[अंतरराष्ट्रीय]
१- 'यामुळे' इसिसशी चर्चेचा विचार 'श्रीश्रीं'नी बदलला
२- टोकियो; मित्सुबिशीसमोरील अडचणीत वाढ
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- राज्यसभेच्या खासदारपदी डॉ. नरेंद्र जाधवांसह सहा जण नियुक्त
४- उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट कायम
५- पंकजा मुंडे 'दारुवाली बाई' म्हणून ओळखतील : मलिक
६- कन्हैय्या कुमारच्या वरळीतील सभेला परवानगी नाकारली
७- लोकलमध्ये सुरेश प्रभूंना सीटची ऑफर, प्रभूंचा रिप्लाय...
८- मल्ल्याने खासदारकीचे वेतन, भत्तेही सोडले नाहीत
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- 'फोर्स 2'चं शूटिंग मनसेने थांबवलं, 35 परदेशी कलाकार ताब्यात
१०- आयपीएल मुंबई-पुण्यातच हवं, एमसीएची सुप्रीम कोर्टात धाव
११- देवनार आगीमुळे प्रदूषणात भर, मनपा आयुक्तांशी सचिनची चर्चा
१२- औरंगाबाद; महसुलापेक्षा माणुसकी महत्त्वाची, दारु कंपन्यांच्या पाण्याबाबत हायकोर्टाचं मत
१३- पुणे; बाळासाहेबांमुळेच सुप्रिया राज्यसभेवर बिनविरोध : पवार
१४- 'आयटी'तील रोजगार 20 टक्क्यांनी घटणार
१५- बाळासाहेब राष्ट्रीय नेते, जागतिक कार्टुनिस्ट- पवार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- दिल्ली; युवराजच्या घराचं गेट कोसळून 8 वर्षीय बालकाचा मृत्यू
२०- कोल्हापूर; स्कॉलरशीपमध्ये दुसरा, दहावीत 94 टक्के मिळवणारा चोर
२१- अहमदनगर; अण्णांच्या आदर्श गावालाही दुष्काळाचा फटका, राळेगणसिद्धीमध्ये टँकर
२२- औरंगाबादेत शेतकऱ्यांनी मोसंबी बाग पेटवली
२३- ग्रेट विराट, कोहलीची पुण्यातील वृद्धाश्रमाला भेट
२४- वडीलधा-या व्यक्तींना ओझे समजून दूर लोटू नका - विराट कोहली
२५- छत्तीसगडमध्ये दोन नक्षलवादी ठार
२६- कर्नाटकच्या माजी मंत्र्याची आत्महत्या
२७- अमेठी; प्रियांकाला सांगून-सांगून कंटाळलोय- राहुल गांधी
२८- वडनेर; फक्त मुलगी द्या, बाकी काही नको; मुलींची संख्या घटल्याने वरपित्यांची विनवणी
२९- अरुणाचल प्रदेशात भूस्खलनामुळे 15 जणांचा मृत्यू
३०- जळगावमध्ये चिमुलकीचा खून;बलात्काराची शक्यता
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३१- उत्सुकता वाढवणारा 'सैराट'चा ट्रेलर
३२- आजचा चंद्र निरखून पाहा, कारण...
३३- 'सुलतान'मध्ये सलमानचं चाहत्यांसाठी सरप्राईज
३४- राधिका आपटे ठरली 'ट्रिबेका' फिल्म फेस्टिव्हलमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
३५- कंगनाचा हृतिकला दर सहा मिनिटाला एक मेल
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
सौंदर्य हे वस्तुत नसते तर पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते
(प्राजक्ता मोरे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये,
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
=================================================

गोरेगावच्या ठाकूर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये फोर्स 2 चित्रपटाचं शूटिंग सुरु होतं. संबंधित कलाकारांकडे टुरिस्ट व्हिसाही नसल्याचं उघड झालं आहे. त्यानंतर 35 परदेशी कलाकारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
ज्या कलाकारांकडे वर्क परमिट नसल्याचं पोलिसांना कारवाईत आढळलं, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर संबंधित देशांच्या दुतावासाशी संपर्क साधून पुढील कारवाई करण्यात येईल.
मनसेने चित्रपटाचं शूटिंग बंद पाडलं, त्यावेळी चित्रपटात भूमिका साकारणारा अभिनेता जॉन अब्राहमही सेटवर हजर होता. विपुल शाह यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी उचलली आहे.

चंदिगढच्या पंचकुला भागातील हे घर युवराजची आई शबनम सिंह यांच्या नावावर आहे. या घरात गेल्या काही महिन्यांपासून दुरुस्ती सुरु आहे. यावेळी कुलदीप नावाचा 8 वर्षांचा मुलगा वडिलांसोबत तिथे आला होता. त्यानंतर पाणी पिण्यासाठी तो मामाबरोबर एका नळाजवळ गेला.
खेळता-खेळता तिथे असलेल्या एक गेटलाही त्याने हात लावला. दुर्दैवाने त्याच वेळी हे गेट त्याच्या अंगावर पडलं. कुलदीपच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो रक्तबंबाळ झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
अपघाताच्या वेळी युवराज आणि त्याची आई दोघंही गुरुग्राममधील निवासस्थानी होते. पोलिस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

महाराष्ट्रात पाण्याची टंचाई असताना खेळपट्टी तयार करण्यासाठी लाखो लीटर पाण्याची नासाडी होते, त्यामुळे आयपीएलचे सामने महाराष्ट्राबाहेर व्हावेत, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयापुढे आली होती.

देवनारच्या आगीमुळे स्थानिकांना श्वसनाचे त्रास होत असून त्यावर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी याआधीही सचिनने पत्राद्वारे पालिकेकडे केली होती. त्यामुळे सचिनच्या पाठपुराव्याने तरी देवनारवासियांचा त्रास कमी होणार का याकडे आता लक्ष लागलं आहे.
देवनार डम्पिंग ग्राऊण्डमुळे परिसरातील झोपडपट्टीवासियांच्या प्रकृतीला त्रास होत आहे. या परिसरातील नागरिकांचं जीवनमान सुधारण्यास पालिका अधिकाऱ्यांनी मदत करावी, असं त्याने पत्रात म्हटलं होतं.

राज्यसभेच्या खासदारपदी डॉ. नरेंद्र जाधवांसह सहा जण नियुक्त
UPDATE : राज्यसभेच्या खासदारपदी राष्ट्रपतींकडून 6 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नरेंद्र जाधव, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी, बंगालमधले भाजप नेते स्वपनदास गुप्ता, बॉक्सर मेरी कोम, माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू आणि मल्याळम अभिनेता सुरेश गोपी यांची नियुक्ती झाली आहे.
नवी दिल्ली: राज्यसभेवर निवडल्या जाणाऱ्या राष्ट्रपती नामनिर्देशित 7 खासदारांमध्ये प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नरेंद्र जाधव यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
राज्यसभेचे खासदार आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांच्यासह इतर 7 सदस्यांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यांचीच रिप्लेसमेन्ट म्हणून नरेंद्र जाधव यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
=================================================
'फोर्स 2'चं शूटिंग मनसेने थांबवलं, 35 परदेशी कलाकार ताब्यात
मुंबई : फोर्स 2 चित्रपटाचं शूटिंग महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने बंद पाडलं आहे. वर्क परमिट नसताना परदेशी कलाकार चित्रपट काम करत असल्याने मनसेने शूटिंग थांबवलं. मनसेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी परदेशी कलाकारांनीही ताब्यात घेतलं आहे.
गोरेगावच्या ठाकूर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये फोर्स 2 चित्रपटाचं शूटिंग सुरु होतं. संबंधित कलाकारांकडे टुरिस्ट व्हिसाही नसल्याचं उघड झालं आहे. त्यानंतर 35 परदेशी कलाकारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
ज्या कलाकारांकडे वर्क परमिट नसल्याचं पोलिसांना कारवाईत आढळलं, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर संबंधित देशांच्या दुतावासाशी संपर्क साधून पुढील कारवाई करण्यात येईल.
मनसेने चित्रपटाचं शूटिंग बंद पाडलं, त्यावेळी चित्रपटात भूमिका साकारणारा अभिनेता जॉन अब्राहमही सेटवर हजर होता. विपुल शाह यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी उचलली आहे.
=================================================
युवराजच्या घराचं गेट कोसळून 8 वर्षीय बालकाचा मृत्यू
नवी दिल्ली : टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगच्या चंदिगढमधील घरात एक दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. घरातील दुरुस्तीच्या वेळी एक भक्कम गेट अंगावर कोसळून 8 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
चंदिगढच्या पंचकुला भागातील हे घर युवराजची आई शबनम सिंह यांच्या नावावर आहे. या घरात गेल्या काही महिन्यांपासून दुरुस्ती सुरु आहे. यावेळी कुलदीप नावाचा 8 वर्षांचा मुलगा वडिलांसोबत तिथे आला होता. त्यानंतर पाणी पिण्यासाठी तो मामाबरोबर एका नळाजवळ गेला.
खेळता-खेळता तिथे असलेल्या एक गेटलाही त्याने हात लावला. दुर्दैवाने त्याच वेळी हे गेट त्याच्या अंगावर पडलं. कुलदीपच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो रक्तबंबाळ झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
अपघाताच्या वेळी युवराज आणि त्याची आई दोघंही गुरुग्राममधील निवासस्थानी होते. पोलिस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
=================================================
आयपीएल मुंबई-पुण्यातच हवं, एमसीएची सुप्रीम कोर्टात धाव
मुंबई : आयपीएलचे सामने मुंबई-पुण्यातच खेळवले जावेत यासाठी मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे 1 मे नंतरचे सामने मुंबई-पुण्यात खेळवले जाणार की नाही? याचा फैसला आता सुप्रीम कोर्ट करणार आहे.
महाराष्ट्रात पाण्याची टंचाई असताना खेळपट्टी तयार करण्यासाठी लाखो लीटर पाण्याची नासाडी होते, त्यामुळे आयपीएलचे सामने महाराष्ट्राबाहेर व्हावेत, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयापुढे आली होती.
घझथ
उच्च न्यायालयानेही याचिकेत तथ्य असल्याचं नमूद केलं आणि 30 एप्रिलनंतरचे महाराष्ट्रातील नियोजित सामने इतर राज्यात खेळवण्याचे आदेश दिले. याच निर्णयाला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं आहे.
उच्च न्यायालयानेही याचिकेत तथ्य असल्याचं नमूद केलं आणि 30 एप्रिलनंतरचे महाराष्ट्रातील नियोजित सामने इतर राज्यात खेळवण्याचे आदेश दिले. याच निर्णयाला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं आहे.
=================================================
उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट कायम
नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये 27 एप्रिलपर्यंत राष्ट्रपती राजवट कायम राहणार आहे. कारण नैनीताल उच्च न्यायालयाने राष्ट्रपती राजवट हटवण्याचा दिलेला निर्णय सुप्रीम कोर्टाने स्थगिती केला आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट कायम राहील. याबाबतची पुढील सुनावणी 27 एप्रिलला होणार आहे.
मोठ्या गदारोळानंतर कालच हायकोर्टाने उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट हटवली होती. या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय स्थगित केला आहे.
उत्तराखंड विधानसभेत 70 आमदार आहेत. त्यातील 36 काँग्रेसचे तर 28 जण भाजपचं प्रतिनिधित्व करतात. तर इतर पक्षांचे 6 आमदार आहेत.
काँग्रेसच्या 9 आमदारांनी बंड केल्याने हरीश रावत सरकार अस्थिर झालं होतं. 27 मार्चला रावत सरकारला बहुमत सिद्ध करायचं होतं, पण ती संधी न देताच केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू केली होती, असा आरोप आहे. त्याविरोधात हरीश रावत सरकारने हायकोर्टात धाव घेतली होती.
हायकोर्टाने राष्ट्रपती राजवट हटवणं हा राज्यातील जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया काल माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी दिली होती. मात्र आज सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
दरम्यान, हरिश रावत आता 29 एप्रिल रोजी बहुमत सिद्ध करणार आहेत.
=================================================
देवनार आगीमुळे प्रदूषणात भर, मनपा आयुक्तांशी सचिनची चर्चा
मुंबई : मुंबईतल्या देवनार डंपिंग ग्राऊंडला वारंवार लागणाऱ्या आगीबाबत खासदार सचिन तेंडुलकरने चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी आज शिवाजीनगर भागातल्या पालिकेच्या एम वॉर्डमध्ये सचिन आणि पालिका आयुक्त अजय मेहता यांची बैठक पार पडली.
देवनारच्या आगीमुळे स्थानिकांना श्वसनाचे त्रास होत असून त्यावर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी याआधीही सचिनने पत्राद्वारे पालिकेकडे केली होती. त्यामुळे सचिनच्या पाठपुराव्याने तरी देवनारवासियांचा त्रास कमी होणार का याकडे आता लक्ष लागलं आहे.
देवनार डम्पिंग ग्राऊण्डमुळे परिसरातील झोपडपट्टीवासियांच्या प्रकृतीला त्रास होत आहे. या परिसरातील नागरिकांचं जीवनमान सुधारण्यास पालिका अधिकाऱ्यांनी मदत करावी, असं त्याने पत्रात म्हटलं होतं.
शिवाजीनगर आणि बैंगनवाडीसारखे परिसर प्रदुषणाचे आगार झाले आहेत. कचरा व्यवस्थापनात मुंबई मागे पडत असल्याचं मागेच हायकोर्टाने अधोरेखित केलं होतं, असंही सचिनने पत्रात नमूद केलं होतं.
सचिन तेंडुलकरने देवनारच्या शिवाजीनगर परिसरातील तीन वसाहतींना भेट दिली होती. त्यानंतर स्थानिकांचे प्रश्न पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणण्याचा निर्णय त्याने घेतला. पिण्याचं पाणी, सांडपाण्याचा निचरा, स्वच्छता, आरोग्य आणि बँकेच्या सुविधा, माध्यमिक शाळा यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी मर्यादित प्रमाणात असल्याचं सचिनने पत्रात म्हटलं होतं.
=================================================
महसुलापेक्षा माणुसकी महत्त्वाची, दारु कंपन्यांच्या पाण्याबाबत हायकोर्टाचं मत
औरंगाबाद : “दारु कंपन्यांना पुरवण्यात येणाऱ्या पाण्याबाबतच्या सुनावणीदरम्यान औरंगाबाद खंडपीठाने महसूल महत्त्वाचा नाही तर माणुसकी महत्त्वाची आहे”, असं ठणकावून सांगितलं.
दारू कंपन्यांना किती पाणी पुरवठा करू शकाल असा सवाल कोर्टानं राज्य सरकारला केला. त्याचं उत्तर सोमवारपर्यंत द्या असे आदेश दिले. शिवाय सुनावणीवेळी कोर्टानं आयपीएल आणि कुंभमेळ्याचे दाखले दिले.
“आम्ही दारु कंपन्यांचं उत्पादन बंद करा असं म्हणत नाही, तर पाणी बंद करा असं म्हणत आहोत. आकडेवारीच्या लॉजिकपेक्षा माणुसकी महत्वाची आहे. ही वेळ वादविवाद करण्याची वेळ नाही. हा प्रश्न औरंगाबाद पुरता मर्यादित नाही. अनेक गावं या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे अशा कंपन्यांचं पाणी तात्काळ 50 टक्के आणि नंतर 30 आणि 20 टक्के कपात करा”, असे निर्देश कोर्टाने दिले.
तसंच येत्या 10 मेपर्यंत 50 टक्के पाणी कपात करा आणि त्याबाबत सोमवारपर्यंत निर्णय घ्या, असे आदेशही कोर्टाने दिले.
=================================================
स्कॉलरशीपमध्ये दुसरा, दहावीत 94 टक्के मिळवणारा चोर
कोल्हापूर : प्रत्येकाकडे असलेली बुद्धिमत्ता ही दुधारी शस्त्रासारखी असते. तिचा वापर कोण कसा करेल, हे सांगता येत नाही. दहावीला 94 टक्के गुण मिळवणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाला घरफोडीच्या प्रकरणात कोल्हापुरात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
दहा घरफोड्या आणि 2 मोटारसायकल चोरणाऱ्या या तरुणाला दहावीत चक्क 94 टक्के गुण मिळाले होते. तसंच चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत तो राज्यात दुसरा आला होता. निव्वळ चैनीसाठी म्हणून तो चोरी करत असल्याचं उघड झालं.
19 वर्षीय आरोपीला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 11 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
=================================================
बाळासाहेबांमुळेच सुप्रिया राज्यसभेवर बिनविरोध : पवार
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुण्यात बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालनाचं उद्धाटन करण्यात आलं.
यावेळी पवारांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. राजकीय जीवनात जरी आमचं शत्रुत्व असलं तरी व्यक्तिगत जीवनात आम्ही कधीच हात राखून बोललो नाही.
व्यक्तिगत जीवनातला प्रेमाचा ओलावा आम्ही नेहमीच जपला असं पवार यांनी यावेळी सांगितलं.
कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माणसाला वर नेऊन ठेवणं हे बाळासाहेबांचं वैशिष्ट्य असल्याचं त्यांनी सांगितलं.
याशिवाय सुप्रिया सुळे या जेव्हा राज्यसभेच्या उमेदवार होत्या, त्यावेळी बाळासाहेबांनी त्यांच्याविरोधात उमेदवारही दिला नाही. सुप्रिया आमच्या अंगा खांद्यावर खेळली. त्यामुळे ती बिनविरोध राज्यसभेत जाईल, असं बाळासाहेब म्हणाले. त्यावर मी म्हणालो तुमच्या मित्रपक्षांचं काय? तर तुम्ही ‘कमळीची काळजी करु नका’, असं बाळासाहेब म्हणाले होते, अशी आठवण पवारांनी सांगितली.
तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही पूर्वीची माणसं मैत्री जाणणारी, जपणारी होती असं म्हणत भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. यावेळी त्यांनी पंकजा मुंडेंच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार दिला नसल्याचीही आठवण करून दिली.
=================================================
अण्णांच्या आदर्श गावालाही दुष्काळाचा फटका, राळेगणसिद्धीमध्ये टँकर
अहमदनगर : महाराष्ट्रातील या भीषण दुष्काळात जलसंधारणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी ज्या दोन गावांचा नेहमीच दाखला दिला जातो, त्यापैकी एक असलेलं राळेगणसिद्धी टँकरग्रस्त झालं आहे. होय, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी गावाला सध्या टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.
राळेगणमध्ये दररोज तीन टँकरने पिण्याचं पाणी पुरवावं लागत आहे.
गेल्या तीस वर्षात पहिल्यांदाच अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीवर पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. एका अर्थाने सध्याचा दुष्काळ किती भीषण आहे, हे ही यावरुन स्पष्ट होत आहे.
राळेगणसिद्धीतील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटत चालले आहेत. जलसंधारण आणि पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामासाठी राळेगणसिद्धी हे एकेकाळी आदर्श गाव होतं. आजही जलसंधारणाच्या आदर्श कामासाठी अण्णांच्या राळेगण आणि पोपटराव पवारांच्या हिवरे बाजारचा उल्लेख केला जातो.
गावपातळीवरील जलसंधारणाचे प्रणेते म्हणून राज्यभर ज्यांचा गौरव झाला त्या अण्णा हजारे यांना राळेगणसिद्धीतील पाण्याच्या दुर्भिक्ष्य दुष्काळाची आणि पाण्याच्या अनिर्बंध उपशाची कहाणी सांगून जातं. पण राळेगणवासियाचं नेमकं चुकलं कुठे याचा पडताळा घेण्याचं काम अण्णांनी सुरु केलं आहे.
=================================================
औरंगाबादेत शेतकऱ्यांनी मोसंबी बाग पेटवली

औरंगाबादेत शेतकऱ्यांनी मोसंबी बाग पेटवली
=================================================
ग्रेट विराट, कोहलीची पुण्यातील वृद्धाश्रमाला भेट
पुणे : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने गुरुवारी पुण्यातील ‘आभाळमाया’ वृद्धाश्रमाला भेट दिली. विराटने तिथल्या ज्येष्ठ नागरिकांची आपुलकीने चौकशी केली. कोहलीच्या भेटीने वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक हरकून गेले.
विराट कोहली फाऊंडेशन आणि एबीआयएल फाऊंडेशनच्या वतीने या वृद्धाश्रमाला आर्थिक मदत करण्यात आली. सिंहगड रोडवरील ‘आभाळमाया’ वृद्धाश्रम हे सध्या 57 ज्येष्ठ नागरिकांचं घर आहे. डॉ. अपर्णा देशमुख यांनी या वृद्धाश्रमाची स्थापना केली.
डॉ. अपर्णा वृद्धांसाठी करत असलेलं काम कौतुकास्पद आहे. वृद्ध पालकांना घरापासून दूर करणं दुर्दैवी आहे. घरातील ज्येष्ठ माणसांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य असल्याचं मत यावेळी विराट कोहलीने व्यक्त केलं.
=================================================
उत्सुकता वाढवणारा 'सैराट'चा ट्रेलर
मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळेचा बहुप्रतिक्षीत सैराट या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. टीझर आणि ट्रेलरमुळे ‘सैराट’ने नक्कीच उत्सुकता ताणून धरलेली आहे.
फँन्ड्रीनंतर नागराज मंजुळे दिग्दर्शित हा दुसरा सिनेमा आहे. प्रदर्शनाआधीच या सिनेमाच्या गाण्यांनी अनेकांना वेडही लावलं आहे.
नववीत शिकणारी आर्ची, 13 किलो घटवलेला परशा, सारं काही ‘सैराट’!
सैराटमधील झिंगाट, सैराट झालं जी आणि याड लागलं या गाण्यांनी चाहत्यांच्या मनावर अक्षरश: अधिराज्य गाजवलं आहे. अजय-अतुल यांचा आवाज आणि संगीताच्या तडक्यामुळे ही गाणी आता सगळीकडेच गुणगुणली जात असल्याचं दिसून येतंय.
येत्या 29 एप्रिलला परशा आणि आर्ची यांची अनोखी प्रेमकहाणी भेटीला येत आहे.
=================================================
पंकजा मुंडे 'दारुवाली बाई' म्हणून ओळखतील : मलिक
मुंबई: दारुकंपन्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन अडचणीत आलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बोचरी टीका केली आहे.
पंकजांचा उल्लेख नवाब मलिकांनी ‘दारुवाली बाई’ नावाने केला आहे. काल मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक बोलत होते.
मृणालताई गोरे किंवा अहिल्याबाई रांगणेकर यांचा मुंबईकर ‘पाणीवाली बाई’ म्हणून गौरव करायचे. तशा पंकजा मुंडे यांची ‘दारुवाली बाई’ म्हणून ओळख झाल्याची बोचरी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.
दारु कंपन्यांमध्ये संचालक पद मिळवण्यासाठी पंकजाताईंनी दोन डीन म्हणजे डायरेक्टर आयडेन्टिफिकेशन नंबर वापरल्याचा आरोप नबाव मलिक यांनी केला. राष्ट्रवादीनं यासंदर्भातले कागदपत्रे उघड केल्यानं पंकजाताईंच्या अडचणीत भर पडल्याचं मलिक म्हणाले.
त्यामुळे जलसंधारण मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यापुढे ‘दारुवाली बाई’ म्हणूनही ओळखल्या जातील असं मलिक म्हणाले.
=================================================
कन्हैय्या कुमारच्या वरळीतील सभेला परवानगी नाकारली
मुंबई: दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील छात्र संघाचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारच्या वरळीत होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. वरळीतील जनता शिक्षण संस्थेत कन्हैयाची सभा प्रस्तावित होती. मात्र आता त्याऐवजी चेंबूरच्या टिळकनगरमधील सभागृहात उद्या कन्हैय्या कुमारची सभा होणार आहे.
सभेसाठी घालून दिलेल्या अटींची पूर्तता न केल्याने पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं कळतंय.
सध्या पोलिसांच्या अटीनुसार ओळखपत्र आणि निमंत्रणाशिवाय सभेच्या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही. तसंच आयोजित सभा संध्याकाळी ६ वाजेपर्यंत संपवावी ही देखील अट घालण्यात आली आहे.
त्याचबरोबर कन्हैय्या कुमारच्या पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमाबाबतही सांशकता आहे. सध्या सिंहगड रोडवरील राष्ट्र सेवा दलाच्या सभागृहात कार्यक्रम आयोजित केला आहे. मात्र पोलिसांनी घातलेल्या अटींमुळे कार्यक्रमाचं स्थळ बदलण्याची शक्यता आहे.
=================================================
लोकलमध्ये सुरेश प्रभूंना सीटची ऑफर, प्रभूंचा रिप्लाय...
मुंबई: केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी भारतीय रेल्वेवर ‘हायटेक कृपा’ करण्याचा इरादा केला आहे. भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सुरेश प्रभूंनी अनेक महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत.
प्रभूंनी त्यातल्या प्रमुख प्रकल्पांची आणि त्या प्रकल्पाच्या प्रगतीची मुंबईतील कार्यक्रमात सविस्तर माहिती दिली. मांटुगा रेल्वे कारखान्याच्या शताब्दी वर्षानिमित्त सुरेश प्रभू मुंबईत आले होते. यावेळी प्रभूंच्या हस्ते करीरोडच्या फूट ओव्हर ब्रिजचंही उद्घाटन कऱण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुरेश प्रभूंमध्ये अनेक प्रकल्पावर सविस्तर चर्चा झाली.
दरम्यान सुरेश प्रभूंनी आज दुसऱ्या दिवशीही मुंबई लोकलमधून प्रवास केला. खुद्द रेल्वे मंत्री लोकलमध्ये आले म्हटल्यावर प्रवाशांनी त्यांना बसण्यासाठी जागा देऊ केली. मात्र सुरेश प्रभूंनी मोठ्या प्रांजळपणे प्रवाशांना नकार दिला आणि उभ्यानं प्रवास केला.
प्रभूंनी कालही करी रोड ते सीएसटी असा उभं राहून लोकलमधून प्रवास केला होता. तर आज त्यांनी पश्चिम रेल्वेवर खाररोड ते विलेपार्ले असा प्रवास लोकलमधून केला. यावेळीही त्यांनी उभं राहूनच प्रवास केला.
=================================================
आजचा चंद्र निरखून पाहा, कारण...
मुंबई : आज चैत्र पौर्णिमा… आज जेव्हा पौर्णिमेचा चंद्र पाहाल, तेव्हा एक गोष्ट तुमच्या ध्यानात येईल.. की नेहमीच्या पौर्णिमेला दिसतो तसा आजचा चंद्र भलामोठ्ठा टप्पोरा नाही. तर आजचा चंद्र एरवीच्या पौर्णिमेपेक्षा तुलनेने लहान आहे.
आजचा चंद्र लहान आहे, त्यामध्ये चैत्र पौर्णिमा किंवा हनुमान जयंतीचा काहीही संबंध नाही. तर हा एक खगोलीय चमत्कार आहे. असा प्रकार साधारणपणे पंधरा वर्षातून एकदाच होतो. या चमत्काराला लघुचंद्र किंवा इंग्रजीवाले मिनी मून म्हणतात. एरवीच्या पौर्णिमेला ते फुल मून म्हणतात.
चंद्र पृथ्वीपासून 3 लाख 84 हजार किलोमीटर अंतरावर आहे. मात्र काल परवा आणि आज या पौर्णिमेच्या आधीच्या आणि नंतरच्या दिवसात पृथ्वी आणि चंद्रामधील अंतर हे जवळपास 4 लाख 6 हजार 350 किमीपर्यंत वाढलं आहे. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या कक्षेमुळे हा बदल होत असतो. म्हणजे आताच्या चैती पौर्णिमेला चंद्र पृथ्वीपासून सर्वात लांब आहे. म्हणून तो आपल्याला तुलनेने लहान दिसत आहे.
तसंही आपल्याकडील हौशी आकाश निरीक्षकांना खऱ्या अर्थाने मिनी मून पाहता येणार नाही कारण चंद्र पृथ्वीपासून सर्वाधिक दूरच्या कक्षेत असण्याची वेळ आज सकाळी 10.55 च्या सुमारास होती. मात्र चंद्र पृथ्वीपासून लांबच्या कक्षेत असल्यामुळे आज रात्रीही तुलनेने चंद्र लहानच दिसेल.
यानंतर असा खगोलीय चमत्कार 10 डिसेंबर 2030 रोजी होईल.
चंद्र जेव्हा पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो, तेव्हा त्या स्थितीला सुपरमून म्हणतात. सुपरमून आणि मिनी मून या चंद्राच्या दोन स्थितीतील फरक हा साधारणपणे 14 टक्क्यांपर्यत असतो.
=================================================
'सुलतान'मध्ये सलमानचं चाहत्यांसाठी सरप्राईज
मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खानची रंगत काही वेगळीच आहे. सलमानने पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना सरप्राईज देणार आहे. सल्लूच्या फॅन्सना ‘सुलतान’मध्ये त्याच्या आवाजातील ‘जग घुमिया’ या गाण्याचा आनंद लुटता येणार आहे.
सलमान खानचा गाता गळा अनेक गाण्यातून आपल्यासमोर आला आहे. त्याचं हेच सिंगिंग टॅलेण्ट आता ‘सुलतान’ सिनेमात देखील पाहायला मिळणार आहे. हे केवळ एक प्रमोशनल साँग नसून ते या सिनेमाचा एक भाग असेल. विशाल-शेखर या जोडीने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.
सलमानने याआधी त्याचा होम प्रॉडक्शन चित्रपट ‘हिरो’ मध्ये ‘मैं हूं हिरो तेरा’ गाणे गायलं होते, जे प्रचंड हिट झालं होत. ‘दबंग’,’वॉन्टेड’ आणि ‘किक’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातही गाणं गायलं होतं. आता सलमानचं ‘जग घूमिया’ हे नवी गाणं प्रेक्षकांवर किती आवडेल हे लवकरच कळेल.
‘सुलतान’ सिनेमात या सिनेमात सलमान खान एका हरियाणाच्या कुस्तीपटूची भूमिकेत आहे. या चित्रपटात अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ‘ईद’ला रिलीज होणार आहे.
=================================================
राधिका आपटे ठरली 'ट्रिबेका' फिल्म फेस्टिव्हलमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २२ - शोर इन दि सिटी, मांझी: दि माऊंटन मॅन, बदलापूर असे अनेक चित्रपट आणि अहल्या सारख्या शॉर्टफिल्ममधील लक्षवेधी अभिनय करणारी गुणी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिला न्यूयॉर्कमधील ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये (आंतरराष्ट्रीय कॅटॅगरीत) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. 'मॅडली' या शॉर्टफिल्ममधील भूमिकेसाठी तिला या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.सहा दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या शॉर्ट स्टोरीजच्या 'मॅडली' या 20 मिनिटांच्या सेगमेंटमधील फिल्ममध्ये राधिका झळकली आहे. मात्र यातील भूमिकेसाठी तिचे खूप कौतुक झाले असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिल्म फेस्टिव्हलमध्येही तिची दखल घेतली गेली आहे.'ट्रिबेका' फिल्म फेस्टिव्हलमध्ये एखाद्या भारतीय अभिनेत्री सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या फिल्म फेस्टिव्हलसाठी जगभरातून हजारो फिल्म्स पाठवल्या जातात, ज्यांचे परीक्षण करणा-या ज्युरींमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गजांचा समावेश असतो.दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेता रितेश देशमुख, अर्जुन कपूर यांनी या पुरस्कारसाठी राधिकाचे अभिनंदन करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
=================================================
गडगंज मल्ल्याने खासदारकीचे वेतन, भत्तेही सोडले नाहीत
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २२ - किंगफिशर एअरलाईन्सच्या कर्मचा-यांचे महिनो महिन्याचे वेतन थकवणा-या विजय मल्ल्याने स्वत: अब्जोपती असताना राज्यसभेचा खासदार म्हणून मिळणारे वेतन आणि भत्ते कधीही सोडलेले नाहीत. बरेलीतील कार्यकर्ते मोहम्मद खालिद जीलानी यांनी माहिती अधिकारातंर्गत राज्यसभा सचिवालयाकडे माहिती मागितली होती. त्यातून ही माहिती समोर आली आहे.मल्ल्या राज्यसभेचा खासदार म्हणून मिळणारे दरमहा ५० हजार रुपये वेतन आणि विविध भत्त्यांचे २० हजार रुपये नियमितपणे घेत होता. मल्ल्याने विविध बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवले असून, सध्या परदेशात फरार आहे.मल्ल्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. ऐशोआरामी आयुष्य जगणा-या मल्ल्या बद्दलची ही माहिती थक्क करणारी असल्याचे जीलानी यांनी सांगितले. मल्ल्याने हवाई प्रवासाची रक्कम घेतली नाही पण टेलिफोन बिल आणि अन्य भत्ते मात्र घेतले.
=================================================
कंगनाचा हृतिकला दर सहा मिनिटाला एक मेल
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २२ - हृतिक रोशन आणि कंगना राणावतमध्ये सुरु झालेली लढाई थांबण्याऐवजी जंगलातल्या वणव्याप्रमाणे अधिकाधिक भडकत चालली आहे. कंगनाने हृतिकला पाठलेले काही ई-मेल लीक झाले असून, त्यामधून कंगना हृतिकवर एकतर्फी प्रेम करत असल्याचे दिसत आहे.डीएनएमध्ये प्रसिद्ध झालेले हे मेल हृतिकने तपासासाठी पोलिसांकडे दिले आहेत. कंगना आपला मानसिक छळ करत असल्याची तक्रारही त्याने दाखल केली आहे. सहा महिन्यांच्या काळात कंगनाने हृतिकला हजारापेक्षा जास्त मेल पाठवले आहेत. काही दिवस तर, दस सहा मिनिटाला एक या स्पीडने तिने हृतिकला मेल केले आहेत.कंगनाने पाठवलेल्या ई-मेलमधील मजकूरही धक्कादायक आहे. कंगनाने हृतिकला आपला न्यूड फोटो मेल केला होता. त्या फोटोसोबत मी तुझी वाट पाहत आहे असा संदेश लिहीला होता. कंगनाकडून येणा-या या मेलला हृतिककडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. मी सकाळी उठल्यानंतर गुगलवर तुझा फोटो किंवा तुझी मुलाखत शोधून माझ्या दिवसाची सुरुवात करते असे कंगनाने काही मेलमध्ये म्हटले आहे.
=================================================
वडीलधा-या व्यक्तींना ओझे समजून दूर लोटू नका - विराट कोहली
- ऑनलाइन लोकमतपुणे, दि. २२ - भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील आभाळमाया वृद्धाश्रमाला भेट देत आजी-आजोबांशी संवाद साधत त्यांच्या चेह-यावर हास्य फुलविले.पुण्यातील एबीआयएल फाउंडेशनचे अमित भोसले, आभाळमाया वृद्धाश्रमाच्या संस्थापिका डॉ अपर्णा देशमुख या वेळी उपस्थित होत्या. विराट कोहली फाउंडेशन व पुण्यातील एबीआयएल फाउंडेशनच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग वृद्धाश्रमाला आर्थिक मदतही देण्यात येणार आहे.यावेळी बोलताना विराट कोहली म्हणाला, घरातील वडिलधा-या व्यक्तींची काळजी घेणे हे कुटुंबातील सदस्यांचे व समाजाचे देखील कर्तव्य आहे. मात्र अनेकजण या वडीलधा-या व्यक्तींना ओझे समजून दूर लोटतात. असे करणे चुकीचे आहे.डॉ. अपर्णा देशमुख यांनी स्थापन केलेल्या या वृद्धाश्रमात नातलगांनी दूर सारलेल्या ५७ वृद्धांची काळजी घेतली जाते. त्यांची संपूर्ण व्यवस्था या वृद्धाश्रमात करण्यात आलेली आहे. ही संस्था २०१० साली सुरू झालेली असून कोणत्याही सरकारी अथवा संस्थेच्या मदतीशिवाय सुरू आहे. डॉ. अपर्णा यांच्या कमाईतूनच या संस्थेचा सर्व खर्च उचलला जातो. ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले व सुरेंद्र मोहिते यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.
=================================================
छत्तीसगडमध्ये दोन नक्षलवादी ठार
रायपूर - सुखमा जिल्ह्यात छत्तीसगड पोलिसांच्या कारवाईत दोन नक्षलवादी ठार झाल्याची घटना आज सकाळी घडली. या गोळीबारात आणखी काही जण जखमी झाले आहेत. सुखमा जिल्ह्यातील कुमाकोलिन गावानजिक दुर्गम भागात तपास मोहीम सुरू असताना लपलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. तेव्हा त्यात दोन नक्षलवादी मारले गेले आणि आणखी काही जण जखमी झाले. घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे.

'यामुळे' इसिसशी चर्चेचा विचार 'श्रीश्रीं'नी बदलला
नवी दिल्ली- क्रूर दहशतवादी संघटना इसिससोबत शांतता चर्चा करण्याचा जाहीर प्रस्ताव ठेवणारे आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना ‘इसिस‘कडून विपरीत उत्तर मिळाल्यावर त्यांचेही ‘शांतता चर्चे‘बद्दल विचार बदलल्याचे दिसते.
‘इसिस‘शी शांततापूर्ण तोडगा काढण्यास वाव नाही; त्यांना केवळ लष्कराच्या माध्यमातूनच उत्तर दिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
इसिसने ओलिसाच्या शिरच्छेदाचे छायाचित्र पाठवून श्री श्री यांनी दिलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना धोक्याचा इशारा दिला. रविशंकर यांनी आज (शुक्रवार) यासंदर्भात माहिती दिली.
रविशंकर म्हणाले "आम्ही इसिसकडे काही दिवसांपूर्वी शांततापूर्ण चर्चेचा प्रस्ताव दिला होता. परंतु, त्यांनी पाठविलेल्या उत्तरावरून त्यांना कोणत्याही प्रकारची चर्चा नको असल्याचे स्पष्ट होते. अशा संघटनांवर कठोर लष्करी कारवाई हाच योग्य पर्याय ठरेल."
'यामुळे' इसिसशी चर्चेचा विचार 'श्रीश्रीं'नी बदलला
‘इसिस‘शी शांततापूर्ण तोडगा काढण्यास वाव नाही; त्यांना केवळ लष्कराच्या माध्यमातूनच उत्तर दिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
इसिसने ओलिसाच्या शिरच्छेदाचे छायाचित्र पाठवून श्री श्री यांनी दिलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना धोक्याचा इशारा दिला. रविशंकर यांनी आज (शुक्रवार) यासंदर्भात माहिती दिली.
रविशंकर म्हणाले "आम्ही इसिसकडे काही दिवसांपूर्वी शांततापूर्ण चर्चेचा प्रस्ताव दिला होता. परंतु, त्यांनी पाठविलेल्या उत्तरावरून त्यांना कोणत्याही प्रकारची चर्चा नको असल्याचे स्पष्ट होते. अशा संघटनांवर कठोर लष्करी कारवाई हाच योग्य पर्याय ठरेल."
=================================================
'आयटी'तील रोजगार 20 टक्क्यांनी घटणार
'आयटी'तील रोजगार 20 टक्क्यांनी घटणार
मुंबई : चालू आर्थिक वर्षात माहिती-तंत्रज्ञान अर्थातच आयटी क्षेत्रातील रोजगारात 20 टक्क्यांची घट होणार असल्याची शक्यता ‘नॅसकॉम’ने वर्तवली आहे. भारतातील आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्या असणार्या इन्फोसिस, टीसीएस आणि विप्रोसारखा कंपन्यांनी ‘ऑटोमेशन’वर अधिक भर दिल्याने त्याचा परिणाम नवीन रोजगाराच्या संधींवर झाला आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात आयटी क्षेत्रातील नोकर्यांच्या संख्येत मोठी घट होणार असल्याचे नॅसकॉमच्या अहवालात म्हटले आहे.
चालू आर्थिक वर्षात आयटी कंपन्यांचा 10 ते 11 टक्के दराने विकास होईल. शिवाय सध्याच्या गतिमान झालेल्या जगात आयटी कंपन्या अधिक अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देत आहेत. डिजिटल क्षेत्रात देखील ऑटोमेशनला महत्त्व आले आहे. ऑटोमेशन वाढू लागल्यामुळे त्यामुळे नोकरीच्या संधी कमी होणार आहेत.
गेल्यावर्षी जूनमध्ये नॅसकॉमने केलेल्या अभ्यासानुसार, चालू आर्थिक वर्षात (2016-17) 2 लाख 75 हजार नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. तर सरलेल्या आर्थिक वर्षात 2 लाख 30 हजार नोकरीच्या संधी उपलब्ध होत्या.
=================================================
बाळासाहेब राष्ट्रीय नेते, जागतिक कार्टुनिस्ट- पवार
पुणे- "बाळासाहेब ठाकरे हे मित्र म्हणून आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व होते. मित्रत्त्व, माणुसकी, आस्था, दिलेला शब्द या बाबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही. बाळासाहेब राष्ट्रीय नेते असले, तरी आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यंग्यचित्रकार होते. सामान्यांच्या हितासाठी त्यांनी कुंचल्याची शक्ती वापरली. त्यांच्यातील अद्भुत कलेच्या अनुभूतीसाठी हे कलादालन उपयुक्त ठरेल,‘‘ अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महापालिकेने सणस मैदानासमोर उभारलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी पवार बोलत होते. या प्रसंगी महापौर प्रशांत जगताप, पालकमंत्री गिरीश बापट, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, ऍड. वंदना चव्हण, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक निम्हण, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृहनेते बंडू केमसे, मनसेचे गटनेते बाबू वागस्कर, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार मंगेश तेंडुलकर आदी उपस्थित होते. मित्र मंडळ चौकातील बाळासाहेब ठाकरे दवाखाना आणि राजमाता जिजाऊ प्रसूतिगृहाचेही उद्घाटन पवार आणि ठाकरे यांच्या हस्ते झाले.
बाळासाहेब राष्ट्रीय नेते, जागतिक कार्टुनिस्ट- पवार
महापालिकेने सणस मैदानासमोर उभारलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी पवार बोलत होते. या प्रसंगी महापौर प्रशांत जगताप, पालकमंत्री गिरीश बापट, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, ऍड. वंदना चव्हण, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक निम्हण, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृहनेते बंडू केमसे, मनसेचे गटनेते बाबू वागस्कर, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार मंगेश तेंडुलकर आदी उपस्थित होते. मित्र मंडळ चौकातील बाळासाहेब ठाकरे दवाखाना आणि राजमाता जिजाऊ प्रसूतिगृहाचेही उद्घाटन पवार आणि ठाकरे यांच्या हस्ते झाले.
=================================================
कर्नाटकच्या माजी मंत्र्याची आत्महत्या
कर्नाटकच्या माजी मंत्र्याची आत्महत्या
बंगळूर - कर्नाटकचे माजी कामगार मंत्री सी. गुरुनाथ (वय 69) यांनी रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. गुरुनाथ यांना लघवीचा त्रास होत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्याची प्रक्रिया सुरू असताना ते खिडकीजवळ गेले आणि खाली उडी मारली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गुरुनाथ यांना काही वैयक्तिक अडचणी होत्या. यामुळे ते त्रासले होते. मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता त्यांच्या नातेवाइकांनी वर्तविली आहे. धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते असलेल्या गुरुनाथ हे 1994 मध्ये एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्रिपदावर होते.
=================================================
मित्सुबिशीसमोरील अडचणीत वाढ
टोकियो : मित्सुबिशी मोटर्स समोरील अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे असून, मोटारींची इंधन कार्यक्षमता वाढवून दाखविल्याप्रकरणी अमेरिकी वाहन सुरक्षा यंत्रणांनी कंपनीकडे शुक्रवारी माहिती मागविली आहे.
जपानमधील वाहननिर्मिती क्षेत्रातील सहाव्या क्रमांकाची कंपनी असलेल्या मित्सुबिशीने 6 लाख 25 हजार मोटारींची इंधन कार्यक्षमता वाढवून दाखविल्याची कबुली या आठवड्यात दिली. जपानच्या परिवहन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या कार्यालयांवर छापे टाकले आहेत.
अमेरिकेच्या महामार्ग सुरक्षा प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मित्सुबिशी मोटर्सकडे अमेरिकेत विक्री केलेल्या मोटारींची माहिती मागविली आहे. मात्र, नेमक्या कोणत्या मॉडेलची माहिती मागविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आलेले नाही. जपानच्या परिवहन मंत्रालयाने कंपनीला इंधन कार्यक्षमता चाचणीचे सर्व अहवाल आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, अन्य कंपन्यांनाही या चाचण्यांचे अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे अन्य कंपन्यांही संशयाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.
याबाबत बोलताना परिवहन मंत्री केईची ईशी म्हणाले, ""हे अतिशय गंभीर प्रकरण असून, देशातील सर्व वाहन उद्योगावरील विश्वासाला यामुळे तडा जाऊ शकतो. मित्सुबिशी कंपनीने या मोटारी परत विकत घेण्याच्या पर्यायाचा विचार करावा.‘‘ ""मोटारींची इंधन कार्यक्षमता आधी दावा केल्याप्रमाणे न आढळल्यास कंपनीने ग्राहकांना अंशदान द्यावे, असा आदेश सरकार देऊ शकते,‘‘ असे अंतर्गत व्यवहार मंत्री सनेई ताकियाची यांनी स्पष्ट केले.
मित्सुबिशी कंपनीने "आय-एमआयईव्ही‘ या इलेक्ट्रिक मोटारीची इंधनक्षमता वाढवून सांगितली होती. या मोटारीची परदेशातही विक्री झालेली आहे. तसेच, याआधी केवळ जपानमध्येच विक्री झालेल्या काही मॉडेलची इंधनक्षमता वाढविल्याची कबुली कंपनीने दिली आहे. कंपनीने आरव्हीआर, आऊटलॅंडर, पजेरो, मिनिकॅब एमआयईव्ही या मोटारींच्या चाचणीसाठी बिगरजपानी पद्धतीची यंत्रणा वापरल्याची माहिती समोर आली आहे.
=================================================
प्रियांकाला सांगून-सांगून कंटाळलोय- राहुल गांधी
अमेठी (उत्तर प्रदेश)- प्रियांका गांधी यांना राजकारणात येण्यासाठी सांगून-सांगून कंटाळलो आहे. परंतु, ती राजकारणात येत नाही. तुम्हीच तिला विचारा व राजकारणात सक्रिय करा, असे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले.
शहरामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रियांका गांधी-वद्रा यांना राजकारणात येण्याविषयी राहुल गांधी यांच्याकडे विचारणा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘प्रियांकाला राजकारणात येण्यासाठी नेहमीच सांगतोय. परंतु, माझे काही ती ऐकत नाही. तुम्हीच तिला विचारून राजकारणात येण्यासाठी तयार करा.‘
‘संसदेत बोलताना राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाला (आरएसएस) माझा राग येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीही माझ्यावर चिडतात व नाराज होतात, तुम्हीच सांगा कोणते मुद्दे उपस्थित करावेत. कॉंग्रेसमध्ये प्रतिभावान नेत्यांची कमी नाही. या नेत्यांच्या जोरावरच राज्यात कॉंग्रेस आघाडी घेईल.‘ असेही गांधी म्हणाले.

फक्त मुलगी द्या, बाकी काही नको
मुलींची संख्या घटल्याने वरपित्यांची विनवणी, वधू-वर सूचक केंद्रातही नोंदणी
वडनेर - मुलांच्या विवाहासाठी वधू शोधणे सर्वच समाजांतील पालकांसाठी किचकट ठरत आहे. वधू मिळत नसल्याने अनेकांची दमछाक होत आहे. शहरी, ग्रामीण परिसरात वरासाठी वधू शोधणे एक मोठे आव्हान बनत चालले आहे. परिणामी अनेक पालक आपल्या विवाहयोग्य मुलांसाठी फक्त मुलगी द्या, बाकी काही नको, अशी विनवणी करीत आहेत.
एकेकाळी मुलाचा विवाह वरपक्षासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा विषय होता. वधुपिते वरपित्यांची मनधरणी करीत असत. मुलींचे घटलेले प्रमाण, शिक्षणामुळे मुलींमध्ये वाढलेल्या जाणिवा यामुळे अलीकडच्या काळात परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. विवाहयोग्य युवकांसाठी वधू शोधताना वरपित्यांची दमछाक होत आहे. मुलांऐवजी आता मुलींकडील लोक अटी घालू लागले आहेत. आम्हाला काही नको, फक्त मुलगी द्या, अशी विनवणी केली जात आहे. लग्न जुळण्यासाठी पूर्वी वधुपिते मध्यस्थ, विवाह नोंदणी केंद्रात चकरा मारत असत.
वरपित्यांना विवाह नोंदणी केंद्राकडे जाणे कमीपणाचे वाटायचे. आता मात्र वरपित्यांनी सर्रास वधू-वर नोंदणी, सूचक केंद्रांकडे आपला मोर्चा वळवला आहे. तेथे मुलींच्या तुलनेत मुलांचीच नोंदणी अधिक आहे. नोकरी, शेती, घर, चारचाकी वाहनांसह अनेक मोठ्या अपेक्षा वधुपक्षांकडून नोंदविल्या जात आहेत.

अरुणाचल प्रदेशात भूस्खलनामुळे 15 जणांचा मृत्यू
तन्गर- अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात भूस्खलन होऊन 15 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना आज (शुक्रवार) घडली आहे.
अतिरिक्त उपायुक्त लोड गांबो यांनी सांगितले की, शहरापासून चार किलोमीटर बांधकाम सुरू होते. तेथे 17 कामगार काम करत होते. भूस्खलनामुळे 15 जणांचा मृत्यू झाला आहे. नऊ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळी बचाव दलाचे पथक दाखल झाले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत असून, विविध ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.
अरुणाचल प्रदेशात भूस्खलनामुळे 15 जणांचा मृत्यू
अतिरिक्त उपायुक्त लोड गांबो यांनी सांगितले की, शहरापासून चार किलोमीटर बांधकाम सुरू होते. तेथे 17 कामगार काम करत होते. भूस्खलनामुळे 15 जणांचा मृत्यू झाला आहे. नऊ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळी बचाव दलाचे पथक दाखल झाले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत असून, विविध ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.
=================================================
जळगावमध्ये चिमुलकीचा खून;बलात्काराची शक्यता
चाळीसगाव (जळगाव)- शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या खडकी बुद्रूक या गावामध्ये चिमुकलीचा खून झाला आहे. तिच्यावर अतिप्रसंग झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सारिका बबन कांबळे (वय 6, मूळ रा. काष्टी धाबली, ता. मालेगाव, जि. नाशिक) ही चिमुकली नुकतीच मामाकडे राहण्यास आली होती. गुरुवारी (ता. 21) रात्री अकरा वाजल्यापासून ती बेपत्ता झाली होती. परिसरात तिचा शोध घेतला असता मृतावस्थेत आढळून आली. तिच्यावर अतिप्रसंग करून खून केल्याची शक्यता आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. शवविच्छेदनाचा अहवाल हाती आल्यानंतर कारण समजू शकेल. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

No comments:
Post a Comment