते. कृष्णा याने 4 एप्रिल रोजी रिता या महिलेसह तिच्या मुलीवर त्यांच्या घरात बलात्काराचा प्रयत्न केला होता. यावेळी रिताने त्याचे लिंग कापले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या कृष्णाचे काही वेळात निधन झाले. या घटनेनंतर रिताने सात मैत्रिणींना बोलावून घेतले. घराजवळ त्यांनी त्याचा मृतदेह जाळून टाकला. 

दरम्यान, कृष्णाच्या नातेवाइकांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान ही माहिती उघड झाली. रिताला अटक करण्यात आली असून, याबाबत पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
=============================================
'शक्तिमान'च्या मृत्यूने दुःख- भाजप आमदार
डेहराडून- उत्तराखंड पोलिसांचा घोडा ‘शक्तिमान‘ याचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर दुःख झाले आहे, असे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार गणेश जोशी यांनी म्हटले आहे. 

जोशी यांनी ‘शक्तिमान‘ला जबर मारहाण केली होती. त्यामध्ये घोड्याचा एक पाय कापावा लागला होता. गंभीर जखमी झालेल्या घोड्याचा बुधवारी (ता. 20) मृत्यू झाला. मात्र, आपण घोड्याला मारहाण केली नसल्याचे जोशी यांनी म्हटले आहे. 

जोशी म्हणाले, ‘शक्तीमानचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर दुःख झाले. आपण घोड्याला मारहाण केली नव्हती. परंतु, नागरिकांनी याबाबत राजकारण करू नये. भाजप नेत्यांची शुक्रवारी भेट घेऊन पुढे काय करायचे हे ठरवणार आहे.‘ 

दरम्यान, जोशी यांनी घोड्याला केलेल्या मारहाणीचा सर्व स्तरांतून निषेध करण्यात आला. घोड्याच्या मृत्यूमुळे प्राणिमित्रांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दांडक्‍याने केलेल्या अमानुष मारहाणीत पोलिसांच्या घोड्याचा पाय मोडल्याबद्दल उत्तराखंडमधील मसुरी येथील भाजप आमदार गणेश जोशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोशी यांना 18 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवल्यानंतर त्यांना 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकारानंतरही जोशी यांनी या अमानुष प्रकाराचे समर्थन केले होते. पोलिसांनी आंदोलकांना आवरण्यासाठी घोड्यांचा वापर केला. त्या वेळी झालेल्या झटापटीत घोड्याला दुखापत झाली. यात चुकीचे काहीही नाही, असे त्यांनी म्हटले होते.
=============================================
राफेल करार अद्याप पूर्ण नाही : पर्रीकर
नवी दिल्ली : फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमाने विकत घेण्याचा करार अद्याप पुर्ण झाला नसून केवळ बोलणी अंतिम टप्प्यात आल्याचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पष्ट केले. 

राफेल ही लढाऊ विमाने घेण्याचा फ्रान्ससोबतचा करार अंतिम झाला असून, 880 कोटी डॉलर 36 विमाने खरेदी करण्यात येणार आहेत. यामुळे भारताचे 21 हजार कोटी रुपये वाचणार आहेत, असे वृत्त भारतीय जनता पक्षाच्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध झाले होते. 

"मी सध्या एवढंच सांगू शकतो की कराराची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे व लवकरच करार पुर्ण होईल. परंतु जोपर्यंत करारावर सह्या होत नाहीत तोपर्यंत सर्व वाटाघाटी स्पष्ट झाल्या असे म्हणता येणार नाही. आम्ही केंद्रीय मंत्रीमंडळाच्या परवानगीसाठी हा प्रस्ताव पाठविला आहे," असे पर्रीकर यांनी सांगितले.  
गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात पंतप्रधान मोदींनी फ्रान्सकडून 36 लढाऊ विमाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. येत्या मे महिनाअखेर हा करार पुर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
=============================================
जगातील 2 अब्ज लोकसंख्येस "झिका'चा धोका
लंडन - जगभरातील सुमारे 2 अब्जपेक्षाही अधिक लोकसंख्या राहत असलेल्या विविध देशांमध्ये झिका हा विषाणु पसरण्याची भीती नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एक अभ्यास अहवालामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. एडिस एजिप्ती जातीच्या डासांमुळे पसरत असलेल्या या विषाणुमुळे आरोग्य क्षेत्रात जागतिक स्तरावर आणीबाणीची परिस्थिती उद्‌भवली आहे. 

गेल्या आठवड्यात या विषाणुच्या संसर्गामुळे अपत्यजन्मावेळी अनेक समस्या निर्माण होण्याची भीती असल्याचे एका संशोधनामधून स्पष्ट झाले. या पार्श्‍वभूमीवर, झिकाच्या प्रसारास अनुकूल ठरण्याची शक्‍यता असलेली परिस्थिती ही अधिक गुंतागुंतीची असल्याचेही आढळून आले आहे. दक्षिण (लॅटिन) अमेरिकेतील मोठ्या भागामध्ये झिकाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची शक्‍यता आहे. 

झिकाच्या संसर्गामुळे नुकत्याच जन्म झालेल्या हजारो अर्भकांच्या मेंदुंची पुरेशी वाढ झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. दक्षिण अमेरिकेतील समुद्रकिनाऱ्याचा भूभाग आणि ऍमेझॉन व तिच्या उपनद्यांच्या भागामध्ये झिकाचा प्रसार होण्याची भीती आहे. अमेरिकेमध्येही फ्लोरिडा व टेक्‍सास राज्यांमध्ये झिकाचा प्रादुर्भाव पसरण्याची शक्‍यता आहे. डास हे झिकाचा प्रसार होण्याच्या प्रक्रियेमागील निव्वळ एक कारण असल्याची प्रतिक्रिया या प्रकल्पावर काम करत असलेले डॉ. ऑलिव्हर ब्रॅडी यांनी म्हटले आहे.
=============================================
राहुल द्रविडच्या दहा वर्षीय मुलाने केले शतक
बंगळूर- भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्या दहा वर्षीय मुलाने 14 वर्षांखालील क्‍लब क्रिकेटमध्ये जोरदार शतक केले. 

लोयोला मैदानावार बंगळूर युनायटेड क्रिकेट क्‍लबकडून (बीयूसीसी) सुमित द्रविड खेळत आहे. फ्रॅंक अन्थोनी पब्लिक स्कूलच्या विरोधात सुमितने 125 धावा केल्या. त्यामध्ये 12 चौकार ठोकले. प्रत्युष (143) व सुमितने 213 धावांची भागीदारी केली. दोघांनी केलेल्या दमदार भागिदारीमुळे ‘बीयूसीसी‘ने हा सामना 246 धावांनी जिंकला. 

दरम्यान, सुमितने पहिल्यांदाच अशा प्रकारची कामगिरी केलेली नाही. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या 12 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत त्याला उत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरविण्यात आले होते.
=============================================
'त्या' कंपन्यांच्या बैठकीत बच्चन होते सहभागी
मुंबई- अभिनेते अमिताभ बच्चन हे 1993 ते 1997 या कालावधीत किमान चार विदेशी शिंपिंग कंपन्यांच्या संचालक पदावर होते अशी माहिती समोर आली आहे. फोन कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दोन कंपन्यांच्या संचालक मंडळांच्या बैठकीतही ते सहभागी झाले होते हे उघडकीस आले आहे. 

या नव्या गौप्यस्फोटामुळे पनामा पेपर्स प्रकरणी अमिताभ बच्चन हे आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. अमिताभ बच्चन यांनी पनामाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगितलं होतं. 
पनामा पेपर्सचा अभ्यास करून एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतची अधिक माहिती प्रसिद्ध केली आहे. सी बल्क शिपिंग कंपनी लिमिटेड आणि ट्रंप शिंपिंग लिमिटेडच्या संचालक मंडळाने 12 डिसेंबर 1994 रोजी 17.50 लाख डॉलर कर्जासंबंधी ठराव मंजूर केला होता. या ठरावांसंबंधी झालेल्या संचालक मंडळांच्या बैठकीत अमिताभ बच्चन यांनी फोन कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला होता. दोन्ही कंपन्यांनी जारी केलेल्या प्रमाणपत्रात अमिताभ बच्चन यांचा संचालक म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. 

पनामा पेपर्स लीकमध्ये अमिताभ बच्चन यांचं नावही समोर आलं होतं. सी बल्क शिपिंग कंपनी लिमिटेड, लेडी शिपिंग लिमिटेड, ट्रेझर शिपिंग लिमिटेड, ट्रंप शिंपिंग लिमिटेड या कंपन्यांवर अमिताभ बच्चन संचालक असल्याचे पनामा पेपर्स लीकमधून उघड झाले होते.

कर चुकविण्यासाठी विदेशांमधील कंपनीमध्ये गुंतवणूक केल्याबद्दल त्यांचे नाव "पनामा पेपर्स‘मध्ये आले होते. या कंपन्यांशी कोणताही संबंध नसून नावाचा गैरवापर झाल्याचा अमिताभ यांचा दावा आहे.
दरम्यान, ‘अतुल्य भारत‘ मोहिमेचा ब्रँड अँबॅसेडर होण्यासाठी माझ्याशी कुणीही संपर्क साधलेला नव्हता. त्यामुळे मी हे पद सोडण्याचा किंवा त्यापासून मला कुणी दूर ठेवण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही,‘‘ असेस्पष्टीकरण ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी दिले. 
=============================================
व्यवसायात एखादी नियमबाह्य कृती योग्य- सर्व्हे
नवी दिल्ली: व्यवसायातील आर्थिक उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी लाच देणे किंवा भ्रष्टाचार करणे किंवा यासारखी एखादी नियमबाह्य कृती चुकीची नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष एका सर्व्हेक्षणातून समोर आला आहे. 

व्यवसायातील गुंतवणूकीसंदर्भात तसेच करासंदर्भात सल्ला देणाऱ्या "इवाय‘ संस्थेने केलेल्या सर्व्हेतून ही माहिती समोर आली आहे. व्यवसायातील एखादे आर्थिक उद्दिष्ट गाठताना लाच देणे, भ्रष्टाचार करणे किंवा यासारखा एखादा गैरप्रकार करणे चुकीचे नसल्याचे मत सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्या 70 टक्के जणांनी व्यक्त केले आहे. मात्र यापूर्वी करण्यात सर्व्हेच्या तुलनेत यंदा भ्रष्टाचार कमी होत असल्याचे चित्र आढळून आले आहे. याबाबत सर्व्हेत म्हटले आहे की, "भारतात भ्रष्टाचाराचे प्रमाण खूप जास्त असल्याचे 2012 साली 70 टक्के जणांना तर 2014 साली 67 जणांचे मत होते. मात्र आता केवळ 58 टक्के जणांच्या मतेच भ्रष्टाचार व्यापक आहे. त्यामुळे देशातील भ्रष्टाचार नियंत्रणात येत आहे.‘ या सर्व्हेमध्ये देशातील आघाडीचे 50 अधिकारी सहभागी होते. 

कंपन्यांमधील गैरव्यवहार टाळण्यासाठी भारतीय कंपन्यांनी दोषींवर वैयक्तिक कारवाई करण्याची गरज आहे, असे मत इवाय इंडियाच्या फ्रॉड इन्वेस्टिगेशन आणि डिस्प्युट सर्व्हिसेसचे सहकारी मुकुल श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. "केंद्र सरकारने व्यवसायात पारदर्शकता आणून भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आधीच अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्याचा परिणाम या सर्वेक्षणात दिसून आला आहे", असे "इवाय‘ने म्हटले आहे.
=============================================
'मितसुबिशी'ने मागितली मान वाकवून माफी


ओकाझाकी: मितसुबिशी मोटर्सने मोटारींच्या इंधनक्षमतेची खोटी आकडेवारी जाहीर केल्याचे मान्य केल्यानंतर जपानी अधिकाऱ्यांनी आज कंपनीच्या प्रमुख कार्यालयावर छापा टाकला आहे. कंपनीच्या ओकाझाकी कार्यालयाची तपासणी करण्यात आली आहे. कंपनीमधील कर्मचाऱ्यांनी तब्बल 6 लाखांपेक्षा जास्त मोटारींच्या इंधनक्षमतेची खोटी आकडेवारी ग्राहकांना सांगितली आहे. कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना मोटारींच्या चार मॉडेल्सची इंधनक्षमता 5 ते 10 टक्क्यांनी वाढवून सांगितल्याचे कंपनीने मान्य केले आहे. 

मितसुबिशीने तयार केलेल्याचार मॉडेल्सपैकी दोन मॉडेल्सची निसान मोटर्सच्या ब्रँडअंतर्गत विक्री करण्यात आली. त्यामुळे इंधन क्षमता चाचणी करताना निसानने का मोटारीची तपासणी केली नाही याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे."आमच्या मते हे मुद्दामच करण्यात आले. अर्थात मोटारींची इंधनक्षमता वाढवून सांगण्यासाठी ही आकडेवारी बदलण्यात आली", मान्य करीत  मितसुबिशीचे अध्यक्ष तेत्सुरो आईकावा यांनी पत्रकार परिषदेत जपानी पद्धतीनुसार मान वाकवून माफी मागितली. 
=============================================

No comments: