Wednesday, 6 April 2016

नमस्कार लाईव्ह ०६-०४-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- रक्का; इसिसकडून चौघांची भरवस्तीत गोळ्या घालून हत्या 
२- श्रीलंकेकडून 99 भारतीय मच्छिमारांची सुटका 
३- लंडन; निर्वासितांमधून इसिसचाही युरोपात प्रवेश 
४- बीजिंग; चीनकडून महत्त्वपूर्ण "विज्ञान उपग्रहा'चे प्रक्षेपण 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- दुष्काळाकडे डोळेझाक करु नका, सुप्रीम कोर्टाने सरकारला झापलं 
६- तीन पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले, दिल्ली, मुंबई गोव्याला धोका 
७- लालकृष्ण अाडवाणींच्या पत्नीचे निधन 
८- सम-विषममधून शालेय विद्यार्थ्यांना वगळले; विद्यार्थ्यांविरोधात बळाचा वापर नको:केंद्र सरकार 
९- रामदेवबाबांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का- शहा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- भारत फक्त हिंदूंसाठीच का ? - मुंबई उच्च न्यायालय 
११- माणसं महत्त्वाची की IPL? सामने राज्याबाहेर का नेत नाहीत? : हायकोर्ट 
१२- मुंबई बॉम्बस्फोट : मुझम्मिल अन्सारी, फरहान खोत व वाहीद अन्सारीला आजन्म कारावास 
१३- मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला हायकोर्टाची सशर्त परवानगी 
१४- मुंबई स्फोट : तिघांना जन्मठेप, चौघांना 10 वर्षांची जेल 
१५- सचिन, रहाणे बारामतीत, क्रिकेट मैदानाचं लोकार्पण 
१६- 'मोदीजी सीलिंग फॅन बॅन करा', प्रत्युषाच्या आत्महत्येनंतर राखीची मागणी! 
१७- आर्थर जेलमध्ये पीटर-भुजबळांची गट्टी, भुजबळांना मुखर्जींच्या घरचा डबा! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- शिर्डी; विखेंच्या कारखान्यात मळीच्या टाकीचा स्फोट, 2 कामगारांचा मृत्यू 
१९- हैदराबाद; सेल्फीचा मोह जीवावर, शाळकरी मुलाचा बळी 
२०- पटना; बिहारमधील दारुबंदीविरुद्ध न्यायालयात याचिका 
२१- पुण्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस 
२२- कोलकाता; उड्डाणपूल अपघात: कंपनीच्या उपाध्यक्षाला अटक 
२३- मुजफ्फरनगर; कारागृहात अंमलीपदार्थ नेण्याचा महिलेचा प्रयत्न 
२४- भाजपच्या वर्धापनदिनानिमित्त लोह येथे पक्षाच्या कार्यालयासमोर ध्वजास मानवंदना  
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२५- सनी लिऑनच्या 'वन नाइट स्टॅण्ड' सिनेमातील नवं गाणं रिलीज 
२६- 'हृतिक नोटीस मागे घे नाहीतर...', कंगनाचं अल्टीमेटम 
२७- ग्रामीण क्रिकेटपटू अनपॉलिश्ड् हिऱ्याप्रमाणे- सचिन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
नाती ही झाडाच्या पानासारखी असतात...
एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते
(संध्या चौधरी, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये, 
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


=====================================

सचिन, रहाणे बारामतीत, क्रिकेट मैदानाचं लोकार्पण

सचिन, रहाणे बारामतीत, क्रिकेट मैदानाचं लोकार्पण
पुणे: बारामतीत सध्या जय्यत तयारी सुरू आहे ती मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या स्वागताची. बारामती नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या लोकार्पण सोहळ्याचं आज आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजिंक्य राहणे, वसिम जाफर, अमोल मुजुमदार, अजित आगरकर हे क्रिकेटवीर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 
यावेळी मुंबई आणि महाराष्ट्र संघांमध्ये ट्वेन्टी ट्वेन्टीचा सामनाही खेळवण्यात येईल. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमपेक्षाही हे स्टेडियम मोठे असून, भविष्यात या मैदानावर आंतराष्ट्रीय दर्जाचे सामने खेळवण्यात येतील, असं नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी सांगितलं आहे.
=====================================

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला हायकोर्टाची सशर्त परवानगी

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला हायकोर्टाची सशर्त परवानगी
मुंबई : गुढीपाडव्याला शिवाजी पार्कात सभा घेण्याचा मनसेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मनसेला सभा घेण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे.

बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने सायलेंट झोनमध्ये सभा घेण्यास परवानगी कशी दिली असा सवाल सरकारला विचारला, ज्याच्यावर सरकारी पक्षाकडे काहीच उत्तर नव्हतं. त्यानंतर झालेल्या सुनावणीत अखेर कोर्टानेच मनसेला सभेसाठी सशर्त परवानगी दिली.

सभेदरम्यान ध्वनीप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. शिवाजी पार्क मैदान निवासी क्षेत्र असल्याने मनसेलाही 55 डेसिबलमध्ये मेळावा साजरा करावा लागेल. कोर्टाच्या नियमाचं उल्लंघन झाल्यास मनसेवर कारवाई करण्याचेही आदेशही हायकोर्टाने दिले आहेत.


शिवाजी पार्कवर होणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढी पाडवा मेळाव्यालाही आवाजाचे निर्बंध घाला, अशी मागणी वेकॉम ट्रस्टने सोमवारी मुंबई हायकोर्टात केली होती. त्याची दखल घेत कोर्टाने या मागणीसाठी रितसर अर्ज करण्याचे निर्देश दिले.
=====================================

माणसं महत्त्वाची की IPL? सामने राज्याबाहेर का नेत नाहीत? : हायकोर्ट

माणसं महत्त्वाची की IPL? सामने राज्याबाहेर का नेत नाहीत? : हायकोर्ट
मुंबईराज्यात आयपीएल सामन्यांच्या आयोजनावर मुंबई हायकोर्टाने आज चांगलेच ताशेरे ओढले आहेत.
 पाण्याची नासाडी करु नका, क्रिकेट सामन्यांपेक्षा माणसं जास्त महत्वाची असल्याचं मत हायकोर्टाने नोंदवलंय. दुष्काळी परिस्थितीत सामने राज्याबाहेर का नेत नाहीत असा परखड सावलही कोर्टाने एमसीएला विचारला आहे. 
आज झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांनी पाण्याच्या गैरवापराबद्दल आपली चिंता व्यक्त केली. यावर उत्तर देताना एमसीएच्या वकिलांनी सामन्यांच्या दरम्यान वापरलं जाणारं पाणी हे पिण्याचं पाणी नसल्याचं सांगितलं. पण या उत्तरावर कोर्टाचं समाधान झालं नाही. 
महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपुरात आयपीएलचे सामने होणार आहेत. त्यासाठी खेळपट्टी तयार करण्यासाठी लाखो लीटर पाण्याची नासाडी होणार असल्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. 
उद्या दुपारी 3 वाजता या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
=====================================

दुष्काळाकडे डोळेझाक करु नका, सुप्रीम कोर्टाने सरकारला झापलं

दुष्काळाकडे डोळेझाक करु नका, सुप्रीम कोर्टाने सरकारला झापलं
नवी दिल्ली: देशातील नऊ राज्ये दुष्काळाने होरपळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला चांगलंच झापलं. 
नऊ राज्यांना जीवघेण्या दुष्काळाने ग्रासलं असताना, तुम्ही डोळेझाक करु शकत नाही, या दुष्काळावर मात करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचला, असं सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला सुनावलं आहे. 
इतकंच नाही तर कोर्टाने केंद्र सरकारकला गुरुवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये दुष्काळी भागात ‘मनरेगा’ योजनेची अंमलबजावणी कशापद्धतीने केली आहे, आणि अशा राज्यांना केंद्र सरकार काय मदत करत आहे, याबाबतची माहिती द्यावी लागणार आहे. 
जनहित याचिका
‘आप’चे माजी नेते योगेंद्र यादव यांच्या ‘स्वराज अभियान’ या एनजीओने याबाबत सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. दुष्काळी शेतकऱ्यांना मदत आणि त्यांचं पुनर्वसन करावं, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. त्याबाबतच्या सुनावणीदरम्यान, कोर्टाने सरकारचे कान उपटले.
=====================================

मुंबई स्फोट : तिघांना जन्मठेप, चौघांना 10 वर्षांची जेल

मुंबई स्फोट : तिघांना जन्मठेप, चौघांना 10 वर्षांची जेल
मुंबई मुंबईत 2002 आणि 2003 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणातील मास्टरमाईंड मुझम्मिल अन्सारी, याच्यासह फरहान खोत आणि वाहीद अन्सारीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

तब्बल 13 वर्षानंतर टाडा न्यायालयानं या खटल्यात 13 पैकी 10 आरोपींना आज शिक्षा सुनावली.  त्यातल्या चार दोषींना 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे, तर तिघांना दोन वर्षांची कारावास ठोठावण्यात आला.

डिसेंबर 2002 ते मार्च 2003 या चार महिन्यात मुंबईत तीन वेळा बॉम्बस्फोट झाले होते.  या स्फोटांमागे ‘स्टुंड्टस इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ अर्थात ‘सिमी’ या दहशतवादी संघटनेचा हात होता.

डिसेंबर 2002 आणि मार्च 2003 दरम्यान मुंबईच्या विविध भागांमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. 2002 साली गुजरातमध्ये झालेल्या दंगलीचा बदला म्हणून हे बॉम्बस्फोट घडविल्याचे तपासात समोर आले होते.  6 डिसेंबर 2002 रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनजवळ मॅक्डोनाल्डमध्ये, 27 जानेवारी 2003 रोजी पार्ल्याच्या भाजी मार्केटमध्ये तर 13 मार्च 2003 रोजी मुलुंड रेल्वे स्टेशनजवळ लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यात 12 जणांचा मृत्यू झाला होता, तर 17 जण जखमी झाले होते.
=====================================

सनी लिऑनच्या 'वन नाइट स्टॅण्ड' सिनेमातील नवं गाणं रिलीज

सनी लिऑनच्या 'वन नाइट स्टॅण्ड' सिनेमातील नवं गाणं रिलीज
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑनचा सिनेमा ‘वन नाइट स्टॅण्ड’चं नवं गाणं इजाजत नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. अरिजीत सिंहनं हे गाणं गायलं असून मीत ब्रोनं हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.

हे गाणं सनी लिऑन आणि अभिनेता तुनज विरानीवर शूट करण्यात आलं आहे.


या सिनेमाचा टीझरही हॉट सीन्सनं भरलेला आहे. नेहमीप्रमाणेच सनी लिऑन या सिनेमातही हॉट आणि सेक्सी अवतारात पाहायला मिळणार आहे. एक रात्र आणि त्या एका रात्रीत काय-काय घडतं यावर हा सिनेमा बेतलेला आहे.


जॅस्मीन डिसूजा दिग्दर्शित या सिनेमात सनी लिऑन आणि अभिनेता तनुज विरानी प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा 22 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
=====================================

'मोदीजी सीलिंग फॅन बॅन करा', प्रत्युषाच्या आत्महत्येनंतर राखीची मागणी!

'मोदीजी सीलिंग फॅन बॅन करा', प्रत्युषाच्या आत्महत्येनंतर राखीची मागणी!
मुंबई: टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूचे कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे. प्रत्युषाच्या मृत्युचं नेमकं काय कारण आहे? हे पोलीस जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. याच दरम्यान, प्रत्युषाच्या मृत्यूबाबत आता अभिनेत्री राखी सावंतनं वादग्रस्त विधान केलं आहे.

नेहमीच वादात राहणारी अभिनेत्री राखी सावंतनं प्रत्युषासाठी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत तिनं मोदी सरकारकडे एक विचित्र मागणी केली आहे.

पत्रकार परिषदेत राखी चक्क सीलिंग फॅनच हातात घेऊन आली. ‘फक्त भारत माता की जय बोलणं जास्त जरुरी नसून घरातून सीलिंग फॅन हटवणं जरुरीचं आहे.’ राखी इथंच थांबली नाही तर तिनं थेट पंतप्रधान मोदींकडेच याबाबत  मागणी केली आहे.

‘मी पंतप्रधान मोदींना आवाहन करु इच्छिते की, देशामध्ये सीलिंग फॅन बॅन करायला हवे. जेणेकरुन आत्महत्यासारख्या घटना घडणार नाही.’ असंही राखीही म्हणाली.

सीलिंग फॅनला लटकून आमच्या मुली-बाळी मरतायत, अशावेळी मोदींनी सीलिंग फॅनच्या उत्पादनावर बंदी आणायला हवी. फक्त टेबल फॅन किंवा एसी वापरण्याचे आदेश काढायला हवे.

मुंबईतील अंधेरी येथील आपल्या राहत्या घरी पंख्याला लटकून प्रत्युषानं आत्महत्या केली होती. दरम्यान, स्टटंबाजी आणि वादग्रस्त विधान करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारी राखी प्रत्युषाच्या मृत्युची बातमी ऐकून थेट रुग्णालयातही गेली होती. त्यावेळी तिने प्रत्युषाच्या बॉयफ्रेंडवर बरेच आरोप केले होते.
=====================================

विखेंच्या कारखान्यात मळीच्या टाकीचा स्फोट, 2 कामगारांचा मृत्यू

विखेंच्या कारखान्यात मळीच्या टाकीचा स्फोट, 2 कामगारांचा मृत्यू
शिर्डी: शिर्डीमध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरा साखर कारखान्यात ऊसाच्या मळीच्या टाकीचा स्फोट झाला. या भीषण दुर्घटनेत 2 कामगारांचा मृत्यू झाला आहे.लोणी प्रवरानगर भागात ही  धक्कादायक घटना घडली. 
या स्फोटात 10 ते 12 कामगार जखमी झाले आहेत. त्यांना प्रवरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी काही कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. 
हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं  नाही. मात्र या भीषण स्फोटामुळे परिसरात भयभीतता पसरली आहे.
=====================================

आर्थर जेलमध्ये पीटर-भुजबळांची गट्टी, भुजबळांना मुखर्जींच्या घरचा डबा!

आर्थर जेलमध्ये पीटर-भुजबळांची गट्टी, भुजबळांना मुखर्जींच्या घरचा डबा!
मुंबई: मुंबईतल्या आर्थर कारागृहात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि शीना बोरा हत्याकांडात आरोपी असलेल्या पीटर मुखर्जी यांची चांगलीच दोस्ती जमल्याचं समजतं आहे. कारागृहात गेल्यापासून छगन भुजबळ आणि पीटर मुखर्जी यांच्यात चांगलीच गट्टी जमली आहे.

विशेष म्हणजे भुजबळांना अद्याप घराच्या जेवणाची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे भुजबळांना पीटर मुखर्जी यांच्याच डब्याचाच आधार मिळतो आहे. आर्थर कारागृहाच्या १२ क्रमांकाच्या बराकीत भुजबळांची रवानगी करण्यात आली आहे.

यामध्ये ७ ते ८ कैदी असून त्यात पीटर मुखर्जी, अण्णा भाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात कैदेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांचाही समावेश आहे. विशेष रंजक गोष्ट म्हणजे, भुजबळ मंत्रीपदी असताना त्यांनी आर्थर कारागृहात स्पेशल सेल उभारण्याचे आदेश दिले होते. त्या सेलमध्ये याआधी दहशतवादी कसाबला ठेवलं होतं. त्यानंतर ती सेल विविध बराकींमध्ये विभागली गेली. त्यापैकी १२ क्रमांकाच्या बराकीत सध्या भुजबळ कोठडीत आहेत.
=====================================

सेल्फीचा मोह जीवावर, शाळकरी मुलाचा बळी

सेल्फीचा मोह जीवावर, शाळकरी मुलाचा बळी
हैदराबाद : सेल्फीचा मोह पुन्हा एकदा जीवावर बेतला आहे. यावेळी सेल्फीच्या मोहाने हैदराबादच्या शाळकरी मुलाचा बळी गेला आहे. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा सेल्फीच्या मोहाने मृत्यू झाला आहे.

हैदराबादेतील प्राणीसंग्रहालयात एका टेकडीवरून सेल्फी घेताना, तोल जाऊन पडल्यामुळे मंजीत चौधरी या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

मंजीतने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षा झाल्यानंतर तो पिकनिकसाठी बहिण आणि भाऊजींसोबत हैदराबादच्या प्राणीसंग्रहालयात गेला होता. त्यावेळी ही दुर्घटना घडली.
=====================================

'हृतिक नोटीस मागे घे नाहीतर...', कंगनाचं अल्टीमेटम

'हृतिक नोटीस मागे घे नाहीतर...', कंगनाचं अल्टीमेटम
मुंबई: अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. हृतिक प्रकरणाची दिशा बदलण्याचा आणि मीडिया ट्रायलचा आधार घेत असल्याचा आरोप कंगनाने केला आहे. सोबतच कंगनाने हृतिकला कायदेशीर नोटीस मागे घेण्याचा सल्ला दिला आहे. तसं न केल्यास कारवाईचा सामना करण्यास तयार राहा असंही तिनं बजावलं आहे.

‘जर हृतिकनं ती नोटीस मागे घेतली तर कंगना हे प्रकरण इथंच संपविण्यास तयार आहे.’ अशी माहिती कंगनाचे वकील रिजवान सिद्दकी यांनी दिली.

आपली प्रतिमा खराब केल्याप्रकरणी हृतिक रोशनने कंगनाला नोटीस बजावली, तर कंगनाने हृतिक रोशनच्या नोटिशीला उत्तरादाखल आणखी एक नोटीस पाठवली होती.

वकील रिझवान सद्दिकी यांच्या मार्फत कंगनाने ऋतिक रोशनला 21 पानांची नोटीस पाठवली आहे. ऋतिकने आपल्याला धमकावल्याचा आरोप या नोटिशीमधून कंगनाने केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण:

पत्रकार परिषद घेऊन कंगनाने जाहीर माफी मागावी, अशी मागणी हृतिक रोशनने कंगनाला पाठवलेल्या नोटिशीतून केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कंगना- ह्रतिकमध्ये कोल्ड वॉर सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी कंगनाने हृतिकला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला होता की, काहीजण प्रसिद्धीसाठी माझ्या नावाचा वापर करतायेत.

कंगनाचं हे वक्तव्य गंभीरपणे घेत हृतिकने तिला नोटीस पाठवलीय. जाहीर पत्रकार परिषदेत माफी मागावी, अशी मागणी हृतिकने केली आहे.
=====================================

लालकृष्ण अाडवाणींच्या पत्नीचे निधन

  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. ६ - भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अाडवाणी यांच्या पत्नी कमला अाडवाणी यांचे बुधवारी संध्याकाळी दिल्लीत ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांनी एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 
    मिळालेल्या माहितीनुसार त्यांना आज बुधवारी सकाळी छातीत दुखत असल्यानं दिल्लीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. संध्याकाळच्या सुमारास ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांचे हृदय बंद पडल्याने निधन झाल्याचे सांगितले. लालकृष्ण अडवाणीं 51 वर्षांपूर्वी कमला यांच्याशी विवाह बंधनात अडकले होते.
=====================================

मुंबई बॉम्बस्फोट : मुझम्मिल अन्सारी, फरहान खोत व वाहीद अन्सारीला आजन्म कारावास

  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई,दि. ६ - मुंबईत डिसेंबर २००२ ते मार्च २००३ दरम्यान झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटांप्रकरणातील प्रमुख दोषी मुझम्मिल अन्सारी, फरहान खोत व वाहीद अन्सारीला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर सिमीचे दहशतवादी साकीब नाचन, आतिफ मुल्ला यांना १० वर्षांच्या आणि अन्वर अली,मोहम्मद कमील, नूर मोहम्मद यांना २ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. विशेष पोटा न्यायालयाने बुधवारी दुपारी हा निर्णय दिला. 
    डिसेंबर २००२ ते मार्च २००३ दरम्यान मुलुंड, मुंबई सेंट्रल, विलेपार्ले येथे बॉम्बस्फोट झाले होते. त्यामध्ये १२ जण ठार तर १३९ लोक जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटांप्रकरणाची न्यायालयाने गेल्या आठवड्यात १० जणांना दोषी ठरवले तर तीन जणांची सबळ पुराव्याअभावी सुटका केली.
=====================================

तीन पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले, दिल्ली, मुंबई गोव्याला धोका

=====================================

भारत फक्त हिंदूंसाठीच का ? - मुंबई उच्च न्यायालय

  • ऑनलाइन लोकमत 
    मुंबई, दि. ६ - एडस जनजागृतीच्या कार्यक्रमात हनुमान चालीसाचे कथन ठेवण्याच्या नागपूर महापालिकेच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेला भारत फक्त हिंदूंसाठीच आहे का ? असा प्रश्न विचारला आहे. यासंबंधी दाखल झालेल्या जनहीत याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने भारत फक्त हिंदूंसाठीच आहे ? असा प्रश्न विचारला. 
    एडस जनजागृतीच्या कार्यक्रमात हनुमान चालीसाचे कथन ठेवण्यावर न्यायालयाने कठोर शब्दात ताशेरे ओढले. नागपूर महापालिकेने पोद्दारेश्वर राम मंदिर ट्रस्टच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कस्तुरचंद पार्क मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. 
    हनुमान चालीसाच ?, कुराण, बायबल किंवा अन्य धार्मिक साहित्याचे कथन का नाही ? असा सवाल खंडपीठाने विचारला. हनुमान चालीस आणि एडस जनजागृतीचा काय संबंध ? फक्त हिंदूंनाच एडसची लागण होते का ? फक्त हनुमान चालीसाच्या पठणाने रुग्ण या भयंकर रोगातून बरा होणार ? असे प्रश्न खंडपीठाने विचारले. 
    न्यायालयाच्या कानउघडणी नंतर आयोजकांनी दोन्ही कार्यक्रमांचे वेगवेगळे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. हनुमान चालीसा पठण आणि एडस जनजागृती कार्यक्रमामध्ये तासाभराचे अंतर ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. 
=====================================
बिहारमधील दारुबंदीविरुद्ध न्यायालयात याचिका
पाटणा - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये केलेल्या संपूर्ण दारुबंदीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ए. एन. सिंह यांनी बिहारच्या उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. 

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य जनतेच्या हक्कावर गदा आली असून, कोणी काय खावे आणि प्यावे, याचा निर्णय घेणारे सरकार कोण, असा प्रश्‍न याचिकेतून उपस्थित करण्यात आला आहे. याचिकेवरील सुनावणीची तारीख अद्याप निश्‍चित झालेली नाही. ‘देशी दारुबंदीच्या निर्णयावर ग्रामीण भागातील जनतेकडून विशेषत: महिला आणि बालकांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याने आम्ही संपूर्ण दारुबंदीचा निर्णय घेतला‘, अशी माहिती देत नितीश कुमार यांनी दारुबंदीचा निर्णय जाहीर केला. दरम्यान आर्मी कॅंटिनमध्ये दारुविक्री सुरुच राहणार असल्याचेही ते म्हणाले.
=====================================
सम-विषममधून शालेय विद्यार्थ्यांना वगळले
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत येत्या 15 एप्रिलपासून पुन्हा सुरू होणाऱ्या सम-विषम योजनेतून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या मोटारींना सवलत देण्यात आल्याची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली. 



सिसोदिया यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, ‘15 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या सम-विषम योजनेतून शालेय पोषाखात विद्यार्थ्यांना नेणाऱ्या मोटारींना वगळण्यात आले आहे.‘ या योजनेचा तिसरा टप्पा 15 ते 30 एप्रिलदरम्यान राबविण्यात येणार आहे. दरम्यान महिलांनाही या योजनेतून वगळण्याचा विचार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली नसल्याचे म्हणत दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती माहिवाल यांनी या योजनेतून महिलांना वगळण्याबाबत दिल्लीच्या वाहतूक मंत्री गोपाल राय यांना आवाहन केले आहे. याबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
=====================================
इसिसकडून चौघांची भरवस्तीत गोळ्या घालून हत्या
रक्का (सीरिया)- इसिस या दहशतवादी संघटनेने चौघांना भरवस्तीत खांबाला बांधून नागरिकांसमोरच गोळ्या घालून हत्या केली. शिवाय, संबंधित छायाचित्रे सोशल नेटवर्किंगवर प्रसारित केली आहेत. 

इसिसने चौघांवर लुटमारीचा आरोप ठेवला होता. शहरामध्ये चौघांना खांबाला बांधण्यात आले होते. यावेळी त्यांचे चेहरे कपड्याने बांधण्यात आले होते. चौघांच्याही डोक्‍यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. 

दरम्यान, इसिसने गेल्या आठवड्यात 15 जणांची हत्या केली होती.
=====================================
विद्यार्थ्यांविरोधात बळाचा वापर नको:केंद्र सरकार
नवी दिल्ली - जम्मु काश्‍मीर राज्याची राजधानी असलेल्या श्रीनगर येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमधील (एनआयटी) विद्यार्थ्यांविरोधात करण्यात आलेल्या पोलिस कारवाईसंदर्भात केंद्र सरकारने आज (बुधवार) "काळजी‘ व्यक्त केली. 

विद्यार्थ्यांविरोधात बळाचा वापर करण्यात येऊ नये, असे मत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी या पार्श्‍वभूमीवर व्यक्त केले. या विद्यार्थ्यांना कोणतीही शारीरिक इजा होऊ नये; तसेच या प्रकाराचा त्यांच्या अभ्यासावर कोणताही नकारात्मक परिणाम होऊ नये, याची खबरदारी केंद्रातर्फे घेण्यात येत असल्याची माहितीही सिंह यांनी यावेळी दिली. ""जमु काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना यासंदर्भातील आवाहन करण्यात आले आहे. भविष्यात अशा स्वरुपाची कोणतीही कारवाई करताना यासंदर्भातील काळजी घेतली जाईल, असे आश्‍वासन त्यांच्याकडून देण्यात आले आहे,‘‘ असे सिंह म्हणाले. 

नुकत्याच झालेल्या ट्‌वेंटी-ट्‌वेंटी विश्‍वकरंडक स्पर्धेमधील उपांत्य फेरीतील सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर एनआयटीमध्ये स्थानिक व इतर विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष झाला होता. भारत वेस्ट इंडीजकडून पराभूत झाल्यानंतर काश्मिरी विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला होता. त्याला बाहेरून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी विरोध केल्याने वाद निर्माण झाला होता. या तणावामुळे एनआयटी काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 
=====================================
श्रीलंकेकडून 99 भारतीय मच्छिमारांची सुटका
मदुराई- श्रीलंकन न्यायालयाने आज (बुधवार) 99 भारतीय मच्छिमारांची सुटका केली. सुटका केलेले मच्छिमार हे तमिळनाडूमधील विविध भागातील आहेत. 

मच्छिमार करताना सागरी सीमा ओलांडल्याच्या आरोपाखाली श्रीलंकेने भारतीय मच्छिमारांना जानेवारीमध्ये अटक केली होती. श्रीलंकेच्या न्यायालयाने आज त्यांची सुटका केली. न्यायालयाने श्रीलंका सरकारला सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील दोन दिवसांमध्ये ते भारतामध्ये दाखल होतील, असे सूत्रांनी सांगितले. 

दरम्यान, रामेश्वरम येथील चार मच्छिमारांना 4 एप्रिल रोजी श्रीलंकेने ताब्यात घेतले असून त्यांची सुटका करण्यात आलेली नाही. न्यायालयाने त्यांना 19 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
=====================================
रामदेवबाबांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का- शहा
नवी दिल्ली - ‘योगगुरु रामदेवबाबा यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य लागू होत नाही का?‘ अशा प्रश्‍न उपस्थित करत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रामदेवबाबा यांना पाठिंबा दर्शविला आहे. 

एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शहा बोलत होते. "रामदेवबाबा हे भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. जे लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलत आहेत, त्यांना मला विचारावेसे वाटते की रामदेवबाबा यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य लागू नाही का?‘, असे म्हणत शहा यांनी प्रश्‍न उपस्थित केला. 

तर एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी "लोकशाहीमध्ये लोक अनेक गोष्टी बोलत असतात. मात्र सरकार जे ठरवेल ते सर्वांना बंधनकारक असते‘, असे म्हणत रामदेवबाबा यांच्या वक्तव्यातून सरकारची भूमिका स्पष्ट होत नसल्याचा सांगितले आहे. 

‘देशात कायद्याचे राज्य आहे. अन्यथा भारतमातेचा अपमान करणाऱ्या कोण्या एका व्यक्तीचे नाही, तर लाखो लोकांचे डोके उडवले असते‘, असे खळबळजनक विधान सोमवारी रोहतक येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सद्‌भावना सभेत बोलताना रामदेवबाबा यांनी केले होते.
=====================================
ग्रामीण क्रिकेटपटू अनपॉलिश्ड् हिऱ्याप्रमाणे- सचिन

बारामती- ग्रामीण भागातील क्रिकेटपटू हे पॉलिश न केलेल्या हि-याप्रमाणे आहेत, त्यांना प्रशिक्षकांच्या माध्यमातून चांगले प्रशिक्षण दिले तर ते माझ्याप्रमाणेच भारतीय संघातून उत्तम क्रिकेट खेळू शकतील, बारामतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये सराव करून घाम गाळा व बारामतीसोबतच देशाचेही नाव उज्वल करा, असा संदेश मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या लोकार्पण सोहळा आज बारामतीत झाला. त्या प्रसंगी बारामतीकरांशी संवाद साधताना तेंडुलकर यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अजय शिर्के, नगराध्यक्ष योगेश जगताप यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. सचिन तेंडुलकर यांच्यासमवतेच अजिंक्य रहाणे, अजित आगरकर, वसिम जाफर, चंद्रकांत पंडीत यांच्यासह अनेक मान्यवरांनी या सोहळ्यास हजेरी लावली.
=====================================
पुण्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस
पुणे - पुणे शहर व उपनगरात आज (बुधवार) दुपारी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. खडकवासला परिसरात गारांचा पाऊस झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरासह कात्रज, मुंढवा, केशवनगर, कोथरुड, उत्तमनगर या भागात ढगांच्या गडगडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. उन्हामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

शहरात गेल्या काही दिवसांत तापमानाच्या पाऱ्याने उच्चांक गाठला होता. या पावसामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
=====================================
निर्वासितांमधून इसिसचाही युरोपात प्रवेश
लंडन - युरोपमध्ये सीरिया व पश्‍चिम आशियातून मोठ्या संख्येने येत असलेल्या निर्वासितांना सामावून घेण्यासाठी तुलनात्मकदृष्टया शिथील करण्यात आलेल्या सीमारेषेवरील तपासणीचा फायदा इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेचे दहशतवादी घेत असल्याचे युरोपिअन युनियनच्या सीमासुरक्षेसंदर्भातील संस्थेच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 

सुरक्षेसंदर्भातील धोरणामध्ये "गंभीर चुका‘ करण्यात आल्याने ग्रीस व इटलीमध्ये बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने प्रवेश मिळविण्यात हजारोनागरिकांनी यश मिळविल्याचे फ्रंटेक्‍स या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या नागरिकांची काटेकोरपणे तपासणी झाली नसल्याची कबुलीही या संस्थेने दिली. 

""युरोपमध्ये हल्ला घडविलेल्या दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवादी हे लेरोस येथून अनियमितरित्या युरोपमध्ये घुसले होते. युरोपमध्ये प्रवेश मिळविण्याकरता या दोघांनी बनावट सीरियन कागदपत्रांचा वापर केला होता,‘‘ असे या संस्थेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या "रिस्क ऍनॅलिसिस 2016‘ या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

दहशतवादी युरोपमध्ये घुसण्यासाठी येथे येणाऱ्या लक्षावधी निर्वासितांच्या लोंढ्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊ शकतात, हे पॅरिसमध्ये गेल्या नोव्हेंबर महिन्यात घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यामधून स्पष्ट झाल्याचे प्रतिपादन या अहवालातून करण्यात आले आहे. 
=====================================
उड्डाणपूल अपघात: कंपनीच्या उपाध्यक्षाला अटक
कोलकाता - कोलकाता येथील उड्डाणपूल अपघात प्रकरणात पूल उभारण्याचे काम असलेल्या आयव्हीआरसीएल कंपनीच्या उपाध्यक्षाला ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

या प्रकरणी आयव्हीआरसीएलच्या आठ अधिकाऱ्यांना भारतीय दंड संहितेतील 302 (खून), 307 (खुनाचा प्रयत्न) आणि 120 बी (गुन्हेगारी कट) या कलमांतर्गत अटक करण्यात आली आहे. यापूर्वी कंपनीतील प्रकल्प व्यवस्थापक तन्मॉय सीलला ताब्यात घेण्यात आले होते. आज कंपनीचे उपाध्यक्ष रणजित भट्टाचार्यला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर स्थानिक न्यायालयाने त्याची पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. 

31 मार्च रोजी कोलकाता उत्तर कोलकातामधील गणेश चित्रपटगृहाजवळ बांधकाम सुरू असलेला उड्डाणपूल कोसळला. या अपघातात 26 जण ठार तर 89 जण जखमी झाले. आयव्हीआरसीएल समूहाची वार्षिक उलाढाल पाच हजार कोटी रुपयांची आहे. समूहाचे मुख्यालय हैदराबाद येथे असून चेन्नई, बंगळूर, पुणे, कोलकाता, अहमदाबाद, नवी दिल्ली या ठिकाणीही समूहाची कार्यालये आहेत. त्यानंतर कंपनीची शहरातील कार्यालये सील करण्यात आली आहेत. पश्‍चिम बंगाल सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये तर जखमींच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
=====================================
चीनकडून महत्त्वपूर्ण "विज्ञान उपग्रहा'चे प्रक्षेपण
बीजिंग - गुरुत्वाकर्षण (मायक्रोग्रॅव्हिटी) आणि अवकाशामधील विविध घटकांचा अभ्यास करण्याच्या उद्देशार्थ चीनने आज (बुधवार) एका उपग्रहाचे (SJ-10) प्रक्षेपण केले. चीनमधील गोबीच्या वाळवंटातील जिउकान उपग्रहण उड्डाण केंद्रामधून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. हा उपग्रह विशिष्ट काळानंतर पुन्हा पृथ्वीवर परतणार असून या काळात अवकाशात मिळविलेल्या माहितीचे पृथ:करण करणे वैज्ञानिकांना शक्‍य होणार आहे. 

अवकाशात असताना या उपग्रहाच्या माध्यमामधून अवकाशातील विविध घटकांची माहिती मिळविण्यासाठी एकूण 19 वैज्ञानिक प्रयोग केले जाणार आहेत. या प्रयोगांमध्ये अवकाशात मानवी प्रजननाच्या शक्‍यतेविषयीची माहिती मिळविण्यासंदर्भातील प्रयोगाचाही समावेश आहे. याचबरोबर, या वैज्ञानिक मोहिमेमध्ये अवकाशामधील किरणोत्साराचाही अभ्यास केला जाणार आहे. 

या उपग्रहाच्या माध्यमामधून केले जाणारे प्रयोग हे सर्वस्वी नवे असून ते याआधी चीनमध्ये वा परदेशांतही करण्यात आलेले नाहीत, असे या प्रकल्पाचे मुख्य वैज्ञानिक हु वेनरुई यांनी म्हटले आहे. चीनच्या महत्त्वाकांक्षी वैज्ञानिक उपग्रह कार्यक्रमाच्या माध्यमामधून अवकाशात प्रक्षेपित केला जाणारा हा दुसरा उपग्रह आहे. 
=====================================
प्रवरा साखर कारखान्यात टाकीचा स्फोट; 2 ठार
शिर्डी (अहमदनगर)- विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरा साखर कारखान्यात उसाच्या मळीच्या टाकीचा स्फोट झाला. या स्फोटात 2 कामगारांचा मृत्यू झाला आहे. प्रवरानगर भागात आज (बुधवार) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, लोणी प्रवरानगर भागात असलेल्या प्रवरा साखर कारखान्यात उसाच्या मळीच्या टाकीचा स्फोट झाला. स्फोटात दोघांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. स्फोटाचे कारण समजू शकलेले नाही. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.
=====================================
कारागृहात अंमलीपदार्थ नेण्याचा महिलेचा प्रयत्न
मुजफ्फरानगर (उत्तर प्रदेश)- जिल्ह्यातील कारागृहात अंमलीपदार्थ पाठविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (बुधवार) दिली. 

कारागृहाचे अधीक्षक राकेश सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहिना नावाची महिला आपल्या नातेवाइकांना कारागृहात भेट घेण्यासाठी आली होती. कारागृहाच्या मख्य प्रवेशद्वारात झडती घेताना अंमलीपदार्थ आढळून आले. महिलेकडील अंमलीपदार्थ ताब्यात घेण्यात आले असून, तिला अटक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.
=====================================
भाजपच्या वर्धापनदिनानिमित्त लोह येथे पक्षाच्या कार्यालयासमोर ध्वजास मानवंदना 



No comments: