Friday, 1 April 2016

नमस्कार लाईव्ह ०१-०४-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- पॅरिसमध्ये इमारतीत स्फोट 
२- कॅनबेरा; लाईव्ह रिपोर्टींगदरम्यान हरवलेला पोपट सापडला 
३- बांगलादेशची विकृती कायम, भारताची पराभवानंतर खिल्ली 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- विद्या बाळ यांच्या लढ्याला यश, शनि मंदिरात महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा 
५- उत्तर प्रदेश; ‘भारत माता की जय’विरोधात दारुल उलूमचा फतवा 
६- सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना मोठा दिलासा! 
७- भागवत व ओवेसी यांचे हातात हात - दिग्विजय सिंह 
८- मसूद अजहरवरील कारवाईत चीनचा खोडा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
९- नवे आर्थिक वर्ष... नवे बदल!, बचतीवरचे व्याजदर आजपासून कमी 
१०- कोलकात्यात कोसळलेल्या पुलाचं महाराष्ट्र कनेक्शन 
११- ...म्हणून कटप्पाने बाहुबलीला मारलं : राजमौली 
१२- हॉटेलमध्ये वेस्ट इंडिजचं कॅरेबियन स्टाईल सेलिब्रेशन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- गिरगाव चौपाटी आग प्रकरण: सीआयआयकडून पालिकेला 8 लाखांची भरपाई 
१४- रतलाम; शौचालयांसाठी पत्नीचे दागिने ठेवले गहाण 
१५- उद्घमंडलम; तमिळनाडूमध्ये हत्तीने दोघांना चिरडले 
१६- लखनौ; ..हा हुतात्म्यांचा अपमान- साध्वी निरंजन ज्योती 
१७- सातारा; बच्चन यांनी स्वीकारले उदयनराजेंचे निमंत्रण 
१८- मुखेड येथे ३ एप्रील रोजी धम्म परिषद  
 १९- सराफा अबकारी कराच्या विरोधात मुखेड बंद ला समिश्र प्रतिसाद  
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- व्हॉट्सअपवरील फॉण्ट असा करा बोल्ड आणि इटॅलिक! 
२०- सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन गॅलेक्सी J3 लाँच, खास फीचर तुमच्या भेटीला  
२१- टी-20च्या सेमीफायनलमधील पराभवानंतर विराटचं पहिलं ट्वीट 
२२- की अॅण्ड कामधील किसमुळे सैफ नाराज नाही 
२३- आशा सोडू नका, अपंग क्रिकेटपटू अमिर हुसैनचे विराटने दिले उदहारण 
२४- विराटशी 'पॅचअप' करायला अनुष्का नाही राजी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
चांगल्या कर्माची फळे चांगलीच असतात, मुखातून गेलेला राम आणि निस्वार्थपणे केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही
(भास्कर पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये, 
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


==========================================

विद्या बाळ यांच्या लढ्याला यश, शनि मंदिरात महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा

विद्या बाळ यांच्या लढ्याला यश, शनि मंदिरात महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा
अहमदनगर मंदिरामध्ये महिलांना मिळणाऱ्या प्रवेशाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारला आपल्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या लढ्याला मोठं यश आलं आहे. 
“कायद्याने महिलांना कुठेही प्रवेश बंदी केली जावू शकत नाही. असं असताना शनि शिंगणापूर येथे महिलांना प्रवेश कसा नाकारला जातो?” असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालायने राज्य सरकारला चांगलच धारेवर धरलं आहे.
जर महिलांना शनि शिंगणापूर येथे प्रवेश नाकारायचा असेल तर, तसा कायदा करा किंवा मंदिराच्या पवित्र्याचा प्रश्न असेल तर दोन दिवसात यावर आपली भूमिका स्पष्ट करत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. 
राज्य सरकारने आपल्या हिंदू धार्मिक स्थळांची योग्य ती अंमलबजावणी करावी असे कठोर आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यावर धार्मिक स्थळांवर कोणामध्येही भेदभाव करण्यात सरकारला मान्य नसल्याचं सरकारने कोर्टात स्पष्ट केलं आहे. 
शनि शिंगणापूर येथे महिलांना प्रवेश नाकारला गेला त्या विरोधात पुण्याच्या सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी मुंबई उच्च न्यायलायात याचिका दाखल केलीय. त्यावर सुनावणी दरम्यान न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढत हे आदेश दिले आहेत. 
“राज्य सरकारने महिलांना प्रवेश बंदी करण्या ऐवजी त्यांना सुरक्षिततेत प्रवेश दिली पाहिजे तो त्यांचा अधिकार आहे. आणि जर महिलांना शनि शिंगणापूर येथे प्रवेश नाकारला जातो किंवा त्या मुद्दांवरुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात असेल तर, जिल्हाधीकारी, पोलीस आणि संबंधीत यंत्रणांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणा-यांवर कारवाई करा” असे आदेश ही न्यायालयाने दिलेत. 
गेल्या काही दिवसात शनि मंदिरात महिलांना मिळणाऱ्या प्रवेशावरुन बरच रणकंदन माजलं होतं. भूमाता ब्रिगेड सारख्या महिला संघटनांनी यासाठी अनेक आंदोलनंही केली. त्यामुळे अखेर या आंदोलनाला कोर्टाच्या निर्णयाने काही प्रमाणात यश आलं आहे, असं म्हणालयला हरकत नाही.
==========================================

व्हॉट्सअपवरील फॉण्ट असा करा बोल्ड आणि इटॅलिक!

VIDEO: व्हॉट्सअपवरील फॉण्ट असा करा बोल्ड आणि इटॅलिक!
मुंबई : व्हॉट्सअॅप या इंस्टंट मेसेजिंग अॅपच्या अँड्राईड व्हर्जनमध्ये आता आणखी काही नवे फीचर्स अॅड करण्यात आले आहेत. त्यानुसार तुम्ही पोस्ट करत असलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजमधील मजकूर बोल्ड आणि इटॅलिक करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

पण व्हॉट्सअॅप वरील फॉण्ट नेमकं कसे बोल्ड आणि इटॅलिक करायाचे हेही जाणून घेऊयात. याबाबत काही यूजर्संना अपडेट मिळाले आहे. मात्र, याचा नेमका वापर कसा करायचा याबाबत बरेच जण अनभिज्ञ आहेत.

असा करता येणार फॉण्ट बोल्ड आणि इटॅलिक:

  • कोणताही शब्द किंवा वाक्य बोल्ड करण्यासाठी * या चिन्हाचा वापर करायचा. (*एबीपी माझा*) अशाप्रकारे शब्द लिहल्यास तो शब्द बोल्ड दिसून येईल.

  • तर याचप्रमाणे शब्द इटालिक करायचा असल्यास _ हे चिन्ह वापरा. (_मुंबई_) असं टाईप केल्यास व्हॉट्सअॅपवर तुमच्या मेसेज बोल्ड किंवा इटॅलिक फॉण्टमध्ये दिसून येईल.

गूगल प्ले मध्ये व्हॉट्सअॅपचं नवं व्हर्जन 2.12.535 उपलब्ध आहे. आपल्या मेसेजमधील जो भाग महत्वाचा असेल त्याला आपल्या सोईप्रमाणे बोल्ड किंवा इटॅलिक करता येणार आहे. सध्या व्हॉट्सअॅपवर फक्त एकाच फॉन्ट आणि फॉन्टसाईजमध्ये पाठवण्याची सुविधा होती. काही दिवसांपूर्वी लिंक हायलाईटची सुविधा व्हॉट्सअॅपने दिली होती. लिंक पॉपअप हायलाईटनंतर पीडीएफ किंवा वर्ड्स यासारखे डॉक्युमेंट्स शेअर करण्याची सुविधाही अलीकडेच व्हॉट्सअॅप धारकांना मिळाली होती.

VIDEO: पाहा व्हॉट्सअॅपवर फॉण्ट बोल्ड आणि इटॅलिक कसं करता येईल.

==========================================

नवे आर्थिक वर्ष... नवे बदल!, बचतीवरचे व्याजदर आजपासून कमी

नवे आर्थिक वर्ष... नवे बदल!, बचतीवरचे व्याजदर आजपासून कमी
मुंबई: नव्या आर्थिक वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. आज 1 एप्रिलपासून या नव्या वर्षात काही नवे नियम लागू होणार आहेत. त्यामुळे सामन्यांना अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागणार आहे. नुकतंच जाहीर करण्यात आलेलं आर्थिक संकल्प आजपासून लागू होणार आहे. त्यामुळे आजपासून बऱ्याच गोष्टी महाग होणार आहेत. पाहूयात नेमके काय काय बदल होणार आहेत.
छोटी बचत, व्याज कमी… 
पीपीएफ, किसान विकासपत्र, नॅशनल सेव्हिंग सर्टीफिकेट, मासिक उत्पन्न खाते, सुकन्या समृद्धी खाते, ज्येष्ठ नागरिक बचत योजना पोस्टाची रिकरिंग यासारख्या छोट्या बचतींवरचे व्याज कमी होणार आहेत.
 कर्ज होणार स्वस्त: 
बचत खात्यांवर देण्यात येणारे व्याज कमी केल्याने बँकांना कर्जावरचे व्याजदरही कमी करण्याची संधी निर्माण झाली आहे. एसबीआयच्या कर्जाच्या व्याजाचे दर 8.95 टक्क्यांपर्यंत खाली येणार आहेत.
 गृहकर्जावर सूट: 
अर्थसंकल्पात तरतुदीप्रमाणे 15 लाखांपर्यंतच्या गृहकर्जावरच्या करात 50 हजार अतिरिक्त सूट मिळेल. घरभाडे भत्ता न घेणाऱ्यांना करात 24 हजारांऐवजी 60 हजारांची सूट मिळेल.
 रेल्वेमध्ये ज्येष्ठांना सुविधा: 
रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव जागांचा कोटा हा 50 टक्क्यांनी वाढवणार. 45 वर्षांवरील महिला आणि गरोदर महिलांना याचा फायदा होणार. 
आधार लिंकच्या आधारेच सबसिडी: 
आधार कार्ड क्रमांक आपल्या बँक खात्यांशी लिंक न करणाऱ्यांना आजपासून सबसिडीचा लाभ मिळणार नाही. शिवाय पासपोर्ट काढण्यासाठी रेशन कार्डाचा पुरावा म्हणून वापर आजपासून बंद होईल.
 गाड्या आणि विमा महाग: 
कारवर सेस लावल्याने छोट्या हॅचबॅक कारच्या किंमतीत २ हजार रुपयांची वाढ होणार. लग्झरी सेगमेंटमधल्या गाड्यांच्या किंमतीत कमाल 1 लाखांची वाढ होईल. शिवाय गाड्यांच्या विम्याचा हप्ताही 40 टक्क्यांनी वाढेल.
 स्वस्त होणार औषधे:
 मधुमेह, रक्तदाब, टीबी यासारख्या आजारांवरच्या 103 प्रकारच्या औषधांच्या किंमती कमी होणार. राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण समितीनं या औषधांच्या किंमतींवर लगाम घातला आहे.
==========================================

कोलकात्यात कोसळलेल्या पुलाचं महाराष्ट्र कनेक्शन

कोलकात्यात कोसळलेल्या पुलाचं महाराष्ट्र कनेक्शन
मुंबई : कोलकात्यामध्ये पूल कोसळून झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा 25 वर पोहोचला आहे. मात्र आता कोलकात्यातील या कोसळलेल्या पुलाचं महाराष्ट्र कनेक्शन उघड झालं आहे.

कोलकात्यामध्ये निर्माणाधीन पूल कोसळल्यानंतर आयव्हीआरसीएल या कंपनीनं त्याचं बिल देवावर फाडलं आहे. पण तीच कंपनी आपल्या महाराष्ट्र सरकारचीही लाडकी असल्याचं दिसतंय.

सायन-पनवेल टोलवेल लिमिटेड या कंपनीने सायन- पनवेल रस्ता बांधला आहे. त्याच कंपनीमध्ये ‘काकडे कन्सट्रक्शन’सोबत आयव्हीआरसीएल कंपनीनं काम केलं.

इतकंच नाही, तर महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये याच कंपनीच्या अंतर्गत उड्डाणपुलांची आणि रस्त्यांची कामे सुरु आहेत. आता याच महाराष्ट्र कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
==========================================

सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन गॅलेक्सी J3 लाँच, खास फीचर तुमच्या भेटीला

सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन गॅलेक्सी J3 लाँच, खास फीचर तुमच्या भेटीला
मुंबई: स्मार्टफोन कंपनी सॅमसंगनं आपला नवा स्मार्टफोन गॅलेक्सी J3 लाँच केला आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यामध्ये नव्यानं लाँच करण्यात आलेलं S बाइक मोड. या फीचरमुळे आपण बाइक चालवताना नोटिफिकेशनमुळे हैराण होणार नाहीत.

तुम्ही बाईक चालवत असताना तुम्हाला जर कुणाचे फोन येत असेल तर या नव्या फीचरमुळे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. तसंच तुमची राइड संपताच ज्यांनी तुम्हाला कॉल होता. त्यांना तात्काळ तुम्हाला कॉल करण्याचा  करण्याचा मेसेज आपोआप मिळेल.

या स्मार्टफोनची किंमत अवघी रु. 8990 आहे. सध्या हा फोन फक्त स्नॅपडीलवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

==========================================

टी-20च्या सेमीफायनलमधील पराभवानंतर विराटचं पहिलं ट्वीट

टी-20च्या सेमीफायनलमधील पराभवानंतर विराटचं पहिलं ट्वीट
मुंबई : ट्वेन्टी-20 विश्वचषकातील उपांत्य सामन्यात नाबाद 89 धावांची धडाकेबाज खेळी रचल्यानंतरही, वेस्ट इंडिजने भारताचा पराभव झाला. मात्र पराभवानंतरही टीम इंडियाचा उपकर्णधार विराट कोहलीने धैर्य दाखवत एक ट्वीट केलं आहे. दोन्ही हात नसतानाही क्रिकेट खेळणाऱ्या आमीर हुसैन लोनचं उदाहरण देत एका व्हिडीओची लिंकही दिली आहे.

कोहलीने ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “कधीही आशा सोडू नका, आयुष्य कधी संपत नाही, ते फक्त सुरु होतं. या तरुणाला सलाम.”
==========================================

लाईव्ह रिपोर्टींगदरम्यान हरवलेला पोपट सापडला

लाईव्ह रिपोर्टींगदरम्यान हरवलेला पोपट सापडला!
कॅनबेरा: ऑस्ट्रेलियात एका महिला पत्रकारानं पोपट आणि त्याच्या मालकिणीची भेट घडवून आणली आहे. ब्रिटनी क्लेन नावाची ही पत्रकार ऑस्ट्रेलियातल्या साऊथपोर्ट कोर्ट हाऊसजवळून वार्तांकन करत असताना लोला नावाचा हा पोपट अचानक तिच्या खांद्यावर येऊन बसला.

अचानक आलेल्या या पाहुण्यामुळे ब्रिटनी चांगलीच घाबरली आणि त्या पोपटाला काढण्यासाठी कॅमेरामनला सांगू लागली. कॅमेरामननं त्याला बाजूला केलं. हा सगळा प्रकार ऑन कॅमेरा रेकॉर्ड झाला होता. तो सगळ्यांनी लाईव्हही पाहिला. त्यात लोलाला ओळखणारे अनेक होते. त्यांनी लोलाची मालकीण मिशेल मिल्सला फोन करुन तसं कळवलं.

जराही वेळ न दवडता मिशेलनं ब्रिटनीशी संपर्क साधला आणि हरवलेला लोला तिला परत मिळाला.
==========================================

...म्हणून कटप्पाने बाहुबलीला मारलं : राजमौली

VIDEO: ...म्हणून कटप्पाने बाहुबलीला मारलं : राजमौली
मुंबई : ‘बाहुबली हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर सर्वांच्या मनात एकच प्रश्न होता, तो म्हणजे कटप्पाने बाहुबलीला का मारलं? गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. कमाईत तर सर्व रेकॉर्ड मोडित काढले.
पण हा सिनेमा पाहून आल्यानंतर प्रत्येकाचा एकच प्रश्न विचारत होता, तो म्हणजे कटप्पाने बाहुबलीला का मारलं? 2015 मध्ये सोशल मीडियावर हाच प्रश्न चर्चेत होता.
चाहत्यांना अद्याप या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. मात्र आता या प्रश्नाचं उत्तर खुद्द दिग्दर्शक एस एस राजमौली यांनी दिलं आहे.
धर्मा प्रॉडक्शनने यू ट्यूबवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये दिग्दर्शक राजमौली हे सिनेमाबद्दल सांगताना दिसत आहेत. सिनेमा कसा घडला, सेटवरचं वातावरण, कोणता सीन शूट करणं सर्वात कठीण होतं आणि कटप्पाने बाहुबलीला का मारलं, या सर्व प्रश्नांची उत्तर राजमौली यांनी या व्हिडीओत दिली आहेत.

कटप्पाने बाहुबलीला का मारलं, असं जेव्हा राजमौली यांना विचारण्यात आलं, तेव्हा ते हसत म्हणाले, कारण मीच त्याला मारण्यास सांगितलं होतं.

असं असलं, तरी या प्रश्नाचं खरं उत्तर 14 एप्रिल 2017 रोजीच मिळणार आहे. कारण त्या दिवशी बाहुबलीचा दुसरा भाग बाहुबली द कन्क्लूजनरिलीज होणार आहे.
==========================================

'की अॅण्ड कामधील किसमुळे सैफ नाराज नाही'

'की अॅण्ड कामधील किसमुळे सैफ नाराज नाही'
मुंबई : सैफ अली खान माझ्यावर नाराज नाही, असं अभिनेता अर्जुन कपूरने स्पष्ट केलं आहे. ‘की अॅण्ड का’मधील करीना कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या किसमुळे सैफ अली खान नाराज असल्याची चर्चा होती. 
आर बाल्की दिग्दर्शित ‘की अॅण्ड का’मध्ये करीना कपूर आणि अर्जुन कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. नुकतंच या सिनेमाचं स्क्रीनिंग करण्यात आलं. त्यावेळी पत्रकारांनी अर्जुनला सिनेमातील किसबाबत विचारलं. यावर अर्जुन म्हणाला की, सैफ अली खान माझ्यावर नाराज नाही.
==========================================

बांगलादेशची विकृती कायम, भारताची पराभवानंतर खिल्ली

बांगलादेशची विकृती कायम, भारताची पराभवानंतर खिल्ली
ढाका : टी ट्वेण्टी विश्वचषकात वेस्ट इंडिजने भारतावर 7 विकेट्स राखून विजय मिळवला. त्यामुळे भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. मात्र भारताच्या पराभवाचा सर्वाधिक आनंद बांगलादेशला झाला आहे. 
बांगलादेशचा विकेटकिपर मश्फिकुर रहिमने टीम इंडियाची खिल्ली उडवणारं ट्विट केलं. “हा आहे आनंद…!!! हाहाहा !!!! सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची हार….” असं ट्विट करून रहिमने धोनीचा फोटोही ट्विट केला.
==========================================

हॉटेलमध्ये वेस्ट इंडिजचं कॅरेबियन स्टाईल सेलिब्रेशन

VIDEO: हॉटेलमध्ये वेस्ट इंडिजचं कॅरेबियन स्टाईल सेलिब्रेशन
क्रिकेट विश्वात वेस्ट इंडिजचे खेळाडू ओळखले जातात ते त्यांच्या तडाखेबंद खेळीने आणि सेलिब्रेशनच्या अनोख्या स्टाईलमुळे. टी-20 विश्वचषकात भारतावर मात केल्यानंतरही काल वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी असंच काहीसं सेलिब्रेशन केलं.
मुंबई: क्रिकेट विश्वात वेस्ट इंडिजचे खेळाडू ओळखले जातात ते त्यांच्या तडाखेबंद खेळीने आणि सेलिब्रेशनच्या अनोख्या स्टाईलमुळे. टी-20 विश्वचषकात भारतावर मात केल्यानंतरही काल वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी असंच काहीसं सेलिब्रेशन केलं.
स्टेडीयमपासून हॉटेलपर्यंत वेस्ट इंडीजचे खेळाडू हे त्यांच्या खास स्टाईलमध्ये नाचत होते. ज्याला हॉटेलमध्ये जमा झालेल्या प्रेक्षकांनीही चांगलीच दाद दिलं. ख्रिस गेल, ड्वॅन ब्राव्हो, सॅम्युअल्स, कर्णधार डॅरेन सॅमी या सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येत होता.
==========================================

‘भारत माता की जय’विरोधात दारुल उलूमचा फतवा

‘भारत माता की जय’विरोधात दारुल उलूमचा फतवा
उत्तर प्रदेश : ‘भारत माता की जय’वरुन वाद सुरु असतानाच आता ‘दारुल उलूम’ने फतवा काढला आहे. ज्याप्रकारे ‘वंदे मातरम’ बोलू शकत नाही, त्याचप्रमाणे ‘भारत माता की जय’ही बोलू शकत नाही, असं दारुल उलूमने म्हटलं आहे. या फतव्याचा केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी निषेध केला आहे.

उत्तर प्रदेशातील दारुल उलूम देवबंदने ‘भारत माता की जय’विरोधात फतवा काढत म्हटलं आहे की, “माणूसच माणसाला जन्म देतो. मग धरती आई कशी होऊ शकते? शिवाय, मुसलमान अल्लाहशिवाय कुणाचीही पूजा करु शकत नाही, तर भारताला त्याने माता का मानावं?”

दारुल उलूमने फतव्यात स्पष्ट म्हटलं आहे की, “मुसलमान एका खुदावर विश्वास ठेवणारा असतो आणि खुदाशिवाय दुसऱ्या कशाचीही पूजा करु शकत नाही. त्यात हिंदुस्तानाला देवीमाता समजलं गेलं आहे, जे इस्लाम धर्म मानणाऱ्यांसाठी शिर्क (अल्लाहशिवाय इतर कुणाची पूजा करणे) आहे.”

मुफ्ती-ए-करामने फतव्यात म्हटलंय की, हिंदुस्तानातील कायद्यामध्ये प्रत्येकाला आपापला धर्म मानण्याचं अधिकार आहे. त्यामुळे कुणीही कायद्याविरोधात कुणीही जबरदस्ती करु शकत नाही.

“कुणावरही ‘भारत माता की जय’ म्हणण्याची जबरदस्ती नाही. मात्र, प्रत्येकाने म्हटलं पाहिजे.” असे भाजप प्रवक्ते मनोज मिश्रा यांनी म्हटले आहे.
==========================================

गिरगाव चौपाटी आग प्रकरण: सीआयआयकडून पालिकेला 8 लाखांची भरपाई

गिरगाव चौपाटी आग प्रकरण: सीआयआयकडून पालिकेला 8 लाखांची भरपाई
मुंबई: ‘मेक इन इंडिया’ या बॅनरखाली गिरगाव चौपाटी येथील महाराष्ट्र रजनी कार्यक्रमात लागलेली आग मुंबई महानगरपालिकेस महाग पडली असून आगीतील ढिगारा काढण्यासाठी पालिकेला 8 लाखाचा भुर्दंड बसला होता.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी हा प्रकार उघडकीस आणताच रीजनल डायरेक्टर कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने (सीआयआय) 4 मार्च 2016 रोजी पालिकेस आलेला अतिरिक्त खर्चाची भरपाई दिली.

अनिल गलगली यांच्या माहिती अधिकार अर्जामुळे सीआयआयचे बिंग फुटले. मुंबई महानगरपालिकेने 10  जेसीबी, 39 डंपरच्या ट्रिप्स, 2 कोम्पक्टोर्स, 198 कामगार आणि 80 सुपरवाइजरी स्टाफ 15 फेब्रुवारी रोजी कार्यरत होत्या. गिरगाव चौपाटी साफसफाईची जबाबदारी आयोजकाची असल्यामुळे पालिकेने केलेला खर्च देण्यास बाध्य होते. परंतु सीआयआयकडून चालढकल करण्यात येत होती.

अनिल गलगली यांच्या आरटीआय आणि लेखी तक्रारीनंतर सीआयआयने वेळ न दवडता 4 मार्च 2016 रोजी सर्व रक्कम पालिकेस अदा करत वादावर पडदा घातला.
==========================================

सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना मोठा दिलासा!

सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना मोठा दिलासा!
नवी दिल्ली सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सरकारी नोकरीतील नियुक्तीदरम्यान उमेदवाराची पार्श्वभूमी आणि चरित्राची चौकशी केली जाते. विशेष म्हणजे चौकशीदरम्यान उमेदवाराची नियुक्ती रोखली जाते. या नियमामध्ये बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नव्या प्रस्तावानुसार, सरकारी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची पोलीस चौकशी केली जाईल. मात्र, चौकशीसाठी नियुक्ती पत्र रोखलं जाणार नाही.

प्रस्तावित नवीन नियम लागू झाल्यास उमेदवारांना आपली पार्श्वभूमी आणि चरित्राबाबत सरकारकडे स्वत:हून माहिती द्यावी लागेल. उमेदवारांनी स्वत:हून माहिती दिल्यास त्यांना तात्पुरतं नियुक्ती पत्र देण्यात येईल. मात्र, पोलिसांच्या सखोल चौकशीनंतरच औपचारिकरित्या कायमस्वरुपी नियुक्ती पत्र देण्यात येईल. यामुळे नियुक्तीदरम्यान होणाऱ्या लाचखोरीला लगाम लागेल, असाही विश्वास व्यक्त केला जातो आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग आणि कर्मचारी निवड मंडळ यांसारख्या संस्थांकडून सरकारी कर्मचाऱ्यांची भरती केली जाते. यामध्ये ए, बी,सी आणि डी वर्गातील अधिकारी आणि कर्माचाऱ्यांची भरती या संस्थांकडून केली जाते.

यूपीएससी किंवा एसएसी या निवड समितींच्या माध्यमातून यशस्वी उमेदवार नोकरीसाठी निवडले जातात. मात्र, नियुक्ती पत्र हातात देण्याआधी उमेदवाराच्या चरित्र आणि पार्श्वभूमीची चौकशी केली जाते. यावेळी उमेदवाराची नियुक्ती रोखली जाते, मात्र, यापुढे तसं होणार नाही.

उमेदवाराच्या चरित्र किंवा पार्श्वभूमीची चौकशी करताना पोलिसांच्या चौकशीत काही त्रुटी आढळल्या. शिवाय, पोलीस चौकशीसाठी दोन ते सहा महिन्यांचा अवधी जात असल्याचे निदर्शनास आले. यामुळे उमेदवाराची नियुक्ती रोखली जात असे. यामुळे नियुक्ती आदेश जारी करण्यासाठी उशीर होत असे आणि पर्यायाने रिक्त पदं भरण्यासाठी प्रचंड कालावधी जात असे. त्यामुळे केंद्राचं हे नवं प्रस्ताव मंजूर होऊन अंमलबजावणी झाल्यास उमेदवारांसाठी अत्यंत मोठा आणि दिलासा देणारा निर्णय ठरणार आहे.
==========================================

पॅरिसमध्ये इमारतीत स्फोट

  • -
    पॅरिस, दि. १ - पॅरिसमधील मध्यवर्ती परिसरात एका इमारतीमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. इमारतीतमधील सहाव्या मजल्यावर हा स्फोट झाला आहे. इमारतीमधून मोठ्या प्रमाणात धूर येताना दिसत आहे. पोलिसांनी गॅस लीक झाल्यामुळे हा स्फोटा झाल्याचा दावा केला आहे. 'स्फोटाचा दहशतवादाशी संबंध नाही. गॅसचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असल्याचं', पोलीस अधिका-याने सांगितलं आहे.
==========================================

भागवत व ओवेसी यांचे हातात हात - दिग्विजय सिंह

  • ऑनलाइन लोकमत 
    नागपूर, दि. १ -  ‘भारत माता की जय’ म्हणू नका असे कुराणमध्ये कुठेच लिहिलेले नाही.सरसंघचालक मोहन भागवत व एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांचे हातात हात घालून काम सुरू आहे. या दोघांचीही ‘फूट पाडा व राज्य’ करा अशी कट्टरवादी विचारधारा आहे. काँग्रेसने तर ‘भारत माता की जय’ या ना-यावर देशाच्या स्वातंत्र्याचा लढा लढला आहे. 
    पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’मध्ये भारत ‘माता की जय’ची केलेली व्याख्या संघ व भाजपला समजविण्याची वेळ आली आहे, असा चिमटा अ.भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी काढला.
    पक्षाच्या आढावा बैठकीसाठी नागपुरात आले असता सिंह यांनी भाजप व संघ परिवारावर सडकून टीका केली. सिंह म्हणाले,  जेएनयुमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ नारे दिले नसतानाही केवळ साम्यवादी विचाराचा असल्यामुळे कन्हैया कुमारला अटक करण्यात आली. मात्र, संसदेवर हल्ला करणा-या अफजल गुरूचे समर्थन करणा-या पीडीपीला जम्मू काश्मिरमध्ये सरकार बनविण्यासाठी भाजप कशी काय साथ देत आहे, हे भागवत यांनी स्पष्ट करावे. 
    संविधान व आरक्षणाचा विरोध करणारी भाजपा आता डॉ. आंबेडकरांना आपलेसे करू पाहत आहे. एकीकडे भागवत म्हणतात की आरक्षणाचा पुनर्विचार व्हावा, तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी म्हणतात आरक्षण लागू राहील. त्यामुळे कोण खरे बोलत आहे,
    हे या नेत्यांनी आधी स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.
==========================================

आशा सोडू नका, अपंग क्रिकेटपटू अमिर हुसैनचे विराटने दिले उदहारण

  •  ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. १ - आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीत वेस्ट इंडिजकडून जिव्हारी लागणारा पराभव झाल्यानंतर अनेकजण निराश झाले आहेत. मात्र या परिस्थितीतही टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने आशा सोडलेली नाही. त्याने आशा सोडू नका, आयुष्य संपत नाही. ही तर सुरुवात असते असे टि्वट केले आहे. 
    या टि्वटमध्ये त्याने हाताविना क्रिकेट खेळणारा जम्मू-काश्मिरचा अपंग क्रिकेट संघाचा कर्णधार अमिर हुसैनचे उदहारण दिले आहे. वयाच्या आठव्यावर्षी आमिरने त्याचे दोन्ही हात गमावले. पण आयुष्यातील या सर्वात मोठया धक्क्यानंतरही तो त्याच्या लक्ष्यापासून विचलित झाला नाही. अनंत अडचणींवर मात करुन त्याने क्रिकेटपटू बनण्याचे त्याचे लक्ष्य साध्य केले. 
    २६ वर्षांचा अमिर आज जम्मू-काश्मिरच्या अपंग क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. विराटने त्याच्या टि्वटमध्ये अमिरला सलाम केला आहे. विराटने त्याच्या टि्वटमध्ये अमिरच्या व्हिडीओची लिंकही दिली आहे. या मेसेजमधून विराटने जे चाहते निराश झाले आहेत त्यांना पराभवाने आपण खचलो नसून, तुम्ही सुद्धा खचू नका असा अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे. 
==========================================

शौचालयांसाठी पत्नीचे दागिने ठेवले गहाण

  • ऑनलाइन लोकमत
    मध्य प्रदेश, दि. 1- मध्य प्रदेशमधल्या रतलाम जिल्ह्यातल्या हनारखेडी गावात सरपंचानं गावात घरोघरी शौचालयाची सोय करण्यासाठी स्वतःच्या पत्नीचे सोन्याचे दागिने गहाण ठेवल्याची घटना समोर आली आहे.
    35 वर्षीय सरपंच दिनेश नयेमा यांना गावात एकाही घरात शौचालय नसल्यानं वाईट वाटत होतं. जेव्हा त्यांनी यासंदर्भात सरकारी अधिका-यांशी बातचीत केली. त्यावेळी फक्त शौचालय बांधल्यावरच सरकारी निधी मिळत असल्याची त्यांना माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी स्वतःच्या पत्नीचे सोन्याचे दागिने गहाण ठेवले आणि जवळपास 2 लाखांचं कर्ज काढून 18 दिवसांत गावात 900 शौचालयं बांधली.
     ही माहिती ज्यावेळी जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या कानावर पडली..तेव्हा त्यांनी 24 तासांच्या आत शौचालयांच्या बांधकामांची रक्कम वळती केली...
==========================================
विराटशी 'पॅचअप' करायला अनुष्का नाही राजी
सोशल मीडियावर अनुष्काची खिल्ली उडविणाऱ्यांबद्दल विराटने जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर हे दोघे पुन्हा एकत्र येणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, सध्या तरी अनुष्का ‘पॅच-अप‘ करण्याच्या मूडमध्ये नसल्याचे दिसते. 

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे सेलिब्रिटी जोडपे टी-20 विश्वकरंडक स्पर्धा सुरू झाल्यापासून चर्चेचा विषय बनले आहे. 
काही दिवसांपूर्वीच चित्रपटांसंबंधी काही ‘व्यावहारिक‘ कारणांवरून त्यांचं अचानक काहीतरी बिनसलं. त्यानंतर थेट ब्रेकअपची बातमी आल्याने दोघांच्या चाहते नाराज झाले. अनुष्का-विराटचं पुन्हा पॅचअप होईल अशी अनेकांना आशा वाटत होती. आता मात्र त्यांची ही इच्छा अपूर्णच राहणार असं दिसतंय.

विराटच्या प्रेमात आता अनुष्काला रस राहिलेला नाही. अनुष्का विराटला तसेच त्यांच्या नात्याला आणखी संधी देऊ इच्छित नाही. तिला जे काही झालं ते विसरून पुढे जायचा तिचा विचार पक्का झाला आहे, असे ‘बॉलिवूड लाइफ डॉट कॉम‘ने म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतर सोशल मीडियावर विनोदांतून अनुष्काची खिल्ली उडविणाऱ्यांबद्दल विराटने संताप व्यक्त केला होता. सोशल मीडियावर त्याने जाहीर नाराजी व्यक्त करीत अनुष्काने आपल्याला केवळ सकारात्मकता दिली असे म्हटले होते. यानंतर तो आणि अनुष्का एकत्र येणार अशा चर्चा रंगल्या होत्या. पण, त्या केवळ चर्चा राहण्याची शक्यता आहे. 
==========================================
तमिळनाडूमध्ये हत्तीने दोघांना चिरडले
उद्घमंडलम (तमिळनाडू)- दोन कामगारांना हत्तीने चिरडून मारल्याची घटना दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (शुक्रवार) दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्तिकुन्ना येथे मनिशेखर हे गुरुवारी (ता. 31) रात्री साडेदहाच्या सुमारास घरी परतत होते. यावेळी हत्तीने त्यांच्यावर हल्ला करून ठार मारले. येथून काही अंतरावर हत्तीने आज दुपारी बाराच्या सुमारास केलेल्या हल्ल्यात करनान यांचा मृत्य झाला आहे. शिवाय, हत्तीने अनेक दुकानांचे नुकसान केले आहे. 

दरम्यान, घटनास्थळी पोलिसांसह वनविभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. गावकरी मोठ्या प्रमाणात एकत्र गोळा झाले असून, त्यांनी हत्तींपासून संरक्षण करण्याची मागणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

==========================================
..हा हुतात्म्यांचा अपमान- साध्वी निरंजन ज्योती
लखनौ - ‘भारतमाता की जय‘ म्हणण्यास नकार देणे म्हणजे देशासाठी हुतात्मा झालेल्यांचा अवमान अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी केली आहे. 

मुस्लिम समुदायातील सदस्यांनी ‘भारतमाता की जय‘ म्हणून असा फतवा इस्लामिक शिक्षण देणाऱ्या उत्तर प्रदेशमधील दारूल उलूम देवबंद या संस्थेने काढला आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना निरंजन ज्योती म्हणाल्या, ‘ ‘भारतमाता की जय‘ न म्हणणे म्हणजे देशासाठी हुतात्मा झालेल्यांचा अपमान आहे. यातून इस्लामचा मूलतत्त्ववाद दिसून येतो. यातून त्यांची मानसिकता दिसून येते. त्यांनी समजून घ्यावे की ते पाकिस्तानमध्ये राहत नाहीत.‘ 

‘हिंदू धर्मामध्ये भारतमाता म्हणजे देवी असून ते त्यांचे भक्त आहेत. देवीच्या उपासनेमध्ये सहभागी होणे हे इस्लामविरोधी आहे. आमचे देशावर प्रेम आहे. मात्र आम्ही तिची उपासना करणार नाही. इस्लाममध्ये केवळ एकच देव मानला जातो‘, असे दारूल उलूम देवबंद संस्थेने काढलेल्या फतव्यात म्हटले आहे.
==========================================
बच्चन यांनी स्वीकारले उदयनराजेंचे निमंत्रण
सातारा : "छत्रपती शिवाजी महाराज का मैं बहोत सन्मान करता हूँ। सतारा में छत्रपती राजघराणे का सन्मान मैं जरूर स्वीकार करुंगा,‘‘ अशा शब्दात बिग बी अमिताभ बच्चन यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचे निमंत्रण स्वीकारले. त्यामुळे "बिग बी‘ अमिताभ साताऱ्यात येण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. 

छत्रपती घराणे व सातारकरांच्या वतीने शिवसन्मान पुरस्कार अभिनय सम्राट अमिताभ बच्चन यांना देण्यात येणार असून, या पुरस्कार सोहळ्यासाठी साताऱ्याच्या ऐतिहासिक भूमीत अमिताभ यांनी उपस्थित राहावे, असे निमंत्रण देण्यासाठी खासदार भोसले यांनी मुंबई येथील त्यांच्या "जनक‘ या निवासस्थानी भेट घेतली. या प्रसंगी बच्चन यांना उदयनराजेंनी स्फटिकाची वनपीस तलवार भेट दिली. 

साताऱ्यातील छत्रपती राजघराण्यांकडून यंदा बच्चन यांना शिवसन्मान पुरस्कार देण्याचा निर्णय झाला आहे. त्या अनुषंगाने ही भेट झाली. या प्रसंगी अमिताभ म्हणाले, की छत्रपती घराण्याबद्दल नितांत आदर आहे. या घराण्याकडून मिळणारा पुरस्कार हा महत्त्वपूर्ण आहे. मला मिळालेल्या पुरस्कारातील हा पुरस्कार अनमोल असेल. 
या प्रसंगी धनंजय पाटील, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, अशोक सावंत, अमरसिंह जाधवराव, पंकज चव्हाण, मानसी इंगळे आदी उपस्थित होते. 
==========================================
मसूद अजहरवरील कारवाईत चीनचा खोडा
नवी दिल्ली : पठाणकोट दहशतवादी हल्ल्यांचा ‘मास्टरमाईंड‘ मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करून त्याच्यावर बंदी घालण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीनने पुन्हा एकदा खीळ घातली. जानेवारीमध्ये पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. हा कट ‘जैश-ए-महंमद‘च्या अजहरने रचला होता. त्यामुळे त्याच्यावर तातडीने कारवाई करण्याचा प्रस्ताव भारताने फेब्रुवारीत संयुक्त राष्ट्रांमध्ये मांडला होता. 

या प्रस्तावावरील निर्णयासाठी आजपर्यंतची (शुक्रवार) मुदत होती. या मुदतीआधीच ‘हा निर्णय तूर्त थांबवावा‘ अशी ‘विनंती‘ चीनने संयुक्त राष्ट्रांच्या संबंधित समितीस केली. 

मसूद अजहर आणि ‘जैश-ए-महंमद‘ या संघटनेवर तातडीने कारवाई न केल्यास दक्षिण आशियातील इतर देशांच्या सुरक्षेसही धोका निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका भारताने घेतली होती. अजहर आणि ‘जैश-ए-महंमद‘ यांच्या दहशतवादी कारवायांचे ठोस पुरावेही भारताने संयुक्त राष्ट्रांच्या समितीसमोर सादर केले. या समितीमध्ये अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सच्या निरीक्षकांचा समावेश आहे. हे पुरावे या समितीने संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्यांना पाठविले. ‘या प्रस्तावावर कोणत्याही सदस्याचा आक्षेप नसेल, तर निर्णय घेण्याची मुदत संपल्यानंतर बंदीची घोषणा केली जाईल,‘ असेही जाहीर करण्यात आले होते. मात्र, ‘मसूद अजहरवर बंदी घालण्याचा निर्णय तूर्त स्थगित करावा, अशी विनंती चीनने या समितीला मुदत संपण्यापूर्वी काही तास आधी केली,‘ अशी माहिती देण्यात आली. 
==========================================
मुखेड येथे ३ एप्रील रोजी धम्म परिषद 


==========================================
 सराफा अबकारी कराच्या विरोधात मुखेड बंद ला समिश्र प्रतिसाद 
मुखेड : - 
         सर्व राज्यात सरकारने एक्ससाईज ड्यूटीच्या नावाखाली लादलेल्या नियम व अटीच्या विरोधात शहरातील सराफा व्यापा-यांनी गेल्या एक महिण्यापासुन आपले प्रतिष्ठाने-बंद ठेवली आहे. सराफा व सुवर्णकार संघटनेला पाठिंबा म्हणुन आज दि.१ एप्रिल रोजी मुखेड बंद चे आवाहण करण्यात आले होते. बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. यावेळी शहरातील व्यापा-यांनी मोर्चा काढुन तहसील कार्यालयात निवेदन दिले. मोर्चास पाठिंबा म्हणुन काँग्रेसचे माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी नगराध्यक्ष बाबुराव देबडवार, शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार, सरचिटणीस श्रावण रँपनवाड, शिवसेना शहरप्रमुख नागनाथ लोखंडे, मनसे तालुकाध्यक्ष बालाजी बंडे, माजी नगराध्यक्ष अनिल जाजु सह सराफा व सुवर्णकार कारागीर उपस्थित होते. मोर्चात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
     केंद्र सरकारने सराफांना विविध याची अटीसह अबकारी कर लागू केल्याने सराफा व्यापारी व कारागीर व्यवसाय अडचणीत आले आहेत. याचा निषेध म्हणुन सराफा व्यापा-यांनी गेल्या एक महिण्यापासुन आपले दुकाने बंद ठेवली आहेत. याचा परिणाम सामान्य ग्राहकांवर होत आहेत. म्हणुन सर्व व्यापारी व नागरिकांनी आपले लक्ष वेधुन सराफांचे प्रश्न मार्गी लावावेत यासाठी मुखेड बंद चे आवाहण करण्यात अाले होते. या बंद ला काँग्रेस, शिवसेना, मनसे आदींनी अापले समर्थन जाहिर केले होते. आज दि.१ एप्रिल रोजी काही व्यापा-यांनी आपले दुकाने बंद ठेवुन सराफा व्यावसायिकांना आपला पाठिंबा दिला. दुपारी १२ वाजता सर्व व्यापा-यांनी शहरातील मुख्य मार्गाने मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यामोर्चात सराफा सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष बस्वराज शिवपुजे, व्यापारी संघटनेचे बाबुराव देबडवार, कोडगीरे, जगदीश बियाणी, शिवकुमार बंडे, सराफा व्यापारी सत्यवान गरुडकर, सुनिल पाटील, गजानन कवटिकवार, सुरेश पाटील बेळीकर, दीपक देवापुरे, शंकरअण्णा पोतदार,  सागर कोडगीरे, शशिकांत जुन्ने पाटील, राजेश पालावार, नरेंद्र कळसकर,  किशन पोतदार आदिसह व्यापारी व सुवर्णकार कारागीर सहभागी होते.

No comments: